शिरुरवरुन नगरकडे जाताना सुपे गावाच्या पुढे ५-६ किमी वर सुवर्णज्योत हा प्रचंड ढाबा आहे. चिकण, मट्ण काहीही खा. मस्तच मिळ्ते. माझी आवडती डाळ तडका ही डिश तर अप्रतिमच मिळते.
भेळ
१. नारायणगाव येथे कोठेही .. (जुन्नर -खेड- मंचर जवळ) फरसान भेळ पण खुप जबरी लागते ..
२. लोणी भापकर, बारामती (पणधरे जवळ)
येथील भेळ ही वेगळी आणि तिखट चुरमुर्याची मिळते, अतिशय उर्कृष्ठ आहे..
३. कैलास .. निअर शिंदेवाडी, पुणे-बँग्लोर हायवे.
४. सरदवाडि (शिरुर जवळ)
५. गणेश भेळ, पुण्यात कोठेही मस्तच ...
गाववालं
लोणी भापकर ला छोट्याश्या चौकात , बस थांबते तेथे मिळते .. पहिल्यासारखी नाही मिळत येव्हडी तिखठ तरीही ही मस्त आहे अजुनही.
स्वताची ओलख अजुन जपलेली आहे..
बाकी तुम्ही दिलेली माहिती ही जबरी आहे ..
सातारामागे टाकुन कोल्हापुरकडे जाताना खींड लागते. डाव्याहाताला पेट्रोलपंपाला लागुन आत जायचे.
तेथे "कणसे धाबा:" लागतो. चिकन, मटण, काजुकरी एकदम मस्तच. खूप गर्दी असते. पण सर्व्हीस चांगली आहे.
माझं गाव विदर्भात - उमरखेड जि. यवतमाळ .. तीथल्या काही जागा**
१) मुत्तुराज वडेवाला - याच्याजवळ वडे, मिरची भजे अप्रतिम मिळतात. एका प्लेट मध्ये कधीच समाधान होत नाही.
२) याच्याच बाजुला एक ऑम्लेटवाला होता - आता आहे का नाही माहित नाही पण त्याच्याजवळ ऑम्लेट मस्त मिळायचे
३) बिकानेर मिठाई - समोसा, कचोरी आणी ईम्रती साठी .. बाकी मिठाई पण मस्तच
४) संजय टॉकीज (बहुतेक) जवळ एक भेळवाला असायचा .. त्याच्याकडे पाणीपुरी, दहीपुरी, भेळ छान मिळायची
५) वसंत टॉकीज समोरच्या गल्लीत एक मिठाईचं दुकान होतं .. त्यात समोसा मस्त मिळायचा आणि याच्याच जवळ एक हॉटेल होते त्यात फाफडा मस्त मिळायचा .. सोबत तळलेली मिरची ..
६) एक हॉटेल होते पुसद रोडवर .. शाळेत जातांना लागायचे .. तीथला पेढा अप्रतिम असायचा .. एकसारख्या आकारात करुन न ठेवता चौकोनी वगैरे तुकडे करुन तराजुत मोजुन मिळायचा ..
७) पुसद रोडवरच एक जयस्वाल वाईन मार्ट आहे .. त्याच्याकडे पुर्वी सांभारवडी (कोथींबीर रोल) मिळायचे .. मस्त होते
८) फक्त उन्हाळ्यात एक ज्युस सेंटर उघडायचे .. तो पाईनॅपल ज्युस मस्त बनवायचा
सध्या एवढेच आठवतायत .. अजुन विदर्भातले काही ठीकाणं सांगेन .. कीतीजणांना याचा उपयोग होईल हे माहिती नाही तरीपण या धाग्यावरुन मला आठवल्या :)
** ही सर्व माहीती जवळपास ३ ते ७ वर्षापुर्वीची आहे .. त्यामुळे सध्याची परीस्थिती माहिती नाही
स्वप्नील भाउ , येवुद्या आनखिन ....
कितीजनांना उपोयोग होयील असे नाही.. पण यामध्ये वाचले तर नक्कीच उपोयोग होयील ...
कालच माझी फ्रेंड गणपती पुळे ला गेली होती.. मला वाटते मेघवेड्यांनी दिलेली खिचडीची माहीती दिली होती .. आज कळेल वृत्तांत ..
विदर्भाद आल्यावर नक्कीच तुम्ही सांगितलेल्या ठिकांनाना भेट देवू ..
बरं आहे हा धागा महाराष्ट्रापुरताच सीमित ठेवला आहे. जगभरातली पोटपुजेची ठिकाणे विचारली असती तर सगळे (फ्रींटुकबृहत्कथयाकथित) का.प्रे.न.झा. उच्चमध्यमवर्गीय उत्तेजित झाले असते आणि हा धागा एव्हाना टॉपला पोचला असता. ;-)
अरे तात्या कडे तर सगळी यादीच होती.. दक्षिण मुंबईतल्या दिल्ली दरबार पासून अगदी गिरगावतल्या बोरभाटलेन मधल्या समर्थ भोजनालय, अनंताश्रम आणि बरच बरच..
ह्या सगळ्या ठिकांणांच्या हॉटेलांची एक छान यादी कुठे मिळेल कुणी सांगू शकेल का.. मुंबईतले बरेच आणि पुण्यातले काही झालेत भेट देऊन पण एखादी साईट असेल जिथे ही यादी मिळेल तर लय उपकार होईल..
माझे दोन प्रश्न -
१. मुंबई (विशेषतः मध्य ते दक्षिण) मध्ये कँडल लाईट डिनर साठी काय सुचवाल.. एकदा शोधताना हवा निघाली होती पण मनासारखा (आणि खिशाला परवडेल असाही) पत्ता मिळालाच नाही, म्हटलं तयारी असावी ;)
२. मुंबई च्या जवळ चांगला धाबा कुठे आहे (कृपया दादरचा प्रितम-दा-धाबा सांगू नका.. )..
धन्यवाद!
गिरगाव चौपाटीसमोर गुडलक किंवा तत्स्म नावाचे इराणी (पक्षी पारसीबावाचे) हॉटेल आहे. लाकडी टेबले, लाकडी पंखे असलेल्या त्या एकमजली हॉटेलात वरच्या मजल्यावर कॅन्डल लाइट डिनरची सोय (टेबलावरच्या टिचभर, चिनीमातीच्या पांढर्या फुलदाणीतल्या गुलाबाच्या फुलासकट!) असल्याचे आठवते. तरीही आम्ही खालीच बसून चहा-पराठे हाणले होते, हा भाग वेगळा.
(स्मरणशील)बेसनलाडू
गिरगावातलेच असाल, तर मनोहर आणि सरदार मध्ये पावभाजी खाल्लीत की नाही, असे विचारून तुमचा अपमान करावेसे वाटत नाही :)
(पावभाजीप्रेमी)बेसनलाडू
मुंबईजवळचे ढाबे म्हणजे सन्नी आणि टोनीचे - एन एच ४ वरचे सन्नी दा ढाबा आणि टोनी दा ढाबा
(सरदार)बेसनलाडू
सरदारकडे ताडदेवला तर कैक दा... मनोहर कडे जायचो जेव्हा खिशात पैसे नसायचे तेव्हा दोन भाजी आणि १० पाव चौघात ;) नित्यानंद, श्रिराम पण आहेत पण मला मात्र तवा पुलाव, पावभाजी असे आयटंम गाडीवरच आवडतात.. ड्रीमलँडला मुमताजची गाडी लागते, जबराट पावभाजी आणि गुलालवाडीतही मस्त विशेषतः रात्री थोड्या उशीरानेच गणपतीत किंवा दांडीयात.. शिवाय ते शेगडीवर शेकत असलेले पापड.. अहाहा...
अहो कँडल लाईट ला नेताना सोयीस्कर हॉटेल पाहिजे.. आमच्या इथे इराण्याकडे कपल गेलं की समजा नुस्तं लफडं नाही तर झोल आहे म्हणून... :))))
धन्यवाद माहितीबद्दल.. नोंद घेतली आहे 'बेला' :)
चला तुमच्या प्रश्नामुळॅ कँडल लाईट डिनर मुंबईत कोठे मिळते ते कळाले
धन्यवाद आपले आणि बेसन लाडु चे ..
-- बाकी पुण्याजवळील पिंपळे सौदागर येथे ही कँडल लाईट डिनर मस्त मिळते .. तिकडेच सोय करुन ठेवली आहे आम्ही .. [:)]
>>> मुंबई (विशेषतः मध्य ते दक्षिण) मध्ये कँडल लाईट डिनर साठी काय सुचवाल..
--- वरळीच्या नेहरू सेंटरजवळच्या 'ज्वेल ऑफ इंडिया'बद्दल बिझीबीच्या कॉलममध्ये वाचल्याचं आठवतं. कधी गेलो नाही, पण जालावर रिव्ह्यूज चांगले आहेत.
नासिक ला पाणीपुरी खायची म्हटली कि गाडी आपोआप कॉलेज रोड ला " नंदन" कडे वळते.शेव दहीपुरी तर अशी भारी कि खाणारा खातच राहतो....
तसे बिग बझार समोर पण एक गाडी असते पेपे शोरूम जवळ तिथे पण पाणीपुरी मस्त ...
आणि सायंतारा चे साबुदाने वडे तर उपास असो नसो खावेसे वाटतात.चटणी पण मस्त असते....रेसिपी मिळवणार आहे एकदा मी! ....टायगर हिल्स म्हणून पांडवलेणे येथे हॉटेल आहे तिथे नोंव्हेज पण मस्त मिळते .मिसळ पाव साठी गंगापूर रोड वरचे "विहार "
पुण्याला भरपूर चापायचे असेल तर दुर्वांकुर बेस्ट आहे!आणि सेनापती बापट रोड च्या बाजूने एक लेन जाते तिथे मॉन्सून मोमो म्हणून आहे ....अप्रतिम! वेज आणि नोन व्हेज दोन्ही + व्हेज क्लीअर सूप अहाहा !
वडा पाव म्हणाल तर जोशी वडे वाले आहेत पण रोहित वडे पण मस्त लागतात.
बाणेर रोड वरचा डोमीनोचा burst पिझ्झा तर लई भारी ! सध्या परदेशात असल्याने फक्त आठवणी जवळ आहेत ....!
तै, तो फोटो हलवा इथून.. अक्षम्य जळजळ!!!!!!!
** अरेच्चा.. अगदी हाच फोटो मिपावरील वरच्या बॅनर मध्ये पण दिसतोय.. (कधी पुस्तकविश्व तर कधी मिसळपाव असं..) पावाच्या शेपवरुन तर पक्की खात्री झाली ;)
.
पोटपुजेची ठिकाणेचांगली मिसळ, वडा, भजी कुठे मिळते ?
या दोन धाग्यावरची माहिती वाचुन आता कुठे जायचे कळेनासे झाले आहे.
शहर, पत्ता, खाण्याचे पदार्थ अश्या क्रमाने मार्गदर्शक पुस्तक (त्याला मराठीत "गाईड" म्हणतात) बनवले तर खूप उपयोग होईल.
(कॉम्प्युटरवर कोण काम करून देउ शकेल हे सगळ्यांना माहीत आहेच). ;)
सहज हा धागा पाहिला.. पुन्हा वर काढत आहे.. कोणाला काही हेल्प मिळेल या अनुशंघाने..
लवकरच.. जुनी-नवी ठिकाणे मिळुन सुची करण्याचे काम हाती घ्यावे म्हणतो.. कोण तयार असले तरी चालेल
हॉटेल शिवेंद्र (कोंढवा -फुरसुंगी रोड)- मटण दालचा एकदम खल्लास !
जगदंबा ,खेड शिवापूर - मटण भाकरी तुपातला भात जबरी, आजपर्यंत अनेक ठिकाणी मटण भाकरी खाल्ली, त्यात इथली झकास होती.
भोर कडून वरंध घाटाकडे जाताना आपटी गावाच्या पुढेच एक मटण खानावळ आहे, बोउल भर मटण आणि रस्सा कितीबी वरपा, ठिकाणहि निसर्गरम्य नदीला लागुनच
तोरणा आणि वेल्ह्याची भटकंती 'स्वप्नील' शिवाय पूर्ण नाहीच, इथली मटण भाकरी उत्तम, मिरच्या घातलेलं आम्लेट पण मस्त…आणि जाताजाता तिथला चहाही !
पुण्यातील अलका चोकातील रिगल हॉटेलजवळ गौरीशंकर नावाचे छोटेसे दुकान आहे तेथील पोहे अप्रतीम असतात. शिवाय साबुदाणा खिचडी, उपमा व शिरा देखील बेस्ट. जंगली महाराज रोडवरील सोहम व मथुरा एक नं. पेरुगेट पोलिस चौकीजवळील साईबा मधील भडंग भेळ व पाणीपुरी खूप आवडीची. गिरीजा मधील मेथी पिठलं व भाकरी म्हणजे स्वर्गच. मुंबईमध्ये माटुंगामध्ये इडली हाउस मध्ये खाल्लेली इडली व त्याचा अजून एक प्रकार (नाव आठवत नाही) क्लासच. अशी चव पुन्हा कुठएही मिळाली नाही.
पुण्यातील कर्वे नगर मधील गिरिजाशंकर विहार सोसायटीजवळचा रोड, कि जो पुढे कॉर्पोरेशन बँक (जुनी भगिनी निवेदिता बॅंक) च्या दिशेनं जातो ,
तिथे तो रोड आडव्या रोडला T सारखा येऊन मिळतो , तिथे शिवदीप वडापाव ट्राय केलाय का कोणी ?
मला थोडा बरा वाटतो तो वडापाव.
https://goo.gl/maps/aWN3M2CAW9w
कर्वे रस्त्यावरून डेक्कन कडे जाताना सह्याद्री हाॅस्पिटल खाली बिपीन स्नॅक. ईडली ब. वडा पोहे मस्त मिळतात.
कासट च्या दुकानाशेजारून आत सीड ईन्फोटेक कडे जाताना भाडाईत मिसळ मिळते. अप्रतीम चव आहे.
ताथवडे बागे समोर मनिषा भेळ. रगडा पॅटीस सोडून बाकीचे पदार्थ छान.
ही झाली पुण्यातली यादी
सोलापूर बद्दल बोलायचं म्हणलं तर कन्ना चौकात मिळणारी पापु सारखी कुठेच नाही मिळत.
पुतळ्याला वळसा घालुन आपण आत ढंगे फर्नीचर कडे जाते त्याच कोपर्यावर हा पाणीपुरी वाला उभा असतो.
तळहात झाकला जाईल ईतकी मोठी आणी कडक पुरी आणी आतलं थंडगार पाणी.....
सात रस्त्यावर संगमेश्वर काॅलेज च्या लेडीज हाॅस्टेल शेजारी बाबुराव ची भेळ आणी कृष्णा फालुदा.
बाळे गावात बारशी रोड ला असणारा हज्जू चा वडापाव आणी भजी.
अगदी पुर्वी मी लहान असताना नव्या पेठेत एक स्वीट मार्ट होत. तिथली कचोरी फार फार आवडायची.
झालच तर चित्रमंदिर च्या कॅन्टीन चा (जिथे आता इंदोर कपडा सेल लागतो) त्याचा सोडा.
गदग चा डोसा.
ह्या सगळ्यात एक लई महत्त्वाचं ठिकाण रायल.
मंगळवार पेठ मीठ गल्लीत असलेलं सुधा ईडली गृह.
अरे वा मौताई,
पक्के सोलापूरकर तुम्ही. चक्क हज्जूचा वडापाव म्हैते म्हणजे काय. आहे अजून हज्जू बरका. साधीशी टपरी आहे पण धंदा जबरदस्त.
कना चौकातल्या पापुची हेड ब्रँच दाजी पेठेत. बालाजी मंदिराजवळ चौकात. त्या चौकातून पुढे गेले की एक भज्यांचा अड्डा आहे. पातळ पुदिना चटणी आणि कुरकुरीत भजी.
रायचूर भजी म्हणजे कोळाच्या मिरच्यांची दांडगी आंध्र भजी पण मिळतात.
इंदूर कॉटनपासले लोमटेचे प्रजा कोल्ड्रिंक बंद झाले. ते कन्न चौकात आलेय. पापुची गाडी आहे तिथेच. अक्सीस बँकेसमोर.
कोथरूड पुणे येथे कोकण एक्सप्रेस च्या डायगोणली समोर, स्फूर्ती मिसळ मधे हिरवट पोपटी टिंज ग्रेव्ही वाली मटार उसळ मिळते, अगदी ग्रेट नाही, पण तेच अन तेच लाल भडक ग्रेव्ही ला जर कंटाळला असाल तर् ट्राय करून पाहा....
अरे मी बाळेकरच आहे. बाकी चिकीता चा ऊल्लेख कसा काय राहुन गेला कुणास ठाऊक. आद्य हाॅटस्पाॅट होता तो. अजुनही असावा . अर्थात महिना अखेरीस येणार आहे तेव्हा समक्ष जाऊन बघते.
प्रतिक्रिया
शिरुरवरुन नगरकडे जाताना सुपे
नगर शहरात बहुदा नव्यानेच
भेळ १. नारायणगाव येथे कोठेही
५. गणेश भेळ, पुण्यात कोठेही
नाही नाही आमची नाही ती
हाण्ण तिच्यायला!
गाववालं लोणी भापकर ला
नारायणगाव. खेड, मंचर, चाकण या परिसरात
मटकी भेळ भामला (चाकणच्या पुढे
मासवडी म्हणजे काय ?
चला आता २-३ दिवस नाहिये
आता जरा सातारला जाउ.
वाहवा.. कणशाकडे.. रोटी आणि
सेम टु सेम हिअर
माझं गाव विदर्भात - उमरखेड
स्वप्नील भाउ , येवुद्या आनखिन
बरं आहे हा धागा
तात्या कसा दिसत नाही?
गिरगाव चौपाटीसमोर
धन्यवाद भाई..
चला तुमच्या प्रश्नामुळॅ कँडल
ज्वेल ऑफ इंडिया?
पोटपूजा !
सिने मे जलन..
ती बाकीचं राहु द्या बाजुला.
पुस्तक अथवा फाईल (कॉम्प्युटरवर) बनवा
सहमत..
पुढच्या आठवड्यात वेळ मिळताच
मुंबईतील पारसी डेअरी म्हणजे
Ninad - You too???????????
चव
खाते रहो
सहज हा धागा पाहिला.. पुन्हा
कराडला गेलात तर दत्त चौकात
मटण स्पेशल !
शालू
डोम्बिवली जवळ...
पुण्यातील आठवणी
पुण्यातील कर्वे नगर मधील
बाकी भेल खायची तर मुंबईत फोर्ट मधील विठ्ठलची.
मला माहीत असलेली
अरे वा मौताई,
उसाचा रस प्यायचा तर
(वारजे पुणे) येथील एकदा हा
कोणीतरी आता नवीन धागा (पुढचा
कोथरूड पुणे येथे कोकण
अभ्यादादा
बाळेकरच म्हणजे काय ?
बाळे गावच्या.