✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पराठे वाला कट्टा

५
५० फक्त यांनी
Tue, 08/30/2011 - 09:10  ·  लेख
लेख
एका तहात दुस-या तहाची बीजं असतात असं म्हणलं जातं,तसंच होतं, एका कट्ट्यालाच पुढच्या कट्ट्याच्या ठिकाण ठरवलं जातं, राहते ते फक्त दिवस आणि वेळ ठरवणं. २९ जुलैच्या कट्ट्यातच दोन ठिकाणांवर चर्चा झाल्या होत्या, एक दिल्ली किचन (प्रस्तावक-श्री.वपाडाव) आणि दुसरं शाजीज पराठा हाउस. व्यनि, फोन, एसेमेस इत्यादीच वापर मुबलक वापर करुन २७ ला संध्याकाळी शाजीज पराठा हाउस इथं जमायचं ठरलं,कट्ट्याला काहीतरी वेगळं करायचं होतं,दोन गोष्टी होत्या एक या हाटेलातलं च्यालेंज आणि दुसरी श्री. जयंत कुलकर्णींना भेटणे, अन्या दातारनं त्यांना खव आणि व्यनितुन येण्याचा आग्रह केलेलाच होता, आणि शुक्रुवारी त्यांचा येणार असल्याचा व्यनि आला. अन्या दातार कोल्हापुरहुन खरगपुरला जाता जाता कट्ट्यासाठी पुण्यात थांबणार होता तर सुधांशु अन किसन शिंदे हे मुंबईकर म्हणजे हुंबईकर पावसात आले होते. शनिवार उजाडला आणि दिवस मावळत आला तो पावसातच, पावसामुळं किती जण येतात आणि कसं हे जरा अवघड वाटत होतं, पण जयंत कुलकर्णी, अन्या दातार आणि मी सारसबागेजवळ भेटुन रविवार पेठेत पोहोचेपर्यंत वल्ली, धनाजीराव, वपाडाव व आत्मशुन्य पोहोचलेले होते. जयंत कुलकर्णीच्या एका धाग्यातल्या उल्लेखाप्रमाणे त्यांच्या वयाबद्दल जो अंदाज केलेला होता तो साफ चुकला, हिरवं मन हिरव्या टिशर्ट सारखंच मोकळेपणानं कॅरी करणारा हा माणुस दिसता क्षणी प्रभावित करुन गेला. इतिहासात रमणा-या या माणसानं सारस बाग ते रविवार पेठ या प्रवासात त्यांच्या फिनलंडमधल्या वास्तव्यातल्या धमाल किस्से ऐकवले. शाहजि मध्ये एकत्र आल्यावर व्हर्चुअल जगात दिलेले शब्द प्रत्यक्ष जगात पाळले जातात याचा याचि देही प्रत्यय आला, एक म्हणजे अन्यानं वपाडाव साठी कोल्हापुरहुन आणलेले भडंग आणि दुसरी म्हणजे धनाजीरावनं जे त्याच्या ’मुलगी वाचवा’ या धाग्यावर पोस्टर्स केलेली होती, त्याचे प्रिंटस, सामाजिक बांधिलकीच्या भान ठेवण्याच्या फक्त जालीय गप्पा न मारता प्रत्यक्ष क्रुती करणा-या धनाजीरावांना धन्यवाद व त्यांच्या या कार्याला शुभेच्छा. आम्ही आपलं लगेच जयंत कुलकर्णींच्या हस्ते एक छोटासा उदघाटन सोहळा आटोपुन घेतला, फोटो काढले आणि कट्ट्याची सुरुवात प्रथेप्रमाणे वड्या खाउन झाली, यावेळी खोब-याच्या वड्या अन्यानं आणलेल्या होत्या, हा फोटो बॉक्स रिकामा होण्यापुर्वी ०.२६५७९८ सेकंद काढलेला आहे. शाजीमधलं च्यालेंज हे फक्त सोमवार ते शुक्रुवार ह्याच दिवसात असतं हे कळाल्यानं आत्मशुन्यला एका महिन्यात दोन च्यालेंज घेण्याची संधि हुकल्याची हुरहुर लागली होती, पण हुरहुरीचे मुळ मालक, पराग दिवेकर यांचे अटलबिहारी वेशात आगमन झाल्यावर त्याने ती गुपचुप परत केली व मेन्यु कार्ड पहायला सुरुवात केली. त्यानंतर पहिल्यांदाच भेटणारा मन१ आला आणि हुंबईकर (याचा अर्थासाठी संपर्क - वपाडाव) किसन शिंदे व सुधांशु यांचे हुंबईहुन आगमन झालं; कोरम पुर्ण झाला आणि आता आर्डर दिली नाही तर हाकलुन देतील अशी वेळ येउ नये यासाठी आर्डर दिल्या गेल्या. पहिल्या राउंडला मिक्स व्हेज, पनीर, मेथी, आलु चिज, असे सर्व पराठे मागवुन संपवल्यानंतर आणि मेन्यु कार्डात लिहिल्याप्रमाणे ’ आर्डर देण्यापुर्वी पराठ्याच्या आकाराची खात्री करुन घ्यावी’ खात्री झाल्यामुळं, पिचचा अंदाज आल्यावर बॅट्समन जसा खुलुन खेळायला लागतो, तश्या रिलेमध्ये आर्डरी सुटत गेल्या आणि टेबल व त्यावरच्या प्लेटा रिकाम्या न राहता परोठे व नान येत गेले आणि संपत गेले. आमच्या टेबलवर तर पडलेल्या लोणच्याच्या मिरच्यांची देठं ही काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या सारखी आणि बटरच्या रिकाम्या डब्या दारुगोळ्याच्या रिकाम्या डब्यासारखे दिसत होते. हाटेलच्या बैठकव्यवस्थेमुळं ग्रुप जरी दोन भागात विभागला होता तरी दुस-या टेबलवर सुद्धा थोड्याफार फरकानं हिच परिस्थिती होती. मन१ आणि जयंत कुलकर्णी हे पहिल्यांदाच येणारे सदस्य सुद्धा वल्ली, सुधांशु, किसन शिंदे आणि अन्या दातार यांच्या साथित खुलली होती हे आवाजावरनं कळत होतं. सगळे पराठे आवडल्या गेल्या असल्याने तसेच आकाराचा व पार्टनरांचा अंदाज आल्याने हरी मिर्च पराठा पण मागवला, आणि त्येच्यायला पहिलाच घास मी तोंडात टाकला, एकतर गरम आणि नेमका त्यातच मिरचीचा तुकडा, असलं तोंड पोळलं की उगा कुठुन असला धागा काढला असं होतं तसं झालं. पण कट्ट्याची ओपनिंग पेअर वपाडाव आणि आत्मशुन्यनं हे पण आव्हान लिलया पेललं. मध्ये एक दोन वेळा आवाजाबद्दल सुचना मिळाल्यानंतर आवाज खाली आलेच अन हाटेलातल्या गर्दिचे प्रमाण पाहुन चर्चेचे विषय सुद्धा बरेच सभ्य झाले, कट्ट्याचा शेवट पतियाला लस्सीनं झाला, दोन ग्लास पतियाला लस्सी पाच जणांत संपवली, म्हणजे एकेकाला एक ग्लास चालला असता पण आधी खाल्लेले पराठे हे शाजीच्या च्यालेंजपेक्षा जास्त आहेत याची सुचना पोटातुन दिली जात असल्यानं शेअर इट हा मार्ग पत्करला गेला. बाहेरची वेटिंगची बाढलेली गर्दी आणि वेटर/मालकांच्या चेह-यावरचे चिंतेचे भाव पाहुन बाहेर येउन पुन्हा प्रथेप्रमाणे गप्पा मारण्याचा ठरवुन बाहेर आलो, एक तासभर विविध विषयावर साधक बाधक चर्चा करुन, पोस्टरच्या उदघाटनानं सुरु झालेला कट्टा जयंत कुलकर्णीना त्यांच्या मराठा इंनफ्र्टीच्या पुस्तकासाठी शुभेच्छ एका छोट्यश्या भेटीच्या रुपात देउन कट्ट्याचे मेंबर निघायला सुरुवात झाली, लांब राहणारे वल्ली, जयंत कुलकर्णी तसेच मन१ व पराग दिवेकर गेल्यानंतर पुन्हा अर्धा तास जागा बदलुन गप्पा मारुन धनाजीराव, वपाडाव, आत्मशुन्य, किसन शिंदे, सुधांशु, अन्या दातार व मी पुन्हा एकदा निरोप घेउन निघालो, ते पुढच्या कट्ट्याचं ठरवुनच.. ही बारा कट्ट्यांची कहाणी, साता कट्टी संपुर्ण.. सुचना - सध्या बाजारात असलेले इनोचे शॉर्टेज पाहता पराठ्यांचे जास्त फोटो टाकलेले नाहीत. असं हि काढायला वेळ कुणाला होता, तिथं.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
राहती जागा
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
आस्वाद
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
33390 वाचन

💬 प्रतिसाद (140)

प्रतिक्रिया

अप्रतिम! सविस्तर

इंटरनेटस्नेही
Tue, 08/30/2011 - 09:45 नवीन
अप्रतिम! सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखीव.
  • Log in or register to post comments

ईंट्या सविस्तर प्रतिसाद

५० फक्त
Wed, 08/31/2011 - 07:56 नवीन
ईंट्या सविस्तर प्रतिसाद जनलोकपाल मंजुर झाल्यावर देणार का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

झक्कास इतिवृत्तांत !!! आणि हो

धन्या
Tue, 08/30/2011 - 09:56 नवीन
झक्कास इतिवृत्तांत !!! आणि हो आयोजक वपाडाव यांचे मनापासून आभार. एरव्ही आम्ही शनिवार आला की ताम्हीणी घाटातून कोकणात कल्टी मारतो. यावेळी थांबलो. त्याचं चीज, सॉरी अमुल बटर झालं. :)
  • Log in or register to post comments

उत्तम

सहज
Tue, 08/30/2011 - 10:03 नवीन
कट्टा वृत्तांत आवडला.
  • Log in or register to post comments

एक उनाड दिवस

सूड
Tue, 08/30/2011 - 10:36 नवीन
आजपर्यंतच्या उनाड दिवसांपैकी एक हा कट्टा !! जायचं ठरलं तेही आदल्या दिवशी. सकाळ-सकाळ फोन खणखणला, " सुड, मी पुण्यात कट्ट्याला जायचं म्हणतोय" इति शिंदे सरकार. म्हणलं बाबा थोडा वेळ दे विचार करायला गेले दोन वीकेंड पायाला भोवरा लावून फिरतोय, थोड्या वेळानं सांगतो काय ते. बाकीचा फापटपसारा लिहीत नाही, पण सिंहगडने जनरल डब्यातून जायचं ठरलं. उभ्याने जावं लागणार अशी मनाची तयारी केलीच होती. पण काय आश्चर्य !! चक्क बसायला जागा मिळाली. वाटेत पुण्यातही भयंकर पाऊस असल्याचं फोनाफोनीवरुन कळलं. उतरल्यावर एका अमुकअमुक अमृततुल्य नामक दुकानात शिरलो. त्या चहाला अमृततुल्य का म्हणावं आणि अमृत जर चवीला असं असतं तर देवांना तेच पिण्याची अवदसा का आठवावी असे प्रश्न पडले. चहाचा पाऊण कप ( पक्षी: ग्लास) संपवतोय तोवर काऊंटरवरुन कोणतरी जाडसर आवाजात ओरडलं 'ओ, तुमचं झालं असेल तर जागा रिकामी करा'. आय्ला, मनात म्हटलं अजून आहे चहा शिल्लक कपात, नंतर पाह्यलं तर आमच्याच शेजारी एकजण नुकताच चहा संपवून मित्राशी गप्पा मारत होता त्याच्यासाठी होतं ते. ही शिस्त पुणेकरांनी जरा वाहतुकीच्या बाबतीत वापरली असती तर किती बरं झालं असतं असा एक अविचार येऊन गेला. पाच-सहा रिक्षावाल्यांची नकारघंटा ऐकून शेवटी ऑटो मिळाली. फार शोधाशोध करावी लागली नाही हे ही नसे थोडके. शाहजी'ज मध्ये पोहचेपर्यंत अन्या दातारान् आणलेल्या नारळाच्या वड्या संपल्या होत्या. मग जे काही चर्चा, मध्येच उडणारे हास्याचे फवारे यांनी शाहजी'ज दणाणून सोडलं. गप्पा काय सुरु झाल्या की संपतात होय ?? पण आता शाहजी'ज मध्येही अमृततुल्य सारखा प्रसंग घडू शकतो, याचं प्रसंगावधान राखून काढता पाय घेतला. आता कट्टा रंगला शाहजी'ज च्या बाहेर. अर्धा तासभर गप्पा मारुन लांब राहणारी मंडळी घराकडे निघाली. शेवटी उरलो ते मी, वप्या, किसन आणि आशू . मग वपाडाव यांचेकडून आयस्क्रीमची ट्रीट घेऊन कट्ट्याची सांगता झाली. वप्या स्वारगेट्पर्यंत सोडायला आला, पण शेवटपर्यंत तो भडंगाचा पुडा काही उघडलंन् नाय हो !!
  • Log in or register to post comments

पुडा काही उघडलंन् नाय हो

गवि
Tue, 08/30/2011 - 10:36 नवीन
पुडा काही उघडलंन् नाय हो !! अहा. क्या बात.. ..... केलंन् . उघडलान्, ग्यला... पड्ला मं?.. कळ्ळं कांय..? हाच तो सुप्रसिद्ध आमच्या लाडक्या कोकणातला लाडका लहेजा... रत्नागिरीच्या शाळेत परत गेल्याचा भास झाला. धन्यवाद हो देवरुखकर..
  • Log in or register to post comments

मस्तच झाला कट्टा..! सगळ्यांना

किसन शिंदे
Tue, 08/30/2011 - 11:07 नवीन
मस्तच झाला कट्टा..! सगळ्यांना पुन्हा एकदा भेटून खुप मजा आली त्याचबरोबर व्यनीतून जयंत कुलकर्णी येणार आहेत असं कळालं मग अशा हुरहुन्नरी, चतुरस्त्र लेखकाला भेटण्याची संधी दवडून चालण्यासारखं नव्हतंच. अल्बर्ट स्पिअर पुर्ण करण्यासोबतच मुसोलिनीवर लिहणार असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं आणी आमची अवस्था 'देवाकडे मागितलं एक मागणं, त्याने पुर्ण केल्या दोन' अशी झाली होती. गप्पाटप्पा चालू असताना होणार्‍या प्रत्येक विनोदाला अटलबिहारी वेशातल्या दिवेकर भटजींच हास्य एकदम सातमजली होतं. शाह-जी चे पराठेही अप्रतिम होते.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

स्पा
Tue, 08/30/2011 - 11:12 नवीन
Image removed. धन्यवाद
  • Log in or register to post comments

बॅटर लक नेस्क्ट टाइम...

सोत्रि
Tue, 08/30/2011 - 11:25 नवीन
इनो घेतल्या गेला आहे. 50 फक्त ने आगाउ सुचना दिली होती ह्या कट्ट्याचीची आणि मी जाणारही होतो. पण त्या दिवशी लोणावळ्यावरुन परतायला खुप उशीर झाला (नागफणी - ट्रेक). पण किस्ना आणि सुदे थेट मुंबैहुन आलेले हे वाचल्यावर भयंकर शर्मनाक अवस्था झाली आहे. :( :( :( पुढच्या कट्ट्याला नक्क़ी ! कधीचा ठरतोय ? - (पराठे खुप आवडणारा मराठे) सोकाजी
  • Log in or register to post comments

सर्व तरूण मित्रांचे आभार

जयंत कुलकर्णी
Tue, 08/30/2011 - 11:30 नवीन
सर्व तरूण मित्रांचे आभार ! मला खरं सांगतो माझे कॉलेजचे दिवस आठवले. अर्थात माझ्या उपस्थितीमुळे जरा तुमच्यावर बंधने आली असणार, पण काय करणार ? पण मी तुमच्या विनोदाची मजा लुटत होतो हे निर्विवाद. आणि आपण सर्वांनी दिलेल्या भेटी बाबत काय बोलणार ! छानच आहे ! लवकरच मी त्याचा एक मोमेंटो करून त्याचा फोटो येथे टाकीन. मी तो स्वतः हाताने लाकडाचा craft करणार आहे. Design कालच तयार केले आहे. अर्थात याला वेळ लागेल कारण सगळे हाताने करणार आहे. :-).
  • Log in or register to post comments

जयंत कुलकर्णी व मनोबा यांचे

वपाडाव
Tue, 08/30/2011 - 11:56 नवीन
जयंत कुलकर्णी व मनोबा यांचे विशेष आभार.... फक्त खरडीतुन होकार देउन भर पावसात तिथे उपस्थित राहिल्याबद्दल... आपल्या भेटी अशाच वृद्धिंगत होत राहोत व मिपा परिवार पुर्ण समाजमनावर प्रतिबिंब उमटवत राहो.....
  • Log in or register to post comments

किती खुष दिसताहेत सारीजण.

स्पंदना
Tue, 08/30/2011 - 12:05 नवीन
किती खुष दिसताहेत सारीजण. गुड!! वपा आता संयोजक झाला!! गुड गुड!!
  • Log in or register to post comments

तिकडे रेवतीआजै सुधांशुस नवरी

५० फक्त
Wed, 08/31/2011 - 01:24 नवीन
तिकडे रेवतीआजै सुधांशुस नवरी हुडकते आहे आता वपाडावचे दोनाचे चार हात करायचे कान्टॅक्ट तुम्ही घेता काय ओ अपर्णातै, नाही घ्याच घ्याच आग्रहाचि विनंती कम सल्ला ज्यादा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

आता वपाडावचे दोनाचे चार हात

धन्या
Wed, 08/31/2011 - 08:45 नवीन
आता वपाडावचे दोनाचे चार हात करायचे कान्टॅक्ट तुम्ही घेता काय ओ अपर्णातै, नाही घ्याच घ्याच आग्रहाचि विनंती कम सल्ला ज्यादा.
हो राव... मॅट्रीमोनियल साईटसवर काय किंवा वधू-वर सुच़क केंद्रात काय फक्त काँटॅक्टच मिळतात. पुढच्या भानगडी आपल्यालाच कराव्या लागतात... भले मग ती मॅट्रीमोनियल साईट किंवा वधू-वर सुच़क केंद्र कितीही बोंबलू देत "इथे लग्न जुळतात." बाकी वरच्या दोन प्रतिसादांचा अर्थ "अपर्णातैंची मॅट्रीमोनियल साईट किंवा वधूवरसुचक मंडळ आहे आणि त्या वप्याला कष्टमर बनवायच्या मागे आहेत" असा घ्यायचा काय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

( रेवती आज्जी देवळात गेलेली

सूड
Wed, 08/31/2011 - 09:09 नवीन
( रेवती आज्जी देवळात गेलेली पाह्यली आणि आलो, घाबरतो ब्वॉ) >>आता वपाडावचे दोनाचे चार हात करायचे कान्टॅक्ट तुम्ही घेता काय अगदी अगदी !! :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

वपाडावचे दोनाचे चार हात

स्पंदना
Mon, 09/05/2011 - 08:12 नवीन
कश्याला एव्हढ्यात. अजुन हसाय् खेळायचे , दिवस त्याचे, का जळताय राव? बाकि वपा आपण वेळ आली की बघुच रे, तसा तुला कोणी रिकामा ठेवला तोवर तर, नाही तर आहेतच पुण्याच्या पोरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

पाठिंब्याबद्द्ल धन्यवाद, पण

५० फक्त
Mon, 09/05/2011 - 11:43 नवीन
पाठिंब्याबद्द्ल धन्यवाद, पण अपर्णातै, पुण्याच्या पोरी वप्याला रिकामा ठेवतील का नाही माहित नाही, पण त्याचा खिसा मात्र नक्की रिकामा करतील. अर्थात वपाडावने मात्र डेट साठी शाजीच फिक्स केलंय असं कळालं कालच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

तुमच्यासारख्या बहिणी केल्याएत

वपाडाव
Mon, 09/05/2011 - 12:24 नवीन
तुमच्यासारख्या बहिणी केल्याएत कशाला? याचसाठी.... सुंदर, गुणी/सोज्वळ, सुगरण व मनमिळावु (४ वेगवेगळ्या नव्हे काही) मुलगी शोधुन तिच्यासोबत बँड वाजवुन द्यायलाच नाही का? राहता राहिलं खिशाचं.... झाला तर झाला रिकामा..... आहे कुणासाठी तो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

तुमच्यासारख्या बहिणी केल्याएत

वपाडाव
Mon, 09/05/2011 - 13:39 नवीन
तुमच्यासारख्या बहिणी केल्याएत कशाला? याचसाठी.... सुंदर, गुणी/सोज्वळ, सुगरण व मनमिळावु (४ वेगवेगळ्या नव्हे काही) मुलगी शोधुन तिच्यासोबत बँड वाजवुन द्यायलाच नाही का? राहता राहिलं खिशाचं.... झाला तर झाला रिकामा..... आहे कुणासाठी तो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

अच्छा ! म्हणजे खिसा रिकामा

स्पंदना
Tue, 09/06/2011 - 11:49 नवीन
अच्छा ! म्हणजे खिसा रिकामा झाल्यावर मग तुला सुंदर सोज्वळ वगैरे वगैरे मुलगी पाहिजे, तोवर सार्‍या फटाकड्या शाजीज मध्ये खाउन पिउन टुन्न ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

अगं तायडे, तसं नाही.... खिसा

वपाडाव
Tue, 09/06/2011 - 18:10 नवीन
अगं तायडे, तसं नाही.... खिसा हा भरलेला असो वा कसाही..... आहे तर त्यांच्याचसाठी (सोज्वळ मुलींसाठीच म्हणतोय मी) ना.... आपण नाय काय घरवाली..... बाहरवाली टायपचे...... प्रभु रामचंद्रावानी एकपत्नित्ववादी आहोत आपण..... (जमलं तर सदैव तसंच ^^^^ राहण्याचा प्रयत्न करु)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

पराठे इतके अप्रतिम आणी

अन्या दातार
Tue, 08/30/2011 - 12:16 नवीन
पराठे इतके अप्रतिम आणी डेलिशिअस होते कि दुसर्‍या दिवशी ट्रेनमध्ये सकाळी नाश्तासुद्धा करावा वाटला नाही. :) कुलकर्णी काकांनी कट्ट्याला उपस्थिती लावून अगदी चार चाँद लावले. मनोबाला इतके मिपाकर एकत्र भेटल्याने अगदी भरुन आले होते (असे त्याच्या चेहर्‍यावरुन आणि आवाजावरुन मला जाणवले) सुड आणि किसन चक्क हुंबैवरुन येताहेत हे ऐकून तर फार आश्चर्य वाटले. मला वाटले स्पा त्याची 'नवी' YZ सॉरी, आपलं SZ घेऊन येत असेल. वड्या लगोलग संपल्या असल्याने त्या चांगल्याच झालेल्या होत्या हे सांगणे न लगे. बाकी वपाडाव ने कुणालाही भडंग दिले नाही हे वाचून अंमळ वाईट वाटले. वपा, अरे कुठे फेडशील रे हे पाप???
  • Log in or register to post comments

>>वपा, अरे कुठे फेडशील रे हे

मनराव
Tue, 08/30/2011 - 15:42 नवीन
>>वपा, अरे कुठे फेडशील रे हे पाप???<<< वपाकडून पुढच्या कट्ट्याला सबको भडंग....... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

नको!!!!!!!! भडंग नको सुड आणि

अन्या दातार
Tue, 08/30/2011 - 16:20 नवीन
नको!!!!!!!! भडंग नको सुड आणि किसनने जशी आईस्क्रीम ट्रीट घेतली तशीच आईस्क्रीम ट्रीट (किंबहुना त्याहीपेक्षा सरसच ;) ) सर्व कट्टेकर्‍यांना (तेही माझ्या उपस्थितितील) मिळूदेत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनराव

अबे वप्याने पुन्हा एकदा उल्लू

धन्या
Wed, 08/31/2011 - 08:55 नवीन
अबे वप्याने पुन्हा एकदा उल्लू बनवलं तुम्हाला... त्याने सुजाता मस्तानी दयायचं कबूल केलं होतं... आणि आईस्क्रिमवर कटवलं... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

तुला बर्‍या चवकश्या ह्या

वपाडाव
Wed, 08/31/2011 - 09:34 नवीन
तुला बर्‍या चवकश्या ह्या सगळ्या..... बस की गप्प..... तुला फुडंच्या येळी कटाप करतो बघ सुजाता मस्तानीच्या लिस्टमधुन.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

छे काय मजा नाय राहिली सुजाता

५० फक्त
Wed, 08/31/2011 - 10:14 नवीन
छे काय मजा नाय राहिली सुजाता मस्तानी मध्ये, म्हणजे साइज फारच छोटा झालाय आता ग्लासाचा आणि त्यामुळं त्यातल्या द्रव पदार्थाची क्वांटीटी पण, याच महिन्यात गेलो होतो की मी, आत्मशुन्य, वल्ली आणि गणेशा आरबिटीत जेवायला अन मग तिथुन पुढं पेठेतल्याच सुजाता मस्तानी मध्ये गेलो होतो, पराशेटच्या एरियात गेल्यावर त्यांना फोन पण केला होता येता का असं विचारलं, वाटलं होतं, त्यांची अन सुजाता मस्तानीची ओळाख बघता डिस्काऊंट नाही मिळाला तरी क्वांटीटी तरी थोडी जास्त मिळाली असती, पण तो योग नव्हता, असो. अवांटर - सदर प्रतिसाद वेगवेगळे अर्थ काढले जाउ नयेत अशाच प्रकारे याची पुर्ण काळजी घेण्यात आलेली आहे. कोणातेही शब्द गाळुन किंवा मनातले शब्द अ‍ॅडावुन प्रतिसाद वाचु नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

मला वाटले स्पा त्याची 'नवी'

स्पा
Tue, 08/30/2011 - 12:20 नवीन
मला वाटले स्पा त्याची 'नवी' YZ सॉरी, आपलं SZ घेऊन येत असेल. अन्या कशाला जळवतोस बे.. घेतलाय न इनो आता गप्प पड कि बाजूला ;)
  • Log in or register to post comments

आधि कलाल असता तर....

अनुरोध
Tue, 08/30/2011 - 13:38 नवीन
आयला आधि कलाल असता तर आमि बी आलो असतो कि हो नविन असलो म्हनुन काय झालं..... बरं आता पुढचा कट्टा कुठे... ???
  • Log in or register to post comments

फोटो तर एकदम मस्त आलेत. मस्त

Mrunalini
Tue, 08/30/2011 - 14:12 नवीन
फोटो तर एकदम मस्त आलेत. मस्त मजा चालु आहे सगळ्यांची. हे शाजीज रेस्टॉरंट कुठे आहे????
  • Log in or register to post comments

सही

अन्या दातार
Tue, 08/30/2011 - 15:25 नवीन
आपण जगण्यासाठी खात नसुन खाण्यासाठी जगतो. हाच आमचाही फंडा आहे; फक्त मार्ग वेगवेगळे आहेत. तुम्ही घरी विविध पाकृ करता आणि आम्ही नित्यनवीन अशी खादाडीची ठिकाणे हुडकत तिथे कट्टे भरवतो! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini

चांगले आहे. आपल्या पुण्यात

Mrunalini
Tue, 08/30/2011 - 16:41 नवीन
चांगले आहे. आपल्या पुण्यात अशी खादाडीची ठिकाणे हुडकायला मला पण खुप आवडतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

हे घ्या....

वपाडाव
Tue, 08/30/2011 - 15:56 नवीन
http://pune.burrp.com/listing/shahjis-paratha-house_raviwar-peth_pune_restaurants/1376491772__MA__maps-directions एकदा या लिंकेवर क्लिकवुन पहा.... सर्व कोडे सुटतील....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini

धन्स हो... आता पुढच्या वर्षी

Mrunalini
Tue, 08/30/2011 - 16:44 नवीन
धन्स हो... :) आता पुढच्या वर्षी भारतात आल्यावर नक्की try करणार इथला पराठा. मला f. c. collg जवळचा चेतन्यचा पराठा पण खुप आवडायचा. mainly गोबी पराठा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

धन्स हो... आता पुढच्या वर्षी

Mrunalini
Tue, 08/30/2011 - 16:44 नवीन
धन्स हो... :) आता पुढच्या वर्षी भारतात आल्यावर नक्की try करणार इथला पराठा. मला f. c. collg जवळचा चेतन्यचा पराठा पण खुप आवडायचा. mainly गोबी पराठा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

तेथील पराठे पण चाखले आहेत, पण

वपाडाव
Tue, 08/30/2011 - 18:04 नवीन
तेथील पराठे पण चाखले आहेत, पण तिथे सदानकदा वर्दळ असते.... म्हणुन जावे/वाट पाहुन खावे वाटत नाही.... पण तिथेच उभारुन तिथली हिरवळ पाहायला ज्याम आडौते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Mrunalini

हाहाहा... आमचं हापिस

धन्या
Wed, 08/31/2011 - 00:19 नवीन
हाहाहा... आमचं हापिस शिवाजीनगरला होतं तेव्हा आम्ही चैतन्यला पडीक असायचो... पराठे खायला आणि हिरवळ न्याहाळायला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

वपाडाव, ५०फक्त आणि या कट्टेकरी मित्रांनो,

प्रास
Tue, 08/30/2011 - 15:35 नवीन
शनिवारी झालेल्या या पराठे कट्ट्याचा वृत्तांत आणि सोबतचे फोटो प्रचंड आवडले. हर्षदरावांच्या निमंत्रणानंतर, येण्याची खूप इच्छा असूनही या वेळी शक्य झालं नाही आणि जयंतरावांना याची देही भेटण्याची संधी हुकली. पुढल्यावेळी त्यांनी त्यांच्या खिडकी-टेबलवाल्या खोलीत कट्टा करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बाकी व्यवस्था करण्यास मिपा-कट्टेकरी समर्थ आहेत हे त्या मिपाकरांच्या परवानगीविनाच जाहिर करतो. ;-) (पुढल्या कट्ट्याची वाट बघणारा) :-)
  • Log in or register to post comments

अट्टल बिहारी...

अत्रुप्त आत्मा
Tue, 08/30/2011 - 16:08 नवीन
@-''आत्मशुन्यला एका महिन्यात दोन च्यालेंज घेण्याची संधि हुकल्याची हुरहुर लागली होती, पण हुरहुरीचे मुळ मालक, पराग दिवेकर यांचे अटलबिहारी वेशात आगमन झाल्यावर त्याने ती गुपचुप परत केली'' सदरहू कट्टा लई झ्याक झाला...आमच बी दुसय्राच कट्ट्यात बरच ''भ्या'' पराठ्यांबरोबर चेपलं गेलं...पहिल्या (आखाडातल्या)खेपेला बरच जड गेलं व्हत.(बाकी पहिल्या खेपेला भारीच जड होतं हो मेलं ;-) ) अता अनुभवानी हुरूप वाढला... ;-) फक्त आमचा सगळ्यांनी अटल बिहारी केला. (अर्थात तिसय्रा कत्ट्यापर्यंत आमी बी अट्टल होऊच ;-) ) पराठ्याचा फोटू स्माइली सारखा येणार हे आंम्ही वर्तवलेलं 'अमुल्य' भविष्य लोणी लाऊन खंरं ठरल की नै... :-)
  • Log in or register to post comments

५०फक्त, एकदम मस्त वृत्तांत.

आत्मशून्य
Tue, 08/30/2011 - 16:32 नवीन
पराठ्याचा हँगोव्हर पूढील दोन दीवस जिभेवर (आणि मनामधे) तसाच होता. पटीयाला लस्सि व चूर्चूर नानही अत्यंत चवदार. त्यातून जयंत कुलकर्णी सारख्या व्यक्तीमत्वाशी झालेली भेट तर कट्याचे वातावरण अधीकच उत्साही बनवत होतं. बाकी मिपाकर्स जमले की ज्या (खमंग) गप्पा सूरू होतात त्या लगेच सूरू झाल्याच. तसचं स्पा नेही शब्द दिल्याप्रमाणे फोनवरून कट्याला हजेरी लावली त्यामूळे पराठा खाण्याचे चायलेंजच दीवस फक्त वीकडेज असतात हा मूद्दा सोडला तर बाकी सर्व कार्यक्रम एकदम मस्त झाला. धनाजी व वपाडाव सोबत असताना वाटेत एका हलवायाच्या दूकानात एक व्यक्ती खमंग जिलब्या टाकत होता ते पाहून आम्ही तिघे हसू आवरत शाहजी'ज ला पोचलो. त्यानूसार अल्केमीस्ट मधील साइन लॅंग्वेजनूसार आधीच शूभशकून झाला होता म्हणायला हरकत नाही ;) बाकी सर्वजण निघून गेल्यावर वपाने हूंबैकरांसोबत अजून एक छोटासा कट्टा (गप्पा-गोश्टींचा) साजरा करून त्यांना मार्गस्थ व्हायला मध्यरात्री जी मदत केली त्याबद्दल त्याचे विषेश आवर्जून आभार.
  • Log in or register to post comments

शाब्बास..शाब्बास!!!

धमाल मुलगा
Tue, 08/30/2011 - 17:44 नवीन
मिसळपाव मस्तकी धरावा, मिपाधर्म वाढवावा.. अवघा कल्लोळ माजवावा..सदोदित!!! असेच उत्तरोत्तर एकेक करत कट्टे वाढत जाऊ द्या! गल्ली, गाव, राज्य, प्रांत, देश अशा सार्‍या सीमा तोडून सारे मिपाकर एक होऊ द्या. असेच हे कट्ट्यांचे लोण पसरत जावे, एक एक मिपाकर जवळ येत जावा हीच सदिच्छा!!! एक सुचना: शक्य झाल्यास, पुढच्या वेळी कट्ट्याच्या प्लॅनिंगमध्ये असं ठिकाण निवडण्याचा प्रयत्न होऊ दे, जिथे 'उठा उठा, बाकीचे ताटकळतायत' किंवा 'श्शूऽऽ..इतरांना त्रास होतो, हळू जरा' वगैरे त्रास नसतील. अरेऽऽ, जल्लां मुंड्या खाली घालून चराचरा तर जनावरंही खाऊन निघून जातात! हे क्षुद्र हाटिलवाले मिपाकरांच्या हास्यशास्त्रविनोदाला असं अडवूच कसं शकतात? आँ? आमचे एकेक मिपाकर म्हणजे असे बहाद्दर, पोतडीतून एकेक किस्से काढतील तर तास तास तरी प्रत्येकाला द्यावा लागेल. आणि हास्यधबधबे तर सातमजलीच! अशी ठिकाणं शोधा, जिथं मनमोकळेपणानं ज्याला कट्टा म्हणतात तो करता येईल मझा येऊन जाईल नं भौ! :)
  • Log in or register to post comments

वृत्तांत झकास लिहिलाय! फोटोही

रेवती
Tue, 08/30/2011 - 19:35 नवीन
वृत्तांत झकास लिहिलाय! फोटोही छान आलेत. सारखे कट्टे करून आम्हाला जळवल्याचं पाप माथी आलं तर पराग गुर्जींकडून पूजा करून घ्यावी लागेल हे जाताजाता सांगून ठेवते आहे.
  • Log in or register to post comments

रेवतीशी सहमत

सानिकास्वप्निल
Tue, 08/30/2011 - 22:55 नवीन
रेवतीशी अगदी सहमत आहे ... सारखे कट्टे जमवून वर असे फोटो लावून, त्यात भर म्हणजे असले झक्कास पराठे हादडून, लस्सी गटवून्...किती-किती त्रास देत आहात :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

रेवतीआजै आणि सानिकातै, या

५० फक्त
Tue, 08/30/2011 - 23:24 नवीन
रेवतीआजै आणि सानिकातै, या पुण्याला (आमच्या नाही, आम्ही सोलापुरीच), झकास कट्टा जमवु, जमणार असेल किंवा जमवणार असाल तर सोलापुरसाठी एक दिवस द्या, सकाळी पुनमची इडली चटणी, दुपारी नसले बंधुकडे जेवण आणि संध्याकाळी चव्हाणांकडे बेसनाची चटणि घालुन कचोरी खाउ, मग समोर नामदेव चिवडेवाल्याकडे कुंदा खाउन , सिद्धेश्वर मध्ये चहा पिउ. दुस-या दिवशी शाहिर वस्तीला गुलाब केटी प्यायला जाउ, वेडाचा प्रकार आहे तो. त्या हाटेलवाल्यानं, एक दोन वेळा फुल वाल्यानं दगा दिल्यावर हट्टानं जमिन घेउन गुलाब लावलेत त्या साठी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सानिकास्वप्निल

>>दुस-या दिवशी शाहिर वस्तीला

प्रभो
Tue, 08/30/2011 - 23:32 नवीन
>>दुस-या दिवशी शाहिर वस्तीला गुलाब केटी प्यायला जाउ, वेडाचा प्रकार आहे तो. त्या हाटेलवाल्यानं, एक दोन वेळा फुल वाल्यानं दगा दिल्यावर हट्टानं जमिन घेउन गुलाब लावलेत त्या साठी. च्यामारी माझं कसं जायचं राहिलं इकडे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

राहणार नाही तर काय

चतुरंग
Wed, 08/31/2011 - 00:12 नवीन
तू वेगळ्याच गुलाबात दंग असणार त्यावेळी! ;) -रंगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

प्रभो, आपण कधी पासुन कधी

५० फक्त
Wed, 08/31/2011 - 01:31 नवीन
प्रभो, आपण कधी पासुन कधी पर्यंत होता सोलापुरात, भवानी पेठेतुन तुळजापुर नाक्याला गेला आहात काय , त्याच रस्त्यावर आहे हे हाटेल, अधिक जुनीमिल कंपाउंड एमेसिबि कँटिन, सिद्धेश्वर, हुतात्मा बागेसमोर, इंडिया टि सात रस्ता हे अजुन काही खास चहावाले, स्वस्तातला म्हंजे साखर पेठ शापिंग् सेंटर वाला, मे महिन्यात गेल्तो, कटिंग २ रु, अन फुल ४ रु. अजुन. त्या मानानं क्वालिटि लईच झ्याक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

>>प्रभो, आपण कधी पासुन कधी

प्रभो
Wed, 08/31/2011 - 01:39 नवीन
>>प्रभो, आपण कधी पासुन कधी पर्यंत होता सोलापुरात, इ. स. १९९१ जून ते इ.स २००२ जूलै - ११ वर्षे (पुर्णवेळ) इ.स. २००२ ऑगस्ट ते इ.स २००९ नोव्हेंबर - ७ वर्षे ३ महिने (सुट्टीत येऊन जाऊन) >> भवानी पेठेतुन तुळजापुर नाक्याला गेला आहात काय , त्याच रस्त्यावर आहे हे हाटेल, बर्‍याचदा गेलोय...पण हाटेलात नाही :( >> अधिक जुनीमिल कंपाउंड एमेसिबि कँटिन, सिद्धेश्वर, हुतात्मा बागेसमोर, इंडिया टि सात रस्ता हे अजुन काही खास चहावाले, इंडिया वाला तर शाळेपासूनचा खास आहे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

''पराग गुर्जींकडून पूजा करून

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/31/2011 - 01:00 नवीन
''पराग गुर्जींकडून पूजा करून घ्यावी लागेल हे जाताजाता सांगून ठेवते आहे.'' चालेल ना :-) तेवडीच दक्षीना बी सुटल, आणी जळवल्याचं परिपूर्ण समाधान बी भेटल... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

च्यायला... कुणाची जळते माडी

धन्या
Wed, 08/31/2011 - 08:51 नवीन
च्यायला... कुणाची जळते माडी आणि कुणी पेटवतं त्याच्यावर बिडी... भटजीबूवा, जरा समाजाचं देणं म्हणून काही असतं की नाही? अं? बघावं तेव्हा आपली दक्षिणेची पडलेली असते तुम्हाला... कधीतरी लोक देतात त्या साबुदाण्याच्या खिचडीवर समाधानी र्‍हावा की... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा