✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

क्षणभर विश्रांती

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Tue, 01/11/2011 - 12:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8225 वाचन

💬 प्रतिसाद (30)

प्रतिक्रिया

छान परिक्षण, पिच्चर बघायला

नरेशकुमार
Tue, 01/11/2011 - 12:50 नवीन
छान परिक्षण, पिच्चर बघायला पाहीजे. ह्या weekend लाच जातो.
  • Log in or register to post comments

बघितला.. ठीक आहे , सचित पाटील

स्पा
Tue, 01/11/2011 - 12:51 नवीन
बघितला.. ठीक आहे , सचित पाटील सोडला तर एकही थोबाड बघण्यासारख नव्हतं.. वर सिद्धार्थ जाधव आणि मनवा नाईक हे combination म्हणजे अत्याचार होता.... त्याला हिरो म्हणून का घेतात हा प्रश्नच आहे बाकी चित्रपटच लुक खूप फ्रेश आहे माझ्यातर्फे २/५
  • Log in or register to post comments

+१ पण सचित पाटील काय हो

गवि
Tue, 01/11/2011 - 12:56 नवीन
+१ पण सचित पाटील काय हो बघण्यासारखा वाटला? त्यापेक्षा ती कोण कदम मला वाटतं, ती छान आहे. सावळीशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

>>ती छान आहे. सावळीशी. ती

सूड
Tue, 01/11/2011 - 17:07 नवीन
>>ती छान आहे. सावळीशी. ती पूजा सावंत .....मटा ची श्रावण क्वीन होती बव्हतेक !! आणि अप्सराला विसरलात की काय ?? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

त्याचं असं झालं..

गवि
Tue, 01/11/2011 - 17:32 नवीन
की मी हा सिनेमा पहात असताना मध्यंतर झालं आणि दिसलं की हे सर्व हिरो आणि हिरविणी आमच्या पुढच्याच रांगेत शो ला येऊन बसले आहेत. मग त्यांनी आमच्याशी संवाद केला. कसा वाटतोय सिनेमा, आमचा पहिलाच प्रयत्न आहे वगैरे म्हणून सर्वांच्या शुभेच्छा घेतल्या. तो जो मेडिकल स्टोअरमधला मुलगा दाखवलाय तो सर्वांच्या वतीने भाषण करत होता. त्यानंतर सर्वांनी प्रेक्षकांसोबत गप्पा, फोटो इ इ केले. तेव्हा दुर्दैवाने मला असे लक्षात आले की त्या अप्सरेचा लूक अत्यंत सामान्य आहे. तरुण असूनही काही एजिंग लाईन्स असाव्यात तसा टच अप केलेला चेहरा दिसत होता. एकूण मत अगदी वाईट झालं (लुक वाईज) बाकी ती सावळी मुलगी खूपच उत्साही, हसरी आणि स्मार्ट दिसत होती. सुंदर तर होतीच. म्हणून ती जास्त आवडली. बुर्जी पाववाल्याचे पात्र (ध्यान) जे काही घेतले आहे त्याच्याशी मनवा नाईकचं जुळलेलं दाखवणे म्हणजे एकास एक जोड्या जुळवा या प्रश्नात प्रत्येक जोडी तिथल्या तिथ्थे अलिबागेत उपलब्ध नगांतूनच जुळली पाहिजे आणि कोणीही पात्र जोडीअभावी "वाया" जाता कामा नये. अशा हट्टाचा अतिरेक वाटला. मेडिकलवाल्याच्या त्या कविता (ज्या ऐकून ती फसवल्याचा फील आलेली त्याची हिरॉईनही अचानक परत त्याच्याच प्रेमात पडते,) त्या तर अशा पुळकावणी आहेत की ज्याचे नाव ते. पण चेहरे फ्रेश आणि कुठेही कंटाळा येऊ नये अशी वातावरणनिर्मिती वगैरेमुळे एकूण बघायला खूप छान वाटले. गाणेही चांगले वाटले.. भरत जाधवचा तो नेहमीचा बावळट अभिनय नसून वेगळाच किंचित गंभीर रोल असल्याने खूपच सुखद. पराचे परिक्षणही एकदम योग्य आणि हवे ते पॉईंट दाखवणारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

असंय होय, आम्ही काही अप्सरेला

सूड
Tue, 01/11/2011 - 17:37 नवीन
असंय होय, आम्ही काही अप्सरेला पाहिली नाही अजून त्यामुळे ती आमच्या साठी अप्सराच !! ;) दृष्टिआड सृष्टी दुसरं काय :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अहो हिरोंमध्ये तो बघण्यासारखा

स्पा
Tue, 01/11/2011 - 12:59 नवीन
अहो हिरोंमध्ये तो बघण्यासारखा होता... हिरवीणी सर्व छान होत्या
  • Log in or register to post comments

बघतो रे या विकांताला....

अवलिया
Tue, 01/11/2011 - 13:01 नवीन
बघतो रे या विकांताला....
  • Log in or register to post comments

फ्रेशनेसचे स्वागत...!

इन्द्र्राज पवार
Tue, 01/11/2011 - 13:03 नवीन
"....तरुणाईचा प्रयत्न म्हणून ह्या चित्रपटाकडे पाहिल्यास हा नक्की आवडून जाईल...." ~ प.रां.च्या परीक्षणातील हे वाक्य खास आहे. मराठी चित्रपटसृष्टीला असा 'फ्रेशनेस' देणार्‍या कुठल्याही प्रयत्नाचे जर अशारितीने स्वागत झाले तर त्या टीमला नव्या निर्मितीसाठी 'टॉनिक' देते. फक्त हे लोक 'प्रत्येक चित्रपट हलकाफुलकाच झाला पाहिजे' असे जे मानतात, त्यामुळे निर्मितीमूल्यांकडे अक्षम्य असे दुर्लक्ष होत जाते. अलिबागचे सौंदर्य न टिपणे याचा उल्लेख आला आहेच, पण 'ध्वनीमुद्रणा' कडे असे काही सेकंड रेटने पाहिले जाते की, दिग्दर्शकाला असे वाटत राहते जणू मराठी प्रेक्षक माझा चित्रपट पाहायला येतो तो "चकचकाट चांगला आहे" म्हणून. कथानक भारतीय बनावटीचे करणे हेही एक कौशल्य असते, जे श्री.सचित पाटील यानी केले असल्याचे प.रा.परीक्षणावरून भासते. मूळ कथा रॉक हडसन आणि जिना लोलोब्रिगिडा अभिनित आणि अत्यंत गाजलेल्या 'कम सप्टेंबर' वर आधारित आहे हे ओळखतेच. मुंबई-पुणे शिवाय अन्यत्रही असे चित्रपट रितसर थिएटरमध्येच प्रदर्शित व्हावेत अशी अपेक्षा. इन्द्रा
  • Log in or register to post comments

सगळं मान्य पण चित्रपट अक्षम्य

नीधप
Tue, 01/11/2011 - 23:58 नवीन
सगळं मान्य पण चित्रपट अक्षम्य भीषण आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

छान छान.

चिंतामणी
Tue, 01/11/2011 - 13:06 नवीन
पराने मराठी सिनेमाचे केलेले रसग्रहण आवडले. आणि परा मराठी सिनेमेसुध्दा बघतो हे माहीत झाले. ;)
  • Log in or register to post comments

एक वेळ पहायला आवडेल.. पण हे

गणपा
Tue, 01/11/2011 - 13:14 नवीन
एक वेळ पहायला आवडेल.. पण हे जमवायच कस? हा प्रशन आहे.
  • Log in or register to post comments

ह्म्म..

स्वाती दिनेश
Tue, 01/11/2011 - 13:21 नवीन
नवीन चेहरे दिसत आहेत, कादंबरी कदमचे नाव 'आघात' मुळे समजले आहे, विक्रम गोखलेंनी तिचे कौतुक केले आहे. म्हणून तिला पहायची उत्सुकता आहे. अर्थात दोन्ही सिनेमांमध्ये खूप फरक आहेच. परा, तुझे परिक्षण आवडले.सिनेमा बघेन.. स्वाती
  • Log in or register to post comments

इतका काही

सहज
Tue, 01/11/2011 - 13:24 नवीन
नुकताच बघितला पण इतका काही खास वाटला नाही. :-) 'तुला शिकवीन चांगलाच धडा' सिनेमा देखील नुकताच पाहीला तो पण चुपके चुपके (धर्मेंद्र, ओमप्रकाश) वरुन प्रेरित!
  • Log in or register to post comments

येत्या विकांताला पाहू जमले तर

विनायक बेलापुरे
Tue, 01/11/2011 - 13:34 नवीन
येत्या विकांताला पाहू जमले तर .... पराचे परिक्षण वाचून चित्रपट पहायची इच्छा पुढच्या प्रतिक्रियांमुळे मेली नाही तर !
  • Log in or register to post comments

एक च नंबर लेखन ... पेपरात

टारझन
Tue, 01/11/2011 - 13:52 नवीन
एक च नंबर लेखन ... पेपरात छापुन यायला लागल्यापासुन क्वालिटी लिहायला लागलंय पोरगं :)
  • Log in or register to post comments

छान लिहिल आहेस. आता बघावाच

जागु
Tue, 01/11/2011 - 14:29 नवीन
छान लिहिल आहेस. आता बघावाच लागेल पिक्चर.
  • Log in or register to post comments

आजपर्यंत मराठी चित्रपटाकडे

यकु
Tue, 01/11/2011 - 14:47 नवीन
आजपर्यंत मराठी चित्रपटाकडे पाठ फिरवलेल्या परा शेठनी चक्क मराठी चित्रपटाचं परिक्षण लिहून त्यात मठ्ठोबा भरत जाधव वर स्तुतीसुमने उधळलीत म्हणजे पिक्चर एकदा पाहायलाच हवा.
  • Log in or register to post comments

मागेच पाहिला होता आपलीमराठी

मेघवेडा
Tue, 01/11/2011 - 14:48 नवीन
मागेच पाहिला होता आपलीमराठी वर. इतका खास वाटला नाही. पण अंमळ कंटाळलेल्या दिवशी टाईमपास म्हणून बरा आहे. तरुणाईचा प्रयत्न म्हणून ह्या चित्रपटाकडे पाहिल्यास हा नक्की आवडून जाईल.... हे खरं. परीक्षण नेहमीप्रमाणे चांगले आहे.
  • Log in or register to post comments

सहमत. >>सोनाली कुलकर्णी दिसली

स्वानन्द
Tue, 01/11/2011 - 22:10 नवीन
सहमत. >>सोनाली कुलकर्णी दिसली आहे छान आणि अभिनयात देखील उत्तम हे तर अजिबात पटले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

खूप मस्त !

स्वतन्त्र
Tue, 01/11/2011 - 15:09 नवीन
हा चित्रपट मला देखील आवडला.एक हलकाफुलका,डोक्याला विशेष ताण न देता पाहावा असाच हा चित्रपट आहे.गाणी तर अप्रतिमच. अप्सरेच्या चाहत्यांसाठी मेजवानी.;-)
  • Log in or register to post comments

चित्रपट बघितला आहे.. ठिक

ऋषिकेश
Tue, 01/11/2011 - 15:43 नवीन
चित्रपट बघितला आहे.. ठिक वाटला होता
  • Log in or register to post comments

परीक्षण छान लिहिले आहे.

मृत्युन्जय
Tue, 01/11/2011 - 17:04 नवीन
परीक्षण छान लिहिले आहे. चित्रपटाकडुन मात्र मला न बघताच फारश्या अपेक्षा नाही आहेत.
  • Log in or register to post comments

हा चित्रपट एकदा पाहण्याजोगा

पिंगू
Tue, 01/11/2011 - 21:53 नवीन
हा चित्रपट एकदा पाहण्याजोगा आहे. तसा माझ्याकडे स्टॉक मध्ये असल्याने कधीही पुन्हा पाहू शकतो. कुणाला हवा असल्यास सांगणे.. एखाद्या शेयर साईटवर टाकतो.. - पिंगू
  • Log in or register to post comments

ग्रेट !

सुहास..
Tue, 01/11/2011 - 23:11 नवीन
नेहमी प्रमाने ' इमानदार ' परिक्षण !! पिक्चर अजुन टाकला नाही !! टाकेन पुण्यात आल्यावर !! बाकी हॉलीवुड, बॉलीवुड, सॅन्डलवुड, परकीय भाषेतले आणि रजनीचे २०० करोडच बजेट असलेल्या चित्रपट पहाणार्‍यासाठी, केवळ चाळीस एक लाखात बनविलेले हे निव्वल अडीच तासाचे निख्खळ मनोरंजन आवडेल की नाही अशी जरा शंकाच आहे.
  • Log in or register to post comments

ती मन्वा म्हणजे जोधा अकबर

पक्या
Wed, 01/12/2011 - 04:58 नवीन
ती मन्वा म्हणजे जोधा अकबर मधील जोधाची दासी होय. तशी दिसायला ती चांगली आहे पण इथे वरील (शेवटचे)चित्रात मेकप फारच भडक वाटतोय.(पांढरा टॉप आणि गुलाबी हेडबॅण्ड मधील) पांढरी फटक दिसतेय.
  • Log in or register to post comments

मस्त

फारएन्ड
Wed, 01/12/2011 - 05:45 नवीन
परीक्षण! बघणार नकीच!
  • Log in or register to post comments

क्षणभर विश्रांती (आणि बराच वेळ कंटाळा)!!

नाटक्या
Wed, 01/12/2011 - 07:08 नवीन
क्षणभर विश्रांती आणि बराच वेळ कंटाळा!! असाच वाटला. सौं. नी खुपच हट्ट केला म्हणून काही महिन्यापुर्वीच घरी बघीतला. कंटाळून पुढे..पुढे ढकलत अक्षरशः कसाबसा संपवला. ज्याम बोअर झालो होतो. अलिबागला निसर्गरम्य ठिकाणी गेलात म्हणून सगळ्यांचेच 'जमायला' पाहिजे का? कोणाला तरी कोणाच्यातरी गळ्यात बांधायचे हा नियम असल्यासारखे वाटले सगळे. आणि शेवट तर त्याहून भयानक!!! डोंगर पोखरून उंदीर काढला असे वाटले.
  • Log in or register to post comments

थोडा पाहिला

मिहिर
Wed, 01/12/2011 - 15:50 नवीन
परवा स्टार प्रवाहवर लागलेला तेव्हा थोडा पाहिला. पण फार कंटाळवाणा वाटला म्हणून बदलले चॅनल. बघायची इच्छा झाली नाही.
  • Log in or register to post comments

अरे वा! आज बघूच. तसंही प्रचंड

प्राजु
Wed, 01/12/2011 - 22:05 नवीन
अरे वा! आज बघूच. तसंही प्रचंड स्नो स्टॉर्म चालू असल्याने बाहेर जाता येणार नाहीच. दिवस सत्कारणी लावावा. :)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा