✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जनलोकपाल आणि मिपासंपादक

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Wed, 08/24/2011 - 16:54  ·  लेख
लेख
नमस्कार, गेले काही दिवस मिपा, टीव्ही, वर्तमानपत्रे बघावे तिकडे अण्णा आणि जनलोकपाल ह्यावर खडाजंगी वाचायला मिळत आहे. आपल्याला त्यातले जास्ती काही कळत नाही पण एकूणच आर्थिक, सामाजिक भ्रष्टाचाराला खीळ बसावी , सामान्य लोकांना न्याय मिळावा, अकार्यक्षम अधिकारी तसेच बाबू लोकांना चाप बसावा ह्यासाठी काहीतरी कायदा बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत येवढेच आम्हाला कळले. मग मनात असे आले की, सामान्य मिपाकरांचे प्रतिसादाच्या प्रतिसाद खाणार्‍या, कधी कधी तर अख्खे धागेच घशात घालणार्‍या संपादकांना जनलोकपालच्या कक्षेत आणता येईल काय ? त्यासाठी काय करावे लागेल ? अनिवासी संपादकांना ह्यातून सूट मिळण्याची शक्यता आहे का ? तसे असल्यास ते सध्या ज्या देशात आहेत त्या देशाशी एखादा करार (गुन्हेगार हस्तांतरा सारखा) करून त्यांना ह्या न्याय कक्षेत आणता येईल काय ? संपादक मंडळ ह्या आयडीवर गुन्हा दाखल झाल्यास त्याचे उत्तरदायित्व नक्की किती व कोणत्या संपादकांवर लादता येईल ? आणि मुख्य म्हणजे कोणी मिपाकर ह्यासाठी उपोषण करेल काय ?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34772 वाचन

💬 प्रतिसाद (170)

प्रतिक्रिया

उपोषण

प्रियाली
Wed, 08/24/2011 - 16:59 नवीन
परा तूच उपोषण कर. मिपावरच एखादा केजरीवाल आणि किरण बेदी शोध. वाद घालून रंगत वाढवण्यासाठी कपिल सिब्बल आणि मनिष तिवारींचे मिपा अवतारही शोध आणि मग राजघाटावर जाऊन दोन तास चिंतन कर. त्यानंतरच आपण पुढे बोलू.
  • Log in or register to post comments

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
Wed, 08/24/2011 - 17:01 नवीन
मला उपोषण करायची गरज आहे का ? मी तसाही उपोषीत + कुपोषीत दिसतोच की ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

बॉरं!

प्रियाली
Wed, 08/24/2011 - 17:04 नवीन
आज पराच्या उपोषणाचा नववा दिवस. त्वरित तोडगा काढा रे कुणीतरी? नाहीतर परा, प्लीज जपा! असा नवा लेख टाकावा लागेल मला. कृपा कर, मिपाकरांवर. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ड्रिप

विनायक प्रभू
Wed, 08/24/2011 - 17:07 नवीन
अरेरे. परा आपण तुला देशी ची ड्रिप चालु करु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

ड्रिप

विनायक प्रभू
Wed, 08/24/2011 - 17:07 नवीन
अरेरे. परा आपण तुला देशी ची ड्रिप चालु करु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

परा,प्लीज जपा! ऐवजी परा,प्लीज

कानडाऊ योगेशु
Wed, 08/24/2011 - 18:47 नवीन
परा,प्लीज जपा! ऐवजी परा,प्लीज गपा! वा परा,प्लीज खपा! असा लेख येण्याचीच शक्यता जास्त आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

+१

छोटा डॉन
Wed, 08/24/2011 - 17:02 नवीन
उपोषण करणारा ( घ्या, आम्ही आत्ताच 'अरे,तुरे' चालु केले ) कोण आहे ते आधी कळुद्यात. मग आम्ही ह्यावर सविस्तर प्रतिक्रिया देउ, ओके ? - छोटा डॉन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

शोधाची गरज...

धमाल मुलगा
Wed, 08/24/2011 - 18:30 नवीन
>>मिपावरच एखादा केजरीवाल आणि किरण बेदी शोध. वाद घालून रंगत वाढवण्यासाठी कपिल सिब्बल आणि मनिष तिवारींचे मिपा अवतारही शोध
केजरीवाल आणि बेदीच तेव्हढे शोधावे लागतील. सिब्बल आणि तिवारींचेही पितर शोभावेत असे बक्कळ मिपा अवतार संधीच्या शोधात हिंडतच असतायत की. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

धमाल केजरीवाल यांचं खरं हलकट

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/24/2011 - 18:37 नवीन
धमाल केजरीवाल यांचं खरं हलकट रूप अशा प्रकारे समोर येत आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हं..

धमाल मुलगा
Wed, 08/24/2011 - 19:05 नवीन
ह्या बोलल्या बघा अदिती रॉय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

घोळ

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/24/2011 - 19:09 नवीन
नाही, नाही. काही दिवसांपूर्वी श्रावण आणि आता सोकाजींनी मला अदिती बेदी बनवलं आहे. पण अदिती रॉय हे जास्त सयुक्तित आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

बेदी काय अन रॉय काय..........

विजुभाऊ
Wed, 08/24/2011 - 19:14 नवीन
बेदी काय अन रॉय काय.......... धरून धोपटायचेच ना कोणालातरी पार्टीत बदल एवढेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

तेच तेच!

धमाल मुलगा
Wed, 08/24/2011 - 19:22 नवीन
त्यांचा स्वप्नाळू आशावाद आणि माझा वास्तववाद ह्यातला फरक आहे तो. ;) (पळाऽऽ...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

या वेळेस मी तुझ्या बाजूने रे!

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/24/2011 - 19:24 नवीन
या वेळेस मी तुझ्या बाजूने रे! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आता

श्रावण मोडक
Fri, 08/26/2011 - 11:01 नवीन
आता इथं दंगा बास्स करा. वेगळा धागा सुरू करा. फेज टू. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रियाली

खात्री

विनायक प्रभू
Wed, 08/24/2011 - 17:02 नवीन
असा लेख परा कडुन येणार ह्याची खात्री होती. असो. अवांतरः परा तुच कर उपोषण. नाहीतरी तुझे वजन सध्या वाढलेले आहे. दहा दिवसात ५ किलो २०० ग्राम कमी होइल. पाण्याऐवजी काय द्रावण द्यायचे ते आधीच सांग. अ. के. चे काम बिका करतीलच.
  • Log in or register to post comments

आणखी एकाची भर ??!!

पल्लवी
Wed, 08/24/2011 - 17:03 नवीन
भन्नाटचा बँड वाजिव की त्यापेक्षा. कट्टाळा आलाय त्येच त्येच वाचुन आता !
  • Log in or register to post comments

मागे एकदा पी ए संगमा लोकसभा

विजुभाऊ
Wed, 08/24/2011 - 17:03 नवीन
मागे एकदा पी ए संगमा लोकसभा अध्यक्ष असताना त्यानी असेच एक क्रान्ती आंदोलन चालवायचा विचार आणला होता.भ्रष्टाचारावर क्रान्ती करुयात म्हणून.......... पण संगमा हे रात्रवादीचे खासदार होते. त्या क्रान्तीचे काय झाले असेल सांगण्याची आवश्यकता नाही. इथे देखील तसे होऊ शकेल. तुम्ही लोकपालालाच लोकपालाच्या कक्षेत आणायला सांगताय सार्त्र झ्या पोल ने म्हंटले होते की हू विल्ल गार्ड द गार्ड्स? एका थोर मिपासदस्याने म्हंटलच आहे : सम आर मोअर इक्वल द्यान आदर्स. ( हे अवलिया सदस्य सध्या मिपावर कोणत्या अवतारात वावरतात ते अजून डिक्लेअर झालेले नाहिय्ये. त्यांचे दोन अवतार समाप्त झाले आहेत)
  • Log in or register to post comments

रात्रवादी??

असुर
Wed, 08/24/2011 - 17:28 नवीन
>>> पण संगमा हे रात्रवादीचे खासदार होते. <<< रात्रवादी??:D 'ष्ट्र' चा 'त्र' उगाच झालेला नाही हे सूज्ञांच्या लक्षात आलेच असेल.. विजुभौंनी परत एकदा एकाच दगडात अनेक बाटल्यांची बुचे उडविली आहेत. बादवे, रात्रवादी या शब्दाचा अर्थ 'रात्र झालीच पाहीजे' की 'रात्रच असली पाहीजे' पैकी कोणता घ्यावा किंवा कसे?? ;-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मला वाटतं...

चेतन सुभाष गुगळे
Wed, 08/24/2011 - 17:38 नवीन
रात्र रंगली पाहिजे किंवा वसूल झाली पाहिजे असा काहीसा अर्थ अभिप्रेत असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

=)) कुणी परत एखादा तुझा धागा

गणपा
Wed, 08/24/2011 - 17:12 नवीन
=)) कुणी परत एखादा तुझा धागा वा प्रतिसाद उडवला काय रे?
  • Log in or register to post comments

@ गणपा

परिकथेतील राजकुमार
Wed, 08/24/2011 - 17:32 नवीन
छे छे. वैयक्तिक रोष म्हणून हे आवहन केलेले नाही याची नोंद घेतल्या जावी. ;) बाकी काही संपादक आमचाच अण्णा हजारे करायला निघालेले बघून अंमळ मौज वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

छे रे!

प्रियाली
Wed, 08/24/2011 - 17:33 नवीन
बाकी काही संपादक आमचाच अण्णा हजारे करायला निघालेले बघून अंमळ मौज वाटली.
तुझा पीपली लाइव करायची आम्ही संधी शोधत होतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

लष्कर-ए-शिवबा

नंदन
Wed, 08/24/2011 - 17:17 नवीन
आठवले. बाकी चालू द्या ;)
  • Log in or register to post comments

मिपालोकपाल, पराण्णा आणि उपोषण

असुर
Wed, 08/24/2011 - 17:35 नवीन
काय पराण्णा, तब्येत वगैरे सगळं ओक्के??? उपोषण वगैरे करायचे असल्यास तुमच्या परिगणसिद्धीमधून इंट्या/स्पायलू वैग्रे कार्यकर्ते घ्या मागवून.. :-) आजच उद्धव ठकर्‍यांनी "अण्णा, तुमची देशाला गरज आहे, तुम्ही उपोषण करु नका. बेदी किंवा केजरीवाल यांना उपोषण करु द्या." अशा आशयाचे एक अतिशय नर्मविनोदी विधान केले आहे. :D बघा, 'मिपाला देखील तुमची गरज आहे' वगैरे म्हणणारे कोणी डान्राव आहेत का ते... ;-) --असुर
  • Log in or register to post comments

घ्या ...

छोटा डॉन
Wed, 08/24/2011 - 18:02 नवीन
>>बघा, 'मिपाला देखील तुमची गरज आहे' वगैरे म्हणणारे कोणी डान्राव आहेत का ते... बाप्पा, आम्ही केव्हाले 'आपोझिशन' मध्ये बसुन राहिलो ना बाप्पा, आम्ही कायले असे म्हणु ? इनफॅक्ट आम्ही विचारतो आहे की कोण उपोषणाला बसणार आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

मिपाची 'टीम अण्णा'

सोत्रि
Wed, 08/24/2011 - 18:37 नवीन
बाकी काही संपादक आमचाच अण्णा हजारे करायला निघालेले बघून अंमळ मौज वाटली.
हे वाचुन एक्दम विजेचा लोळ चमकुन मिपाची 'टीम अण्णा', डोळ्यासमोर साक्षात साकार झाली. अगदी शेम टु शेम रामानंद सागर फेम रामयण इस्टाइल मधे: परिकथेतील राजकुमार - (Anna Hazare) 3_14 अदिती - (Kiran Bedi) धमाल मुलगा - (Arvind Kejriwal) विजुभाउ - (Shanti Bhushan) बिपीन्दा - (Prashant Bhushan) श्रावण मोडक - (Santosh Hegde) ही फ्रेम संपते न संपते तोच दुसर्‍या फ्रेम मधे डॉन्रावांची झुल्पे एक्दम पांढरी होउन साक्षात शिब्बल अवतीर्ण झाले. - ('अण्णा तुम आगे बढो' असा नारा देणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments

=)) =)) इश्य

शुचि
Wed, 08/24/2011 - 18:43 नवीन
=)) =)) इश्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

=)) =)) इश्य उभ्या

विजुभाऊ
Wed, 08/24/2011 - 19:02 नवीन
=)) =)) इश्य उभ्या रोमरोमांतुनी चैत्रवाटा कुणी देहयात्रेत या गुंतले? आरक्त त्याच्या कृपेच्या कडा अन उष:सूक्त ओठात ओथंबले... शुचि तै......... तुमची स्वाक्षरी तरी बदला किंवा या असल्या स्वाक्षरीनिशी इश्श्य तरी म्हणून नका अजून घोड्यावर बसलेले नाहीत असा उमेदवारांचा गैरसमज व्हायचा....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

हाहाहा विजुभाऊ .... अहो खरच

शुचि
Wed, 08/24/2011 - 19:06 नवीन
हाहाहा विजुभाऊ .... अहो खरच कॉफीचा ठसका लागला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

खी खी खी ....

सोत्रि
Wed, 08/24/2011 - 19:19 नवीन
आयला विजुभौ बरं झाले तुम्ही हा प्रतिसाद टाकलात. मलाही शिरशिरी आलीच होती....... ;) पण म्हटल पाशवी शक़्तीचा अजुन अंदाज नाहीयेय, उगाच काडी करायला नको नाहीतर पाशवी शक़्तींपासुन मुक्ती मिळवता मिळवता नाकी नउ यायचे. :lol: - (देहयात्रेत गुंतलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मलाही शिरशिरी आलीच

विजुभाऊ
Wed, 08/24/2011 - 19:46 नवीन
मलाही शिरशिरी आलीच होती....... Wink ऑ..शिरशिरी का सुरसुरी .......... ? मराठीत दोन्हीचे अर्थ वेगळे होतात शिरशिरी येणे =अंगावर शिरशिरी येणे ( उदा :थंड पाण्याच्या स्पर्षाने ) सुरसुरी येणे = फास्टरफेणे च्या पुस्तकात बन्याला कसली तरी उचापत करण्याची सुरसुरी आली की तो नेहमी टॉक्क असा आवाज करायचा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

माफ करा येक डाव, माती

सोत्रि
Wed, 08/24/2011 - 19:54 नवीन
माफ करा येक डाव, माती खाल्ली... :( सुरसुरी आली असेच म्हणायचे होते :) - (माफीचा साक्षीदार) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ऑं

चिंतामणी
Wed, 08/24/2011 - 21:01 नवीन
शिरशिरी येणे =अंगावर शिरशिरी येणे ( उदा :थंड पाण्याच्या स्पर्षाने ) ऑं :-O :shock: भौ- एव्हढाच अर्थ अभीप्रेत आहे?????????? :-~ :puzzled:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

भौ- एव्हढाच अर्थ अभीप्रेत

विजुभाऊ
Wed, 08/24/2011 - 21:11 नवीन
भौ- एव्हढाच अर्थ अभीप्रेत आहे?????????? Puzzled Puzzled बाकीचे ल्हिले तर धरुन हाणतील. अगोदरच ती इश्श्य च्या नंतरची कविता त्यात पुन्हा शिरशिरी..... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

ठ्ठ्या:!!!!

धमाल मुलगा
Wed, 08/24/2011 - 19:20 नवीन
मेलो! नाकातोंडातून कॉफीचे फवारे उडाले राव. भाऊ आजकाल फुल्ल फॉर्मात बॅटिंग करुन र्‍हायले बाप्पा... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

धमाल राव, काही प्रश्न पडले

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 08/26/2011 - 10:58 नवीन
धमाल राव, काही प्रश्न पडले आहेत मला, १) तुम्ही दिवसातून किती वेळा कॉफी पिता ? २) इतक्यांदा नाकातोंडात कॉफी गेल्याने त्याचे काही दुष्परिणाम झाले आहेत का ? ३) एकदा नाकातोंडात कॉफी गेली की त्यातून सावरून मग प्रतिसाद टंकायला तुम्हाला साधारण किती वेळ लागतो ? ४) गरम कॉफी नाकात गेल्याने सर्दी बरी होते, असा तुमचा अनुभव आहे काय ? असल्यास तुम्ही कॉफी-नेती या नवीन प्रकारचे जनक म्हणून पेटंट का नाही घेऊन टाकत ? तूर्तास इतकेच आहेत, अजून काही प्रश्न पडले तर ते विचारेनच ;-) वि.मे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

विश्वनाथपंत, काही उत्तर पाडतो मी,

धमाल मुलगा
Fri, 08/26/2011 - 11:58 नवीन
विश्वनाथपंत, काही उत्तर पाडतो मी, १) तुम्ही दिवसातून किती वेळा कॉफी पिता ? कधी मोजायची गरज नाही पडली बा. हापिसातल्या कॉफीशॉपवाल्याला विचारावं लागेल. बहुधा १०-१२ लार्ज कॉफी आणि ५-७ शॉट्स होत असावेत. २) इतक्यांदा नाकातोंडात कॉफी गेल्याने त्याचे काही दुष्परिणाम झाले आहेत का ? अं...नाही! उलट कोमट पाण्यामुळं स्वच्छ होतं आणि कॅफेनमुळं निर्जंतुक. ३) एकदा नाकातोंडात कॉफी गेली की त्यातून सावरून मग प्रतिसाद टंकायला तुम्हाला साधारण किती वेळ लागतो ? अंदाजे अर्धा-पाऊण मिनिट. पुढच्या वेळी घड्याळ लाऊन वेळ नोंदवून ठेवेन :) ४) गरम कॉफी नाकात गेल्याने सर्दी बरी होते, असा तुमचा अनुभव आहे काय ? नाही. सर्दीवर कॉफीचा उपयोग नाही. त्यासाठी छानशी ब्रँडी गरम पाण्यात चमचाभर मध घालून घेतो मी. >>असल्यास तुम्ही कॉफी-नेती या नवीन प्रकारचे जनक म्हणून पेटंट का नाही घेऊन टाकत ? आमची संस्कृतीच मुळात इतकी थोर आहे, कशा कशाची पेटंटं घेत बसणार? कणाद मुनींनी अणूच्या संकल्पनेचं पेटंट घेतलं नाही. सुश्रुतांनी शल्यक्रियेचं पेटंट घेतलं नाही, पातंजलमुनींनी योगसाधनेचं पेटंट घेतलं नाही, मध्वाचार्यांनी आध्यात्माचं पेटंट घेतलं नाही, ...मी तर फार फार यःकिंचित मनुष्य आहे हो. :) >>तूर्तास इतकेच आहेत, ठीक ठीक. >>अजून काही प्रश्न पडले तर ते विचारेनच अवश्य. मज मूढास जमतील तशी उत्तरं देण्याचा यत्न करेन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

अहो केजरीवाल कॉफ्या काय

इरसाल
Fri, 08/26/2011 - 12:11 नवीन
अहो केजरीवाल कॉफ्या काय पिताय. उपोषण बिपोषणाचा बघा जरा ? उप्स.......बिप्स नाय ब्र कां ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

=))

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/24/2011 - 18:54 नवीन
आयला सोकाजी, मोडकांनी तुमचाही गेम केला तर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

माझंच विधान खरं करून दाखवलंत?

चेतन सुभाष गुगळे
Wed, 08/24/2011 - 22:48 नवीन
<<आयला>> हा उल्लेख चक्क तुमच्याकडून. या असल्या शब्दोल्लेखाने त्या मातेला किती यातना झाल्या असतील? "एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीला दु:ख देण्यास कारणीभूत होते" हे मी या संकेतस्थळावर इतरत्र मांडलेलं वैश्विक सत्य जे की तुम्हाला तिथं पटलं नव्हतं शेवटी तुम्ही इथं स्वत:च्या करणीनं (किंवा टंकणीनं) खरं करून दाखवलंतच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आवरा

सोत्रि
Wed, 08/24/2011 - 22:53 नवीन
आवरा तिच्यायला ! - (वैश्विक सत्य उलगडण्यात दंगलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

ह. च घ्याल याची खात्री आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/24/2011 - 23:42 नवीन
तिच्या म्हणजे नक्की कोणाच्या आयला का आवरायचं हो सोकाजी? उगाच नस्त्या गमजा करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

खी खी खी ....

सोत्रि
गुरुवार, 08/25/2011 - 07:25 नवीन
तेच तर वैश्विक सत्य उलगडण्यात दंगलेलो आहे ;) - (वैश्विक सत्य उलगडण्यात दंगलेला) सोकाजी अवांतरः मी फार हलकट (वजनाने हलका असलेला ह्या अर्थी) नसल्यामुळे सर्व गोष्टी हलक्याच वाटतात मला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

गृहितकं

राजेश घासकडवी
Wed, 08/24/2011 - 22:59 नवीन
तुमच्या प्रतिसादात काही दडलेली गृहितकं आहेत. १. आयला या शब्दाचा आई या शब्दाशी काही संबंध आहे. (मला वाटत होतं की वाक्याला वजन येण्यासाठी वापरण्यात येणारा निरर्थक शब्द आहे) २. आयला हा शब्द स्त्रीच्या तोंडी (अगर लेखनात) आला तर त्यामुळे इतर कुठल्यातरी स्त्रीला दुःख होतं. ३. स्त्रियांनी काय प्रकारचे शब्द वापरावे व काय वापरू नयेत हे स्त्री नसलेल्यांनी सांगणं योग्य आहे. (आठवा, स्लटवॉक) ४. तो शब्द लिहिणारी ३_१४ विक्षिप्त अदिती आयडीधारक व्यक्ती या स्त्री आहेत. या सगळ्याबद्दल अदिती व प्रियाली या स्त्रीनामसदृश आयडीधारकांकडून काय प्रतिक्रिया येते हे पहाणं रोचक ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

ओढा ओढा

प्रियाली
Wed, 08/24/2011 - 23:49 नवीन
इथून तिथून काड्या लावा.
या सगळ्याबद्दल अदिती व प्रियाली या स्त्रीनामसदृश आयडीधारकांकडून काय प्रतिक्रिया येते हे पहाणं रोचक ठरेल.
मी पूर्वीच म्हटल्याप्रमाणे अदितीचं माहित नाही, ही थोडी पर्शनल बाब आहे. प्रियालीचा फोटु खरडवहीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

काहीही

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/24/2011 - 23:47 नवीन
हा उल्लेख चक्क तुमच्याकडून.
आता '३_१४ विक्षिप्त अदिती' या आयडीने प्रतिसाद दिला म्हणजे मीच हा उल्लेख केला असा संशय येण्यास जागा आहे.
या असल्या शब्दोल्लेखाने त्या मातेला किती यातना झाल्या असतील?
कोणती*, कोणाची माता? आणि असले नामोल्लेख मी अनेक मातांसमोर केलेला आहे. च्यायला, भाईकाकांनी स्त्री पात्राच्या तोंडी "हितं कोण चालायला बसलं आहे रांडीचं?" असं घातलेलं चालतं. आणि ३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीने साधे साधे, च्यायला, आयला, तिच्यामारी, हलकट, फकि'नेल (fuckin'ell) असले शब्द वापरले की लगेच यातना होणार का कोणाच्या मातेला?
"एक स्त्रीच दुसर्‍या स्त्रीला दु:ख देण्यास कारणीभूत होते"
तुम्ही काय ते डाऊनमार्केट, जुनाट साहित्य वाचता का ज्यात आदर्श स्त्री कशी असावी याचं अतिशय 'सडकं' वर्णन असतं.
हे मी या संकेतस्थळावर इतरत्र मांडलेलं वैश्विक सत्य जे की तुम्हाला तिथं पटलं नव्हतं शेवटी तुम्ही इथं स्वत:च्या करणीनं (किंवा टंकणीनं) खरं करून दाखवलंतच ना?
अहो, जिथे स्त्रीशिवाय मनुष्याचा जन्मच होत नाही तिथे सगळ्याच गोष्टींचा कार्यकारणभाव स्त्रीपाशी नेता येईलच. अगदी ओसामाच्या आईलाही तुम्ही दोष देऊ शकता वर्ल्ड ट्रेड सेंटर पाडण्याचा! म्हणून काय ते खरं मानायचं का? बाकी अनेक वैश्चिक सत्य मी पण याच संकेतस्थळावर इतरत्र मांडली आहेत. त्यांचा अभ्यास केलात का? *गोमाता, भारतमाता, हिंदमाता इ.इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

नाही, तुमच्याकडून मृदु शब्दांची अपेक्षा नाहीच.

चेतन सुभाष गुगळे
गुरुवार, 08/25/2011 - 09:05 नवीन
<< बाकी अनेक वैश्चिक सत्य मी पण याच संकेतस्थळावर इतरत्र मांडली आहेत. त्यांचा अभ्यास केलात का? >> <<३_१४ विक्षिप्त अदिती या आयडीने साधे साधे, च्यायला, आयला, तिच्यामारी, हलकट, फकि'नेल (fuckin'ell) असले शब्द वापरले की लगेच यातना होणार का कोणाच्या मातेला?>> अर्थातच, तुम्ही मांडलेली अनेक धक्कादायक विधानं (वैश्विक सत्य म्हणण्याचा धीर होत नाही) मी वाचली असून पचवली ही आहेत. त्याचा अभ्यास करुन इतकेच सांगतो की मृदु शब्द तुम्ही टंकावेत अशी अपेक्षा निदान मी तरी नक्कीच करणार नाही. पण पंडित गागाभट्टांनी खुलासा केल्याप्रमाणे << , एखाद्या स्त्रीलिंगी व्यक्तीने अथवा स्त्रीसदृश आयडीने३ या शब्दांचा वापर करणे हे अर्थाच्या दृष्टीने किंचित चमत्कारिक वाटू शकते, आणि त्या दृष्टिकोनातून 'च्या बापाला' किंवा 'दीर/नणंद' (अथवा 'देवर/ननद') असे पर्यायी शब्दप्रयोग सुचवण्याची प्रथमदर्शनी धारणा एखाद्या सहजनिरीक्षकास (casual observer अशा अर्थी) होऊ शकते. >> <<त्यामुळे विशेषतः स्त्रियांनी (किंवा स्त्रीसदृश आयडींनी५) असे शब्दप्रयोग करून अशा स्त्रीविरोधी आणि गलिच्छ विचारधारेस अप्रत्यक्षपणे आणि अभावितपणे हातभार लावणे हे आमच्या पुरुषसूकर६ (किंवा पुरुषसुकर७) तर्कास सुसंगत वाटत नाह>> अगदी असेच मलाही अभिप्रेत होते. स्त्री आणि पुरूषांच्या पारंपारिक भुमिकांची अनेक वेळा अदलाबदल होते. पण त्यावेळी अगदी तसेच पुरूषी शब्द स्त्रिया वापरत नाहीत की तसेच स्त्रीसुलभ शब्द पुरूष वापरत नाही. शब्दांवर योग्य तो लिंगवाचक बदल केला जातोच की. उदाहरणार्थ, सई परांजपे यांच्या एका हिंदी चित्रपटात एका पुरूष पात्राला महिला पात्र छेडते. तेव्हा पुरूष पात्र केविलवाण्या सुरात उद्गारते, "तुम्हारे घर में कोई बाप, भाई नही है क्या?" पाहा इथे महिलांच्या तोंडी असलेल्या पारंपारिक मा-बहन या शब्दांमध्ये कसा समर्पक बदल केला गेला आहे. मलाही तुमच्याकडून असाच क्रांतिकारी बदल अपेक्षित होता. तुम्ही आवश्यक तो बदल न केल्याने पंडित गागाभट्टांनी तर्क लढविल्याप्रमाणे <<'समलिंगी संबंधांत काहीही गैर नसते'४ या आजकाल हळूहळू मान्यता पावू लागलेल्या विचारधारेस मान देऊन, लेस्बियन/गे चळवळीस नैतिक पाठिंबा देण्याच्या आणि एकात्मता दर्शवण्याच्या उदात्त भावनेतून असे शब्दप्रयोग करणे हे अर्थातच शक्य असावे. >> वाचणार्‍याचा असा समजदेखील होऊ शकतो. <<तुम्ही काय ते डाऊनमार्केट, जुनाट साहित्य वाचता का ज्यात आदर्श स्त्री कशी असावी याचं अतिशय 'सडकं' वर्णन असत>> मी असलं काही साहित्य वाचत नाही. परंतू "ज्यात आदर्श स्त्री कशी असावी याचं अतिशय 'सडकं' वर्णन असतं" अशा दूरदर्शन मालिकातरी डाऊनमार्केट नसाव्यात, अन्यथा सिंदुर, सुहाग, करवा चौथ आदींची रेलचेल असणार्‍या मालिका इतक्या उदंड प्रमाणात बनल्या आणि महिलावर्गात लोकप्रिय झाल्या नसत्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

चला एक अपेक्षा तर सोडलीत.

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/25/2011 - 18:59 नवीन
तुम्ही मांडलेली अनेक धक्कादायक विधानं (वैश्विक सत्य म्हणण्याचा धीर होत नाही) मी वाचली असून पचवली ही आहेत.
स्वतःच्या फुटकळ गप्पांना "वैश्विक सत्य" म्हणण्याचा धीर तर सोडाच स्वप्नही मी बघत नाही. नाही, मी अजूनतरी मूर्खांच्या नंदनवनात रहात नाही. पण तुम्ही माझी विधानं पचवली आहेत का याबद्दल मला शंकाच आहे.
पण पंडित गागाभट्टांनी खुलासा केल्याप्रमाणे ...
पंगांनी मुद्दे मांडले आहेत म्हणूनच मी त्यांच्याशी चर्चा करते आहे. "वैश्विक सत्यां"बद्दल चर्चा अशक्य आहे; आमच्यात "वैश्विक सत्यां"ची रेवडी उडवतात.
परंतू "ज्यात आदर्श स्त्री कशी असावी याचं अतिशय 'सडकं' वर्णन असतं" अशा दूरदर्शन मालिकातरी डाऊनमार्केट नसाव्यात, अन्यथा सिंदुर, सुहाग, करवा चौथ आदींची रेलचेल असणार्‍या मालिका इतक्या उदंड प्रमाणात बनल्या आणि महिलावर्गात लोकप्रिय झाल्या नसत्या.
लोकप्रिय आहे म्हणून डाऊनमार्केट नाही हे आणखी एक "वैश्विक सत्य" कुठे वाचलंत? अगदी काल सुरू झालेल्या मालिकेतही असल्या सडक्या गोष्टी आदर्श म्हणून दाखवल्या असतील तरी मी त्याला जुनाटच म्हणेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे

हम्म्म्म्म्...

पंगा
गुरुवार, 08/25/2011 - 01:06 नवीन
'आयला'/'च्यायला', 'साला'/'साली' हे शब्दप्रयोग हल्लीच्या समानतेच्या युगात युनिसेक्स झाले आहेत खरे. म्हटले तर हे प्रगतीचे लक्षण आहे. 'शिव्या देणे' हा प्रकार आणि त्यास प्राप्त असलेली समाजमान्यता हे दोन्ही तसे पूर्वापारपासून युनिसेक्सच; फक्त१, पूर्वीच्या काळात पुरुषांनी कोणत्या शिव्या द्याव्या आणि स्त्रियांनी कोणत्या शिव्या द्याव्या याबद्दल काही निश्चित असे संकेत होते, कदाचित 'पुरुषी शिव्या' आणि 'बायकी शिव्या' अशी वर्गवारीही होती. कालौघात हे संकेत विस्मरणात जाऊन त्यांतून लादली गेलेली बंधने शिथिल होत आहेत, आणि हे भेदभाव गळून पडून या शब्दांचा वापरहक्क सर्वांसाठी समानरीत्या खुला होत आहे, आणि अशा रीतीने अंशतः का होईना, पण समानता येऊ पाहत आहे. या अर्थाने हे प्रगतीचे लक्षणच मानले पाहिजे. (अर्थात, उपरोल्लेखित शब्दप्रयोगांचा स्त्रियांकडून वापर ही प्रथा तितकीही नवी नसावी. 'शोले'मधील 'बसंती'चे उदाहरण हे तितकेही अलीकडचे नाही.) मात्र, शब्दशः अर्थ अथवा गर्भितार्थ२ लक्षात घेतले असता, एखाद्या स्त्रीलिंगी व्यक्तीने अथवा स्त्रीसदृश आयडीने३ या शब्दांचा वापर करणे हे अर्थाच्या दृष्टीने किंचित चमत्कारिक वाटू शकते, आणि त्या दृष्टिकोनातून 'च्या बापाला' किंवा 'दीर/नणंद' (अथवा 'देवर/ननद') असे पर्यायी शब्दप्रयोग सुचवण्याची प्रथमदर्शनी धारणा एखाद्या सहजनिरीक्षकास (casual observer अशा अर्थी) होऊ शकते. मात्र, असे काही करण्यापूर्वी अशा शब्दप्रयोगांच्या वापरामागे अन्य काही भावना असणे शक्य आहे का, याचाही विचार करणे येथे इष्ट ठरावे. 'समलिंगी संबंधांत काहीही गैर नसते'४ या आजकाल हळूहळू मान्यता पावू लागलेल्या विचारधारेस मान देऊन, लेस्बियन/गे चळवळीस नैतिक पाठिंबा देण्याच्या आणि एकात्मता दर्शवण्याच्या उदात्त भावनेतून असे शब्दप्रयोग करणे हे अर्थातच शक्य असावे. (आठवा: "Ich bin ein Berliner.") असा काही विचार अशा शब्दप्रयोगांमागे दडलेला असल्यास तो विचार अर्थातच स्तुत्य आहे. पण तरीही, 'कोणाचीतरी आई अथवा बहीण (पक्षी: एक स्त्री) ही एक भोग्यवस्तू असणे' ही जी एक गलिच्छ आणि अन्याय्य विचारधारा या शब्दांमागे आहे, ती लक्षात घेता, असे शब्द अथवा वाक्प्रचार हे किमानपक्षी 'साक्षीदारांपैकी/देशातील एकमेव मर्द' यांसारख्या वाक्प्रचारांएवढ्या (किंवा कदाचित त्याहून अधिक) गंभीरतेने दखल घेण्यायोग्य असावेत, आणि 'खूब लड़ी मर्दानी'च्या तुलनेत तर कैक पटीने दखलपात्र ठरावेत, असा एक विचार आपला आमच्या सूकरबुद्धीस चाटून जातो, इतकेच. त्यामुळे विशेषतः स्त्रियांनी (किंवा स्त्रीसदृश आयडींनी५) असे शब्दप्रयोग करून अशा स्त्रीविरोधी आणि गलिच्छ विचारधारेस अप्रत्यक्षपणे आणि अभावितपणे हातभार लावणे हे आमच्या पुरुषसूकर६ (किंवा पुरुषसुकर७) तर्कास सुसंगत वाटत नाही.८ तरी कृपया तेवढे ते 'च्या बापाला' किंवा 'दीर/नणंद' (अथवा 'देवर/ननद') यांसारखे शब्दप्रयोग भाषेत रुळवण्याचे मनावर घ्यावेच, अशी संबंधितांना आमची आपली विनम्र सुचवण.९ तळटीपा: १ अवांतर: ही धेडगुजरी शिवी नव्हे, याची कृपया नोंद घ्यावी. २ शब्दशः अर्थ अथवा गर्भितार्थ: 'आयला'/'च्यायला': 'मी वाक्यविषय असलेल्या व्यक्तीच्या मातु:श्रींस भोगले.' (प्रस्तुत शब्द हा एक शब्द नसून कर्ता/कर्त्री आणि क्रियापद अध्याहृत असलेले एक संपूर्ण वाक्य आहे, या बाबीकडे विनम्र निर्देश करू इच्छितो.) 'साला'/'साली': 'वाक्यविषय असलेल्या व्यक्तीच्या भगिनीशी माझे संबंध आहेत.' (श्रेयनिर्देश: 'साला'/'साली' या शब्दांच्या भावार्थाबद्दल श्री. खुशवंतसिंह यांचे आभार.) ३ 'आयडी म्हणजे जिवंत व्यक्ती नव्हे' याची प्रस्तुत प्रतिसादलेखकास पूर्ण कल्पना आहे. मात्र, व्यक्ती जिवंत आहे अथवा मृत याने प्रस्तुत आर्ग्युमेंटात काहीही फरक पडू नये. ४ (अवांतर: या विचारधारेशी किमानपक्षी प्रस्तुत प्रतिसादलेखकाचे तरी काहीही वाकडे नाही, हे येथे स्पष्ट करणे उचित ठरावे.) ५ स्पष्टीकरण आधीप्रमाणेच. ६ 'Male (Chauvinist) Pig' अशा अर्थी. ७ 'पुरुषांना सुलभ' अथवा 'पुरुषसुलभ', अर्थात 'पुरुषांना सहजगत्या समजणारा' अशा अर्थी. थोडक्यात, या संदर्भात Masculine Logic असे कदाचित म्हणता यावे. तर्काचे याव्यतिरिक्त अन्यही प्रकार असण्याबद्दल ऐकलेले आहे. ८ आक्षेपार्ह, निषेधार्ह अथवा निषिद्ध असण्याबद्दल कोणताही दावा केलेला नाही, याची कृपया नोंद घ्यावी. ९ कोणी कोणता शब्दप्रयोग कोणत्या कारणासाठी आणि कधी करावा, हा अर्थातच प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असल्याकारणाने, विनम्र सुचवणीपलीकडे काहीही करणे हे प्रस्तुत प्रतिसादलेखाच्या अधिकारकक्षेत नाही, याची प्रस्तुत प्रतिसादलेखकास नम्र जाणीव आहे, आणि त्याहून अधिक काही करण्याचा प्रस्तुत प्रतिसादलेखकाचा मानसही नाही. कृपया नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेतन सुभाष गुगळे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा