✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक

ग — गणेशा, Mon, 05/23/2011 - 22:12
रानातली वाट.. एक न संपणारा परिघ -१ आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक सुरकतलेल्या चेहर्‍यावरी तुझाच कयास उसवला श्वास गड्या जणू संपला प्रवास भेगाळलेल्या आशेवरी कोरडच जिणं सांडलेल्या घामावरी सावकाराचं देणं भुकेला पोटाला आता मातीची ढेकळं पाण्याच्या थेंबासाठी कुत्र्यासम जिणं आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक!! आस घे भिडायाला ओठी पिरतीचे गाण रानातल्या पिकासाठी काळजाचा ठाव हरवलं देहभान.. आता अंधारलं जग मिठीत तुझ्या विसावलं माझं वेडं स्वप्नपान ------------- शब्दमेघ ( २३ मे २०११, रानातली वाट.. एक न संपणारा परिघ) २. काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती
  • काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती
  • टिपुर आशेचं दाणं ... रानातली वाट......
  • शिवार पिकल उद्या ... (समाप्त... रानातील वाट..)
  • ५. दुष्काळ झळा ... रानातली वाट..

Book traversal links for आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक

  • काळ्याशार भुईवर हिरवी क्रांती ›

प्रतिक्रिया द्या
6326 वाचन

💬 प्रतिसाद (17)

भेगाळलेल्या आशेवरी कोरडच

पाषाणभेद
Tue, 05/24/2011 - 00:57 नवीन
भेगाळलेल्या आशेवरी कोरडच जिणं सांडलेल्या घामावरी सावकाराचं देणं भुकेला पोटाला आता मातीची ढेकळं पाण्याच्या थेंबासाठी कुत्र्यासम जिणं हे छान समजले. आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक!! म्हणजे चांगली चाहूल आहे काय?
  • Log in or register to post comments

आभाळाच्या मांडवाला भुई ची रे

गणेशा
Tue, 05/24/2011 - 13:33 नवीन
आभाळाच्या मांडवाला भुई ची रे हाक करपलेल्या रानाला या शृंगाराची भूक!! या ओळींचा अर्थ आहे... करपलेल रानात आता पुन्हा नवतारुण्य घेवुन झाडांना.. रोपांना पुन्हा हिरवा शालु घेवुन नटायचे आहे.. पावसाच्या .. प्रियकराच्या अलिंगणा मध्ये चिंब भिजुन जायचे आहे. आणि म्हणुन आभाळाला भुई साकडे घालते आहे , असे चित्र आहे ह्या ओळीत. (पण ही कविता रोमँटीक नाहि .. करुन असल्याने असे शब्दचित्र.. अश्या शब्दभावना ह्या कवितेत आल्या नाहीत.. पुढे सर्व पद्धतीत 'रानातील वाट... 'लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे तेंव्हा झाडांसाठी,.. हिरव्या शेतासाठी असे रोमँटीक लिहिणार आहे) मनापासुन कविता वाचल्या बद्दल आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

चांगली आहे कविता.

प्राजु
Tue, 05/24/2011 - 04:38 नवीन
चांगली आहे कविता. महानोरांच्या कवितांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

गणेशा, भावा तू कधी कधी खरचं कवी असतोस.

आत्मशून्य
Tue, 05/24/2011 - 05:10 नवीन
_/\_. छान कवीता.
  • Log in or register to post comments

गडबडीत आहे गणेशा , पण काहितरी

स्पंदना
Tue, 05/24/2011 - 07:13 नवीन
गडबडीत आहे गणेशा , पण काहितरी छान दिसतय , नंतर एडीट करते. __/\__
  • Log in or register to post comments

अजून येऊ दे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/24/2011 - 10:00 नवीन
मस्त.....! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

छान कविता

दत्ता काळे
Tue, 05/24/2011 - 10:15 नवीन
प्राजुच्या म्हणण्याप्रमाणे - महानोरांच्या कवितांची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

संवेदनशील

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 05/24/2011 - 11:08 नवीन
असं काहीतरी लिहीता येणे म्हणजेच, संवेदनशील मनाचे लक्षण आहे. खुप सुंदर गणेशा!!
  • Log in or register to post comments

सर्वांचे मनपुर्वक आभार.. नविन

गणेशा
Tue, 05/24/2011 - 13:40 नवीन
सर्वांचे मनपुर्वक आभार.. नविन लिखानाला सुरवात करतानाच असे सुंदर प्रतिसाद पाहुन खुप छान वाटले.. मनापासुन. प्राजु जी आणि दत्ता जी ना.धो.महानोर यांच्या कविता म्हणजे खुपच जबरदस्त आहेत. तशी उंची गाठायला तेव्हडा अनुभव नाहिच.. पण तुम्ही असे लिहिल्याने छान वाटले. अवांतर : ना.धो.महानोर यांच्या स्वताच्या चालीत. त्यांच्या समोर त्यांच्या काही कविता ऐकल्या आहे.. ( वंसत व्याखानमाला, उरुळी कांचन), मी कात टाकली .. आणि नभ उतरु आलं.. जबरदस्तच आहेत.
  • Log in or register to post comments

छान कविता

स्वर भायदे
Tue, 05/24/2011 - 17:19 नवीन
छान कविता आहे गणेशा भेगाळलेल्या आशेवरी कोरडच जिणं सांडलेल्या घामावरी सावकाराचं देणं हे आवडलं( शेतकऱ्याची नेमकी मनोवस्था अशीच झाली आहे.)
  • Log in or register to post comments

मस्त रे गणेशा.

मृत्युन्जय
Tue, 05/24/2011 - 17:32 नवीन
मस्त रे गणेशा.
  • Log in or register to post comments

सही रे शब्दमेघ....

प्यारे१
Tue, 05/24/2011 - 17:50 नवीन
सही रे शब्दमेघ....
  • Log in or register to post comments

चांगली कविता

सखी
Tue, 05/24/2011 - 21:54 नवीन
चांगली कविता!! छान असं लिहणार होते पण त्यातल्या कारुण्याने तसं लिहावसं वाटलं नाही. पांगिरा कधी पहायला मिळतो कुणास ठाऊक, पण हे तश्याच एखाद्या चित्रपटातील गाणं वाटावं इतकी चांगली झालीय कविता असं म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments

चांगले जमलीय.

पैसा
Tue, 05/24/2011 - 23:21 नवीन
मला सुरुवातीला सगळा अर्थ लागला नव्हता, पण परत वाचली आणि तू लिहिलेला अर्थ वाचला तेव्हा कळले.
  • Log in or register to post comments

एक सुंदर कविता. गणेशा, आणखीन

अरुण मनोहर
Wed, 05/25/2011 - 07:47 नवीन
एक सुंदर कविता. गणेशा, आणखीन येऊ देत. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

गणेशा -खूपच मस्त .खूप आवडली

प्रकाश१११
Wed, 05/25/2011 - 08:24 नवीन
गणेशा -खूपच मस्त .खूप आवडली भेगाळलेल्या आशेवरी कोरडच जिणं सांडलेल्या घामावरी सावकाराचं देणं भुकेला पोटाला आता मातीची ढेकळं पाण्याच्या थेंबासाठी कुत्र्यासम जिणं हे छान लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर रचना अमोल केळकर

अमोल केळकर
Wed, 05/25/2011 - 09:24 नवीन
सुंदर रचना :) अमोल केळकर
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा