Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by गणेशा on Tue, 06/28/2011 - 00:10
३. आलं आभाळ दाटुन दु:ख गेलया भरुन थेंबागणिक र सारं वेडावल मन रान || स्वप्न झिम्माड पान कोरडं ठिकुर गाण बांधावर विखुरलं टिपुर आशेचं दाणं || कवा पाहिन मी सारं माझ हिरव शिवार बाया बापड्यांच्या मुखी कवा हक्काची भाकर || आलं आभाळ दाटुन दु:ख गेलया भरुन पेरल्यात ओलशब्द आस पावसाची बघुन || आलं आभाळ दाटुन दु:ख गेलया भरुन || ................ शब्दमेघ (२८ जुन २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ) १. आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक : http://www.misalpav.com/node/18087 २. काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती : http://www.misalpav.com/node/18290 ४. शिवार पिकल उद्या ... : http://www.misalpav.com/node/18515 (नोटः येथे आलेले शब्द ' आल', 'सार', 'कोरड'... हे बोली भाषेतील शब्द आहेत. आले, सारे, कोरडे... अश्या अर्थाचे ते आहेत. पण बोली भाषेत शेवटच्या शब्दावरील ठेका/लय लिखानातुन स्पष्ट दाखवता येत नसल्याने अनुस्वार दिलेला आहे)

Submitted by इंटरनेटस्नेही on Tue, 06/28/2011 - 01:44

Permalink

चांगली आहे कविता. कीप इट अप.

चांगली आहे कविता. कीप इट अप.
  • Log in or register to post comments

Submitted by झंम्प्या on Tue, 06/28/2011 - 10:56

Permalink

खूप सुंदर कविता,

कवितेने अगदी बांधावर उभ करून, शेतकर्याची दुख्ख दाखवली, छान संवाद साधलाय या तीनही कवितेतून, कुठे हळूच मनातील स्वप्न अलगद, घडी उघडून दाखवावी तशी दिसतात, झिम्माड गर्द रानात.. टिफण चालती सर्जा-राजाच्या पायामधी भिंगरी फिरती औंदाच्या पावसात बांधणार चारभिंती घराच्या छप्पराला स्वप्न टांगली कौलांची तर कधी, अगतिकता समोर उभी करता, कवा पाहिन मी सारं माझ हिरव शिवार बाया बापड्यांच्या मुखी कवा हक्काची भाकर || खूपच सुंदर वर्णन,
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Tue, 06/28/2011 - 12:36

In reply to खूप सुंदर कविता, by झंम्प्या

Permalink

मनापासुन धन्यवाद ... मुळ

मनापासुन धन्यवाद ... मुळ कवितेपेक्षा हि तुमचा रिप्लाय छान आहे असे वाटते आहे. .. सर्व प्रतिसादकांचे आभार
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळलेला काव्यप्रेमी on Tue, 06/28/2011 - 11:07

Permalink

__/\__

स्वप्न झिम्माड पान कोरडं ठिकुर गाण बांधावर विखुरलं टिपुर आशेचं दाणं ||
नि:शब्द!!
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 2262 views

Book traversal links for टिपुर आशेचं दाणं ... रानातली वाट......

  • ‹ काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती
  • Up
  • शिवार पिकल उद्या ... (समाप्त... रानातील वाट..) ›

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com