Skip to main content

पोटपुजेची ठिकाणे

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 09/12/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
रोमनाचा धागा बघितला .. आणि वाटले ज्याला जिथले पदार्थ आवडतात तो येथे त्या ठिकाणाची माहिती लिहिन .. त्यामुळे केंव्हाही कोठे ही महाराष्ट्रभर फिरलो तरी कळेल की कोठे काय छान मिळते. परवाच एका च्या सांगण्यावरुन .. शिंदेवाडिच्या पुढे कैलास मध्ये रात्री जेवन केले पिठल भाकरी थाली अआणि इतर महाराष्ट्रियन पदार्थ .. जबराट आहे एकदम सगळे .. असो ... खालील माहितीचा बाकीच्यांना उपोयोग होयील असे वाटते. ------------------------------------- मिसळ : १. सिन्नर ची मिसळ ही अतिशय उत्कृष्ठ आहे असे मला वाटते.. नंतर नाशिकची .. २. कोल्हापुरची मिसळ खुप प्रसिद्ध आहे , पण मी कोल्हापुरमध्ये मेन ठिकाणी खाल्ली नसेन म्हणुन येव्हडी आवडली नाही, शिवाय त्याबरोबर ब्रेड होते म्हणुन मज्जा आली नाही. (कोल्हापुरला २ दाच गेलो आहे फक्त म्हणुन माहीती नाही काही) ३. पिंपरी-वाघिरे ( पिंपरी-चिंचवड, निअर पिंपळे सौदागर, पुणे) - जनता मिसळ हाउस मध्ये खुप भारी मिसळ मिळते .. दर विकएंड ला जातो मी घरी गेल्यावर.. मसाला ते कोल्हापुर मधुन मागवतात आणि फरसान घरीच बनवतात म्हणुन तर खुप जबरी लागते ... जवळच तेथे निसर्ग म्हणुन हॉटेल आहे तेथे ही छान मिळते मिसळ. बाकी अजुनहि खुप भारी ठिकाणे असतीलच ... वडापाव : १. कृष्णा वडापाव- सारंग, सहकारनगर - मला येथील वडापाव खुप आवडतो. तळजाईला जाताना हमखास येथे वडापाव खातोच .. खुप मोठी रांग असते येथे.; २. अहमदनगर : येथील एका चौकातील वडापाव खुप फेमस आहे, पण नेमके नाव विसर्लो त्याचे .. नगरकरांनी सांगावे .. खुप पुर्वी गेलो होतो म्हणुन आठवत नाहिये . ३. कुंजविहार, ठाणे पश्चिम. पिठल भाकरी /शेव भाजी १. सोहम , डेक्कन जिमखाना, पुणे २. कैलास , निअर शिंदेवाडी आणि निअर खेड शिवापुर, मुंबई-बँगलोर हायवे. चहा : १. टिळकरोड, पुणे येथील कुठल्याही अमृततुल्य मध्ये , खास करुन टिळक येथे आणि शक्तीस्पोर्ट समोर ( बहुतेक नाव : आंबाई आहे.. देवीचे नाव आहे हे नक्की पण) २. त्रिवेणी : जंगली महाराज रोड. ३. भवानी : गजानन महाराज मठा शेजारी.. पर्वती पायथ्याकडुन मठाकडे येताना. (क्रिमरोल पण खुप छान आहे इथला). ४. माऊली : पिंपरी-वाघिरे ( पिंपरी-चिंचवड, निअर पिंपळे सौदागर, पुणे) तवा सुरमई: १. पुना गेट , निगडी. NH4 पुणे -मुंबई हायवे. ( नक्की खा, मी कायम खातो .. खुप वेगळी अआणि मस्त आहे. मुंबईत ही नाही मिळाळी अशी अजुन. चिकन/चिकन थाली १. हॉटेल सिंधुदुर्ग, निअर शिवसेना भवन, दादर , मुंबई. २. गोमंतक , दादर , मुंबई. ३. गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर, पुणे. (मुर्ग मसल्लम) - बाकी आठवेन तसे देइन .. आपण ही आपल्या जवळील माहिती द्यावी (नोट : असो आपली माहिती देत रहा अशी विनंती .. आणि आम्हीच दिलेले भारी आणि तुम्ही दिलेले टुकार असे म्हणुन भांडन करु नये ही सुचना )

वाचने 61625
प्रतिक्रिया 199

प्रतिक्रिया

In reply to by रेवती

दादरला कैलास नाथ ची लस्सी फेमस हि लस्सी पिण्यापेक्षा खायची असते चमच्याने (आमच्या डोंबिवली पूर्व ला एक शाखा आहे त्यांची ) ती पण जाम आवडते .आणि सी एसटी स्टेशन समोरील जे खाण्याचे स्टोल आहेत तेथील SANDWICH पण आवडतात .तिला .मला मात्र हाजी आली दर्ग्याच्या जवळ असलेले ज्यूस व SANDWICH आवडतात .त्याचा मुलगा शेट्टी माझ्या वर्हात होता हॉटेल मेनेज मेंट च्या वेळी .

In reply to by निनाद मुक्काम …

दादरला कैलास नाथ ची लस्सी फेमस हि लस्सी पिण्यापेक्षा खायची असते चमच्याने ह्या लस्सीत ती घट्ट होण्यासाठी टिश्यु पेपर वापरत होते असे ऐकले आहे. जेंव्हा ही गोष्ट बाहेर आली तेव्हापासुन कैलास लस्सी कुप्रसिध्द झाली.

कोल्ड कॉफी १. दुर्गा , MIT जवळ, पौड रोड, पुणे. स्ट्राबेरी विथ क्रीम १. महाबळेश्वर (नादच नाय ) आंबरस / महाराष्ट्रीयन डायनिंग थाली १. दुर्वांकुर, टिळक रोड, पुणे २. मथुरा, जंगली महाराज रोड, पुणे. (आंबरस असताना फक्त आंबरसाच्याच १५ वाट्या तरी संपवायचो मी.. आता ह्यावेळेस पुण्यातच राहयला आलोय म्हंटल्यावर मस्त घरीच आंबरस हाणीन ... हॉटेल मध्ये जावुन खायची वेळ कमी यीइन .. पण जे पुण्यात घरच्यांबरोबर नाही राहत त्यांनी मनसोक्त आंबरस खायला जा नक्की )

In reply to by गणेशा

कोल्ड कॉफी १. दुर्गा , MIT जवळ, पौड रोड, पुणे.
२. ज्ञान प्रबोधीनी चौकात, द मोबाईल शॉप समोर, दुकानाचं नाव नाही माहीती.

पोटपुजा म्हटल्यावर मला भलतीच पूजा आठवली. असो. खाण्यासाठी मला स्वतःच्या घरचंच आवडतं. आधीच माझे खाण्यापिण्याचे हजार नखरे, आणि ते सगळे इतरांना समजून सांगण्यापेक्षा स्वतःचं स्वतः करून खाल्लेलं उत्तम!

In reply to by धमाल मुलगा

>आधीच माझे खाण्यापिण्याचे हजार नखरे, आणि ते सगळे इतरांना समजून सांगण्यापेक्षा >>अभिनंदन! 'र' राहिला का रे?

In reply to by श्रावण मोडक

ओ गपा ना. ती टेक्सासमध्ये आहे. घोड्यावरुन येऊन गोळ्या घालेल ना. ;) -(द बॅड) धम्या पाब्लो.

र्धा डोंबिवली व अर्धा मुंबईकर आल्याने मुंबईतील काही जागा सांगतो .बाकी लेखाच्या मालकाने मुंबईतील सिंधुदुर्ग व गोमंतक ची चव चाखलेली दिसते .पण सागायला वाईट वाटते ह्या दोन्ही हॉटेल वाल्यांनी आपला दर्जा अत्यंत ढासळला आहे .आता जर रुचकर व चविष्ट नॉन वेज खायचे असेल तर कॉपर चिमणी कबाब साठी बडे मिया (ताज हॉटेल च्या पाठच्या गल्लीत ) व अवचट ह्यांचा दिवा महाराष्ट्राचा जरूर चाखावी .वडापाव ठाण्याचा ओके पण दर्जेदार म्हणजे दादरचा आयडील च्या गल्लीत श्रीकृष्ण (अजून दर्जा राखून )मामा काणे (दर्जा राखून ) व मुंबईत वडापाव स्पर्धेत दुसरा आलेला कीर्तीचा कॉलेजचा वडापाव (हा वडापाव दादरला समुद्रकिनारी असलेल्या कीर्ती कॉलेज च्या गल्लीत असल्याने त्याचे नाव आपसूकच कीर्तीचा वडापाव असे झाले .मुंबईत नंबर १ वड्याचा किताब जुहू येथील मिठीबाई ह्या हाय फाय कॉलेजच्या समोरील वडापावने पटकावला (अर्थात त्याने वडापाव वर बरेच प्रयोग केले आहेत जसे अमूल बटर व अजून बरेच अर्थात त्यामुळे माझ्या मराठी जिभेला तो रुचला नाही .अजून शाहीद कपूर तेथे वडा ख्याला येतो असे ऐकून आहे . बाकी भेल खायची तर मुंबईत फोर्ट मधील विठ्ठलची .बाकी पावभाजी मुंबईतील खाऊ गल्लीतील .(अजून दर्जा राखून आहेत .)

In reply to by निनाद मुक्काम …

>> बाकी भेल खायची तर मुंबईत फोर्ट मधील विठ्ठलची. बाकी पावभाजी मुंबईतील खाऊ गल्लीतील प्रचंड सहमत! विठ्ठलला तोड नाही! सुपरहिटच! खाऊगल्लीतली पावभाजीही सुपर चवीची असते! यावरून कसं तरी आठवलं, अंधेरी स्टेशनला १ नंबर प्लॅटफॉर्मवर मेन एन्ट्रन्सच्या डाव्याबाजूला जे रेल्वे कँटीन आहे त्याच्याकडे रगडा-पाव तुफान हिट मिळतो! इतर ठिकाणी गोरेगाव, पार्ल्यालाही ट्राय केले पण मजा नाही आली! हा सॉल्लीडच बनवतो! तसंच अंधेरी स्टेशनच्या बाहेर पश्चिमेला, आदर्श रेलवे कँटिनसमोर, मोठ्या फूटओव्हर पुलाच्या पायाकडे रात्री बारानंतर तवापुलाव/भुर्जीपावची गाडी लागते! त्याच्याकडचा तवापुलाव भारीच!

In reply to by मेघवेडा

प्रचंड सहमत! विठ्ठलला तोड नाही! सुपरहिटच! खाऊगल्लीतली पावभाजीही सुपर चवीची असते! जोकुणी ह्या वरील पदार्थ खाणार तो असहमत होउच शकत नाही.

In reply to by मेघवेडा

यावरून कसं तरी आठवलं, अंधेरी स्टेशनला १ नंबर प्लॅटफॉर्मवर मेन एन्ट्रन्सच्या डाव्याबाजूला जे रेल्वे कँटीन आहे त्याच्याकडे रगडा-पाव तुफान हिट मिळतो! इतर ठिकाणी गोरेगाव, पार्ल्यालाही ट्राय केले पण मजा नाही आली! पुर्वी गोरेगावच्या ठ्क्करकडे रगडा पॅटीस, पाणिपुरी/शेवपुरी प्रकार चांगले मिळायचे. आता अजून आहे त्याची क्वालिटी?????/

In reply to by चिंतामणी

ठक्कर म्हणजे ग्रामपंचायत रोडवरचा ना? त्याच्याकडे रगडा पॅटीस खाल्लेलं आठवतं. आता असतो का तेही माहिती नाही.

अवचट ह्यांचा दिवा महाराष्ट्राचा जरूर चाखावी कुठे आहे हा दिवा. पत्ता सांगता का?

In reply to by विलासराव

A restobar owner Dr. Suhas Awchat of Diva Maharashtracha writes a letter to Rajesh Tope Minister of Higher and Technical Education and have decided to file a petition in the court to make regional Maharashtrian cuisine as a compulsory subject, the institutes believe it is sensible to do such only when there is scope for their students having number of outlets providing Marathi cuisine. However, few Marathi dishes are taught in the second year of the degree course in a subject food production. http://www.divamaharashtracha.com/a/Cook%20Book.html मराठी माणूस व मराठी खाद्य संस्कृतीचा प्रचंड अभिमान असणार्या ह्या अवचट दांपत्याने मराठी जेवण पेज ३ वर आणले .पण दर मात्र कुठल्याही पॉश उपहारगृहात असतात .त्यापैकी कमी आहेत . ह्यांनी मराठी माणसाला नोलात २५% सवलत जाहीर केल्याने प्रचंड खळबळ उडाली होती .

@अंधेरी स्टेशनला १ नंबर प्लॅटफॉर्मवर मेन एन्ट्रन्सच्या डाव्याबाजूला जे रेल्वे कँटीन आहे च्यायला हे नवीन आहे .एरवी मी रेल्वे कँटीन टाळतो .पण येत्या भारत भेटीत नक्की बाकी टिपिकल डोसा खायचा तर रुईयाचे कॉलेजच्या बाजूचे मणी (अजूनही हवा तेवढा सांभार तोही फुकट आख्या मुंबईत तिथेच मिळतो . आमच्या मासाहेब जेव्हा रुईयात होत्या (आमच्या नशिबी हे भाग्य नव्हते )पण काट्यावर पडीक असायचो . एकदा आई समवेत मानिज मध्ये गेलो .नि आई म्हणाला चवीत अजिबात फरक नाही .बाकी डोसेवाले उडपी पद्धतीने डोसे बनवितात .मानिज आपले वेगळेपण जपून आहे .बाकी कट्या मागील डीपीज मध्ये उत्कृष्ट असे फास्ट फूड व अनेक मराठी सिनेतारिका ज्या नाट्य व सिनेमा व टीवीवर दिसतात .त्यांना भेटण्याचा .नशीब असेल तर प्रत्यक्ष बोलण्याचा चान्स मिळतो .म्हणून जायचो . रेल्वे कँटीन मधील काश्मिरी सोडा हे एक भन्नाट रसायन आहे .(येत्या भारत भेटीत त्याला काश्मिरी का म्हणतात ह्याचा शोध घेईन अरे मेधवेध अंधेरीत राहतो आणि स्टेशन समोरील इराण्याला का विसरतो (तो अजूनही असावा असा जबरी आशावाद मनी बाळगून ) बाकी ईशान्य मुंबईत चेंबूर स्टेशन च्या बाहेर सदगुरू ची पावभाजी मस्त बाकी मुंबईत कोणत्याही भटाचा चहा ज्याचा दुकानाच्या सुरवातीला शंकर कैलास अशी नावे असतात त्याचा प्यावा .

In reply to by निनाद मुक्काम …

अहो, मानिज नव्हे त्याचे नाव. स्वच्छ 'मणी' असे आहे (आणि 'मणी'चे म्हणून मणीज). आता दस्तुरखुद्द मणी तिथे असेल असे वाटत नाही.
.बाकी डोसेवाले उडपी पद्धतीने डोसे बनवितात .मानिज आपले वेगळेपण जपून आहे .
हे समजले नाही. मणी अगदी खास उडुपी आहे, ज्याप्रमाणे माटुंग्याचे इतर खास इतर काही उडुपी आहेत (रामा नायक, कॅफे म्हैसूर, कॅफे मद्रास, शारदा, अंबा भुवन, आनंद भुवन) तसाच मणीही. डी. पी. आता पार 'बिघडले' आहे, पूर्वी तोही एक साधा उडुपी होता. पण त्याने धंदा कसा जोरदार एक्सपांड केला आहे! त्यापलिकडचे मराठी दुकानदार ('जयेश मिल्क बार') केव्हाच आले आणी गेले, मणी आणि डी. पी. टिकून आहेत-- मणी अगदी मूळ स्वरूपात, डी. पी. बदललेल्या! बाय द वे, रूईयाचा 'कट्टा' नव्हे, त्याला 'नाका' म्हणतात!

In reply to by प्रदीप

वरील प्रदीप यांच्या सुधारणा बरोबरच आहेत. रुईया नाक्याला वळसा घालून मागच्या अंगाला गेले की शेरीज फास्ट फूड बार, चायनामन इन्डो-चायनीज रेस्तराँ आणि त्यांच्या बरोबर समोरच फूटपाथवरचा पाणीपुरीवाला, यांच्याकडे चक्कर टाकायला विसरू नये! शेरीज आणि शिवाजी पार्कचे टिब्ज यांच्याकडे मिळणारा फ्रँकी पदार्थ ही दोन ठिकाणे सोडून जगात इतरत्र कुठेही तितका 'बेस्ट' मिळत नाही, असे माझे मत! :) (दादरकर)बेसनलाडू सेरेपी यांनी काढलेल्या मसाला पाव आणि फ्रूट बिअर च्या आठवणीने डोळे पाणावले! (स्मरणाशील)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

बरोबर आहेत म्हणजे? असणारच-- तिथे, त्या नाक्यावर कॉलेजातील ६ वर्षे फुल्ल्टाईम व नंतर अनेक पार्टटाईम घालवलीयत ना! :) शेरीज आणी चायनीज वगैरे माझ्या वेळच्या नंतर आले, तेव्हा ते नव्हते. अगदी पूर्वी (म्हणजे मी शाळेत जायचो तेव्हा) डी. पी. ही नव्हतेच. तिथे 'कॅफे राम' ह्या धेडगुजरी नावाचा इराणी होता. मी कॉलेजात जायच्या एखाद-दोन वर्षे अगोदर तो गेला व डी. पी. आले. खरे तर त्याचे 'डी. पी.' हे संक्षिप्तकरण आमच्या बॅचने केले असावे. त्या परिसरात अजून एक इराणी होता तो, ए. वन. ट्रेडर्सच्या शेजारी. तसेच पोदारच्या शेजारील गल्लीत एक इराणी (कॅफे गुलशन?) अजून टिकून आहे. दादर स्टेशन (पूर्व) च्या बाहेरील इराणी आहे का गेला? टिब्सच्या फ्रँकीची आठवण खासच. माझ्य आठवणीप्रमाणे त्यांचे सर्वात पहिले आउटलेट चर्चगेट स्टेशनात आले. ब्रेबॉर्नवर मॅचला जातांना अथवा ब्रिटीश काउन्सिलला जातांना मधे हे एक मोठे व महत्वाचे आकर्षण असे. नंतर शिवाजी पार्कला फ्रॅन्कीचे दुकन आले, ते अजूनही आहे का? शिवाजी पार्क जिमखान्याच्या कँटिनमधे वडा उत्कृष्ट मिळे. तसेच केरळ समाजला लागूनही एक वडापाव वाला तेव्हा असे. अजून एका इराण्याचा उल्लेख आवर्जून केलाच पाहिजे. तो म्हणजे शिवाजी पार्काच्य स्विमींग पूलला लागून होता. तेव्हा (७०-७३ सालात) त्याच्याकडे वडा छान मिळे. पण त्याचे मुख्य आकर्षण म्हणजे त्याच्याकडे असलेला ज्यूक बॉक्स, आणि जुन्या गाण्यांच्या रेकॉर्ड्सचा त्याचा ग्रेट संग्रह. त्यासाठी तिथे रोज संध्याकाळी जोरदार गर्दी असे. एक टेबल पकडून बसावे, एखादा वडा किंवा चहा घ्यावा आणि एक-सो-एक जुनी गाणी ऐकावीत. त्य गर्दीत शिरीष कणेकरांनाही अनेकदा पाहिल्याचे आठवते.

In reply to by प्रदीप

गुलशन अजूनही आहे, असे स्मरते. दादर (पूर्व) स्टेशनबाहेरचा स्वामीनारायण मंदिरासमोरचा इराणी जाऊन तिकडे 'शुभम' नावाचे उपाहारगृह झाले आहे. बकवास आहे; पण स्टेशनच्या बाहेरच असल्याने चहाकॉफीसाठी चटकन आत शिरणार्‍यांसाठी किंवा त्यातल्या त्यात स्वस्तातली राईस प्लेट खायची असणार्‍यांसाठी बरे म्हटले पाहिजे. स्टेशनकडून उजव्या हाताला हिंदमाताच्या दिशेने चालल्यावर कैलास लस्सीवाला!! त्याच्या समोरच 'शापूर' नावाचा दुसरा इराणी होता, तो अजूनही टिकून आहे. पण आता तो फक्त नावालाच इराणी आहे आणि त्याच्याकडे जरा जास्तच पंजाबी पदार्थांची रेलचेल आहे. कैलासची लस्सी मात्र अजूनही प्रसिद्ध! परवडत असेल तर सरळ महाराजा लस्सी मागवावी :) ९१-९२ च्या दंगलीत काही नराधमांनी 'कैलास'ला आग लावून राख केले होते; पण परत उभे राहिले. शापूरचीही मोडतोड केली होती, पण जाळपोळ नाही. शिवाजी पार्कचे टिब्ज अजूनही आहे; आणि अजूनही प्रचंड गर्दी खेचत असते. (दादरकर)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

प्रतिसाद दोनदा प्रकाशित झाल्याने काढून टाकला आहे.

In reply to by बेसनलाडू

शेरीज मधे झुरळांचा मुक्त संचार पाहील्यानंतर तिथल्या फ्रँकिज खाववल्या नव्ह्त्या :-(...अर्थात, त्यामुळे आम्ही डि.पीजच्या जमिनीकडे पाहणं बंद करुन टाकलं लग्गेच!

In reply to by निनाद मुक्काम …

>>> रेल्वे कँटीन मधील काश्मिरी सोडा हे एक भन्नाट रसायन आहे .(येत्या भारत भेटीत त्याला काश्मिरी का म्हणतात ह्याचा शोध घेईन --- मणी'ज् आणि काश्मिरी सोडाच्या उल्लेखावरून आठवलं. मणी'ज् च्या शेजारच्या दुकानाता हा 'फॉल्स सोडा' म्हणून बोर्ड पाहिला होता. कुतूहल म्हणून मागवल्यावर ते काला खट्टायुक्त मिश्रण निघाले :) False_Soda

In reply to by चिंतामणी

आज इतके दिवसांनी एरवी गोड लागणारा (म्हणजे गोड मानून घेतलेला )पास्ता आज बेचव वाटला .असे वाटले ने मजशी ने परत मात्र भूमीला सागरा प्राण तळमळला (भारतीय खाण्यासाठी ) कुठे सावरकर कुठे आम्ही आमची झेप उदर भरण नोहे इतकीच

पुणे,नगर आणि मुंबईच्या बाहेर लोक उपाशी राहतात की काय असं वाटेल वरचे प्रतिसाद पाहुन,म्हणुन हे घ्या. सोलापुर - १. लकी चॉकातुन एमएसईबीच्या ऑफिसच्या बाजुने (महिंद्र्करबिल्डींग) नवी पेठेत जाताना पहिल्या उजव्या बोळात पुनम इडली मध्ये इडली / मेदु वडा व चटणी. २. गंगा विहिरीजवळ अण्णाची भजी. ३. साखर पेठ सुत मार्केट जव़ळ बटाटा भजी. ४. पार्क चॉपाटीची डिस्को भजी ५. हरिभाई देवकरण च्या भॅयाची भे़ळ व पाणिपुरी. ६. हुतात्मा बागेच्या गेट्जवळचा चव्हाण कडे बेसन भाजी घातलेली कचोरी व पाव चटणी (बेसन भाजी ही फक्त सोलापुरची पेशलिटि आहे) ७. विजापुर वेशीतला खिमा ( इथे मटण नेउन द्यावे लागते, खिमा करुन मिळतो) ८. किल्यासमोरची सुप्रिया पावभाजी व मस्तानी ९. चाटी गल्लीत काका हलवाई कडे पुरी भाजी व कुंदा १०. नवी पेठेत भाग्यश्री बटाटेवडा व चिवडा. ११. लांबोटीचा मक्याचा चिवडा , कुंदा , मस्का स्लाईस व चहा १२ पंढरपुरच्या अकबर टॉकीज शेजारची मस्तानी १३. कोंडीच्या नसले बंधु कडचे पिठलं भाकरीचे जेवण १४. भिगवण ज्योती मिस़ळ १५. किल्यासमोर सिद्धेश्वरचा चहा १६. जुनी मिल एमएसईबि ऑफिस कँटिन्चा चहा. १७. भवानी पेठेतिल गुलाब केटि - हा चहाचा प्रकार आहे, ज्याच्या दुधात गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या असतात. १८. सोलापुर एसटि स्टँड्च्या समोर मिळणारा रु. २ चा चहा व साखर पेठ शॉपिंग सेंटर मधला जनता चहा - हा २००९ पर्यंत रु. १ फक्त प्रति कप होता, पण चव अम्रुततुल्य सारखीच. १९. सोलापुर-उस्मानाबाद बॉर्डरच्या पठाणची पुरी भाजी व चहा. २०. सोलापुर सावरकर मॅदान जव़ळ वसंत पॅलवान कडे आंबा आईस्क्रीम . २१ जोडबसवण्णा चॉकात महेबुब कडे चहा व क्रिमरोल आणि लस्सी - ही खायची असते २२. स्टेशन जव़ळ्चं सुगरण यापॅकी किमान १०- १२ आयटेम झाल्याखेरीज माझी सोलापुर ट्रिप पुर्ण होतच नाही. ही साठा उत्तरी कहाणी एकविसा उत्तरी सुफ़ळ क्रमशः हर्षद.

In reply to by ५० फक्त

हर्षद, बरीच मोठी लिस्ट दिलीस. मस्तच. मी सोलापुरात सुधा इडलीगृहात जाऊन इडली खाल्ली. इडली-चटणी-सांबार याबरोबर चटकदार, झणझणीत लाल मिरचीच्या बियांची कोरडी चटणी. नंतर ताजे लोणी-साखर लावलेल्या ब्रेड स्लाईस (मस्का-पाव). आत्मा सुखावला. किल्ल्याच्या समोरचा चहा अफलातून. पण तिथे आम्हाला मारामारी (चहा+कॉफी मिश्रण) घेण्याचा आग्रह झाला. तो प्रकार पण सुंदर. बाकी सुप्रजाची पावभाजी लाजवाब. ज्वारीची पातळ कडक भाकरी आणि शेंगदाणा चटणी केवळ अप्रतिम. सोलापूरकर खरंच सुखी आहेत.

In reply to by योगप्रभू

सिद्धेश्वरचा मारामारी पण फार प्रसिद्ध आहे. गुलाब केटी सारखाच मारामारी पण सोलापुरचा पेश्शल आहे. मी सोलापुरात असताना माझं ऑफिस सावरकर मॅदानाच्या जवळ होतं आणि कामासाठि सगळ्या जिल्ह्यात फिरायचो, त्यामुळे त्यावेळी जिभेचे चोचले फार पुरवले आहेत. हॉटेल ते टप-या कुठेही कुणीही सांगितलं की लगेच ट्राय करायचो. या यादीत अजुन भर घालतो आहे. हर्षद.

In reply to by ५० फक्त

सोलापुरात कधीच आजुन गेलो नाही... पण सोलापुरच्या खाण्याबद्दल आणि चटणी बद्दल बरेच ऐकुन आहे. तुम्ही दिल्याने छान वाटले .. आणि तुम्ही म्हणता तसेच टपरी-पासुन -- हॉटेल पर्यंत मी पण वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असतो.. मज्जा येते ..

In reply to by चिंतामणी

नाव आठवत नाही आता. माझी माहिती जवळपास ५-६ वर्षांपुर्वीची आहे. एका सरदारजीचं हॉटेल होतं. पण ब्येस जेवण होतं. जेवणाचा हॉल पहिल्यामजल्यावर होता इतकंच आठवतंय. अधिक माहितीसाठी: कॉलिंग जयपाल...कॉलिंग जयपाल... :D

In reply to by ५० फक्त

मी हजार ठिकाणी खीमा (मटण ) खाल्ला असेल पण सोलापुरच्या कॅफे स्माईल (नक्की नाव आठवत नाही) सारखा खीमा आणि रेशमासारखी मऊ पोळी त्याबरोबर हिरव्या मिरच्या, गार चिरलेला कांदा आणि बीर. हे जेवण मी कधीही विसरू शकत नाही. शेवटी एग पुडींग... जाऊदेत नको त्या आठवणी.... कारण आता ते जेवण परत कधीच मिळणार नाही. बंद झालं ते हॉटेल.....

In reply to by जयंत कुलकर्णी

निषेध निषेध निषेध! आधी एव्हढं रसभरीत वर्णनं करायची आणि शेवटच्या वाक्यात टप्पकन 'बंद झालं ते हाटेल' असं सांगून आमचा पोपट करायचा. :( हे काय बरं न्हवं कुलकर्णीआप्पा :)

In reply to by ५० फक्त

हुतात्मा बागेच्या गेट्जवळचा चव्हाण कडे बेसन भाजी घातलेली कचोरी व पाव चटणी (बेसन भाजी ही फक्त सोलापुरची पेशलिटि आहे) ५० फक्त आणि तमाम सोलापूरकर, ही बेसन भाजी कशी बनवायची ? जेंव्हा मिळत होती तेंव्हा पाककृती विचारली नाही आणि आत इथं मिळत नाही पण बनवायची आहे.

पुण्यात लक्ष्मी रोडवर एल आय सी बिल्डिंग समोर ..हाय फॅशन जवळ.. सिटी ज्वेल म्हणून बिल्डिंग आहे त्यात दुसर्‍या मजल्यावर 'भगत ताराचंद' नावाचे वेज रेस्टॉरंट आहे. अफलातून राजस्थानी जेवण मिळते. भरपूर तूप लावलेली पोळी , मस्त गारेगार ताक ह्याबरोबरच खास राजस्थानी पध्दतिने बनवलेल्या भाज्या मिळतात . खूपच चविष्ट जेवण आहे तिथले.

In reply to by उपास

त्यातल्या जी. भगत ताराचंदमध्ये एकदा जेवणाचा योग आला होता. (क्रॉफर्ड मार्केट असं काहीसं स्मरतं.) प्रचंड फ्यान झालो. चक्क तुपात डुबिवलेल्या चपात्या. आणी ताक(गुज्जु : छांस) शेवटी २ गुलाबजाम. येक नवंबर जेवण रे बाबा.... लिवता लिवता किबोर्ड ओला झालाय(लाळेने) ! ;-) फुडच्या ट्रिपला फादर-मदर संगे जायचा विचार आहे.

फिश करी अ‍ॅन्ड राइस ... , पुणे, कन्या शाळेच्या शेजारी. भटांच मास्यांच हॉटेल !! तिथे सोलकढी, जिर्या-मिर्याची कढी ... खूप सुंदर.

शिरवळचा श्रीराम ..वडापाव...खाल्लाय का????? खुप छान असतो.. आणी आमच्या इथे शशीकाकाचे हॉटेल आहे तिथे पुरी भाजी खासच मिळते.

गोरेगाव वेस्ट ला ठक्कर कडे मस्त आम्लेट मिळते..२-३ आरामात खाल्ली जातात्.

वा, वा, वा. धागा आणि प्रतिसाद मस्तच. एवीतेवी मुंबईत जायचे वेध लागले म्हणून खादाडीच्या जागांची उजळणी करत होतोच, त्या यादीत आता बर्‍याच नावांची भर पडली. पश्चिम रेल्वेवरच्या/जवळच्या खादाडीच्या जागांची यादी करायची झाली तर 'ब्रिटानिया'चा या यादीत अग्रहक्क. धनसाक, बेरी नो पुलाव, पात्रानी मच्छी, कबाब इ. हादडून मग कॅरॅमल कस्टर्ड किंवा पारसी डेरीची कुल्फी खावी. मरिन लाईन्सच्या गेलॉर्ड बेकरीचे आणि चर्चगेटच्या सम्राट रेस्तराँच्या 210c केक-शॉपचे केक्स आणि पेस्ट्रीजही उत्तम. पारंपरिक मिठायांसाठी नाना चौकातलं आदर्श बेस्ट. पलीकडे स्टेशनजवळचं मेरवान इराणी हाटिलही मस्तच. ब्रून-मस्का, आम्लेट, चहा असा टिपिकल इराणी बेत आहेच, पण तिथले मावा केक खाल्ल्याशिवाय त्या दुकान-कम-हाटिलाच्या पायर्‍या उतरू नयेत. 'समर्थ'बद्दल पुन्हा लिहित नाही :). विठ्ठल पावभाजीचा उल्लेख आला आहेच, तशीच ताडदेवची सरदार पावभाजीही प्रसिद्ध. हाजी अली ज्युस सेंटर, बडे मियाँचे कबाब, चर्चगेट स्टेशनची फ्रँकी, सिंधी खाण्यासाठी कैलाश परबत, मंगळदास मार्केटकडचं राजधानी नाही तर पंचवटी गौरव हे आहेच; मात्र ग्रँट हाऊस कँटीनच्या खिम्याच्या आणि क्रॉफर्ड मार्केटमधल्या बादशाह कोल्ड्रिंक हाऊसच्या फालुद्याशिवाय ही यादी अपूर्ण राहील. त्यांचे वर्णन करण्यात शब्द खर्ची घालत नाही. परेल-एलफिस्टनच्या काही मालवणी खानावळी-कम-लंच होम्सशिवाय विशेष जागा माहीत नाहीत. दादरला अर्थात मामा काणे, छबिलदास/श्रीकृष्ण वडा, प्रकाश, सायबिणी, आस्वाद, गोमांतक, जिप्सी अशी मोठी यादी आहे. 'दिवा महाराष्ट्राचा'चं नाव वर आलं आहेच. माहीमचं अजून एक कारवारी हाटेल छान आहे, त्याचं नाव आठवून सांगतो. बांद्र्याला पूर्वेला हायवे गोमांतक आणि अस्सल केरळी खाण्यासाठी राईस बोट तर पश्चिमेला जरा जास्तच हाईप झालेली एल्को पाणीपुरी आणि कारावानसराई हे मुगलाई हाटेलही ठीकठाक. थडोमल शहानीकडचा जय सँडविचवाला मात्र ए-वन! खारला 'राजस्थान' हे नाव पाहून एस.व्ही. रोडवरच्या एका हाटेलात शिरलो होतो आणि नावाशी पूर्ण विसंगत पण चविष्ट मुगलाई जेवण मिळालं होतं. सांताक्रुझ पश्चिमेला योको सिझलर्स आहे, पण कोबे सिझलर्सची सर त्याला नाही. साठ्ये कालिजात असताना जीवनची थाळी, दीनानाथजवळचं शर्मा चाट हाऊस, रामकृष्ण आणि शिवसागरची पावभाजी असे वार लागायचे. मत्स्याहारी असाल तर गजालीला जायलाच हवं, फक्त रांगेत ताटकळण्याची तयारी हवी. अंधेरी पश्चिमेला, चार बंगल्याजवळचं स्टमक हे चायनीज खाण्यासाठी उत्तम. तसंच पुढे ओशिवर्‍याजवळचं 'जस्ट बिर्याणी' (ही ऐकीव माहिती. नाही तर अर्थातच दिल्ली दरबार). मालाड पश्चिमेला एम. एम. मिठाईवाल्याकडे छोले-भटुरे आणि दाट लस्सी चांगली मिळते. बोरिवलीला गोयल शॉपिंग सेंटरमध्ये एका छोट्या कोपर्‍यात मिळणार्‍या कच्छी दाबेली आणि मुंगभज्यांनाही न्याय द्यायला हवा. दहिसर चेकनाक्याजवळचं कोकणरत्न ठीकठाक, पण वर मेव्याच्या प्रतिसादात आलेल्या दालखिचडीसाठी ते विशेष आठवणीत :)

In reply to by नंदन

नंदन नंदन लै लै भारी! >> एवीतेवी मुंबईत जायचे वेध लागले म्हणून खादाडीच्या जागांची उजळणी करत होतोच, त्या यादीत आता बर्‍याच नावांची भर पडली. + १. आणि तू तर कहरच केलायस आता! बहुतेक ठिकाणी +१ आहेच! >> पलीकडे स्टेशनजवळचं मेरवान इराणी हाटिलही मस्तच. ब्रून-मस्का, आम्लेट, चहा असा टिपिकल इराणी बेत आहेच, पण तिथले मावा केक खाल्ल्याशिवाय त्या दुकान-कम-हाटिलाच्या पायर्‍या उतरू नयेत. मंगळवारी बंद असते. तेवढे टाळा.. माझा मागच्या वेळी मजबूत पोपट झाला होता. >> साठ्ये कालिजात असताना जीवनची थाळी, दीनानाथजवळचं शर्मा चाट हाऊस, रामकृष्ण आणि शिवसागरची पावभाजी असे वार लागायचे. इथे तर अगदी अगदी +१. जीवनची थाळी म्हणजे आहाहा! आणखी एक पार्ल्यातलं हमखास ठिकाण म्हणजे स्टेशनसमोरची प्रकाश मारवाडीची लस्सी! आणि बाजूचंच गोपाळ पानवाल्याकडचं मसाला पान! अहाहा! ज्जे व्वात! बाकी प्रतिसाद तर लै लै ब्येश्ट! प्रिंटआऊट काढून ठेवतो. मुंबैत पोहोचल्यावर प्लॅनिंग करताना काम येईल! ;)

In reply to by मेघवेडा

हे सगळे प्रकार जर मागल्या वर्षी माहित असते तर किती सोय झाली असती! मला आणि आईला एका दिवसासाठी मुंबईला जावं लागणार होतं पण आमचं काम झाल्यावर जेवायचं कुठे? हा प्रश्न सुटला नाही. आमचं काम दादर, माटुंग्याला होतं. आईच्या औषध गोळ्यांच्यावेळेस जर जेवण मिळलं नाही तर पंचाइत नको म्हणून शेवटी जाणं क्यान्सल केलं.नंतर समजलं कि तिथेही बरेच हाटेलवाले आहेत. मुंबईची फारशी माहिती नसल्याने असे झाले. नेहमी घरून स्वयंपाक करून डबा नेण्याची सवय मलाच मोडायला हवी.

In reply to by रेवती

खरं तर गिरगाव सोडलं तर दादर-परळ भागात मराठी जेवणाचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. चविष्ट पण काहीशा अप्रसिद्ध ठिकाणांची माहिती या दुव्यावर आहे.

In reply to by मेघवेडा

होय आणि दुपारी एक दोन पेक्षा उशीर केलात तर मावा केके संपलेच समजा.. एकदा ४०-५० आणले की २-३ दिवस पुरवून खायचे ;)

In reply to by नंदन

मुंबईचे समस्त इराणी हे एक आयकॉनिक वैभव होते. ते खरे तर इंस्टिट्यूशनच होते. अनेक कारणांनी ते आता काळाच्या उदरात लुप्त होऊ लागले आहेत. काहींनी धंदे बंदच केले (किंग्ज सर्कलवरील भांडारकर रोडच्या कोपर्‍यावरील कूलार, दादर टी. टी. वरील टिळक ब्रिजच्या पायथ्याकडे होता तो इराणी), काही बंद केले गेले (शिवाजी पार्कावरील इराण्याचे रेस्टोरंट जाळण्याचे व लुटण्याचे पातक काही मर्हाठी लोकांनी केले होते म्हणे!), काहींनी रूपडे बदलले ( किंग्ज सर्कलवरील एडनवाला रोडच्या कोपर्‍यावरील कूलार- केव्हाच अर्धा 'चायनीज' झाला... तरी ह्याने अर्धा भाग होता तसाच राखलाय). मोक्याच्या ठिकाणी बसून निवांत ब्रून मस्का किंवा खारी किंवा ऑम्लेट खावे, पानीकम चाय प्यावा, जगाच्या उठाठेवी करणार्‍या गप्पा कराव्यात, येणारी-जाणारी शोभा न्याहाळावी..... सुख, सुख ते अजून काय असतं? आणि काही इराणी-- मेरवान (नंदन ह्यांनी उल्लेख केलेला आहेच), धोबी तलावचे क्यानी. तेथील छोटी खारी अक्षरशः जिभेवर विरघळायची! त्यासमोरील मेरवानचे मावा केक्स...अहा... परवाच आमच्या येथील एका 'टर्की कबाब' वाल्या दुकानात गेलो. चार पाच इराण्यासारखी दिसणारी व तसलीच भाषा बोलणारी माणसे ते दुकान चालवत होती. कबाब अत्यंत सुमार होते, पण टर्की कॉफीची चव न्यारी होती. विचारल्यावर त्यातील प्रमुखाने मला कॉफीचा डबाच आणून दाखवला. 'मेहमूद इर्हादी' असे ब्रँडचे नाव होते. तुर्कस्तानात लोकप्रिय असावा. न रहावून त्यातील एकाला मी 'तुम्ही इराणी आहात का' असे विचारले. तसे काही नव्हते, ते तुर्कीच होते सगळे. पण उगाच मला मी इराण्याकडे काहीतरी खातोय ह्याचा आनंद घ्यायचा होता. तो आनंद आता मिळेल असे वाटत नाही.

In reply to by प्रदीप

साहेब घाबरू नका.. आमच्या गिरगावात या.. अजूनही हाताची बोटे मोजून उरतील अशी इराण्याची हाटेले गिरगाव व जवळपास आहेत.. मोक्याची जागा आणि कितीही वेल एक कप चहावर बसण्याची तसेच फुकण्याची सोय.. कधी येताय बोला :)

बांद्रा पश्चीमेला सिग्नलजवळ लकी (नाव नक्की आठवत नाही) बिर्यानी साठी मस्त आहे.

ठाणे पुणे नगर औरंगाबाद कोल्हापूर या पलीकडे महाराष्ट् आहे रे मुलानो. कोणीतरी विदर्भा तील एखाद्या स्थळाचा उल्लेख कराकी. विदर्भावर चा हा अनुल्लेख कोणीतरी भरून काढाकी. धुळे अमळनेर पाचोरा अकोला वडनेरा वर्धा येथले लोक काही खातच नाहीत असे का वाटते तुम्हाला. ठाणे पुणे ठबे एरीया पार झेन्डे लावणारे मिपाकर आपल्या उर्वरीत महाराष्ट्रला ओळखत नाहीत?

In reply to by विजुभाऊ

काऊन असं कालजाले घर पाडनारं बोलते विजुभौ? हे राज्य तर सगल्यांचच ना बाप्पा ? :) खरंच कुणीतरी विदर्भातली खवय्येगिरी जरुर सांगा. मी शेगावची प्रसिद्ध कचोरी खाल्लीय. जरा खान्देशकडे पण येऊ. भुसावळचा प्रसिद्ध 'घाशीलाल वडा' खाल्लाय का कुणी? तमाम महाराष्ट्रातील सर्वात तिखटजाळ, एकाच वड्यात डोळ्यातून पाणी काढणारा असा हा वडापाव आहे. मी माझ्या नातेवाईकाबरोबर हा वडापाव खायला गेलो होतो. तेव्हाची ही गंमत. माझ्या नातेवाईकांनी आधीच तिथल्या माणसाला बजावले, 'अरे हे आमचे पाहुणे पुण्यावरुन आलेत. त्यांना आपल्याइतक्या तिखटाची सवय नाही. तेव्हा कमी तिखट वडा दे.' त्यावर बरं म्हणून त्या माणसाने बटाट्याच्या भाजीतील मिरच्यांचे तुकडे बाजूला करुन चार वडे तळून दिले. तर ते खाताना घाम निघाला. बाजूचे पब्लिक मात्र वड्यात आणखी लाल तिखटाची चटणी घालून खात होते. बापरे! काय जबरी लोक आहेत इकडचे. 'घाशीलालचा वडा' मर्दानंच खावा. गोडघाशा पब्लिकने उगा नाद करायचा नाय. :)

In reply to by योगप्रभू

शेगावला आनंदसागर उद्यान आहे. येथे उपमा, शिरा, ढोकळा, फाफडा, पोहे, ईडली, खिचडी सर्व पदार्थ अफलातुन रुचकर आहेत. बिसलरी पाणी येथे १ लिटर ८ रुपयांना मिळ्ते.ज्युसही छान मिळतात. जेवण पन मस्त असते. माझ्या मते फॅमीली सहलीसाठी हे सर्वोत्तम टिकाण आहे आनी परवडेबलही. ईथे पहा: 1

पुण्यात खडकीकडून होळकर पूल ते विश्रांतवाडी (पण बाँबे सॅपर्सकडून न जाता होळकर पुलानंतरचा पहिलाच डावा टर्न घेऊन बहुधा "वैतागवाडी "किंवा तत्सम गावातून जाणारा रस्ता) या रस्त्यावर एक सरदारजी फॅमिलीचं नाष्ता सेंटर होतं. कायम सामोसे वगैरे तळत बसलेले असायचे. टेस्टी सामोसा आणि चटणी विथ तोंड भाजणारा शेगडीवरून डायरेक्ट काचेच्या ग्लासात ओतलेला मसालेदार तिखट आलेबाज चहा. आता असतील की नाही कोण जाणे. रोज त्या रस्त्याने जायचो म्हणून तशा पद्धतीने लोकेशन सांगितलंय.. कोणीतरी माझ्या वर दिलेल्या धेडगुजरी डायेक्शन्स नीट सांगितल्या आणि अजून ते तिथे असतात का सांगितलं तर फार बरं वाटेल..

In reply to by गवि

मस्त मिळतात तेथे सामोसे .. दुपारी ३ नंतर मिळतात .. छान आहे अगदी नाव विसरलो आहे .. पण २ महिन्यांपुर्वी कल्यानीनगर ला जाताना खाल्ला होता .. एकदम झक्कास ..

In reply to by गवि

कोणीतरी माझ्या वर दिलेल्या धेडगुजरी डायेक्शन्स नीट सांगितल्या आणि अजून ते तिथे असतात का सांगितलं तर फार बरं वाटेल. गणेशाने सांगीतले आहेच. पण मी पुन्हा एकदा खात्री करून सांगतो. बाकी सध्या विहार कुठे चालू आहे? पुण्यात नाही का रहात?

In reply to by आप्पा

जाउन आलात की काय काय खाल्लंत ते लिहा उस्त्वार बरं का. मी जानेवारीत जाईन गड्ड्याला, आमंत्रणाचा वेगळा धागा काढतोच आहे. हर्षद.