✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

'डर्टी पिक्चर' : उलाला...उलाला...उलाला...उलाला

स
सोत्रि यांनी
Fri, 12/02/2011 - 23:39  ·  लेख
लेख
बराच गाजावाजा करत आज एकदाचा ’डर्टी पिक्चर’ झळकला. फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो असला भक्तीभाव कधीच नव्हता. सध्या जास्त काही कामधाम नाही त्यात शुक्रवार, त्यामुळे फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो नाही पण फ़र्स्ट डेला पिक्चर टाकता आला. एका सी ग्रेड अभिनेत्री, सिल्क स्मिता, हीची शोकांतीका पडद्यावर दाखवली. पिक्चर मधे विषेश तसे काही नाही. तसे काही नाही म्हणजे, चांगली पटकथा, उत्कृष्ट दिग्दर्शन, उच्च निर्मीतीमुल्य वगैरे असले काही. साधी सरळधोपट कथा आहे. तसा 'आंबटशौकीन' मसाला भरपूर आहे. एका खेड्यातली लहान मुलगी जीला मोठ्या शहराचे आकर्षण आहे आणि तीची आई तीला शहरात नुसता झगमगाट आहे जो तिच्यासाठी चांगला नाही हे सांगत असते. जरा मोठी झाल्यावर ती पळून शहरात जात अगणित स्ट्रगलर्स प्रमाणे स्टुडिओज जे उंबरठे झिजवते. तुझ्यात काही नाही असे नकार सतत ऐकत असते. अशीच एकदा पिक्चर बघायला ती थिएटरमधे गेली असता एक माणुस तीला २० रुपये देऊन हॉटेलात चल असे म्हणतो. आणि इथे तीला उपरती होते की जर हा माणूस मला जर २० रुपये देऊ शकतो तर माझ्यात नक्कीच काहीतरी आहे. त्याला गुंगारा देउन ती तिथुन निसटते पण तीचा सिनेप्रवास 'सील्क' ह्या नावाने व्यवस्थित मार्गी लागतो. इथुन पुढे कथा आपल्याला माहिती असलेल्या नेहमीच्याच वाटेने पुढे जाते. तीचे नसरूद्दीन शहाबरोबर प्रेम प्रकरण, तीचे खुप सक्सेस मिळवणे, पुढे अहंकारामुळे मुजोरीपणा करणे, सरत्या काळात हताश होउन नैराश्य येणे आणी मग आत्महत्या अशी वळणे घेत हा चित्रपट संपतो. चित्रपटात बरेच पिटातल्या प्रेक्षकांना खूष करणारे संवाद आहेत. ते फारच बोल्ड आणि खुसखुशीत आहेत. बस चित्रपट म्हणून एवढेच. चित्रपटाला २ स्टार्स. अहो थांबा, एवढेच लिहायला हा लेख नाही लिहीला. ह्या सगळ्यात महत्वाचे राहीलेय की, ते म्हणजे 'विद्या बालन'. अगदी कमी चित्रपटात यादगार भुमिका करून, फिल्मफेअर सारखेच अनेक ­पुरस्कार मिळवणारी प्रतिथयश आणि आघाडीची अभिनेत्री, विद्या, जेव्हा सिल्क स्मितावर चित्रपट करणार असे जाहीर झाले तेव्हा सर्वांच्या भुवया वर गेल्या होत्या. त्यात प्रोमोजमधे होणारे तीचे दर्शन अधिकच उत्सुकता वाढवत होते. पण..... विद्या ही भूमिका अक्षरश: जगली आहे. सी ग्रेड अभितेत्रीच्या जिवनावरचा पिक्चर म्हणजे त्यात बोल्ड सीन्सची भरमार असणे सहाजिकच आहे. पण विद्याने कुठेही ते 'व्हल्गर'ते कडे झुकणार नाही ह्याची काळजी घेतली आहे. सगळ्याच बोल्ड सीन्समधे 'सेन्शुअल' दिसली आहे ती. सुरूवातीला स्ट्रगल करणारी आणि अगदी टिपीकल 'साऊथ ईंडिअन', चपट्या केसांचा, एकदम नॉन ग्लॅमरस लूक असणारी सिल्क एकदम खरीखुरी वाटते. तीला बघूनच असे वाटत रहाते की, अरे, ही कशी काय सेक्स बॉम्ब होऊ शकेल. पण त्यानंतर चित्रपटात ब्रेक मिळाल्यानंतरचा तीचा लूक तर एकदम घायाळ करणारा. असे कपडे घालूनही विद्या अजिबात न अवघडता वावरली आहे चित्रपटभर. ह्या भुमिकेसाठीतीने बरेच वजन वाढवले आहे. खासकरून जेव्हा तीचे करीयर उतरतीला लागलेले असते त्याकाळासाठी तर तिने वजन अतिशय वाढवले आहे. थुलथुलीत पोट, घेरदार मांड्या असल्या अवतारातही ती अजिबात न डगमगता अतिशय आत्मविश्वासाने तोकड्या कपड्यांमधे बिनधास्त 'शो ऑफ'करते. संपूर्ण पिक्चर फक्त तिच्यामुळे 'दर्शनिय' आणि 'सहनीय' झाला आहे. खरेच, हा फक्त विद्याचाच सिनेमा आहे. आता काही कमकुवत बाजू: पूर्ण चित्रपटात सिल्क नर्तकी म्हणून दाखवली आहे. पण विद्या नाचण्यात कमी पडते. तीथे तीचा ग्रेस सिल्क स्मीतासारखा नाही, कमी पडतो. इमरान हाश्मीचे कॅरॅक्टर एकदम हुकलेले वाटते. तो पिक्चरमध्ये नसता तरीही चालले असते. इंटरवलनंतर पिक्चरचा वेग जरा मंदावला जातो आणि चित्रपट जरा रटाळ होतो. मोराल ऑफ स्टोरी म्हणजे, विद्यासाठी एकदा(च) हा चित्रपट जरूर बघावा. पण जर विद्याच आवडत नसेल तर हा चित्रपट बघण्यात काही अर्थ नाही,पैसे आणि वेळ दोन्ही फुकट.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
मत
अनुभव
समीक्षा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
18589 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

नो नो नो

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/06/2011 - 12:46 नवीन
थत्ते चाचा, बहूदा कधी नाही ते हे साँग उचलेगिरी नसावे. बाकी हे गाणे मवाली चित्रपटातील आहे. असेच आपले अजून एक आवडते गाणे म्हणजे 'एका आंख मारू तो ...' ;) रविवारी आपण पण 'डर्टी पिक्चर' पाहीला. चित्रपट फक्त आणि फक्त विद्या बालन आणि धांसू संवाद ह्यांनीच व्यापलेला आहे, आणि म्हणूनच सुसह्य देखील झाला आहे. विद्या बालन शब्दश "बुम्बाट'. तिचा इश्किया देखील असाच मनात घर करुन राहीलेला चित्रपट. वेगळ्या विषयाला आणि आवाक्याला हिंदी दिग्दर्शक हात घालत नाहीत म्हणणार्‍यांनी हा चित्रपट जरूर पहावाच. अभिषेक चौबेचे डायरेक्शन आणि विशाल भारद्वाजचा स्क्रीन प्ले.. अमेझिंग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

रविवारी आपण पण 'डर्टी पिक्चर'

गणपा
Tue, 12/06/2011 - 14:01 नवीन
रविवारी आपण पण 'डर्टी पिक्चर' पाहीला.
थेटरात जौन का रे? नसल्यास....... हॅ हॅ हॅ तुला कळले असेलच मला काय म्हणायचेय ते. व्यनीची वाट पहात आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नाय नाय

परिकथेतील राजकुमार
Tue, 12/06/2011 - 14:29 नवीन
ह्या टैमाला थेटरात जाउन बघीतला. आणि गम्मत म्हणजे फुकटात पहायला मिळाला ;) ज्या प्रेमळ व्यक्तीने माझे तिकीट मी यायच्या आधीच काढून ठेवले, त्या व्यक्तीने पैसेच मागीतले नाहीत :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हॅ हॅ हॅ

सोत्रि
Tue, 12/06/2011 - 16:56 नवीन
त्या व्यक्तीने पैसेच मागीतले नाहीत
हॅ हॅ हॅ, महिमा बुम्बाट विद्याचा :lol: - (सध्या विद्यामय) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

परा, ह्या विद्यामय

सोत्रि
Tue, 12/06/2011 - 16:53 नवीन
परा, ह्या विद्यामय प्रतिसादाबद्दल माझ्याकडून एक लार्ज! चियर्स :beer: - (सध्या विद्यामय) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

प्रकाटाआ

सोत्रि
Tue, 12/06/2011 - 16:54 नवीन
द्विरूक्तीमुळे प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हो...

सोत्रि
Tue, 12/06/2011 - 19:16 नवीन
पण तसे विशाल - शेखरने मान्य केलेले आहेच. ८०च्या दशकातील गाण्यांनी इन्स्पायर्ड असे हे गाणे आहे आणि त्यामुळेच भप्पींना ते गाणे गायला लावायची आयडीया त्यांनी लढवली. भप्पीदांनीच हे एका मुलाखतीत सांगीतले आहे. व्हिडो मिळाला की डकवतोच. - (भप्पीदांच्या काही काही गाण्यांचा पंखा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

(भप्पींनी कोठून उचलले होते ते ठाऊक नाही).

चिंतामणी
गुरुवार, 12/08/2011 - 00:24 नवीन
थत्ते जी भप्पीदानी गाणे फक्त गायले आहे. संगीत दिग्दर्शन विशाल-शेखरचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

थत्ते चिच्चा - डान्राव

वपाडाव
Tue, 12/06/2011 - 19:02 नवीन
मिथुन लुथरियाच्या चित्रपटांची संवाद ही नेहमीच जमेची बाजु असते. ते संवाद रजत अरोडा याने लिहिलेले आहेत... वन्स अपॉन --- मुंबै मधील संवादही यानेचं लिहिले आहेत....
  • Log in or register to post comments

त्या व्हिडिओ साठी धन्यवाद ....खूप हसले !!

गौरी१२
Wed, 12/07/2011 - 11:34 नवीन
तो वरचा व्हिडिओ किती विनोदी आहे. गाणं छान आहे पण ते बघायला विनोदी आहे. त्यात "जीतुजीं"नी काय विनोदी डान्स केलाय .... ( डान्स कि योगासने केलीत ?;) ) खास करून सुरवातीचा भाग ते गाणे सुरु व्हायचा आधी (म्हणजे ०.१५ सेकंद ते ०.३४ सेकंद) १९ सेकंद एकच स्टेप केलीय जीतुजींनी.... तिथे खूप हसायला आले . (सकाळचा मॉर्निंग वॉक चा प्रकार फास्ट फॉरवर्ड मध्ये पहिल्यासारखा वाटला. ;) )
  • Log in or register to post comments

डर्टी बट नॉट डर्टी!

धमाल मुलगा
गुरुवार, 12/08/2011 - 11:11 नवीन
च्यायला, त्या डार्टी पिक्चरमध्ये इतकं काय मोठं अश्लिल वगैरे आहे ते काय कळ्ळं नाय बा. त्यात जे सीन्स आहेत तसे किंवा त्यापेक्षाही जास्त 'इंटेन्सिटी' असलेले सीन्स पेरलेले कित्येक हिंदी सिनेमे आहेत की. हां, आता सिनेमा एका अश्या बाईच्या जिवनावर आहे की जी 'तसल्या' भूमिका करायची, तर त्या अनुशंगाने सिनेमातले सीन्स बरेच फिके (माईल्ड ह्या अर्थाने म्हणतोय.) आहेत. विचार करा, भट्ट क्यांपने हा सिनेमा केला असता तर काय झालं असतं? सिनेमा पुर्णतः विद्या बालनचा आहे हे अगदी मान्य भो. बाकीचे आपले शब्दशः 'सपोर्टिंग अ‍ॅक्टर'. मला ह्या सिनेमातला सर्वात आवडलेला प्रसंग म्हणजे, शेवटी शेवटी सिल्कला कामं मिळेनाशी होतात, तेव्हा ती कामं मागत फिरताना, अगदी सुरुवातीला ज्यानं तीला हाकलून दिलेलं असतं त्याच्यासमोर येते. त्यावेळी तोही म्हणतो, "काम तर देता येणार नाही, पण काही पैशांची मदत करु शकेन" त्यावेळी सिल्क त्याला पाच रुपये मागते आणि तो गोंधळून फक्त पाच रुपये? विचारतो त्यानंतरची विद्याच्या चेहर्‍यावरचे भाव आणि संवादफेक....क्या बात है!
  • Log in or register to post comments

सगळी रजत अरोडाची कमाल आहे रे बाबा !!

वपाडाव
Fri, 12/09/2011 - 12:51 नवीन
मला ह्या सिनेमातला सर्वात आवडलेला प्रसंग म्हणजे, शेवटी शेवटी सिल्कला कामं मिळेनाशी होतात, तेव्हा ती कामं मागत फिरताना, अगदी सुरुवातीला ज्यानं तीला हाकलून दिलेलं असतं त्याच्यासमोर येते. त्यावेळी तोही म्हणतो, "काम तर देता येणार नाही, पण काही पैशांची मदत करु शकेन" त्यावेळी सिल्क त्याला पाच रुपये मागते आणि तो गोंधळून फक्त पाच रुपये? विचारतो त्यानंतरची विद्याच्या चेहर्‍यावरचे भाव आणि संवादफेक....क्या बात है!
लाँग लिव्ह रजत अरोडा !! लैच खच्चिक संवाद अन पटकथा लिहितो बे हा माणुस ...... टोप्या बंद ह्याला.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मला तर ब्वॉ 'डर्टी पिच्चर'मधे

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 12/09/2011 - 07:05 नवीन
मला तर ब्वॉ 'डर्टी पिच्चर'मधे विद्या बालनच्याही पुढे बरंच काही दिसलं. हे पहा.
  • Log in or register to post comments

.

स्पा
Fri, 12/09/2011 - 12:35 नवीन
.
  • Log in or register to post comments

स्पावड्या, "हा दुसर्‍या

प्यारे१
Fri, 12/09/2011 - 12:42 नवीन
स्पावड्या, "हा दुसर्‍या संस्थळावरचा बिन्दू इकडे आणून स्वतःची लाल करायचा प्रयत्न का करत आहेस रे तू? तुला हा बिन्दू इकडे देखील टाकता आला असताच ना? आधी मोठ्या तोर्‍यात गेलेलास ना तिकडे? आता का आता का? (प्रशांत दामले स्टाईल)" - कशी वाटते रे ही प्रतिक्रिया? मी एकदा देणारे बरं तुला! ;) अवांतरःसाला, कुत्रं विचारत नाही तरी फुडंफुडं करायची सवय जात नाही लोकांची..... मुख्य विषयः डर्टी पिच्चर पाहिला नाही. विद्या बालन प्रयोगशील अभिनेत्री आहे असं एकंदर दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

प्यारे

मी-सौरभ
Fri, 12/09/2011 - 15:38 नवीन
असल्या विक्षिप्त प्रतिक्रिया का देत आहात तुम्ही???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अरे राजा अंथरुण पाहून 'पाय'

प्यारे१
Fri, 12/09/2011 - 15:50 नवीन
अरे राजा अंथरुण पाहून 'पाय' पसर जरा. काहीपण का बोलतो आहेस ? ;) नाहीतर गणपाचा 'पाया' रस्सा हाणावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

..

मी-सौरभ
Fri, 12/09/2011 - 17:20 नवीन
स्वारी श्क्तीमान... गणपाने बनवलेला (गणपाचा नाही बरं) पाया खायला मी कधीही तयार आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

टारगेट !

सुहास..
Fri, 12/09/2011 - 17:30 नवीन
अवांतरःसाला, कुत्रं विचारत नाही तरी फुडंफुडं करायची सवय जात नाही लोकांची..... >>> मी काही बोललो की (टारगेट करण्याच्या लायकीचे नसलेले ) काही लोक्स लगेच 'टारगेट' करतो आहे म्हणुन बोंबलायला लागतात, म्हणुन तुर्तास " प्यारे गुर्जी की जय " म्हणतो आणि इथेच थांबतो ;) धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

=)) हा बिंदू कलात्मकेतेच

स्पा
Fri, 12/09/2011 - 12:45 नवीन
=)) हा बिंदू कलात्मकेतेच प्रतिक आहे असा अपमान करू न्ये त्याचा
  • Log in or register to post comments

इतरत्र दिलेला प्रतिसाद देतोय.

मन१
Fri, 12/09/2011 - 17:37 नवीन
चित्रपट फार तर घरी बघाय्च्या कामाचा वाटतोय. मला मुळात असा म्रुत व्यक्तीचे काहीतरीच चित्रण करणारे पिक्चर काढावेत का असा प्रश्न पडतो. मागे थेट्रात जाउन "shoot out at lokhandwala" हा बॉलीवूडपत पाहिला होता. त्यातला एक गुंड (IIT graduate)माया डोळस(विवेक ओबेरॉय) गुंडागर्दी सुरु करताना , वाढवत जाताना त्याची आई अमृता सिंग त्याला कसे अजून अजून हल्कत, गुंड, नीच,भड्वा बनायला उद्युक्त करते हे दाखवले आहे. एक अत्यंत घाणेरडे, विकृत पात्र म्हणजे त्या गुंडाची आई असे दाखवले आहे. कुठलीही आई आपल्या मुलाला असे करील असे वाटत नाही. ती स्त्री आजही जिवंत आहे. तिने ह्या चित्रपटातील अशा चित्रणाविरुद्ध कोर्टाची पायरीही गाठली होती. पण बहुतांश गरिब व निराधारांचा होतो तसाच तिचाही तित्थे पराभव झाला व चित्रपट उच्चारवात सुरुच राहिला. हे सांगायचे कारण काय, की तेव्हापासून अशा सत्यकथा म्हणवून घेणार्‍या व्यावसायिक चित्रपटांची तिडिक बसली. शहाण्याने व्यावसायिक सिनेमे बनवातेत किंवा थेट माहितीपट(documentary)ससंदर्भ बनवावा. कुणाच्याही जीवनाची किंवा मृत्यूची अशी थट्टा मांडून थेट्रात त्याचा "खेळ" करु नये. पण कुणाला काय दाखवतोय ह्याचे भान ठेवावे. चित्रपट पाहिल्यावर हा तिच्यावर "आधारित" सिनेमा आहे व चित्रण जसेच्या तसे नाही हे समजणारे आपल्या तुमच्याआमच्यासारखे सुबुद्ध इथे तरी अत्यल्प संख्येने आहेत. इतरांसाठी "ती तशीच होती. त्यात दाखवले आहे ना." असे म्हणत चवीचवीने गप्पा मारायची सोय होते. कुणाही बद्दल असे बोललेले दाखवलेले मला तर आवडत नाही. कल्पना करा एखाद्याच्या काही "असे काही" घडले आहे व घरच्यांना त्याचा आधीच बराच त्रास आहे. त्यात पुन्हा माध्यमे "अरेरे किती हा त्रास "म्हणत पुन्हा पुन्हा तोच तोच प्रसंग आंबटशौकीन समाजात दाखवतात तेव्हा त्यांना वेदनायुक्त आयुष्य जगायला भाग पाडतात. आजही अशा माठ्यांमध्ये वावरतो की जे तावातावाने अकबर्-सलिम-अनारकली ह्यांच्याबद्द्ल मुघल ए आजम बघून व तो खरा समजून बोलत असतात. त्यांना कितीही कळवळून सांगितले की "बाबा रे त्या पिक्चर मध्ये सर्व काही निव्वळ cinematic liberty म्हणूनच पहा. सलिम्-अनारकलीच्या ऐकिव दंतकथेत एक germ सापडला म्हणून त्या के आसिफने त्याचा एक परिकथेसम चित्रपट बनवला आहे. त्यात जी एवढी मोठ्ठी शेवटची लढाई व शाहजादा सलिमचे धैर्य दाखवले आहे, ते मुळात घडलेलेच नाही. म्हणजे आख्खीच्या आख्खी लढाई ही निव्वळ फ्यंटसी आहे." मूळ सलिम व अकबर कसेही असले तरी असे नक्कीच नव्हते. तरी पब्लिक ऐकत नाही. "अशा" पब्लिक मध्ये "तसे" वर्णन करून दाखवणे, तेही सत्य व्यक्तीचे म्हणजे त्याच्या परिचितांना मनस्तापच ना. मनोरंजनासाठी बॉलीवूडवाले कशाचे काय करतील सांगता येत नाही."बॉलीवूड" हा एकच शब्द माझा पूर्वग्रह बनवण्यास पुरेसा आहे.असो. माझे शब्द तोकडे पडताहेत. आता थांबतो. चित्रपट पाहून मग नक्कीच पुन्हा प्रतिक्रिया देइन. disclaimer:- माझ्या तक्रारी मुख्यतः अशा चित्रपटांबद्द्ल आहेत. परिक्षण जमले आहेच, ह्यात शंका नाही.
  • Log in or register to post comments

आय टी आय पास

प्रभो
Fri, 12/09/2011 - 20:34 नवीन
ओ भाऊ तो माया डोळस आय टी आय पास असतो..आय आय टी नाही.... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

मनोरंजनासाठी बॉलीवूडवाले

सोत्रि
Fri, 12/09/2011 - 19:27 नवीन
मनोरंजनासाठी बॉलीवूडवाले कशाचे काय करतील सांगता येत नाही."बॉलीवूड"
मनराव, हे मात्र अगदी लाख बोल्लात. १००% सहमत. - (तरीही बॉलीवूड प्रेमी) सोकाजी
  • Log in or register to post comments

सिल्क स्मिता चे सिनेमे कोणते आहेत ?

चित्रगुप्त
Fri, 03/16/2012 - 20:41 नवीन
विद्या बालन साठी हा सिनेमा बघितला, अतिशय आवडला.... यावरून उत्सुकता निर्माण झाली, ती अशी की सिल्क स्मिता चे सिनेमे कोणकोणते आहेत ? जालावर आहेत का ?
  • Log in or register to post comments

एका हिंदी सिनेमात बघीतल्याचे आठवत आहे.

चिंतामणी
Sat, 03/17/2012 - 10:34 नवीन
श्रीदेवी- कमलहसनचा सदमा. (चित्रपट छान आहे. पण सिल्क स्मिथावाला भाग ठिगल लालल्यासारखा वाटतो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा