Skip to main content

विश्वचषक २०११ भारत वि. पाक दुसरे सेमिफायनल

लेखक प्रशांत यांनी बुधवार, 30/03/2011 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
भारत वि. पाक हा सामना बघण्याची उत्सुकता सर्वांना असते त्यात आजचा सामना म्हणजे विश्वचषक २०११ चे दुसरे सेमिफायनल त्यामुळे प्रत्येकाने सामना बघण्यासाठी विषेश तयारी केली असेलच.. आपल्या पंतप्रधानांनी तर हा सामना बघण्यासाठी फारच विषेश तयारी करत त्याच्या खास......... आमंत्रण दिलेले आहे.. तर आजचा सामना बघ्याण्यासाठी तुम्ही काय काय आणि कशी तयारी केली... सामना चालु झाल्यानंतर सामन्याचे धावते वर्णन आपण आपल्या मिपाच्या खास शैलित करुच..

वाचने 68555
प्रतिक्रिया 300

प्रतिक्रिया

In reply to by सखी

आत्ता बाद होईल हो तो. त्याचे काय टेन्शन नाय. फक्त कोणत्या क्षणी बाद होईल ते पाहात राहू या.

जिंकण्याचा चान्स ७०% आहेत... त्या नेहराचे १० ओव्हर पुर्ण करा नाहितर शेवटि तो घाण करतो.

आता एकच राहिला म्हणावा तसा आफ्रिदी त्याला गुंडाळला कि ममं वर्ल्डकप प्रीत्यर्थ इति म्हणायला मोकळे

साला रज्जाक गेला ना की आपण विजयाच्या जवळ पोहचलोच समजा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रज्जाक पूर्वीसारखा राहिला नाही हो साहेब पूर्वी तो आला कि स्क्रीन पूर्ण लाल दाखवायचे सगळ्या देशांना धसका दिला होता पण आफ्रिदीचा काय नेम नाय साला सुटला तर वळूसारखा आवरणे मुश्कील

In reply to by इरसाल

रज्जाकही पूर्वीसारखा नाही आणि आफ्रिदीही आज चालणार नाही. दोघांच्याही विकेटा काढणे गरजेचे. कधी पडणार विकेट ?

काय नुसती गडाबड करतांय रे मुलांनो? जरा पाकिस्तानचा स्कोअर सांगा ना! (भारताचा कळला वर...)

गेला रे ssssssssssssssssss साहेब बोललो होतो न

रज्जाक गेला साला.आता आफ्रिदी राहीला. म्याच जिंकतो आपण.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लगेच पाठवला पाहीजे. मिसबाहला खेळ म्हणावं पाहीजे तेवढं ३९ बॉल मध्ये १६ धावा काढल्यात.

In reply to by इरसाल

यापुढे तुमच्या प्रत्येक धाग्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद आमच्याकडून!! :)

मिस्बाह ला पेटी पोचली वाटत त्याच खेळणं सपशेल खोट वाटतंय एकदाही तो रन काढण्याचा प्रयत्न करताना दिसलेला नाहीये

सखी आणि यशोधरा ची नजर काढावी लागेल त्यांचा म्हणणं खरं ठरतेय.त्यांना दृष्ट न लागो दोघींना पार्टी काय पायजेल बोला ................................

In reply to by इरसाल

सखी आणि यशोधरा ची नजर काढावी लागेल त्यांचा म्हणणं खरं ठरतेय.त्यांना दृष्ट न लागो आफ्रिदीच्या मुसक्या बांधा बरं लवकर. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओके चार मुसक्या फॉर आफ्रिदी टु गो :)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ओके चार मुसक्या फॉर आफ्रिदी टु गो :)

In reply to by सखी

आफ्रिदी गेला. सखी पाय इकडे करा. नमस्कार करतो. :) -दिलीप बिरुटे

In reply to by पिवळा डांबिस

कुंड्ल्यांची मांडामांड चालू आहे. ग्रह,तारे,स्थळ,काळावरुन विजय निश्चित आहे. विजयाच्या मार्गात काही विघ्न आहेत पण मीच सुट्यांमधे मुंबईला सिद्धीविनायकाला एकविस रुपये कबूल केलेले असल्यामुळे विघ्न दूर होऊन भारतीय प्रमाण वेळेला ठीक रात्री ११:०० वा. विजय निश्चित आहे. त्युसुनामीमुळे पृथ्वी काही अंशात वळली असल्यामुळे काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. च्यायला, या अंफायरांच्या उगाच रक्तदाब वाढवत आहे. :)

In reply to by सखी

धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!

अरे त्या नेहराला आवरा किती जीवतोड प्रयत्न चाललाय त्याचा वाएड बॉल टाकायचा बरं तो तीकडचापण तसाच भेटला

अहो इरसाल वरी नॉट, मिस्बाह टेस्ट मॅच असल्यासारखा खेळतोय. भज्जी आला परत, बघुया तो उडवतोय का अजुन एक दांडी

आयला हे लय भारी चाललंय संपल्या ओवर कि जा मध्ये विश्रांतीसाठी नेहरा काय २० ओवर टाकतोय काय आज ? संपत कश्या नाहीत अजून ?

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बिरुटे साहेब... दृष्ट नका लावू नेहराला... आत्ताच तर कुठे टाकतोय बरा.... हे काय... रियाझ आउट! धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!..ये धत्तड तत्तड!!