पु. लं नी पूर्वरंग या प्रवास वर्णनात थायलंडमधील जागोजागच्या बुद्धमूर्ती बघून एक टिप्पणी केलीय, की थायलंडमधल्या बुद्धदेवांना आमच्या पुण्यातल्या देवांइतकी लडिवाळ नावे ठेवलेली नाहीत. हे निरीक्षण खरोखर मजेशीर आहे. पुण्यात माती गणपती, मोदी गणपती, हत्ती गणपती, गुपचूप गणपती, भांग्या मारुती, पत्र्या मारुती, डुल्या मारुती, तांबडी जोगेश्वरी, पासोड्या विठोबा, निवडुंग्या विठोबा, खुन्या मुरलीधर अशी मजेशीर नावे आहेत. अशीच काही मजेशीर नावे गावोगावी आढळतात. नाशिकला दुतोंड्या मारुती आहे. नवशा गणपती आहे. बरं हे देवांपुरतेच मर्यादित नाही. 'डॉन ' चित्रपटात किशोरकुमारचे 'इ है बम्बई नगरिया' हे गाणे ऐकताना त्यातही काही मजेशीर उल्लेख आहेत. उदा: मुंबईत चर्चगेट भाग आहे, पण चर्चचा पत्ता नाही. पाणी नसलेला तलाव 'धोबी तलाव' म्हणून ओळखतात. कोल्हापुरात प्रवेशताना एक 'कावळा नाका' आहे. सातार्यात पूर्वी विठ्ठल मंदिरासमोर सार्वजनिक नळ होता. त्या स्टॉपला सातारकर अगदी आतापर्यंत 'विठोबाचा नळ' म्हणत. ऐकणार्याला हसू येई. सातार्यात एक 'वाघाची नळी' म्हणूनही भाग आहे.
तर मिपाकरांना माझी नम्र विनंती. असेच गावोगावचे (अर्थातच आपापल्या) आणखी गंमतीशीर भाग सांगणार का? शक्य झाल्यास ते नाव कसे पडले, हेही सांगावे. (उदा : पुण्यात 'गुपचूप गणपती' आहे. म्हणजे हा गणपती गुपचूप बसलेला आहे म्हणून नाही, तर तो ज्या वाड्यात आहे त्याच्या मालकांचे नाव श्री. गुपचूप म्हणून.)
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझ्या गावात १ एरीयाला
माझ्या गावात १ एरीयाला धोंडिपुरा म्ह्नतात
का ते नाही माहित.
ह्याखाली ramjya ह्या आयडीने जर उपप्रतिसाद दिल्यास तो फाट्यावर मारन्यात यावा ....
ठाण्यातील घोडबंदर नाव कसे पडले असेल?
ठाण्यातील घोडबंदर भागातून पूर्वी परदेशांशी घोड्यांचा व्यापार होत असेल म्हणून तसे नाव पडले असावे का?
+१
In reply to ठाण्यातील घोडबंदर नाव कसे पडले असेल? by योगप्रभू
तसेच गुजरातेतल्या पोरबंदर भागातुन पुरवी परदेशांशी पोरांचा व्यापार होत असेल म्हणुन तसे नाव पडले असावे का ?
- योगाप्रभु
योगा से कुंगफु सिखुंगा ,,,
किंवा
In reply to +१ by टारझन
लहान माकडांचा...
गु खाऊ राजुरी थोडी मोठी कथा
थोडी मोठी कथा आहे त्या बाबत सांगेल लव्करच.....
कोल्हापुरात 'पापाची टीकटी ,
कोल्हापुरात 'पापाची टीकटी , आणि ' मिरजकर टीकटी' अश्या दोन टीकट्या आहेत.
आता 'टीकटी ' म्हणजे काय माहित नाही, त्यामुळे 'पापा/ पाप वा मिरजकर ही माहित नाहीत.
टीकटी नाही ....
In reply to कोल्हापुरात 'पापाची टीकटी , by स्पंदना
ते टीकटी असे नसून "तिकटी " असे आहे...
"तिकटी म्हणजे तीन रस्ते एकत्र येण्याचे ठिकाण..
हि माहीती कोल्हापूरच्या मित्राने दिलेली आहे ...
+१
In reply to टीकटी नाही .... by नाखु
पापाची तिकटी हे कदाचित 'पापा परदेशी' या कोल्हापुरातल्या माणसाच्य नावावरून आले असावे.
अवांतर
In reply to +१ by मिहिर
या 'पापा परदेशी'बद्दल माहिती मिळू शकेल काय?
जास्त माहित नाही
In reply to अवांतर by पंगा
पण आम्हाला शाहू महाराजांचा एक धडा होता, त्यात उल्लेख होता या नावाचा. कदाचित इंद्रराज पवारांना माहित असेल.
अच्छा! तिकटी होय? बघा ,
In reply to टीकटी नाही .... by नाखु
अच्छा! तिकटी होय?
बघा , लहाणपणा पासुन आम्ही 'टीकटी'च ऐकत अन म्हनत आलो.
आपण फारसा विचार न करता किती गोष्टी तश्याच वापरत असतो नाही?
मुळात तिकटी हा तीकाटणे या
In reply to टीकटी नाही .... by नाखु
मुळात तिकटी हा तीकाटणे या शब्दाचा अपभ्रंश आहे. तीन रस्ते एकत्र येण्याचे ठिकाण हे अगदी बरोबर आहे
तिकटी - तीकाटणे
In reply to मुळात तिकटी हा तीकाटणे या by कहर
तिकटी - तीकाटणे यांच्यातील संबंध नाही कळला. अधिक माहिती द्याल का?
तीकाटणे - शेतीच्या कामात बहुधा टोकणणी च्या आधी वापरतात असे वाटते. चू.भू.द्या.घ्या.
तसच उस्माना बाद मध्ये
तसच उस्माना बाद मध्ये 'बोंबल्या मारुती ' आहे.
किंवंदता अशी आहे की एकदा या गावात चोर शिरले. वेशीत मारुतीच्या देवळाजवळुन हे चोर गावात शिरताना पाहुन हा मारुती ठो ठो बोंबलायला लागला म्हणुन याचे नाव 'बोम्बल्या मारुती'
ही खरी माहिती आहे.
मिपाच्या मुखपृष्ठावर असा एक
In reply to तसच उस्माना बाद मध्ये by स्पंदना
मिपाच्या मुखपृष्ठावर असा एक डू-आयडींना बघुन बोंबलणारा मारुती स्थापन का करत नाही नीलकांत ?
सातार्यात गोरा राम, काळा
सातार्यात गोरा राम, काळा राम, शहा राम, कासार देवी अशी देवळं आहेत .
फुटकं तळं, मंगळवार तळं आहे.
रामाचा गोट्/गोठ , चिमणपुरा असे भाग आहेत.
गोरा राम, काळा राम
In reply to सातार्यात गोरा राम, काळा by पुष्करिणी
ही मंडळी मुंबईत गिरगावातसुद्धा आहेत.
(नाशकातसुद्धा असावीत काय?)
सातार्यात चिमणपुरा आहे तो
सातार्यात चिमणपुरा आहे तो भाग चिमाजीअप्पा च्या मुळे ओळखला जातो
व्यंकटपुरा आहे. कारंडबी नाका आहे.
सातार्यात चाम्दणी चौक आहे. तेथून सात आठ रस्ते सुरू होतात.
"म्हाद्या" नावाची एक शेंगदाण्याची भाजी सातारा भागात घरोघरी केली जाते.
"सुशीला " नावाचा एक ओल्या चुरमुर्याच्या पोह्यांचा प्रकार ऐकीवात आहे
>>>"म्हाद्या" नावाची एक
In reply to सातार्यात चिमणपुरा आहे तो by विजुभाऊ
>>>"म्हाद्या" नावाची एक शेंगदाण्याची भाजी सातारा भागात घरोघरी केली जाते.
आयला विजुभाउ.. कुठं फेडाल ही पापं.. आम्ही इकडे मॅगीवर आणि तुम्ही म्हाद्याचं नाव काढा...
पटकी येवो तुमाला तेजायला..
रेसिपीच घ्या की
In reply to सातार्यात चिमणपुरा आहे तो by विजुभाऊ
रेसिपीच घ्या की मनावर जरा आणि टाका … म्हणजे आम्हालापण 'म्हाद्या'ला खाता येईल :P
दुध,तूप इ.इ.
कराड तालुक्यात दह्यारी, ताकारी, लोणारी, तुपारी अशी गांवे जवळजवळ वसलेली आहेत. पैकी मी फक्त ताकारीच पाह्यलंय, तेही बसमधून. बाकी, इथं जवळच नसलं तरी, दुधारी नावांचंही गांवही आहेच.
सांगली जिल्ह्यातलं तासगांव परशुरामभाऊ पटवर्धन यांच्या नावावरून भाऊंचं तासगांव म्हणून ओळखलं जातं आणि सातारा जिल्ह्यातलं 'भिकार तासगांव' म्हणून. आता या 'भिकार' नावामागचा इतिहास काही मला ठाऊक नाही ब्वॉ..
मस्तं
In reply to दुध,तूप इ.इ. by मस्त कलंदर
याच प्रकारे नाना फडणवीसाचा मोठा वाडा असलेलं मेणवली गाव नानाची मेणवली म्हणून ओळखले जाते. याच परशुरामभाऊ पटवर्धनांचे नाव पुण्यातल्या शिप्र मंडळींच्या कॉलेजला दिले आहे. सर परशुरामभाऊ कॉलेज. अर्थात SP College.
आमच्या ऐकीव माहिती
आमच्या ऐकीव माहिती नुसार,(खात्री नाही)
येरवडा :
आधी ह्या भागाला हे नाव नसावे. तिथे वेड्यांचे इस्पितळ झाले अन मग ती लोक वेड्यांना शोधायला लागली.
ये रे वेड्या ,ये रे वेड्या करू लागली अन त्यातूनच येरवडा असे नाव पडले असावे. :)
हडपसर : हडपसर ला आधि कबरस्तान असावे.त्यातूनच हाडे पसर्-हडपसर असे नाव आले असे ऐकून आहे.
बा़की काही गावांची नावे अफलातून असतात.
नव्या मुंबैतच,
करावे,दारावे,पावणे,दिवा असल्या नावांचे भाग आहेत.
हल्ली तर म्हणे पुण्यातच "नांदेड सिटि" होउ घातली आहे.
मागे उज्जैन जवळ एका गावाचे नाव आढळले "बनबना गांव"
तिथल्या लोकांना त्या नावा मागचे कारण विचारले तर "ऐसेही गांव बस गया सो उसको सब लोग बनबना गांव करके पुकारते है."
तोरणा किल्याकडून रायगडला जाताना कोकणात उतरावे लागते. तेंव्हा वाटेत "बोचेघोळ नाळ" लागते.
ह्या नाळेतून पायी उतरता येत नाही.पार्श्वभाग टेकवतच उतरावे लागते,त्यातूनच हे नाव आले.;)
अभिज्ञ.
मुंबईत पिला हाउस नावाचा
मुंबईत पिला हाउस नावाचा (कु)प्रसिद्ध भाग आहे. (सत्या मधला संवाद आठवा, पिला हाउस मे शब्बो को ट्राय किया.. किचड मे ही कमल खिलते है...) तिकडली कामं पिवळेपणाशी संबंध सांगून असली तरी त्याच्या नावाचा पिवळेपणाशी काहीही संबंध नाही. तो प्ले हाउस चा अपभ्रंश आहे.
गिरगावात दोन हत्ती नावाची जागा आहे म्हणे. बैलबाजार, साकीनाका, फिल्टर पाडा ही अशी काही नावे. बाकी मुंबईतील अनेक भाग विचित्र नावांचे आहेत. सवय झाली म्हणून विचित्र वाटत नाहीत इतकेच. दादरला कुठल्या जिन्यामुळे हे नाव पडले ते एक मुंबादेवी जाणे. विक्रोळी, भांडूप, परळ, शिवडी, माटुंगा, माहीम, मालाड, कुर्ला, चेंबूर या नावांच्या व्युत्पत्तीचा शोध मला तरी लागत नाही (हे माझे अज्ञान असेल ).
चिंचपोकळी ला आधी चिंचेचे झाड होते काय? लालबाग ला कुठली बाग होती, आणि लाल का? गिरगाव मधल्या गिर चा काय अर्थ? चिराबाजार ला नक्की काय विकत मिळायचे म्हणून चिराबाजार म्हणतात? भायखळा येथे खळा असायला कधी शेत तरी होते का?
पश्चिम लायनीवर वांद्रे आणि खार ही जनावरांशी जवळीक साधणारी गावे आहेत, तशीच पुढे कांदिवली आणि बोरीवली अशी खाण्याशी नाते सांगणारी गावे आहेत. दहिसर ची फोड दही आणि सर अशी केली तरीही अर्थ नाही लागत.
असो, ऋषीचे कुळ, नदीचे मूळ या यादीत गावांच्या नावाची भर टाकायला हरकत नसावी.
गिरगाव
In reply to मुंबईत पिला हाउस नावाचा by विश्वनाथ मेहेंदळे
गिरगावचं खरं नाव 'गिरणगाव' होतं, असं ऐकलंय. मिल्स/ मिल कामगारांच्या चाळींमुळे हे नाव पडलं असावं.. 'खार'हे नाव खारजमीनीवरुन आल्याचं ऐकलंय..
गिरगाव्-गिरणगाव
In reply to गिरगाव by चिगो
नाही. गिरगाव वेगळे नि गिरणगाव वेगळे.
गिरणगाव म्हणजे लालबाग-परळ भाग; जेथे पूर्वी कापडाच्या गिरण्या होत्या.
गिरगाव म्हणजे चर्नी रोड स्थानकाच्या जवळील भाग.
ओक्के..
In reply to गिरगाव्-गिरणगाव by सुनील
धन्यवाद..
बोरीवली जवळील मागठाणे
In reply to मुंबईत पिला हाउस नावाचा by विश्वनाथ मेहेंदळे
बोरीवली जवळील मागठाणे - हे पूर्वीचे 'मंगलस्थान'. कान्हेरी बौद्ध लेणी क्र. ८१ शिलालेखावर याचा उल्लेख आहे.
बोरीवली जवळील मागठाणे
In reply to मुंबईत पिला हाउस नावाचा by विश्वनाथ मेहेंदळे
बोरीवली जवळील मागठाणे - हे पूर्वीचे 'मंगलस्थान'. कान्हेरी बौद्ध लेणी क्र. ८१ शिलालेखावर याचा उल्लेख आहे.
थोडे काहितरि वेगळे
:)
मुंबैतील
सँडहर्स्ट रोडला संडास रोड म्हणणारे मुंबैकर याचि देही याचि डोळा पाहिलेले आहेत.
सिंगापूर - पासपोर्ट आणि विसा शिवाय
कोणाला सिंगापूर ला जायचं असेल ते पण पासपोर्ट आणि विसा शिवाय तर पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात जाता येईल.
विशेष माहिती: येथे येष्टी बस नि पण जात येतं.
अधिक माहितीसाठी https://villageinfo.in/maharashtra/pune/purandhar/singapur.html
रेड्याची टक्कर नावाची जागा
रेड्याची टक्कर नावाची जागा आहे कोल्हापुरात.
आन्खि एक विशेष म्हन्जे तलवार चौक. हा धनाजी जाधवांच्या पराक्रमाच्या स्मरणार्थ उभारला.
पुणे जिल्ह्यात चोराची आळंदी नावाचे (कु)प्रसिध्द गाव आहे(होते म्हनावे लागेल कदचित. नाव बहुधा बदलले असावे.).
कोल्हपुरातच, मी रंकाळा
कोल्हपुरातच, मी रंकाळा तलावाच्या कडेने 'देवकर पाणंद' ( हे पण एका भागाचे नांव) च्या दिशेने जाताना अगदी महानगरपालिकेने बसवलेली "संडास चौक" अशी पाटी वाचली होती.
मि.पा. वरच्या कोल्हपुरकरांकडुन या चौकाचा इतिहास कळेल का ?
औरन्गाबाद विषयी थोदेसे
१. भद्रा मारुति
२.लोता कारन्जा
३.चौपाति
४.बाबा
विदर्भातली मंडळी कुठे आहेत?
विदर्भातली मंडळी कुठे आहेत? या लौकर...
अमरावती: हे एक चमत्कारिक आणि सुरस नावांनी भरलेले शहर आहे.
>> मालटेकडी: (अगदी हाच अर्थ घेतला तरी १००% खरा आहे.) इथून अमरावती शहराचे विहंगम दृश्य दिसते. अंधार पडल्यावर इथून संपूर्ण अमरावतीत चालणारा लोडशेडींगचा खेळ पाहायला मजा यायची.
>> फेजरपुरा, नमुना कॉलनी, काँग्रेस नगर, बिच्छू टेकडी, चपरासीपुरा, इत्यादी. अजुन आहेत आठवत नाहीत.
अमरावतीकर, जर्शीक हेल्प कराना राजेहो.
आलो ना भौ
In reply to विदर्भातली मंडळी कुठे आहेत? by संदीप डांगे
आलो ना भौ, घाई काह्याले करता...
गेल्या वर्षी मी ११ वर्षांनी मालटेकडीवर गेलो होते. अधिकृत नाव शिवटेकडी आहे. माथ्यावर मोकळी जागा बरीच आहे. मध्यभागी असलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा एकदम भव्य आहे. दर वर्षी शिवजयंतीला शिवसैनिकांचे शिस्तबद्ध संचलन असते.
एका कोपर्यात दूरदर्शनचे केंद्र आहे. हा फोटो सुर्योदयापूर्वी काढला आहे.
फ्रेजरपुरा हे नाव पोलिस स्टेशनला जोडले गेले आहे. नमुना या भागाला नमुनाच म्हणतात. कॉलनी जोडत नाही. तिथे होलसेलमध्ये साड्या, चादरी वगैरे मिळतात. काँग्रेसनगरमध्ये बर्याच राजकीय नेत्यांचे बंगले आहेत (यात माजी राष्ट्रपतीही समाविष्ट आहेत) म्हणून नाव काँग्रेसनगर पडले.
कॅम्प एरियात आमचे घर जिथे होते (गेल्या वर्षीच विकले) तिथे रस्त्याच्या पलिकडल्या एरियाला (झोपडपट्टीच) बिच्छू टेकडी म्हणतात. थोडाफार उंचसखल भाग आहे. चपराशीपुराही जवळच आहे. कॅम्प एरियाच्या एका कोपर्यातील झोपडपट्टीचे नाव चिलम छावणी असे पण आहे. ते नाव प्रत्यक्षात चिमल शाह नावाच्या संतांवरून पडले असे ऐकले आहे. शहावणी चे छावणी झाले.
आणखी काही नावे म्हणजे फरशी प्लॉट, पटवीपुरा, दहीसाथ, सक्करसाथ. बुधवारा, इतवारा (जुन्या शहरातील बाजारपेठांचे भाग).
हांगाशी.... आत्ता बेस झालं का
In reply to आलो ना भौ by श्रीरंग_जोशी
हांगाशी.... आत्ता बेस झालं का नाइ.
ती चिलम छावणीच आठवत नव्हते.
नागपुर..
In reply to आलो ना भौ by श्रीरंग_जोशी
नागपुर : नागासारखी वळणे घेत जाणार्या (कोणे एके काळच्या) नदीकाठी बसलेले गाव, म्हणून नागपुर..
महाल : पुर्वी भोसले राजांच्या महालासाठी प्रसिद्ध होता, आता गडकरींच्या वाड्यासाठी.
'काँग्रेसनगर' नागपुरातही आहे. तसेच श्री. जमनालाल बजाज ह्यांच्या नावावरुन 'बजाजनगर'
लोकमत चौक : 'लोकमत' वृत्तपत्राचे ऑफीस इथेच. पुर्वी नागपुरमधली सगळ्यात उंच बिल्डींग, अजुनही असेल कदाचित..
पंचशील चौक : ह्याच नावाच्या टॉकीजवरुन
मोमिनपुरा : बव्हांश मुस्लिम वस्ती. 'छोटा पाकीस्तान' म्हणूनपण संभावना होते कधी-कधी..
इतवारा, कळमना, गांधीबाग : मार्केट एरीया..
गंगा-जमुना : रेड लाईट एरीया.. नागपुरकरांना 'गंगा-जमुना वाहू लागल्या' वगैरे ऐकवू नका. त्याचा एकच अर्थ माहीत असतो बहुतेकांना.
लोहा पुल : इंग्रजांनी बांधलेला लोखंडी रेल्वेपुल.
बाकी सदर (शहरात शिरतांना आधी सगळ्यात बाहेरचा भाग, आता भरपुर आत गेलाय.) सिताबर्डी (सिताराम नावाच्या कुण्या दिवानाच्या नावावरुन नाव पडलंय, असं ऐकलंय), जरीपटका इ. भरपुर रंजक नावं आहेत.
नागपुरात NADT (National Academy of Direct Taxes) ही Indian Revenue Servicesची ट्रेनींग अकादमी आहे, पण तिच्याबद्दल फारसं कुणाला ठाऊक नाही. तिथे जायचं असल्यास 'पागलखाना चौक चलो' असं सांगायचं, तिथून जवळच.. हा 'पागलखाना' पण 'ताजुद्दीन बाबा' या वलींमुळे जास्त प्रसिद्ध आहे. त्यांचा दर्गा आहे तिथे. त्यांच्याच नावावर 'छोटा ताजबाग' आणि 'बडा ताजबाग' हीपण ठीकाणं आहेत..
.
आजूबाजूला कुरणे असणारे गाव ते कुरणवाड .... कुरुंदवाड
चेंबूर कुर्ला
ही नावे चिंबोरी व कुर्ली या माशांवरुन आली आहेत.
खेकडे हो!!
In reply to चेंबूर कुर्ला by dadadarekar
हे मासे आहेत? गणपाला नाय तं जागूला बोलवून कोणीतरी ह्यांना हे खायला घाला रे एकदा!!
चिंबोरी= मोठे खेकडे, कुर्ल्या= (त्यामानाने) लहान खेकडे.
बाँबे
ऑकलंड जवळ बाँबे हिल्स नावाचे पहाड आहेत. पुर्वी इथे बाँबे नावाचे जहाज आले होते.
त्यामधून आलेले प्रवासी इथे स्थायीक झाले होते.
हिंगोलीत तोफखाना नावाचा एरीया
हिंगोलीत तोफखाना नावाचा एरीया आहे , त्यात गोलंदाज गल्ली पण आहे .
बावनखोली नावाचा भाग आहे . येथे चिमना बाजार भरायचा (आता भरतो का नाही माहीत नाही) होळी नावाचा एरीया आहे.(होळीवरचे पोर डेंजर होती) पेन्शनपुरा म्हणून पण एक एरीयाआहे . रहेमत नगरात पण लोक रहातात (आता बहुतेक त्याचे सावरकर नगर केले. )
परभणीत गोल घुमट नावाचा एरीया आहे .उघडा महादेव म्हणलं तर अॉटोवाला बरोबर नेउन सोडतो. बेलजाळी म्हणून पण महादेवाचे मंदिर आहे.
मुर्तीजापुर मध्ये टांगा चौक आहे (जिथे कधीच टांगे नसतात.
चंद्रपुर मध्ये गोल बाजार आहे , इथे नवखा माणूस गोल गोलच फिरत बसतो , बाहेर पडायचा रस्ता काही सापडत नाही.
पुण्यात हासबनीस बखळ नावाची जागा फक्त गुगल म्यापच्या सहाय्याने शोधून दाखवावी व बक्षिस घेऊन जावे .(पुणेकरांसाठी नाही हि स्किम)
हैद्राबाद ला स्याप गल्ली पाहिली.
बाकी जसे आठवेल तसे.
स्पर्श किबोर्ड वापरून
In reply to हिंगोलीत तोफखाना नावाचा एरीया by उगा काहितरीच
स्पर्श किबोर्ड वापरून अक्षरावर अर्धा चंद्र कसा काढायचा ? काना असल्यावर देता येतो . (उदा कॉल, कॉलेज ) पण एका आक्षरावर देता येत नाही (मग स्याप, वगैरे लिहावे लागते.)
कॅपिटल E वापरावे. उदा. माझा
In reply to स्पर्श किबोर्ड वापरून by उगा काहितरीच
कॅपिटल E वापरावे. उदा. माझा आयडी लिहिण्यासाठी swEps असे टंकावे.
ऑ साठी शिफ्ट ओ
In reply to कॅपिटल E वापरावे. उदा. माझा by एस
ऑ साठी शिफ्ट ओ
स्वॅप्स जमलं जमलं ! पण मी
In reply to कॅपिटल E वापरावे. उदा. माझा by एस
स्वॅप्स जमलं जमलं ! पण मी डायरेक्ट मराठी किबोर्ड वापरून टाईप करतो, त्या किबोर्ड वर कसं करायचं ?
द्या मला बक्षिस. काय आहे ते?
In reply to हिंगोलीत तोफखाना नावाचा एरीया by उगा काहितरीच
द्या मला बक्षिस. काय आहे ते?
मी पुण्याचा नाही. खात्री साठी काही मिपा सदस्यांना विचारु शकता .
खाली दिलेली लिन्कवर क्लिकावे मग तुम्ही दिलेला " हासबनीस बखळ" हा भाग गुगल मॅप वर दिसेल.
https://www.google.co.in/maps/place/%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8…
शोधुन दाखवावी म्हणजे
In reply to द्या मला बक्षिस. काय आहे ते? by प्रमोद देर्देकर
शोधुन दाखवावी म्हणजे प्रत्यक्षात तिथे जाऊन दाखवावे. (तिथे जाऊन सेल्फी वगैरे काढली तर दावा वैध ठरविण्यात येईल) सबब तुमचा दावा वैध मानता येणार नाही. तरी तुम्हाला एक उत्तेजनार्थ बक्षीस देण्याचा निर्णय विचाराधिन आहे.
बर्याचदा गावांच्या नावांमागे
बर्याचदा गावांच्या नावांमागे काहीतरी रंजक गोष्टी असतात.
मी शाळेत असताना एका व्याख्यानाला गेलो होतो तिथे वक्त्यांनी याची काही उदाहरणे दिली होती.
जसे कि सातार्याजवळ "वडाचे म्हसवे" नावाचे गाव आहे. त्यांनी या नावामागची माहिती काढायला सुरुवात केली तेव्हा कळाल कि तेथे एक खूप मोट्ठे वडाचे झाड आहे. ज्याची ब्रिटीश लोकांनी नोंद करून ठेवली होती. तेव्हापासून त्याला हे नाव पडले.
पण आता बाकी उदाहरणे आठवत नाहीत! :)
सातार्यात "५०१ पाटी" आहे तिथे म्हणे खूप आधी ५०१ साबणाच्या जाहिरातीची फार मोठ्ठी पाटी होती. तेव्हा उंच इमारती नसल्याने ती लांबूनही दिसायची त्यामुळे हे नाव पडले.
पण एका भागाला "गेंडामाळ" हे नाव कसे पडले आहे ते मात्र मला माहिती नाही! :)
खजुरी
महाराष्ट्र आणि कर्नाटक बॉर्डर वर एका गावच नाव खजुरी आहे, पण खजूर कुठे दिसले नाही बुवा. ;)
कराड मध्ये खालील गमतीची
कराड मध्ये खालील गमतीची ठिकाणे आहेत
१. मढ्या मारुती : पूर्वी या नदीकाठच्या मारुती मंदिराजवळ प्रेतांवर अंत्यसंस्कार व्हायचे.
२. पिलीग राजा (प्लेग राजा)
३. पंताचा कोट आणि कोटाखालचा गणपती
४. पायऱ्या खाली
५. वडाचा गणपती
६ अंडीवाला चौक
७. पंढरीचा मारुती
८ सात सैद (सात शहीद )
आणि हो. जखिणवाडी तर विसरलोच
In reply to कराड मध्ये खालील गमतीची by कहर
आणि हो. जखिणवाडी तर विसरलोच
बालाजी
हैद्राबाद : मोबाइल बालाजी.
व्हिसा बालाजी ना?
In reply to बालाजी by जगदिश देशमुख
व्हिसा बालाजी ना?
हो
In reply to व्हिसा बालाजी ना? by टवाळ कार्टा
हो .. त्याला व्हिसा बालाजी पण म्हणतात
पुण्यामधे कर्वेनगरला नळस्टॉप
पुण्यामधे कर्वेनगरला नळस्टॉप सारखाच एक वडाचा स्टॉप आहे. लहानपणी तिकडे मामाकडे जायचो तेव्हा पी.एम्.टी. ( आताची पी.एम.पी.एल्) चा शेवटचा स्टॉप होता तो. पी.एम्.टी. त्या वडाच्या झाडाला वळसा घालुन पुन्हा पुण्याच्या दिशेने जायची.
आता ते वडाचे झाड नाही पण वडाचा स्टॉप हे नाव कायम राहीले.
ठाण्यामध्ये 'जान्हवी स्टॉप'
ठाण्यामध्ये 'जान्हवी स्टॉप' आहे असे म्हणतात बुवा.
वंदना
In reply to ठाण्यामध्ये 'जान्हवी स्टॉप' by भिंगरी
जान्हवीचं ठौक नै पण 'वंदना' आहे!!
वंदना थिएटर आहे ना ?
In reply to वंदना by सुनील
वंदना थिएटर आहे ना ?
होय
In reply to वंदना थिएटर आहे ना ? by 'पिंक' पॅंथर्न
थेटर आहे
पनवेल मध्ये पण...लाइन आळी,
पनवेल मध्ये पण...लाइन आळी, मिरची गल्ली, बावन्न बंगला अशी ठिकाणे आहेत....आता बावन्न बंगला इथे एकच सोसायटी आहे....आणि लाइन आळी म्हणजे काय ते मला अजून समजले नाही.(मला वाटायच की तरुण मुले लाइन मारायला तिथे जातात..)
पनवेलला एक "मिडल क्लास को-ऑप
In reply to पनवेल मध्ये पण...लाइन आळी, by नितिन पाठे
पनवेलला एक "मिडल क्लास को-ऑप हौसिंग सोसायटी" सुद्धा आहे.
लेटेष्ट एग्जेम्पल-
लेटेष्ट एग्जेम्पल-
सेनापती बापट रस्त्याजवळ "दीप बंगला" चौक आहे. अगदी परवा-परवापर्यन्त या नावाचा बँगला होता तिथे. आत्ता पाडलाय. अजुन १० वर्षाने असेच काहीहीश्री किस्से सांगतील मिपाकर.
दीप बंगला पाडला??????
In reply to लेटेष्ट एग्जेम्पल- by यसवायजी
मी परवा गेले तिकडून. लक्षातच आलं नाही ट्रॅफिक मध्ये.
थोडे माझेही -
मुलुंड ह्या गाकॅचे नाव मुळून्द असे होते त्याचा इंग्रजी उच्चार रूढ होवून नाव बदलले.
दापोली ह्या शहराला 'काप ' हे दुसरे नाव आहे. ( कापात गेलो होतो ). येथे पूर्वी इंग्रजांचा "कॅम्प ' होता. त्याकॅम्प चा अपभ्रंश 'काप '.
नाशिकला एक 'कॅनडा कॉर्नर'आहे.
कॅनडा कॉर्नर
In reply to थोडे माझेही - by मनोज श्रीनिवास जोशी
:) हाहाहा आय नो!
विरोधाभासातली गंमत...
अकोल्यात (नगरमधले अकोले नाही) 'गवळीपुरा' अशा नावाचा एक भाग आहे. आता गवळी राहतात तो पुरा असा त्याचा शब्दशः अर्थ. इथे धार काढतात पण देशी दारूची! गवळीपुर्यातल्या प्रत्येक घरी मोहाची दारू बनवली जाते. आधी जिथे दुधाची धार काढली जायची तिथे आता देशी दारूची धार निघते.
आणखी एक
आमच्या कुटूंबाचे मूळ गाव - मोर्शी (जि. अमरावती).
या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे दोन नद्या आहेत नल व दमयंती. गावाच्या वेशीबाहेर या दोन नद्यांचा संगम होतो :-) .
खोपोलीपासुन जवळ सातगावला एक
खोपोलीपासुन जवळ सातगावला एक विठोबा मंदिर आहे.त्याचं नाव बोंबल्या विठोबा पडलंय.कारण त्याच्या जत्रेत सुकटाचा बाजार भरतो!सुके बोंबिल मोठ्या प्रमाणात विकले जातात म्हणून हा बोंबल्या विठोबा!!आमच्या इथली फार प्रसिध्द जत्रा आहे ही.
तुम्ही काय बोंबलता? नै म्हणजे
In reply to खोपोलीपासुन जवळ सातगावला एक by अजया
तुम्ही काय बोंबलता? नै म्हणजे नेमक्या त्याच वेळेस तिथून जात असू तर तुम्च्याच कडून बोंबील घेउ =))
"दीप बंगला" चौक
"सेनापती बापट रस्त्याजवळ "दीप बंगला" चौक आहे. अगदी परवा-परवापर्यन्त या नावाचा बँगला होता तिथे. आत्ता पाडलाय." -- प्रभातच्या 'माणूस' सिनेमातील प्रमुख नायिका शांता हुबळिकर यांच्या मालकीचा हा बंगला होता. त्यांनी आपल्या मुलाच्या प्रदीप या नावावरुन "दीप बंगला" हे नाव ठेवले होते .
मिरज येथे एका मोठ्या खड्ड्यामध्ये खेळाचे मैदान आहे . मिरजकर त्याला 'अमर खड्डा' म्हणतात . तसेच तेथिल एका मशिदीचे बांधकाम काळ्या दगडांमध्ये केले आहे , त्यामुळे नाव 'काळी मशिद' असे आहे .
प्रभातच्या 'माणूस' सिनेमातील
In reply to "दीप बंगला" चौक by सिरुसेरि
यस्सर...मी पण हेच ल्हिणार होतो, पण लिंक सापडेना....
उभादांडा
आमचया वेंगूर्ले गावात उभादांडा नावाचा एरिया आहे.समुद्राकिनारि असल्यामूले कदाचित् हे नाव पड़ले असावे.कारन समुद्रकिनारयाला इकड़े दांडी असे पन बोलतात.
मुरुडजवळ रेवदंडा आहे
In reply to उभादांडा by स्वप्निल रेडकर
मुरुडजवळ रेवदंडा आहे
गाढव नाका
भांडूप मध्ये गाढव नाका पण आहे. पूर्वी इथे गाढवांचा बाजार भरत असे ऐकले आहे . जाणकारांनी प्रकाश टाकावा :)
निपाणीत आमच्या गल्लीत सगळी
In reply to गाढव नाका by स्वप्निल रेडकर
निपाणीत आमच्या गल्लीत सगळी गोग्गोड माणसं राहतात. पूर्वी गल्लीला "ढोरांचा बाजार" म्हणायचे. (गुरुवारी गुरांचा बाजार भरायचा इथे म्हणून.) नंतर नाव बदलून "साखरवाडी" केलंय. कित्ती गोग्गोड ना?
गल्लीचं नाव साखरवाडी?
In reply to निपाणीत आमच्या गल्लीत सगळी by यसवायजी
गल्लीचं नाव साखरवाडी?
यप्पं
In reply to गल्लीचं नाव साखरवाडी? by असंका
यप्पं
अहमदनगर मध्ये भुतकरवाडी, गंज बाजार , नावाचे भाग आहेत
अहमदनगर मध्ये भुतकरवाडी, गंज बाजार , नावाचे भाग आहेत
नगरच्या बाहेर एक "भिंगार"
In reply to अहमदनगर मध्ये भुतकरवाडी, गंज बाजार , नावाचे भाग आहेत by शंतनु _०३१
नगरच्या बाहेर एक "भिंगार" नावाचा भाग आहे. नवीन एखाद्याला ऐकतांना ते "भंगार" सारखं वाटतं :)
पाथर्डी कडे जातांना एक घाट आहे - त्याचं नाव "करंजीचा घाट"
नगर कॉलेजच्या पुढे एक "कोंबडी वाल्याचा मळा" नावाचा एक भाग आहे.
विखे पाटील ईंजी. कॉलेज ज्या गावात आहे त्या गावाचं नाव - "वडगांव गुप्ता". उत्तर भारतीय बांधवांचं आडनाव असलेलं मी बघितलेलं हे एकंच गाव आहे :)
भिंगारची एक आठवण
In reply to नगरच्या बाहेर एक "भिंगार" by नाव आडनाव
भिंगार - हे तिथल्या उसाच्या रसासाठी प्रसिद्ध आहे. २००२ साली एमसीएची एक प्रवेश परिक्षा देऊन मी रापमंच्या बसने पुणे ते अकोला दिवसाचा प्रवास केला होता. तेव्हा चालक वाहकांना तिथला रस आवडतो म्हणून बस तिथे एका रसवंतीवर थांबवण्यात आली होती. या प्रकारचा माझा हा प्रथमच अनुभव होता. त्यामुळे मला अगदी मध्य प्रदेशात असल्यासारखे वाटले.
ठाणे !
ठाण्यातील तीन हात नाका, तीन पेट्रोल पंप, घोडबंदर या जागांचा उल्लेख झालाच आहे.
काही आणिक उदाहरणे. इतिहास माहीत नाही.
पाड्यांची एक भारीच मजा आहे.
पातलीपाडा
डोंगरीपाडा (ठीक आहे उंचावरचं ठिकाण असेल)
धर्माचा पाडा (हो अशी जागा आहे ठाण्यात)
कोकणीपाडा (कोकणी लोक रहात असावेत)
काजूपाडा (काजू?)
पाटोणपाडा (हे म्हणजे येऊरचा लास्ट स्टॉप)
झालंच तर...
वाघबीळ (इथे वाघ यायचा म्हणे. अजूनही येतो)
गायमुख (इथला डोंगर गाईच्या मुखासारख्या आकाराचा आहे)
ढोकाळी
कोलशेत
कोलबाड
माजीवाडा (आजीवाडा पण आहे काय?)
खोपट
पोखरण नं १, २
>>पोखरण नं १, २
In reply to ठाणे ! by वेल्लाभट
>>पोखरण नं १, २
ही जागांची नावं नाहीत. पोखरण (उपवन) तलावाकडे जाण्याचे दोन रस्ते आहेत. त्यातला पोखरण रोड नं १- कॅडबरी जंक्शनहून रेमंड मार्गे जाणारा आणि पोखरण रोड नं २- व्होल्टास, ग्लॅक्सो, ब्लू स्टारमार्गे जाणारा.
हो माहित्ये, पण रस्ते म्हणजे
In reply to >>पोखरण नं १, २ by नितिन थत्ते
हो माहित्ये, पण रस्ते म्हणजे जागाच ना :)
रोड नं.२६ अशी सुध्धा जागा आहे
In reply to >>पोखरण नं १, २ by नितिन थत्ते
रोड नं.२६ अशी सुध्धा जागा आहे जरा पुढे
.
In reply to ठाणे ! by वेल्लाभट
तलावपाळी ... म्हणजे काय ?
ठाणं हे तलावांचं शहर आहे
In reply to . by dadadarekar
ठाणं हे तलावांचं शहर आहे (होतं). आता कमी तलाव असले तरीही इतर शहरांपेक्षा अधिक आहेत. तलावपाळी म्हणजे मासुंदा तलाव परिसर. हा तलाव ठाण्याच्या मध्यवर्ती जागी असून कुठल्याही वेळी जायला एक 'हॅपनिंग' जागा आहे. इथेच दिवाळीच्या आदल्या दिवशी, दिवाळीच्या पहिल्या दिवशी, गुढीपाडव्याला, त्या आधीच्या संध्येला रोषणाई असते.
.
In reply to ठाणं हे तलावांचं शहर आहे by वेल्लाभट
ते ठाउक आहे.
पण पाळी म्हणजे काय ?