Skip to main content

सत्य साईबाबांचे नावच गूढ

लेखक माझीही शॅम्पेन यांनी सोमवार, 25/04/2011 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच सत्य साईबाबांचे निधन झाले ८६ वर्षाच्या महापुरुषचा चमत्कारी बाबचा अंत झाला १९४० साली त्यानी स्वता:ला आपण साईबाबांचे अवतार आहोत अस जाहीर केल. १९५४ साली पुत्तपर्थि येथे त्यानी पाहिल हॉस्पिटल काढल , पुढे अनेक ठिकाणी त्यानी कॉलेज , हॉस्पिटलस आणि यूनिवर्सिटी काढल्या. त्यानी कोट्यावधीची माया गोळा केली ( अर्थात बरीच संपत्ती वरील मार्गांनी चांगल्या कामासाठी वापरली सुध्धा) जागो जागी त्याचे देवसमान / तर देवंसोबत फोटो लावले पाहिले आहेत ( खास करून उडुपी हॉटेलात) चेपु आणि ट्विटर वर सध्या त्यांच्या संदेशाची रिघ लागली आहे आता दुसरी बाजू , नरेंद्र दाभोळकर / अनिस नि अंध-स्रद्धा निर्मूलनची सीडि मधे ते कसे हाथसफाई करून लोकाना फसवतात त्याचे विश्लेषण केल आहे , एका प्रसंगात स्वत शंकरराव चव्हाण ह्याच्या उपस्थितीत हे घडला आहे (पुढे त्यांचाच मुलाने ह्या बाबाना बोलावून त्याच्या पायाचे तीर्थ प्राशां केल होत) आता ह्या अनुषंगाने मला काही प्रश्न पडले आहेत , जाणकारणी थोडा प्रकाश टाकावा. १. जे सर्व-सामन्यना कळू शकते (जादू टोणा वैइगरे) ते ह्या सेलेब्रेटीना कळता कामा नये ? ह्याचा त्याना गुरु मानण्याचा उद्देश काय ? सचिन जे काही करतो आहे (उपास , अबोला वै.) ते माझ्या डोक्यापलीकडचे आहे २. ४० हजार करोड ची संपत्ती कशी गोळा केली असावी , त्याच्या ट्रस्ट वर संबधित सरकारने कधीच लक्ष दिल नाही का. तसेक त्यांच्या पश्यात त्याची मालकी वैइगरे हे विषय सोडुनच द्या ३. त्याना इतक्या लोकनी गुरू-स्थानी / देव-स्थानी मानया सारखी नक्की कुठल्या गोष्टी कारणीभूत आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने त्याना स्पिरिचुयल गुरू वै संबोधल आहे. कित्येक करोड (किवा) लाख लोक त्याची अनुयायी व्हावेत अस नक्की काय झाल असाव ? (सदर लेख त्याच्यावर टीका करण्यासाठी लिहिला नाहीए , तस वाटल्यास संपादक मंडळानी लेख उडवून टाकावा अशी विनाती) ---------------------- माझीही शॅम्पेन

वाचने 55706
प्रतिक्रिया 105

प्रतिक्रिया

या माणसाचा पर्दाफाश करणारे खूप videos youtube वर आहेत तरीही इतके लोक त्याच्या मागे पाहून डोक्याला शॉट बसला. सेलिब्रिटी वगैरे लोकांचे अशा प्रकारात हितसंबंध गुंतलेले असावेत, नाहीतर ४० करोड कसे आले? आणि हि फक्त वृत्तपत्रांना सांगितलेली रक्कम आहे असं वाटतंय.

In reply to by शिल्पा ब

४० कोटी नाही तर ४०,००० कोटी. शिवाय फक्त सेलिब्रिटीज नाहीत तर आदरणिय माजी पंतप्रधान नरसिंह राव, अटल बिहारी वाजपेयी, कडक मास्तर शंकरराव चव्हाण, माजी लोकसभा अध्यक्ष आदरणिय शिवराज पाटील, (जवळपास भारतरत्न) सचिन्,मैदानावर धावांचा पाउस पाडणारा सुनिल गावस्कर ही आदरणिय मंडळीपण आहेत. अमेरिकेतपण शेकड्यांवर भक्तगण आहेत्.अनेक गोरे तर अनेक भारतिय वंशाचे. राव्/चव्हाण तर गेले.ह्या बाकीच्यांची सी.बी.आय.चौकशी व्हावी असे वाटते.

In reply to by जयंत कुलकर्णी

याच संदर्भात नरेंद्र दाभोळकरांचा लेख इथे वाचता येईल - http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=15… मला त्यातले हे महत्वाचे वाटले -
चमत्काराचा वादग्रस्त मुद्दा उभा करून बाबांच्या अफाट सेवाकार्याकडे दुर्लक्ष केले जाते असा एक आक्षेप असतो. बाबांनी शाळा, दवाखाने वगरे गोष्टी उभ्या केल्या हे खरेच आहे, चांगलेही आहे. पण या स्वरूपाची असंख्य काय्रे याहीपेक्षा फार मोठय़ा प्रमाणावर कोणतेही राज्य शासन वा केंद्र शासन करतच असते. त्याचे कौतुक नसते, कारण लोकांच्या करातून मिळालेल्या पशांतूनच हे सारे घडवले जाते. अब्जावधी रुपयांचा अखंड ओघ येत असेल तर काही सेवाकाय्रे त्यातून उभी राहणारच. असंख्य सेवाकाय्रे करणाऱ्या सरकारला सामान्य नागरिक प्रश्न विचारतो, चिकित्सा करतो, पाच वर्षांनी पदच्युतही करू शकतो. तो त्याचा अधिकार मानला जातो. बाबांच्या ट्रस्टला अफाट देणग्या मिळण्यात त्यांच्या चमत्काराचा नि:संशय वाटा आहे. मग त्या चमत्कारांना प्रश्न विचारणे, त्यांची चिकित्सा करणे यामुळे बाबांचा अधिक्षेप का मानला जातो?
प्रकाशकाका म्हणतात, त्या प्रमाणे काळ्या पैशाची सोय किंवा Portfolio Management System अशा ठिकाणी अतिशय सबळ असावी!

ब-याच ढोंगी आणि लफडेबाज माणसांपैकी एक कमी झाला याचा अतिशय जास्त आनंद झाला मला ही यादी अशीच लवकर लवकर आणि वेगाने वाढत जावी ही सदिच्छा. काल जर याच्या मरण्यामुळे वैग्रे तेंड्ल्या खेळला नसता ना (इति प्रसारमाध्यमातील व्रुत्तानुसार) पार उतरला असता मनातुन, बरं झालं खेळ्ला ते.

In reply to by ५० फक्त

तेंडल्या खेळला नाही तरीही उतरला हो मनातुन.... शप्पथ कद्धी कद्धी असा विचार मनाला शिवला सुद्धा नव्हता की आपला तेंडल्या साईच्या पाया पडाया जाईल अन धाय मोकलुन रडेल... अवांतर : नांदेडपासुन जवळ एक साई उद्यान, चाकुर (हो... हो... शिवराज पाटलाच ) येथे बांधलंय. त्यात वॉटर पार्कही आहे. तिथे या बाबांच मंदिरही आहे. काही वर्षांपुर्वी ३-४ मित्र मिळुन फिरायला म्हणुन गेलो होतो. आमच्या एका मित्राने उद्यानात शिरल्या बरोब्बर एका चावडीवरुन बाबांचा फोटो घेतला अन कात्रीने त्या फोटोचे केशकर्तन केले. ज्याम आणंद झाला म्हणुन. अरे, तेंडल्या, आम्ही तुला देव मानतो ना रे... मग हे असले झटके का देतोस...

शिल्पा यांच्याशी सहमत. त्यांनी केलेले चमत्कार हे दैवी नसून हातचलाखीचाच एक प्रकार आहे हे खूप वेळा पाहिलंय. खूप आश्चर्य वाटते मोठे मोठे राजकारणी आणि खेळाडू(आपला सचिनसुद्धा) यांचे भक्त होते.

इथे चित्रफीत पहा आपल्या प्रश्नातच उत्तरे दडलेली आहेत. धार्मिक ट्रस्ट देवस्थान ही श्रीमंत का असतात. इथे काळ्या पैशाच पांढर्‍या पैशात रुपांतर होत असते. अनेक राजकारणी, फिल्म वाले यांचे भक्त असतात ते काही केवळ चमत्कारामुळे नाही. या उपयुक्तता मूल्या मुळे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

घाटपांडे साहेब, हा.हा.हा...चित्रफित पाहून खूप हसू येत होतं पण बळेच दाबून धरलं. :D :D :D

In reply to by शिल्पा ब

ओ, तसं नाय काय ते, छोटी चेन असती तर फकत किड्नी घेउन सोडला असता, रत्नहार होता म्हणे तो म्हणुन तर खुन केला, हां आपल्याकडे पण आयेसो ३.१४ इस्ट्मन्कलर बेल्ट अल्फा ५ ग्रेड अ‍ॅअ‍ॅअ‍ॅ सिस्टिम आहे आशरमात. लेवल असतात प्रत्येक गोष्टीला, छोटी चुक झाली तर किडनी काढायची मोठी झाली किडनी सोडुन बाकी सगळं काढायचं.

In reply to by ५० फक्त

लेवल असतात प्रत्येक गोष्टीला, छोटी चुक झाली तर किडनी काढायची मोठी झाली किडनी सोडुन बाकी सगळं काढायचं. ऐकावं ते नवलच म्हणायचं कि...;)

In reply to by प्रकाश घाटपांडे

चित्रफित डकवल्याबद्दल धन्यु. :) -दिलीप बिरुटे

त्या काळातील "नीरा राडिया" असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रास्वामी हेही असेच मीडिएटर असल्याचे ऐकले होते. अवांतर: सचिन तेंडुलकर (आणि इतर यशस्वी लोक) त्यांच्या आशीर्वादाने/कृपेने/शक्तीमुळे यशस्वी झाला असेल तर भारतरत्न सचिनला द्यायच्या ऐवजी सत्यसाईबाबांनाच का देऊ नये?

ह्या सगळ्या बाबांच्या अन त्याच्या चाहत्यांच्या.. &%$%#$#*&(* भारतात किती मुर्ख लोकं राहतात याचे साक्षात उदाहरण आहे हे. सुशिक्षित आंधळे अडाणी सगळे..

यान्च्याशी १००% सहमत

बाकी काही असो, त्यांच्या मुळे एकाही गरजु चे प्राण वाचले असतील(मोफत वैद्यकीय इलाजांमुळे), तर बाकी गोष्टी दुर्लक्ष करायला हरकत नाही,

In reply to by आनंद

हेच म्हणायचे होते.परिस्थितीने गांजलेल्यांना आधार देणे, त्यांना संकटात मदत करणे अशी अनेक कामे त्यांच्या ट्रस्टने केली. भिकार दर्जाची सरकारी रुग्णालये,पडिक शाळा,गलिच्छ पाणी ह्यांना दाभोळकर आणि कंपनी पर्याय देवू शकतात का? २.५ लाखाच्या ह्रुदयाच्या सर्जरी किती संस्था २५/३० हजारात करतील? सत्य साई ट्रस्टने ते काम केले. त्यांनी दाखवलेल्या चमत्कारांवर अर्थातच कोणीच विश्वास ठेवणार नाही. काही गैरव्यवहार झालेही असतील.वर ईतरांनी म्हंटल्याप्रमाणे काळा पैसाही त्यात गुंतला असू शकतो(म्हणजे असेलच्).पण ज्यांना खरोखरच वैद्यकिय किंवा ईतर गरज आहे ते लोक पैसा काळा की पांढरा ते बघत नाहीत.

In reply to by आनंद

त्यांच्या मुळे एकाही गरजु चे प्राण वाचले असतील(मोफत वैद्यकीय इलाजांमुळे), तर बाकी गोष्टी दुर्लक्ष करायला हरकत नाही सहमत..असे ऐकले आहे की त्यांच्या मोफत वैद्यकीय उपचाराचा लाभ बरेच गरीब लोक घेतात. मिळालेल्या पैशाचा थोडाफार सदुपयोग होत असल्याने चमत्कारांकडे थोडा काणा डोळा करायला हरकत नाही. दादा कोंडके यांनी त्यांच्या "एकटा जीव" या पुस्तकात सत्य साईबाबांचा उल्लेख केला होता. एकदा आशा भोसले त्यांच्या कडे दर्शनाला गेल्या असताना स.सा. बाबांनी हवेतून सोन्याचा दागिना काढला आणि आशाताईंना भेट दिला. त्यांच वेळी आशाताईच्या ड्रायव्हरला मात्र असाच काही चमत्कार करून मात्र साधीशी गोष्ट भेट दिली. भक्तांची आर्थिक कुवत, सामजिक स्थान जाणून भेट देणे म्हणजे चमत्कारच नाही का? असेच माझ्या एका मद्रासच्या कलिगला शंका होती की रेनॉल्ट पेन कंपनीत जॉब जॉईन करू का? त्या वेळी स.सा. बाबांनी हवेतून एक रेनॉल्ट पेन काढून त्यांना भेट दिले होते. पण हे सर्व प्रकार केल्याने त्यांना देवत्व मिळाले आणि म्हणूनच त्यांना लोकांकडून पैसा जमवून अशी हॉस्पिटले चालवत आली. थोड्याफार गरिब लोकांना मोफत उपचार घेता आले. नाहीतर हे इतक्या सहज शक्य होते का?

In reply to by योगी९००

त्यांना लोकांकडून पैसा जमवून अशी हॉस्पिटले चालवत आली.
ही तर 'गरीबों का मसीहा' गिरीच झाली. अर्थात त्यांनी हा दानधर्म अगदी थोडक्यात भागवला असावा. कारण हिमनगाचं टोक जाऊन ४०००० कोटीचा हिमनग तसाच शिल्लक आहे. पण ससाबा पश्चातही उरलेल्या गरीबांचीही चिंता नको, प्रेम साई अवतरणार आहेच. *म्हटलंच आहे, शिंग फुंकता रॉबिनसाठी शरवुडचे जंगल भंगेल गडी उठतील रंगेल *-भा. रा. भागवत

In reply to by शहराजाद

>>शिंग फुंकता रॉबिनसाठी वा वा .. काय मस्त आठवण जागवलीत. लहान पणी अगदी भारावलो होतो भागवतांचा रॉबिन हुड वाचुन !! शेरवुडचे जंगल, मोठा जॉन, लिटल जॉन, मरियम, कोणतरी लठ्ठ्या, हरणं, उमदार दिलदार राजा रिचर्ड, त्याची हरणं आणि रॉबिनची पुंडाई. भागवतांची भाषांतरीत पुस्तकं वाचणं हा फारच आनंददायी अनुभव होता, आता तसा निखळ निर्भेळ आनंद पटकन मिळवता येत नाही. इतकं छान नवं काही राहिलं नाही किंवा जाणीवा बोथट झाल्यात. बादवे ते पाणबुडीवालं एच. जी. वेल्सचं कोणतं हो भाषांतरीत पुस्तक ? पुस्तकविश्वच्या दिवाळी अंकात अदितीने एक नितांतसुंदर लेख लिहिलाय 'सांगावेसे वाटले म्हणुन', त्यात तिने लिहलेय ती भागवत आजोबांना भेटली तेव्हा ते तिला कसे वाटले याबद्दल. अवांतराबद्दल क्षमस्व.

In reply to by आनंदयात्री

बादवे ते पाणबुडीवालं एच. जी. वेल्सचं कोणतं हो भाषांतरीत पुस्तक ?
पाणबुडीवाले एच. जी. वेल्सचे नसावे. ज्यूल्स व्हर्नचे असावे. 'ट्वेंटी थाउज़ंड लीग्ज़ अंडर द सी'. त्याच्या भागवतांच्या अनुवादाबद्दल कल्पना नाही. फारा वर्षांपूर्वी 'किशोर' मासिकात 'सागरकैद' नावाने त्याचा एक मराठी अनुवाद क्रमशः प्रसिद्ध झाला होता. अनुवादक कोण होते ते आठवत नाही. (बहुधा भागवत नसावेत.)

In reply to by पंगा

>>पाणबुडीवाले एच. जी. वेल्सचे नसावे. ज्यूल्स व्हर्नचे असावे. 'ट्वेंटी थाउज़ंड लीग्ज़ अंडर द सी'. करेक्ट. ज्यूल्स व्हर्नचेच. हेच मराठीत वाचले आहे पण किशोरमध्ये नाही हे नक्की.

In reply to by पंगा

त्याच्या भागवतांच्या अनुवादाबद्दल कल्पना नाही.
बहुतेक "साता समुद्राचा सुलतान" असावं.

In reply to by आनंदयात्री

रॉबिन हुड आणि त्याच्या रंगेल गड्यांनी एके काळी मलाही झपाटून टाकलं होतं. (भा. रा. भागवत झिन्दाबाद) खरं तर तशीच टोळीदेखील काढायचा आमचा मनसुबा होता; पण एक तर आसपास जंगल नव्हतं. शिवाय, आमचे पाद्रीबाबा, धाकला जॉन इ मंडळीची टोळीशी बांधिलकी तकलादू आणि पार्ट टाइम होती. टोळी अस्तित्वात येऊ शकली नाही हे वेगळं सांगायला नको. @ अदितीतै भागवत आजोबांच्या भेटीचा लेख मिपावरही टाका. असो. फार अवांतर होत चाललय. खरड टाकीन.

In reply to by योगी९००

रेनॉल्ट पेन कंपनीत जॉब जॉईन करू का? त्या वेळी स.सा. बाबांनी हवेतून एक रेनॉल्ट पेन काढून त्यांना भेट दिले होते.
नशीब रिनॉल्ट कार कंपनीत जॉब जॉईन करु का म्हणुन विचारले नाही त्याने.....

In reply to by वपाडाव

नशीब रिनॉल्ट कार कंपनीत जॉब जॉईन करु का म्हणुन विचारले नाही त्याने..... आमचे तेच म्हणणे होते त्यावेळी की एखाद्या कार कंपनीत जॉईन करू का विचारायला पाहिजे होते म्हणजे स.सा. बाबांनी कारच काढून दिली असती.

In reply to by आनंद

गरजूंचे प्राण वाचताना जर अनेक लोकांची घरे उद्ध्वस्त झाली असतील अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन त्यांचे काय? महेश कुलकर्णी

In reply to by महेश_कुलकर्णी

लोकांची घरे कशी बरे उध्वस्त झाली? त्यांनी गुंड पाठवून पैसे जमवून आणले का? का लोक त्यांच्या कडे पैसे नसताना कर्जे काढून त्यांना पैसे देत होते? काही उदाहरणे देऊ शकाल काय?

In reply to by आनंद

आनंद यांच्यासारखे अंधश्रद्धाळू लोक असल्यानेच असल्या बाबांचे फावते. आनंद यांच्यासारखे लोक नुसते बाबांची अनुयायी बनत नाहीत तर त्या बाबांचा प्रसारही करतात.

In reply to by Nile

मी अंधश्रद्धाळू आहे हे नवीनच कळल. मला ओळ्खणारे लोक मला कश्यावरही श्रद्धा नसलेला म्हणतात. बाकी ते बांबाचा प्रसार वाचुन (आधी कॉफी सांड्ली ना भाउ!) सांगावस वाटत की कुठ्ल्या बाबाचा प्रसार करण्या पेक्षा स्वतः च एखादा बाबा बनण्याचा प्रयत्न करीन.

''त्यांच्या मुळे एकाही गरजु चे प्राण वाचले असतील(मोफत वैद्यकीय इलाजांमुळे), तर बाकी गोष्टी दुर्लक्ष करायला हरकत नाही,'' अजिबात नाही, उद्या दाउदनं त्याच्या बापाच्या नावानं दवाखाना काढला आणि त्यात एका गरजुचे प्राण वाचवले तरी हेच म्हणणार का ? ज्या गरजुचे प्राण फुकट वाचले त्याच्या प्राणाची किंमत बाकीच्यांनी ब-याच मार्गांनी दिली असेल, कुणी किडन्या देउन तर कुणी अजुन काही देउन.

In reply to by टारझन

इतक्या सहजा सहजी सुटका कसली होतेय. आत्मा अमर आहे शरीर बदलुन येइलच लवकर.(जालावरही जसे पुनर्जन्म होतात तसे)

In reply to by टारझन

मेला चार दिवसापुर्वीच असेल, सगळ्या कागदावर अंगठे वगैरे घेउन झाल्यावर सांगितलं असेल. बरं एक शंका, मरण्यापुर्वी या भोंदुनं आपलं शरीर,किडनी, लिव्हर गेला बाजार डोळे तरी दान केले होते का ? किंवा किमान लिलावात विकायची वगैरे आयडिया आहे का कुणाची इबेला वगैरे, जाम पैसे मिळतील त्यातुन ?

In reply to by टारझन

फक्त टारझनच देऊ शकतात. अनेकजण या प्रतिक्रियेने मनांत सुखावले असले तरी सगळ्यांचं डेअरिंग नाही होणार असं लिहायला. एकूण सर्व प्रतिक्रिया वाचून मिपावर असल्याचा अभिमान वाटला. बुवांच्या माध्यमातून काळ्या पैशाचे पांढरे करणे, पोलिटिकल कामे करुन घेणे यासाठीच सर्व बडे बुवाभक्त होतात या मताशी १००% सहमत. दुनिया झुकती है, बस झुकानेवाला चाहिये.

'माझीही शॅम्पेन', तुम्हाला जी चर्चा करण्याची इच्छा आहे ती स्तुत्य आहे. पण तुम्ही 'वगैरे' हा शब्द 'वैइगरे' हा शब्द चुकीचा लिहू नये असे वाटले. 'वगैरे' हा शब्द मुळात उर्दु (फारसी?) आहे. त्याचा अर्थ 'व + गैरे' म्हणजे मराठीत 'आणि + इतर' (संस्कृतात 'इति + आदि' = इत्यादि ) असा आहे. बरेच लोक हा शब्द "वैग्रे" , "वैगरे" असा लिहू आणि उच्चारू लागले आहेत त्याचा खेद वाटतो.

In reply to by विसुनाना

धन्यवाद विसुनाना ! पुढील खेपेस "इत्यादी" हा शब्द वापरीन :) अवांतर - इत्यादी आणि एक्सेटरा (ईग्रजी) शब्द जरा जवळचे वाटतात का ?

लातुर मधील एका तरुण मुलाची किडनी पुट्टीपुर्तीच्या हॉस्पिटल मध्ये काढली होती. हे मी सदर मुलाच्या तोंडातुन पत्रकारांसमोर ऐकलेली कथा आहे. ती चित्रलेखा मध्ये ही आली होती. बापाच्या किडनीच्या आजारात मुलाला किडनी द्यावी लागली .मुलाने आश्रमात सेवा केली. बाप नंतर वारला. मुलाने नंतर जेव्हा एक्स रे काढला त्यावेळी बापाची एक किडनि गायब व याची एक गायब. हे प्रेत उकरुन काढुन काढलेल्या पोस्टमार्टेम वरुन सिद्ध झाले. मुलगा कोर्टात लढला. हारला. जजच सत्यसाईबाबाचे भक्त निघाले. ७-८ वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. अगदी साधा मुलगा होता. प्रकरण बंद. कोट्यावधी रुपयांची माया जमा झाल्यावर जनहितार्थ काही गोष्टी कराव्याच लागतात. चिरोटा यांचे "पण ज्यांना खरोखरच वैद्यकिय किंवा ईतर गरज आहे ते लोक पैसा काळा की पांढरा ते बघत नाहीत." हे मत मान्यच आहे. अंधश्रद्धेचे बळी हेच अंधश्रद्धेचे मोठे वाहक असतात. मनुष्य अडचणीत असला की चिकित्सा वगैरे असल्या भानगडीत तो पडत नाही. साहजिकच श्रद्धा हाच भाग मग जोपासला जातो हे वास्तव नाकारुनही चालणार नाही

In reply to by प्रकाश घाटपांडे

>>कोट्यावधी रुपयांची माया जमा झाल्यावर जनहितार्थ काही गोष्टी कराव्याच लागतात पका काकांशी प्रचंड सहमत आहे. मला तर वाटतं की बाबांच्या भक्तांचा सगळा काळा पैसा यांच्या ट्रस्ट च्या नावाखाली पांढरा करुन घेतला गेला आहे.

In reply to by मराठमोळा

मला तर वाटतं की बाबांच्या भक्तांचा सगळा काळा पैसा यांच्या ट्रस्ट च्या नावाखाली पांढरा करुन घेतला गेला आहे.
बर्‍याच प्रमाणात शक्यता आहे. पण वर उल्लेखलेल्या सेलिब्रिटीज म्हणजे कोणी पेज थ्रीवाल्या उडाणटप्पु व्यक्ती नाहीत. ती आहेत समाजातली दैवते. त्यांची चौकशीची मागणी करायची म्हणजे तुम्ही-आम्ही संपण्याचीच शक्यता जास्त.

फार छान विषय चर्चेला घेतल्या बद्दल लेखकाचे मनपूर्वक आभार आणि अभिनंदन... मी जेव्हा सत्य साई बाबांच्या भोंदूगिरी बद्दल मित्रांमधे बोलतो तेव्हा भाविक मला सांगतात "त्यांनी अनेक कॉलेज आणि हॉस्पिटल(पूर्णत: मोफत सेवा) काढली आहेत आणि ते त्यांचे मोठेपण आहे..." पण मी या गोष्टीने समाधानी होत नाही कारण त्या ट्रस्टकडे जमा झालेला पैसा हा भोंदुगिरी करून लोकांना फसवून गोळा केला आहे. फकिर साईबाबांचा अवतार एवढ श्रीमंत आणि आरामदायी आयुष्य कसे काढतो? उदा. २००५ पासून बाबा फुल्ली ऑटोमॅटिक व्हिलचेअर वापरत होते. या सर्व मुद्यामध्ये एक अजून एक प्रश्न मला काल पासून त्रास देतो आहे तो म्हणजे ४ दिवस शासकीय दुखवटा कशासाठी? महेश कुलकर्णी

पूर्वी मिसळपाववर नेमक्या याच गुरूगिरीच्या धंद्यावर अगदी अचूक भाष्य असणारी मुलाखत अनुवादीत झालेली आहे... यासंदर्भात अगदी वाचनीय http://www.misalpav.com/node/16401

केवळ सेलीब्रिटीजचे श्रध्दास्थान सत्य साईबाबा होते म्हणून तर त्यांच्या क्षेत्रातली त्यांची कामगिरी गौण ठरते असे मत वरील काही प्रतिसाद वाचताना लक्षात आले. सचिन तेंडुलकर हा साईबाबांच्या आशिर्वादानेच चांगली कामगिरी करू शकला म्हणून त्याच्याऐवजी साईबाबांनाच "भारतरत्न "द्यावे असे चेष्टेने लिहीणे देखील चुकीचे आहे. कुठलीही प्रसिद्ध व्यक्ती ही देखील इतर माणसासारखा विचार करतच असते. तिचे देखील गुरू, श्रद्धास्थाने असू शकतात. ते योग्य कि अयोग्य हा भाग वेगळा. बरं, ते ठरवणार कोण ? त्यालासुध्दा पात्रता लागते. सेलीब्रिटीजचच्या कामगिरीची उगाचच चेष्टा करून थोड्याफार ओळखीच्या लोकांमध्ये स्वतःच्या मताची टिमकी वाजवणे हे जरा अतीच.

In reply to by नाना बेरके

>>केवळ सेलीब्रिटीजचे श्रध्दास्थान सत्य साईबाबा होते म्हणून तर त्यांच्या क्षेत्रातली त्यांची कामगिरी गौण ठरते असे मत वरील काही प्रतिसाद वाचताना लक्षात आले. सचिन तेंडुलकर हा साईबाबांच्या आशिर्वादानेच चांगली कामगिरी करू शकला म्हणून त्याच्याऐवजी साईबाबांनाच "भारतरत्न "द्यावे असे चेष्टेने लिहीणे देखील चुकीचे आहे. सेलिब्रिटीजची त्यांच्या क्षेत्रातली कामगिरी गौण ठरते असे मी म्हणत नाही तर श्रद्धाळू लोक अश्या अर्थाने बोलतात. "सत्यसाईबाबांचा आशीर्वाद नसता तर सचिन तेंडुलकर कुठला इतक्या धावा करता !!!" असा टोन दिसतो. म्हणून "मग सत्यसाईबाबांनाच भारतरत्न द्यावे" असे म्हणावे लागते.

सत्यसाई फ्रॉड होते, खरे होते, अवतार होते, मानव होते, देव होते ह्या सगळ्याशी काही घेणे देणे नाही. त्या माणसाच्या हॉस्पिटल मध्ये एका कोणा गरिबाची आई, बहिण , लहानगे लेकरु वाचले असेल तरी मला त्या माणसाविषयी आदरच आहे :) बाकी बाँबब्लास्ट करुन लाखो लोकांचे जीव घेणार्‍या दाऊदशी बाबांची केलेली तुलना पाहून गंमत वाटली :) असो... आणि हो एक विचारायचे राहिलेच. सध्या तावातावाने ह्या धाग्यावर बाबांच्या नावाने बोंबा ठोकणारे, त्यांच्या हातचलाखीचे पितळ वैग्रे उघडे पाडणारे बाबांच्या हयातीत काय करत होते? गेला बाजार त्यांनी आंतरजालावर एखादा लेख लिहून बाबांच्या भक्तांना सावध करण्याचा प्रयत्न तरी केला काय ? हे थोर विचारवंत आता बाबांचे खरे रुप जगासमोर आणतील आणि मग स्वतः थोडा फार खर्च उचलुन बाबांची रुग्णसेवा पुढे नेतील अशी अपेक्षा. अवांतर :- असे काही बघितले की सगळ्यात आधी 'ज्यानी आयुष्यात एकही पाप केले नाही, त्यानी पहिला दगड मारावा' ह्या कथेची आठवण होते :)

In reply to by परिकथेतील राजकुमार

असे काही बघितले की सगळ्यात आधी 'ज्यानी आयुष्यात एकही पाप केले नाही, त्यानी पहिला दगड मारावा' ह्या कथेची आठवण होते
माझ्या समजुतीकरिता विचारतो. सध्या तावातावाने ह्या धाग्यावर बाबांच्या नावाने बोंबा ठोकणारे, त्यांच्या हातचलाखीचे पितळ 'वैग्रे' उघडे पाडणारे जे आहेत, ते (बाबांच्या हयातीत किंवा अन्यथा) स्वतःसुद्धा (कमीअधिक प्रमाणात) हातचलाखीचा धंदा करीत होते, असा काही आपला दावा आहे काय? असल्यास, त्याकरिता आधार काय असावा बरे?

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>आणि हो एक विचारायचे राहिलेच. सध्या तावातावाने ह्या धाग्यावर बाबांच्या नावाने बोंबा ठोकणारे, त्यांच्या हातचलाखीचे पितळ वैग्रे उघडे पाडणारे बाबांच्या हयातीत काय करत होते? गेला बाजार त्यांनी आंतरजालावर एखादा लेख लिहून बाबांच्या भक्तांना सावध करण्याचा प्रयत्न तरी केला काय ? हे सर्व आरोप जुने आहेत. मी स्वतः यातील काही गोष्टी अंधश्रद्धा निर्मुलनच्या कार्यकर्त्यांकडून खूप जुन्या काळी ऐकलेल्या आठवतात. ज्या काळी आंतरजाल अस्तित्वात नव्हते तेव्हापासून चालू आहे. "बोंबा" ठोकणारे जुन्या काळापासून ठोकत आहेत, काही जणांनी त्या ऐकल्या नसतील तर त्याला "बोंबा" ठोकणारे काय करणार? तात्पर्य :- एखादी गोष्ट आपल्याला माहित नसते तेव्हा ती अस्तित्वात नसते असे नाही. >>हे थोर विचारवंत आता बाबांचे खरे रुप जगासमोर आणतील आणि मग स्वतः थोडा फार खर्च उचलुन बाबांची रुग्णसेवा पुढे नेतील अशी अपेक्षा. अवांतर :- असे काही बघितले की सगळ्यात आधी 'ज्यानी आयुष्यात एकही पाप केले नाही, त्यानी पहिला दगड मारावा' ह्या कथेची आठवण होते कुणी सांगावे, आरोप करणाऱ्यातले काही जण तरी त्यांच्या परीने आणि कुठेही गाजावाजा न करता करत असतीलही अशी मदत. ते करत नाहीत असे गृहीत का धरावे ? (तुमच्या अवांतर वाक्यातून तसे प्रतीत होते आहे.) तात्पर्य :- वरचेच ;-)

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

मेहेंदळे आजोबा तुम्हाला पाचर दिसले की शेपटीने त्याच्याशी खेळायची सवयच आहे का हो ? तुमच्या अगाध ज्ञानाविषयी कट्ट्याच्या दुसर्‍याच दिवशी समजल्याने तुम्हाला प्रतिउत्तर करायचे नाही असे मनोमन ठरवले होते. पण साला आमचा किडा पण गप्प बसेना म्हणुन उत्तर देत आहे.
हे सर्व आरोप जुने आहेत. मी स्वतः यातील काही गोष्टी अंधश्रद्धा निर्मुलनच्या कार्यकर्त्यांकडून खूप जुन्या काळी ऐकलेल्या आठवतात. ज्या काळी आंतरजाल अस्तित्वात नव्हते तेव्हापासून चालू आहे. "बोंबा" ठोकणारे जुन्या काळापासून ठोकत आहेत, काही जणांनी त्या ऐकल्या नसतील तर त्याला "बोंबा" ठोकणारे काय करणार? तात्पर्य :- एखादी गोष्ट आपल्याला माहित नसते तेव्हा ती अस्तित्वात नसते असे नाही.
येवढे बिनकामाचे अगाध ज्ञान, त्यातील अंधश्रद्धा निर्मुलनचे कार्यकर्ते वैग्रे फालतु तपशील टंकण्याच्या आधी पक्त :-
आणि हो एक विचारायचे राहिलेच. सध्या तावातावाने ह्या धाग्यावर बाबांच्या नावाने बोंबा ठोकणारे, त्यांच्या हातचलाखीचे पितळ वैग्रे उघडे पाडणारे बाबांच्या हयातीत काय करत होते? गेला बाजार त्यांनी आंतरजालावर एखादा लेख लिहून बाबांच्या भक्तांना सावध करण्याचा प्रयत्न तरी केला काय ?
हे अधोरेखीत शब्द वाचले किंवा समजावुन घेतले असतेत तर किती बरे झाले असते :) पण काय आहे ना, जुने स्कोर सेटल करायची इतकी घाई झालेली असते की काय लिहिले आहे ते निट न वाचताच त्याच्या विरुद्ध लिहिण्याची घाई... असो... ह्यापुढे तुमच्या लेखनाची दखल घेईनच असे नाही (फालतु वेळ असेल तर आणि सविता भाभी अपडेट झाले नसेल तर धागा उघडीन पुन्हा कदाचित). त्यामुळे उगाच रागारागाने, संतापाने अजुन हातभर ज्ञान टंकु नका. उगाच टंकनाचे कष्ट वाया. ;) सत्य साई तुम्हाला बुद्धी देवोत =))

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>मेहेंदळे आजोबा तुम्हाला पाचर दिसले की शेपटीने त्याच्याशी खेळायची सवयच आहे का हो ? नाही. नाठाळांची शेपटी दिसली की तिला अडकवण्याची सवय आहे. तुम्हाला अनुभव आला आहेच. विसरला असाल तर स्वतःची शेपटी निरखून बघा. >>तुमच्या अगाध ज्ञानाविषयी कट्ट्याच्या दुसर्‍याच दिवशी समजल्याने तुम्हाला प्रतिउत्तर करायचे नाही असे मनोमन ठरवले होते. पण साला आमचा किडा पण गप्प बसेना म्हणुन उत्तर देत आहे. अरेच्या !!! वृत्तांतात तर आमच्या अगाध ज्ञानाविषयी काही आले नव्हते. हेरखाते आहे तुमचे की नुसताच कल्पनाविलास ?? बाकी लोकमान्य टिळक म्हणून गेलेच आहेत की दिडकीची भांग घेतली की वाट्टेल तितक्या कल्पना सुचतात. तेव्हा, तुमचे चालू द्या... >>हे अधोरेखीत शब्द वाचले किंवा समजावुन घेतले असतेत तर किती बरे झाले असते >>गेला बाजार त्यांनी आंतरजालावर एखादा लेख लिहून बाबांच्या भक्तांना सावध करण्याचा प्रयत्न तरी केला काय ? कूपकथेतील मंडूककुमार साहेब, तुम्ही वाचता तितकेच जाल नाही आहे हो. थोडा शोध घ्या, बुवाबाजी या विषयावर ५०-१०० धागे येऊन गेले आहेत. तुमच्या कडे रिकामा वेळ बराच असतो असे दिसते. तेव्हा त्याचा सदुपयोग करून ते धागे वाचा आणि "अभ्यास वाढवा". इथले कमी पडले तर उपक्रमावर पण बरेच आहेत. आता इथे ५-१० ओळींचा प्रतिसाद लिहिणाऱ्यानेच आधी सत्यसाईबाबावरच लिहिले पाहिजे असा तुमचा आग्रह असेल तर गोष्ट वेगळी. तरीही ज्यांनी ज्यांनी अशा "बोंबा ठोकल्या", त्यातल्या कुणीच आधी काही लिहिले नव्हते असा तर्क नाही काढता येत. (माफ करा, चुकलो, तुम्हाला चक्क तर्कशुद्ध विचार करायला सांगतो आहे. सॉरी हं.) बाकी, जमले तर खाली Nile यांनी दिलेला प्रतिसाद पण वाचा. स्कोर "वैग्रे" बद्दल उत्तर मागे दिले होते. ते "पक्त" पुन्हा वाचा. >>ह्यापुढे तुमच्या लेखनाची दखल घेईनच असे नाही. नका घेऊ, झेपत नाही तुम्हाला. >>सत्य साई तुम्हाला बुद्धी देवोत =)) ओरिजिनल देवाने मला दिली तेवढी बुद्धी पुरेशी आहे. सत्य साईने दिलेल्या बुद्धीचा स्पेसिमेन तुम्ही असाल तर.... बापरे... मुळीच नको. आजचा श्लोक :- आधीच मर्कट तशातची मद्य प्याला.....

In reply to by परिकथेतील राजकुमार

सध्या तावातावाने ह्या धाग्यावर बाबांच्या नावाने बोंबा ठोकणारे, त्यांच्या हातचलाखीचे पितळ वैग्रे उघडे पाडणारे बाबांच्या हयातीत काय करत होते? गेला बाजार त्यांनी आंतरजालावर एखादा लेख लिहून बाबांच्या भक्तांना सावध करण्याचा प्रयत्न तरी केला काय ? हे थोर विचारवंत आता बाबांचे खरे रुप जगासमोर आणतील आणि मग स्वतः थोडा फार खर्च उचलुन बाबांची रुग्णसेवा पुढे नेतील अशी अपेक्षा.
बाबांच्या हयातीत अनेकदा टिका वगैरे झाली आहे हे वरती मेहेंदळ्यांनी लिहले आहेच. पण ह्या मुद्द्याचे इथे कारण काय? पुर्वी समजा इथे बोंब ठोकणार्‍यांपैकी एखाद्याने काही केले नसेल म्हणून इथे करु नये असे कुठल्या धर्मग्रंथात लिहले आहे काय? मुळात धाग्याचा अन लेखकाचा उद्देशच चर्चा करणे हा आहे हे असताना, तसे व्यासपीठ उभे केले असताना पुर्वी काय केले हे विचारणे अस्थायी आहे. शिवाय आंतरजालावर एखादा लेख लिहणे म्हणजेच काहीतरी करणे नाही. अश्या भोंदु बाबांबाबत आपल्या घरातल्यांनाही सावध करणे म्हणजे कामगीरीच आहे. आणि रुग्णसेवाच केली पाहिजे असे नाही. अश्या भोंदूंपासून लोकांना सावध करणे हे ही महत्त्वाचे कार्य आहे.

In reply to by Nile

पुर्वी काय केले हे विचारणे अस्थायी आहे.
'अस्थायी' नव्हे. 'अस्थानी'. 'अस्थानी' बोले तो, out of place. 'अस्थायी' बोले तो, unstable. अर्थाचा अनर्थ होतो, म्हणून ही सुचवण. बाकी चालू द्या.

In reply to by पंगा

गलती से मिश्टेक हो गया. चुक सुधारल्या बद्दल धन्यवाद. स्वगतः च्यायला शाळेत नीट मराठी शिकलो असतो तर.. ;-)

In reply to by पंगा

पंगा, चांगलेच मराठी बोलायला लागला रे बाबा तू आता. अचूक दुरूस्ती करायलाही लागला आताशा. प्रगती उत्तम आहे. कोणत्या मास्तरांची शिकवणी लावली? बाकी चालू दे. चर्चा भन्नाट चालली आहे.

चेपु आणि ट्विटर वर सध्या त्यांच्या संदेशाची रिघ लागली आहे यातील चेपु म्हणजे काय ? :( अमोल केळकर

आमचा देवच या भोंदुगीरीच्या जाळात अडललेला पाहुन अतिव यातना झाल्या. बाकी आपला शिर्डिचे साईबाबा आणि संत गाडगेबाबा सोडले तर अन्य कुठल्याच बाबा, भाई,माई, माता, माँ वर विश्वास नाही.

In reply to by गणपा

आमचा देवच या भोंदुगीरीच्या जाळात अडललेला पाहुन अतिव यातना झाल्या.
आपण आपल्या देवाला फक्त क्रिकेट फिल्ड पुरते लिमिटेड ठेवले आणि त्याच्या वैयक्तिक जिवनात माणुस म्हणुन पाहिल्यास यातना कमी होऊ शकतात. :)
बाकी आपला एक शिर्डिचे साईबाबा सोडले तर अन्य कुठल्याच बाबा, भाई,माई, माता, माँ वर विश्वास नाही.
बास , अजुन काही बोलणे नाही :) - सत्यसाई हेयर कटिंग सैलुन आमचे कडे विविध प्रकारचे केस पिंजुन मिळतील. मुंज व दहाव्याच्या ऑर्डरी स्विकारतो . पत्ता : पिंपळाच्या झाडाखाली , गटरीच्यावर , झिपरे चाळ , अस्वलगल्ली , मेंढरपाल (पश्चिम)

In reply to by टारझन

आपण आपल्या देवाला फक्त क्रिकेट फिल्ड पुरते लिमिटेड ठेवले आणि त्याच्या वैयक्तिक जिवनात माणुस म्हणुन पाहिल्यास यातना कमी होऊ शकतात.
खरयं टार्‍या तुझं. पण काये ना या नावा भवतीच वलयंच अस आहे की त्याला क्रिकेट फिल्ड पुरते लिमिटेड ठेवणं जड जातं. :)

In reply to by टारझन

मुंज व दहाव्याच्या ऑर्डरी स्विकारतो .
मुंजीला आणि दहाव्याला केस पिंजू कधीपासून लागले? की हा पुण्यातले सायकलरिपेरवाले सहसा ष्टोदुरुस्तीचीही कामे करतात (/ करत असत), तशातला काही प्रकार आहे?

In reply to by पंगा

मुंजीला आणि दहाव्याला केस पिंजू कधीपासून लागले? की हा पुण्यातले सायकलरिपेरवाले सहसा ष्टोदुरुस्तीचीही कामे करतात (/ करत असत), तशातला काही प्रकार आहे?
पार खपलो ! :)

In reply to by पंगा

>>की हा पुण्यातले सायकलरिपेरवाले सहसा ष्टोदुरुस्तीचीही कामे करतात (/ करत असत), तशातला काही प्रकार आहे? जर (हा विनोद असेल तर) { प्रतिसाद.टंका ("हा हा हा ... पंगाशेठशी नाईलाजाने सहमत."); } (वरचा स्युडो कोड कंपाईल होईल याची ग्यारंटी नाही, कृपया त्यावरुन हात धुवुन मागे लागु नये.)

In reply to by गणपा

आमचा देवच या भोंदुगीरीच्या जाळात अडललेला पाहुन अतिव यातना झाल्या.
तुमचा देव .. सचिन ? काही प्रश्न पडलेत मला .. मला ही सचिन खुप आवडतो .. त्याचे डेडीकेशन .. डाउन टु अर्थ आचार्-विचार .. खेळ .. आनि इतर .. पण म्हणुन जर त्याला देव म्हणत असताल तर असेच इतर लाखो लोग कोणाला तरी बाबा महाराज .. गुरु असे त्यांना वाटत असलेल्या आपुलकीने मानत असतील तर .. त्यांची कारणे काहीही असु शकतात.. फक्त चमत्कार असेच कारण नसु ही शकेल . म्हणजे आपला तो देव .. बाकीच्यांचा तो राक्षस अशी नविन म्हण प्रस्थापित होउ शकते आहे असे वाटते .... असो .. सत्य साईबाबा ह्यांच्या बद्दल मला तरी ते मरे पर्यंत काहीच जास्त माहिती नव्हते.. त्यामुळे आता न्युज वर किंवा येथे कोणी काहीही बोलले (चांगले -वाईट) त्याकडे मी तरी दुरक्ष करत आहे... कारण त्याचा आता काहीच फायदा नाहिये ...

In reply to by गणपा

आमचा देवच या भोंदुगीरीच्या जाळात अडललेला पाहुन अतिव यातना झाल्या.
तुमचा देव .. सचिन ? काही प्रश्न पडलेत मला .. मला ही सचिन खुप आवडतो .. त्याचे डेडीकेशन .. डाउन टु अर्थ आचार्-विचार .. खेळ .. आनि इतर .. पण म्हणुन जर त्याला देव म्हणत असताल तर असेच इतर लाखो लोग कोणाला तरी बाबा महाराज .. गुरु असे त्यांना वाटत असलेल्या आपुलकीने मानत असतील तर .. त्यांची कारणे काहीही असु शकतात.. फक्त चमत्कार असेच कारण नसु ही शकेल . म्हणजे आपला तो देव .. बाकीच्यांचा तो राक्षस अशी नविन म्हण प्रस्थापित होउ शकते आहे असे वाटते .... असो .. सत्य साईबाबा ह्यांच्या बद्दल मला तरी ते मरे पर्यंत काहीच जास्त माहिती नव्हते.. त्यामुळे आता न्युज वर किंवा येथे कोणी काहीही बोलले (चांगले -वाईट) त्याकडे मी तरी दुरक्ष करत आहे... कारण त्याचा आता काहीच फायदा नाहिये ...