Skip to main content

सावधान! 'व्हर्चुअल फ्रेंड ' ची 'रियालिटी ' भोवली.

लेखक विनायक बेलापुरे यांनी मंगळवार, 05/04/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चाळीशीच्या इसमाकडून २० वर्षीय तरुणीचा विनयभंग इंटरनेटवर चैटिंग करत घट्ट मैत्रीत अडकलेल्या २० वर्षीय तरुणीला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. व्हर्चुअल फ्रेंडशी तरुण तरुणींनी किती मैत्री वाढवावी याबाबत सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या २० वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी ४१ वर्षीय व्यक्तीला डेक्कन पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी कोथरूड येथील तरुणीने डेक्कन पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सलील भालचंद्र नानल (वय ४१ वर्षे रा. मुंबई) याला अटक केली आहे. सहा वर्षापूर्वी २००५ मध्ये शाळेत असताना या तरुणीने नानलशी चैटिंग करण्यास सुरुवात केली होती. चैटिंगवर एकमेकाना मोबाईल नंबर्स दिल्यावर त्यांचे बोलणे सुरु झाले. दरम्यान, या तरुणीच्या अनोख्या मैत्रीची माहिती तिच्या आईला समजली. त्यानंतर तिने नानलशी बोलणे बंद केल्यावर त्याने तरुणीला धमकावण्यास सुरुवात केली. या तरुणीने २००८ मध्ये पुणे पोलिसांच्या महिला सहाय्य कक्षात तक्रार नोंदवली होती. त्यावेळी दोघांचे समुपदेशन करण्यात आले होते. नानल याने तिला परत त्रास देणार नाही, असे पोलिसांना सांगितले होते. मात्र, काही दिवसानंतर त्याने पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली आहे असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान नानलने फेसबुकावर बोगस आयडी तयार करून तरुणीचा बदनामीकारक मजकूर पोस्त केला होता. त्यानंतर नानल ने तिला १० जानेवारीला संभाजी बागेजवळ भेटण्यास बोलावले होते. त्यावेळी त्याने तिचा विनयभंग केला. सदर बातमी आजच्या (५ एप्रिल २०११) महाराष्ट्र टाईम्स, पुणे आवृत्तीतील मुख्य पानातील २ क्रमांकाच्या पानावर आहे. याची लिंक सापडली नाही म्हणून ज्यांनी वाचली नसेल अश्या सर्वांच्या माहितीसाठी आणि हितासाठी बातमी टंकली आहे.

वाचने 7052
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

त्यानंतर नानल ने तिला १० जानेवारीला संभाजी बागेजवळ भेटण्यास बोलावले होते. त्यावेळी त्याने तिचा विनयभंग केला.
गेली कशाला ही मठ्ठ मुलगी? ते पण एकटी ? आयटमंच प्रकार आहे .. आणि संभाजी बागेत काय सामसुम होती काय ? :) मी तर कोणत्या मुलीशी कॅम वर तिला पाहिल्याशिवाय आज्जिबात मैत्री करत नाही .. आय अ‍ॅम सो पर्टिक्युलर यु नो ? :) - विनय (सर) भंगे

In reply to by टारझन

येगजॅक्टली.. (एवढे रामायण झाल्यावर) गेली कशाला हाच विचार पैल्यांदा मनात आला. पण लिहिला नाही घाबरुन. आगीत हात घालणार्‍यांना जरा नका घालू हात म्हणून सांगावे तर "आगीने सुधारावे, आमच्यावर दोष टाकून का मोकळे होता.. " असं म्हणत राहतात. असो. अटक झाली याचा आनंद आहे.

In reply to by टारझन

अगदी बरोबर ! बागेत बोलावले होते जानेवारीत ... अटकेची बातमी आहे एप्रिलमधील. आय अ‍ॅम सो पर्टिक्युलर यु नो ? इन्डीड ... :) चुका होतात म्हणूनच अपघात होतात पण बेटर केअर दॅन रिग्रेट ....

In reply to by टारझन

मी तर कोणत्या मुलीशी कॅम वर तिला पाहिल्याशिवाय आज्जिबात मैत्री करत नाही .. आय अ‍ॅम सो पर्टिक्युलर यु नो ?
अगदी अगदी. बादवे मुलीच्या नावाने आयडी काढून मराठी संस्थळावर वावरणार्‍या पुरुषांवर काही गुन्हा दाखल होवु शकतो काय? ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

भलत्या - "सलत्या" कुणाच्याही नावाने फेक आयडी काढणे गुन्हा ठरु शकतो असं एका जाणकारांनी पूर्वीच मत सांगितलयं म्हणे. :)

In reply to by विनायक बेलापुरे

अग्गायायाया.... आआणि त्या आयडीने कविता टंकल्या तर अजून कोणती कलमे लागतात या विचाराने हळवा झालो...

अटक करण्यासाठी ठोस पुरावा हवा असेल म्हणुन पोलीसांनीच जायला सांगीतल असेल.बागेत अस काही लोंकासमोर झाल असेल हे खर वाटत नाही. पोलीसांच्या भाषेत टेकनिकल विनयभंग म्हणता येइल.

सलील भालचंद्र नानल (वय ४१ वर्षे रा. मुंबई) विश्वास बसत नाही मुंबईचे लोक असं काही करतील यावर.;)

In reply to by रेवती

बावळट काय !!! नालायक आहे !!! ४० वर्षचा म्हतारा (काका लोकांची माफी) कशाला हवा होता... मुंबैत काय कमी हैत का ज्वान पोरं...(ज्यासाठी लिहिल्या गेले आहे त्याने लक्ष घालावे) अन मी म्हंतो संभाजी बागेत बोलावलं तर काय १४ जान्वारीला मुंबैला बायकोकडुन हळदी-कुंकु घ्यायला येते का ही चर्चा करायला बोलावलं असल्यासारखं गेल्ती की काय ही भवानी... -(लुटण्याचा आवा विकणारा कुंभार)

In reply to by रेवती

अगदी अगदी .... नेटवर बसतात तेच मुळात कोणी सावज मिळते का हे शोधत .. पुण्याचे लोक मात्र चालू असावेत. बाकी गावांतील सद्गुणी आणि सालस असतात. ;)

In reply to by अविनाशकुलकर्णी

शक्य आहे. बैंड स्टैण्ड , कोलाबा कॉजवे, समुद्र महाल अश्या ठिकाणी वावर असेल कदाचित त्याचा.

ती पोरगीही बावळट असावी. बावळट कसली? २००५ पासुन चालु आहे..बनेल आहे..अंगाशी आले कि विनय भंग.. नानल बावळट आहे म्हणा तर

In reply to by अविनाशकुलकर्णी

शक्यता नाकारता येत नाही. शेवटी उर्मी काय .. प्रत्येकालाच असते. . नाही का ? :) पोरी अंगाशी आल्यावर कशा रंग बदलतात ह्याच्या कथा खुप ऐकल्या - पाहिल्या आहेत. जाणकारांनी कथारुपी प्रकाश टाकावा :) त्या दोघांचे केलेले समुपदेशन हा कॉमेडी प्रकार वाटला :) पोरीचं नाव कळाल्यास उत्तम होईल :) खि खि खि

In reply to by अविनाशकुलकर्णी

असेल सुद्धा .... कारण संपूर्ण माहिती बातमीत दिसत नाही आहे. वाचणारयाने बिटवीन द लाइन्स अर्थ काढावा. २० वर्षाच्याने जसे जपून रहावे तसेच ४० वर्शाच्याने ही जपून रहावे . हा मेसेज पोचल्याचा आनंद झाला. :)

In reply to by अविनाशकुलकर्णी

बाकी चुकुन तिच्या प्रोफाईल ची लिंक भेटल्यावर खालील प्रतिसाद येऊ शकतात १. व्वा ! विकांताचा मेणु फिक्स झाला. २. बादलीभर लाळ गळाली. ३. ए कोणीतरी लाळेरं द्या रे .. ४. मी लिंक क्लिक केलीच नाही , मी प्रोफाईल पाहिलीच नाही .. ५. टार्‍या .. अरे किती जीव घेशील लेका ? काही अनपेक्षित पण शक्य असणार्‍या प्रतिक्रीया १. फोटु असा ब्लर का आहे ? फोटु आवडला नाही. २. अंडे न घालता करता येईल काय ? ३. व्हेज लोकांनी काय करावे ? ४. उपवासाला चालते काय? ५. इकडे अमेरिकेत कुठे मिळते ? ( इथे गळफास घेतल्या आहे =)) ) - संभवामी युगे युगे

In reply to by टारझन

जबरदस्त प्रतिसाद!!! :) बाकी ही मुलगी मेडिकलच्या तिसर्‍या वर्षाला आहे? तिच्या भावी पेशंटसना सहानुभूती!!!!

दिसते तसे नसते म्हणून सगळे जग फसते, ही म्हण सहजच आठवली. वर चाळीशीच्या लोकांना कुणीतरी 'म्हातारा' म्हणून संबोधले आहे, त्याची गंमत वाटली. उपाध्या बदललेल्या दिसतात आजच्या काळात, म्हणजे १० वर्षांनी अलिकडे आल्या असाव्यात. वय ६० - थेरडा वय ५० - ज्येष्ठ नागरिक वय ४० - म्हातारा वय ३० - प्रौढ वय २० - गृहस्थ वय १५ - तरुण वय १० - सज्ञान वय ५ - टीन

In reply to by योगप्रभू

योग प्रभुंची म्हण मला ही आठवली :) इथे सगळे जण परिस्थिती माहित नसतांना केवळ एकांगी माहितीच्या जोरावर ( आणि तीच खरी आहे असे मानुन) सदर पुरुषावर बोटसुख घेत सुटले आहेत. म्हणुनंच युयुस्तुंसारख्या जाणकार समाजसुधारकांना पुरुषमुक्ती संघटणा उघडावी लागलीये . माझा इथे युयुस्तुंना पाठिंबा असेल . लवकरात लवकर आरोपी आणि आरोप करणारीचा खोलवर तपास करुन न्यायालयासमोर खरे पुरावे सादर करावेत आणि त्याचे अपडेट्स धागाप्रवर्तकाने इथे द्यावेत , जेणे करुन सर्वांच्या आत्म्याला शांता मिळेल . - (एव्हरीथिंग) नोजप्रभु

नेटवर अशी मैत्री करणारे गळ टाकणारेच असतात तेव्हा फोन नंबर वगैरे कशाला द्यायचा? आणि मुख्य म्हणजे कोण माणूस, काय आहे, कसा आहे हे माहिती नसताना भेटायला जाणे हि तर मूर्खपणाची हद्दच झाली. चॅटींग करणे ठीक एक वेळ पण प्रत्यक्ष भेटायला जाणे तेसुद्धा एकटे? शाळा, कालेजात एवढे जिवंत लोक असताना वर्चुअलची काय गरज? बाकी टार्‍या नेहमीप्रमाणे पांचट ः) त्याची ही उर्मी काही जात नाही.;)

In reply to by शिल्पा ब

>>>>>>>आणि मुख्य म्हणजे कोण माणूस, काय आहे, कसा आहे हे माहिती नसताना भेटायला जाणे हि तर मूर्खपणाची हद्दच झाली. चॅटींग करणे ठीक एक वेळ पण प्रत्यक्ष भेटायला जाणे तेसुद्धा एकटे? खरय. >>>>>नेटवर अशी मैत्री करणारे गळ टाकणारेच असतात तेव्हा फोन नंबर वगैरे कशाला द्यायचा? हेही खरय.

In reply to by विलासराव

विलासराव. तुमचा पहिला लेख वाचुन माझ्या मनात आलेला असाच काहीसा विचार नंतर बदलला. :) तुम्ही पण उपास सोडा की राव.

In reply to by गणपा

(किंवा, 'याचे श्रेय तुम्हालाच!' कसे घ्यायचे ते तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून. ;)) तुम्ही माझ्या बोटांतून तो प्रतिसाद खेचून घेऊन टंकवलात. ;)

चिल!