एका तहात दुस-या तहाची बीजं असतात असं म्हणलं जातं,तसंच होतं, एका कट्ट्यालाच पुढच्या कट्ट्याच्या ठिकाण ठरवलं जातं, राहते ते फक्त दिवस आणि वेळ ठरवणं. २९ जुलैच्या कट्ट्यातच दोन ठिकाणांवर चर्चा झाल्या होत्या, एक दिल्ली किचन (प्रस्तावक-श्री.वपाडाव) आणि दुसरं शाजीज पराठा हाउस.
व्यनि, फोन, एसेमेस इत्यादीच वापर मुबलक वापर करुन २७ ला संध्याकाळी शाजीज पराठा हाउस इथं जमायचं ठरलं,कट्ट्याला काहीतरी वेगळं करायचं होतं,दोन गोष्टी होत्या एक या हाटेलातलं च्यालेंज आणि दुसरी श्री. जयंत कुलकर्णींना भेटणे, अन्या दातारनं त्यांना खव आणि व्यनितुन येण्याचा आग्रह केलेलाच होता, आणि शुक्रुवारी त्यांचा येणार असल्याचा व्यनि आला. अन्या दातार कोल्हापुरहुन खरगपुरला जाता जाता कट्ट्यासाठी पुण्यात थांबणार होता तर सुधांशु अन किसन शिंदे हे मुंबईकर म्हणजे हुंबईकर पावसात आले होते.
शनिवार उजाडला आणि दिवस मावळत आला तो पावसातच, पावसामुळं किती जण येतात आणि कसं हे जरा अवघड वाटत होतं, पण जयंत कुलकर्णी, अन्या दातार आणि मी सारसबागेजवळ भेटुन रविवार पेठेत पोहोचेपर्यंत वल्ली, धनाजीराव, वपाडाव व आत्मशुन्य पोहोचलेले होते.
जयंत कुलकर्णीच्या एका धाग्यातल्या उल्लेखाप्रमाणे त्यांच्या वयाबद्दल जो अंदाज केलेला होता तो साफ चुकला, हिरवं मन हिरव्या टिशर्ट सारखंच मोकळेपणानं कॅरी करणारा हा माणुस दिसता क्षणी प्रभावित करुन गेला. इतिहासात रमणा-या या माणसानं सारस बाग ते रविवार पेठ या प्रवासात त्यांच्या फिनलंडमधल्या वास्तव्यातल्या धमाल किस्से ऐकवले.
शाहजि मध्ये एकत्र आल्यावर व्हर्चुअल जगात दिलेले शब्द प्रत्यक्ष जगात पाळले जातात याचा याचि देही प्रत्यय आला, एक म्हणजे अन्यानं वपाडाव साठी कोल्हापुरहुन आणलेले भडंग आणि दुसरी म्हणजे धनाजीरावनं जे त्याच्या ’मुलगी वाचवा’ या धाग्यावर पोस्टर्स केलेली होती, त्याचे प्रिंटस, सामाजिक बांधिलकीच्या भान ठेवण्याच्या फक्त जालीय गप्पा न मारता प्रत्यक्ष क्रुती करणा-या धनाजीरावांना धन्यवाद व त्यांच्या या कार्याला शुभेच्छा. आम्ही आपलं लगेच जयंत कुलकर्णींच्या हस्ते एक छोटासा उदघाटन सोहळा आटोपुन घेतला, फोटो काढले
आणि कट्ट्याची सुरुवात प्रथेप्रमाणे वड्या खाउन झाली, यावेळी खोब-याच्या वड्या अन्यानं आणलेल्या होत्या, हा फोटो बॉक्स रिकामा होण्यापुर्वी ०.२६५७९८ सेकंद काढलेला आहे.
शाजीमधलं च्यालेंज हे फक्त सोमवार ते शुक्रुवार ह्याच दिवसात असतं हे कळाल्यानं आत्मशुन्यला एका महिन्यात दोन च्यालेंज घेण्याची संधि हुकल्याची हुरहुर लागली होती, पण हुरहुरीचे मुळ मालक, पराग दिवेकर यांचे अटलबिहारी वेशात आगमन झाल्यावर त्याने ती गुपचुप परत केली व मेन्यु कार्ड पहायला सुरुवात केली. त्यानंतर पहिल्यांदाच भेटणारा मन१ आला आणि हुंबईकर (याचा अर्थासाठी संपर्क - वपाडाव) किसन शिंदे व सुधांशु यांचे हुंबईहुन आगमन झालं; कोरम पुर्ण झाला आणि आता आर्डर दिली नाही तर हाकलुन देतील अशी वेळ येउ नये यासाठी आर्डर दिल्या गेल्या.
पहिल्या राउंडला मिक्स व्हेज, पनीर, मेथी, आलु चिज, असे सर्व पराठे मागवुन संपवल्यानंतर आणि मेन्यु कार्डात लिहिल्याप्रमाणे ’ आर्डर देण्यापुर्वी पराठ्याच्या आकाराची खात्री करुन घ्यावी’ खात्री झाल्यामुळं, पिचचा अंदाज आल्यावर बॅट्समन जसा खुलुन खेळायला लागतो, तश्या रिलेमध्ये आर्डरी सुटत गेल्या आणि टेबल व त्यावरच्या प्लेटा रिकाम्या न राहता परोठे व नान येत गेले आणि संपत गेले. आमच्या टेबलवर तर पडलेल्या लोणच्याच्या मिरच्यांची देठं ही काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या सारखी आणि बटरच्या रिकाम्या डब्या दारुगोळ्याच्या रिकाम्या डब्यासारखे दिसत होते.
हाटेलच्या बैठकव्यवस्थेमुळं ग्रुप जरी दोन भागात विभागला होता तरी दुस-या टेबलवर सुद्धा थोड्याफार फरकानं हिच परिस्थिती होती. मन१ आणि जयंत कुलकर्णी हे पहिल्यांदाच येणारे सदस्य सुद्धा वल्ली, सुधांशु, किसन शिंदे आणि अन्या दातार यांच्या साथित खुलली होती हे आवाजावरनं कळत होतं.
सगळे पराठे आवडल्या गेल्या असल्याने तसेच आकाराचा व पार्टनरांचा अंदाज आल्याने हरी मिर्च पराठा पण मागवला, आणि त्येच्यायला पहिलाच घास मी तोंडात टाकला, एकतर गरम आणि नेमका त्यातच मिरचीचा तुकडा, असलं तोंड पोळलं की उगा कुठुन असला धागा काढला असं होतं तसं झालं. पण कट्ट्याची ओपनिंग पेअर वपाडाव आणि आत्मशुन्यनं हे पण आव्हान लिलया पेललं.
मध्ये एक दोन वेळा आवाजाबद्दल सुचना मिळाल्यानंतर आवाज खाली आलेच अन हाटेलातल्या गर्दिचे प्रमाण पाहुन चर्चेचे विषय सुद्धा बरेच सभ्य झाले,
कट्ट्याचा शेवट पतियाला लस्सीनं झाला, दोन ग्लास पतियाला लस्सी पाच जणांत संपवली, म्हणजे एकेकाला एक ग्लास चालला असता पण आधी खाल्लेले पराठे हे शाजीच्या च्यालेंजपेक्षा जास्त आहेत याची सुचना पोटातुन दिली जात असल्यानं शेअर इट हा मार्ग पत्करला गेला.
बाहेरची वेटिंगची बाढलेली गर्दी आणि वेटर/मालकांच्या चेह-यावरचे चिंतेचे भाव पाहुन बाहेर येउन पुन्हा प्रथेप्रमाणे गप्पा मारण्याचा ठरवुन बाहेर आलो, एक तासभर विविध विषयावर साधक बाधक चर्चा करुन, पोस्टरच्या उदघाटनानं सुरु झालेला कट्टा जयंत कुलकर्णीना त्यांच्या मराठा इंनफ्र्टीच्या पुस्तकासाठी शुभेच्छ एका छोट्यश्या भेटीच्या रुपात देउन कट्ट्याचे मेंबर निघायला सुरुवात झाली,
लांब राहणारे वल्ली, जयंत कुलकर्णी तसेच मन१ व पराग दिवेकर गेल्यानंतर पुन्हा अर्धा तास जागा बदलुन गप्पा मारुन धनाजीराव, वपाडाव, आत्मशुन्य, किसन शिंदे, सुधांशु, अन्या दातार व मी पुन्हा एकदा निरोप घेउन निघालो, ते पुढच्या कट्ट्याचं ठरवुनच..
ही बारा कट्ट्यांची कहाणी, साता कट्टी संपुर्ण..
सुचना - सध्या बाजारात असलेले इनोचे शॉर्टेज पाहता पराठ्यांचे जास्त फोटो टाकलेले नाहीत. असं हि काढायला वेळ कुणाला होता, तिथं.
वाचने
33453
प्रतिक्रिया
140
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम वृत्तांत
आनि मी पण च्यालेंज स्विकारणार
In reply to उत्तम वृत्तांत by प्रचेतस
@गणेशा आणी समस्त पराठेप्रेमी लोकहो
In reply to आनि मी पण च्यालेंज स्विकारणार by गणेशा
मी १ ते ४ पुण्यात आहे ...
In reply to @गणेशा आणी समस्त पराठेप्रेमी लोकहो by आत्मशून्य
आणी मी सदानकदा पराठा चायलेंजच्या तयारीत
In reply to मी १ ते ४ पुण्यात आहे ... by गणेशा
ठरल्यावर
In reply to आणी मी सदानकदा पराठा चायलेंजच्या तयारीत by आत्मशून्य
तूला सांगूच नक्कि.
In reply to ठरल्यावर by प्रचेतस
होय होय.
In reply to तूला सांगूच नक्कि. by आत्मशून्य
वल्लि साहेब बास बास...
In reply to होय होय. by प्रचेतस
:)
In reply to वल्लि साहेब बास बास... by आत्मशून्य
इथं धागा काढु नका चालेल पण
In reply to वल्लि साहेब बास बास... by आत्मशून्य
व्हय सचित्र धागा टाकायचा इरोधातच है आपन
In reply to इथं धागा काढु नका चालेल पण by ५० फक्त
हिप हिप हुर्रेsss!!!
In reply to व्हय सचित्र धागा टाकायचा इरोधातच है आपन by आत्मशून्य
अभिनंदन
In reply to हिप हिप हुर्रेsss!!! by किसन शिंदे
मस्त उप्-वृत्तांत
In reply to अभिनंदन by प्रचेतस
तुम्हाला साष्टांग नमस्कार.
In reply to मस्त उप्-वृत्तांत by धन्या
@--- आधी खरंच पोटात गोळा आला
In reply to मस्त उप्-वृत्तांत by धन्या
किसना तू पण गेलेला ??
In reply to हिप हिप हुर्रेsss!!! by किसन शिंदे
ईनो...
In reply to किसना तू पण गेलेला ?? by सूड
इनो कशाला मागवताय, थंडाई
In reply to ईनो... by मी-सौरभ
कवाधरनं आईकतोय डोडा-डोडा.
In reply to इनो कशाला मागवताय, थंडाई by ५० फक्त
डोडा
In reply to कवाधरनं आईकतोय डोडा-डोडा. by सूड
अगदी अगदी
In reply to डोडा by इरसाल
आयला हे डोडा होय, हे तर लय
In reply to डोडा by इरसाल
डोडा..
In reply to इनो कशाला मागवताय, थंडाई by ५० फक्त
फोटो
In reply to डोडा.. by किसन शिंदे
फोटो न काढण्याचे कारण : अधिक
In reply to फोटो by प्रचेतस
:) मला कशापै इचारता राव ?
In reply to फोटो न काढण्याचे कारण : अधिक by सोत्रि
आ.शू.
In reply to :) मला कशापै इचारता राव ? by आत्मशून्य
सा.सु. सौ.
In reply to आ.शू. by मी-सौरभ
हो तेजायला.. डोडाचे फटू हवेतच
In reply to डोडा.. by किसन शिंदे
फोटो फोटो काय चाललंय रे,
In reply to हो तेजायला.. डोडाचे फटू हवेतच by स्पा
तो पर्यंत चार वाजतील मग तुझा
In reply to फोटो फोटो काय चाललंय रे, by ५० फक्त
@धनाजीराव..
In reply to इनो कशाला मागवताय, थंडाई by ५० फक्त
हबिणंदण...
In reply to हिप हिप हुर्रेsss!!! by किसन शिंदे
:)
In reply to उत्तम वृत्तांत by प्रचेतस
कट्टा झकास झालेला दिसतोय.
@गवि : तुम्ही येण्यास उत्सुक
In reply to कट्टा झकास झालेला दिसतोय. by गवि
अच्छा..
In reply to @गवि : तुम्ही येण्यास उत्सुक by वपाडाव
असेच म्हणतो...पराठे आम्हालाही
In reply to अच्छा.. by गवि
नाही हो गवि, तसे नाही.
In reply to अच्छा.. by गवि
जाउ द्या हो गवि. तुम्ही तरी
In reply to अच्छा.. by गवि
>>आम्ही तर इथे पुण्यातच बसलो
In reply to जाउ द्या हो गवि. तुम्ही तरी by मृत्युन्जय
शनिवारी काहीच केले नाही ब्वॉ.
In reply to >>आम्ही तर इथे पुण्यातच बसलो by अन्या दातार
'उपलब्ध पराठ्यांची संख्या'
In reply to जाउ द्या हो गवि. तुम्ही तरी by मृत्युन्जय
सर्वप्रथम, गवि, मनीष,
In reply to 'उपलब्ध पराठ्यांची संख्या' by प्यारे१
हे बरंय राव !!
In reply to सर्वप्रथम, गवि, मनीष, by ५० फक्त
आता कसं शक्य आहे..?
In reply to सर्वप्रथम, गवि, मनीष, by ५० फक्त
५०, लिहु का रे इथे तो
In reply to आता कसं शक्य आहे..? by गवि
अरे बाबा आता कुठं आयोजक झाला
In reply to ५०, लिहु का रे इथे तो by वपाडाव
अप्रतिम! सविस्तर
ईंट्या सविस्तर प्रतिसाद
In reply to अप्रतिम! सविस्तर by इंटरनेटस्नेही
झक्कास इतिवृत्तांत !!! आणि हो
उत्तम
एक उनाड दिवस
पुडा काही उघडलंन् नाय हो
मस्तच झाला कट्टा..! सगळ्यांना
धन्यवाद
बॅटर लक नेस्क्ट टाइम...
सर्व तरूण मित्रांचे आभार
जयंत कुलकर्णी व मनोबा यांचे
किती खुष दिसताहेत सारीजण.
तिकडे रेवतीआजै सुधांशुस नवरी
In reply to किती खुष दिसताहेत सारीजण. by स्पंदना
आता वपाडावचे दोनाचे चार हात
In reply to तिकडे रेवतीआजै सुधांशुस नवरी by ५० फक्त
( रेवती आज्जी देवळात गेलेली
In reply to तिकडे रेवतीआजै सुधांशुस नवरी by ५० फक्त
वपाडावचे दोनाचे चार हात
In reply to तिकडे रेवतीआजै सुधांशुस नवरी by ५० फक्त
पाठिंब्याबद्द्ल धन्यवाद, पण
In reply to वपाडावचे दोनाचे चार हात by स्पंदना
तुमच्यासारख्या बहिणी केल्याएत
In reply to वपाडावचे दोनाचे चार हात by स्पंदना
तुमच्यासारख्या बहिणी केल्याएत
In reply to वपाडावचे दोनाचे चार हात by स्पंदना
अच्छा ! म्हणजे खिसा रिकामा
In reply to तुमच्यासारख्या बहिणी केल्याएत by वपाडाव