आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
रानातली वाट.. एक न संपणारा परिघ -१
आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक
सुरकतलेल्या चेहर्यावरी तुझाच कयास
उसवला श्वास गड्या जणू संपला प्रवास
भेगाळलेल्या आशेवरी कोरडच जिणं
सांडलेल्या घामावरी सावकाराचं देणं
भुकेला पोटाला आता मातीची ढेकळं
पाण्याच्या थेंबासाठी कुत्र्यासम जिणं
आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक
करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक!!
आस घे भिडायाला ओठी पिरतीचे गाण
रानातल्या पिकासाठी काळजाचा ठाव
हरवलं देहभान.. आता अंधारलं जग
मिठीत तुझ्या विसावलं माझं वेडं स्वप्नपान
------------- शब्दमेघ ( २३ मे २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ)
२. काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती
- काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती
- टिपुर आशेचं दाणं ... रानातली वाट......
- शिवार पिकल उद्या ... (समाप्त... रानातील वाट..)
- ५. दुष्काळ झळा ... रानातली वाट..
भेगाळलेल्या आशेवरी कोरडच
आभाळाच्या मांडवाला भुई ची रे
चांगली आहे कविता.
गणेशा, भावा तू कधी कधी खरचं कवी असतोस.
गडबडीत आहे गणेशा , पण काहितरी
अजून येऊ दे.
छान कविता
संवेदनशील
सर्वांचे मनपुर्वक आभार.. नविन
छान कविता
मस्त रे गणेशा.
सही रे शब्दमेघ....
चांगली कविता
चांगले जमलीय.
एक सुंदर कविता. गणेशा, आणखीन
गणेशा -खूपच मस्त .खूप आवडली
सुंदर रचना अमोल केळकर