Skip to main content

पोटपुजेची ठिकाणे

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 09/12/2010 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
रोमनाचा धागा बघितला .. आणि वाटले ज्याला जिथले पदार्थ आवडतात तो येथे त्या ठिकाणाची माहिती लिहिन .. त्यामुळे केंव्हाही कोठे ही महाराष्ट्रभर फिरलो तरी कळेल की कोठे काय छान मिळते. परवाच एका च्या सांगण्यावरुन .. शिंदेवाडिच्या पुढे कैलास मध्ये रात्री जेवन केले पिठल भाकरी थाली अआणि इतर महाराष्ट्रियन पदार्थ .. जबराट आहे एकदम सगळे .. असो ... खालील माहितीचा बाकीच्यांना उपोयोग होयील असे वाटते. ------------------------------------- मिसळ : १. सिन्नर ची मिसळ ही अतिशय उत्कृष्ठ आहे असे मला वाटते.. नंतर नाशिकची .. २. कोल्हापुरची मिसळ खुप प्रसिद्ध आहे , पण मी कोल्हापुरमध्ये मेन ठिकाणी खाल्ली नसेन म्हणुन येव्हडी आवडली नाही, शिवाय त्याबरोबर ब्रेड होते म्हणुन मज्जा आली नाही. (कोल्हापुरला २ दाच गेलो आहे फक्त म्हणुन माहीती नाही काही) ३. पिंपरी-वाघिरे ( पिंपरी-चिंचवड, निअर पिंपळे सौदागर, पुणे) - जनता मिसळ हाउस मध्ये खुप भारी मिसळ मिळते .. दर विकएंड ला जातो मी घरी गेल्यावर.. मसाला ते कोल्हापुर मधुन मागवतात आणि फरसान घरीच बनवतात म्हणुन तर खुप जबरी लागते ... जवळच तेथे निसर्ग म्हणुन हॉटेल आहे तेथे ही छान मिळते मिसळ. बाकी अजुनहि खुप भारी ठिकाणे असतीलच ... वडापाव : १. कृष्णा वडापाव- सारंग, सहकारनगर - मला येथील वडापाव खुप आवडतो. तळजाईला जाताना हमखास येथे वडापाव खातोच .. खुप मोठी रांग असते येथे.; २. अहमदनगर : येथील एका चौकातील वडापाव खुप फेमस आहे, पण नेमके नाव विसर्लो त्याचे .. नगरकरांनी सांगावे .. खुप पुर्वी गेलो होतो म्हणुन आठवत नाहिये . ३. कुंजविहार, ठाणे पश्चिम. पिठल भाकरी /शेव भाजी १. सोहम , डेक्कन जिमखाना, पुणे २. कैलास , निअर शिंदेवाडी आणि निअर खेड शिवापुर, मुंबई-बँगलोर हायवे. चहा : १. टिळकरोड, पुणे येथील कुठल्याही अमृततुल्य मध्ये , खास करुन टिळक येथे आणि शक्तीस्पोर्ट समोर ( बहुतेक नाव : आंबाई आहे.. देवीचे नाव आहे हे नक्की पण) २. त्रिवेणी : जंगली महाराज रोड. ३. भवानी : गजानन महाराज मठा शेजारी.. पर्वती पायथ्याकडुन मठाकडे येताना. (क्रिमरोल पण खुप छान आहे इथला). ४. माऊली : पिंपरी-वाघिरे ( पिंपरी-चिंचवड, निअर पिंपळे सौदागर, पुणे) तवा सुरमई: १. पुना गेट , निगडी. NH4 पुणे -मुंबई हायवे. ( नक्की खा, मी कायम खातो .. खुप वेगळी अआणि मस्त आहे. मुंबईत ही नाही मिळाळी अशी अजुन. चिकन/चिकन थाली १. हॉटेल सिंधुदुर्ग, निअर शिवसेना भवन, दादर , मुंबई. २. गोमंतक , दादर , मुंबई. ३. गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर, पुणे. (मुर्ग मसल्लम) - बाकी आठवेन तसे देइन .. आपण ही आपल्या जवळील माहिती द्यावी (नोट : असो आपली माहिती देत रहा अशी विनंती .. आणि आम्हीच दिलेले भारी आणि तुम्ही दिलेले टुकार असे म्हणुन भांडन करु नये ही सुचना )

वाचने 61625
प्रतिक्रिया 199

प्रतिक्रिया

आता तेवढा नाही आता सहकारनगरपर्यंत आलाच आहात तर घरी या की राव. घरीच वडापावचा बेत करू कसे??

समस्त मिपाकरांनी खाद्यवाङ्मयात ही जी अमूल्य भर घातलेली आहे त्याचे एक पुस्तक तयार करून मिळेल का? उभी हयात पुण्यात घालवून सुद्धा मला इतकी खाद्यस्थळे माहिती नव्हती. शिवाय असे पुस्तक बरोबर घेवून कोणत्याही गावात/शहरात गेले तरी कुठे आणि काय खायचे याची पंचाईत व्हायची नाही ... :) अवांतरः ह्यांत कोणताही उपरोध दडलेला नाही , पुणेकर असल्याचा उल्लेख आला आहे म्हणून आधीच स्पष्ट केलेले बरें ...

विजुभाऊ, धुळे-नवापूर रोडवरच्या एका धाब्यावर (बहुधा नेर या गावाजवळ) कोंबडी मस्त झणझणीत आणि मस्त मसालेदार मिळाली होती एवढं आठवतंय. सगळ्या आवारात मसाल्याचा वास सुटला होता.

मिपा वरील पु़जेची पथ्ये हा लेख आठवला.. http://www.misalpav.com/node/11183 मिपावरचा एक अजरामर धागा.. (घाबरु नका, ही माझ्याच धाग्याची जाहिरात नाही!)

आमच्या डोंबिवलीतले काही छान ठीकाण.. १) माय होम-- अत्यंत सॉफ्ट इडली २) गोविंदाश्रम- पावभाजी बेस्ट ३) गोरे वडापाव- कस्तुरी प्लाझासमोर, वडा ए वन असतो. ४) ठाकुर वडापाव- ५)सेलीब्रेशन - एम आय डी सी ग्राउंड, याचे पहाडी सॅन्ड्वीच खायचे ६) सेलीब्रेशन समोरच एक भय्या गाडी लावतो, त्याच्या गाडीवर " सेन्ड बिच " अस लिहलय.. मस्त आहे. ७) शांतारामचे सरबत, पेंढार्कर समोरचे.. आता कसे आहे माहीत नाही. ८)पाया सुप, कस्तुरी प्लाझाच्या पुढे.. एक काकु स्टॉल लावतात.. कडक मामला आहे.. ९)गुगील स्टार... टोल नाक्या पलीकडे, शिळफाटा रोड्वर .. सगले कबाब मस्त आहेत...

In reply to by शैलेन्द्र

फडके वरील मोर्देन कॅफे चा उल्लेख नसल्याने तुम्हाला दिवाळीच्या पहाटच्या वेळी फडकेवर बंदी घालण्यात येत आहे . आदेशावरून

सगोती कोकण एक्सप्रेस, डहाणुकर कॉलणी, पुणे सामोसे अनारसे बंधु, ज्ञानप्रबोधनी जवळ , पुणे. नागपुरी मटण्/चिकण हॉटेल नागपुर, पुणे ( गल्लींची अआणि पेठेतल्या रोडची नावे निटशी माहित नाही त्यामुले नीट सांगता येणार नाही पण एस्.पी च्या समोरील लेन ने आत जायचे आणी आत मध्ये पुरेपुर कोल्हापुर च्या लेन मध्येच आहे हे )

In reply to by गणेशा

एकदम झकास! पण बर्‍याच वर्षात तिकडं गेलो नाही. हल्ली चव कशी आहे ते ठाऊक नाही. >>गल्लींची अआणि पेठेतल्या रोडची नावे निटशी माहित नाही :) टिळक रस्त्यावरुन येत असाल तर टिळकस्मारक समोरची गल्ली जी भरत नाट्य मंदीराकडे जाते (गल्लीचं नाव शेडगेवाडी) त्या रस्त्याला डाव्या हाताला हॉटेल नागपूर. ओळखीची खूण म्हणजे उजव्या बाजूचं तॄष्णा (बार हो.)

strong>ढाब्यामधील अस्सल गावरान चिकन्/मटन ते ही बाजेवर १. किनारा ढाबा , शिरुर च्या थोडे आधी , पुणे -नगर हायवेवरती .. चहा आणि भजी आणि बटाटेवडा १. भटाचे कुकडी कॉलनीतील कँटीन .. (३-४ वर्षे येथे पडिक असायचो , ते दिवस आठवले मस्त वाटले ,अजुनही गेल्यावर भट पैसे नको म्हणतो माझ्यकडुन .. येव्हडे छान रीलेशन होते .. वडापाव-भजी आणि चहा यांची मेस होती माझी तेथे .. मला वाटते अशी मेस लावणारा मीच पहिला आणि शेवटचा असेन)

In reply to by गणेशा

शिरुरवरुन नगरकडे जाताना सुपे गावाच्या पुढे ५-६ किमी वर सुवर्णज्योत हा प्रचंड ढाबा आहे. चिकण, मट्ण काहीही खा. मस्तच मिळ्ते. माझी आवडती डाळ तडका ही डिश तर अप्रतिमच मिळते.

In reply to by विलासराव

नगर शहरात बहुदा नव्यानेच झालेले, " उदयनराजे पॅलेस" हे हॉटेल मस्त आहे.. वेज नॉन्वेज दोन्हीही..., सन्केत चौकानंतर, पुण्याच्या दीशेला

भेळ १. नारायणगाव येथे कोठेही .. (जुन्नर -खेड- मंचर जवळ) फरसान भेळ पण खुप जबरी लागते .. २. लोणी भापकर, बारामती (पणधरे जवळ) येथील भेळ ही वेगळी आणि तिखट चुरमुर्याची मिळते, अतिशय उर्कृष्ठ आहे.. ३. कैलास .. निअर शिंदेवाडी, पुणे-बँग्लोर हायवे. ४. सरदवाडि (शिरुर जवळ) ५. गणेश भेळ, पुण्यात कोठेही मस्तच ...

In reply to by विलासराव

नाही नाही आमची नाही ती [:)] तरीही पुण्यात भेटलो तर आमचीच सम्जुन घरच्या सारखे खाल्ली तरी आवडेन

In reply to by गणेशा

२. लोणी भापकर, बारामती (पणधरे जवळ) येथील भेळ ही वेगळी आणि तिखट चुरमुर्याची मिळते, अतिशय उर्कृष्ठ आहे..
नक्की कोनती? जगतापची का? लै वर्षं झाली गेलो नाय तिकडं. आता नीट आठवेना. ओ गाववालं, झगड्याच्या समाधानमधली मिसळ अन पुरीभाजी इसरलो का आपुन? :) आणि गांधीचौकात अलिकडं सिक्वेरा मेन्सवेअरसमोर जेवरेमामांकडची भेळ पण ढिंच्याक. आईस्क्रीम आणि मस्तानी खायला शाकंभरी कोल्ड्रिंक्स... नौशादवाल्यानं थोडेदिवस 'मोकळ्यात जड' केलं राव पण शाकंभरीला मात नाय देऊ शकला. :)

In reply to by धमाल मुलगा

गाववालं लोणी भापकर ला छोट्याश्या चौकात , बस थांबते तेथे मिळते .. पहिल्यासारखी नाही मिळत येव्हडी तिखठ तरीही ही मस्त आहे अजुनही. स्वताची ओलख अजुन जपलेली आहे.. बाकी तुम्ही दिलेली माहिती ही जबरी आहे ..

In reply to by श्वेता२४

मटकी भेळ भामला (चाकणच्या पुढे) खूप छान मिळते. गरमागरम मटकी, कांदा आणि भेळभत्ता. ऑस्सम

चला आता २-३ दिवस नाहिये ... तेच हो पोटपुजेसाठीची एकदोन नविन ठिकाणे नक्कीच पाहण्याचा प्रयत्न करीन गुड नाईट

सातारामागे टाकुन कोल्हापुरकडे जाताना खींड लागते. डाव्याहाताला पेट्रोलपंपाला लागुन आत जायचे. तेथे "कणसे धाबा:" लागतो. चिकन, मटण, काजुकरी एकदम मस्तच. खूप गर्दी असते. पण सर्व्हीस चांगली आहे.

In reply to by चिंतामणी

वाहवा.. कणशाकडे.. रोटी आणि रस्सा खाउन बघा.. पण त्यांचीच तीन हॉटेल झालीत त्यात जुन्याची चव नाही.. आम्ही अजून जुन्यातच जातो..

माझं गाव विदर्भात - उमरखेड जि. यवतमाळ .. तीथल्या काही जागा** १) मुत्तुराज वडेवाला - याच्याजवळ वडे, मिरची भजे अप्रतिम मिळतात. एका प्लेट मध्ये कधीच समाधान होत नाही. २) याच्याच बाजुला एक ऑम्लेटवाला होता - आता आहे का नाही माहित नाही पण त्याच्याजवळ ऑम्लेट मस्त मिळायचे ३) बिकानेर मिठाई - समोसा, कचोरी आणी ईम्रती साठी .. बाकी मिठाई पण मस्तच ४) संजय टॉकीज (बहुतेक) जवळ एक भेळवाला असायचा .. त्याच्याकडे पाणीपुरी, दहीपुरी, भेळ छान मिळायची ५) वसंत टॉकीज समोरच्या गल्लीत एक मिठाईचं दुकान होतं .. त्यात समोसा मस्त मिळायचा आणि याच्याच जवळ एक हॉटेल होते त्यात फाफडा मस्त मिळायचा .. सोबत तळलेली मिरची .. ६) एक हॉटेल होते पुसद रोडवर .. शाळेत जातांना लागायचे .. तीथला पेढा अप्रतिम असायचा .. एकसारख्या आकारात करुन न ठेवता चौकोनी वगैरे तुकडे करुन तराजुत मोजुन मिळायचा .. ७) पुसद रोडवरच एक जयस्वाल वाईन मार्ट आहे .. त्याच्याकडे पुर्वी सांभारवडी (कोथींबीर रोल) मिळायचे .. मस्त होते ८) फक्त उन्हाळ्यात एक ज्युस सेंटर उघडायचे .. तो पाईनॅपल ज्युस मस्त बनवायचा सध्या एवढेच आठवतायत .. अजुन विदर्भातले काही ठीकाणं सांगेन .. कीतीजणांना याचा उपयोग होईल हे माहिती नाही तरीपण या धाग्यावरुन मला आठवल्या :) ** ही सर्व माहीती जवळपास ३ ते ७ वर्षापुर्वीची आहे .. त्यामुळे सध्याची परीस्थिती माहिती नाही

In reply to by स्वप्निल..

स्वप्नील भाउ , येवुद्या आनखिन .... कितीजनांना उपोयोग होयील असे नाही.. पण यामध्ये वाचले तर नक्कीच उपोयोग होयील ... कालच माझी फ्रेंड गणपती पुळे ला गेली होती.. मला वाटते मेघवेड्यांनी दिलेली खिचडीची माहीती दिली होती .. आज कळेल वृत्तांत .. विदर्भाद आल्यावर नक्कीच तुम्ही सांगितलेल्या ठिकांनाना भेट देवू ..

बरं आहे हा धागा महाराष्ट्रापुरताच सीमित ठेवला आहे. जगभरातली पोटपुजेची ठिकाणे विचारली असती तर सगळे (फ्रींटुकबृहत्कथयाकथित) का.प्रे.न.झा. उच्चमध्यमवर्गीय उत्तेजित झाले असते आणि हा धागा एव्हाना टॉपला पोचला असता. ;-)

अरे तात्या कडे तर सगळी यादीच होती.. दक्षिण मुंबईतल्या दिल्ली दरबार पासून अगदी गिरगावतल्या बोरभाटलेन मधल्या समर्थ भोजनालय, अनंताश्रम आणि बरच बरच.. ह्या सगळ्या ठिकांणांच्या हॉटेलांची एक छान यादी कुठे मिळेल कुणी सांगू शकेल का.. मुंबईतले बरेच आणि पुण्यातले काही झालेत भेट देऊन पण एखादी साईट असेल जिथे ही यादी मिळेल तर लय उपकार होईल.. माझे दोन प्रश्न - १. मुंबई (विशेषतः मध्य ते दक्षिण) मध्ये कँडल लाईट डिनर साठी काय सुचवाल.. एकदा शोधताना हवा निघाली होती पण मनासारखा (आणि खिशाला परवडेल असाही) पत्ता मिळालाच नाही, म्हटलं तयारी असावी ;) २. मुंबई च्या जवळ चांगला धाबा कुठे आहे (कृपया दादरचा प्रितम-दा-धाबा सांगू नका.. ).. धन्यवाद!

In reply to by उपास

गिरगाव चौपाटीसमोर गुडलक किंवा तत्स्म नावाचे इराणी (पक्षी पारसीबावाचे) हॉटेल आहे. लाकडी टेबले, लाकडी पंखे असलेल्या त्या एकमजली हॉटेलात वरच्या मजल्यावर कॅन्डल लाइट डिनरची सोय (टेबलावरच्या टिचभर, चिनीमातीच्या पांढर्‍या फुलदाणीतल्या गुलाबाच्या फुलासकट!) असल्याचे आठवते. तरीही आम्ही खालीच बसून चहा-पराठे हाणले होते, हा भाग वेगळा. (स्मरणशील)बेसनलाडू गिरगावातलेच असाल, तर मनोहर आणि सरदार मध्ये पावभाजी खाल्लीत की नाही, असे विचारून तुमचा अपमान करावेसे वाटत नाही :) (पावभाजीप्रेमी)बेसनलाडू मुंबईजवळचे ढाबे म्हणजे सन्नी आणि टोनीचे - एन एच ४ वरचे सन्नी दा ढाबा आणि टोनी दा ढाबा (सरदार)बेसनलाडू

In reply to by बेसनलाडू

सरदारकडे ताडदेवला तर कैक दा... मनोहर कडे जायचो जेव्हा खिशात पैसे नसायचे तेव्हा दोन भाजी आणि १० पाव चौघात ;) नित्यानंद, श्रिराम पण आहेत पण मला मात्र तवा पुलाव, पावभाजी असे आयटंम गाडीवरच आवडतात.. ड्रीमलँडला मुमताजची गाडी लागते, जबराट पावभाजी आणि गुलालवाडीतही मस्त विशेषतः रात्री थोड्या उशीरानेच गणपतीत किंवा दांडीयात.. शिवाय ते शेगडीवर शेकत असलेले पापड.. अहाहा... अहो कँडल लाईट ला नेताना सोयीस्कर हॉटेल पाहिजे.. आमच्या इथे इराण्याकडे कपल गेलं की समजा नुस्तं लफडं नाही तर झोल आहे म्हणून... :)))) धन्यवाद माहितीबद्दल.. नोंद घेतली आहे 'बेला' :)

In reply to by उपास

चला तुमच्या प्रश्नामुळॅ कँडल लाईट डिनर मुंबईत कोठे मिळते ते कळाले धन्यवाद आपले आणि बेसन लाडु चे .. -- बाकी पुण्याजवळील पिंपळे सौदागर येथे ही कँडल लाईट डिनर मस्त मिळते .. तिकडेच सोय करुन ठेवली आहे आम्ही .. [:)]

In reply to by उपास

>>> मुंबई (विशेषतः मध्य ते दक्षिण) मध्ये कँडल लाईट डिनर साठी काय सुचवाल.. --- वरळीच्या नेहरू सेंटरजवळच्या 'ज्वेल ऑफ इंडिया'बद्दल बिझीबीच्या कॉलममध्ये वाचल्याचं आठवतं. कधी गेलो नाही, पण जालावर रिव्ह्यूज चांगले आहेत.

नासिक ला पाणीपुरी खायची म्हटली कि गाडी आपोआप कॉलेज रोड ला " नंदन" कडे वळते.शेव दहीपुरी तर अशी भारी कि खाणारा खातच राहतो.... तसे बिग बझार समोर पण एक गाडी असते पेपे शोरूम जवळ तिथे पण पाणीपुरी मस्त ... आणि सायंतारा चे साबुदाने वडे तर उपास असो नसो खावेसे वाटतात.चटणी पण मस्त असते....रेसिपी मिळवणार आहे एकदा मी! ....टायगर हिल्स म्हणून पांडवलेणे येथे हॉटेल आहे तिथे नोंव्हेज पण मस्त मिळते .मिसळ पाव साठी गंगापूर रोड वरचे "विहार " पुण्याला भरपूर चापायचे असेल तर दुर्वांकुर बेस्ट आहे!आणि सेनापती बापट रोड च्या बाजूने एक लेन जाते तिथे मॉन्सून मोमो म्हणून आहे ....अप्रतिम! वेज आणि नोन व्हेज दोन्ही + व्हेज क्लीअर सूप अहाहा ! वडा पाव म्हणाल तर जोशी वडे वाले आहेत पण रोहित वडे पण मस्त लागतात. बाणेर रोड वरचा डोमीनोचा burst पिझ्झा तर लई भारी ! सध्या परदेशात असल्याने फक्त आठवणी जवळ आहेत ....!

In reply to by मीली

तै, तो फोटो हलवा इथून.. अक्षम्य जळजळ!!!!!!! ** अरेच्चा.. अगदी हाच फोटो मिपावरील वरच्या बॅनर मध्ये पण दिसतोय.. (कधी पुस्तकविश्व तर कधी मिसळपाव असं..) पावाच्या शेपवरुन तर पक्की खात्री झाली ;)

. पोटपुजेची ठिकाणे चांगली मिसळ, वडा, भजी कुठे मिळते ? या दोन धाग्यावरची माहिती वाचुन आता कुठे जायचे कळेनासे झाले आहे. शहर, पत्ता, खाण्याचे पदार्थ अश्या क्रमाने मार्गदर्शक पुस्तक (त्याला मराठीत "गाईड" म्हणतात) बनवले तर खूप उपयोग होईल. (कॉम्प्युटरवर कोण काम करून देउ शकेल हे सगळ्यांना माहीत आहेच). ;)

मुंबईतील पारसी डेअरी म्हणजे पेढ्यांचा व दुधाची पर्वणी (कृपया चितळ्यांची बरोबरी करण्याचा हेतू नाही ) ह्याची नोंद घ्यावी आम्हला मिपा वर राहायचे म्हटलं .

In reply to by निनाद मुक्काम …

(कृपया चितळ्यांची बरोबरी करण्याचा हेतू नाही ) ह्याची नोंद घ्यावी आम्हला मिपा वर राहायचे म्हटलं . Ninad - You too???????????:(

काहिहि आसो, पण घरच्या जेवणाचि चव कुठेच नाहि.

सहज हा धागा पाहिला.. पुन्हा वर काढत आहे.. कोणाला काही हेल्प मिळेल या अनुशंघाने.. लवकरच.. जुनी-नवी ठिकाणे मिळुन सुची करण्याचे काम हाती घ्यावे म्हणतो.. कोण तयार असले तरी चालेल

हॉटेल शिवेंद्र (कोंढवा -फुरसुंगी रोड)- मटण दालचा एकदम खल्लास ! जगदंबा ,खेड शिवापूर - मटण भाकरी तुपातला भात जबरी, आजपर्यंत अनेक ठिकाणी मटण भाकरी खाल्ली, त्यात इथली झकास होती. भोर कडून वरंध घाटाकडे जाताना आपटी गावाच्या पुढेच एक मटण खानावळ आहे, बोउल भर मटण आणि रस्सा कितीबी वरपा, ठिकाणहि निसर्गरम्य नदीला लागुनच आपटी आपटी तोरणा आणि वेल्ह्याची भटकंती 'स्वप्नील' शिवाय पूर्ण नाहीच, इथली मटण भाकरी उत्तम, मिरच्या घातलेलं आम्लेट पण मस्त…आणि जाताजाता तिथला चहाही !

गावठी चिकन आणि तान्दळाची भाकरी झकास. क्वार्टर घेउन गेलात तर फक्त सर्विस चार्ज लागतो.

पुण्यातील अलका चोकातील रिगल हॉटेलजवळ गौरीशंकर नावाचे छोटेसे दुकान आहे तेथील पोहे अप्रतीम असतात. शिवाय साबुदाणा खिचडी, उपमा व शिरा देखील बेस्ट. जंगली महाराज रोडवरील सोहम व मथुरा एक नं. पेरुगेट पोलिस चौकीजवळील साईबा मधील भडंग भेळ व पाणीपुरी खूप आवडीची. गिरीजा मधील मेथी पिठलं व भाकरी म्हणजे स्वर्गच. मुंबईमध्ये माटुंगामध्ये इडली हाउस मध्ये खाल्लेली इडली व त्याचा अजून एक प्रकार (नाव आठवत नाही) क्लासच. अशी चव पुन्हा कुठएही मिळाली नाही.

In reply to by श्वेता२४

पुण्यातील कर्वे नगर मधील गिरिजाशंकर विहार सोसायटीजवळचा रोड, कि जो पुढे कॉर्पोरेशन बँक (जुनी भगिनी निवेदिता बॅंक) च्या दिशेनं जातो , तिथे तो रोड आडव्या रोडला T सारखा येऊन मिळतो , तिथे शिवदीप वडापाव ट्राय केलाय का कोणी ? मला थोडा बरा वाटतो तो वडापाव. https://goo.gl/maps/aWN3M2CAW9w

कर्वे रस्त्यावरून डेक्कन कडे जाताना सह्याद्री हाॅस्पिटल खाली बिपीन स्नॅक. ईडली ब. वडा पोहे मस्त मिळतात. कासट च्या दुकानाशेजारून आत सीड ईन्फोटेक कडे जाताना भाडाईत मिसळ मिळते. अप्रतीम चव आहे. ताथवडे बागे समोर मनिषा भेळ. रगडा पॅटीस सोडून बाकीचे पदार्थ छान. ही झाली पुण्यातली यादी सोलापूर बद्दल बोलायचं म्हणलं तर कन्ना चौकात मिळणारी पापु सारखी कुठेच नाही मिळत. पुतळ्याला वळसा घालुन आपण आत ढंगे फर्नीचर कडे जाते त्याच कोपर्यावर हा पाणीपुरी वाला उभा असतो. तळहात झाकला जाईल ईतकी मोठी आणी कडक पुरी आणी आतलं थंडगार पाणी..... सात रस्त्यावर संगमेश्वर काॅलेज च्या लेडीज हाॅस्टेल शेजारी बाबुराव ची भेळ आणी कृष्णा फालुदा. बाळे गावात बारशी रोड ला असणारा हज्जू चा वडापाव आणी भजी. अगदी पुर्वी मी लहान असताना नव्या पेठेत एक स्वीट मार्ट होत. तिथली कचोरी फार फार आवडायची. झालच तर चित्रमंदिर च्या कॅन्टीन चा (जिथे आता इंदोर कपडा सेल लागतो) त्याचा सोडा. गदग चा डोसा. ह्या सगळ्यात एक लई महत्त्वाचं ठिकाण रायल. मंगळवार पेठ मीठ गल्लीत असलेलं सुधा ईडली गृह.

In reply to by मनिमौ

अरे वा मौताई, पक्के सोलापूरकर तुम्ही. चक्क हज्जूचा वडापाव म्हैते म्हणजे काय. आहे अजून हज्जू बरका. साधीशी टपरी आहे पण धंदा जबरदस्त. कना चौकातल्या पापुची हेड ब्रँच दाजी पेठेत. बालाजी मंदिराजवळ चौकात. त्या चौकातून पुढे गेले की एक भज्यांचा अड्डा आहे. पातळ पुदिना चटणी आणि कुरकुरीत भजी. रायचूर भजी म्हणजे कोळाच्या मिरच्यांची दांडगी आंध्र भजी पण मिळतात. इंदूर कॉटनपासले लोमटेचे प्रजा कोल्ड्रिंक बंद झाले. ते कन्न चौकात आलेय. पापुची गाडी आहे तिथेच. अक्सीस बँकेसमोर.

हुतात्मा बागेकडचा वसंत पैलवान चा रस किंवा टिळक चौकातले कंदले आणी डफरीन चौकातले पुणेकर कामठे याला पर्याय नाही

कोथरूड पुणे येथे कोकण एक्सप्रेस च्या डायगोणली समोर, स्फूर्ती मिसळ मधे हिरवट पोपटी टिंज ग्रेव्ही वाली मटार उसळ मिळते, अगदी ग्रेट नाही, पण तेच अन तेच लाल भडक ग्रेव्ही ला जर कंटाळला असाल तर् ट्राय करून पाहा....

अरे मी बाळेकरच आहे. बाकी चिकीता चा ऊल्लेख कसा काय राहुन गेला कुणास ठाऊक. आद्य हाॅटस्पाॅट होता तो. अजुनही असावा . अर्थात महिना अखेरीस येणार आहे तेव्हा समक्ष जाऊन बघते.