✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सत्य साईबाबांचे नावच गूढ

म
माझीही शॅम्पेन यांनी
Mon, 04/25/2011 - 08:22  ·  लेख
लेख
नुकताच सत्य साईबाबांचे निधन झाले ८६ वर्षाच्या महापुरुषचा चमत्कारी बाबचा अंत झाला १९४० साली त्यानी स्वता:ला आपण साईबाबांचे अवतार आहोत अस जाहीर केल. १९५४ साली पुत्तपर्थि येथे त्यानी पाहिल हॉस्पिटल काढल , पुढे अनेक ठिकाणी त्यानी कॉलेज , हॉस्पिटलस आणि यूनिवर्सिटी काढल्या. त्यानी कोट्यावधीची माया गोळा केली ( अर्थात बरीच संपत्ती वरील मार्गांनी चांगल्या कामासाठी वापरली सुध्धा) जागो जागी त्याचे देवसमान / तर देवंसोबत फोटो लावले पाहिले आहेत ( खास करून उडुपी हॉटेलात) चेपु आणि ट्विटर वर सध्या त्यांच्या संदेशाची रिघ लागली आहे आता दुसरी बाजू , नरेंद्र दाभोळकर / अनिस नि अंध-स्रद्धा निर्मूलनची सीडि मधे ते कसे हाथसफाई करून लोकाना फसवतात त्याचे विश्लेषण केल आहे , एका प्रसंगात स्वत शंकरराव चव्हाण ह्याच्या उपस्थितीत हे घडला आहे (पुढे त्यांचाच मुलाने ह्या बाबाना बोलावून त्याच्या पायाचे तीर्थ प्राशां केल होत) आता ह्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत , जाणकारणी थोडा प्रकाश टाकावा. १. जे सर्व-सामन्यना कळू शकते (जादू टोणा वैइगरे) ते ह्या सेलेब्रेटीना कळता कामा नये ? ह्याचा त्याना गुरु मानण्याचा उद्देश काय ? सचिन जे काही करतो आहे (उपास , अबोला वै.) ते माझ्या डोक्यापलीकडचे आहे २. ४० हजार करोड ची संपत्ती कशी गोळा केली असावी , त्याच्या ट्रस्ट वर संबधित सरकारने कधीच लक्ष दिल नाही का. तसेक त्यांच्या पश्यात त्याची मालकी वैइगरे हे विषय सोडुनच द्या ३. त्याना इतक्या लोकनी गुरू-स्थानी / देव-स्थानी मानया सारखी नक्की कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने त्याना स्पिरिचुयल गुरू वै संबोधल आहे. कित्येक करोड (किवा) लाख लोक त्याची अनुयायी व्हावेत अस नक्की काय झाल असाव ? (सदर लेख त्याच्यावर टीका करण्यासाठी लिहिला नाहीए , तस वाटल्यास संपादक मंडळानी लेख उडवून टाकावा अशी विनाती) ---------------------- माझीही शॅम्पेन
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
55440 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

या माणसाचा पर्दाफाश करणारे

शिल्पा ब
Mon, 04/25/2011 - 09:59 नवीन
या माणसाचा पर्दाफाश करणारे खूप videos youtube वर आहेत तरीही इतके लोक त्याच्या मागे पाहून डोक्याला शॉट बसला. सेलिब्रिटी वगैरे लोकांचे अशा प्रकारात हितसंबंध गुंतलेले असावेत, नाहीतर ४० करोड कसे आले? आणि हि फक्त वृत्तपत्रांना सांगितलेली रक्कम आहे असं वाटतंय.
  • Log in or register to post comments

४०

चिरोटा
Mon, 04/25/2011 - 12:46 नवीन
४० कोटी नाही तर ४०,००० कोटी. शिवाय फक्त सेलिब्रिटीज नाहीत तर आदरणिय माजी पंतप्रधान नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, कडक मास्तर शंकरराव चव्हाण, माजी लोकसभा अध्यक्ष आदरणिय शिवराज पाटील, (जवळपास भारतरत्न) सचिन्,मैदानावर धावांचा पाउस पाडणारा सुनिल गावस्कर ही आदरणिय मंडळीपण आहेत. अमेरिकेतपण शेकड्यांवर भक्तगण आहेत्.अनेक गोरे तर अनेक भारतिय वंशाचे. राव्/चव्हाण तर गेले.ह्या बाकीच्यांची सी.बी.आय.चौकशी व्हावी असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

असल्या गोष्टींवर जरूर टीका करावी.

जयंत कुलकर्णी
Mon, 04/25/2011 - 10:11 नवीन
येथे वाचा भाग १ भाग - २
  • Log in or register to post comments

याच संदर्भात नरेंद्र

मनिष
गुरुवार, 04/28/2011 - 12:02 नवीन
याच संदर्भात नरेंद्र दाभोळकरांचा लेख इथे वाचता येईल - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=152559%3A2011-04-26-17-02-33 मला त्यातले हे महत्वाचे वाटले -
चमत्काराचा वादग्रस्त मुद्दा उभा करून बाबांच्या अफाट सेवाकार्याकडे दुर्लक्ष केले जाते असा एक आक्षेप असतो. बाबांनी शाळा, दवाखाने वगरे गोष्टी उभ्या केल्या हे खरेच आहे, चांगलेही आहे. पण या स्वरूपाची असंख्य काय्रे याहीपेक्षा फार मोठय़ा प्रमाणावर कोणतेही राज्य शासन वा केंद्र शासन करतच असते. त्याचे कौतुक नसते, कारण लोकांच्या करातून मिळालेल्या पशांतूनच हे सारे घडवले जाते. अब्जावधी रुपयांचा अखंड ओघ येत असेल तर काही सेवाकाय्रे त्यातून उभी राहणारच. असंख्य सेवाकाय्रे करणाऱ्या सरकारला सामान्य नागरिक प्रश्न विचारतो, चिकित्सा करतो, पाच वर्षांनी पदच्युतही करू शकतो. तो त्याचा अधिकार मानला जातो. बाबांच्या ट्रस्टला अफाट देणग्या मिळण्यात त्यांच्या चमत्काराचा नि:संशय वाटा आहे. मग त्या चमत्कारांना प्रश्न विचारणे, त्यांची चिकित्सा करणे यामुळे बाबांचा अधिक्षेप का मानला जातो?
प्रकाशकाका म्हणतात, त्या प्रमाणे काळ्या पैशाची सोय किंवा Portfolio Management System अशा ठिकाणी अतिशय सबळ असावी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जयंत कुलकर्णी

ब-याच ढोंगी आणि लफडेबाज

५० फक्त
Mon, 04/25/2011 - 10:13 नवीन
ब-याच ढोंगी आणि लफडेबाज माणसांपैकी एक कमी झाला याचा अतिशय जास्त आनंद झाला मला ही यादी अशीच लवकर लवकर आणि वेगाने वाढत जावी ही सदिच्छा. काल जर याच्या मरण्यामुळे वैग्रे तेंड्ल्या खेळला नसता ना (इति प्रसारमाध्यमातील व्रुत्तानुसार) पार उतरला असता मनातुन, बरं झालं खेळ्ला ते.
  • Log in or register to post comments

तेंडल्या खेळला नाही तरीही

वपाडाव
Wed, 04/27/2011 - 15:45 नवीन
तेंडल्या खेळला नाही तरीही उतरला हो मनातुन.... शप्पथ कद्धी कद्धी असा विचार मनाला शिवला सुद्धा नव्हता की आपला तेंडल्या साईच्या पाया पडाया जाईल अन धाय मोकलुन रडेल... अवांतर : नांदेडपासुन जवळ एक साई उद्यान, चाकुर (हो... हो... शिवराज पाटलाच ) येथे बांधलंय. त्यात वॉटर पार्कही आहे. तिथे या बाबांच मंदिरही आहे. काही वर्षांपुर्वी ३-४ मित्र मिळुन फिरायला म्हणुन गेलो होतो. आमच्या एका मित्राने उद्यानात शिरल्या बरोब्बर एका चावडीवरुन बाबांचा फोटो घेतला अन कात्रीने त्या फोटोचे केशकर्तन केले. ज्याम आणंद झाला म्हणुन. अरे, तेंडल्या, आम्ही तुला देव मानतो ना रे... मग हे असले झटके का देतोस...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

शिल्पा यांच्याशी

किसन शिंदे
Mon, 04/25/2011 - 10:14 नवीन
शिल्पा यांच्याशी सहमत. त्यांनी केलेले चमत्कार हे दैवी नसून हातचलाखीचाच एक प्रकार आहे हे खूप वेळा पाहिलंय. खूप आश्चर्य वाटते मोठे मोठे राजकारणी आणि खेळाडू(आपला सचिनसुद्धा) यांचे भक्त होते.
  • Log in or register to post comments

प्रश्नातच उत्तर

प्रकाश घाटपांडे
Mon, 04/25/2011 - 10:17 नवीन
इथे चित्रफीत पहा आपल्या प्रश्नातच उत्तरे दडलेली आहेत. धार्मिक ट्रस्ट देवस्थान ही श्रीमंत का असतात. इथे काळ्या पैशाच पांढर्‍या पैशात रुपांतर होत असते. अनेक राजकारणी, फिल्म वाले यांचे भक्त असतात ते काही केवळ चमत्कारामुळे नाही. या उपयुक्तता मूल्या मुळे.
  • Log in or register to post comments

घाटपांडे

किसन शिंदे
Mon, 04/25/2011 - 10:32 नवीन
घाटपांडे साहेब, हा.हा.हा...चित्रफित पाहून खूप हसू येत होतं पण बळेच दाबून धरलं. :D :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

ज्याला ती चेन देताना नीट

शिल्पा ब
Mon, 04/25/2011 - 10:38 नवीन
ज्याला ती चेन देताना नीट हातचलाखी करता आली नाही त्याचा नंतर खुन झाला. गुगलुन पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

ओ, तसं नाय काय ते, छोटी चेन

५० फक्त
Mon, 04/25/2011 - 11:04 नवीन
ओ, तसं नाय काय ते, छोटी चेन असती तर फकत किड्नी घेउन सोडला असता, रत्नहार होता म्हणे तो म्हणुन तर खुन केला, हां आपल्याकडे पण आयेसो ३.१४ इस्ट्मन्कलर बेल्ट अल्फा ५ ग्रेड अ‍ॅअ‍ॅअ‍ॅ सिस्टिम आहे आशरमात. लेवल असतात प्रत्येक गोष्टीला, छोटी चुक झाली तर किडनी काढायची मोठी झाली किडनी सोडुन बाकी सगळं काढायचं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

लेवल असतात प्रत्येक गोष्टीला,

किसन शिंदे
Mon, 04/25/2011 - 11:09 नवीन
लेवल असतात प्रत्येक गोष्टीला, छोटी चुक झाली तर किडनी काढायची मोठी झाली किडनी सोडुन बाकी सगळं काढायचं. ऐकावं ते नवलच म्हणायचं कि...;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

:)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 04/25/2011 - 21:04 नवीन
चित्रफित डकवल्याबद्दल धन्यु. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

डील मेकर

नितिन थत्ते
Mon, 04/25/2011 - 10:27 नवीन
त्या काळातील "नीरा राडिया" असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रास्वामी हेही असेच मीडिएटर असल्याचे ऐकले होते. अवांतर: सचिन तेंडुलकर (आणि इतर यशस्वी लोक) त्यांच्या आशीर्वादाने/कृपेने/शक्तीमुळे यशस्वी झाला असेल तर भारतरत्न सचिनला द्यायच्या ऐवजी सत्यसाईबाबांनाच का देऊ नये?
  • Log in or register to post comments

हं

यकु
Mon, 04/25/2011 - 11:10 नवीन
हं!
  • Log in or register to post comments

ह्या सगळ्या बाबांच्या अन

मराठमोळा
Mon, 04/25/2011 - 11:17 नवीन
ह्या सगळ्या बाबांच्या अन त्याच्या चाहत्यांच्या.. &%$%#$#*&(* भारतात किती मुर्ख लोकं राहतात याचे साक्षात उदाहरण आहे हे. सुशिक्षित आंधळे अडाणी सगळे..
  • Log in or register to post comments

५० फक्त

सविता००१
Mon, 04/25/2011 - 11:27 नवीन
यान्च्याशी १००% सहमत
  • Log in or register to post comments

बाकी काही असो, त्यांच्या

आनंद
Mon, 04/25/2011 - 11:30 नवीन
बाकी काही असो, त्यांच्या मुळे एकाही गरजु चे प्राण वाचले असतील(मोफत वैद्यकीय इलाजांमुळे), तर बाकी गोष्टी दुर्लक्ष करायला हरकत नाही,
  • Log in or register to post comments

हेच

चिरोटा
Mon, 04/25/2011 - 12:00 नवीन
हेच म्हणायचे होते.परिस्थितीने गांजलेल्यांना आधार देणे, त्यांना संकटात मदत करणे अशी अनेक कामे त्यांच्या ट्रस्टने केली. भिकार दर्जाची सरकारी रुग्णालये,पडिक शाळा,गलिच्छ पाणी ह्यांना दाभोळकर आणि कंपनी पर्याय देवू शकतात का? २.५ लाखाच्या ह्रुदयाच्या सर्जरी किती संस्था २५/३० हजारात करतील? सत्य साई ट्रस्टने ते काम केले. त्यांनी दाखवलेल्या चमत्कारांवर अर्थातच कोणीच विश्वास ठेवणार नाही. काही गैरव्यवहार झालेही असतील.वर ईतरांनी म्हंटल्याप्रमाणे काळा पैसाही त्यात गुंतला असू शकतो(म्हणजे असेलच्).पण ज्यांना खरोखरच वैद्यकिय किंवा ईतर गरज आहे ते लोक पैसा काळा की पांढरा ते बघत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

सहमत

योगी९००
Mon, 04/25/2011 - 12:16 नवीन
त्यांच्या मुळे एकाही गरजु चे प्राण वाचले असतील(मोफत वैद्यकीय इलाजांमुळे), तर बाकी गोष्टी दुर्लक्ष करायला हरकत नाही सहमत..असे ऐकले आहे की त्यांच्या मोफत वैद्यकीय उपचाराचा लाभ बरेच गरीब लोक घेतात. मिळालेल्या पैशाचा थोडाफार सदुपयोग होत असल्याने चमत्कारांकडे थोडा काणा डोळा करायला हरकत नाही. दादा कोंडके यांनी त्यांच्या "एकटा जीव" या पुस्तकात सत्य साईबाबांचा उल्लेख केला होता. एकदा आशा भोसले त्यांच्या कडे दर्शनाला गेल्या असताना स.सा. बाबांनी हवेतून सोन्याचा दागिना काढला आणि आशाताईंना भेट दिला. त्यांच वेळी आशाताईच्या ड्रायव्हरला मात्र असाच काही चमत्कार करून मात्र साधीशी गोष्ट भेट दिली. भक्तांची आर्थिक कुवत, सामजिक स्थान जाणून भेट देणे म्हणजे चमत्कारच नाही का? असेच माझ्या एका मद्रासच्या कलिगला शंका होती की रेनॉल्ट पेन कंपनीत जॉब जॉईन करू का? त्या वेळी स.सा. बाबांनी हवेतून एक रेनॉल्ट पेन काढून त्यांना भेट दिले होते. पण हे सर्व प्रकार केल्याने त्यांना देवत्व मिळाले आणि म्हणूनच त्यांना लोकांकडून पैसा जमवून अशी हॉस्पिटले चालवत आली. थोड्याफार गरिब लोकांना मोफत उपचार घेता आले. नाहीतर हे इतक्या सहज शक्य होते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

शिंग फुंकता रॉबिनसाठी

शहराजाद
Wed, 04/27/2011 - 09:09 नवीन
त्यांना लोकांकडून पैसा जमवून अशी हॉस्पिटले चालवत आली.
ही तर 'गरीबों का मसीहा' गिरीच झाली. अर्थात त्यांनी हा दानधर्म अगदी थोडक्यात भागवला असावा. कारण हिमनगाचं टोक जाऊन ४०००० कोटीचा हिमनग तसाच शिल्लक आहे. पण ससाबा पश्चातही उरलेल्या गरीबांचीही चिंता नको, प्रेम साई अवतरणार आहेच. *म्हटलंच आहे, शिंग फुंकता रॉबिनसाठी शरवुडचे जंगल भंगेल गडी उठतील रंगेल *-भा. रा. भागवत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

शिंग फुंकता रॉबिनसाठी

आनंदयात्री
Wed, 04/27/2011 - 23:58 नवीन
>>शिंग फुंकता रॉबिनसाठी वा वा .. काय मस्त आठवण जागवलीत. लहान पणी अगदी भारावलो होतो भागवतांचा रॉबिन हुड वाचुन !! शेरवुडचे जंगल, मोठा जॉन, लिटल जॉन, मरियम, कोणतरी लठ्ठ्या, हरणं, उमदार दिलदार राजा रिचर्ड, त्याची हरणं आणि रॉबिनची पुंडाई. भागवतांची भाषांतरीत पुस्तकं वाचणं हा फारच आनंददायी अनुभव होता, आता तसा निखळ निर्भेळ आनंद पटकन मिळवता येत नाही. इतकं छान नवं काही राहिलं नाही किंवा जाणीवा बोथट झाल्यात. बादवे ते पाणबुडीवालं एच. जी. वेल्सचं कोणतं हो भाषांतरीत पुस्तक ? पुस्तकविश्वच्या दिवाळी अंकात अदितीने एक नितांतसुंदर लेख लिहिलाय 'सांगावेसे वाटले म्हणुन', त्यात तिने लिहलेय ती भागवत आजोबांना भेटली तेव्हा ते तिला कसे वाटले याबद्दल. अवांतराबद्दल क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शहराजाद

?

पंगा
गुरुवार, 04/28/2011 - 00:28 नवीन
बादवे ते पाणबुडीवालं एच. जी. वेल्सचं कोणतं हो भाषांतरीत पुस्तक ?
पाणबुडीवाले एच. जी. वेल्सचे नसावे. ज्यूल्स व्हर्नचे असावे. 'ट्वेंटी थाउज़ंड लीग्ज़ अंडर द सी'. त्याच्या भागवतांच्या अनुवादाबद्दल कल्पना नाही. फारा वर्षांपूर्वी 'किशोर' मासिकात 'सागरकैद' नावाने त्याचा एक मराठी अनुवाद क्रमशः प्रसिद्ध झाला होता. अनुवादक कोण होते ते आठवत नाही. (बहुधा भागवत नसावेत.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

करेक्ट

आनंदयात्री
गुरुवार, 04/28/2011 - 00:49 नवीन
>>पाणबुडीवाले एच. जी. वेल्सचे नसावे. ज्यूल्स व्हर्नचे असावे. 'ट्वेंटी थाउज़ंड लीग्ज़ अंडर द सी'. करेक्ट. ज्यूल्स व्हर्नचेच. हेच मराठीत वाचले आहे पण किशोरमध्ये नाही हे नक्की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

त्याच्या भागवतांच्या

गणपा
गुरुवार, 04/28/2011 - 00:50 नवीन
त्याच्या भागवतांच्या अनुवादाबद्दल कल्पना नाही.
बहुतेक "साता समुद्राचा सुलतान" असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

समुद्र सैतान

शहराजाद
गुरुवार, 04/28/2011 - 02:07 नवीन
भा. रा. भागवतांचा पुस्तकरूप अनुवाद 'समुद्र सैतान' , भाग १ आणि२ नावाने प्रसिद्ध झाला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

आठवण

शहराजाद
गुरुवार, 04/28/2011 - 09:12 नवीन
रॉबिन हुड आणि त्याच्या रंगेल गड्यांनी एके काळी मलाही झपाटून टाकलं होतं. (भा. रा. भागवत झिन्दाबाद) खरं तर तशीच टोळीदेखील काढायचा आमचा मनसुबा होता; पण एक तर आसपास जंगल नव्हतं. शिवाय, आमचे पाद्रीबाबा, धाकला जॉन इ मंडळीची टोळीशी बांधिलकी तकलादू आणि पार्ट टाइम होती. टोळी अस्तित्वात येऊ शकली नाही हे वेगळं सांगायला नको. @ अदितीतै भागवत आजोबांच्या भेटीचा लेख मिपावरही टाका. असो. फार अवांतर होत चाललय. खरड टाकीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

रेनॉल्ट पेन कंपनीत जॉब जॉईन

वपाडाव
Wed, 04/27/2011 - 16:16 नवीन
रेनॉल्ट पेन कंपनीत जॉब जॉईन करू का? त्या वेळी स.सा. बाबांनी हवेतून एक रेनॉल्ट पेन काढून त्यांना भेट दिले होते.
नशीब रिनॉल्ट कार कंपनीत जॉब जॉईन करु का म्हणुन विचारले नाही त्याने.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

हॅ हॅ

योगी९००
गुरुवार, 04/28/2011 - 09:52 नवीन
नशीब रिनॉल्ट कार कंपनीत जॉब जॉईन करु का म्हणुन विचारले नाही त्याने..... आमचे तेच म्हणणे होते त्यावेळी की एखाद्या कार कंपनीत जॉईन करू का विचारायला पाहिजे होते म्हणजे स.सा. बाबांनी कारच काढून दिली असती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

घरे उद्ध्वस्त

महेश_कुलकर्णी
Mon, 04/25/2011 - 13:55 नवीन
गरजूंचे प्राण वाचताना जर अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली असतील अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन त्यांचे काय? महेश कुलकर्णी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

लोकांची घरे कशी बरे उध्वस्त

llपुण्याचे पेशवेll
Mon, 04/25/2011 - 15:27 नवीन
लोकांची घरे कशी बरे उध्वस्त झाली? त्यांनी गुंड पाठवून पैसे जमवून आणले का? का लोक त्यांच्या कडे पैसे नसताना कर्जे काढून त्यांना पैसे देत होते? काही उदाहरणे देऊ शकाल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महेश_कुलकर्णी

आनंद यांच्यासारखे

Nile
Tue, 04/26/2011 - 01:54 नवीन
आनंद यांच्यासारखे अंधश्रद्धाळू लोक असल्यानेच असल्या बाबांचे फावते. आनंद यांच्यासारखे लोक नुसते बाबांची अनुयायी बनत नाहीत तर त्या बाबांचा प्रसारही करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद

मी अंधश्रद्धाळू आहे हे नवीनच

आनंद
Tue, 04/26/2011 - 12:52 नवीन
मी अंधश्रद्धाळू आहे हे नवीनच कळल. मला ओळ्खणारे लोक मला कश्यावरही श्रद्धा नसलेला म्हणतात. बाकी ते बांबाचा प्रसार वाचुन (आधी कॉफी सांड्ली ना भाउ!) सांगावस वाटत की कुठ्ल्या बाबाचा प्रसार करण्या पेक्षा स्वतः च एखादा बाबा बनण्याचा प्रयत्न करीन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

''त्यांच्या मुळे एकाही गरजु

५० फक्त
Mon, 04/25/2011 - 12:04 नवीन
''त्यांच्या मुळे एकाही गरजु चे प्राण वाचले असतील(मोफत वैद्यकीय इलाजांमुळे), तर बाकी गोष्टी दुर्लक्ष करायला हरकत नाही,'' अजिबात नाही, उद्या दाउदनं त्याच्या बापाच्या नावानं दवाखाना काढला आणि त्यात एका गरजुचे प्राण वाचवले तरी हेच म्हणणार का ? ज्या गरजुचे प्राण फुकट वाचले त्याच्या प्राणाची किंमत बाकीच्यांनी ब-याच मार्गांनी दिली असेल, कुणी किडन्या देउन तर कुणी अजुन काही देउन.
  • Log in or register to post comments

टाकुनिया बाबा गेला

स्पा
Mon, 04/25/2011 - 12:05 नवीन
टाकुनिया बाबा गेला
  • Log in or register to post comments

मेलं झिपरं तिच्यायचं एकदाच ..

टारझन
Mon, 04/25/2011 - 12:20 नवीन
मेलं झिपरं तिच्यायचं एकदाच .. बरी सुटका झाली .. त्याचं तोंड पाहिलं की मेंढराची आठवण यायची =))
  • Log in or register to post comments

इतक्या सहजा सहजी सुटका कसली

आनंद
Mon, 04/25/2011 - 12:37 नवीन
इतक्या सहजा सहजी सुटका कसली होतेय. आत्मा अमर आहे शरीर बदलुन येइलच लवकर.(जालावरही जसे पुनर्जन्म होतात तसे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

मेला चार दिवसापुर्वीच असेल,

५० फक्त
Mon, 04/25/2011 - 12:57 नवीन
मेला चार दिवसापुर्वीच असेल, सगळ्या कागदावर अंगठे वगैरे घेउन झाल्यावर सांगितलं असेल. बरं एक शंका, मरण्यापुर्वी या भोंदुनं आपलं शरीर,किडनी, लिव्हर गेला बाजार डोळे तरी दान केले होते का ? किंवा किमान लिलावात विकायची वगैरे आयडिया आहे का कुणाची इबेला वगैरे, जाम पैसे मिळतील त्यातुन ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

अशी प्रतिक्रिया

तिमा
Tue, 04/26/2011 - 13:12 नवीन
फक्त टारझनच देऊ शकतात. अनेकजण या प्रतिक्रियेने मनांत सुखावले असले तरी सगळ्यांचं डेअरिंग नाही होणार असं लिहायला. एकूण सर्व प्रतिक्रिया वाचून मिपावर असल्याचा अभिमान वाटला. बुवांच्या माध्यमातून काळ्या पैशाचे पांढरे करणे, पोलिटिकल कामे करुन घेणे यासाठीच सर्व बडे बुवाभक्त होतात या मताशी १००% सहमत. दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

सहमत!

मनिष
गुरुवार, 04/28/2011 - 10:18 नवीन
सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

इत्यादि आणि वगैरे

विसुनाना
Mon, 04/25/2011 - 12:24 नवीन
'माझीही शॅम्पेन', तुम्हाला जी चर्चा करण्याची इच्छा आहे ती स्तुत्य आहे. पण तुम्ही 'वगैरे' हा शब्द 'वैइगरे' हा शब्द चुकीचा लिहू नये असे वाटले. 'वगैरे' हा शब्द मुळात उर्दु (फारसी?) आहे. त्याचा अर्थ 'व + गैरे' म्हणजे मराठीत 'आणि + इतर' (संस्कृतात 'इति + आदि' = इत्यादि ) असा आहे. बरेच लोक हा शब्द "वैग्रे" , "वैगरे" असा लिहू आणि उच्चारू लागले आहेत त्याचा खेद वाटतो.
  • Log in or register to post comments

धन्यवाद विसुनाना ! पुढील

माझीही शॅम्पेन
Tue, 04/26/2011 - 05:49 नवीन
धन्यवाद विसुनाना ! पुढील खेपेस "इत्यादी" हा शब्द वापरीन :) अवांतर - इत्यादी आणि एक्सेटरा (ईग्रजी) शब्द जरा जवळचे वाटतात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना

फुकट उपचार?

प्रकाश घाटपांडे
Mon, 04/25/2011 - 12:42 नवीन
लातुर मधील एका तरुण मुलाची किडनी पुट्टीपुर्तीच्या हॉस्पिटल मध्ये काढली होती. हे मी सदर मुलाच्या तोंडातुन पत्रकारांसमोर ऐकलेली कथा आहे. ती चित्रलेखा मध्ये ही आली होती. बापाच्या किडनीच्या आजारात मुलाला किडनी द्यावी लागली .मुलाने आश्रमात सेवा केली. बाप नंतर वारला. मुलाने नंतर जेव्हा एक्स रे काढला त्यावेळी बापाची एक किडनि गायब व याची एक गायब. हे प्रेत उकरुन काढुन काढलेल्या पोस्टमार्टेम वरुन सिद्ध झाले. मुलगा कोर्टात लढला. हारला. जजच सत्यसाईबाबाचे भक्त निघाले. ७-८ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. अगदी साधा मुलगा होता. प्रकरण बंद. कोट्यावधी रुपयांची माया जमा झाल्यावर जनहितार्थ काही गोष्टी कराव्याच लागतात. चिरोटा यांचे "पण ज्यांना खरोखरच वैद्यकिय किंवा ईतर गरज आहे ते लोक पैसा काळा की पांढरा ते बघत नाहीत." हे मत मान्यच आहे. अंधश्रद्धेचे बळी हेच अंधश्रद्धेचे मोठे वाहक असतात. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो हे वास्तव नाकारुनही चालणार नाही
  • Log in or register to post comments

+१०००००००

मराठमोळा
Mon, 04/25/2011 - 12:50 नवीन
>>कोट्यावधी रुपयांची माया जमा झाल्यावर जनहितार्थ काही गोष्टी कराव्याच लागतात पका काकांशी प्रचंड सहमत आहे. मला तर वाटतं की बाबांच्या भक्तांचा सगळा काळा पैसा यांच्या ट्रस्ट च्या नावाखाली पांढरा करुन घेतला गेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

सहमत आहे

चिरोटा
Mon, 04/25/2011 - 13:14 नवीन
मला तर वाटतं की बाबांच्या भक्तांचा सगळा काळा पैसा यांच्या ट्रस्ट च्या नावाखाली पांढरा करुन घेतला गेला आहे.
बर्‍याच प्रमाणात शक्यता आहे. पण वर उल्लेखलेल्या सेलिब्रिटीज म्हणजे कोणी पेज थ्रीवाल्या उडाणटप्पु व्यक्ती नाहीत. ती आहेत समाजातली दैवते. त्यांची चौकशीची मागणी करायची म्हणजे तुम्ही-आम्ही संपण्याचीच शक्यता जास्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

१०० % सहमत

महेश_कुलकर्णी
Mon, 04/25/2011 - 13:41 नवीन
फार छान विषय चर्चेला घेतल्या बद्दल लेखकाचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन... मी जेव्हा सत्य साई बाबांच्या भोंदूगिरी बद्दल मित्रांमधे बोलतो तेव्हा भाविक मला सांगतात "त्यांनी अनेक कॉलेज आणि हॉस्पिटल(पूर्णत: मोफत सेवा) काढली आहेत आणि ते त्यांचे मोठेपण आहे..." पण मी या गोष्टीने समाधानी होत नाही कारण त्या ट्रस्टकडे जमा झालेला पैसा हा भोंदुगिरी करून लोकांना फसवून गोळा केला आहे. फकिर साईबाबांचा अवतार एवढ श्रीमंत आणि आरामदायी आयुष्य कसे काढतो? उदा. २००५ पासून बाबा फुल्ली ऑटोमॅटिक व्हिलचेअर वापरत होते. या सर्व मुद्यामध्ये एक अजून एक प्रश्न मला काल पासून त्रास देतो आहे तो म्हणजे ४ दिवस शासकीय दुखवटा कशासाठी? महेश कुलकर्णी
  • Log in or register to post comments

पूर्वी मिसळपाववर नेमक्या याच

यकु
Mon, 04/25/2011 - 13:56 नवीन
पूर्वी मिसळपाववर नेमक्या याच गुरूगिरीच्या धंद्यावर अगदी अचूक भाष्य असणारी मुलाखत अनुवादीत झालेली आहे... यासंदर्भात अगदी वाचनीय http://www.misalpav.com/node/16401
  • Log in or register to post comments

केवळ सेलीब्रिटीजचे

नाना बेरके
Mon, 04/25/2011 - 14:02 नवीन
केवळ सेलीब्रिटीजचे श्रध्दास्थान सत्य साईबाबा होते म्हणून तर त्यांच्या क्षेत्रातली त्यांची कामगिरी गौण ठरते असे मत वरील काही प्रतिसाद वाचताना लक्षात आले. सचिन तेंडुलकर हा साईबाबांच्या आशिर्वादानेच चांगली कामगिरी करू शकला म्हणून त्याच्याऐवजी साईबाबांनाच "भारतरत्न "द्यावे असे चेष्टेने लिहीणे देखील चुकीचे आहे. कुठलीही प्रसिद्ध व्यक्ती ही देखील इतर माणसासारखा विचार करतच असते. तिचे देखील गुरू, श्रद्धास्थाने असू शकतात. ते योग्य कि अयोग्य हा भाग वेगळा. बरं, ते ठरवणार कोण ? त्यालासुध्दा पात्रता लागते. सेलीब्रिटीजचच्या कामगिरीची उगाचच चेष्टा करून थोड्याफार ओळखीच्या लोकांमध्ये स्वतःच्या मताची टिमकी वाजवणे हे जरा अतीच.
  • Log in or register to post comments

कर्ता आणि निमित्तमात्र

नितिन थत्ते
Mon, 04/25/2011 - 14:50 नवीन
>>केवळ सेलीब्रिटीजचे श्रध्दास्थान सत्य साईबाबा होते म्हणून तर त्यांच्या क्षेत्रातली त्यांची कामगिरी गौण ठरते असे मत वरील काही प्रतिसाद वाचताना लक्षात आले. सचिन तेंडुलकर हा साईबाबांच्या आशिर्वादानेच चांगली कामगिरी करू शकला म्हणून त्याच्याऐवजी साईबाबांनाच "भारतरत्न "द्यावे असे चेष्टेने लिहीणे देखील चुकीचे आहे. सेलिब्रिटीजची त्यांच्या क्षेत्रातली कामगिरी गौण ठरते असे मी म्हणत नाही तर श्रद्धाळू लोक अश्या अर्थाने बोलतात. "सत्यसाईबाबांचा आशीर्वाद नसता तर सचिन तेंडुलकर कुठला इतक्या धावा करता !!!" असा टोन दिसतो. म्हणून "मग सत्यसाईबाबांनाच भारतरत्न द्यावे" असे म्हणावे लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना बेरके

सत्यसाई फ्रॉड होते, खरे होते,

परिकथेतील राजकुमार
Mon, 04/25/2011 - 14:24 नवीन
सत्यसाई फ्रॉड होते, खरे होते, अवतार होते, मानव होते, देव होते ह्या सगळ्याशी काही घेणे देणे नाही. त्या माणसाच्या हॉस्पिटल मध्ये एका कोणा गरिबाची आई, बहिण , लहानगे लेकरु वाचले असेल तरी मला त्या माणसाविषयी आदरच आहे :) बाकी बाँबब्लास्ट करुन लाखो लोकांचे जीव घेणार्‍या दाऊदशी बाबांची केलेली तुलना पाहून गंमत वाटली :) असो... आणि हो एक विचारायचे राहिलेच. सध्या तावातावाने ह्या धाग्यावर बाबांच्या नावाने बोंबा ठोकणारे, त्यांच्या हातचलाखीचे पितळ वैग्रे उघडे पाडणारे बाबांच्या हयातीत काय करत होते? गेला बाजार त्यांनी आंतरजालावर एखादा लेख लिहून बाबांच्या भक्तांना सावध करण्याचा प्रयत्न तरी केला काय ? हे थोर विचारवंत आता बाबांचे खरे रुप जगासमोर आणतील आणि मग स्वतः थोडा फार खर्च उचलुन बाबांची रुग्णसेवा पुढे नेतील अशी अपेक्षा. अवांतर :- असे काही बघितले की सगळ्यात आधी 'ज्यानी आयुष्यात एकही पाप केले नाही, त्यानी पहिला दगड मारावा' ह्या कथेची आठवण होते :)
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: चिनू१९८५
    नोंदणी: Wed, 03/25/2026 - 09:02
  • सदस्य: साधक भूषण
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 19:02
  • सदस्य: दीपक चकवे
    नोंदणी: Mon, 03/23/2026 - 11:07
  • सदस्य: भूषण तळवेलकर
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 23:18
  • सदस्य: Jayashree15
    नोंदणी: Sun, 03/22/2026 - 18:55
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा