✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात? - एक नीरीक्षण

श
शुचि यांनी
Sun, 10/31/2010 - 15:50  ·  लेख
लेख
पार्श्वभूमी - माधुरी आणि नुपूर या माझ्या सहकारी माझ्याहून १० ते ८ वर्षाने तरी लहान आहेत. परवाचीच गोष्ट आम्ही ६० मैल दूर कॉर्पोरेट ऑफीसला कामानिमित्त जाऊन आलो आणि दुसर्‍या दिवशी रात्री डिप्लॉयमेंट होती म्हणून दोघी माझ्या खोलीवर राहील्या. रात्री डिनरच्या वेळी साहजीकच कॉर्पोरेट ऑफीस , तेथील नवीन सहकारी यांचा विषय निघाला. गाडी या रूळावर आली की कोणते सहकारी कसे वाटले? आणि काही रोचक पण सामाइक मुद्दे समोर आले. जसं मला आणि माधुरीला योगेश आवडला, नुपूरला सुमीत आवडला, मला आणि नुपूरला हेमंत अजीबात आवडला नाही तीघींनाही अली सो सो वाटला. पहीली सुरुवात मी केली "माधुरी , ये हेमंतको कुछ मॅनर्स नही लगता है यार. कल एक तो लंच पर इतना काफी अंतर था बीचमें फीर भी चिल्ला चिल्ला के मुझे पूछ रहा था कहां से हूं, फिर पुणे मे एक्झॅक्टली कहांसे? फिर महाराष्ट्रीअन हूं क्या? वो समझनेके बाद बोलने लगा - कस काय हाय, बर हाय काय?" ...... "रिअली एम्बॅरॅसींग!" माधुरीने इतकं नीरीक्षण केलं नव्हतं पण नुपूरने दुजोरा दिला. ती म्हणाली तो जरा तसाच आहे एकदा तिचा डिफेक्ट लाटला होता तेव्हा पासून तिने फोनवर त्याच्याशी डिफेक्ट ची चर्चा करणं बंद केलं. आमच्या तीघींच एक मत पक्क होतं ते होतं अली बद्दल की हा स्वतःबद्दल अति बोलतो. मान्य त्याची बायको पहीलट्करीण आहे, फेब्रुवारीमधे त्यांना मुलगी होणार आहे पण पूर्ण लंच सगळ्यांना त्याच विषयावर वेठीला धरण्याचं कारण नव्हतं. नुपूरला सुमीत खूप आवडला होता. सुमीत मॅनेजर होता. माधुरी गेल्या महीन्यात भारतातून अमेरीकेत आली आहे. असो. मला आणि माधुरीला योगेश आवडला कारण तो फार बोलत नव्हता , जे बोलत होता ते सेन्सीबल बोलत होता. त्याच्यामध्ये मार्दव एक प्रकारचा जंटलनेस होता. तो खूप वेलमॅनर्ड आनि सौजन्यशील वाटला. हे सर्व आत्ता आठवण्याचं कारण की पुढील लेख वाचनात आला- http://timesofindia.indiatimes.com/life-style/relationships/man-woman/5-types-of-women-men-cant-stand/articleshow/5640393.cms . हा लेख आहे पुरुषांना कशा प्रकारच्या स्त्रिया आवडत नाहीत. गोषवाराच सांगायचा तर - (१) कटकट्या - २४ X ७ कशा ना कशा बद्दल कीरकीर करणार्‍या, नकारात्मक दृष्टीकोन असलेल्या. (२) वजनाची फार काळजी करणार्‍या म्हणजे खाणं पीणं एंजॉय न करता सतत स्वतःच्या वजनाचीच काळजी करणार्‍या (३) सतत सासरच्या माणसांबद्दल उफराटं बोलणार्‍या (४) कामामध्ये अति व्यग्र स्त्रिया (५) सतत दुसर्‍यांची दुखणी खुपणी बरी करण्याकरता धावणार्‍या आणि आमची या लेखाच्या बरोब्बर उलटी चर्चा आठवली ती म्हणजे स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात. खालील निष्कर्ष हे मैत्रिणींबरोबर केलेल्या चर्चेतून निष्पन्न झालेले आहेत. मी त्यांची जबाबदारी घेत नाही. मी फक्त मांडण्याचं काम करते आहे. (१) "पॉवरफुल" - आदिमानवाच्या काळात कदाचित शारीरीक सबळता हा निकष असेल पण आता आधुनिक युगामधे तो निकष तितक्या प्रिमिटीव्ह पातळीवर न राहता तो निकष देखील विकसीत झाला आहे . "आर्थिक", "सामाजिक", "बौद्धिक" दृष्ट्या सक्षम पुरुष हे स्त्रियांना चटकन अपील होतात (भावतात). नात्यामधे स्त्रीला सुरक्षेची भावना महत्वाची वाटते. जी सुरक्षा अर्थिकदृष्ट्या स्थिर किंवा स्वतःच्या कार्यक्षेत्रामधे स्थिर झालेली व्यक्ती परिपूर्ण रीतीने देऊ शकते. त्याचप्रमाणे नात्यामधील "कमीटमेंट" ही स्थैर्य लाभलेले पुरुषच देऊ शकतात. शेवटचा मुद्दा अशा रीतीने स्थैर्य लाभलेल्या पुरुषाचा सहवास प्रिय वाटणं कारण स्त्रीला स्वतःला स्थिरता लाभल्याने जणू सुर्यप्रकाश मिळालेल्या कमळासारखी ती विकसीत होणं. (२) "मार्दवपूर्ण" - काही पुरुष अतिशय मार्दवपूर्ण वागणारे , बोलणारे, सौजन्यशील, सिव्हिलाइज्ड असतात. दुर्मीळ पण क्वचित सापडतात खरे. स्त्रियांना हे "नॉन्-थ्रेटनिंग" वाटतात. त्यांच्याबरोबर मन मोकळं करता येईल असं काहीसं वाटतं. हे पुरुष आवडण्यामागे शास्त्रीय कारण हेदेखील असू शकतं की मार्दव असल्याने मूल वाढविण्यास हा योग्य जोडीदार आहे असा "सबकॉन्शस" निर्णय मेंदू घेत असावा. शिवाय मित्र या रूपातदेखील हे पुरुष अगदी फिट बसतात. (३) "बॅड बॉय" - हे पुरुष रुढार्थाने पारंपारीक नसतात तर थोडे बंडखोर, धोकादायकच असू शकतात्.त्यांच्यामध्ये गुंतण्यात एक प्रकारचा धोका असतो. पण या धोक्यातच थ्रिल असतं. परत आपण अशा पुरषाला बदलू शकू हा अटळ आत्मविश्वास .आपलं प्रेम या आडमार्गाला गेलेल्या पुरषाला पारंपारीक सज्जनतेच्या मार्गावर घेऊन येइल आणि आपला अहंकार सुखावेल अशी काहीशी मनोभूमिका यामागे असू शकते. (४) "रोमँटीक" - कधीही पहीला वाढदिवस, पहीली भेट, पहीलं अमकंटमकं न विसरणारे हे पुरुष. फुलं देतील, चॉकलेटचा भडीमार करतील, भेटवस्तू, कवितांची पखरण करतील. भरपूर लाड आणि खूप लक्ष पुरवतील आपल्या प्रियेकडे. काही स्त्रियांना असे पुरुष का आवडतात हे ओळखणं फार अवघड नसावं. अजूनदेखील अनेक प्रकार असतील यात वाचकांनी जमेल तशी भर घालावी.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
205060 वाचन

💬 प्रतिसाद (125)

प्रतिक्रिया

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्

धमाल मुलगा
Tue, 11/02/2010 - 17:28 नवीन
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं !!!!!!! प्रिय मित्र प.रा., तू चाइल्ड हेल्पलाइनला कॉल घेतोस की करत असतोस? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

जसा मूड असेल त्यावर डिपेंड

परिकथेतील राजकुमार
Tue, 11/02/2010 - 18:05 नवीन
जसा मूड असेल त्यावर डिपेंड ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ही ही ही... जबरी... जोरदार

इंटरनेटस्नेही
Tue, 11/02/2010 - 16:50 नवीन
ही ही ही... जबरी... जोरदार ठसका लागला.. :D (बोबंलणारं बाळ) इंट्या, (इयत्ता - पहिली - अ) असो. सिरिअसली, मी तुमची सुचना विचारात घेतली आहे. धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

बाळा, उगी उगी

वाहीदा
Wed, 11/03/2010 - 18:20 नवीन
उगीच आपली जाहीरातबाजी करु नये बाळा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

हो ना.. पण कधी कधी इतकं

इंटरनेटस्नेही
Wed, 11/03/2010 - 20:44 नवीन
हो ना.. पण कधी कधी इतकं 'डेस्पो' व्हायला होतं की विचारता सोय नाही..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

डेस्पो ??

वाहीदा
गुरुवार, 11/04/2010 - 12:32 नवीन
'डेस्पो' म्हणजे काय रे भाऊ ?? :-? ॠषि, अभ्यासात लक्ष घाल ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

डेस्पो म्हणजे डेस्परेट.. मला

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 11/04/2010 - 15:58 नवीन
डेस्पो म्हणजे डेस्परेट.. मला वाटलेलचं की तरुणाईचे शॉर्टफॉर्म्स तुमच्या जमान्यातील लोकांना कळनार नाहीत म्हणुन... :D .. अभ्यास सुरु आहे... लेट्स सी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

ॠषि, तू पण ना त्या पराच्या नादाला लागून आगाऊ झाला आहेस

वाहीदा
गुरुवार, 11/04/2010 - 16:12 नवीन
क्यूं बच्चू, दूध के दात निकले नहीं और अभी से डेस्पो ?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

.. परा हे आमचे सर्वच बाबतीत

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 11/04/2010 - 16:27 नवीन
:D .. परा हे आमचे सर्वच बाबतीत आर्दश आहेत! परा यांच्या सारखा संत सज्जन मागील १०,००० वर्षांत झाला नाही आणि पुढेही होणार नाही कदाचित!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

इंट्या... अरे दादा धाग्याचे

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 11/04/2010 - 16:31 नवीन
इंट्या... अरे दादा धाग्याचे शिर्षक निट वाच रे. ' स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात' असा धागा आहे, 'पुरुषांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात] असा नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इंटरनेटस्नेही

ही ही ही.. जबरी!__/\__आमचा

इंटरनेटस्नेही
गुरुवार, 11/04/2010 - 16:44 नवीन
पराशेठ, ही ही ही.. जबरी! __/\__ आमचा प्रणाम स्वीकारावा! ___________________ सहजराव, थांबतो आता. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

सलमान खान आवडतो.

नरेशकुमार
Tue, 11/02/2010 - 18:03 नवीन
सलमान खान आवडतो.
  • Log in or register to post comments

लेख वाचुन भारतभुषन

वेताळ
Tue, 11/02/2010 - 20:22 नवीन
व प्रदीपकुमार नायक का झाला ते कळाले.
  • Log in or register to post comments

हसून हसून मेले !

वाहीदा
Wed, 11/03/2010 - 18:18 नवीन
भारतभूषण अन प्रदिपकुमार वरिल सर्व गुण त्यांच्याकडे होते म्हणून नायक झाले? अन ते स्रियांना आवडतात ?? ==)) ==)) हे नविनच कळले . लेकीन यह बात कुछ् हजम नहीं हुई ! ;-) बाकी शुची तुझा Bold (!) and Beautiful( ;-) ) लेख आवडला ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

कदाचित स्त्रियांना मनोनिग्रही

मृत्युन्जय
Wed, 11/03/2010 - 18:30 नवीन
कदाचित स्त्रियांना मनोनिग्रही पुरुषही आवडत असावेत. भारतभुषणचा मनोनिग्रह प्रचंड होता. समोर मधुबाला असताना देखील त्याच्या चेहेर्‍यावरची माशी सुद्धा कधी हलली नाही. अरे अशी मुलगी समोर असताना च्यायला विश्वामित्राची पण तपश्चर्या ढळली असती. आणि याच्या चेहेर्‍यावर कसलेच भाव नसायचे. जो माणूस मधुबालासमोर रॉमँटिक नाही होउ शकला त्याचा मनोनिग्रह किती कमालीचा पॉवरफुल्ल असेल विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

>>भारतभुषणचा मनोनिग्रह >>

यशोधरा
Wed, 11/03/2010 - 18:33 नवीन
>>भारतभुषणचा मनोनिग्रह >> =))) अगदी, अगदी! मला ते जिंदगीभर नहीं भूलेगी... गाणे आठवले आणि तो ठोंब्या भाभू!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मनोनिग्रह काय कप्प्पाळीचा पॉवरफुल्ल ??

वाहीदा
Wed, 11/03/2010 - 18:53 नवीन
ठोंब्या ! यडपट, बावळट वाटायचा नुसता तो भारतभूषण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

यडपट, बावळट वाटायचा नुसता तो

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/03/2010 - 19:08 नवीन
यडपट, बावळट वाटायचा नुसता तो भारतभूषण
तुमच्या जमान्यातले बरेचसे हिरो तसेच होते ग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

ए आगाऊ बाळा..

वाहीदा
Wed, 11/03/2010 - 19:13 नवीन
तुमच्या जमान्यातले म्हणजे काय रे हलकट्ट परा ?? आता तू भेटच मला, तुला या जमान्यातील नायिका काय इंगे दाखवू शकते ते सांगते ... ~ वाहीदा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

इथे एक स्त्री सदस्या मला धमकी

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/03/2010 - 19:34 नवीन
इथे एक स्त्री सदस्या मला धमकी देत आहे. तरी क्रुपया संपादकांनी ह्याची दखल घ्यावी आणि मज पामरास अभय द्यावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

नायिका बोलतेय यांच्याशी तर

पुष्करिणी
Wed, 11/03/2010 - 20:58 नवीन
नायिका बोलतेय यांच्याशी तर यांना अभय हवाय , अरेरे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

खरं आहे गं तुझं, पण

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 11/03/2010 - 21:07 नवीन
>> ... तर यांना अभय हवाय ... << नशीब तरी आता एकमेव अ‍ॅक्टींग करणारा देओल मागतोय! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्करिणी

हा हा हा

वाहीदा
गुरुवार, 11/04/2010 - 12:29 नवीन
इथे एक स्त्री सदस्या मला धमकी देत आहे. तरी क्रुपया संपादकांनी ह्याची दखल घ्यावी आणि मज पामरास अभय द्यावे. हा ! हा ! हा ! माझे पाशवी हास्य तुझ्या पर्यंत पोहचले असेल बाकी तुझा interest एवढा बदलला असेल असे वाटले नव्हते हो कधी, "एकदम अभय हवाय" ?? :-? परा तुझी परी होत चालली की काय ? ;-) क्या करें जमाना बदल रहा हैं , और तुम भी .. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

आली आली पाशवी स्त्रीयांची

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 11/04/2010 - 12:47 नवीन
आली आली पाशवी स्त्रीयांची कंपुधाड आली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वाहीदा

तरीही दिला तुझा अभय!

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 11/04/2010 - 16:03 नवीन
तरीही दिला तुझा अभय! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा