नायकिणीचा नाच
आमच्या गावच्या जत्रेच्या आदल्या रात्री ग्रामदैवताच्या अश्वाची सवाद्य मिरवणूक असते. रात्रभर ती गावाच्या चौकाचौकात रेंगाळून पहाटेच्या सुमारास देवाच्या डोंगरावर न्यायची असा प्रघात पडलेला किँवा पाडलेला आहे. या मिरवणूकीचे पूर्वीचे वैशिष्ट्य म्हणजे सोंगाच्या गाड्या असत. सुतारनेटावरची पुरुषमंडळी व पोरं विविध पौराणिक देखावे प्रत्यक्ष संवादातून, हुबेहूब वेशभुषेसह सादर करीत. ते पाहण्यासाठी अबालवृद्धांची रस्त्याकडेला गर्दी उसळायची.
परंतु आता जमाना बदललाय... सोंगाच्या गाड्या कालबाह्य झाल्यात. त्यांच्या जागी नाचणाऱ्या नायकिणी आल्यात. त्यांचा नाच पहायला तरुण पोरांची झुंबड उडू लागलीय...
तो रस्त्यावरचा तमाशा बहुतेकांना आवडणारा. रात्र कशी सरते ते जाणवू न देणारा तो जलसा अनुभवणं म्हणजे तरुणांसाठी वर्षातून एकदाच लाभणारी पर्वणी. उडत्या चालीच्या गावरान गाण्यांच्या ठेक्यावर पदर उडवीत नाचणाऱ्या त्या कोवळ्या कमनीय तरुणी जवळून पाहण्यासारखा दुर्मिळ योग पुन्हा बारा महिने नसतो. म्हणून मिसरुड फुटलेल्यांचं नायकिणींच्या भोवती दाट कोँडाळं. वर्षानुवर्षे बायांची संख्या वाढतेच आहे, अन् त्यांना न्याहाळणाऱ्यांचीसुद्धा.
संध्याकाळी नाचणाऱ्या युवतीँची 'डान्सिँगपार्टी' आपल्या लवाजम्यासह गावातल्या दलालाच्या घरी उतरली की त्यांना पहायला तरुण पोरांची हीऽऽ झुंबड! त्या बोलतात कशा, चालतात कशा, खातात-पितात कशा हे पाहणं म्हणजे वेगळीच मौज. 'दलालाची लै मज्जा आसंल नै?' अशी खालच्या आवाजात एकमेकांना टीपण्णी दिली की दलालाच्या अहोभाग्यावर जळणं व्हायचं. दलालानं दारातून डोकावणारी पोरं हाकलली की समजायचं पोरी आता नटायला बसल्यात. मग तासभर इकडं तिकडं घुटमळून कोणाला कोणती आवडली याची सकारण चर्चा ठरलेली. दीडेक तासाने दार उघडलं जायचं अन् त्या चिरतरुण नृत्यांगना स्वर्गीय शृंगार करुन बाहेर यायच्या.
त्यांचं ते नटणं म्हणजे 'भडक' सदरात मोडणारं. गर्द दाट रंगाची काठापदराची साडी चोपून चापून नऊवारासारखी नेसलेली, पदर थेट पोटरीपर्यँत सोडलेला, चांदीचा गच्च कंबरपट्टा, केस चोपून अंबाडा केलेला, त्यावर काळा फिट्ट बो, अंगभर चमचमणारे दागिने, चेहरा उजळवलेला, चंद्रकोरी टिकली, अन् ओठांना लालचुटुक लाली. तंग ब्लाऊज, अन् नजरेत भरणारी ती दोन टोकदार टोकं!
'ओऽय होये!' प्रत्येक तरुण रसिकाच्या नजरेतून सौंदर्यास्वाद बोलून जायचा. तशा आस्वादक नजरांची त्या नर्तिकांना नेहमीची सवय. त्यादेखील त्या चौकस नेत्रशरांचा सस्मित स्विकार करीत मोहकपणे लाजल्या की तरुणांचा कलेजा खल्लास! असा समोरासमोरचा 'प्रेमानुभव' खेडेगावात कोठून मिळायला? दिवसा उजेडी तर शक्यच नाही. आणि रात्रीच्या काळोखात बायकोचं असं मोहक लाजणं अनुभवणार कसं? त्यामुळेच नायकिणीँच्या नाचाला तरुण आशिक पोरांबरोबरच अनेक विवाहित बाप्येसुद्धा लाभत असतात. 'ती' आपल्याला आवडली असून तिने आपल्याकडे पाहून गोग्गोड स्मित करावं अशा आशेने बहुतेकजण रुंजी घालतात...
मग एकदाची मिरवणूक सुरु झाली की शिट्यांच्या सलामीत नाचकाम सुरु. नामांकित ब्रासबँडचा यावेळी कस लागे. एकसे बढकर एक अशा ठेकेबाज गाण्यावर कमनीय कंबर लचकतांना पाहून अधाशी डोळ्यांना पंख न फुटते तरच नवल! मनमोहक पदन्यासाची ती दिलखेचक अदा नखशिखांत प्राशून घेण्यासाठी एकच धडपड उडू लागते. हळूहळू नाचगाणे गर्दीचा ताल धरू लागते. गोलाकार उभारलेल्या रसिकांना चुचकारत पोरींचे नृत्य चालू होते...
त्या डान्सपार्टीचा एक हस्तक अगोदरच गर्दीत मिसळून शिट्ट्या फुंकीत दहाची नोट उंचावित असतो. ती नोट कोणी घ्यावी हे दुसऱ्या हाताने निर्देशित केल्यावर ती तरुणी ठुमकत त्याच्याजवळ येते व त्याच्या डोक्यावर लाडीक टपली मारून नोट हस्तगत करते. त्याचंच अनुकरण करीत अनेक पोरं मग आपल्या आवडत्या नर्तिकेच्या कोमल बोटांची नाजुक टपली खातात...
थोड्यावेळाने तोच हस्तक त्याच्या मित्राच्या गालावर वीसची नोट धरतो. यावेळी त्या मित्राला आवडलेली पोरगी कंबर हलवित येऊन त्या गालाचा आपल्या मऊ बोटांना गालगुच्चा घेऊन ती विसाची नोट आपल्या कंचुकीत दडवून पुन्हा मध्यभागी चाललेल्या नृत्यात सहभागी होते. हे पाहून तशीच नाजूक मऊ बोटे अनेक आसुसलेल्या मित्रांच्या गालावर वीस वीस रुपयांत रुतू लागतात..
रात्र चढत जाते, नृत्य रंगत जाते. चौकाचौकात मिरवणूक अधिकाधिक थबकू पाहते.
एका मोठ्या चौकात पुन्हा तोच हस्तक पन्नासाची नोट उंचावून आपल्या आवडतीला बोलावतो. यावेळी ती पदराचा आडोसा धरून केवळ त्याच्याचकडे पाहत येत असते. ती आडपडदा ठेऊन नेमके करते काय? ही उत्सुकता शमविण्यासाठी एकजण पन्नासाची नोट उंचावित आपल्या आवडतीला खुणावतो. ती हसते, डोईवर पदर घेऊन आडोसा धरते अन् त्याच्याजवळ येतांना दोन तीनवेळा चक्क डोळा मारते, हे दिसतं फक्त त्या नोटधारकालाच!
मग अनेक रसिकलोक आपल्या आवडत्या पाखराकडून डोळे मारून घेतात. चारचौघात मिळणारा डाव्या डोळ्याच्या कौलाने धन्यधन्य होऊन जातात. गर्दीच्या खिशातील नोटांना नायकिणींचा ऊर जवळ करावासा वाटू लागतो. मिळतील तितक्या नोटांच्या भाराने पोरीँचा उभार आणखीनच उभारी घेतो. आता रात्र बरीच चढलेली असते. काही शौकिनांच्या डोक्यापर्यंत मदिरा चढलेली दिसते. ते नायकिणीँच्या अंगचटीला जाऊ पाहतात, पण तिथे उधारीचा धंदा अजिबात चालत नसतो. नोट दाखवून 'दौलतजादा' करणाऱ्या जहागिरदारालाच त्या हसून -लाजून भाव देत असतात अन् फुकटात घसट वाढवणाऱ्या पेताडांना दलालाचे पंटर व डान्सपार्टीचे बॉडीगार्ड यथेच्छ चोप देत रिंगणाबाहेर घालवून देत असतात...
अनेकांचे खिसे रिकामे पडतात. मात्र पोरीँची छाती दबून गेलेली असते, नाचूनही, नोटा साठवूनही!
( "www.mimarathi.net/node/4388">चौफेर" मधून.)
प्रतिक्रिया
'मनुष्याच्या विकृतीला पाजळणे'
सहमत!
सहमत. आणि त्यांच्यातली
ग्रामदैवत मनात काय विचार करत असेल ?
तुमचे लेख असेच वेगळे वेगळे
लहानपणी जे मी पाहिलं त्यावर
खुप मस्त लिहिले आहे..वर्णन
+१ असेच म्हणते
+३
आमच्या वतनाच्या गावी माझे
अतिषय चित्रदर्शी वर्णन केले
षिर्षक वाचुन एखाद दुसरा फोटु
आहाहा सून्दर लेख. मीपाच्या साहीत्य दालनात हा तर मानाचा तूराच
फार मजा येते राव तुम्च्याकढे,
दुबईत या!
काही आहेत अजून...
दुबई ची बाजारपेठ विविध
दुबई ची ९०च्य दशकातील रौनक
दुबई आजही शॉपिंग चे नंदनवन आहे
युरोप व अमेरिकेतील सिझन
छान
आता गेलं पाईजे लवकर , बरं