Skip to main content

स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात? - एक नीरीक्षण

लेखक शुचि यांनी रविवार, 31/10/2010 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी - माधुरी आणि नुपूर या माझ्या सहकारी माझ्याहून १० ते ८ वर्षाने तरी लहान आहेत. परवाचीच गोष्ट आम्ही ६० मैल दूर कॉर्पोरेट ऑफीसला कामानिमित्त जाऊन आलो आणि दुसर्‍या दिवशी रात्री डिप्लॉयमेंट होती म्हणून दोघी माझ्या खोलीवर राहील्या. रात्री डिनरच्या वेळी साहजीकच कॉर्पोरेट ऑफीस , तेथील नवीन सहकारी यांचा विषय निघाला. गाडी या रूळावर आली की कोणते सहकारी कसे वाटले? आणि काही रोचक पण सामाइक मुद्दे समोर आले. जसं मला आणि माधुरीला योगेश आवडला, नुपूरला सुमीत आवडला, मला आणि नुपूरला हेमंत अजीबात आवडला नाही तीघींनाही अली सो सो वाटला. पहीली सुरुवात मी केली "माधुरी , ये हेमंतको कुछ मॅनर्स नही लगता है यार. कल एक तो लंच पर इतना काफी अंतर था बीचमें फीर भी चिल्ला चिल्ला के मुझे पूछ रहा था कहां से हूं, फिर पुणे मे एक्झॅक्टली कहांसे? फिर महाराष्ट्रीअन हूं क्या? वो समझनेके बाद बोलने लगा - कस काय हाय, बर हाय काय?" ...... "रिअली एम्बॅरॅसींग!" माधुरीने इतकं नीरीक्षण केलं नव्हतं पण नुपूरने दुजोरा दिला. ती म्हणाली तो जरा तसाच आहे एकदा तिचा डिफेक्ट लाटला होता तेव्हा पासून तिने फोनवर त्याच्याशी डिफेक्ट ची चर्चा करणं बंद केलं. आमच्या तीघींच एक मत पक्क होतं ते होतं अली बद्दल की हा स्वतःबद्दल अति बोलतो. मान्य त्याची बायको पहीलट्करीण आहे, फेब्रुवारीमधे त्यांना मुलगी होणार आहे पण पूर्ण लंच सगळ्यांना त्याच विषयावर वेठीला धरण्याचं कारण नव्हतं. नुपूरला सुमीत खूप आवडला होता. सुमीत मॅनेजर होता. माधुरी गेल्या महीन्यात भारतातून अमेरीकेत आली आहे. असो. मला आणि माधुरीला योगेश आवडला कारण तो फार बोलत नव्हता , जे बोलत होता ते सेन्सीबल बोलत होता. त्याच्यामध्ये मार्दव एक प्रकारचा जंटलनेस होता. तो खूप वेलमॅनर्ड आनि सौजन्यशील वाटला. हे सर्व आत्ता आठवण्याचं कारण की पुढील लेख वाचनात आला- http://timesofindia.indiatimes.com/life-style/relationships/man-woman/5… . हा लेख आहे पुरुषांना कशा प्रकारच्या स्त्रिया आवडत नाहीत. गोषवाराच सांगायचा तर - (१) कटकट्या - २४ X ७ कशा ना कशा बद्दल कीरकीर करणार्‍या, नकारात्मक दृष्टीकोन असलेल्या. (२) वजनाची फार काळजी करणार्‍या म्हणजे खाणं पीणं एंजॉय न करता सतत स्वतःच्या वजनाचीच काळजी करणार्‍या (३) सतत सासरच्या माणसांबद्दल उफराटं बोलणार्‍या (४) कामामध्ये अति व्यग्र स्त्रिया (५) सतत दुसर्‍यांची दुखणी खुपणी बरी करण्याकरता धावणार्‍या आणि आमची या लेखाच्या बरोब्बर उलटी चर्चा आठवली ती म्हणजे स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात. खालील निष्कर्ष हे मैत्रिणींबरोबर केलेल्या चर्चेतून निष्पन्न झालेले आहेत. मी त्यांची जबाबदारी घेत नाही. मी फक्त मांडण्याचं काम करते आहे. (१) "पॉवरफुल" - आदिमानवाच्या काळात कदाचित शारीरीक सबळता हा निकष असेल पण आता आधुनिक युगामधे तो निकष तितक्या प्रिमिटीव्ह पातळीवर न राहता तो निकष देखील विकसीत झाला आहे . "आर्थिक", "सामाजिक", "बौद्धिक" दृष्ट्या सक्षम पुरुष हे स्त्रियांना चटकन अपील होतात (भावतात). नात्यामधे स्त्रीला सुरक्षेची भावना महत्वाची वाटते. जी सुरक्षा अर्थिकदृष्ट्या स्थिर किंवा स्वतःच्या कार्यक्षेत्रामधे स्थिर झालेली व्यक्ती परिपूर्ण रीतीने देऊ शकते. त्याचप्रमाणे नात्यामधील "कमीटमेंट" ही स्थैर्य लाभलेले पुरुषच देऊ शकतात. शेवटचा मुद्दा अशा रीतीने स्थैर्य लाभलेल्या पुरुषाचा सहवास प्रिय वाटणं कारण स्त्रीला स्वतःला स्थिरता लाभल्याने जणू सुर्यप्रकाश मिळालेल्या कमळासारखी ती विकसीत होणं. (२) "मार्दवपूर्ण" - काही पुरुष अतिशय मार्दवपूर्ण वागणारे , बोलणारे, सौजन्यशील, सिव्हिलाइज्ड असतात. दुर्मीळ पण क्वचित सापडतात खरे. स्त्रियांना हे "नॉन्-थ्रेटनिंग" वाटतात. त्यांच्याबरोबर मन मोकळं करता येईल असं काहीसं वाटतं. हे पुरुष आवडण्यामागे शास्त्रीय कारण हेदेखील असू शकतं की मार्दव असल्याने मूल वाढविण्यास हा योग्य जोडीदार आहे असा "सबकॉन्शस" निर्णय मेंदू घेत असावा. शिवाय मित्र या रूपातदेखील हे पुरुष अगदी फिट बसतात. (३) "बॅड बॉय" - हे पुरुष रुढार्थाने पारंपारीक नसतात तर थोडे बंडखोर, धोकादायकच असू शकतात्.त्यांच्यामध्ये गुंतण्यात एक प्रकारचा धोका असतो. पण या धोक्यातच थ्रिल असतं. परत आपण अशा पुरषाला बदलू शकू हा अटळ आत्मविश्वास .आपलं प्रेम या आडमार्गाला गेलेल्या पुरषाला पारंपारीक सज्जनतेच्या मार्गावर घेऊन येइल आणि आपला अहंकार सुखावेल अशी काहीशी मनोभूमिका यामागे असू शकते. (४) "रोमँटीक" - कधीही पहीला वाढदिवस, पहीली भेट, पहीलं अमकंटमकं न विसरणारे हे पुरुष. फुलं देतील, चॉकलेटचा भडीमार करतील, भेटवस्तू, कवितांची पखरण करतील. भरपूर लाड आणि खूप लक्ष पुरवतील आपल्या प्रियेकडे. काही स्त्रियांना असे पुरुष का आवडतात हे ओळखणं फार अवघड नसावं. अजूनदेखील अनेक प्रकार असतील यात वाचकांनी जमेल तशी भर घालावी.

वाचने 205235
प्रतिक्रिया 125

प्रतिक्रिया

In reply to by योगप्रभू

कडक प्रतिसाद. जवळजवळ सर्वच विवाहित पुरुषांना पटण्यासारखा! (विवाहित)बेसनलाडू यावरून आमच्या बैल या विडंबनाची आठवण झाल्याशिवाय राहवले नाही. (स्मरणशील)बेसनलाडू

माझ्या एका मित्राला मैत्रिणींबरोबर गंमतीत आणि मैत्रीत फ्लर्टची फार सवय आहे; जेवढी मैत्री जास्त तेवढं याचं फ्लर्टींग जास्त! त्याच्या गर्लफ्रेंडलाही या सगळ्याची मजा वाटते आणि ती पण माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तो सगळ्यांचा खूप चांगला मित्र आहे याचा आनंद होतो आणि तिला हे असं इतर मैत्रीणींशी केलेलं मैत्रीखात्यातलं फ्लर्टींग आवडतंही. कधीमधी तीसुद्धा काड्या लावत बसते. आमच्या एकूणच मित्रमंडळात हा मित्र खूप लाडका आहे हे वेगळं सांगायची गरज नसावी. सामान्यतः मुलींना मुलगी म्हणून न वागवणारे, एक माणूस म्हणून वागवणारे लोकं मला आवडतात, अशा लोकांशी माझी मैत्री चटकन होते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सामान्यतः मुलींना मुलगी म्हणून न वागवणारे, एक माणूस म्हणून वागवणारे लोकं मला आवडतात, अशा लोकांशी माझी मैत्री चटकन होते. प्रतिसादामधले हे वाक्य १०० टक्के पटले.

In reply to by मुक्तसुनीत

+२ ... पटले. (सामान्य मुलींना माणूस म्हणून वागवणारा) ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

सामान्य हा शब्द काळजाला भिडला, अंमळ हळवा झालो आणि डोळे पाणावले. (नो थ्यांक्स बिरुटेसर, रुमाल आहे माझ्याकडं, तुम्ही पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा!)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

भेटा एकदा!* *ही धमकीच आहे.

In reply to by पिवळा डांबिस

काका, माझा हा मित्र आता अमेरिकेत असला तरी मी त्याच्याबद्दल बोलते होते, तुमच्याबद्दल नाही! ;-)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

>> मुलींना मुलगी म्हणून न वागवणारे, एक माणूस म्हणून वागवणारे लोकं मला आवडतात >> वय वाढेल तसे असेच लोक जास्त भेटतात ग बाई. लहान आहेस तोवर मुलगी म्हणून वागावणं एन्जॉय करून घे. ;) गम्मत करतेय :)

In reply to by शुचि

हॅ हॅ हॅ ... वय वाढेल तेव्हा मुलगी म्हणून वागवणारे जास्त आवडतील! ;-) पुढचं पुढे ... आणि तेव्हा हे मित्रंही म्हतारे 'काका'च झाले असतील ना!! एखाद्या मुलाशी चांगली दोस्ती झाली आहे हे समजण्याचे उपाय म्हणजे बर्‍याचदा 'ही काय मुलगी आहे का?' अशी वाक्य कानावर येतात. नाहीतर स्कूटर, बाईक सर्व्हीसिंगला टाकायची असताना मुलं लिफ्ट मागतात. मी सध्या भलत्या काहीतरी विषयात नोकरी करत असल्यामुळे मुली ही अतिशय दुर्मिळ वस्तू आहे. त्यातही माझ्यासारख्या टवाळ पोरीच आजूबाजूला जास्त! त्यामुळे बर्‍याचदा अनिच्छेनेही मुलगी आहे यावरून "एन्जॉय" करून घेते.

इतक्या महत्त्वाच्या विषयावरचा लेख अस्थायी किंवा अश्लील किंवा कोणी सुरू केली आहे व तिच्यात चित्रं आहेत की नाहीत अशी चर्चा का व्हावी ते कळलं नाही. मूळ लेखातल्या यादीत थोडी भर. यातल्या काही गोष्टी स्त्री व पुरुष दोहोंना लागू पडतात. १. 'विनोदबुद्धी असलेले' - जग गमतीदार आहे असा दृष्टीकोन असणारे, आणि ती गंमत शेअर करण्यात उत्साह दाखवणारे कोणाला आवडणार नाहीत? २. 'संगीताचं अंग असलेले' - ज्यांना एखादं वाद्य वाजवता येतं अशांना स्वरांच्या माध्यमातून मोहिनी टाकता येते. निदान रसिकपणे कानसेन असणंही महत्त्वाचं असतं. ३. 'खेळांमध्ये प्रवीण असलेले' - म्हणजे अर्थातच अगदी सचिन तेंडुलकर नाही, पण काहींना जात्याच खेळांमध्ये गती असते. हालचाली सौष्ठवपूर्ण असतात. ४. 'सकारात्मक भूमिका असलेले' - हातपाय गाळून बसणे, तक्रार करणे याऐवजी उत्साहाने सगळ्याला सामोरं जाणारे.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही नाही, उशीरच असा काही झालेला नाही. फार्म्युले काम करत नाहीएत इतकंच सांगतोय आम्ही. आणि उशीराचा बाबतीत म्हणाल तर बेटर लेट.... यु नो!

आवरा राव आता. आत्ता या दोन छोट्या चकमकी वाचून फुटायची वेळ आली. ;)

तरुणाईच्या जाहीरातबाजीचा क्षीण प्रयत्न !! अवांतर : लगेच खरडी करु नयेत , सिनियर सिटीझन्सशी आम्ही भांडत नाही हे तरी कितिवेळा सांगायच !!

बरं ते सगळं राहू दे.... लग्न झालेल्या तुम्हा मुरांब्यांना विचारतो... लग्न करावं की नाही मग आम्ही?

In reply to by स्वानन्द

कसं आहे ना मित्रा, वाघोबा म्हणलं तरी खातो, अन वाघ म्हणलं तरी खातो..मग जरा लढून, मजा करुन, सोबत थोडं जगुन पहावं असं माझं मत आहे. :)

हम्म्म्म वाचतोय... :) (सकारात्मक, मार्दवपुर्ण, आणि सिंगल) इंट्या.

In reply to by इंटरनेटस्नेही

"मी सिंगल आहे", "मी लहान आहे", "माझं वय अमुकतमुक" असं बोंबलणारी बाळं बर्‍याचशा मुली-बायकांना आवडत नाहीत असं माझं आणखी एक निरीक्षण नमूद करते.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

"मी सिंगल आहे", "मी लहान आहे", "माझं वय अमुकतमुक" असं बोंबलणारी बाळं बर्‍याचशा मुली-बायकांना आवडत नाहीत असं माझं आणखी एक निरीक्षण नमूद करते.
अशा मुली-बायका चाईल्ड अ‍ॅब्युजला प्रोत्साहन देतात असं माझं आणखी एक निरीक्षण नमूद करतो.

In reply to by परिकथेतील राजकुमार

अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्गं !!!!!!! प्रिय मित्र प.रा., तू चाइल्ड हेल्पलाइनला कॉल घेतोस की करत असतोस? ;)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

ही ही ही... जबरी... जोरदार ठसका लागला.. :D (बोबंलणारं बाळ) इंट्या, (इयत्ता - पहिली - अ) असो. सिरिअसली, मी तुमची सुचना विचारात घेतली आहे. धन्यवाद. :)

In reply to by वाहीदा

डेस्पो म्हणजे डेस्परेट.. मला वाटलेलचं की तरुणाईचे शॉर्टफॉर्म्स तुमच्या जमान्यातील लोकांना कळनार नाहीत म्हणुन... :D .. अभ्यास सुरु आहे... लेट्स सी..

In reply to by इंटरनेटस्नेही

क्यूं बच्चू, दूध के दात निकले नहीं और अभी से डेस्पो ?? ;-)

In reply to by वाहीदा

:D .. परा हे आमचे सर्वच बाबतीत आर्दश आहेत! परा यांच्या सारखा संत सज्जन मागील १०,००० वर्षांत झाला नाही आणि पुढेही होणार नाही कदाचित!

In reply to by इंटरनेटस्नेही

इंट्या... अरे दादा धाग्याचे शिर्षक निट वाच रे. ' स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात' असा धागा आहे, 'पुरुषांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात] असा नाहीये.

In reply to by परिकथेतील राजकुमार

पराशेठ, ही ही ही.. जबरी! __/\__ आमचा प्रणाम स्वीकारावा! ___________________ सहजराव, थांबतो आता. :)

In reply to by वेताळ

भारतभूषण अन प्रदिपकुमार वरिल सर्व गुण त्यांच्याकडे होते म्हणून नायक झाले? अन ते स्रियांना आवडतात ?? ==)) ==)) हे नविनच कळले . लेकीन यह बात कुछ् हजम नहीं हुई ! ;-) बाकी शुची तुझा Bold (!) and Beautiful( ;-) ) लेख आवडला ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

कदाचित स्त्रियांना मनोनिग्रही पुरुषही आवडत असावेत. भारतभुषणचा मनोनिग्रह प्रचंड होता. समोर मधुबाला असताना देखील त्याच्या चेहेर्‍यावरची माशी सुद्धा कधी हलली नाही. अरे अशी मुलगी समोर असताना च्यायला विश्वामित्राची पण तपश्चर्या ढळली असती. आणि याच्या चेहेर्‍यावर कसलेच भाव नसायचे. जो माणूस मधुबालासमोर रॉमँटिक नाही होउ शकला त्याचा मनोनिग्रह किती कमालीचा पॉवरफुल्ल असेल विचार करा.

In reply to by मृत्युन्जय

>>भारतभुषणचा मनोनिग्रह >> =))) अगदी, अगदी! मला ते जिंदगीभर नहीं भूलेगी... गाणे आठवले आणि तो ठोंब्या भाभू!

In reply to by वाहीदा

यडपट, बावळट वाटायचा नुसता तो भारतभूषण
तुमच्या जमान्यातले बरेचसे हिरो तसेच होते ग ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

तुमच्या जमान्यातले म्हणजे काय रे हलकट्ट परा ?? आता तू भेटच मला, तुला या जमान्यातील नायिका काय इंगे दाखवू शकते ते सांगते ... ~ वाहीदा

In reply to by वाहीदा

इथे एक स्त्री सदस्या मला धमकी देत आहे. तरी क्रुपया संपादकांनी ह्याची दखल घ्यावी आणि मज पामरास अभय द्यावे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

इथे एक स्त्री सदस्या मला धमकी देत आहे. तरी क्रुपया संपादकांनी ह्याची दखल घ्यावी आणि मज पामरास अभय द्यावे. हा ! हा ! हा ! माझे पाशवी हास्य तुझ्या पर्यंत पोहचले असेल बाकी तुझा interest एवढा बदलला असेल असे वाटले नव्हते हो कधी, "एकदम अभय हवाय" ?? :-? परा तुझी परी होत चालली की काय ? ;-) क्या करें जमाना बदल रहा हैं , और तुम भी .. ;-)