Skip to main content

पराठे वाला कट्टा

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 30/08/2011 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
एका तहात दुस-या तहाची बीजं असतात असं म्हणलं जातं,तसंच होतं, एका कट्ट्यालाच पुढच्या कट्ट्याच्या ठिकाण ठरवलं जातं, राहते ते फक्त दिवस आणि वेळ ठरवणं. २९ जुलैच्या कट्ट्यातच दोन ठिकाणांवर चर्चा झाल्या होत्या, एक दिल्ली किचन (प्रस्तावक-श्री.वपाडाव) आणि दुसरं शाजीज पराठा हाउस. व्यनि, फोन, एसेमेस इत्यादीच वापर मुबलक वापर करुन २७ ला संध्याकाळी शाजीज पराठा हाउस इथं जमायचं ठरलं,कट्ट्याला काहीतरी वेगळं करायचं होतं,दोन गोष्टी होत्या एक या हाटेलातलं च्यालेंज आणि दुसरी श्री. जयंत कुलकर्णींना भेटणे, अन्या दातारनं त्यांना खव आणि व्यनितुन येण्याचा आग्रह केलेलाच होता, आणि शुक्रुवारी त्यांचा येणार असल्याचा व्यनि आला. अन्या दातार कोल्हापुरहुन खरगपुरला जाता जाता कट्ट्यासाठी पुण्यात थांबणार होता तर सुधांशु अन किसन शिंदे हे मुंबईकर म्हणजे हुंबईकर पावसात आले होते. शनिवार उजाडला आणि दिवस मावळत आला तो पावसातच, पावसामुळं किती जण येतात आणि कसं हे जरा अवघड वाटत होतं, पण जयंत कुलकर्णी, अन्या दातार आणि मी सारसबागेजवळ भेटुन रविवार पेठेत पोहोचेपर्यंत वल्ली, धनाजीराव, वपाडाव व आत्मशुन्य पोहोचलेले होते. जयंत कुलकर्णीच्या एका धाग्यातल्या उल्लेखाप्रमाणे त्यांच्या वयाबद्दल जो अंदाज केलेला होता तो साफ चुकला, हिरवं मन हिरव्या टिशर्ट सारखंच मोकळेपणानं कॅरी करणारा हा माणुस दिसता क्षणी प्रभावित करुन गेला. इतिहासात रमणा-या या माणसानं सारस बाग ते रविवार पेठ या प्रवासात त्यांच्या फिनलंडमधल्या वास्तव्यातल्या धमाल किस्से ऐकवले. शाहजि मध्ये एकत्र आल्यावर व्हर्चुअल जगात दिलेले शब्द प्रत्यक्ष जगात पाळले जातात याचा याचि देही प्रत्यय आला, एक म्हणजे अन्यानं वपाडाव साठी कोल्हापुरहुन आणलेले भडंग आणि दुसरी म्हणजे धनाजीरावनं जे त्याच्या ’मुलगी वाचवा’ या धाग्यावर पोस्टर्स केलेली होती, त्याचे प्रिंटस, सामाजिक बांधिलकीच्या भान ठेवण्याच्या फक्त जालीय गप्पा न मारता प्रत्यक्ष क्रुती करणा-या धनाजीरावांना धन्यवाद व त्यांच्या या कार्याला शुभेच्छा. आम्ही आपलं लगेच जयंत कुलकर्णींच्या हस्ते एक छोटासा उदघाटन सोहळा आटोपुन घेतला, फोटो काढले आणि कट्ट्याची सुरुवात प्रथेप्रमाणे वड्या खाउन झाली, यावेळी खोब-याच्या वड्या अन्यानं आणलेल्या होत्या, हा फोटो बॉक्स रिकामा होण्यापुर्वी ०.२६५७९८ सेकंद काढलेला आहे. शाजीमधलं च्यालेंज हे फक्त सोमवार ते शुक्रुवार ह्याच दिवसात असतं हे कळाल्यानं आत्मशुन्यला एका महिन्यात दोन च्यालेंज घेण्याची संधि हुकल्याची हुरहुर लागली होती, पण हुरहुरीचे मुळ मालक, पराग दिवेकर यांचे अटलबिहारी वेशात आगमन झाल्यावर त्याने ती गुपचुप परत केली व मेन्यु कार्ड पहायला सुरुवात केली. त्यानंतर पहिल्यांदाच भेटणारा मन१ आला आणि हुंबईकर (याचा अर्थासाठी संपर्क - वपाडाव) किसन शिंदे व सुधांशु यांचे हुंबईहुन आगमन झालं; कोरम पुर्ण झाला आणि आता आर्डर दिली नाही तर हाकलुन देतील अशी वेळ येउ नये यासाठी आर्डर दिल्या गेल्या. पहिल्या राउंडला मिक्स व्हेज, पनीर, मेथी, आलु चिज, असे सर्व पराठे मागवुन संपवल्यानंतर आणि मेन्यु कार्डात लिहिल्याप्रमाणे ’ आर्डर देण्यापुर्वी पराठ्याच्या आकाराची खात्री करुन घ्यावी’ खात्री झाल्यामुळं, पिचचा अंदाज आल्यावर बॅट्समन जसा खुलुन खेळायला लागतो, तश्या रिलेमध्ये आर्डरी सुटत गेल्या आणि टेबल व त्यावरच्या प्लेटा रिकाम्या न राहता परोठे व नान येत गेले आणि संपत गेले. आमच्या टेबलवर तर पडलेल्या लोणच्याच्या मिरच्यांची देठं ही काडतुसाच्या रिकाम्या पुंगळ्या सारखी आणि बटरच्या रिकाम्या डब्या दारुगोळ्याच्या रिकाम्या डब्यासारखे दिसत होते. हाटेलच्या बैठकव्यवस्थेमुळं ग्रुप जरी दोन भागात विभागला होता तरी दुस-या टेबलवर सुद्धा थोड्याफार फरकानं हिच परिस्थिती होती. मन१ आणि जयंत कुलकर्णी हे पहिल्यांदाच येणारे सदस्य सुद्धा वल्ली, सुधांशु, किसन शिंदे आणि अन्या दातार यांच्या साथित खुलली होती हे आवाजावरनं कळत होतं. सगळे पराठे आवडल्या गेल्या असल्याने तसेच आकाराचा व पार्टनरांचा अंदाज आल्याने हरी मिर्च पराठा पण मागवला, आणि त्येच्यायला पहिलाच घास मी तोंडात टाकला, एकतर गरम आणि नेमका त्यातच मिरचीचा तुकडा, असलं तोंड पोळलं की उगा कुठुन असला धागा काढला असं होतं तसं झालं. पण कट्ट्याची ओपनिंग पेअर वपाडाव आणि आत्मशुन्यनं हे पण आव्हान लिलया पेललं. मध्ये एक दोन वेळा आवाजाबद्दल सुचना मिळाल्यानंतर आवाज खाली आलेच अन हाटेलातल्या गर्दिचे प्रमाण पाहुन चर्चेचे विषय सुद्धा बरेच सभ्य झाले, कट्ट्याचा शेवट पतियाला लस्सीनं झाला, दोन ग्लास पतियाला लस्सी पाच जणांत संपवली, म्हणजे एकेकाला एक ग्लास चालला असता पण आधी खाल्लेले पराठे हे शाजीच्या च्यालेंजपेक्षा जास्त आहेत याची सुचना पोटातुन दिली जात असल्यानं शेअर इट हा मार्ग पत्करला गेला. बाहेरची वेटिंगची बाढलेली गर्दी आणि वेटर/मालकांच्या चेह-यावरचे चिंतेचे भाव पाहुन बाहेर येउन पुन्हा प्रथेप्रमाणे गप्पा मारण्याचा ठरवुन बाहेर आलो, एक तासभर विविध विषयावर साधक बाधक चर्चा करुन, पोस्टरच्या उदघाटनानं सुरु झालेला कट्टा जयंत कुलकर्णीना त्यांच्या मराठा इंनफ्र्टीच्या पुस्तकासाठी शुभेच्छ एका छोट्यश्या भेटीच्या रुपात देउन कट्ट्याचे मेंबर निघायला सुरुवात झाली, लांब राहणारे वल्ली, जयंत कुलकर्णी तसेच मन१ व पराग दिवेकर गेल्यानंतर पुन्हा अर्धा तास जागा बदलुन गप्पा मारुन धनाजीराव, वपाडाव, आत्मशुन्य, किसन शिंदे, सुधांशु, अन्या दातार व मी पुन्हा एकदा निरोप घेउन निघालो, ते पुढच्या कट्ट्याचं ठरवुनच.. ही बारा कट्ट्यांची कहाणी, साता कट्टी संपुर्ण.. सुचना - सध्या बाजारात असलेले इनोचे शॉर्टेज पाहता पराठ्यांचे जास्त फोटो टाकलेले नाहीत. असं हि काढायला वेळ कुणाला होता, तिथं.

वाचने 33459
प्रतिक्रिया 140

प्रतिक्रिया

In reply to by स्पंदना

अगं तायडे, तसं नाही.... खिसा हा भरलेला असो वा कसाही..... आहे तर त्यांच्याचसाठी (सोज्वळ मुलींसाठीच म्हणतोय मी) ना.... आपण नाय काय घरवाली..... बाहरवाली टायपचे...... प्रभु रामचंद्रावानी एकपत्नित्ववादी आहोत आपण..... (जमलं तर सदैव तसंच ^^^^ राहण्याचा प्रयत्न करु)

पराठे इतके अप्रतिम आणी डेलिशिअस होते कि दुसर्‍या दिवशी ट्रेनमध्ये सकाळी नाश्तासुद्धा करावा वाटला नाही. :) कुलकर्णी काकांनी कट्ट्याला उपस्थिती लावून अगदी चार चाँद लावले. मनोबाला इतके मिपाकर एकत्र भेटल्याने अगदी भरुन आले होते (असे त्याच्या चेहर्‍यावरुन आणि आवाजावरुन मला जाणवले) सुड आणि किसन चक्क हुंबैवरुन येताहेत हे ऐकून तर फार आश्चर्य वाटले. मला वाटले स्पा त्याची 'नवी' YZ सॉरी, आपलं SZ घेऊन येत असेल. वड्या लगोलग संपल्या असल्याने त्या चांगल्याच झालेल्या होत्या हे सांगणे न लगे. बाकी वपाडाव ने कुणालाही भडंग दिले नाही हे वाचून अंमळ वाईट वाटले. वपा, अरे कुठे फेडशील रे हे पाप???

In reply to by मनराव

नको!!!!!!!! भडंग नको सुड आणि किसनने जशी आईस्क्रीम ट्रीट घेतली तशीच आईस्क्रीम ट्रीट (किंबहुना त्याहीपेक्षा सरसच ;) ) सर्व कट्टेकर्‍यांना (तेही माझ्या उपस्थितितील) मिळूदेत!

In reply to by अन्या दातार

अबे वप्याने पुन्हा एकदा उल्लू बनवलं तुम्हाला... त्याने सुजाता मस्तानी दयायचं कबूल केलं होतं... आणि आईस्क्रिमवर कटवलं... :)

In reply to by धन्या

तुला बर्‍या चवकश्या ह्या सगळ्या..... बस की गप्प..... तुला फुडंच्या येळी कटाप करतो बघ सुजाता मस्तानीच्या लिस्टमधुन.....

In reply to by वपाडाव

छे काय मजा नाय राहिली सुजाता मस्तानी मध्ये, म्हणजे साइज फारच छोटा झालाय आता ग्लासाचा आणि त्यामुळं त्यातल्या द्रव पदार्थाची क्वांटीटी पण, याच महिन्यात गेलो होतो की मी, आत्मशुन्य, वल्ली आणि गणेशा आरबिटीत जेवायला अन मग तिथुन पुढं पेठेतल्याच सुजाता मस्तानी मध्ये गेलो होतो, पराशेटच्या एरियात गेल्यावर त्यांना फोन पण केला होता येता का असं विचारलं, वाटलं होतं, त्यांची अन सुजाता मस्तानीची ओळाख बघता डिस्काऊंट नाही मिळाला तरी क्वांटीटी तरी थोडी जास्त मिळाली असती, पण तो योग नव्हता, असो. अवांटर - सदर प्रतिसाद वेगवेगळे अर्थ काढले जाउ नयेत अशाच प्रकारे याची पुर्ण काळजी घेण्यात आलेली आहे. कोणातेही शब्द गाळुन किंवा मनातले शब्द अ‍ॅडावुन प्रतिसाद वाचु नये.

मला वाटले स्पा त्याची 'नवी' YZ सॉरी, आपलं SZ घेऊन येत असेल. अन्या कशाला जळवतोस बे.. घेतलाय न इनो आता गप्प पड कि बाजूला ;)

आयला आधि कलाल असता तर आमि बी आलो असतो कि हो नविन असलो म्हनुन काय झालं..... बरं आता पुढचा कट्टा कुठे... ???

In reply to by Mrunalini

आपण जगण्यासाठी खात नसुन खाण्यासाठी जगतो. हाच आमचाही फंडा आहे; फक्त मार्ग वेगवेगळे आहेत. तुम्ही घरी विविध पाकृ करता आणि आम्ही नित्यनवीन अशी खादाडीची ठिकाणे हुडकत तिथे कट्टे भरवतो! :)

In reply to by वपाडाव

धन्स हो... :) आता पुढच्या वर्षी भारतात आल्यावर नक्की try करणार इथला पराठा. मला f. c. collg जवळचा चेतन्यचा पराठा पण खुप आवडायचा. mainly गोबी पराठा. :)

In reply to by वपाडाव

धन्स हो... :) आता पुढच्या वर्षी भारतात आल्यावर नक्की try करणार इथला पराठा. मला f. c. collg जवळचा चेतन्यचा पराठा पण खुप आवडायचा. mainly गोबी पराठा. :)

In reply to by Mrunalini

तेथील पराठे पण चाखले आहेत, पण तिथे सदानकदा वर्दळ असते.... म्हणुन जावे/वाट पाहुन खावे वाटत नाही.... पण तिथेच उभारुन तिथली हिरवळ पाहायला ज्याम आडौते....

In reply to by वपाडाव

हाहाहा... आमचं हापिस शिवाजीनगरला होतं तेव्हा आम्ही चैतन्यला पडीक असायचो... पराठे खायला आणि हिरवळ न्याहाळायला :)

शनिवारी झालेल्या या पराठे कट्ट्याचा वृत्तांत आणि सोबतचे फोटो प्रचंड आवडले. हर्षदरावांच्या निमंत्रणानंतर, येण्याची खूप इच्छा असूनही या वेळी शक्य झालं नाही आणि जयंतरावांना याची देही भेटण्याची संधी हुकली. पुढल्यावेळी त्यांनी त्यांच्या खिडकी-टेबलवाल्या खोलीत कट्टा करावा अशी मी त्यांना विनंती करतो. बाकी व्यवस्था करण्यास मिपा-कट्टेकरी समर्थ आहेत हे त्या मिपाकरांच्या परवानगीविनाच जाहिर करतो. ;-) (पुढल्या कट्ट्याची वाट बघणारा) :-)

@-''आत्मशुन्यला एका महिन्यात दोन च्यालेंज घेण्याची संधि हुकल्याची हुरहुर लागली होती, पण हुरहुरीचे मुळ मालक, पराग दिवेकर यांचे अटलबिहारी वेशात आगमन झाल्यावर त्याने ती गुपचुप परत केली'' सदरहू कट्टा लई झ्याक झाला...आमच बी दुसय्राच कट्ट्यात बरच ''भ्या'' पराठ्यांबरोबर चेपलं गेलं...पहिल्या (आखाडातल्या)खेपेला बरच जड गेलं व्हत.(बाकी पहिल्या खेपेला भारीच जड होतं हो मेलं ;-) ) अता अनुभवानी हुरूप वाढला... ;-) फक्त आमचा सगळ्यांनी अटल बिहारी केला. (अर्थात तिसय्रा कत्ट्यापर्यंत आमी बी अट्टल होऊच ;-) ) पराठ्याचा फोटू स्माइली सारखा येणार हे आंम्ही वर्तवलेलं 'अमुल्य' भविष्य लोणी लाऊन खंरं ठरल की नै... :-)

पराठ्याचा हँगोव्हर पूढील दोन दीवस जिभेवर (आणि मनामधे) तसाच होता. पटीयाला लस्सि व चूर्चूर नानही अत्यंत चवदार. त्यातून जयंत कुलकर्णी सारख्या व्यक्तीमत्वाशी झालेली भेट तर कट्याचे वातावरण अधीकच उत्साही बनवत होतं. बाकी मिपाकर्स जमले की ज्या (खमंग) गप्पा सूरू होतात त्या लगेच सूरू झाल्याच. तसचं स्पा नेही शब्द दिल्याप्रमाणे फोनवरून कट्याला हजेरी लावली त्यामूळे पराठा खाण्याचे चायलेंजच दीवस फक्त वीकडेज असतात हा मूद्दा सोडला तर बाकी सर्व कार्यक्रम एकदम मस्त झाला. धनाजी व वपाडाव सोबत असताना वाटेत एका हलवायाच्या दूकानात एक व्यक्ती खमंग जिलब्या टाकत होता ते पाहून आम्ही तिघे हसू आवरत शाहजी'ज ला पोचलो. त्यानूसार अल्केमीस्ट मधील साइन लॅंग्वेजनूसार आधीच शूभशकून झाला होता म्हणायला हरकत नाही ;) बाकी सर्वजण निघून गेल्यावर वपाने हूंबैकरांसोबत अजून एक छोटासा कट्टा (गप्पा-गोश्टींचा) साजरा करून त्यांना मार्गस्थ व्हायला मध्यरात्री जी मदत केली त्याबद्दल त्याचे विषेश आवर्जून आभार.

मिसळपाव मस्तकी धरावा, मिपाधर्म वाढवावा.. अवघा कल्लोळ माजवावा..सदोदित!!! असेच उत्तरोत्तर एकेक करत कट्टे वाढत जाऊ द्या! गल्ली, गाव, राज्य, प्रांत, देश अशा सार्‍या सीमा तोडून सारे मिपाकर एक होऊ द्या. असेच हे कट्ट्यांचे लोण पसरत जावे, एक एक मिपाकर जवळ येत जावा हीच सदिच्छा!!! एक सुचना: शक्य झाल्यास, पुढच्या वेळी कट्ट्याच्या प्लॅनिंगमध्ये असं ठिकाण निवडण्याचा प्रयत्न होऊ दे, जिथे 'उठा उठा, बाकीचे ताटकळतायत' किंवा 'श्शूऽऽ..इतरांना त्रास होतो, हळू जरा' वगैरे त्रास नसतील. अरेऽऽ, जल्लां मुंड्या खाली घालून चराचरा तर जनावरंही खाऊन निघून जातात! हे क्षुद्र हाटिलवाले मिपाकरांच्या हास्यशास्त्रविनोदाला असं अडवूच कसं शकतात? आँ? आमचे एकेक मिपाकर म्हणजे असे बहाद्दर, पोतडीतून एकेक किस्से काढतील तर तास तास तरी प्रत्येकाला द्यावा लागेल. आणि हास्यधबधबे तर सातमजलीच! अशी ठिकाणं शोधा, जिथं मनमोकळेपणानं ज्याला कट्टा म्हणतात तो करता येईल मझा येऊन जाईल नं भौ! :)

वृत्तांत झकास लिहिलाय! फोटोही छान आलेत. सारखे कट्टे करून आम्हाला जळवल्याचं पाप माथी आलं तर पराग गुर्जींकडून पूजा करून घ्यावी लागेल हे जाताजाता सांगून ठेवते आहे.

In reply to by रेवती

रेवतीशी अगदी सहमत आहे ... सारखे कट्टे जमवून वर असे फोटो लावून, त्यात भर म्हणजे असले झक्कास पराठे हादडून, लस्सी गटवून्...किती-किती त्रास देत आहात :(

In reply to by सानिकास्वप्निल

रेवतीआजै आणि सानिकातै, या पुण्याला (आमच्या नाही, आम्ही सोलापुरीच), झकास कट्टा जमवु, जमणार असेल किंवा जमवणार असाल तर सोलापुरसाठी एक दिवस द्या, सकाळी पुनमची इडली चटणी, दुपारी नसले बंधुकडे जेवण आणि संध्याकाळी चव्हाणांकडे बेसनाची चटणि घालुन कचोरी खाउ, मग समोर नामदेव चिवडेवाल्याकडे कुंदा खाउन , सिद्धेश्वर मध्ये चहा पिउ. दुस-या दिवशी शाहिर वस्तीला गुलाब केटी प्यायला जाउ, वेडाचा प्रकार आहे तो. त्या हाटेलवाल्यानं, एक दोन वेळा फुल वाल्यानं दगा दिल्यावर हट्टानं जमिन घेउन गुलाब लावलेत त्या साठी.

In reply to by ५० फक्त

>>दुस-या दिवशी शाहिर वस्तीला गुलाब केटी प्यायला जाउ, वेडाचा प्रकार आहे तो. त्या हाटेलवाल्यानं, एक दोन वेळा फुल वाल्यानं दगा दिल्यावर हट्टानं जमिन घेउन गुलाब लावलेत त्या साठी. च्यामारी माझं कसं जायचं राहिलं इकडे??

In reply to by प्रभो

प्रभो, आपण कधी पासुन कधी पर्यंत होता सोलापुरात, भवानी पेठेतुन तुळजापुर नाक्याला गेला आहात काय , त्याच रस्त्यावर आहे हे हाटेल, अधिक जुनीमिल कंपाउंड एमेसिबि कँटिन, सिद्धेश्वर, हुतात्मा बागेसमोर, इंडिया टि सात रस्ता हे अजुन काही खास चहावाले, स्वस्तातला म्हंजे साखर पेठ शापिंग् सेंटर वाला, मे महिन्यात गेल्तो, कटिंग २ रु, अन फुल ४ रु. अजुन. त्या मानानं क्वालिटि लईच झ्याक.

In reply to by ५० फक्त

>>प्रभो, आपण कधी पासुन कधी पर्यंत होता सोलापुरात, इ. स. १९९१ जून ते इ.स २००२ जूलै - ११ वर्षे (पुर्णवेळ) इ.स. २००२ ऑगस्ट ते इ.स २००९ नोव्हेंबर - ७ वर्षे ३ महिने (सुट्टीत येऊन जाऊन) >> भवानी पेठेतुन तुळजापुर नाक्याला गेला आहात काय , त्याच रस्त्यावर आहे हे हाटेल, बर्‍याचदा गेलोय...पण हाटेलात नाही :( >> अधिक जुनीमिल कंपाउंड एमेसिबि कँटिन, सिद्धेश्वर, हुतात्मा बागेसमोर, इंडिया टि सात रस्ता हे अजुन काही खास चहावाले, इंडिया वाला तर शाळेपासूनचा खास आहे.. :)

In reply to by रेवती

''पराग गुर्जींकडून पूजा करून घ्यावी लागेल हे जाताजाता सांगून ठेवते आहे.'' चालेल ना :-) तेवडीच दक्षीना बी सुटल, आणी जळवल्याचं परिपूर्ण समाधान बी भेटल... ;-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

च्यायला... कुणाची जळते माडी आणि कुणी पेटवतं त्याच्यावर बिडी... भटजीबूवा, जरा समाजाचं देणं म्हणून काही असतं की नाही? अं? बघावं तेव्हा आपली दक्षिणेची पडलेली असते तुम्हाला... कधीतरी लोक देतात त्या साबुदाण्याच्या खिचडीवर समाधानी र्‍हावा की... :)

In reply to by धन्या

वरती रेवतीताईंनी जो प्रतिसाद दीलाय,तो मला मजेशीर वाटला,म्हणून मी ही थोडी गंमत केली,,,त्या गमतीचे गमक त्यांच्या प्रतिसादातला माझा गमतीदारपणे केलेला उल्लेख एवढेच आहे,त्याला अनुसरून मी ही प्रतिसाद दिला...या गमतीजमतीत ''समाजाचं देणं''वगैरे गंभीर विषय कुठे बसतो बुवा? आणी दक्षिणेची नाही बघितलं तरी प्रत्येकालाच पडलेली असते ;-) (नाही का? )... आणी लोक देतात त्या खिचडीवर आंम्ही समाधानी आहोतच्,,,फक्त कधी ती असते साबुदाण्याची, तर कधी असते साधी...असो,काही गैरसमज झाला असल्यास सादर क्षमस्व.......... :-)

In reply to by अत्रुप्त आत्मा

पर्यूषण पर्वाचा लईच परिणाम झालेला दिसतोय सगळ्यांवर ... असो... ओ परागबुवा, हुर हुर गेली काय हरि मिर्च पराठ्याबरोबर.

In reply to by धन्या

@- तुम्ही उगाचच जड घेतलात. मस्करी करत होतो राव ...ब्वार...ब्वार... ठीक हाय... प्रतिसाद हलका , पण शब्द वाटले जड, तुमची असल ओवी, आमी बगू ह्रायलो... तमाशाचा फड ;-) ... ह्यो परतीसाद मातूर हलकाच घ्या हो... :-) :-)

फोटो एकदम भारी. आणि लस्सीचा फोटो तर एकदमच दिलखुश आहे.

आम्ही आजकाल असे धागे वाचत नाही.

झ का स! मुख्य आणि पुरवणी वृत्तांत वाचून मजा आली. कट्टे असेच रंगतात आणि रंगोत. :) बादवे, हे शाजीज कुठे आहे आणि कसले च्यालेंज वगैरेचे तपशील गुलदस्त्यात का बरे?

''नमस्कार बिका, लक्ष्मि रोडचं रास्तापेठेकडचं टोक आहे शाजी पराठा म्हणजे. नाहीतर लक्ष्मी रोडच्या समांतर रोडने गणेश पेठच्या गुरुद्वाराच्या बोळातुन पुढे आल्यावर उजव्या बाजुला समोरच आहे. ०२०२४४७७८१०.'' दरबार बँडच्या रांगेत. शाजि पराठाचे च्यालेंज टायमिंग सोमवार ते शुक्रुवार दुपारी ४ ते ७ कोणत्याही एका प्रकारचे चार पराठे ६० मिनिटात एकाच व्यक्तीने खाणे बक्षिस - चार पराठ्यांचे बिल देणेची गरज नाही, तुम्ही डिक्लेअर केलेल्या ठिकाणापासुन शाजीपर्यंत येण्याजाण्याचा खर्च र. २०० पर्यंत रोख, आणि त्या तारखेपासुन पुढचे एक वर्षभर तुमच्या हजेरीत, तुम्ही + कुणिही केलेल्या खादाडीच्या बिलावर १० % सुट. + तुमचा फोटो हाटेलात लावला जातो , सध्या तिथं ४-५ फोटो आहेत.

In reply to by ५० फक्त

शाजीचं च्यालेंज भारी है की!! (घ्यावं की काय च्यालेंज? सातारा रोडवरुन गणेश पेठेत आणि परत असं चालंत गेलो तर च्यालेंज घेता येईल! ;) ) -(प्राठेप्रेमी) रंगा

In reply to by चतुरंग

सातारा रोडवरुन गणेश पेठेत आणि परत असं चालंत गेलो तर च्यालेंज घेता येईल.
आत्मशुन्य, ऐकलं का रे? च्यायलेंज घेण्यासाठी सकाळपासून उपाशी राहायची गरज नाही. नळ स्टॉपवरुन शाजी पराठयाला चालत ये... :)

In reply to by ५० फक्त

घ्यायला हवं च्यालेंज......जीभ आणी हात वळवळायला लागलेत... :D (च्यालेंज लाऊन ६ प्लेट पोहे + १ प्लेट समोसा + १ प्लेट वडा सांबार + ४ चहा रिचवलेला) प्रभो

In reply to by ५० फक्त

बा**ला! आपण या चॅलेंजला घेतलं. कधी जाऊयात? चला बरोबर. ट्राय नक्की मारणार. फोटो बरोबरच घेऊन येतो. लै आवडलं च्यालेंज!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिका.. घेतलं .. काउंट मी इन.. च्यायला सातारी गडी मी अन् असं च्यालेंज बघितल्यावर माघार घेणार व्हय. जाउनच येउ एकदा..

In reply to by बिपिन कार्यकर्ते

च्यायला, घेतलं मी पण हे चॅलेंज. बिका, तुम्ही जाताना मला पण घेऊन जावा, ४ पराठे म्हणजे काय लै मोठ्ठी चीज आहे काय ? डन !!! - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

एक तास हा वेळ पाहता जास्त वाटत नाही. पंधरा मिनिटात खायचे म्हटले असते तर अवघड वाटले असते. आधी दोन आणि अर्धा तास थांबून दोन असे खाणे नुसता विचार करता तितके अवघड वाटत नाही. तरीही त्यांनी ज्याअर्थी चॅलेंज ठेवलाय त्याअर्थी ते पुष्कळ कठीण असणारच याची खात्री बाळगावी. उदा. चार पारले जी बिस्किटे किंवा चार मारी बिस्किटे एका मिनिटात खाऊन दाखवणे हा तसा सोपा वाटणारा चॅलेंज अजूनपर्यंततरी कोणी जिंकताना मी पाहिलेलं नाही. अट इतकीच की बिस्किटे दुधात बुडवून किंवा ओली करुन खायची नाहीत / सोबत पाणी प्यायचे नाही. बाकी एकामागून एक खा किंवा एकावेळी चारी तोंडात कोंबा.. नाही जमले अद्याप.

In reply to by गवि

गवि, तुम्ही म्हणता ते बरोबरच आहे. पण जनरली असे पाहण्यात आहे की असे चँलेंज ज्या ठिकाणी असते तिथला जनरल कंश्टंबर हा 'डाएट कॉन्शस किंवा चरबी मोजणार्‍यातला' असतो, मोजुनमापुन आणि 'चवी'साठी खाणारे लोक येतात अशा ठिकाणी. इरेला पेटुन खाणारेही असतातच की ... लेट्स सी ह्या पराठ्याचे कसे होते आहे ? एक चौकशी : चैतन्य ( एफ.सी.रोड ) आणि इथले पराठे ह्यांच्या आकारात किती फरक आहे ? चैतन्यचे ३ पराठे बर्‍याचदा खाल्ले आहेत, अर्थात ४ ते ७ ह्या वेळेत पराठे खाण्याची ही आयुष्यातली पहिलीच वेळ असेल. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

एक चौकशी : चैतन्य ( एफ.सी.रोड ) आणि इथले पराठे ह्यांच्या आकारात किती फरक आहे ? फारच थोडा फरक आहे. मग आव्हान स्विकारले आहेस ना? कधी जाणार आहेस हे सांग. बिका येणारच. मी, धम्या, परा, सोत्री आणि श्रामो इत्यादी तुला प्रोत्साहन द्यायला येउ (आणि नंतर कट्टा करू. जिंकलास तर खुशीत आणि हारलास तर गम में;) ;-) :wink:)

In reply to by छोटा डॉन

दोन वडापाव (संपुर्ण) आणि १ कटिंग च्या (संपुर्ण) बसल्या बैठकीला संपवता यायला लागला वाटतं!

In reply to by धमाल मुलगा

पुढच्या वेळी येताना इनोचे पाकिट घेऊन येतो बरं का धमालबुवा. - छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

फ्रेंच फ्राइज च्या ऐवजी पराठे खाताना आणि बरोबर जोडीला सोलकढी किंवा ताक वैग्रे घेउन डान्या गफ्फा कुठल्या हाणणार पण ? बहूदा मावळ, नर्मदा, अणूउर्जा प्रकल्प असे विषय घेतले जातील.

In reply to by परिकथेतील राजकुमार

विधायक, परिवर्तनवादी, राजकीय, क्रांतिकारक (मला कळतंय, हे चुकतंय, पण असुद्या, क्रांती वगैरे आलं की कसं बोलण्याला वजन येतं. ;) ) वगैरे कोणतेही विषय यायचे नाहीत. बहुतेक पराठे आणि लस्सीमुळं 'माझं पहिलं प्रेम, माझं काय चुकलं? , तीनं असं करणं बरोबर आहे का? ' वगैरे हळवे विषय शून्यप्रहरात चर्चेला येतील .

In reply to by छोटा डॉन

आम्हाला कशाला इनो? आमुचे कट्टे उदंड होतसे! आणि दिलखुलासही. इनोसाठी दुसरी बाजारपेठ शोधा भो!

In reply to by छोटा डॉन

तुमी र्‍हावंद्या वो. तुम्हीतर मिपाचे रजनीकांत. उगा शाजिवाल्यांना गाशा गुंडाळावा लागेल. ;) बाकी मिपाकरांचा एकंदर उत्साह पाहाता आता फोटो सोडा शाजिवाल्यांना एक मोठा बोर्ड लावावा लागेलस दिसतय.

In reply to by गणपा

मग पूनमक्षेत्री जमूया की! टेन्शन इल्ला! झक्कपैकी हैद्राबादी खिमा हाणू, मटण शोरबा आहेच, बाकी दाल-खिचडी, पर्‍यापेश्शल 'करारी भेंडीमसाला' वगैरे रात्री साडेअकरापर्यंत हवं तेवढं मागवा. टेन्शन इल्ला! क्या बोल्ता? :)

In reply to by धमाल मुलगा

मग पूनमक्षेत्री जमूया की!
तो सुदिन लवकरात लवकर उगवावा अशी मनापासुन ईच्छा आहे हो बारामतीकर. मनीच्या बाता: ये पूनमवालोंने धम्या को गोद लिया हय काय?

आईला.... मस्त्च आहे हे च्यालेंज... मला नव्ह्त माहित हे असं काही. मग तुमच्या ह्या कट्ट्या मधे कोणी च्यालेंज जिंकले की नाही???

In reply to by Mrunalini

''टायमिंग सोमवार ते शुक्रुवार दुपारी ४ ते ७'' आम्हि गेलंतो शनिवारी सांजंला. वर उल्लेखल्याप्रमाणं, आत्मशुन्य, गणेशा अन वल्ली जाणार आहेतच, आमच्या त्या दिवशीचा खेळ पाहता ४ पराठे खाणं अवघड जाणार नाही, फक्त एकाच टाइपचे हे थोडं लफडं आहे. असे हि एका टेबलावर ५ जणात १२ पराठे अन ६ नान + २ पतियाला लस्सी संपवल्यात आमी.

In reply to by ५० फक्त

आत्मशुन्य, गणेशा अन वल्ली जाणार आहेतच
आम्हाला फाट्यावर मारण्यात आलेले दिसत आहे..... तरीही मंडळ तिथे उपस्थिती द्यायला तयार राहील हे जाता जाता नमुद करतो....

In reply to by वपाडाव

अबे, हाटेल पाहिलंस ना ते, मंडळ घेउन आस तर जागा पुरेल का, त्या दिवशी बिचारा सुडच लोकलमध्ये बसल्यासारखा चवथ्या सीट्वर बसला होता आणि किसन, ते वडापचे ड्रायव्हर बसतात ना अर्धी क्ष्क्ष्क्ष्क्ष बाहेर काढुन तसा. असो, आपला नामोल्लेख न केल्याबद्दाल सॉरी. वर अपर्णातै ना सल्ला दिलेला आहेच, त्या असतात सिंगापुरात त्यांनी मनावर घेतलं तर काय होईल याचा विचार करा. सध्या बरेच जण तयार होत आहेत च्यालेंजसाठी गणपतीझाल्यावर एकदा सगळ्यांनी तिथं जाउ. दहाजण च्यालेंज जिंकले तर तिथले पुढचे एक वर्षाचे कट्टे फुकट पडतील आपल्याला.

जोरदार झालेला दिसतोय कट्टा. च्यालेंज लै भारी आहे, एकदा प्रयत्न करावा म्हणतो :)

जर का चॅलेंज पूर्ण झालं नाही तर काय?? वरील सर्व रथी महारथी गारद होतील अशी दाट शक्यता वाटत असल्याने हा प्रश्नप्रपंच..

च्यालेंज जीत्ल्याबद्दल वाकडे रावांच "काच्क्कन" अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!!!!!!