✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जनलोकपाल आणि मिपासंपादक

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Wed, 08/24/2011 - 16:54  ·  लेख
लेख
नमस्कार, गेले काही दिवस मिपा, टीव्ही, वर्तमानपत्रे बघावे तिकडे अण्णा आणि जनलोकपाल ह्यावर खडाजंगी वाचायला मिळत आहे. आपल्याला त्यातले जास्ती काही कळत नाही पण एकूणच आर्थिक, सामाजिक भ्रष्टाचाराला खीळ बसावी , सामान्य लोकांना न्याय मिळावा, अकार्यक्षम अधिकारी तसेच बाबू लोकांना चाप बसावा ह्यासाठी काहीतरी कायदा बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत येवढेच आम्हाला कळले. मग मनात असे आले की, सामान्य मिपाकरांचे प्रतिसादाच्या प्रतिसाद खाणार्‍या, कधी कधी तर अख्खे धागेच घशात घालणार्‍या संपादकांना जनलोकपालच्या कक्षेत आणता येईल काय ? त्यासाठी काय करावे लागेल ? अनिवासी संपादकांना ह्यातून सूट मिळण्याची शक्यता आहे का ? तसे असल्यास ते सध्या ज्या देशात आहेत त्या देशाशी एखादा करार (गुन्हेगार हस्तांतरा सारखा) करून त्यांना ह्या न्याय कक्षेत आणता येईल काय ? संपादक मंडळ ह्या आयडीवर गुन्हा दाखल झाल्यास त्याचे उत्तरदायित्व नक्की किती व कोणत्या संपादकांवर लादता येईल ? आणि मुख्य म्हणजे कोणी मिपाकर ह्यासाठी उपोषण करेल काय ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34772 वाचन

💬 प्रतिसाद (170)

प्रतिक्रिया

घात* लिहीण्यासाठी कोड हाताने

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/25/2011 - 01:13 नवीन
घात* लिहीण्यासाठी कोड हाताने घालावा लागतो का इथे बटण आहे त्याचं? *१०१२ यात १० चा १२ वा घात या अर्थात घात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

अपना हाथ...

पंगा
गुरुवार, 08/25/2011 - 01:17 नवीन
...अर्थात कोड हाताने लिहावा लागतो. (अर्थात, एकदा लिहून चोप्य-पस्ते करण्याची लघुहस्तचमत्कृती वापरता येतेच.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हां हाताने लिहून मागाहून चोप्य पस्ते आहेच

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/25/2011 - 01:58 नवीन
आधीच्या प्रतिसादासंदर्भात: शिव्यांसंदर्भात कोणते संदर्भ योग्य मानायचे? घासून गुळगुळीत झालेले का पुराणातले? एकूणच जुन्या मोजपट्ट्या लावून आज का जगायचं? आमची एक आजी स्वतःच्या पोरा-पोरींनाही रांडीच्या/रांडीचे म्हणून हाक मारायची, दुसरे आजोबा प्रेमाने एखाद्याचा उल्लेख गांडू असा करायचे, तर ती भाषा, (जुनी आहे म्हणून हो!) प्रमाण भाषा मानावी का? आज च्यायला, आयला, (e.g. bloody, fuck etc) इ. शब्द घासून गुळगुळीत झाले आहेत (आणि हे वाक्यही!) की त्याचा मूळ अर्थ प्रमाण मानावा का आजच्या वापरातला? असंच असेल तर कुंती या नावाचे आणि इंग्लिशमधल्या (म्हणे!) सर्वात वाईट शब्दाचे मूळ समान आहे (चटकन संदर्भ सापडत नाहीये); तर मग कुंती हा शब्द अपशब्द म्हणून वापरावा का? सही, भिडू वगैरे शब्द माझ्या घरात अनेकांना अश्लील वाटतात म्हणून ते अश्लील ठरतात का? know याचा एक (archaic) अर्थ to have sexual intercourse with (जनन -> जन -> ज्ञान अशी काहीशी etymology) असाही आहे, तर मग तोच जुनाट अर्थ घेऊन आता know हे क्रियापद वापरावं का? आणि मग याच चालीत एकेकाळी अमके गुण मर्दानी (किंवा स्त्रैण) मानले जायचे म्हणून आजही तेच आणि तसंच का मान्य करावं? तर मी तरी पुराणकाळातले, archaic अर्थ आजच्या काळात प्रमाण मानत नाही. त्याचप्रमाणे शौर्य, धैर्य इ. गुण मर्दानी गुण असतात हे ही मानत नाही. बाकी च्यायला काय म्हणायचं ते म्हणा! ;-) आता उगाच अवांतरः मजेमजेत भांडताना एका मित्राने मला "मोफो" अशी शिवी दिली. त्यावर मी दात काढत, "अरे, या शिवीने माझा अपमान कसा होणार?"** असं विचारलं. मग त्याने मला मोफोचं मराठी भाषांतर विचारलं. पुढे वडलांना मराठीत काय म्हणतात ते विचारून, शिवीचे लिंग बदलून मला शिवी दिली. आता हा सगळा प्रकार एवढा मजेशीर होता की तो इथे लिहील्याशिवाय मला रहावलं नाही. ** मी होमोफोबिक आहे असा अर्थ काढू नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

उत्तर

पंगा
गुरुवार, 08/25/2011 - 04:19 नवीन
आज च्यायला, आयला, (e.g. bloody, fuck etc) इ. शब्द घासून गुळगुळीत झाले आहेत (आणि हे वाक्यही!) की त्याचा मूळ अर्थ प्रमाण मानावा का आजच्या वापरातला?
वरील शब्दप्रयोग हे 'घासून गुळगुळीत झाले आहेत' या विधानाशी तितकासा सहमत नाही. कार्यालयीन सेटपमध्ये किंवा अन्य काही प्रसंगी असे शब्द वापरल्यास गोत्यात येणे शक्य आहे. शिवाय, सार्वजनिक असलेल्या अथवा पूर्णतः खाजगी नसलेल्या अशा सर्वसामान्य सेटपमध्येसुद्धा एखाद्याने - मग भले ही तो तिर्‍हाईत असो - या शब्दांच्या वापरास आक्षेप घेणे हे अगदीच अशक्य नाही. उदाहरणार्थ, आपल्या आजी त्यांच्या स्वतःच्या लेकरांना 'रांडेच्या'/'रांडीचे' म्हणत असणे भलेही शक्य असेल - हे आपल्या आजी आणि त्यांच्या लेकरांमधील खाजगी (आणि खाजगी सेटपमध्ये घडलेले) संभाषण असल्याकारणाने तो आपल्या आजी आणि त्यांची लेकरे यांचा वैयक्तिक मामला आहे, सबब उपस्थित नसलेल्या कोणा त्रयस्थास यात आक्षेप घेण्याचा अधिकार असण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मात्र, आपल्या कार्यालयात आपल्या एखाद्या सहकर्मीस अथवा आपल्या वरिष्ठांस आपण यांपैकी कोणते संबोधन वापरल्यास त्यास कदाचित आक्षेप घेतला जाण्याची शक्यता अगदीच नगण्य नाही. आणि असा आक्षेप घेतला गेल्यास त्यास आपल्या आजी त्यांच्या लेकरांस उद्देशून असे संबोधन वापरत असत हे समर्थन कितपत उपयुक्त ठरू शकेल, याबद्दल साशंक आहे. मात्र, 'शब्दांचा मूळ अर्थ प्रमाण मानावा की आजच्या वापरातला' हा युक्तिवाद कदाचित वापरून पाहता येईलही, अशी आशा आहे. वाटल्यास करून पहावा. हीच गत आपण वर उद्धृत केलेल्या इतर शब्दांचीही. याच दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास 'आयला'/'च्यायला' हा शब्दप्रयोगदेखील तितकासा घासून गुळगुळीत झाला आहे, असे वाटत नाही. (अतिअवांतर: असे शब्दप्रयोग स्वतःच्या मुलांस उद्देशून वापरणे हे कदाचित माझ्याही आजीच्या काळात आणि समाजात आम असणे अशक्य नाही; मात्र माझ्या वडिलांनी मला उद्देशून असेच शब्दप्रयोग करणे हे मला खटकण्यासारखे असू शकते आणि मी असे शब्दप्रयोग स्वतःच्या मुलाच्या बाबतीत वापरणे मला स्वतःला आक्षेपार्ह वाटू शकते. मात्र, मी असे शब्दप्रयोग माझ्या अतिनिकटच्या मित्रांस उद्देशून खाजगीमध्ये करणारच नाही, असेही म्हणता येत नाही. दोहोंमध्ये काय परस्परसंमत प्रोटोकोल आहे, त्यावर अवलंबून आहे.) (अतिअतिअवांतर: आमच्या एका तमिळभाषक हॉस्टेलमित्राने सुटीचा घरी गेल्यावर प्रभातकालीन नाश्त्याचे वेळी धाकटी बहीण डोक्याशी काही भुणभुण लावत असता हॉस्टेलच्या सवयीने हॉस्टेलमधील मित्रांसमवेत अशाच प्रसंगी वापरण्याच्या सवयीतला एक सणसणीत शब्दप्रयोग आपण कोठे आहोत याचे भान न राहिल्याने आपल्या बहिणीस उद्देशून चुकून वापरला होता, आणि सुटी संपवून हॉस्टेलला परत आल्यावर ही कथा आम्हांस ऐकवली होती, हे अजूनही आठवते. असाच काहीसा प्रसंग आमच्या आणखी एका - पुन्हा तमिळभाषक - हॉस्टेलमित्रासमवेत रेल्वेच्या तिकिटचेकरच्या संदर्भात घडला असल्याचेही आठवते. दोन्ही गोष्टींचे तपशील आता कालौघात विस्मरणात गेलेले आहेत, परंतु दोन्ही प्रसंगी परिणाम फारसे सुखद अथवा वांच्छनीय नव्हते, असे अंधुकसे आठवते. थोडक्यात, 'घासून गुळगुळीत होणे' वगैरे प्रकार हे स्थलकालव्यक्तिसापेक्ष असू शकतात, एवढेच म्हणणे आहे.) बाकी,
know याचा एक (archaic) अर्थ to have sexual intercourse with (जनन -> जन -> ज्ञान अशी काहीशी etymology) असाही आहे...
याबद्दल कल्पना आहे. ('I know!' हा वाक्प्रयोग करण्याचा मोह मोठ्या कष्टाने आवरता घेतला.) नेमके संदर्भ आठवत नसले, तरी बायबलात असे अनेक संदर्भ सापडतात असे आठवते. 'अमक्यातमक्याने आपल्या पत्नीस जाणले आणि तिने त्याला दोन/पाच/दहा/जितकी असतील तितकी मुले दिली' वगैरे वगैरे.
...तर मग तोच जुनाट अर्थ घेऊन आता know हे क्रियापद वापरावं का?
वापरण्यास फारशी हरकत नसावी. शक्यता मनोरंजक आहेत. विशेषतः असा अर्थ होऊ शकतो हे ऐकणाराच्या गावी नसल्यास. 'Hey, I know you from somewhere, some time' हे वाक्य उदाहरणादाखल चटकन सुचते. (वाक्य युनिसेक्स असण्यास मला प्रत्यवाय दिसत नाही.)
तर मी तरी पुराणकाळातले, archaic अर्थ आजच्या काळात प्रमाण मानत नाही. त्याचप्रमाणे शौर्य, धैर्य इ. गुण मर्दानी गुण असतात हे ही मानत नाही.
व्यक्तिशः माझा कोणत्याच शब्दाला फारसा आक्षेप नाही. शब्दामागील भावनेला (किंवा खरे तर पर्सीव्ड भावनेला) केस-बाय-केस तत्त्वावर असू शकतो. 'खूब लड़ी मर्दानी'मधून मला तरी 'मर्दानी म्हणजे पुरुषासारखी शूर' हा अर्थ प्रतीत होत नाही, केवळ 'मर्दानी म्हणजे शूर' एवढाच अर्थ प्रतीत होतो. मग त्यापुढे त्या शब्दाच्या एटिमॉलॉजीत (ती माहीत असूनही) पडण्याची गरज मला वाटत नाही. (खुद्द श्रीमती सुभद्राकुमारी चौहान यांना वाटली असावी का, किंवा श्रीमती सुभद्राकुमारी चौहान यांनी तो शब्दप्रयोग पुरुषांच्या अशा तथाकथित खास गुणांची भलावण करण्याच्या हेतूने आणि स्त्रियांना डेरॉगेटरी अर्थाने केला असावा का, किंबहुना अप्रत्यक्षरीत्या आपण असे काही करतो आहोत असे श्रीमती चौहान यांच्या मनास तरी चाटून गेले असावे का, याबाबत मी अ‍ॅट बेस्ट साशंक आहे. केवळ तत्कालीन व्होगमध्ये असलेला एक शब्द त्यांनी फारसा विचार न करता वापरला असावा, अशी शंका आहे. अर्थात याचा अर्थ तो आजही वापरला गेला पाहिजे असा मुळीच नाही.) बाकी, 'साक्षीदारांतील/देशातील एकमेव मर्द' यावरील आक्षेप मी समजू शकतो. मात्र, तो 'हा शब्द घासून गुळगुळीत झालेला नाही' म्हणून नव्हे, तर उलट 'एके काळी तत्कालीन विचारसरणीस अनुसरून तो कदाचित मुळातच ('घासून' नव्हे!) गुळगुळीत मानला जात असेलही, पण आजच्या आपल्या नव्या जाणिवांतून त्याची जी धार आपणास दृग्गोचर (काय शब्द आहे!) होत आहे, तिच्या प्रकाशात असा शब्द वापरणे उचित ठरू शकत नाही' या कारणामुळे. वरकरणी पाहता 'खूब लड़ी मर्दानी' आणि 'साक्षीदारांतील/देशांतील एमकेव मर्द' यांच्या या भिन्न ट्रीटमेंटमध्ये विरोधाभास जाणवू शकेल. मात्र, या दोहों केसिसमध्ये फरक आहे, असे नम्रपणे सुचवू इच्छितो. पहिल्या केसमध्ये 'पुरुषांची भलावण आणि स्त्रियांचा उपमर्द(!)' हा जाणूनबुजून करण्याचा कोणताही उद्देश वरकरणी दिसून येत नाही - सबब तो तसा नसावा हे मानावयास जागा आहे - तर दुसर्‍या केसमध्ये तो तसा उघडउघड दिसून येतो, हा या दोहों केसिसमधील महत्त्वाचा आणि ठळक फरक आहे, असे वाटते. बाकी, कशावर कोणता आक्षेप हा कोणी, कोठे आणि कसा घ्यावा (किंवा घेऊ नये), हा ज्याचात्याचा/जिचातिचा वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त, हाच नियम सर्वपक्षी लागू होतो, एवढेच नव्हे, तर आक्षेपाचा तोच मुद्दा क्वचित्प्रसंगी अनपेक्षितरीत्या उलटपक्षीही परतवला जाऊ शकतो, एवढेच दाखवून द्यायचे होते. (अन्यथा या विशिष्ट केसपुरता माझा व्यक्तिशः कोणताही आक्षेप नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

शाळेत आमच्या एक शिक्षिका

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/25/2011 - 04:47 नवीन
शाळेत आमच्या एक शिक्षिका च्यायला, आयला हे शब्द अगदी रोज नाही, पण क्वचित वापरायच्या. (सवयीचे शब्द आवरणं त्यांनाही कधीमधी कठीण असावं.) Bloody, fuck वगैरे शब्द अजूनपर्यंत कोणी टॉक्स, प्रेझेंटेशनमधे वापरल्याचं ऐकलेलं नाही, पण त्याच समूहासमोर, मुख्य चर्चा संपल्यावर पण विषयाशी संबंधित चर्चा सुरू असताना हे शब्द वापरलेले ऐकलेले आहेत. अगदी एखादा वयस्कर प्राध्यापकही (विशेषतः साहेबाच्या देशातला), सात्त्विक संतापाने मुठी आवळून "Bloody mobile phones ..." वगैरे वगैरे बोलताना ऐकलेलं आहे. असे प्राध्यापक विद्यार्थी वर्गात जास्त प्रिय असायचे. त्यामुळे का होईना, मिपासारख्या तुलनेने अपारंपारिक आणि बर्‍याचशा इनफॉर्मल व्यासपीठावर असे शब्द लिखाणात वापरण्यात मला, मी तार्किकदृष्ट्या फारतर एखादीच पायरी चढल्यासारखं वाटतं. कदाचित मी जशा प्रकारच्या आस्थापनांमधे काम केलं आहे तिथे एकूणच वातावरण बर्‍यापैकी इनफॉर्मल असल्यामुळेही असेल, असे शब्द वापरलेच जात नाहीत किंवा असे शब्द वापरल्यामुळे आपण गोत्यात येऊ हे मला पटत नाही. 'खूब लड़ी मर्दानी': प्रत्येक स्त्रीने स्त्रीवादी आणि/किंवा मला वाटते तशीच स्त्रीवादी भूमिका घ्यावी हा हट्ट का? असा हट्ट माझातरी नाही. सुभद्राकुमारी चौहान यांनी त्या काळात असे शब्द वापरण्यात मला फारसं आक्षेपार्ह वाटतही नाही. पण आजच्या काळातही आपण ते शब्द त्याच अर्थाने वापरावेत का याचा पुनर्विचार करावासा वाटतो. 'साक्षीदारांपैकी एकमेव मर्द' यात जेवढा उपरोध जाणवतो त्यातला एक शतांशही 'खूब लड़ी मर्दानी'मधे जाणवत नाही. 'साक्षीदारांपैकी एकमेव मर्द' असा उल्लेख करणार्‍या मिडीयातल्या लोकांनी शब्दाचा अर्थ काय होऊ शकतो याचा विचार न करताच शब्दप्रयोग केलेला असेल हे ही मी मान्य करू शकते (जे तुम्हाला कदाचित मान्य नाही). ज्या संदर्भात मी या गोष्टीचा संदर्भ दिला होता, त्या कवितेवरही माझा आक्षेप होता तो काही गुण, जे सदगुण समजले जातात ते मनुष्यांच्या नव्हे, फक्त पुरूषांच्या ठायीच दिसतात असा सरळ अर्थ तिथे प्रतीत होत होता, आणि माझा आक्षेप त्यावर होता. साधारणतः मुलगे, पुरूष काही शब्द मुली, स्त्रियांसमोर वापरत नाहीत; मला हा ही भंपकपणाच वाटतो. माझ्या भावाचा एक मित्र बोलताना, सहजच 'शिव्या' द्यायचा. आमच्या घरी शिरण्यापूर्वी तो प्रत्येक वेळेस मी घरी आहे का नाही याची खात्री करायचा, (इथे मी मुलगी/स्त्री आहे असा संदर्भ मुद्दाम देते आहे.) जेणेकरून तोलूनमापून बोलावं का नाही हे त्याला समजावं. एकदा मी आतल्या खोलीत असताना भावाने त्याला मुद्दाम खोटं सांगितलं आणि यानेही झकास शिव्या दिल्या. शिव्यांचा बोलताना सहज वापर मलाही आवडला, आणि शेवटी हसू आवरलं नाही तेव्हा मी बाहेर आले. तेव्हा तो थोडा लाजला, पण त्यानंतर मी समोर आहे म्हणून मुद्दाम अनैसर्गिक बोलण्याची गरज त्याला पडली नाही. शिव्या ही एक व्यक्त होण्याची पद्धत आहे, नैसर्गिकपणे आल्यास त्या अपमानास्पद वाटत नाहीत. आश्चर्य वाटल्यास तोंडून ज्या सहजतेने "बाप रे" किंवा "bly me" येतं तेवढ्याच सहजतेने "आईच्चा" किंवा "bloody'ell" आल्यास त्यातून ध्वनित होणारा अर्थ गुळगुळीत झालेलाच निघतो.
आक्षेपाचा तोच मुद्दा क्वचित्प्रसंगी अनपेक्षितरीत्या उलटपक्षीही परतवला जाऊ शकतो, एवढेच दाखवून द्यायचे होते.
अर्थातच तुमचा मुद्दा मला मान्य आहे. 'मर्दानी' गुणावगुणांचा पुनर्विचार करण्याची मला आवश्यकता वाटते तसंच या च्यायला-आयलाकडे बघण्याचा दृष्टीकोनही पुन्हा तपासावा असं वाटतं.
अन्यथा या विशिष्ट केसपुरता माझा व्यक्तिशः कोणताही आक्षेप नाही.
याची खात्री असल्यामुळेच एवढा प्रतिवाद करण्यासाठी विचार केला. :-) बाकी knowingly/unknowingly झालेले, केलेले विनोद आवडले. या अशा शब्दांची निर्मिती, 'भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास' असं काही वाचलं की गंमत वाटते. नंदा खरे यांनी 'अंताजीची बखर' (का 'बखर अंतकाळाची') मधे केलेलं एक विधान आठवतं, पोटाची टीचभर खळगी असो वा टीचभर इंद्रीय त्यासाठीच सगळं आयुष्य का? तेव्हा अशा गोष्टींचा तेवढ्यापुरता विचार करून सोडून देणंच योग्य वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

पंगासेठ आणि आदीतीतै.. उत्तम

अर्धवट
गुरुवार, 08/25/2011 - 09:01 नवीन
पंगासेठ आणि आदीतीतै.. उत्तम चर्चा.. मुद्दे बहुतांशी पटले. (*डीचं धोत्तार काढून गुणीजनांच्या डोसक्याला गुंडाळणारा) अर्धवट पंगासेठचे भाषेला समृद्ध करण्याचे कौशल्य पाहून आनंद वाटला. ('फक्त' ही नवीन धेडगुजरी शिवी मिळाल्याच्या आनंदात) अर्धवट बाकी प्रतीसादाच्या लांबीवरून पंडित गागाभट्ट हा इंद्रराज पवार यांचा डुआयडी असावा अशी शंका उगीचंच मनास चाटून गेली. (इंद्रदेवांच्या आठवणीने व्याकूळ) अर्धवट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

सुपरस्क्रिप्ट लिहायला लिखाण

प्रभो
गुरुवार, 08/25/2011 - 01:23 नवीन
प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

_/\_

आनंदयात्री
गुरुवार, 08/25/2011 - 01:14 नवीन
मालक, प्रतिसाद कसा लिहावा हे तुमच्याकडुन शिकावे !! (आता आमच्या छिद्रान्वेशी हितशत्रुंनी मालक या शब्दावरुन राळ उडवू नये, मालक हा शब्द मिपावर सर्वसामान्य संबोधनासारखा प्रचलित असल्याने त्याच हेतुन वापरला आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

खल्लास!

धमाल मुलगा
Wed, 08/24/2011 - 19:08 नवीन
आता उरलेली पदं भरुन टाका. १.स्वामी अग्निवेश २.मनिष तिवारी ३.चिदु ४.सोन्यामाई ५.सोन्यामाईंचं कोकरु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

ती दुसरी फळी आहे, आम्ही (हे

सोत्रि
Wed, 08/24/2011 - 19:24 नवीन
ती दुसरी फळी आहे, आम्ही (हे आदरार्थी एकवचनी असे आहे बर का) 'स्ट्रॅटेजीक मॅनेजमेंट' मधे असल्यामुळे हे दुय्यम काम डेलीगेट केल्या गेले आहे :lol: - (स्ट्रॅटेजीक मॅनेजमेंटचा पुरस्कर्ता) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धन्यवाद

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/25/2011 - 14:52 नवीन
सर्व मिपावासीयांचे धन्यवाद __/\__ हा उस्फुर्त प्रतिसाद पाहून मी भारावुन गेलो आहे. विशेषतः तरुण मिपाकरांचा हा पाठींबा अविश्वसनीय आहे. अर्धवट ठाकरे, बाबा राजेश, आणि धमालकॄष्ण अडवाणी ह्यांचा देखील पाठिंबा पाहून अंगात बळ आले. अदिती रॉय सारख्या काही लोकांनी इथे वेगळ्याच विषयावर वादविवाद चर्चा करून उगाचच ह्या विषयाला हायजॅक करण्याचा प्रयत्न केला, मात्र सूज्ञ जनतेने त्यांना योग्य उत्तर दिले आणि धागा मूळ विषयाकडे वळवला. आता आम्हाला प्रतिक्षा आहे ती निखिल संघवी काय उत्तर आणतात ह्याची. श्री. विकास ह्यांच्या शब्दांवरुन तरी मिपा काँग्रेस कडून आज न उद्या अचानक रात्रीच्या वेळी माझा आयडी उचलला जाण्याची शक्यता वाटते आहे. पण मी तुम्हाला विनंती करतो की त्यांना अडवू नका. तुम्ही शांत रहा, हिंसा करू नका. आपण पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढत आहोत हे ध्यानात ठेवा आणि शांततेने वागा. मला उडवले तर उडवू द्या, पण तुम्ही ठाम रहा. उद्यापासून संपादकांच्या खरडवह्या आणि व्यनी घेरा. त्यांना व्यनीतून आणि खरडीमधून संतांची वचने आणि भजने पाठवा. एकालाही सोडू नका. भारत माता की जय !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

ओके

छोटा डॉन
गुरुवार, 08/25/2011 - 17:08 नवीन
झालं का ? निघायचं का आता ? सर्व काही आवरुन ५ मिनिटात बाहेर या, आम्ही गाडीत वाट बघत आहोत. - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ह्या पराला संपादक कर रे नीलकांता!

चतुरंग
Wed, 08/24/2011 - 18:51 नवीन
म्हणजे ही असली नस्ती टँवटँव बंद होईल! ;) (संपादनप्रेमी)रंगा
  • Log in or register to post comments

डिस्फंक्शन

विनायक प्रभू
Wed, 08/24/2011 - 18:57 नवीन
परा च्या डीस्फंक्शन ला इलाज नाही रंगराव.
  • Log in or register to post comments

काय हर्कत नै अजाबात.... लै

विकाल
Wed, 08/24/2011 - 19:16 नवीन
काय हर्कत नै अजाबात.... लै जिल्ब्या अवन्दा मिपा वर उपोष्ण सोडायाला...!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

काही विचार....

विकास
Wed, 08/24/2011 - 19:36 नवीन
सर्वप्रथम या लेखातून झुंडशाहीस उत्तेजना दिल्याबद्दल मी निषेध करतो. मिपा हे लोकशाही मानणारे संस्थळ आहे. म्हणूनच संपादक या गंभीर विषयावर अंतर्गत चर्चा करून नवीन नियम जाहीर करण्याच्या तयारीत असताना असे कोणीतरी बाहेरून मागण्या करणे हे लोकशाहीस धरून नाही, संस्थळाचा अपमान आहे. संपाद्क मंडळ/मिपा व्यवस्थापन लोकशाहीच्या मुल्यांशी तडजोड न करता, जर असे कोणी बाहेरून आव्हान देऊ लागले तर आयडीदाबी करायला देखील कमी पडणार नाहीत हे ध्यानात असुंदेत. ;) -------------------- तरी देखील हा विषय महत्वाचा असल्याने काही लेखांचे विचार मनात घोळत आहेत, वेळे अभावी फक्त शिर्षके जाहीर करत आहे. :-)
  1. साक्षात अण्णाच परांच्या रुपात मिपावर आले आहेत.
  2. पराच्या आंदोलनामागे प्रा.डॉ. *?
  3. परा प्लीज गपा
  4. पराचे आंदोलन आणि नक्षलवादी चळवळतील साम्य-भेद
*ह. घेणे.
  • Log in or register to post comments

विकासराव, पृथ्वीचा आकार

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/24/2011 - 19:46 नवीन
विकासराव, पृथ्वीचा आकार त्रिकोणी आहे का षटकोनी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अर्थातच

विकास
Wed, 08/24/2011 - 20:19 नवीन
अर्थातच त्रिकोणी! अर्थात त्रिकोण दोन बाजूनी बघत एकूण कोन बघितले तर कदाचीत षटकोनी पण म्हणू शकाल. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

हायला!

धमाल मुलगा
Wed, 08/24/2011 - 19:46 नवीन
विकास सिब्बल? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

काय पन!

विकास
Wed, 08/24/2011 - 20:12 नवीन
आम्ही काय कालं डगल घातलेलं वाटलो की काय तुम्हाला! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

वाटलेच होते

कुंदन
Wed, 08/24/2011 - 20:02 नवीन
वाटलेच होते मला पराच्या उपोषाणामागे परकीय शक्तींचा हात असावा. परा, माग काय मागायचे ते विकास रावांना , ते नक्की मदत करतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

ओ साहेब!

विकास
Wed, 08/24/2011 - 20:17 नवीन
माग काय मागायचे ते विकास रावांना , ते नक्की मदत करतील. आम्हाला ठेच परत परत लागलेली नाही ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कुंदन

अरेरे

कुंदन
Wed, 08/24/2011 - 22:22 नवीन
तुम्हाला कोणी "जरा जपा" असे सावध केले नाही वाट्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मिपाच्या भल्यासाठी चाललेली

सूड
Wed, 08/24/2011 - 19:42 नवीन
मिपाच्या भल्यासाठी चाललेली पराण्णांची तळमळ बघून आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आलं आहे. कोणीच पुढे नाही आलं तर ते स्वतः मिपाच्या भल्यासाठी आमरण उपोषणही करतील यात तीळमात्र शंका नाही. आम्ही खवत काळीफित लावून त्याला समर्थन देण्याचा नक्की प्रयत्न करु.
  • Log in or register to post comments

हे देखील विसरू नका...

विकास
Wed, 08/24/2011 - 19:57 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

मिपालोकपाल कोण?

राजेश घासकडवी
Wed, 08/24/2011 - 19:48 नवीन
मिपावर उपोषण कोण करणार याविषयी बरीच चर्चा झाली. समजा सर्वकाही सुरळित होऊन मिपालोकपाल विधेयक पास झाले तर - मिपालोकपाल निवडणाऱ्या समितीवर कोण कोण असावेत? - शेवटी मिपालोकपाल होण्यासाठी लायक आयडी कोण? या मुद्यांवर चर्चा व्हावी असा मी प्रस्ताव मांडतो.
  • Log in or register to post comments

जनलोकपालमधे जो 'मॅगसेसे'

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/24/2011 - 19:53 नवीन
जनलोकपालमधे जो 'मॅगसेसे' पुरस्कारप्राप्त हा मुद्दा आहे, त्याजागी मिपावर प्राध्यापक लोकं असावेत अशी सूचना करते.
शेवटी मिपालोकपाल होण्यासाठी लायक आयडी कोण?
आमच्याच कंपूतले असल्यामुळे मी बाबा पथ्यवाले घासकडवी यांचं नाव सुचवते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पराअण्णा कि जय

स्पा
Wed, 08/24/2011 - 20:24 नवीन
Image removed. धन्यवाद
  • Log in or register to post comments

अरे देवा

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/24/2011 - 20:27 नवीन
Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आयच्या गावात दंगा!!

Nile
गुरुवार, 08/25/2011 - 04:01 नवीन
मेलो च्यामायला!! Image removed. फोकलीच्यांनो, असले धागे काढताना जरा सांगत जा आधी.. आम्ही पण उपोषण फिपोषणाला मदत करू की कधीतरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =))

प्रभो
Wed, 08/24/2011 - 20:37 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) हा खरा पर्‍याचा कार्यकर्ता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अगदी अगदी !! यासम स्पाच.

सूड
गुरुवार, 08/25/2011 - 13:48 नवीन
अगदी अगदी !! यासम स्पाच. :D अवांतरः काल उपप्रतिसाद टंकायला गेलो आणि स्पाचा प्रतिसादच गायबला होता. म्हटलं दोन मिनटांत प्रतिसाद गेला संमं येवढं शिरेस झालं का काय ह्या उपोषणाबाबतीत !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

ठ्या....

सोत्रि
Wed, 08/24/2011 - 20:41 नवीन
<इतस्त: विखुरलेली गडबडा लोळणारी स्मायली./> <इतस्त: विखुरलेली गडबडा लोळणारी स्मायली./> <इतस्त: विखुरलेली गडबडा लोळणारी स्मायली./> <इतस्त: विखुरलेली गडबडा लोळणारी स्मायली./> <इतस्त: विखुरलेली गडबडा लोळणारी स्मायली./> <इतस्त: विखुरलेली गडबडा लोळणारी स्मायली./> <इतस्त: विखुरलेली गडबडा लोळणारी स्मायली./> - (हसरा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

फरक

विकास
Wed, 08/24/2011 - 20:48 नवीन
जेंव्हा अण्णा तिहार मधून बाहेर आले तेंव्हा जनसमुदाय त्यांना पाठींबा देण्यास उभा होता. पण पराजींचे काही खरे नाही, येथे त्यांना बाहेर पडताना पाहून पब्लीक नुसतेच गडाबडा लोळतयं! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

=)) =)) =)) =)) =))=)) =))

प्रीत-मोहर
Wed, 08/24/2011 - 20:54 नवीन
=)) =)) =)) =)) =))=)) =)) =)) =)) =)) =))=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

:D

विशाखा राऊत
Wed, 08/24/2011 - 21:13 नवीन
=)) =)) :D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

इन्कलाऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽब ...

धमाल मुलगा
Wed, 08/24/2011 - 21:26 नवीन
झिंदाबाऽऽऽऽद!!!! परातात्या अमर रहें! -सदश्य, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

परातात्या अमर रहें! वा वा

गणपा
Wed, 08/24/2011 - 21:44 नवीन
परातात्या अमर रहें!
वा वा वा... एका दगडात दोन पक्षी कसे मारावे ते आमच्या धम्या कडुन शिकावे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अमर रहें!

प्रशांत
Wed, 08/24/2011 - 22:57 नवीन
अमर रहें! अमर रहें! अवांतरः पराण्णानी हजारेचा चष्मा लावला वाटतंय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

स्पा यांना विनंती

राजेश घासकडवी
Wed, 08/24/2011 - 21:41 नवीन
मी स्पा यांना जाहीर विनंती करतो, की त्यांनी पराजीअण्णांचा फोटो जॉन अब्राहामच्या चेहेऱ्यावर आरोपित करून मंडळाचं आणखीन मनोरंजन करावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/24/2011 - 21:46 नवीन
गुर्जींच्या विनंतीला मी दुजोरा देते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

दुजोरा? तोही श्रावणात? अगंऽ

रेवती
Wed, 08/24/2011 - 21:49 नवीन
दुजोरा? तोही श्रावणात? अगंऽ आज निदान बुधबृहस्पतीची पूजा तरी केलीस का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अजून श्रावण खपला, आपलं संपला

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/24/2011 - 22:30 नवीन
अजून श्रावण खपला, आपलं संपला नाही. राशीला लागला आहे मेला कधीचा. असो. हे बुधबृहस्पती काय भानगड असते? (रीतीभातीतली) अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

श्रावणातल्या बुधवारी पूजा

रेवती
गुरुवार, 08/25/2011 - 00:56 नवीन
श्रावणातल्या बुधवारी पूजा करतात त्यामध्ये जी गोष्ट हवी असेल त्यावर गंधाने दोन बाहुल्या काढतात आणि त्यांची पूजा करातात. त्यामुळे ती गोष्ट मिळते असा पूर्वी विश्वास असायचा. उदा. धान्याच्या कोठीवर बाहुल्या काढून पूजा करणे हे विपुल धान्य मिळण्यासाठी तसेच तिजोरीवर वगैरे. गावाला गेलेलं माणूस परत येण्यासाठी दरवाज्याच्या मागच्या बाजूला बाहुल्या काढत. आता जॉन हवा असल्यास जॉनच्या पाठिमागे दोन नाही तरी एक बाहुली (तिचे हात दिसल्यामुळे तसे समजण्यात आले आहे.) असलेला फोटू तू श्रावणमासी जालावर चढवल्याने आता इफेक्टची वाट पहायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बा*** भां**!!!! या

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/24/2011 - 22:26 नवीन
बा*** भां**!!!! या पराक्रमाबद्दल स्पा यांना खास पारितोषिक देण्यात येईल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अशक्य आहे

स्मिता.
Wed, 08/24/2011 - 22:42 नवीन
अशक्य आहे रे स्पा!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अबाबाबाबाबा अगागागागा

अत्रुप्त आत्मा
Wed, 08/24/2011 - 23:01 नवीन
कोणता चेहरा वापरून कुठे दगड मारलास तू? त्याकडे पाहून म्हणावे वाटते ''परा'' चा ''कावळा" केलास तू..... :wink: हा हा हा...हसुन हसुन लागली वाट,,,लोळुन लोळुन मोडली खाट...ह्हा ह्हा ह्हा...:bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

पराअण्णा कि जय

चिंतामणी
Wed, 08/24/2011 - 23:12 नवीन
या फटुतील कॅमेरामन माजी मिपाकर आहे का????????? :~ :-~ :puzzled:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आयला हे लयच भारीये राव, हे

किसन शिंदे
गुरुवार, 08/25/2011 - 10:01 नवीन
:D :D :D आयला हे लयच भारीये राव, हे असे फोटोग्राफीतले किडे फक्त तुच करु शकतोस रे स्पावड्या..! जबरा.!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

'मी परा आहे'

मी-सौरभ
Wed, 08/24/2011 - 20:52 नवीन
मिपावर विर्तुअल टोप्यांचा धंदा चालू करावा काय? (पॉपकॉर्न ची एजन्सी पन घ्यावी म्हणतो)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा