हसता हसता खुर्चीतुन खाली पडलो कि हो .......
(पडल्या नंतर भड्डाम्म्म्म!!!! असा अवाज आला अजुन हसतोय....)
स्व पा.
मला ह्य दिवळीत एक पण फटाका नाही फोडता आला :(
लिहीलंय एकदम मस्त! लिहायची ष्टाईल आवडली, पण स्पष्ट सांगायचं झालं तर हेतू नाय आवडला!
आम्हीही दिवाळीत पेटते फटाके फेकायचो बॉम्बसारखे, त्याचं युद्ध शेजारच्या बिल्डींगच्या पोरांशी! :-) पेटत्या फुलबाज्या, फटाके, वगैरे तर अगदीच कॉमन! भुईनळे, चक्र, सुतळी बॉम्ब वगैरे जबरदस्त फटाके हवेतून यायला लागले की एकदम बॉर्डरवर असल्याचा फील यायचा! अहो, रॉकेटं फेकून मारली आहेत.
पण असं खुन्नसमध्ये कधी काय केलं नाय ब्वॉ! रात्री या असल्या फायटी करुन पुन्हा सकाळी त्याच पोरांबरोबर क्रिकेटच्या म्याच खेळायचो आम्ही!
आता एक शंका:
>>>माय गॉड! घरात लहान बाळं आहेत - दिवाळी म्हणजे काय त्यांना अजून माहितही नाही. ती बिचारी इवले-इवले हात गाला-खांद्यांशी घेऊन झोपलेली असतात... इकडेतिकडे टुकूटूकू पाहात असतात...मध्येच भड्डाम्म्म!!!! आवाज झाला की फूटभर उंच उडून केकाटायला लागतात ना ती? <<<
तुम्ही जेव्हा एक सणसणीत म्हणजे पार काचा खाली येतील इतका सणसणीत बॉम्ब लावलात तेव्हा ही बाळं कानात बोळे घालून बसली होती की काय??? की 'आपल्या तो बाब्या आणि दुसर्याचं कार्ट' या न्यायाप्रमाणे बाळांना झाला तो त्रास आणि बाकीच्यांना आणि त्यांच्या घरातल्या कार्ट्यांना झाली ती त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल(?)सजा???
बुरा ना मानो, पण दिवाळी है भौ!! फटाके दिवाळीत नाय लावणार तर काय संक्रांतीला लावणार का??
इतका सणसणीत बॉम्ब लावलात तेव्हा ही बाळं कानात बोळे घालून बसली होती की काय???
ती घराबाहेर पाठविण्यात आली होती. मी इथं कोर्ट -कचेरी करीत नाहीय. म्हणून अवांतर तपशील दिलेला नाही.
या न्यायाप्रमाणे बाळांना झाला तो त्रास आणि बाकीच्यांना आणि त्यांच्या घरातल्या कार्ट्यांना झाली ती त्यांच्या दुर्वर्तनाबद्दल(?)सजा???
तो माझा इश्यू नाहीय. ते मला ठरवताही येणार नाही. फटाके मला अजूनही आवडत नाहीत. माझे ते पाच बॉम्ब वाजले तेव्हा माझेही कान सुन्न झाले होते. पुढच्या वेळी फटाके वाजवायचे की नाही ते अजूनही शेजारी म्हणेल त्याप्रमाणे.
पण तो सॉरी म्हणून, फराळ करून निघून गेलाय.
असो. एकूण तुमच्या भावना पोचल्या.
अवांतरः आमच्या गावाकडच्या जत्रेत टूरिंग टॉकीजवरच्या भोंग्यातून एक मस्त आवाज येत असे.
"इच्यारा इच्यारात खेळ गमवू नकाऽऽऽ, इच्यारा इच्यारात खेळ गमवू नकाऽऽऽ"
ती सध्या माझी रिंगटोन आहे.
मी सुद्धा कोर्ट-कचेर्या करत नाही, किंवा तुमचा शेजारी माझा अशील नाही, किंवा तुमच्या धाग्याचे निष्कारण काश्मीर व्हावे हाही हेतू नाही! गैरसमज नसावा! तुमची लिखाणाची स्टाईल आवडलीये हे मी आधीच स्पष्ट लिहिलंय! तुमच्या भावना दुखावतील असंसुद्धा काहीच नाही हो!
पण तुमच्या फटाक्याला जशी बाळं बाहेर पाठवण्यात आली तशी ती आधीच्या फटाक्यांना गेली असती तर किमान त्यांचा त्रास तरी वाचला असता की!
आणि बाकीच्या 'कार्ट्यांना' त्रास होणं हा जर तुमचा इश्यू नसेल तर तुमच्या बाळांना त्रास व्हावा हा त्या शेजार्याचाही इश्यू नाहीये ना!
तरीसुद्धा तो सॉरी म्हणून गेला म्हणजे भलताच सज्जन शेजारी दिसतोय! तुम्हीपण सॉरी म्हणून फराळ करुन आला असालच! ;-)
अवांतर: तुमची रिंगटोन फारच आवडली बुवा!
--असुर
कारण नसताना पुन्हा एकदा गंमत म्हणून प्रतिसाद देतोय त्याबद्दल स्वारी... पण मला खालच्या ओळीत थोडीशी अडचण आहे..
पण तुमच्या फटाक्याला जशी बाळं बाहेर पाठवण्यात आली तशी ती आधीच्या फटाक्यांना गेली असती तर किमान त्यांचा त्रास तरी वाचला असता की!
म्हणजे लोक फटाके वाजवतात आणि स्वत:च्या घरातही त्यांच्या आवाजाचा त्रास होतोय म्हणून आम्ही बाळांना बाहेर पाठवायचं..
काही काळानं त्रास होतोय म्हणून आम्ही स्वत:पण स्वत:च्याच घराच्या बाहेर पडायचं.. दुसर्यांच्या नालायकपणामुळं बर्का..
मग आम्हाला तात्पुरते दुसरे शेजारी मिळणार.... ते ही फटाके वाजवतील..
मग पुन्हा काही लोकं आम्हाला सांगतील.. अरेऽ तुम्ही तुमच्या स्वत:चे घर सोडून इथे आलात.. तिथेही त्रास.. इथेही त्रास.. यापेक्षा आता असं करा या पृथ्वीवरूनच नाहीसे व्हा ना कायमचे
फिनीश!
(बेजबाबदार) लोकशाही जिंदाबाद!
रंगपंचमीच्या दिवसाच्या आसपासच्या दिवसांमधे कोणीही कधीही कोणाच्याही अंगावर फुगे फोडणे,
गणपतीच्या दिवसात, लग्नसराई इ मधे वाट्टेल तेवढ्या डेसिबलात मिरवणूका,
दिवाळीत अंदाधुंद फटाके
जाज्वल्य अभिमान आहे. भारतीय लोकशाही जिंदाबाद!!!
लहानशी कथा चांगली आहे पण ह्या जश्यास तसे प्रकाराला चांगले म्हणण्यात बरे वाटावे ह्यातच कुठेतरी ......
थोडक्यात, तुम्ही गांधीगिरी सोडून (मुन्ना)भाईगिरी केलीत तर. आपल्या बाळांना त्रास होत असताना नैतिकतेच्या (बाहेर फटाक्यांसोबत) कश्या चिंध्या होत होत्या हे मी समजू शकतो. ह्या लेखातून तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे ते सुद्धा सविस्तर लिहा.
संदेश वगैरे देण्याच्या भानगडीत कशाला पडू मी गांधीवादी?
आणि हवाय कुणाला संदेश? इथे सगळेच संदेश देणारे (पाहा: या महिन्याचे स्वत:चे मोबाईल बील आणि आलेले "संदेश").
पण आता तुम्ही विचारतच आहात तर दुसर्या कुणाचा तरी पण मी घेतलेला संदेश इथं टाकतो; वरच्या पोस्टच्या ओघात पहा पटतो का. मलातरी पटला आणि हळूहळू प्रक्टीकली प्रूव्हसुध्दा होतोय.
आपल्याला एकत्र जगण्यासाठी दहशतीची मदत होईल, प्रेमाची किंवा बंधुभावाची नव्हे. हा संदेश मानवी जाणीवेत घुसून बसल्याशिवाय काही आशा आहे, असे मला वाटत नाही. - यु. जी. कृष्णमूर्ती
"आपल्याला एकत्र जगण्यासाठी दहशतीची मदत होईल, प्रेमाची किंवा बंधुभावाची नव्हे. हा संदेश मानवी जाणीवेत घुसून बसल्याशिवाय काही आशा आहे, असे मला वाटत नाही. - यु. जी. कृष्णमूर्ती "
हा संदेश सगळ्यांना दिला गेला पाहिजे, निसर्ग नियम पणं हेच सांगतो. हरिणांच्या कळपात कोणताही धोका नसताना ३-४ नर एका मादीसाठी एकमेकांचा जीव घेताना दिसतील, पण तेच सगळे शिका-याची चाहुल लागताच सगळे एकत्र येतात आणि त्या आलेल्या शिका-या विरुद्ध लढायला तयार होतात.
भारतीय काय किंवा इतर कोण्त्याही स्वातंत्र्यलढ्यात एकत्र झालेले सगळे प्रेम, बंधूभाव या साठी जमा झाले नव्हते, त्या मागची प्रमुख भावना ब्रिटिश किंवा तत्सम सत्ताधा-यांच्या दहशतीविरुद्ध लढणे हि होती.
हर्षद
राहुल गांधींच्या 'दोन' हिंदुस्तानात काही होईल असे वाटत नाही. त्या साठी 'तिसरा' हिंदुस्थानच जन्मास यायला हवा.
अवांतर : आता हा 'तिसरा' हिंदुस्थान कायदेशीर/घटनात्मक आहे का नाही' हे पालुपद चालू होईल.
हा हा हा च्यामारी काल मह्या शेजा-यानं अस्साच
तरास दिला. मी पोरीसंग सुरसुरी पेटाला भायेर आलो
आन ध्यानीमनी नसतांना शेजा-याने सुतळी बोम्ब
लय जवळ फोडला.पार कानाजवळ सुतळी बॊम्ब फोडल्यासारखं वाटलं
कानात कुं...... असा आवाज लय येळ चालू
होता. पोरगीबी दचकली. लय शा घालाव्या वाटल्या.
पण सणासुदीचं भांडण नको म्हून मूकाट बसतो.
बाबुराव :)
फार भयानक प्रकार आहे हा सुतळी बॉम्ब चा.
मी प्रेग्नन्ट होते. अन आम्च्या बिल्डिंग मध्ये असे फटाके लावले. अक्षरशः पोटातल बाळ उडालेल जाणवल मला .
सरळ पोलिस, अन आवाज बंद! पण कशी बशी दिवाळी झाली अन लेक थोडी लवकरच जन्मली दिवाळी नंतर २ दिवसांनी.
प्रतिक्रिया
आई शप्पत इतकी हसत होते की
हा हा हाहा हा हाहा हा हाहा हा हा
धमाल !!!!! =)) मस्त आयडियाची
असला खुन्नसभरा हेतू?? तोही दिवाळीत??
इतका सणसणीत बॉम्ब लावलात
मी सुद्धा कोर्ट-कचेर्या करत
फिनीश!
:-)
थोडक्यात, तुम्ही गांधीगिरी
संदेश वगैरे देण्याच्या
+१ श्री. यशवंत्
राहुल गांधींच्या 'दोन'
खतरनाक लिवलंय
भन्नाट...जाम आवडलं.
हा हा हा च्यामारी काल मह्या
लय भारी! स्वतःचं जळतं तेव्हाच
फार भयानक प्रकार आहे हा सुतळी
सर्व प्रतिसादकर्ते,