Skip to main content

जनलोकपाल आणि मिपासंपादक

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 24/08/2011 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेले काही दिवस मिपा, टीव्ही, वर्तमानपत्रे बघावे तिकडे अण्णा आणि जनलोकपाल ह्यावर खडाजंगी वाचायला मिळत आहे. आपल्याला त्यातले जास्ती काही कळत नाही पण एकूणच आर्थिक, सामाजिक भ्रष्टाचाराला खीळ बसावी , सामान्य लोकांना न्याय मिळावा, अकार्यक्षम अधिकारी तसेच बाबू लोकांना चाप बसावा ह्यासाठी काहीतरी कायदा बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत येवढेच आम्हाला कळले. मग मनात असे आले की, सामान्य मिपाकरांचे प्रतिसादाच्या प्रतिसाद खाणार्‍या, कधी कधी तर अख्खे धागेच घशात घालणार्‍या संपादकांना जनलोकपालच्या कक्षेत आणता येईल काय ? त्यासाठी काय करावे लागेल ? अनिवासी संपादकांना ह्यातून सूट मिळण्याची शक्यता आहे का ? तसे असल्यास ते सध्या ज्या देशात आहेत त्या देशाशी एखादा करार (गुन्हेगार हस्तांतरा सारखा) करून त्यांना ह्या न्याय कक्षेत आणता येईल काय ? संपादक मंडळ ह्या आयडीवर गुन्हा दाखल झाल्यास त्याचे उत्तरदायित्व नक्की किती व कोणत्या संपादकांवर लादता येईल ? आणि मुख्य म्हणजे कोणी मिपाकर ह्यासाठी उपोषण करेल काय ?

वाचने 35396
प्रतिक्रिया 170

प्रतिक्रिया

In reply to by विकास

वाटलेच होते मला पराच्या उपोषाणामागे परकीय शक्तींचा हात असावा. परा, माग काय मागायचे ते विकास रावांना , ते नक्की मदत करतील.

In reply to by कुंदन

माग काय मागायचे ते विकास रावांना , ते नक्की मदत करतील. आम्हाला ठेच परत परत लागलेली नाही ! ;)

In reply to by विकास

तुम्हाला कोणी "जरा जपा" असे सावध केले नाही वाट्ट.

मिपाच्या भल्यासाठी चाललेली पराण्णांची तळमळ बघून आम्हाला नेहमीच कौतुक वाटत आलं आहे. कोणीच पुढे नाही आलं तर ते स्वतः मिपाच्या भल्यासाठी आमरण उपोषणही करतील यात तीळमात्र शंका नाही. आम्ही खवत काळीफित लावून त्याला समर्थन देण्याचा नक्की प्रयत्न करु.

मिपावर उपोषण कोण करणार याविषयी बरीच चर्चा झाली. समजा सर्वकाही सुरळित होऊन मिपालोकपाल विधेयक पास झाले तर - मिपालोकपाल निवडणाऱ्या समितीवर कोण कोण असावेत? - शेवटी मिपालोकपाल होण्यासाठी लायक आयडी कोण? या मुद्यांवर चर्चा व्हावी असा मी प्रस्ताव मांडतो.

In reply to by राजेश घासकडवी

जनलोकपालमधे जो 'मॅगसेसे' पुरस्कारप्राप्त हा मुद्दा आहे, त्याजागी मिपावर प्राध्यापक लोकं असावेत अशी सूचना करते.
शेवटी मिपालोकपाल होण्यासाठी लायक आयडी कोण?
आमच्याच कंपूतले असल्यामुळे मी बाबा पथ्यवाले घासकडवी यांचं नाव सुचवते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मेलो च्यामायला!! फोकलीच्यांनो, असले धागे काढताना जरा सांगत जा आधी.. आम्ही पण उपोषण फिपोषणाला मदत करू की कधीतरी.

In reply to by प्रभो

अगदी अगदी !! यासम स्पाच. :D अवांतरः काल उपप्रतिसाद टंकायला गेलो आणि स्पाचा प्रतिसादच गायबला होता. म्हटलं दोन मिनटांत प्रतिसाद गेला संमं येवढं शिरेस झालं का काय ह्या उपोषणाबाबतीत !!

In reply to by स्पा

इतस्त: विखुरलेली गडबडा लोळणारी स्मायली./> इतस्त: विखुरलेली गडबडा लोळणारी स्मायली./> इतस्त: विखुरलेली गडबडा लोळणारी स्मायली./> इतस्त: विखुरलेली गडबडा लोळणारी स्मायली./> इतस्त: विखुरलेली गडबडा लोळणारी स्मायली./> इतस्त: विखुरलेली गडबडा लोळणारी स्मायली./> इतस्त: विखुरलेली गडबडा लोळणारी स्मायली./> - (हसरा) सोकाजी

In reply to by स्पा

जेंव्हा अण्णा तिहार मधून बाहेर आले तेंव्हा जनसमुदाय त्यांना पाठींबा देण्यास उभा होता. पण पराजींचे काही खरे नाही, येथे त्यांना बाहेर पडताना पाहून पब्लीक नुसतेच गडाबडा लोळतयं! :-)

In reply to by स्पा

मी स्पा यांना जाहीर विनंती करतो, की त्यांनी पराजीअण्णांचा फोटो जॉन अब्राहामच्या चेहेऱ्यावर आरोपित करून मंडळाचं आणखीन मनोरंजन करावं.

In reply to by राजेश घासकडवी

गुर्जींच्या विनंतीला मी दुजोरा देते.

In reply to by रेवती

अजून श्रावण खपला, आपलं संपला नाही. राशीला लागला आहे मेला कधीचा. असो. हे बुधबृहस्पती काय भानगड असते? (रीतीभातीतली) अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

श्रावणातल्या बुधवारी पूजा करतात त्यामध्ये जी गोष्ट हवी असेल त्यावर गंधाने दोन बाहुल्या काढतात आणि त्यांची पूजा करातात. त्यामुळे ती गोष्ट मिळते असा पूर्वी विश्वास असायचा. उदा. धान्याच्या कोठीवर बाहुल्या काढून पूजा करणे हे विपुल धान्य मिळण्यासाठी तसेच तिजोरीवर वगैरे. गावाला गेलेलं माणूस परत येण्यासाठी दरवाज्याच्या मागच्या बाजूला बाहुल्या काढत. आता जॉन हवा असल्यास जॉनच्या पाठिमागे दोन नाही तरी एक बाहुली (तिचे हात दिसल्यामुळे तसे समजण्यात आले आहे.) असलेला फोटू तू श्रावणमासी जालावर चढवल्याने आता इफेक्टची वाट पहायला हरकत नाही.

In reply to by स्पा

कोणता चेहरा वापरून कुठे दगड मारलास तू? त्याकडे पाहून म्हणावे वाटते ''परा'' चा ''कावळा" केलास तू..... :wink: हा हा हा...हसुन हसुन लागली वाट,,,लोळुन लोळुन मोडली खाट...ह्हा ह्हा ह्हा...:bigsmile:

मिपावर विर्तुअल टोप्यांचा धंदा चालू करावा काय? (पॉपकॉर्न ची एजन्सी पन घ्यावी म्हणतो)

ए मेल्या, तूच कर उपोषण अन् बिपोषण! संमंवर गुन्हे दाखल करतोय म्हणे! बरं झालं कोणकोण संपादक आहेत ते नक्की माहित नाहिये.

In reply to by धमाल मुलगा

ओ द्येसमुक, तुम्ही उगं मदे मदे करू नका हां! ते लवासा शिट्टीचं काय झालं? त्याफुडची ईस येकर जिमीन मिळाली का? आन् ती पत्रकं छापायला टाका ना राव! अवो कोंची म्हून काय इचारता? तीच ती शेंडी, जान्वं, पळी, पंचपात्राची वो! आपली निशानी हाय ना ती!

In reply to by रेवती

एक तर आमची आदर्श वाट लागलीए. त्यात पुन्हा हायकमांडनी अण्णांची समजूत घालायचा अवजड उद्योग माथी मारला.... तुम्ही आणि आता त्या लवासाच्या भानगडीत नका ओढू हो. :( - हसमुख देशमुख.
आन् ती पत्रकं छापायला टाका ना राव! अवो कोंची म्हून काय इचारता? तीच ती शेंडी, जान्वं, पळी, पंचपात्राची वो! आपली निशानी हाय ना ती!
ह्या कामासाठी कृपया ग्रीसमधील 'स्पार्टन मूलनिवासी संघ' ह्यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती. ;) - धम्या लिओनायडस.

In reply to by धमाल मुलगा

स्पार्टन मूलनिवासी संघ मला खरड करू शकता :D ग्रीसमधील हापिस ठाकुर्लीत म्हात्रे बिल्डींग मध्ये उघडण्यात आलेले आहे :D

In reply to by धमाल मुलगा

तुमी पलायनवाद स्विकारलात ते समजलं धमालराव! स्पा, चल, दिलं तुला ह्यांडबिलं छापायचं क्वांट्रॅक्.......शेंडी, जानवं आणि पळी पंचपात्री घ्येतलेला मनुक्ष पायजे..........नुस्ता चित्रात.....नायतं येशील घ्युन बुवाला! -चंडीका मोनी

In reply to by रेवती

>>शेंडी, जानवं आणि पळी पंचपात्री घ्येतलेला मनुक्ष पायजे फकस्त येवडंच ?? त्ये तुमचं कद, सवळं का काय त्ये नगं व्हय ?? -मिपा स्वयंभोचक संघ सदस्य

In reply to by सूड

पायजेल की! सवळं बी पायजेल, त्याशिवायचा मानूस छापनार व्हता व्हय? अवो काय जनाची न्हाई पन मनाची तरी......पुन्ना अश्लील म्हनायला मोकळे तुमी इरोदी गटवाले! ह्ये आस्सं असतय राजकारन! ह्ये मी धमाल रावांना म्हंतिये......आपलं काम दुसर्‍याच्या गळ्यात मारायचं आनि वर पिरेमाचा आव आनायचा! ठिके, या बारीला मापी दिली.

In reply to by रेवती

संतसज्जन मोड सुरु > आज्जी, श्लील-अश्लील सारं काही सापेक्ष असतं बरं !! संतसज्जन मोड संपला> -इति ह. भ. प. रुमाल फुगला वार्‍यावर्तीधर

In reply to by रेवती

पलायन कसलं? शेवटची सही पाहिलीत ना? मीही स्पार्टनच. फक्त 'स्पार्टन मूलनिवासी संघ' ह्यांना काम मिळावे म्हणून तिकडे पाठव्तोय. :D स्पा ट्राओपस, तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणं काम तुमच्यापर्यंत आणून दिलं आहे. पार्टी आपलीच आहे, बिलिंग नीट करा. घरचंच काम समजून करा. ;)

In reply to by धमाल मुलगा

पार्टी आपलीच आहे, बिलिंग नीट करा. घरचंच काम समजून करा तेजी चिंता करू नगा फकस्त आपल बिडी काडीच बघा कायतरी ;)

In reply to by प्रीत-मोहर

बघू काय तुझ्याकडं? आँ? @ स्पा-र्टन, दोन टायमाला चाय, बिडी आणि वीस रुपये रोज. बघा सौदा पटतोय का? ;) (वि.सु.: ज्या सदस्यांना उपरोल्लेखित ऐतिहासिक बिदागीची माहिती नसेल त्यांचा मिपा-अभ्यास अत्यंत कमी पडतो आहे. अस्सल मिपाकर होण्यासाठी अभ्यास वाढवण्याची गरज आहे. ;) )

In reply to by धमाल मुलगा

माझ्या आंदोलनाच्या आडून स्वतःच्या तुंबड्या भरुन घेउन भ्रष्टाचाराला खतपाणी घालु नये अशी सर्वांना नम्र विनंती.

In reply to by परिकथेतील राजकुमार

माझ्या आंदोलनाच्या आडून स्वतःच्या तुंबड्या भरुन घेउन भ्रष्टाचाराला खतपाणी घालु नये अशी सर्वांना नम्र विनंती. अवो परान्ना ;) कार्यकर्त्यांना(बिपीन दा नव्हे) बी उपाशी माराल का? ;)

In reply to by धमाल मुलगा

दोन टायमाला चाय, बिडी आणि वीस रुपये रोज. बघा सौदा पटतोय का? मालक .. अवो ग्रीस वरून हापिस हिकर आलाय, तर फक्त चा नि बिडी ? अस व्होतू का कधी? वडापाव च पघा कि कायतरी ;)

In reply to by धमाल मुलगा

सहमत रे धम्या. :p :-p :tongue: (च्यामारी धम्याच्या. सोत्री आणि तु भ्रमणध्वनीवर बोलून कास्टींग करता का रे?) :~ :-~ :puzzled:

In reply to by चिंतामणी

चिंतुकाका तुमाला नक्की काय म्हणायचय? स्पष्ट बोला, उगीच आडून वार करू नका.;) -चंडीका मोनी

आणि मुख्य म्हणजे कोणी मिपाकर ह्यासाठी उपोषण करेल काय ? त्यापेक्षा कोणी मिपावर प्रशिद्ध होणार्‍या सुलभ पाकक्रिया करून फक्त ते अन्न(?) खाऊन राहील काय असं विचारा... उपोषणापेक्षा लवकर मरेल!!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

त्यापेक्षा कोणी मिपावर प्रशिद्ध होणार्‍या सुलभ पाकक्रिया करून फक्त ते अन्न(?) खाऊन राहील काय असं विचारा...उपोषणापेक्षा लवकर मरेल!!!!! =) सहमत! पण मग असे केले तर? - पराण्णांनी उपोषणापेक्षा अशा सर्व पाकक्रीया (मिपाचा) निषेध म्हणून खात रहाण्याचा निर्धार केला तर? ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

परा यांच्यावर योग्य ती कारवाई लवकरच करणेत येईल! कारवाई "केल्या जाईल" हा मिपा आक्टान्वये संमंत झालेला शब्दप्रयोग न वापरल्याबद्दल प्रथम बिकांवर कारवाई करण्यात यावी अशी मी मागणी करतो.... सध्या सगळ्या अरबी उंटशहाण्यांना उचलून आपटायचे दिवस आहेत. होस्नी मुबारक गेला, गडाफी गेला... अब तेरा क्या होगा रे बिका? :)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कंची घोषना ते लिवलंच नाय!!! अशा क्रिप्टिक लिहिण्याबद्दल बिका यांचे नांव बदलून ते विप्र असे ठेवावे अशी मी आता मागणी करतो!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

घ्या म्हणजे तुम्हाला माहीतच नव्हते की बिका आणि विप्र हे एकाच व्यक्तीचे डुप्लीकेट आय डी आहेत. मग कसे तुम्ही ज्येष्ठ मिपाकर काका? ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

एक नॉन चा एका कन्फर्म्ड ए.एम.सी बरोबर तुलना केल्याबद्दल पिडां शुची तै चा निषेध. बिका कसले कारवाई करतायत? त्यानी रंगा साहेबांकडे 'कोथिंबिर' कशी निवडावी ची शिकौणी लावलीय ना.

In reply to by शुचि

का गरिबाला "ज्येष्ठ मिपाकर" वगिरे म्हणून लाजवतांय? हम तो आपके चरणरज!!! हां, 'काका' अशासाठी या दोन्ही ध्यानांबरोबर बसून मी प्यार्ट्या गाजवलेल्या आहेत.... :)

परिकथेतील राजकुमाराचा परा झाला इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचा पराण्णा करू नका हो. त्यामुळे तो परका झाल्यासारखा वाटतो. अवांतर: ण आणि न मध्ये बरेच लोक फरक करत त्यामुळे पुढे पराण्णा चा परान्ना असा उल्लेख होण्याची भीती आहे. चुकून असं घडलंच तर त्याची फार पंचाईत होईल. आमच्या इथे लोकांनी हॉटेलचं जेवु नये व स्वत:च्या घरचंच खावं याचा प्रसार करण्याकरिता अनेक तरूणींना "परान्नाला शिवणार नाही" अशी शपथ घ्यायला लावली जातेय. हे लोण पुढे वाढत गेलं तर परान्ना झालेल्या पराचं काय होईल?

In reply to by चेतन सुभाष गुगळे

अनेक तरूणींना "परान्नाला शिवणार नाही" अशी शपथ घ्यायला लावली जातेय. उलट अनेक तरूणी (आणि प्रौढा, पुरंध्री इत्यादि इत्यादी) जर 'परान्ना'ला एकदा शिवल्या तर पुन्हा आयुष्यात दुसर्‍या कुठल्याच 'अन्ना'ला शिवणार नाहीत!! आमचा परान्ना म्हणजे काय समजलांत तुम्ही? त्याच्या दुकानातला गुलाबी ताटवा बघितलेला दिसत नाही तुम्ही!!! :) हो की नाही हो श्रामो? (मिपावर काहीही शाबीत करायचे झाल्यास श्रामोंची साक्ष घ्यायची अशी जुनी प्रथा आहे!!! ते पराच्या दुकानात ताटवे बघत पडलेले असतात असा कुणीही अर्थ काढू नये!!!) :)

In reply to by पिवळा डांबिस

मिपावर काहीही शाबीत करायचे झाल्यास श्रामोंची साक्ष घ्यायची अशी जुनी प्रथा आहे!!!
सहमत!
ते पराच्या दुकानात ताटवे बघत पडलेले असतात असा कुणीही अर्थ काढू नये!!!
=)) =))

In reply to by नंदन


In reply to by पिवळा डांबिस

उलट अनेक तरूणी (आणि प्रौढा, पुरंध्री इत्यादि इत्यादी) जर 'परान्ना'ला एकदा शिवल्या तर पुन्हा आयुष्यात दुसर्‍या कुठल्याच 'अन्ना'ला शिवणार नाहीत!!
स्पाने कृपया जॉनच्या शरीरावर पराच्या चेहेरा आरोपित करावा अशी विनंती मी पुन्हा एकदा करते आहे.
ते पराच्या दुकानात ताटवे बघत पडलेले असतात असा कुणीही अर्थ काढू नये!!!
श्रावण, ही गुंतागुंताची चीज आहे का?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्पाने कृपया जॉनच्या शरीरावर पराच्या चेहेरा आरोपित करावा अशी विनंती मी पुन्हा एकदा करते आहे. >> काय ते सारखं सारखं जॉन जॉन चालवलं आहे. अहो तो चार दिन की चांदनी आहे. हे असले स्टेरॉईड खावून बॉडी बनविणारे खुप जण आले नि गेले. आपला देव आनंद पाहा. कसा चिरतरूण आहे. अभिजात सौंदर्याकडे पाहा. तकलादू गोष्टींचा नाद सोडून द्या.