✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

'डर्टी पिक्चर' : उलाला...उलाला...उलाला...उलाला

स
सोत्रि यांनी
Fri, 12/02/2011 - 23:39  ·  लेख
लेख
बराच गाजावाजा करत आज एकदाचा ’डर्टी पिक्चर’ झळकला. फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो असला भक्तीभाव कधीच नव्हता. सध्या जास्त काही कामधाम नाही त्यात शुक्रवार, त्यामुळे फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो नाही पण फ़र्स्ट डेला पिक्चर टाकता आला. एका सी ग्रेड अभिनेत्री, सिल्क स्मिता, हीची शोकांतीका पडद्यावर दाखवली. पिक्चर मधे विषेश तसे काही नाही. तसे काही नाही म्हणजे, चांगली पटकथा, उत्कृष्ट दिग्दर्शन, उच्च निर्मीतीमुल्य वगैरे असले काही. साधी सरळधोपट कथा आहे. तसा 'आंबटशौकीन' मसाला भरपूर आहे. एका खेड्यातली लहान मुलगी जीला मोठ्या शहराचे आकर्षण आहे आणि तीची आई तीला शहरात नुसता झगमगाट आहे जो तिच्यासाठी चांगला नाही हे सांगत असते. जरा मोठी झाल्यावर ती पळून शहरात जात अगणित स्ट्रगलर्स प्रमाणे स्टुडिओज जे उंबरठे झिजवते. तुझ्यात काही नाही असे नकार सतत ऐकत असते. अशीच एकदा पिक्चर बघायला ती थिएटरमधे गेली असता एक माणुस तीला २० रुपये देऊन हॉटेलात चल असे म्हणतो. आणि इथे तीला उपरती होते की जर हा माणूस मला जर २० रुपये देऊ शकतो तर माझ्यात नक्कीच काहीतरी आहे. त्याला गुंगारा देउन ती तिथुन निसटते पण तीचा सिनेप्रवास 'सील्क' ह्या नावाने व्यवस्थित मार्गी लागतो. इथुन पुढे कथा आपल्याला माहिती असलेल्या नेहमीच्याच वाटेने पुढे जाते. तीचे नसरूद्दीन शहाबरोबर प्रेम प्रकरण, तीचे खुप सक्सेस मिळवणे, पुढे अहंकारामुळे मुजोरीपणा करणे, सरत्या काळात हताश होउन नैराश्य येणे आणी मग आत्महत्या अशी वळणे घेत हा चित्रपट संपतो. चित्रपटात बरेच पिटातल्या प्रेक्षकांना खूष करणारे संवाद आहेत. ते फारच बोल्ड आणि खुसखुशीत आहेत. बस चित्रपट म्हणून एवढेच. चित्रपटाला २ स्टार्स. अहो थांबा, एवढेच लिहायला हा लेख नाही लिहीला. ह्या सगळ्यात महत्वाचे राहीलेय की, ते म्हणजे 'विद्या बालन'. अगदी कमी चित्रपटात यादगार भुमिका करून, फिल्मफेअर सारखेच अनेक ­पुरस्कार मिळवणारी प्रतिथयश आणि आघाडीची अभिनेत्री, विद्या, जेव्हा सिल्क स्मितावर चित्रपट करणार असे जाहीर झाले तेव्हा सर्वांच्या भुवया वर गेल्या होत्या. त्यात प्रोमोजमधे होणारे तीचे दर्शन अधिकच उत्सुकता वाढवत होते. पण..... विद्या ही भूमिका अक्षरश: जगली आहे. सी ग्रेड अभितेत्रीच्या जिवनावरचा पिक्चर म्हणजे त्यात बोल्ड सीन्सची भरमार असणे सहाजिकच आहे. पण विद्याने कुठेही ते 'व्हल्गर'ते कडे झुकणार नाही ह्याची काळजी घेतली आहे. सगळ्याच बोल्ड सीन्समधे 'सेन्शुअल' दिसली आहे ती. सुरूवातीला स्ट्रगल करणारी आणि अगदी टिपीकल 'साऊथ ईंडिअन', चपट्या केसांचा, एकदम नॉन ग्लॅमरस लूक असणारी सिल्क एकदम खरीखुरी वाटते. तीला बघूनच असे वाटत रहाते की, अरे, ही कशी काय सेक्स बॉम्ब होऊ शकेल. पण त्यानंतर चित्रपटात ब्रेक मिळाल्यानंतरचा तीचा लूक तर एकदम घायाळ करणारा. असे कपडे घालूनही विद्या अजिबात न अवघडता वावरली आहे चित्रपटभर. ह्या भुमिकेसाठीतीने बरेच वजन वाढवले आहे. खासकरून जेव्हा तीचे करीयर उतरतीला लागलेले असते त्याकाळासाठी तर तिने वजन अतिशय वाढवले आहे. थुलथुलीत पोट, घेरदार मांड्या असल्या अवतारातही ती अजिबात न डगमगता अतिशय आत्मविश्वासाने तोकड्या कपड्यांमधे बिनधास्त 'शो ऑफ'करते. संपूर्ण पिक्चर फक्त तिच्यामुळे 'दर्शनिय' आणि 'सहनीय' झाला आहे. खरेच, हा फक्त विद्याचाच सिनेमा आहे. आता काही कमकुवत बाजू: पूर्ण चित्रपटात सिल्क नर्तकी म्हणून दाखवली आहे. पण विद्या नाचण्यात कमी पडते. तीथे तीचा ग्रेस सिल्क स्मीतासारखा नाही, कमी पडतो. इमरान हाश्मीचे कॅरॅक्टर एकदम हुकलेले वाटते. तो पिक्चरमध्ये नसता तरीही चालले असते. इंटरवलनंतर पिक्चरचा वेग जरा मंदावला जातो आणि चित्रपट जरा रटाळ होतो. मोराल ऑफ स्टोरी म्हणजे, विद्यासाठी एकदा(च) हा चित्रपट जरूर बघावा. पण जर विद्याच आवडत नसेल तर हा चित्रपट बघण्यात काही अर्थ नाही,पैसे आणि वेळ दोन्ही फुकट.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
चित्रपट
लेखनप्रकार (Writing Type)
मत
अनुभव
समीक्षा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
18589 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

हे काय नुसती चित्रंच टाकलीत

गणपा
Fri, 12/02/2011 - 23:46 नवीन
हे काय नुसती चित्रंच टाकलीत ? . . . . . . . . . . . . . ;)
  • Log in or register to post comments

हलवा मग

कुंदन
Fri, 12/02/2011 - 23:52 नवीन
हलवा मग धागा "कलादालन" मध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

(No subject)

टवाळ कार्टा
Fri, 12/02/2011 - 23:48 नवीन
:P
  • Log in or register to post comments

हाण्ण!

दादा कोंडके
Fri, 12/02/2011 - 23:58 नवीन
धन्यवाद सोकाजीराव! बादलीभर लाळ गळाली वगैरे पाकृ प्रतिक्रीया चालतील का? चविनी चित्रं बघून घेतली. आता लेख वाचतो! :)
  • Log in or register to post comments

हे भगवान! ही विद्या बालन

यकु
Sat, 12/03/2011 - 00:08 नवीन
हे भगवान! ही विद्या बालन उताराला लागलेल्या नसरु चाचाच्या माथी यावी ना. ;-) इश्किया मध्येही, त्या राजनीती मध्येपण आणखी कुणीतरी (की हीच हो?) आणि इथेही.
  • Log in or register to post comments

नसरुद्दीन चाचा

कपिलमुनी
Sat, 12/03/2011 - 07:04 नवीन
लकी माणुस ( कोणत्या भांड्यामधुन पाणी पितो...चौकशी केली पाहिजे )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

विद्या नावाचे भारी बेन नसरू चाचाच्या हाती पडले

विवेकखोत
Tue, 12/06/2011 - 16:10 नवीन
चांदीच्या ग्लासा तून पीत असेल बहुतेक :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

खोत

कपिलमुनी
Tue, 12/06/2011 - 18:02 नवीन
खोतांची बाल्यावस्था संपून पौगंडावस्था सुरु झाली आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकखोत

ठ्ठ्ठो!

धमाल मुलगा
गुरुवार, 12/08/2011 - 11:11 नवीन
मेलो तिच्यायला..ठसकून उसकून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

या नावाचा शिनेमा येतोय हेच

रेवती
Sat, 12/03/2011 - 01:11 नवीन
या नावाचा शिनेमा येतोय हेच मुळात २ दिवसांपूर्वी विद्या बालचे भजे (प्रतिसाद) वाचल्यावर समजले. मग त्याचा ट्रेलर पाहिला आणि शिनेमाची उत्सुकता वाटायला लागली. आता वेळ मिळाल्यावर पाहीन. उगीच घाईगडबडीने (तरातरा जाऊन) पाहण्यासारखा नाही हे कळवल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

रेवती (किंवा आणखी कोणी ताई /

टवाळ कार्टा
Sat, 12/03/2011 - 01:49 नवीन
रेवती (किंवा आणखी कोणी ताई / माई / आक्का / वैनी / काकू / आज्जी...ज्याने त्याने आपापल्या वयाप्रमाणे संबोधन वापरा) यांनी न टंकलेला प्रतिसादाचा भाग .... खालचे वाक्य मग काहितरीच काय... तरातरा जाउन पहायला तो काय शारुक किंवा जॉनचा शिनेमा वाटला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

शाहरूख आणि जॉन घाणेरडे

रेवती
Sat, 12/03/2011 - 09:50 नवीन
शाहरूख आणि जॉन घाणेरडे वाटतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

लैच भारी.... बघुया कधी योग

सुहास झेले
Sat, 12/03/2011 - 05:13 नवीन
लैच भारी.... बघुया कधी योग येतोय बघायचा ;)
  • Log in or register to post comments

हिरवा सोका

कपिलमुनी
Sat, 12/03/2011 - 07:06 नवीन
;)
  • Log in or register to post comments

कपिलमुनी,अहो पिक्चरचा विषयच

सोत्रि
Sat, 12/03/2011 - 10:59 नवीन
कपिलमुनी, अहो पिक्चरचा विषयच असा आहे की विद्या आणि तीचे हे फोटो ह्या शिवाय दुसरे काहीच नाही त्यात. त्यामुळे फक्त ह्या फोटोंमुळे 'हिरवा' म्हणत असाल तर सांगतो, हा चित्रपट सह'कुटंब' बघितला गेल्या आहे. 'कसली 'सेन्शुअल' दिसते ना विद्या' हा माझ्या बायकोचा डायलॉग आहे पिक्चर बघतानाचा. :) चला, आता विद्याचे फोटो 'डोळेभरून' पहाताना पकडलो गेलो तरी हरकत नाही ;) - (सध्या 'विद्या'मय) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हि असली चित्र असलेला सिनेमा

किचेन
Wed, 12/07/2011 - 13:05 नवीन
हि असली चित्र असलेला सिनेमा तुम्ही सहकुंब बघितलात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

चित्र नाही हो, चलचित्रं

प्रचेतस
Wed, 12/07/2011 - 13:10 नवीन
चित्र नाही हो, चलचित्रं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

???

सोत्रि
Wed, 12/07/2011 - 17:00 नवीन
हो का काय झाले? :shock: बायकोच म्हणाली होती की हा सिनेमा 'बघायचाच' म्हणुन :) - (सहकुटुंब विद्यामय झालेला) सोकजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

नशीबवान आहात. मी तर माझ्या

किचेन
Wed, 12/07/2011 - 17:08 नवीन
नशीबवान आहात. ;) मी तर माझ्या नवर्याला चुकुनही परवानगी देणार नाही.अगदी घरी सी डि आणून पण नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

अहो नवर्‍याने दुसर्‍या

सोत्रि
Wed, 12/07/2011 - 18:03 नवीन
अहो नवर्‍याने दुसर्‍या कुणाबरोबर जाऊन तो पिक्चर बघितला जाण्यापेक्षा तुमच्याबरोबर बघितलेला बरा की नाही? सांगा, पटले की नाही? ;) (कृ. ह. घे.) - (सध्या विद्यामय) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

_/\__/\__/\_

प्रचेतस
Wed, 12/07/2011 - 18:07 नवीन
_/\__/\__/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

माझा नवरा पत्नीवार्ता आहे.तो

किचेन
Wed, 12/07/2011 - 18:34 नवीन
माझा नवरा पत्नीवार्ता आहे.तो अस कधीच करणार नाही.माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. समजा तुमच्या बायकोने परवानगी दिली नसती तर काय तुम्ही शेजारच्याच्या बायकोला घेऊन गेला असता? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

पत्नीवार्ता नाही हो

जाई.
Wed, 12/07/2011 - 18:59 नवीन
पत्नीवार्ता नाही हो पत्नीव्रता असे टंका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

जाई बाई, नवरा स्त्रीलिंगी

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 12/19/2011 - 21:28 नवीन
जाई बाई, नवरा स्त्रीलिंगी असतो का हो ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.

मिस्टेक कबूल

जाई.
Mon, 12/19/2011 - 21:57 नवीन
विमे गुरुजी धन्यवाद मला ते पतिव्रताप्रमाणे पत्नीव्रता वाटल होतं रच्याकने पत्नीनिष्ठ हा पर्याय कसा वाटतो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

>>मिस्टेक कबूल तुम्ही मिपावर

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 12/21/2011 - 14:06 नवीन
>>मिस्टेक कबूल तुम्ही मिपावर किंवा एकूणच जालावर नवीन दिसत आहात. नाही, पटकन चूक कबूल केली म्हणून म्हटले ;-) >>विमे गुरुजी धन्यवाद गुरुजी नका म्हणू. त्यासाठी खूपच वेगळे लिखाण करावे लागते म्हणे (मुळात लिखाण करावे लागते). >>मला ते पतिव्रताप्रमाणे पत्नीव्रता वाटल होतं. रच्याकने पत्नीनिष्ठ हा पर्याय कसा वाटतो? चांगला आहे की, किचेन ताईंना कसा वाटतो, ते एकदा विचारून घेऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई.

काहीतरीच काय?

वपाडाव
गुरुवार, 12/08/2011 - 10:37 नवीन
तुम्ही शेजारच्याच्या बायकोला घेऊन गेला असता?
ते तिच्यावर अवलंबुन असेल ? हो का नाय सोकाजी..........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

ये बात कुछ हजम नही हुई

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 12/19/2011 - 21:27 नवीन
ये बात कुछ हजम नही हुई .... तुमचा तुमच्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे मग चित्रपट बघण्यासारख्या निरुपद्रवी गोष्टीवर बंदी का? असे चित्रपट बघून तो लगेच नॉन पत्नीव्रत होईल अशी भीती वाटते का हो ?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

आँ?

स्मिता.
Wed, 12/07/2011 - 18:58 नवीन
मी तर माझ्या नवर्याला चुकुनही परवानगी देणार नाही.अगदी घरी सी डि आणून पण नाही. तुम्ही नक्की किचेनताई आहात की किचेन दादा? नाही म्हणजे तुम्ही नवर्‍याला परवानगी देणार नसल्यापेक्षा तुम्हालाच बायको परवानगी देत नसावी असं वाटतंय ;) बाकी हा चित्रपट 'सहकुटुंब' का बघू नये याचं कारण कळलं नाही. मी तर स्वतःच हा चित्रपट डाऊनलोड करून नवर्‍यासोबत पाहिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

+१

सोत्रि
Wed, 12/07/2011 - 19:00 नवीन
बाकी हा चित्रपट 'सहकुटुंब' का बघू नये याचं कारण कळलं नाही. मी तर स्वतःच हा चित्रपट डाऊनलोड करून नवर्‍यासोबत पाहिला.
एक नंबर, मलाही हेच म्हणायचे होते :) - (सहकुटुंब विद्यामय) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्मिता.

???

अन्या दातार
Wed, 12/07/2011 - 23:50 नवीन
असली म्हणजे कसली? (हे वाक्य तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकात जसे म्हणले आहे त्या अर्थाने घ्यावे ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

मॉर्निंग शो टाकणेचा इचार

अत्रुप्त आत्मा
Sat, 12/03/2011 - 10:38 नवीन
मॉर्निंग शो टाकणेचा इचार करणेत येइल...परिक्षण झ्याक झाले हाय... :-)
  • Log in or register to post comments

श्या !

परिकथेतील राजकुमार
Sat, 12/03/2011 - 12:31 नवीन
सोत्रिला कंपूतून डच्चू देण्यात आलेला आहे ! असे शिणीमे फक्त 'डायरेक्टर्स कट' बघायचे असतात राव. ;) कधी शिकणार तुम्ही ? असो.. आता तुम्ही नियम मोडलाच आहात तर आम्ही देखील बघून घेतो.
  • Log in or register to post comments

हो रे, हो खरं आहे तुझे.

सोत्रि
Sat, 12/03/2011 - 14:32 नवीन
हो रे, हो खरं आहे तुझे. मलाही खरेतर शिनेमे 'डायरेक्टर्स कट' बघायलाच आवडतं. पण ह्या वेळेला दोन कारणे होती. १. इश्किया बघितल्यापासून विद्या माझ्या टॉप ५ लिस्ट मधे फार वर आली आहे आणि प्रोमोज मधेले तीचे 'रुपडे' फारच 'गोंडस' दिसत होते. २. कधी नव्हे ती बायकोची आज्ञा झाली की हा पिक्चर बघायचाच म्हणून ( तुला नाही अजुन हे कळायचे ;) ) - (सध्या 'विद्यामय') सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

इष्किया नावाचा सिनेमा

रेवती
Sat, 12/03/2011 - 19:04 नवीन
इष्किया नावाचा सिनेमा आहे? शिनेमा कसा आहे याबद्दल क्रिपया कळवणे. बाकी विद्या मिळवण्याबाबत कोणतेही बोलणे द्व्यर्थी वाटू शकेल.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

इष्किया नावाचा सिनेमा

इंटरनेटस्नेही
Sat, 12/03/2011 - 19:25 नवीन
इष्किया नावाचा सिनेमा आहे?
होय.
शिनेमा कसा आहे याबद्दल क्रिपया कळवणे.
भिकार. आम्ही तर डाउलोड केला होता.. तो सुद्धा पुर्ण बघु शकलो नाही. - इंटिया ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

???

सोत्रि
Sat, 12/03/2011 - 21:46 नवीन
भिकार
जरा खुलासा कराल का? - (सध्या विद्यामय) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

विद्या बालन तर चांगलीच आहे

इंटरनेटस्नेही
Sun, 12/04/2011 - 01:05 नवीन
विद्या बालन तर चांगलीच आहे यात काही वाद नाही.. पण चित्रपट मात्र खास नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

माहितीबद्दल धन्यवाद. सध्या

रेवती
Sun, 12/04/2011 - 02:06 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद. सध्या तुम्ही (सोकाजी व इंटाजी) दोघेही विद्यार्थी आहात.;) आपली आज्ञाधारक, विद्यार्थीनी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

आज्जे, बाकी, माणूस अनंतकाळाचा

सोत्रि
Sun, 12/04/2011 - 09:50 नवीन
आज्जे, बाकी, माणूस अनंतकाळाचा विद्यार्थी असतो हे तु सिद्ध केलेस बर का ;) असो, इश्किया हा चित्रपट विद्याइतकाच चांगला आहे. पण ह्या चित्रपटाची जान आहे अर्शद वारसी. 'डर्टी..' मधे फक्त विद्या लक्षात रहाते तसे इश्कियाचे नाही. चित्रपटातील प्रत्येक पात्र लक्षात रहाते आणि स्टोरीत चपखल बसते. सबब इश्किया बघण्याचे करून अभिप्राय कळविणे. - (विद्या आणि अर्शदचा पंखा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

शिनेमा (इष्किया) बघायचा

रेवती
Sun, 12/04/2011 - 10:31 नवीन
शिनेमा (इष्किया) बघायचा प्रयत्न करीन, अर्थातच अभिप्राय देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

प्रॉमिसल्याप्रमाणे अभिप्राय

रेवती
Fri, 12/09/2011 - 11:53 नवीन
प्रॉमिसल्याप्रमाणे अभिप्राय देतिये. (विमानात पाहिला) इश्किया आवडला. सगळ्यांची कामे चांगली झालीत. मला खरच वाटलं होतं की विद्याचा नवरा मेलाय म्हणून. नंतर मात्र मरतो. काही प्रसंग पळवत पाहिले कारण मुलगा शेजारीच बसून बघत होता.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

(विमानात पाहिला) इश्किया

इंटरनेटस्नेही
Tue, 12/20/2011 - 01:34 नवीन
(विमानात पाहिला) इश्किया आवडला.
आपण विमानाने प्रवास करतो हे दाखवण्याचा क्षीण प्रयत्न. ;) कृपया हलकेच घेणे. ;)
मला खरच वाटलं होतं की विद्याचा नवरा मेलाय म्हणून.
हीच या चित्रपटाची खासियत आहे. ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

एक वेगळा हाताळलेला विषय

मोहनराव
Sat, 12/03/2011 - 17:14 नवीन
एक वेगळा हाताळलेला विषय म्हणुन सिनेमा पाहायला काहीच हरकत नाही. विद्याचे रुपडे पाहायला बाकी कसाही का असेना चित्रपट झेलु शकतो. :)
  • Log in or register to post comments

विद्या साठी पाहण्यास हरकत नाही

वेताळ
Sun, 12/04/2011 - 18:15 नवीन
आताच्या सहाफुटी सरळसोट हिरोईनामध्ये दिसायला चांगली हिच वाटते.
  • Log in or register to post comments

याबाब्बो...

धमाल मुलगा
गुरुवार, 12/08/2011 - 11:12 नवीन
सरळसोट विरुध्द वळसेदार असा हा सरळसोट सामना आहे हे मान्य केल्याशिवाय पर्यायच नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

मला पाहायचाय ..... :)

गौरी१२
Tue, 12/06/2011 - 10:48 नवीन
आताच्या काळात विद्या हि दिसायला सुंदर आहेच पण एकमेव "अभिनय" करणारी अभिनेत्री आहे. मला विद्या "पा " चित्रपटात प्रचंड आवडली होती. तीचासाठी मला हा 'डर्टी.. सिमेमा पाहायचाय ..... :) (मिपा वाले ..... ते उलाला .. गाण्यातलं "लाडकी तू है बडी बुमबाट ..." म्हणजे काय ?? :) )
  • Log in or register to post comments

+१

सोत्रि
Tue, 12/06/2011 - 11:21 नवीन
आताच्या काळात विद्या हि दिसायला सुंदर आहेच पण एकमेव "अभिनय" करणारी अभिनेत्री आहे
प्रचंड सहमत!
"लाडकी तू है बडी बुमबाट ..." म्हणजे काय ??
बुमबाट म्हणजे रापचिक असावे ;) अ‍ॅक्चुली अश्या शब्दांचे अर्थ नसतात शोधायचे भावना समजून घ्यायच्या असतात :lol: - (सध्या विद्यामय) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरी१२

बरा आहे ...

छोटा डॉन
Tue, 12/06/2011 - 11:00 नवीन
पिक्चर बरा आहे. पिक्चरच्या सुरवातीलाच एक जबराट, बुम्बाट साऊथ इंडियन म्युझिकचा तुकडा दिल खुष करुन टाकतो. पुर्वार्ध नक्कीच चांगला आहे, शेवटी शेवटी पिक्चर जरा गुंडाळल्यासारखा वाटला आणि त्यामुळे बरेच तुकडे मिस झाल्याने त्याचा बॅलन्स गेला, शेवटचे काही मिनिट्स तर खुप कंटाळल्यासारखे झाले होते. असो. काही चांगले मुद्दे : १. सगळ्यांची अ‍ॅक्टिंग ( हो, तुषार कपुरचीही अ‍ॅक्टिंग बरी होती, त्याने ह्यापेक्षा जास्त प्रयत्न केला असता तर हास्यास्पद झाले असते ) २. डायलॉक्स ... एकदम तुफान आहेत ! ३. नेमकी आणि सुरेल गाणी .... उलाला उलाला आणि इश्क सुफियाना थोडक्यात : कुठे डिव्हिडी वगैरे मिळाली किंवा नेटवरुन उतरवुन घेतला असेल तर 'पळवत पळवत' पाहण्यासारखा आहे, असो. ;) - (काटछाटप्रिय)छोटा डॉन
  • Log in or register to post comments

?

नितिन थत्ते
Tue, 12/06/2011 - 12:15 नवीन
>>नेमकी आणि सुरेल गाणी .... उलाला उलाला आणि इश्क सुफियाना उलाला उलाला हे भप्पी लाहिरींच्या (जितू-जया प्रदाच्या) "उइ अम्मा उइ अम्मा..... साडी हवा हो गयी" वरून सरळ उचललेलं गाणं आहे - मधल्या पीसेस सकट(भप्पींनी कोठून उचलले होते ते ठाऊक नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा