✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शिवार पिकल उद्या ... (समाप्त... रानातील वाट..)

ग — गणेशा, गुरुवार, 07/14/2011 - 16:02
४. शेतामधी संगतीनं राबतोय पहाटेचा ओलाजरद किरण हिरव्या भाताच्या रोपावर दवबिंदु जणु अवखळ शिवार पिकल उद्या जणु घबाड घावल दिवाळ सनाला यंदा घरी फराळ मिळल सावकाराच्या बेन्याच पैकं बी फिटत्याल फाटलेल्या सदर्‍याला जोड ठिगळाचा मिळल वाफ्यातुन वाहतय पाणी हळुच जपुन दारं धरुन मातीत फुलेल रानाच सपान रातच्याला काजव्याचा अंधुक सोनेरी प्रकाश सोन्याच्या दिसाचा हाच सुगावा असल ................ शब्दमेघ (१४ जुलै २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ) . . . . . मागील ३ कविता : १. आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक (गीत) आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक सुरकतलेल्या चेहर्‍यावरी तुझाच कयास उसवला श्वास गड्या जणू संपला प्रवास भेगाळलेल्या आशेवरी कोरडच जिणं सांडलेल्या घामावरी सावकाराचं देणं भुकेला पोटाला आता मातीची ढेकळं पाण्याच्या थेंबासाठी कुत्र्यासम जिणं आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक!! आस घे भिडायाला ओठी पिरतीचे गाण रानातल्या पिकासाठी काळजाचा ठाव हरवलं देहभान.. आता अंधारलं जग मिठीत तुझ्या विसावलं माझं वेडं स्वप्नपान ------------- शब्दमेघ ( २३ मे २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ) . . . . २. काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी... भरारल रान सारं, गंधाळली माती गच्च ओल शिवार.. फुललेली कांती हिरव्या पात्यावर,. मोत्यांची नक्षी पांढर्‍याफटुक ढगांची रेशमी दुलई काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती बांधावर उभी कोवळी रानजाई नटलेल्या सृष्टीवर आभाळाची प्रीती कोसळल्या सरी.. दूर डोंगरमाथी... भरारल रान सारं, गंधाळली माती || झिम्माड गर्द रानात.. टिफण चालती सर्जा-राजाच्या पायामधी भिंगरी फिरती औंदाच्या पावसात बांधणार चारभिंती घराच्या छप्पराला स्वप्न टांगली कौलांची ------------- शब्दमेघ ( १६ जुन २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ) . . . . ३. टिपुर आशेचं दाणं (गीत) आलं आभाळ दाटुन दु:ख गेलया भरुन थेंबागणिक र सारं वेडावल मन रान || स्वप्न झिम्माड पान कोरडं ठिकुर गाण बांधावर विखुरलं टिपुर आशेचं दाणं || कवा पाहिन मी सारं माझ हिरव शिवार बाया बापड्यांच्या मुखी कवा हक्काची भाकर || आलं आभाळ दाटुन दु:ख गेलया भरुन पेरल्यात ओलशब्द आस पावसाची बघुन || आलं आभाळ दाटुन दु:ख गेलया भरुन || ................ शब्दमेघ (२८ जुन २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ)

Book traversal links for शिवार पिकल उद्या ... (समाप्त... रानातील वाट..)

  • ‹ टिपुर आशेचं दाणं ... रानातली वाट......
  • Up
  • ५. दुष्काळ झळा ... रानातली वाट.. ›

प्रतिक्रिया द्या
2650 वाचन

💬 प्रतिसाद (5)

व्वाह!

मिसळलेला काव्यप्रेमी
गुरुवार, 07/14/2011 - 16:45 नवीन
वाफ्यातुन वाहतय पाणी हळुच जपुन दारं धरुन मातीत फुलेल रानाच सपान
हे लय भारी!! जियो!!
  • Log in or register to post comments

वाहव्वा छान

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 07/14/2011 - 17:24 नवीन
सगळ्या कविता म्हणजे १ जिवंत अनुभव आहेत...
  • Log in or register to post comments

छान वाटले

कच्ची कैरी
Fri, 07/15/2011 - 10:54 नवीन
गणेशा ,आज बर्याच दिवसानंतर तुमची कविता वाचली ,खूप छान वाटतय अगदी मिसळपाववर परत आल्यासारख वाटतय .
  • Log in or register to post comments

क्लास..!

विसोबा खेचर
Fri, 07/15/2011 - 11:09 नवीन
क्लास..!
  • Log in or register to post comments

आवड्ली..

पल्लवी
Fri, 07/15/2011 - 16:01 नवीन
शिवार पिकल उद्या जणु घबाड घावल दिवाळ सनाला यंदा घरी फराळ मिळल सावकाराच्या बेन्याच पैकं बी फिटत्याल फाटलेल्या सदर्‍याला जोड ठिगळाचा मिळल ही कडवी आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा