"सिंगिंग इन द रेन"
आजच बातमी ऐकली की उत्तर भारतामध्ये जोरदार पाऊस झालाय आणि मला एका पाऊस-गाण्याची आठवण झाली. गाण्याबरोबर आठवला ते गाणं ज्या चित्रपटात आहे तो चित्रपट आणि त्याचे अप्रतिम, देखणं सादरीकरण. या माझ्या एका आवडत्या हॉलिवूडपटाची - म्युझिकलची मिपाकरांना ओळख करुन द्यायचा छोटासा प्रयत्न!
१९५२ साली एका हॉलीवूड चित्रपटाचा मूकपट ते बोलपट प्रवास गमतीशीर पद्धतीने सांगणारा हा एक चित्रपट निघाला होता. जीन केली आणि स्टॅनली डोनन यांनी दिग्दर्शित केलेला आणि स्वत: जीन केली व बरोबर डेबी रेनॉल्ड्स, जीन हेगन आणि डोनाल्ड ओ'कॉनर याच्या सहज सुंदर अभिनयाने नटलेला हा चित्रपट होता, "Singing In The Rain".
नायक 'डॉन लॉकवूड' (जीन केली) मूक-चित्रपटांतील यशस्वी नायक, 'लीना लेमॉन्ट' (जीन हेगल) यशस्वी नायिका, यांचे मूक-चित्रपट तुफान यशस्वी होत असताना, या जोडीला घेऊन बोलपट निर्मिती करण्याचे ठरवले जाते कारण दरम्यान बोलपटांचे तंत्रज्ञान विकसित झालेले असते. हा बोलपट लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी त्यांच्या आधीच्या एका यशस्वी मूकचित्रपटाची कथाच घेण्याचे ठरते. पण वांदा असा असतो की लीना लेमॉन्टचा आवाज चिरका आणि बोलपटासाठी निरुपयोगी असतो. सर्वांचे तिचा आवाज त्यातल्या त्यात बरा करण्याचे निरनिराळे प्रयत्न फसतात आणि चित्रपट-निर्मिती बंद व्हायची वेळ येते.
दरम्यान डॉनला 'कॅथी सेल्डन' (डेबी रेनोल्ड्स) नावाची तरुणी भेटते. ती उत्तम गायिका, नर्तिका आणि होतकरू नटी असते पण तिला कुणी चान्स दिलेला नसतो. डॉनला कॅथीचे गुण आवडतात आणि तो लीनाच्या नकळत तिचे संवाद कॅथीच्या आवाजात डब करू लागतो. अशाप्रकारे एकत्र काम करता करता डॉन आणि कॅथी यांची जवळीक वाढते नि ते एकमेकांच्या प्रेमात पडतात.
जेव्हा दोघांनाही आपल्या एकमेकांवरच्या प्रेमाची जाणीव होते तेव्हा प्रचंड पाऊस पडत असतो पण डॉन आपला आनंद व्यक्त न करता राहूच शकत नाही आणि हे गाणं म्हणतो....
http://www.youtube.com/watch?v=D1ZYhVpdXbQ
आर्थर फ्रीडने लिहिलेल्या या गाण्याला नासिओ हर्ब ब्राऊन याने संगीत दिलेलं आहे. यातला जीन केलीचा पर्फोर्मंस वादातीत अप्रतिम आहे. या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी केली ४ डिग्री तापात शुटींग करत होता असं सांगतात.
तरीही प्रेमात पडलेल्या आणि आपण जिच्या प्रेमात आहोत ती ही आपल्या प्रेमात तितकीच पडलेली आहे हे जाणणार्या प्रेमवीराचा अभिनय त्याने भन्नाटच केला आहे, त्याबद्दल 'जीन केली'ला सलाम....!
"सिंगिंग इन द रेन" या चित्रपटात वर सांगितल्या प्रमाणे मूकपट ते बोलपट अशी कथावस्तू आहे. मूकपटात काम करणार्यांना बोली भाषेचे शिक्षण देण्यासाठी शब्दफेक तंत्रज्ञाची मदत घेतली जाते.
मुळातच भाषेवर चांगले प्रभुत्व असलेला डॉन आणि त्याच्यासह कॉस्मो (डोनाल्ड ओ'कॉनर, हा यात मूकपटाला पार्श्वसंगीत देणारा संगीतकार आणि डॉनचा बालमित्र आहे) त्या शिक्षकाचीच शिकवणी घेतात......
या प्रसंगी त्यांनी गायलेलं हे गाणं आणि त्यातले जीन नि डोनाल्डचे नृत्य एकदम झकास झालेले आहे.....
जरूर आनंद घ्या.....
http://www.youtube.com/watch?v=TKlub5vB9z8&feature=related
हे गाणं केवळ 'डोनाल्ड ओ'कॉनर'चंच.....
बोलपटाचे चित्रीकरण बंद पडायच्या शक्यतेने डिप्रेस झालेल्या डॉनला (जीन केली) त्याचा मित्र कॉस्मो (डोनाल्ड ओ'कॉनर) या अवस्थेतून बाहेर काढायचा प्रयत्न करतो तेव्हाचं हे गाणं आहे.
हे गाणं ऐकताना आणि विशेषत: बघताना न हसणारा माणूस उगाच मनुष्य शरीरात वावरतोय असं मानायला हरकत नाही.....
खच्चून मजा.....!
http://www.youtube.com/watch?v=2oWk4ZiuSHE&feature=related
आता 'डेबी रेनॉल्ड्स'चं एकही गाणं न देणं हा तिच्यावर अन्याय होईल..... जीन इतकीच ती या चित्रपटाचा प्राण आहे.....
जीन (डॉन), डोनाल्ड (कॉस्मो) यांच्या बरोबर इथे डेबी (कॅथी) कसलं भन्नाट नृत्य करते.... ती कुठेही कमी पडत नाही आणि अख्खं गाणं एका वेगळ्याच उंचीवर येऊन पोहोचतं...
तेव्हा हे केवळ 'डेबी रेनोल्ड्स' साठी..... Enjoy!!!
http://www.youtube.com/watch?v=bU2zoQ8gV-s&feature=related
या चित्रपटात पुढे कॅथीच्या आवाजातल्या संवादाचे नि गाण्यांचे श्रेय लाटण्याचा लीना लेमॉन्ट आपल्या करारपत्राच्या साहाय्याने प्रयत्न करते. मग जीन नि कॉस्मो त्या चित्रपटाच्या प्रॉड्युसरबरोबर तिचा हा डाव उधळून कॅथीचं श्रेय तिच्याच झोळीत टाकतात आणि चित्रपटाचा सुखांत होतो.
हा चित्रपट खूप लोकप्रिय झाला आणि या चित्रपटामुळे जीन केलीतील नट, दिग्दर्शक, गायक आणि कोरीओग्राफर यांच्यावर शिक्कामोर्तब झालं. "सिंगिंग इन द रेन" जीनच्या पुढच्या अनेक उत्कृष्ट म्युझिकल्सची नांदी ठरला.
वाचने
3558
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
प्रतिक्रिया
व्वॉव! खर सांगु मी वरच काहिच
एकदम मस्त ... युट्युब आता
वा..
कॉणे एके काळी टी.एन.टी. नेटवर्क वर प्रथम पाहीला होता
टीएनटी चॅनेल...!
In reply to टीएनटी चॅनेल...! by इन्द्र्राज पवार
१००% सहमत
In reply to १००% सहमत by प्रास
अॅन अमेरिकन इन पॅरिस...!!
In reply to अॅन अमेरिकन इन पॅरिस...!! by इन्द्र्राज पवार
इन्द्रा, पांढर्यावर काळं
प्रास
In reply to प्रास by चिंतामणी
येस्सर!