Skip to main content

'डर्टी पिक्चर' : उलाला...उलाला...उलाला...उलाला

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 02/12/2011 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
बराच गाजावाजा करत आज एकदाचा ’डर्टी पिक्चर’ झळकला. फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो असला भक्तीभाव कधीच नव्हता. सध्या जास्त काही कामधाम नाही त्यात शुक्रवार, त्यामुळे फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो नाही पण फ़र्स्ट डेला पिक्चर टाकता आला. एका सी ग्रेड अभिनेत्री, सिल्क स्मिता, हीची शोकांतीका पडद्यावर दाखवली. पिक्चर मधे विषेश तसे काही नाही. तसे काही नाही म्हणजे, चांगली पटकथा, उत्कृष्ट दिग्दर्शन, उच्च निर्मीतीमुल्य वगैरे असले काही. साधी सरळधोपट कथा आहे. तसा 'आंबटशौकीन' मसाला भरपूर आहे. एका खेड्यातली लहान मुलगी जीला मोठ्या शहराचे आकर्षण आहे आणि तीची आई तीला शहरात नुसता झगमगाट आहे जो तिच्यासाठी चांगला नाही हे सांगत असते. जरा मोठी झाल्यावर ती पळून शहरात जात अगणित स्ट्रगलर्स प्रमाणे स्टुडिओज जे उंबरठे झिजवते. तुझ्यात काही नाही असे नकार सतत ऐकत असते. अशीच एकदा पिक्चर बघायला ती थिएटरमधे गेली असता एक माणुस तीला २० रुपये देऊन हॉटेलात चल असे म्हणतो. आणि इथे तीला उपरती होते की जर हा माणूस मला जर २० रुपये देऊ शकतो तर माझ्यात नक्कीच काहीतरी आहे. त्याला गुंगारा देउन ती तिथुन निसटते पण तीचा सिनेप्रवास 'सील्क' ह्या नावाने व्यवस्थित मार्गी लागतो. इथुन पुढे कथा आपल्याला माहिती असलेल्या नेहमीच्याच वाटेने पुढे जाते. तीचे नसरूद्दीन शहाबरोबर प्रेम प्रकरण, तीचे खुप सक्सेस मिळवणे, पुढे अहंकारामुळे मुजोरीपणा करणे, सरत्या काळात हताश होउन नैराश्य येणे आणी मग आत्महत्या अशी वळणे घेत हा चित्रपट संपतो. चित्रपटात बरेच पिटातल्या प्रेक्षकांना खूष करणारे संवाद आहेत. ते फारच बोल्ड आणि खुसखुशीत आहेत. बस चित्रपट म्हणून एवढेच. चित्रपटाला २ स्टार्स. अहो थांबा, एवढेच लिहायला हा लेख नाही लिहीला. ह्या सगळ्यात महत्वाचे राहीलेय की, ते म्हणजे 'विद्या बालन'. अगदी कमी चित्रपटात यादगार भुमिका करून, फिल्मफेअर सारखेच अनेक ­पुरस्कार मिळवणारी प्रतिथयश आणि आघाडीची अभिनेत्री, विद्या, जेव्हा सिल्क स्मितावर चित्रपट करणार असे जाहीर झाले तेव्हा सर्वांच्या भुवया वर गेल्या होत्या. त्यात प्रोमोजमधे होणारे तीचे दर्शन अधिकच उत्सुकता वाढवत होते. पण..... विद्या ही भूमिका अक्षरश: जगली आहे. सी ग्रेड अभितेत्रीच्या जिवनावरचा पिक्चर म्हणजे त्यात बोल्ड सीन्सची भरमार असणे सहाजिकच आहे. पण विद्याने कुठेही ते 'व्हल्गर'ते कडे झुकणार नाही ह्याची काळजी घेतली आहे. सगळ्याच बोल्ड सीन्समधे 'सेन्शुअल' दिसली आहे ती. सुरूवातीला स्ट्रगल करणारी आणि अगदी टिपीकल 'साऊथ ईंडिअन', चपट्या केसांचा, एकदम नॉन ग्लॅमरस लूक असणारी सिल्क एकदम खरीखुरी वाटते. तीला बघूनच असे वाटत रहाते की, अरे, ही कशी काय सेक्स बॉम्ब होऊ शकेल. पण त्यानंतर चित्रपटात ब्रेक मिळाल्यानंतरचा तीचा लूक तर एकदम घायाळ करणारा. असे कपडे घालूनही विद्या अजिबात न अवघडता वावरली आहे चित्रपटभर. ह्या भुमिकेसाठीतीने बरेच वजन वाढवले आहे. खासकरून जेव्हा तीचे करीयर उतरतीला लागलेले असते त्याकाळासाठी तर तिने वजन अतिशय वाढवले आहे. थुलथुलीत पोट, घेरदार मांड्या असल्या अवतारातही ती अजिबात न डगमगता अतिशय आत्मविश्वासाने तोकड्या कपड्यांमधे बिनधास्त 'शो ऑफ'करते. संपूर्ण पिक्चर फक्त तिच्यामुळे 'दर्शनिय' आणि 'सहनीय' झाला आहे. खरेच, हा फक्त विद्याचाच सिनेमा आहे. आता काही कमकुवत बाजू: पूर्ण चित्रपटात सिल्क नर्तकी म्हणून दाखवली आहे. पण विद्या नाचण्यात कमी पडते. तीथे तीचा ग्रेस सिल्क स्मीतासारखा नाही, कमी पडतो. इमरान हाश्मीचे कॅरॅक्टर एकदम हुकलेले वाटते. तो पिक्चरमध्ये नसता तरीही चालले असते. इंटरवलनंतर पिक्चरचा वेग जरा मंदावला जातो आणि चित्रपट जरा रटाळ होतो. मोराल ऑफ स्टोरी म्हणजे, विद्यासाठी एकदा(च) हा चित्रपट जरूर बघावा. पण जर विद्याच आवडत नसेल तर हा चित्रपट बघण्यात काही अर्थ नाही,पैसे आणि वेळ दोन्ही फुकट.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18654
प्रतिक्रिया 75

प्रतिक्रिया

धन्यवाद सोकाजीराव! बादलीभर लाळ गळाली वगैरे पाकृ प्रतिक्रीया चालतील का? चविनी चित्रं बघून घेतली. आता लेख वाचतो! :)

हे भगवान! ही विद्या बालन उताराला लागलेल्या नसरु चाचाच्या माथी यावी ना. ;-) इश्किया मध्येही, त्या राजनीती मध्येपण आणखी कुणीतरी (की हीच हो?) आणि इथेही.

In reply to by कपिलमुनी

मेलो तिच्यायला..ठसकून उसकून!

या नावाचा शिनेमा येतोय हेच मुळात २ दिवसांपूर्वी विद्या बालचे भजे (प्रतिसाद) वाचल्यावर समजले. मग त्याचा ट्रेलर पाहिला आणि शिनेमाची उत्सुकता वाटायला लागली. आता वेळ मिळाल्यावर पाहीन. उगीच घाईगडबडीने (तरातरा जाऊन) पाहण्यासारखा नाही हे कळवल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by रेवती

रेवती (किंवा आणखी कोणी ताई / माई / आक्का / वैनी / काकू / आज्जी...ज्याने त्याने आपापल्या वयाप्रमाणे संबोधन वापरा) यांनी न टंकलेला प्रतिसादाचा भाग .... खालचे वाक्य मग काहितरीच काय... तरातरा जाउन पहायला तो काय शारुक किंवा जॉनचा शिनेमा वाटला ;)

In reply to by कपिलमुनी

कपिलमुनी, अहो पिक्चरचा विषयच असा आहे की विद्या आणि तीचे हे फोटो ह्या शिवाय दुसरे काहीच नाही त्यात. त्यामुळे फक्त ह्या फोटोंमुळे 'हिरवा' म्हणत असाल तर सांगतो, हा चित्रपट सह'कुटंब' बघितला गेल्या आहे. 'कसली 'सेन्शुअल' दिसते ना विद्या' हा माझ्या बायकोचा डायलॉग आहे पिक्चर बघतानाचा. :) चला, आता विद्याचे फोटो 'डोळेभरून' पहाताना पकडलो गेलो तरी हरकत नाही ;) - (सध्या 'विद्या'मय) सोकाजी

In reply to by किचेन

हो का काय झाले? :shock: बायकोच म्हणाली होती की हा सिनेमा 'बघायचाच' म्हणुन :) - (सहकुटुंब विद्यामय झालेला) सोकजी

In reply to by सोत्रि

नशीबवान आहात. ;) मी तर माझ्या नवर्याला चुकुनही परवानगी देणार नाही.अगदी घरी सी डि आणून पण नाही.

In reply to by किचेन

अहो नवर्‍याने दुसर्‍या कुणाबरोबर जाऊन तो पिक्चर बघितला जाण्यापेक्षा तुमच्याबरोबर बघितलेला बरा की नाही? सांगा, पटले की नाही? ;) (कृ. ह. घे.) - (सध्या विद्यामय) सोकाजी

In reply to by सोत्रि

माझा नवरा पत्नीवार्ता आहे.तो अस कधीच करणार नाही.माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. समजा तुमच्या बायकोने परवानगी दिली नसती तर काय तुम्ही शेजारच्याच्या बायकोला घेऊन गेला असता? ;)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमे गुरुजी धन्यवाद मला ते पतिव्रताप्रमाणे पत्नीव्रता वाटल होतं रच्याकने पत्नीनिष्ठ हा पर्याय कसा वाटतो?

In reply to by जाई.

>>मिस्टेक कबूल तुम्ही मिपावर किंवा एकूणच जालावर नवीन दिसत आहात. नाही, पटकन चूक कबूल केली म्हणून म्हटले ;-) >>विमे गुरुजी धन्यवाद गुरुजी नका म्हणू. त्यासाठी खूपच वेगळे लिखाण करावे लागते म्हणे (मुळात लिखाण करावे लागते). >>मला ते पतिव्रताप्रमाणे पत्नीव्रता वाटल होतं. रच्याकने पत्नीनिष्ठ हा पर्याय कसा वाटतो? चांगला आहे की, किचेन ताईंना कसा वाटतो, ते एकदा विचारून घेऊ.

In reply to by किचेन

ये बात कुछ हजम नही हुई .... तुमचा तुमच्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे मग चित्रपट बघण्यासारख्या निरुपद्रवी गोष्टीवर बंदी का? असे चित्रपट बघून तो लगेच नॉन पत्नीव्रत होईल अशी भीती वाटते का हो ?? ;-)

In reply to by किचेन

मी तर माझ्या नवर्याला चुकुनही परवानगी देणार नाही.अगदी घरी सी डि आणून पण नाही. तुम्ही नक्की किचेनताई आहात की किचेन दादा? नाही म्हणजे तुम्ही नवर्‍याला परवानगी देणार नसल्यापेक्षा तुम्हालाच बायको परवानगी देत नसावी असं वाटतंय ;) बाकी हा चित्रपट 'सहकुटुंब' का बघू नये याचं कारण कळलं नाही. मी तर स्वतःच हा चित्रपट डाऊनलोड करून नवर्‍यासोबत पाहिला.

In reply to by स्मिता.

बाकी हा चित्रपट 'सहकुटुंब' का बघू नये याचं कारण कळलं नाही. मी तर स्वतःच हा चित्रपट डाऊनलोड करून नवर्‍यासोबत पाहिला.
एक नंबर, मलाही हेच म्हणायचे होते :) - (सहकुटुंब विद्यामय) सोकाजी

In reply to by किचेन

असली म्हणजे कसली? (हे वाक्य तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकात जसे म्हणले आहे त्या अर्थाने घ्यावे ;) )

सोत्रिला कंपूतून डच्चू देण्यात आलेला आहे ! असे शिणीमे फक्त 'डायरेक्टर्स कट' बघायचे असतात राव. ;) कधी शिकणार तुम्ही ? असो.. आता तुम्ही नियम मोडलाच आहात तर आम्ही देखील बघून घेतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

हो रे, हो खरं आहे तुझे. मलाही खरेतर शिनेमे 'डायरेक्टर्स कट' बघायलाच आवडतं. पण ह्या वेळेला दोन कारणे होती. १. इश्किया बघितल्यापासून विद्या माझ्या टॉप ५ लिस्ट मधे फार वर आली आहे आणि प्रोमोज मधेले तीचे 'रुपडे' फारच 'गोंडस' दिसत होते. २. कधी नव्हे ती बायकोची आज्ञा झाली की हा पिक्चर बघायचाच म्हणून ( तुला नाही अजुन हे कळायचे ;) ) - (सध्या 'विद्यामय') सोकाजी

In reply to by सोत्रि

इष्किया नावाचा सिनेमा आहे? शिनेमा कसा आहे याबद्दल क्रिपया कळवणे. बाकी विद्या मिळवण्याबाबत कोणतेही बोलणे द्व्यर्थी वाटू शकेल.;)

In reply to by रेवती

इष्किया नावाचा सिनेमा आहे?
होय.
शिनेमा कसा आहे याबद्दल क्रिपया कळवणे.
भिकार. आम्ही तर डाउलोड केला होता.. तो सुद्धा पुर्ण बघु शकलो नाही. - इंटिया ;)

In reply to by इंटरनेटस्नेही

माहितीबद्दल धन्यवाद. सध्या तुम्ही (सोकाजी व इंटाजी) दोघेही विद्यार्थी आहात.;) आपली आज्ञाधारक, विद्यार्थीनी

In reply to by रेवती

आज्जे, बाकी, माणूस अनंतकाळाचा विद्यार्थी असतो हे तु सिद्ध केलेस बर का ;) असो, इश्किया हा चित्रपट विद्याइतकाच चांगला आहे. पण ह्या चित्रपटाची जान आहे अर्शद वारसी. 'डर्टी..' मधे फक्त विद्या लक्षात रहाते तसे इश्कियाचे नाही. चित्रपटातील प्रत्येक पात्र लक्षात रहाते आणि स्टोरीत चपखल बसते. सबब इश्किया बघण्याचे करून अभिप्राय कळविणे. - (विद्या आणि अर्शदचा पंखा) सोकाजी

In reply to by रेवती

प्रॉमिसल्याप्रमाणे अभिप्राय देतिये. (विमानात पाहिला) इश्किया आवडला. सगळ्यांची कामे चांगली झालीत. मला खरच वाटलं होतं की विद्याचा नवरा मेलाय म्हणून. नंतर मात्र मरतो. काही प्रसंग पळवत पाहिले कारण मुलगा शेजारीच बसून बघत होता.;)

In reply to by रेवती

(विमानात पाहिला) इश्किया आवडला.
आपण विमानाने प्रवास करतो हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न. ;) कृपया हलकेच घेणे. ;)
मला खरच वाटलं होतं की विद्याचा नवरा मेलाय म्हणून.
हीच या चित्रपटाची खासियत आहे. ;) =))

एक वेगळा हाताळलेला विषय म्हणुन सिनेमा पाहायला काहीच हरकत नाही. विद्याचे रुपडे पाहायला बाकी कसाही का असेना चित्रपट झेलु शकतो. :)

आताच्या काळात विद्या हि दिसायला सुंदर आहेच पण एकमेव "अभिनय" करणारी अभिनेत्री आहे. मला विद्या "पा " चित्रपटात प्रचंड आवडली होती. तीचासाठी मला हा 'डर्टी.. सिमेमा पाहायचाय ..... :) (मिपा वाले ..... ते उलाला .. गाण्यातलं "लाडकी तू है बडी बुमबाट ..." म्हणजे काय ?? :) )

In reply to by गौरी१२

आताच्या काळात विद्या हि दिसायला सुंदर आहेच पण एकमेव "अभिनय" करणारी अभिनेत्री आहे
प्रचंड सहमत!
"लाडकी तू है बडी बुमबाट ..." म्हणजे काय ??
बुमबाट म्हणजे रापचिक असावे ;) अ‍ॅक्चुली अश्या शब्दांचे अर्थ नसतात शोधायचे भावना समजून घ्यायच्या असतात :lol: - (सध्या विद्यामय) सोकाजी

पिक्चर बरा आहे. पिक्चरच्या सुरवातीलाच एक जबराट, बुम्बाट साऊथ इंडियन म्युझिकचा तुकडा दिल खुष करुन टाकतो. पुर्वार्ध नक्कीच चांगला आहे, शेवटी शेवटी पिक्चर जरा गुंडाळल्यासारखा वाटला आणि त्यामुळे बरेच तुकडे मिस झाल्याने त्याचा बॅलन्स गेला, शेवटचे काही मिनिट्स तर खुप कंटाळल्यासारखे झाले होते. असो. काही चांगले मुद्दे : १. सगळ्यांची अ‍ॅक्टिंग ( हो, तुषार कपुरचीही अ‍ॅक्टिंग बरी होती, त्याने ह्यापेक्षा जास्त प्रयत्न केला असता तर हास्यास्पद झाले असते ) २. डायलॉक्स ... एकदम तुफान आहेत ! ३. नेमकी आणि सुरेल गाणी .... उलाला उलाला आणि इश्क सुफियाना थोडक्यात : कुठे डिव्हिडी वगैरे मिळाली किंवा नेटवरुन उतरवुन घेतला असेल तर 'पळवत पळवत' पाहण्यासारखा आहे, असो. ;) - (काटछाटप्रिय)छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

>>नेमकी आणि सुरेल गाणी .... उलाला उलाला आणि इश्क सुफियाना उलाला उलाला हे भप्पी लाहिरींच्या (जितू-जया प्रदाच्या) "उइ अम्मा उइ अम्मा..... साडी हवा हो गयी" वरून सरळ उचललेलं गाणं आहे - मधल्या पीसेस सकट(भप्पींनी कोठून उचलले होते ते ठाऊक नाही).

In reply to by नितिन थत्ते

थत्ते चाचा, बहूदा कधी नाही ते हे साँग उचलेगिरी नसावे. बाकी हे गाणे मवाली चित्रपटातील आहे. असेच आपले अजून एक आवडते गाणे म्हणजे 'एका आंख मारू तो ...' ;) रविवारी आपण पण 'डर्टी पिक्चर' पाहीला. चित्रपट फक्त आणि फक्त विद्या बालन आणि धांसू संवाद ह्यांनीच व्यापलेला आहे, आणि म्हणूनच सुसह्य देखील झाला आहे. विद्या बालन शब्दश "बुम्बाट'. तिचा इश्किया देखील असाच मनात घर करुन राहीलेला चित्रपट. वेगळ्या विषयाला आणि आवाक्याला हिंदी दिग्दर्शक हात घालत नाहीत म्हणणार्‍यांनी हा चित्रपट जरूर पहावाच. अभिषेक चौबेचे डायरेक्शन आणि विशाल भारद्वाजचा स्क्रीन प्ले.. अमेझिंग.

In reply to by परिकथेतील राजकुमार

रविवारी आपण पण 'डर्टी पिक्चर' पाहीला.
थेटरात जौन का रे? नसल्यास....... हॅ हॅ हॅ तुला कळले असेलच मला काय म्हणायचेय ते. व्यनीची वाट पहात आहे. ;)

In reply to by गणपा

ह्या टैमाला थेटरात जाउन बघीतला. आणि गम्मत म्हणजे फुकटात पहायला मिळाला ;) ज्या प्रेमळ व्यक्तीने माझे तिकीट मी यायच्या आधीच काढून ठेवले, त्या व्यक्तीने पैसेच मागीतले नाहीत :P

In reply to by परिकथेतील राजकुमार

त्या व्यक्तीने पैसेच मागीतले नाहीत
हॅ हॅ हॅ, महिमा बुम्बाट विद्याचा :lol: - (सध्या विद्यामय) सोकाजी

In reply to by परिकथेतील राजकुमार

परा, ह्या विद्यामय प्रतिसादाबद्दल माझ्याकडून एक लार्ज! चियर्स :beer: - (सध्या विद्यामय) सोकाजी

In reply to by नितिन थत्ते

पण तसे विशाल - शेखरने मान्य केलेले आहेच. ८०च्या दशकातील गाण्यांनी इन्स्पायर्ड असे हे गाणे आहे आणि त्यामुळेच भप्पींना ते गाणे गायला लावायची आयडीया त्यांनी लढवली. भप्पीदांनीच हे एका मुलाखतीत सांगीतले आहे. व्हिडो मिळाला की डकवतोच. - (भप्पीदांच्या काही काही गाण्यांचा पंखा) सोकाजी

मिथुन लुथरियाच्या चित्रपटांची संवाद ही नेहमीच जमेची बाजु असते. ते संवाद रजत अरोडा याने लिहिलेले आहेत... वन्स अपॉन --- मुंबै मधील संवादही यानेचं लिहिले आहेत....

तो वरचा व्हिडिओ किती विनोदी आहे. गाणं छान आहे पण ते बघायला विनोदी आहे. त्यात "जीतुजीं"नी काय विनोदी डान्स केलाय .... ( डान्स कि योगासने केलीत ?;) ) खास करून सुरवातीचा भाग ते गाणे सुरु व्हायचा आधी (म्हणजे ०.१५ सेकंद ते ०.३४ सेकंद) १९ सेकंद एकच स्टेप केलीय जीतुजींनी.... तिथे खूप हसायला आले . (सकाळचा मॉर्निंग वॉक चा प्रकार फास्ट फॉरवर्ड मध्ये पहिल्यासारखा वाटला. ;) )

च्यायला, त्या डार्टी पिक्चरमध्ये इतकं काय मोठं अश्लिल वगैरे आहे ते काय कळ्ळं नाय बा. त्यात जे सीन्स आहेत तसे किंवा त्यापेक्षाही जास्त 'इंटेन्सिटी' असलेले सीन्स पेरलेले कित्येक हिंदी सिनेमे आहेत की. हां, आता सिनेमा एका अश्या बाईच्या जिवनावर आहे की जी 'तसल्या' भूमिका करायची, तर त्या अनुशंगाने सिनेमातले सीन्स बरेच फिके (माईल्ड ह्या अर्थाने म्हणतोय.) आहेत. विचार करा, भट्ट क्यांपने हा सिनेमा केला असता तर काय झालं असतं? सिनेमा पुर्णतः विद्या बालनचा आहे हे अगदी मान्य भो. बाकीचे आपले शब्दशः 'सपोर्टिंग अ‍ॅक्टर'. मला ह्या सिनेमातला सर्वात आवडलेला प्रसंग म्हणजे, शेवटी शेवटी सिल्कला कामं मिळेनाशी होतात, तेव्हा ती कामं मागत फिरताना, अगदी सुरुवातीला ज्यानं तीला हाकलून दिलेलं असतं त्याच्यासमोर येते. त्यावेळी तोही म्हणतो, "काम तर देता येणार नाही, पण काही पैशांची मदत करु शकेन" त्यावेळी सिल्क त्याला पाच रुपये मागते आणि तो गोंधळून फक्त पाच रुपये? विचारतो त्यानंतरची विद्याच्या चेहर्‍यावरचे भाव आणि संवादफेक....क्या बात है!

In reply to by धमाल मुलगा

मला ह्या सिनेमातला सर्वात आवडलेला प्रसंग म्हणजे, शेवटी शेवटी सिल्कला कामं मिळेनाशी होतात, तेव्हा ती कामं मागत फिरताना, अगदी सुरुवातीला ज्यानं तीला हाकलून दिलेलं असतं त्याच्यासमोर येते. त्यावेळी तोही म्हणतो, "काम तर देता येणार नाही, पण काही पैशांची मदत करु शकेन" त्यावेळी सिल्क त्याला पाच रुपये मागते आणि तो गोंधळून फक्त पाच रुपये? विचारतो त्यानंतरची विद्याच्या चेहर्‍यावरचे भाव आणि संवादफेक....क्या बात है!
लाँग लिव्ह रजत अरोडा !! लैच खच्चिक संवाद अन पटकथा लिहितो बे हा माणुस ...... टोप्या बंद ह्याला.....

.

In reply to by स्पा

स्पावड्या, "हा दुसर्‍या संस्थळावरचा बिन्दू इकडे आणून स्वतःची लाल करायचा प्रयत्न का करत आहेस रे तू? तुला हा बिन्दू इकडे देखील टाकता आला असताच ना? आधी मोठ्या तोर्‍यात गेलेलास ना तिकडे? आता का आता का? (प्रशांत दामले स्टाईल)" - कशी वाटते रे ही प्रतिक्रिया? मी एकदा देणारे बरं तुला! ;) अवांतरःसाला, कुत्रं विचारत नाही तरी फुडंफुडं करायची सवय जात नाही लोकांची..... मुख्य विषयः डर्टी पिच्चर पाहिला नाही. विद्या बालन प्रयोगशील अभिनेत्री आहे असं एकंदर दिसतंय.

In reply to by प्यारे१

अवांतरःसाला, कुत्रं विचारत नाही तरी फुडंफुडं करायची सवय जात नाही लोकांची..... >>> मी काही बोललो की (टारगेट करण्याच्या लायकीचे नसलेले ) काही लोक्स लगेच 'टारगेट' करतो आहे म्हणुन बोंबलायला लागतात, म्हणुन तुर्तास " प्यारे गुर्जी की जय " म्हणतो आणि इथेच थांबतो ;) धन्यवाद