✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सत्य साईबाबांचे नावच गूढ

म
माझीही शॅम्पेन यांनी
Mon, 04/25/2011 - 08:22  ·  लेख
लेख
नुकताच सत्य साईबाबांचे निधन झाले ८६ वर्षाच्या महापुरुषचा चमत्कारी बाबचा अंत झाला १९४० साली त्यानी स्वता:ला आपण साईबाबांचे अवतार आहोत अस जाहीर केल. १९५४ साली पुत्तपर्थि येथे त्यानी पाहिल हॉस्पिटल काढल , पुढे अनेक ठिकाणी त्यानी कॉलेज , हॉस्पिटलस आणि यूनिवर्सिटी काढल्या. त्यानी कोट्यावधीची माया गोळा केली ( अर्थात बरीच संपत्ती वरील मार्गांनी चांगल्या कामासाठी वापरली सुध्धा) जागो जागी त्याचे देवसमान / तर देवंसोबत फोटो लावले पाहिले आहेत ( खास करून उडुपी हॉटेलात) चेपु आणि ट्विटर वर सध्या त्यांच्या संदेशाची रिघ लागली आहे आता दुसरी बाजू , नरेंद्र दाभोळकर / अनिस नि अंध-स्रद्धा निर्मूलनची सीडि मधे ते कसे हाथसफाई करून लोकाना फसवतात त्याचे विश्लेषण केल आहे , एका प्रसंगात स्वत शंकरराव चव्हाण ह्याच्या उपस्थितीत हे घडला आहे (पुढे त्यांचाच मुलाने ह्या बाबाना बोलावून त्याच्या पायाचे तीर्थ प्राशां केल होत) आता ह्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत , जाणकारणी थोडा प्रकाश टाकावा. १. जे सर्व-सामन्यना कळू शकते (जादू टोणा वैइगरे) ते ह्या सेलेब्रेटीना कळता कामा नये ? ह्याचा त्याना गुरु मानण्याचा उद्देश काय ? सचिन जे काही करतो आहे (उपास , अबोला वै.) ते माझ्या डोक्यापलीकडचे आहे २. ४० हजार करोड ची संपत्ती कशी गोळा केली असावी , त्याच्या ट्रस्ट वर संबधित सरकारने कधीच लक्ष दिल नाही का. तसेक त्यांच्या पश्यात त्याची मालकी वैइगरे हे विषय सोडुनच द्या ३. त्याना इतक्या लोकनी गुरू-स्थानी / देव-स्थानी मानया सारखी नक्की कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने त्याना स्पिरिचुयल गुरू वै संबोधल आहे. कित्येक करोड (किवा) लाख लोक त्याची अनुयायी व्हावेत अस नक्की काय झाल असाव ? (सदर लेख त्याच्यावर टीका करण्यासाठी लिहिला नाहीए , तस वाटल्यास संपादक मंडळानी लेख उडवून टाकावा अशी विनाती) ---------------------- माझीही शॅम्पेन
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
55440 वाचन

💬 प्रतिसाद (105)

प्रतिक्रिया

सहमत

आनंदयात्री
गुरुवार, 04/28/2011 - 00:25 नवीन
सचिनबद्दलच्या मतांशी सहमत आहे. तसेच सत्यसाईबाबा फ्रॉड होते, तर ते पकडले गेले किंवा त्यांचे पितळ उघडे पडले अश्या गोष्टी झाल्यावर सर्वसामान्य माणसाला आनंद झाला तर एकवेळ समजु शकते, पण ते मेले तर आनंद व्हायचे काय कारण हे कळले नाही. थोडक्यात तुम्ही कंबोडियात रहात असाल आणी पॉल पॉट मेला तर तुमचा आनंद मी समजु शकतो पण इतर कोणी मेल्याने तुम्हाला आनंद होत असेल तर तुमच्या सुधारणावादी, निधर्मीवादी, विज्ञानवादी वैगेरे वैगेरे वादी प्रवृत्तीपेक्षा माणुसकीचा अभाव चिंताजनक आहे. तुमचा नसलेला आमचा असलेला देव तुमचे भले करो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

विकास तुमची प्रतीकिर्‍या

माझीही शॅम्पेन
गुरुवार, 04/28/2011 - 01:11 नवीन
विकास तुमची प्रतीकिर्‍या अशांता: पटतेय. चर्चा चांगली चालू आहे , लेख लिहील्यानंतर बर्‍याच प्रतिक्रिया आल्यात पण काही पश्न अजूनही अनूत्तरीत वाटतात प्रसार माध्यमांची अनाकलनीय भूमिका खर तर मुद्दामन मी चंद्रास्वामिंचा उल्लेख टाळला ते एक यशस्वी(?) मध्यस्थ होते किंबहुना सर्व मीडिया मध्ये कुठेना कुठे त्यांचा गुन्हेगारी पार्श्वभाग समोर येत राहतो पण सत्य-साईबाबा बद्दल अस खात्रीने म्हणता येत नाही. मिपा , उपक्रम किंवा ई-सकाळ अश्या प्रतिक्रिया देता येणार्‍या (सोशल मीडिया) माध्यमातून हे तरंग उमटत राहतात. स्वता:ला पुरोगामी म्हणणार्‍या कुठल्याच माध्यांनी चमत्कार करणार्‍या बाबांचा अंत झाला किवा काही लोक त्याचा निधानाने तथाकथित(?) आनंदी झाले अस काहीही सांगत नाही आहेत. सचिन / सुनील आणि सत्य साईबाबा सचिन किंवा सुनील नुकतच त्यांच अंतिम दर्शन घेतल इत्यादी. त्याना अध्यमीत्‍क गुरू मानून त्यानी जे केल कदाचित योग्य केल अस असाव पण यामुळे लोकांच्या मध्ये खळबळ माजू नये म्हणून त्यानी नक्की कश्या प्रकारे मार्गदर्शन केल हेही सांगितल नाही. बर एकीकडे त्याना मध्यस्थ म्हणाव तर सचिन सारख्या महा-मानवस त्याची काय गरज. म्हणजे कुठेतरी काहीतरी गफलत असावी की त्यांच्या वर टीका करण्याराना ते कळलेच नाही अस म्हणाव? अध्यमिक रोबिनहुड(?) श्रीमन्ताना लुटून गरिबाना संपत्ती वाटणारा रोबिनहुड किंवा तस्त्सम व्यक्तिरेखा सामन्याननी नेहमी नायक म्हणून स्वीकाराल्या गेल्या आहेत. हे कदाचित त्याचच उदाहरण असाव ? अश्या नायकानी खून केले तरी ते माफ केले जातात तर जादू-टोणा तर किरकोळ बाब. थोडकायात हे प्रकरण अतिशय गुंता-गुंतीच आहे म्हणून गूढ अर्थाने शीर्षक दील आहे ! बाकी चालूद्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

गैरसमज नसावा...

विकास
गुरुवार, 04/28/2011 - 05:54 नवीन
थोडकायात हे प्रकरण अतिशय गुंता-गुंतीच आहे म्हणून गूढ अर्थाने शीर्षक दील आहे ! बाकी चालूद्या ! गुंतागुंतीचे आहे हे मान्यच आहे. आणि आपण गूढ म्हणले त्यात काही गैर नाही. स्वता:ला पुरोगामी म्हणणार्‍या कुठल्याच माध्यांनी चमत्कार करणार्‍या बाबांचा अंत झाला किवा काही लोक त्याचा निधानाने तथाकथित(?) आनंदी झाले अस काहीही सांगत नाही आहेत. अहो स्वतःला पुरोगामी समजणारी माध्यमे राशीभविष्य छापतात, अनेक बुवा-बाबा-बायांच्या कार्यक्रमाबद्दल छापतात अथवा दाखवतात, कारण वाचकवर्गाच विचार असतो. येथे तर अनेक दिग्गज हे साईबाबांचे भक्त अथवा त्यांना मानणारे, त्यांना वेडं कसे ठरवायचे? आणि त्यातील कोणीही त्यांच्या चमत्काराचे कौतूक केलेले नसताना. त्यामुळे चमत्काराचा उल्लेख सोडून साईबाबांची बातमी आली आहे. त्यात काही गैर नाही. मात्रं पुरोगाम्यांना आनंद होण्यासाठी नक्की त्यांनी त्यांचे काय बिघडवले होते हे पण समजले पाहीजे... केवळ पुरोगामी म्हणून आधी उल्लेख केल्याप्रमाणे चमत्कारासाठी संतपद मिळवणार्‍या मदर तेरेसाबद्द्लही असे का वाटले नव्हते, ज्यांच्या समाजसेवेबद्दल ही सेक्यूलर/विज्ञानवादी पाश्चात्यांनी ताशेरे ओढले पण आपण मात्र गप्प राहीलो? मला एक मात्र (खरचं) प्रश्न पडला आहे: सत्य श्री साईबाबा शेवटपर्यंत चमत्कार करत होते का? तसेच यातील नक्की कोण कोण चमत्कारामुळे त्यांच्या जवळ गेले? त्याना अध्यमीत्‍क गुरू मानून त्यानी जे केल कदाचित योग्य केल अस असाव पण यामुळे लोकांच्या मध्ये खळबळ माजू नये म्हणून त्यानी नक्की कश्या प्रकारे मार्गदर्शन केल हेही सांगितल नाही. काही गरज नाही... त्यांचे खाजगी जीवन आहे. कुठल्या सायकॅस्ट्रीस्ट कडे गेले/ कौन्सिलरकडे गेले तर सांगायला हवे का? बरं असे सायकॅस्ट्रीट्स (लांबून ;) ) बघितले आहेत ज्यांना समाजात बिथरलेले पाहीले आहे पण तरी लोकांना सुधारू शकता. मग केवळ ते विज्ञानाचा आधार घेतात म्हणून आपण आक्षेप घेतो का? बर एकीकडे त्याना मध्यस्थ म्हणाव तर सचिन सारख्या महा-मानवस त्याची काय गरज. मध्यस्थ नसतात तर कौन्सिलर असू शकतात. रामाला ईश्वरी अवतार समजले तरी वसिष्ठांनी त्याला आलेल्या औदासिन्याच्या क्षणाला उपदेश केला, त्यातून योगवसिष्ठ तयार झाले. कृष्णाला पण सांदीपनी मुनींकडे शिकायला जावेच लागले होते. किंबहूना आपण सर्वेसर्वा नाही ह्याची सचिनला जाणीव आहे असे म्हणेन. (आता साईबाबा हा त्याने शोधलेला मार्ग होता. त्यात वाहवत गेला नसला तर काय बिघडले?) अध्यात्मिक रॉबिनहूड का ते माहीत नाही तसेच प्रकाशरावांनी मांडलेल्या मुद्याबाबत देखील माहीत नाही. त्याची चौकशी नीट करणे यात काही गैर नाही. मात्र न करताच बोलणे पटणार नाही. केवळ साईबाबांसंदर्भातच नाही तर इतर कुणाच्याही बाबतीत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माझीही शॅम्पेन

अध्यात्मिक रॉबिनहूड का ? कारण कुठेतरी ते भावनिक गरज भागवितात

वाहीदा
गुरुवार, 04/28/2011 - 14:40 नवीन
मनुष्य हा सामाजिक प्राणि नक्की आहे आहे पण जशी त्याची वैचारिक गरज आहे तशी तशीचे त्याची भावनिक गरज ही आहे अन अध्यात्मिक गरज ही आहे अन कुठेतरी ती भावनिक गरज हे बाबा / बुवा लोक्स पूर्ण करताना आढळतात. मग बाबाने दिलेली साधी राख असो, डोक्यावर ठेवलेला हात असो किंवा मग त्याचे ते प्रेमळ बोलणे असो हे कुठेतरी त्या क्षणाला अदभूत अनुभुती त्या त्या व्यक्तीला देत असेल. मानस शास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहीले तर प्रत्येकाला त्याची गरज आहे अन कुठेतरी आजच्या टेंन्शन युक्त आयुष्यात fatherly / motherly figure म्हणून हे बाबालोक पुढे येत आहेत. कदाचित त्याची कारणे आजची ढासळलेली कुंटुब व्यवस्था असेल जिथे संयुक्त कुटुंब पद्धत न राहता ती Nuclear झाली आहे घरात आजी आजोबांचे स्थान हळू हळू हे बाबा लोक घेत आहेत पण ते समाजाला कुठे तरी कणा नसलेले ही बनवत आहेत जिथे विचार करण्याची गरज उरत नाही अन फ़क्त चमत्कारानेच काम होते हे कुठेतरी भितीवह आहे जेव्हा नेते हे Trasnformational न रहाता Transactional होतात अन सर्व काही व्यवहारावर अवलंबून रहाते तेव्हा कुठेतरी ते समाजाला नक्कीच खोल दरित घेऊन जाणारे आहेत. "तूम्ही मला मते द्या मी तुमच्यासाठी अमुक अमुक करतो" हेच आजच्या नेत्यांचे गुण आहेत मग काहीही न मागता हा बाबा मला देतोय अन माझ्यातील सकारात्मक गुण माझ्या डोक्यावर हात ठेवून ते बाहेर येतात अन मी प्रेरणामय होतो तर मग मी त्या आनंदमय क्षणी वाट्टॆल ते पैसे स्वखुशिने द्यायला तयार होतो कारण बाबांचे गोड बोलणे !! असेच कुठेसे या वलयांकीत लोकांबरोबर झाले असेल कारण त्या क्षणाला ज्या मायेची त्यांना गरज असते ती ही बाबा लोक पुरवतात त्याक्षणाला त्यांच्या किंवा कुणाच्याच विचारांना अन तर्कबुध्दीला काडी मात्र महत्व नाही कारण एक मानवी स्वभाव म्हणून ते वलयांकित माणसे एक भावनिक प्राणी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

अतिशय योग्य आणि विचार करण्या

आनंद
Wed, 04/27/2011 - 23:09 नवीन
अतिशय योग्य आणि विचार करण्या जोगा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

नवीन सदस्य

  • सदस्य: अभिशेक पाटिल 2
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 11:14
  • सदस्य: Abhishek C
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 11:05
  • सदस्य: देव@मिसलपाव
    नोंदणी: Sat, 03/21/2026 - 08:44
  • सदस्य: आम्ही कोण म्हण…
    नोंदणी: Fri, 03/20/2026 - 00:38
  • सदस्य: मिपाखरु
    नोंदणी: Fri, 03/20/2026 - 00:36
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा