बघितला..
ठीक आहे ,
सचित पाटील सोडला तर एकही थोबाड बघण्यासारख नव्हतं..
वर सिद्धार्थ जाधव आणि मनवा नाईक हे combination म्हणजे अत्याचार होता....
त्याला हिरो म्हणून का घेतात हा प्रश्नच आहे
बाकी चित्रपटच लुक खूप फ्रेश आहे
माझ्यातर्फे २/५
की मी हा सिनेमा पहात असताना मध्यंतर झालं आणि दिसलं की हे सर्व हिरो आणि हिरविणी आमच्या पुढच्याच रांगेत शो ला येऊन बसले आहेत.
मग त्यांनी आमच्याशी संवाद केला. कसा वाटतोय सिनेमा, आमचा पहिलाच प्रयत्न आहे वगैरे म्हणून सर्वांच्या शुभेच्छा घेतल्या. तो जो मेडिकल स्टोअरमधला मुलगा दाखवलाय तो सर्वांच्या वतीने भाषण करत होता.
त्यानंतर सर्वांनी प्रेक्षकांसोबत गप्पा, फोटो इ इ केले.
तेव्हा दुर्दैवाने मला असे लक्षात आले की त्या अप्सरेचा लूक अत्यंत सामान्य आहे. तरुण असूनही काही एजिंग लाईन्स असाव्यात तसा टच अप केलेला चेहरा दिसत होता. एकूण मत अगदी वाईट झालं (लुक वाईज)
बाकी ती सावळी मुलगी खूपच उत्साही, हसरी आणि स्मार्ट दिसत होती. सुंदर तर होतीच. म्हणून ती जास्त आवडली.
बुर्जी पाववाल्याचे पात्र (ध्यान) जे काही घेतले आहे त्याच्याशी मनवा नाईकचं जुळलेलं दाखवणे म्हणजे एकास एक जोड्या जुळवा या प्रश्नात प्रत्येक जोडी तिथल्या तिथ्थे अलिबागेत उपलब्ध नगांतूनच जुळली पाहिजे आणि कोणीही पात्र जोडीअभावी "वाया" जाता कामा नये. अशा हट्टाचा अतिरेक वाटला.
मेडिकलवाल्याच्या त्या कविता (ज्या ऐकून ती फसवल्याचा फील आलेली त्याची हिरॉईनही अचानक परत त्याच्याच प्रेमात पडते,) त्या तर अशा पुळकावणी आहेत की ज्याचे नाव ते.
पण चेहरे फ्रेश आणि कुठेही कंटाळा येऊ नये अशी वातावरणनिर्मिती वगैरेमुळे एकूण बघायला खूप छान वाटले.
गाणेही चांगले वाटले..
भरत जाधवचा तो नेहमीचा बावळट अभिनय नसून वेगळाच किंचित गंभीर रोल असल्याने खूपच सुखद.
पराचे परिक्षणही एकदम योग्य आणि हवे ते पॉईंट दाखवणारे.
"....तरुणाईचा प्रयत्न म्हणून ह्या चित्रपटाकडे पाहिल्यास हा नक्की आवडून जाईल...."
~ प.रां.च्या परीक्षणातील हे वाक्य खास आहे. मराठी चित्रपटसृष्टीला असा 'फ्रेशनेस' देणार्या कुठल्याही प्रयत्नाचे जर अशारितीने स्वागत झाले तर त्या टीमला नव्या निर्मितीसाठी 'टॉनिक' देते. फक्त हे लोक 'प्रत्येक चित्रपट हलकाफुलकाच झाला पाहिजे' असे जे मानतात, त्यामुळे निर्मितीमूल्यांकडे अक्षम्य असे दुर्लक्ष होत जाते. अलिबागचे सौंदर्य न टिपणे याचा उल्लेख आला आहेच, पण 'ध्वनीमुद्रणा' कडे असे काही सेकंड रेटने पाहिले जाते की, दिग्दर्शकाला असे वाटत राहते जणू मराठी प्रेक्षक माझा चित्रपट पाहायला येतो तो "चकचकाट चांगला आहे" म्हणून.
कथानक भारतीय बनावटीचे करणे हेही एक कौशल्य असते, जे श्री.सचित पाटील यानी केले असल्याचे प.रा.परीक्षणावरून भासते. मूळ कथा रॉक हडसन आणि जिना लोलोब्रिगिडा अभिनित आणि अत्यंत गाजलेल्या 'कम सप्टेंबर' वर आधारित आहे हे ओळखतेच.
मुंबई-पुणे शिवाय अन्यत्रही असे चित्रपट रितसर थिएटरमध्येच प्रदर्शित व्हावेत अशी अपेक्षा.
इन्द्रा
नवीन चेहरे दिसत आहेत, कादंबरी कदमचे नाव 'आघात' मुळे समजले आहे, विक्रम गोखलेंनी तिचे कौतुक केले आहे. म्हणून तिला पहायची उत्सुकता आहे. अर्थात दोन्ही सिनेमांमध्ये खूप फरक आहेच.
परा, तुझे परिक्षण आवडले.सिनेमा बघेन..
स्वाती
नुकताच बघितला पण इतका काही खास वाटला नाही. :-)
'तुला शिकवीन चांगलाच धडा' सिनेमा देखील नुकताच पाहीला तो पण चुपके चुपके (धर्मेंद्र, ओमप्रकाश) वरुन प्रेरित!
आजपर्यंत मराठी चित्रपटाकडे पाठ फिरवलेल्या परा शेठनी चक्क मराठी चित्रपटाचं परिक्षण लिहून त्यात मठ्ठोबा भरत जाधव वर स्तुतीसुमने उधळलीत म्हणजे पिक्चर एकदा पाहायलाच हवा.
मागेच पाहिला होता आपलीमराठी वर. इतका खास वाटला नाही. पण अंमळ कंटाळलेल्या दिवशी टाईमपास म्हणून बरा आहे.
तरुणाईचा प्रयत्न म्हणून ह्या चित्रपटाकडे पाहिल्यास हा नक्की आवडून जाईल....
हे खरं. परीक्षण नेहमीप्रमाणे चांगले आहे.
हा चित्रपट एकदा पाहण्याजोगा आहे. तसा माझ्याकडे स्टॉक मध्ये असल्याने कधीही पुन्हा पाहू शकतो.
कुणाला हवा असल्यास सांगणे.. एखाद्या शेयर साईटवर टाकतो..
- पिंगू
नेहमी प्रमाने ' इमानदार ' परिक्षण !!
पिक्चर अजुन टाकला नाही !! टाकेन पुण्यात आल्यावर !!
बाकी हॉलीवुड, बॉलीवुड, सॅन्डलवुड, परकीय भाषेतले आणि रजनीचे २०० करोडच बजेट असलेल्या चित्रपट पहाणार्यासाठी, केवळ चाळीस एक लाखात बनविलेले हे निव्वल अडीच तासाचे निख्खळ मनोरंजन आवडेल की नाही अशी जरा शंकाच आहे.
ती मन्वा म्हणजे जोधा अकबर मधील जोधाची दासी होय.
तशी दिसायला ती चांगली आहे पण इथे वरील (शेवटचे)चित्रात मेकप फारच भडक वाटतोय.(पांढरा टॉप आणि गुलाबी हेडबॅण्ड मधील) पांढरी फटक दिसतेय.
क्षणभर विश्रांती आणि बराच वेळ कंटाळा!! असाच वाटला.
सौं. नी खुपच हट्ट केला म्हणून काही महिन्यापुर्वीच घरी बघीतला. कंटाळून पुढे..पुढे ढकलत अक्षरशः कसाबसा संपवला. ज्याम बोअर झालो होतो.
अलिबागला निसर्गरम्य ठिकाणी गेलात म्हणून सगळ्यांचेच 'जमायला' पाहिजे का? कोणाला तरी कोणाच्यातरी गळ्यात बांधायचे हा नियम असल्यासारखे वाटले सगळे. आणि शेवट तर त्याहून भयानक!!! डोंगर पोखरून उंदीर काढला असे वाटले.
प्रतिक्रिया
छान परिक्षण, पिच्चर बघायला
बघितला.. ठीक आहे , सचित पाटील
+१ पण सचित पाटील काय हो
>>ती छान आहे. सावळीशी. ती
त्याचं असं झालं..
असंय होय, आम्ही काही अप्सरेला
अहो हिरोंमध्ये तो बघण्यासारखा
बघतो रे या विकांताला....
फ्रेशनेसचे स्वागत...!
सगळं मान्य पण चित्रपट अक्षम्य
छान छान.
एक वेळ पहायला आवडेल.. पण हे
ह्म्म..
इतका काही
येत्या विकांताला पाहू जमले तर
एक च नंबर लेखन ... पेपरात
छान लिहिल आहेस. आता बघावाच
आजपर्यंत मराठी चित्रपटाकडे
मागेच पाहिला होता आपलीमराठी
सहमत. >>सोनाली कुलकर्णी दिसली
खूप मस्त !
चित्रपट बघितला आहे.. ठिक
परीक्षण छान लिहिले आहे.
हा चित्रपट एकदा पाहण्याजोगा
ग्रेट !
ती मन्वा म्हणजे जोधा अकबर
मस्त
क्षणभर विश्रांती (आणि बराच वेळ कंटाळा)!!
थोडा पाहिला
अरे वा! आज बघूच. तसंही प्रचंड