✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पराठे वाला कट्टा

५
५० फक्त यांनी
Tue, 08/30/2011 - 09:10  ·  लेख
लेख
एका तहात दुस-या तहाची बीजं असतात असं म्हणलं जातं,तसंच होतं, एका कट्ट्यालाच पुढच्या कट्ट्याच्या ठिकाण ठरवलं जातं, राहते ते फक्त दिवस आणि वेळ ठरवणं. २९ जुलैच्या कट्ट्यातच दोन ठिकाणांवर चर्चा झाल्या होत्या, एक दिल्ली किचन (प्रस्तावक-श्री.वपाडाव) आणि दुसरं शाजीज पराठा हाउस. व्यनि, फोन, एसेमेस इत्यादीच वापर मुबलक वापर करुन २७ ला संध्याकाळी शाजीज पराठा हाउस इथं जमायचं ठरलं,कट्ट्याला काहीतरी वेगळं करायचं होतं,दोन गोष्टी होत्या एक या हाटेलातलं च्यालेंज आणि दुसरी श्री. जयंत कुलकर्णींना भेटणे, अन्या दातारनं त्यांना खव आणि व्यनितुन येण्याचा आग्रह केलेलाच होता, आणि शुक्रुवारी त्यांचा येणार असल्याचा व्यनि आला. अन्या दातार कोल्हापुरहुन खरगपुरला जाता जाता कट्ट्यासाठी पुण्यात थांबणार होता तर सुधांशु अन किसन शिंदे हे मुंबईकर म्हणजे हुंबईकर पावसात आले होते. शनिवार उजाडला आणि दिवस मावळत आला तो पावसातच, पावसामुळं किती जण येतात आणि कसं हे जरा अवघड वाटत होतं, पण जयंत कुलकर्णी, अन्या दातार आणि मी सारसबागेजवळ भेटुन रविवार पेठेत पोहोचेपर्यंत वल्ली, धनाजीराव, वपाडाव व आत्मशुन्य पोहोचलेले होते. जयंत कुलकर्णीच्या एका धाग्यातल्या उल्लेखाप्रमाणे त्यांच्या वयाबद्दल जो अंदाज केलेला होता तो साफ चुकला, हिरवं मन हिरव्या टिशर्ट सारखंच मोकळेपणानं कॅरी करणारा हा माणुस दिसता क्षणी प्रभावित करुन गेला. इतिहासात रमणा-या या माणसानं सारस बाग ते रविवार पेठ या प्रवासात त्यांच्या फिनलंडमधल्या वास्तव्यातल्या धमाल किस्से ऐकवले. शाहजि मध्ये एकत्र आल्यावर व्हर्चुअल जगात दिलेले शब्द प्रत्यक्ष जगात पाळले जातात याचा याचि देही प्रत्यय आला, एक म्हणजे अन्यानं वपाडाव साठी कोल्हापुरहुन आणलेले भडंग आणि दुसरी म्हणजे धनाजीरावनं जे त्याच्या ’मुलगी वाचवा’ या धाग्यावर पोस्टर्स केलेली होती, त्याचे प्रिंटस, सामाजिक बांधिलकीच्या भान ठेवण्याच्या फक्त जालीय गप्पा न मारता प्रत्यक्ष क्रुती करणा-या धनाजीरावांना धन्यवाद व त्यांच्या या कार्याला शुभेच्छा. आम्ही आपलं लगेच जयंत कुलकर्णींच्या हस्ते एक छोटासा उदघाटन सोहळा आटोपुन घेतला, फोटो काढले आणि कट्ट्याची सुरुवात प्रथेप्रमाणे वड्या खाउन झाली, यावेळी खोब-याच्या वड्या अन्यानं आणलेल्या होत्या, हा फोटो बॉक्स रिकामा होण्यापुर्वी ०.२६५७९८ सेकंद काढलेला आहे. शाजीमधलं च्यालेंज हे फक्त सोमवार ते शुक्रुवार ह्याच दिवसात असतं हे कळाल्यानं आत्मशुन्यला एका महिन्यात दोन च्यालेंज घेण्याची संधि हुकल्याची हुरहुर लागली होती, पण हुरहुरीचे मुळ मालक, पराग दिवेकर यांचे अटलबिहारी वेशात आगमन झाल्यावर त्याने ती गुपचुप परत केली व मेन्यु कार्ड पहायला सुरुवात केली. त्यानंतर पहिल्यांदाच भेटणारा मन१ आला आणि हुंबईकर (याचा अर्थासाठी संपर्क - वपाडाव) किसन शिंदे व सुधांशु यांचे हुंबईहुन आगमन झालं; कोरम पुर्ण झाला आणि आता आर्डर दिली नाही तर हाकलुन देतील अशी वेळ येउ नये यासाठी आर्डर दिल्या गेल्या. पहिल्या राउंडला मिक्स व्हेज, पनीर, मेथी, आलु चिज, असे सर्व पराठे मागवुन संपवल्यानंतर आणि मेन्यु कार्डात लिहिल्याप्रमाणे ’ आर्डर देण्यापुर्वी पराठ्याच्या आकाराची खात्री करुन घ्यावी’ खात्री झाल्यामुळं, पिचचा अंदाज आल्यावर बॅट्समन जसा खुलुन खेळायला लागतो, तश्या रिलेमध्ये आर्डरी सुटत गेल्या आणि टेबल व त्यावरच्या प्लेटा रिकाम्या न राहता परोठे व नान येत गेले आणि संपत गेले. आमच्या टेबलवर तर पडलेल्या लोणच्याच्या मिरच्यांची देठं ही काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या सारखी आणि बटरच्या रिकाम्या डब्या दारुगोळ्याच्या रिकाम्या डब्यासारखे दिसत होते. हाटेलच्या बैठकव्यवस्थेमुळं ग्रुप जरी दोन भागात विभागला होता तरी दुस-या टेबलवर सुद्धा थोड्याफार फरकानं हिच परिस्थिती होती. मन१ आणि जयंत कुलकर्णी हे पहिल्यांदाच येणारे सदस्य सुद्धा वल्ली, सुधांशु, किसन शिंदे आणि अन्या दातार यांच्या साथित खुलली होती हे आवाजावरनं कळत होतं. सगळे पराठे आवडल्या गेल्या असल्याने तसेच आकाराचा व पार्टनरांचा अंदाज आल्याने हरी मिर्च पराठा पण मागवला, आणि त्येच्यायला पहिलाच घास मी तोंडात टाकला, एकतर गरम आणि नेमका त्यातच मिरचीचा तुकडा, असलं तोंड पोळलं की उगा कुठुन असला धागा काढला असं होतं तसं झालं. पण कट्ट्याची ओपनिंग पेअर वपाडाव आणि आत्मशुन्यनं हे पण आव्हान लिलया पेललं. मध्ये एक दोन वेळा आवाजाबद्दल सुचना मिळाल्यानंतर आवाज खाली आलेच अन हाटेलातल्या गर्दिचे प्रमाण पाहुन चर्चेचे विषय सुद्धा बरेच सभ्य झाले, कट्ट्याचा शेवट पतियाला लस्सीनं झाला, दोन ग्लास पतियाला लस्सी पाच जणांत संपवली, म्हणजे एकेकाला एक ग्लास चालला असता पण आधी खाल्लेले पराठे हे शाजीच्या च्यालेंजपेक्षा जास्त आहेत याची सुचना पोटातुन दिली जात असल्यानं शेअर इट हा मार्ग पत्करला गेला. बाहेरची वेटिंगची बाढलेली गर्दी आणि वेटर/मालकांच्या चेह-यावरचे चिंतेचे भाव पाहुन बाहेर येउन पुन्हा प्रथेप्रमाणे गप्पा मारण्याचा ठरवुन बाहेर आलो, एक तासभर विविध विषयावर साधक बाधक चर्चा करुन, पोस्टरच्या उदघाटनानं सुरु झालेला कट्टा जयंत कुलकर्णीना त्यांच्या मराठा इंनफ्र्टीच्या पुस्तकासाठी शुभेच्छ एका छोट्यश्या भेटीच्या रुपात देउन कट्ट्याचे मेंबर निघायला सुरुवात झाली, लांब राहणारे वल्ली, जयंत कुलकर्णी तसेच मन१ व पराग दिवेकर गेल्यानंतर पुन्हा अर्धा तास जागा बदलुन गप्पा मारुन धनाजीराव, वपाडाव, आत्मशुन्य, किसन शिंदे, सुधांशु, अन्या दातार व मी पुन्हा एकदा निरोप घेउन निघालो, ते पुढच्या कट्ट्याचं ठरवुनच.. ही बारा कट्ट्यांची कहाणी, साता कट्टी संपुर्ण.. सुचना - सध्या बाजारात असलेले इनोचे शॉर्टेज पाहता पराठ्यांचे जास्त फोटो टाकलेले नाहीत. असं हि काढायला वेळ कुणाला होता, तिथं.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
राहती जागा
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
33390 वाचन

💬 प्रतिसाद (140)

प्रतिक्रिया

उत्तम वृत्तांत

प्रचेतस
Tue, 08/30/2011 - 09:37 नवीन
उत्तम वृत्तांत दिलात ५० फक्त. शाजी'ज मधले चुर चुर नान तर लै भारी. नान मध्ये पनीरचा चुरा करून त्याचे स्टफिंग केले जाते व नानला घड्या घालून 'कोन'सारखा आकार दिला जातो. चवीला एकदम सुंदर लागते. अगदी नुसते खाल्ले तरी हरकत नाही. बाकी पराठ्यांबद्दल आम्ही पामर काय बोलू. ते तर चवीला अप्रतिमच. पतियाळा लस्सी तर चवीला अतिशय छान. इतर ठिकाणी लस्सी म्हणजे उगाच पातळ श्रीखंड खाल्यासारखं वाटतं, इथली लस्सी अस्सल पंजाबी चवीची, ग्लास बघूनच दडपायला होणारी. जयंत कुलकर्णींबरोबर बर्‍याच चर्चा करता आल्या त्या निमित्ताने एका चतुरस्त्र माणसाची ओळख झाली. हुंबैकर खास पावसातून इकडील कट्ट्याला आल्यामुळे त्यांचे खास आभार. आत्मशून्यला च्यालेंज पूर्ण करण्याची संधी हुकल्याने तो लवकरच वीकडेजला जाउन च्यालेंज पूर्ण करणार हे निश्चित. (मी पण बरोबर येणार :) )
  • Log in or register to post comments

आनि मी पण च्यालेंज स्विकारणार

गणेशा
Tue, 08/30/2011 - 15:23 नवीन
आनि मी पण च्यालेंज स्विकारणार आहे, वल्ली आपण दोघे आक्रमणास निघु. यावेळेस माझा घोडा आणत आहे... बाकी कट्ट्याला यावेळी येता नाही आल्याने वाईट वाटले.. पराठ्यामुळे नाही वप्या ( तुझा असाच प्रतिसाद ध्यानात घेवुन आधीच तुला बोलतोय, आणि आयोजक आहे ना तु .. अरे वा ) तर वाईट वाटले आपले नविन मित्र .. धनाजीराव, जयंतराव आणि परागशेठ यांना भेटता आले नाही म्हणुन.. बाकी आत्मशुन्य ... कधी जायचे रे परत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@गणेशा आणी समस्त पराठेप्रेमी लोकहो

आत्मशून्य
Tue, 08/30/2011 - 16:05 नवीन
फिल फ्री टू कॉल/व्यनी मी एनी टाइम इन विक्डेज, आय एम लूकींग फॉर्वर्ड टू मीट दी चायलेंज ए.एस.ए.पी. दीवस ताबडतोप ठरवावा, ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

मी १ ते ४ पुण्यात आहे ...

गणेशा
Tue, 08/30/2011 - 16:50 नवीन
मी १ ते ४ पुण्यात आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

आणी मी सदानकदा पराठा चायलेंजच्या तयारीत

आत्मशून्य
Tue, 08/30/2011 - 17:13 नवीन
इट्स योर कॉल नाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

ठरल्यावर

प्रचेतस
Tue, 08/30/2011 - 17:32 नवीन
ठरल्यावर मला सांगा रे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

तूला सांगूच नक्कि.

आत्मशून्य
Tue, 08/30/2011 - 17:45 नवीन
पण मूळातच हे चायलेंज घ्यायला जाणे, हे काही मिपाकरांची मिपाकरांशी कट्टा विरहहीत ओळख असल्याच्या प्रखर वास्तवाखाली येत असल्याने ते पार पडल्यानंतर त्याचा सच्चित्र वृत्तांताचा धागा अथवा कोणत्याही प्रकारे तमाशा वगैरे होइल याची अपेक्षा तेव्हडी ठेऊ नकोस म्हणजे झालं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

होय होय.

प्रचेतस
Tue, 08/30/2011 - 17:48 नवीन
होय होय. अपेक्षा ठेवल्या जाणार नाहीत. बाकी च्यालेंज पार पाडल्यावर पतियाळा लस्सी पण फूल हाणून दाखवणार ना तू बे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

वल्लि साहेब बास बास...

आत्मशून्य
Tue, 08/30/2011 - 17:57 नवीन
ही कट्टावीरहीतते सारखी छाटछूट गोश्ट आहे म्हणून त्यात फूका चाय्लेंज ओतू नका. आम्हाला आमच्या मर्यादा माहीत आहे. जर तीन पराठे खाल्ले तर मात्र पटीयाला अख्खा गट्टम करीन म्हणतो. पण तरीही ही कट्टा विरहीतता असल्याने याचा सचित्र धागा काढून तमाशा केला जाणार नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

:)

प्रचेतस
Tue, 08/30/2011 - 17:58 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

इथं धागा काढु नका चालेल पण

५० फक्त
Wed, 08/31/2011 - 01:20 नवीन
इथं धागा काढु नका चालेल पण शाजीवाला तुमचे फोटु काढुन लावेल मागं भिंतीवर त्याचं काय, आणि फार्म नीट भरा रे आधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

व्हय सचित्र धागा टाकायचा इरोधातच है आपन

आत्मशून्य
Wed, 08/31/2011 - 15:09 नवीन
पण तिथं जे घडल त्याचा सविस्तर वृत्तांत प्रतीक्रीयांच्या स्वरूपात इथ याच धाग्यावर आलाच पाहीजे हे मात्र खरं. छाटछुट गोश्ट असली तरी चायलेंज ते शेवटी चायलेंज आहे. (कट्याला उघडपणे कट्टाच मानणारा) -उन्नतीशून्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हिप हिप हुर्रेsss!!!

किसन शिंदे
Wed, 09/14/2011 - 20:02 नवीन
ठरल्याप्रमाणे शाहजी मध्ये आज पराठा चॅलेंज पार पडण्यात आलं आहे. :) एका वेळेला एकच माणूस हे चॅलेंज घेऊ शकतो त्यामुळे हे शिवधनुष्य कोण पेलणार यासाठी मात्र थोडा गोधंळ झाला कारण चॅलेंज एकासाठीच आणी ते घेण्यासाठी तिथे जमलेले पाचही जण उत्सुक! त्यावर तोडगा म्हणुन नावाच्या चिठ्ठ्या उडवण्यात आल्या आणी त्यात धनाजीरावांना हे चॅलेंज स्विकारण्याचा मान मिळाला. मग काय, धनाजीरावांनी 'कधी नाही मिळलं आणी गप्पकन गिळलं' या पध्दतीने चार पराठयाचं चॅलेंज आरामशीर जिंकलं..! धनाजीरावांचे हार्दिक अभिनंदन..!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

अभिनंदन

प्रचेतस
Wed, 09/14/2011 - 22:47 नवीन
सर्वप्रथम धनाजीरावांचे हार्दिक अभिनंदन. च्यालेंजसाठी लवकर जायचे असल्याने शाहजी तसे रिकामेच होते आणि अगदी सहजच जागा मिळाली. ५० फक्त आणि पराग दिवेकर अगोदरच आले होते. मी, धनाजीराव, आत्मशून्य पाठोपाठ पोहोचलोच. ग्रुप मध्ये फक्त एकालाच आव्हान स्विकारता येणार असल्याने चिट्ठ्या पाडून धनाजीरावांचे नाव पुढे आले आणि त्यांच्या पोटात गोळा उभा राहिला तो त्यांनी महत्प्रयासाने सरकवून पराठ्याना उदर मनाने जागा करून द्यायचे मान्य केले. फॉर्म भरण्याची फॉर्मेलीटी पूर्ण करून पराठ्यांची ऑर्डेर देण्यात आली. आम्हाला मिक्स व्हेज पराठा, पनीर पराठा, हरी मिर्च का पराठा असे विविध प्रकार घेण्यात आले. धनाजीराव एकेक पराठा संपवण्यात मग्न होता. त्यांच्या खाण्याकडे शाहजीच्या वाढप्यांची तशी सक्त नजर होतीच. न जाणो हे आपल्या ताटातले पराठे हळूच दुसर्‍याला वाढतील की काय. ;) आम्ही दोन पराठ्यामध्येच गप्पगार झालो. इकडे धनाजीराव सुरुच होते. ३ रा पराठाही संपवला. हळूहळू शेवटचा पराठाही खायला सुरुवात केली. खाणे आता कष्टप्रद झाल्याचे जाणवत होतेच. शेवटी पराठा अगदी संपायला आला, वाढपीही उत्सुकतेने धनाजीरावांकडे बघत होते. अखेर शेवटचा तुकडा त्यांनी तोंडात टाकला आणि झाला टाळ्या, शिट्ट्यांचा जोरदार कडकडाट. धनाजीराव विजयी झाले होते. चेहरा घामेघूम झाला होता पण डोळ्यांत समाधानाचे भाव होते. इतके वेळ पाणी न पिल्याने तहानही लागली होती. मग त्यांनी मागवली थंडाई. बदामाचे काप घालून केलेली ग्लासभर थंडाईपण त्यांनी अगदी सहजपणे रिचवली. बाकीच्यांनी पतियाळा लस्सी संपवली. आव्हान जिंकल्याबद्दल शाहजीच्या व्यवस्थापनाकडून धनाजीरावांचे पराठा बिल माफ झाले तसेच जाण्यायेण्याचा खर्च रू. १५० रोख मिळाला. विजयानंदाप्रीत्यर्थ धनाजीरावांकडून आम्हाला खास सरप्राईझ मिळाले. :) खाणे झाले, बाहेर जाउन मस्त मसाला पानांचा आस्वाद घेण्यात आला. तितक्यात प्यारे१ आणि वपाडाव आले, त्यांच्यासाठी परत शाहजीला गेलो. मग त्यांनी पण विविध पराठे आणि चुर चुर नानचा आस्वाद घेतला व परत आम्ही सर्वांनी पतियाळा लस्सी व थंडाई रिचवली. बाकी ५० फक्त यांचे डोडा आणल्याबद्दल खास आभार. तो सुरुवातीलाच संपवल्यामुळे वप्या आणि प्यारे१ यांना मिळू शकला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

मस्त उप्-वृत्तांत

धन्या
गुरुवार, 09/15/2011 - 07:20 नवीन
आधी खरंच पोटात गोळा आला होता पण नंतर म्हटलं की लायिप यिज फुल ऑप च्यायलेंज्येस यांड सरपरायजेस... होउन जौद्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तुम्हाला साष्टांग नमस्कार.

मृत्युन्जय
गुरुवार, 09/15/2011 - 18:38 नवीन
तुम्हाला साष्टांग नमस्कार. आगे बढो हम तुम्हारे साथ है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

@--- आधी खरंच पोटात गोळा आला

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/15/2011 - 23:08 नवीन
@--- आधी खरंच पोटात गोळा आला होता----@ हेच वाक्य उलट बाजुनी टाइपुन शेवटी प्रश्न चिन्ह टाका :-p स्वारी टंका :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

किसना तू पण गेलेला ??

सूड
Wed, 09/14/2011 - 23:57 नवीन
किसना तू पण गेलेला ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

ईनो...

मी-सौरभ
गुरुवार, 09/15/2011 - 00:19 नवीन
लवकर आणा रे कुणी तरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

इनो कशाला मागवताय, थंडाई

५० फक्त
गुरुवार, 09/15/2011 - 08:01 नवीन
इनो कशाला मागवताय, थंडाई मागवा मस्तपैकी, आणि हो एक डोडा खाउन हे च्यालेंज पुर्ण केल्याबद्दल धनाजीचे विशेष अभिनंदन, आता शाजीवाल्याला प्रत्येक गि-हाइकाता धनाजी दिसताहेत म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

कवाधरनं आईकतोय डोडा-डोडा.

सूड
गुरुवार, 09/15/2011 - 08:31 नवीन
कवाधरनं आईकतोय डोडा-डोडा. आमी आल्तो तवा दुकान बंद झाल्तं त्येचं, फोटु तरी लावाच आता त्ये डोडा का काय अस्तंय त्येचा. वपाडावकडं ती मस्तानी बी पेंडींग हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

डोडा

इरसाल
गुरुवार, 09/15/2011 - 17:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अगदी अगदी

प्रचेतस
गुरुवार, 09/15/2011 - 18:20 नवीन
अगदी अगदी. हेच ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

आयला हे डोडा होय, हे तर लय

किसन शिंदे
Fri, 09/16/2011 - 09:49 नवीन
आयला हे डोडा होय, हे तर लय वेळा खाल्लय ठाण्यातल्या प्रशांत कॉर्नरमधुन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

डोडा..

किसन शिंदे
गुरुवार, 09/15/2011 - 09:01 नवीन
खरचं फोटो काढला असेल तर द्या इथे किंवा व्यनीत टाकला तरी चालेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

फोटो

प्रचेतस
गुरुवार, 09/15/2011 - 09:03 नवीन
फोटो एकपण काढला नाही रे. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

फोटो न काढण्याचे कारण : अधिक

सोत्रि
गुरुवार, 09/15/2011 - 09:23 नवीन
फोटो न काढण्याचे कारण : अधिक माहितीसाठी आत्मशुन्यला भेटावे ;) @ आत्मशुन्य: ह.घे. पीस... :) - (सचित्र तमासगीर) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

:) मला कशापै इचारता राव ?

आत्मशून्य
गुरुवार, 09/15/2011 - 23:39 नवीन
कोनत्याही कट्ट्याच्या अथवा कट्टावीरहीततेच्या प्रतीसादात/उत्तरांत फटू चिटकवण्या न चिटकवण्याबाबत आपन(आदरार्थी एकवचन) कधी तरी मत व्यक्त केलयं काय राव ? :p -(लोककला प्रेमी) आत्मशून्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

आ.शू.

मी-सौरभ
गुरुवार, 09/15/2011 - 23:42 नवीन
लै कायदेशीर बोलाया लागले तुमी.. प्रमोशन व्हनार बगा तुमचं लवकरचं ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आत्मशून्य

सा.सु. सौ.

आत्मशून्य
Fri, 09/16/2011 - 00:03 नवीन
अरे लोकांना आचार स्वातंत्र्य वगैरे काय है की नाय शेवटी ...? आपन हाडामासांची सामान्य मानसच की, हौस मौज मजा मिपाकरांनी नाय तर मंग आनखी कोनी करायची ? फटू खरच काढायला (व प्रतीसादात डाकवायला) पायजे होते ;) अती अवांतर :- पराठा खाणे माझ्यासाठी छाट्छूट चायलेंज होतेच होते व म्हणूनच माझ्याकडे त्याबाबत मिपाकरांना फार काही सांगण्यासारखे नव्हतेही, पण धनाजीरावां सारख्या व्यक्तीने हे अचाट काम करून मूर्ती लहान पण किर्ती महान हे जे सिध्द केलं आहे त्याबद्दल खर तरं सचित्र धागाच टाकायला पाहीजे असं माझं स्पश्ट मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

हो तेजायला.. डोडाचे फटू हवेतच

स्पा
गुरुवार, 09/15/2011 - 09:03 नवीन
हो तेजायला.. डोडाचे फटू हवेतच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

फोटो फोटो काय चाललंय रे,

५० फक्त
गुरुवार, 09/15/2011 - 11:59 नवीन
फोटो फोटो काय चाललंय रे, रेल्वेच्या फोटोनं स द ग दि त होणारा तु तुला काय करायचा रे डोडाचा फोटो आणि ती खाउन चवीची मजा घेण्याची गोष्ट आहे फोटोत बघायची नाही, आणि खायच्या गोष्टीचे फोटो टाकले की बघवत नाहीत उगा का बघितलं असं होतं, म्हणजे भुक लागते रे लगेच. ये की लेका एकदा पुण्याला, त्या उत्तम वाल्याकडं गरम गरम समोसे खाउ मग डोडा खाउ नंतर पापडी अन मिरची, नंतर आख्खा लक्ष्मी रोड फिरुन येउ मग गुरुद्वारात जाउ प्रसाद घ्यायला, तो पर्यंत चार वाजतील मग तुझा फॉर्म भरु शाजी मध्ये अन बसवू तुला, एक दोन तीन चार पराठे खायला आणि नंतर तुझा फोटो लावु तिथं. खरंच स्पावड्या तु च्यालेंज जिंकलास ना तर तुझा फोटो मिपावर एक वर्षभर लावावा अशी परवानगी काढेन मी मालकांकडुन. बघ विचार कर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

तो पर्यंत चार वाजतील मग तुझा

स्पा
गुरुवार, 09/15/2011 - 12:12 नवीन
तो पर्यंत चार वाजतील मग तुझा फॉर्म भरु शाजी मध्ये अन बसवू तुला, एक दोन तीन चार पराठे खायला आणि नंतर तुझा फोटो लावु तिथं. खरंच स्पावड्या तु च्यालेंज जिंकलास ना तर तुझा फोटो मिपावर एक वर्षभर लावावा अशी परवानगी काढेन मी मालकांकडुन. बघ विचार कर. =)) =)) =)) =)) =)) =)) तेजायला माझा फोटू भलतीकडेच लावायची वेळ येईल... शाजी च्यालेंज आपला प्रांत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

@धनाजीराव..

मी-सौरभ
गुरुवार, 09/15/2011 - 18:45 नवीन
एक रिक्वेष्ट आहे... चॅलेंज नंतरच्या दिवशी काय झाल हे जाणोन घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.... ;) बघा जमलं तर ईथं सांगा नाय तर व्यनीत लिहा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हबिणंदण...

सोत्रि
गुरुवार, 09/15/2011 - 09:19 नवीन
बिंगो ! धनाजीरावांचे मन:पुर्वक अभिनंदन! (आता धनाजीरावांना घरी जेवायला बोलावताना दहावेळा विचार करावा लागेल किंवा दहाजणांचे जेवण बनवावे लागेल) ;) - (खादाडीची आव्हाने स्विकारणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

:)

ऋषिकेश
Mon, 09/05/2011 - 16:45 नवीन
ऑफीसातून फोटो दिसत नाहीयेत (विषेशतः पराठे आनि लश्श्यांचे) याचा आनंद हा धागा वाचुन होतो आहे :P बाकी कट्टा जोरदार झालेला दिसतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कट्टा झकास झालेला दिसतोय.

गवि
Tue, 08/30/2011 - 09:44 नवीन
कट्टा झकास झालेला दिसतोय. वरचेवर मिपा वाचत असूनही कट्ट्याच्या आमंत्रणाचा धागा पाहण्यातून कसा सुटला कोण जाणे. शनिवारी असल्यामुळे सहज शक्य होते. (एरवी पुणे कट्टा रविवारी असतो..) पण धागाच न वाचल्याने मिस झाले. आता शोधतो. बेटर लक फॉर मी नेक्स्ट टाईम.. :)
  • Log in or register to post comments

@गवि : तुम्ही येण्यास उत्सुक

वपाडाव
Tue, 08/30/2011 - 12:00 नवीन
@गवि : तुम्ही येण्यास उत्सुक आहात ही कल्पना जर असती तर सुडक्याने संपर्क साधायला हवा होता.... कट्ट्यचा धागा नव्हता.... आग लावण्यात आली आहे.... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अच्छा..

गवि
Tue, 08/30/2011 - 12:06 नवीन
समजले. आम्हास फाट्यावर मारल्या गेले.. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

असेच म्हणतो...पराठे आम्हालाही

मनिष
Tue, 08/30/2011 - 13:10 नवीन
असेच म्हणतो...पराठे आम्हालाही आवडतात रे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नाही हो गवि, तसे नाही.

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 08/30/2011 - 14:12 नवीन
नाही हो गवि, तसे नाही. पराठ्याला बटर लावावे की नाही यावर वाद होऊ नये म्हणून धागा काढला गेला नाही असे आतल्या गोटातून कळते ;-) *आतल्या गोटातून कळणे :- स्वतः चा अन्दाज असणे, उगाच पुडी सोडणे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

जाउ द्या हो गवि. तुम्ही तरी

मृत्युन्जय
Tue, 08/30/2011 - 14:20 नवीन
जाउ द्या हो गवि. तुम्ही तरी मुंबैला होता. आम्ही तर इथे पुण्यातच बसलो होतो. पण तरीही............... जौद्या. इनो घेउन येतो. बाकी कट्टा झक्कास झालेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

>>आम्ही तर इथे पुण्यातच बसलो

अन्या दातार
Tue, 08/30/2011 - 15:10 नवीन
>>आम्ही तर इथे पुण्यातच बसलो होतो. त्याचाही वृत्तांत टाका की मग. अडवलंय कुणी?? का आता आठवत नाहीये काय काय केलं ते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

शनिवारी काहीच केले नाही ब्वॉ.

मृत्युन्जय
Tue, 08/30/2011 - 15:49 नवीन
शनिवारी काहीच केले नाही ब्वॉ. घरीच बसलो होतो तंगड्या वर करुन. आता त्याचा वृत्तांत कदाचित तुम्हाला आवडायचा नाही. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

'उपलब्ध पराठ्यांची संख्या'

प्यारे१
Tue, 08/30/2011 - 15:12 नवीन
'उपलब्ध पराठ्यांची संख्या' आणि 'येण्याची कमाल शक्यता व खाण्याची किमान क्षमता असलेले सदस्य' यांमध्ये निर्माण झालेल्या गुणोत्तराचा परिणाम म्हणून किमान सदस्यांना आमंत्रण्याचा निर्णय 'आयोजकां'नी घेतला असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

सर्वप्रथम, गवि, मनीष,

५० फक्त
Wed, 08/31/2011 - 07:50 नवीन
सर्वप्रथम, गवि, मनीष, म्रुत्युंजय व प्यारे १ यांची सपशेल माफी मागतो. या कट्ट्याचा धागा काढलेला नव्हता, वर लिहिल्याप्रमाणे इथं जायचे हे जुलैच्या कट्ट्यात ठरलेलं होतं, फक्त तारिख नक्की नव्हती. गवि तुम्हाला येणं शक्य होईल याची कल्पना नव्हती किंवा स्पावड्या / सुड्ने तुम्हाला कळवले आहे असा समज झालेला होता. एक विनंती, शक्य असेल तर वरचा फाटावर मारण्याचा प्रतिसाद काढुन टाकावव, असा कोणताही विचार नव्हता आमचा. अर्थात तुम्ही केलेल्या नामबदलातुन कट्ट्याला त्यादिवशीचा सगळ्यात मोठा जोक देउन गेली, हे खरं. मनीष व म्रुत्युंजय, तुम्हाला कळवणं राहुन गेलं ही आमची चुक आहे, सपशेल मान्य.एक डाव माफि करावी. प्यारे१, तुझ्याबरोबर व्यनित बोलणं चालु आहेच. सर्वच मिपाकरांना एक नम्र विनंती, या कट्ट्याच्या आमंत्रणाचा धागा न काढला गेल्यामुळं प्रॉब्लेम झाला आहे, त्याचा ब्लेम माझ्यावर टाकु शकता, जर एका वर्षात किमान १२ वेळा मिपाकरांना एकत्र आणण्याचे ठरवले आहे तर त्याबद्दल कळवणे ही माझिच जबाबदारि आहे, असं मी मानतो. सदर चुक पुढच्या वेळी सुधारुन घेतली जाईल. लवकरच गणेशोत्सव समाप्ती ते नवरात्र सुरुवात याच्या दरम्यान अजुन एक कट्टा, खाली धमुने दिलेल्या सुचना व एका मिथुनायणाच्या धाग्यावर दिलेल्या प्रतिसादाच्या अनुषंगाने करण्याची तयारी चालु आहे, लवकरच आमंत्रणाचा धागा टाकला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हे बरंय राव !!

सूड
Wed, 08/31/2011 - 08:59 नवीन
हे बरंय राव !! मलाच कळलं शुक्रवारी तेही किसना कडून. लास्ट मोमेंटपर्यंत शाश्वती नव्हती जाण्याची. त्यात यु नो हुंबैचा पाऊस, त्यादिवशी गाड्या रद्द होऊ नयेत म्हणून मनातल्या मनात देव पावसाच्या पाण्यात ठेवले होते. तरी मळवली क्रॉस केलं आणि गाडी अर्धा तास खोळंबली होती. असो. गवि, पुढल्या वेळेस कळवतो तुम्हाला जाणार असलो तर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आता कसं शक्य आहे..?

गवि
Wed, 08/31/2011 - 09:32 नवीन
एक विनंती, शक्य असेल तर वरचा फाटावर मारण्याचा प्रतिसाद काढुन टाकावव, असा कोणताही विचार नव्हता आमचा. आता कसा काढणार. बूच बसले आहे ना. आणि ते सिरियसली म्हटलेलं नसल्याने संमंला विनंती करुन वगैरे काढण्याच्या द्रा.प्रा.ची आवश्यकता नाही. :) ती स्माईली ज्या प्रकारचे भाव दाखवतेय ते पाहून तो एक ज्योक आहे हे पुरेसे प्रकट होत असावे. :) खरेच यासाठी काही करायचे असेल तर तो काय जोक झाला होता ते सांगा.. इथे किंवा खवत. किंवा व्यनीत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

५०, लिहु का रे इथे तो

वपाडाव
Wed, 08/31/2011 - 09:40 नवीन
५०, लिहु का रे इथे तो ज्योक.... म्हणजे तुझी संमती घेणं गरजेचं आहे की नाही ते माहीत नाही म्हणुन विचारलं......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अरे बाबा आता कुठं आयोजक झाला

५० फक्त
Wed, 08/31/2011 - 10:13 नवीन
अरे बाबा आता कुठं आयोजक झाला आहेस, का उगा आयडि उडवुन घ्यायच्या मागं लागलास. व्यनि कर सगळ्यांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा