+ १
अदिती आणि चित्राशी सहमत !
कोणताही पुरूष हा थेट त्याच्याशी कोणतंतरी नातं जोडता आलं किंवा शक्यता असली तरच आवडला पाहिजे का ? सहज जाता जाता निव्वळ 'दिसलेला' कोणी आवडू शकतो. चार तासांच्या प्रवासात सहप्रवासी असलेला आवडू शकतो किंवा नावडू शकतो. यात शुचीनी मांडलेले मुद्दे उदाहरण म्हणून घ्या. त्यात एका स्त्रीने हे लिहावं यात 'नवल' वाटण्यासारखे काय !!! असे नवल वाटणारे पुरूष मित्र हे ही काही नवल नाही ;)
एकुणच धागा आणि त्यावरच्या 'चर्चा' वाचुन चुकून 'हळदी कुंकवाच्या' कार्यक्रमाच्या हॉलमध्ये शिरल्यासारखे वाटले.
बाकी चालु द्या...
अवांतर :- मिपाला आता खरडफळ्याची खरच गरज उरली आहे का ? (हे स्वगत आहे. मिपा पदाधिकारी वर्गाला उद्देशुन हा प्रश्न नाही.)
शुचि लेख आवडला ,
प्रश्न हा पडला की 'त्या' पुरूषांना कसे पुरुष आवडत असतील. आणी 'त्या' स्त्रियांना कश्या प्रकारच्या स्त्रिया आवडत असतील ?
अवांतर : 'त्या' स्त्रियांच्या सत्यकथेवर आधारित http://en.wikipedia.org/wiki/Monster_(2003_film) (मॉनस्टर) नक्की पहावा.
निवांत : हापिसात जाणे, पगार घरी आणणे आणि निवांत जगणे. 'हेच का केलंस? तेच का नाही केलंस' वगैरे प्रश्नांच्या भानगडीत पडण्याचा कंटाळा असलेले पुरुष. बर्याचदा अशा पुरुषांना वाचनाचा किंवा टिव्ही/सिनेमे पाहण्याचा नाद असतो. त्यांना अगदी रोजचं वर्तमानपत्रदेखील पुरवुन पुरवुन, 'छोट्या जाहिराती'सकट वाचायची हौस असते. अशा प्रश्नांमध्ये डोकं घातल्यास वाचनाची समाधी भंग पावते, रसभंग होतो त्यामुळं 'हे पैसे! तुला मी कधी काही अडवलंय का तुला काय हव्वं ते कर ना प्रिये!' वगैरे गोग्गोड टाकून बर्याचशा झेंगटातून स्वतःला सोडवून घेत, सोफ्यावर लोळत टिव्ही किंवा पुस्तकं वगैरे वाचनाचा आनंद घेणारे पुरुष. अशा निवांत पुरुषांचा एक फायदा असतो, की त्यांचं डिट्टेलिंगकडं फारसं लक्षच नसतं. त्यामुळं वादाचे फार प्रसंग येत नाहीत. अर्थात काही स्त्रीया अशा पुरुषांना 'निर्लज्ज' वगैरे शेलकी विशेषणं लाऊन बदनाम करतात, पण त्याकडे लक्ष देण्यापेक्षा होणारा फायदा हा जास्त फायदेशीर असतो. ;)
(असं मला एकुण ८ स्त्रीयांनी पटवून दिलं होतं, त्यातल्या शेवटीच्या गळाला लागलोच. ;) =)) )
>>> असं मला एकुण ८ स्त्रीयांनी पटवून दिलं होतं,
पुरुषांना अशी वाढीव संख्या सांगण्यात मोठा रस असतो. ;)
[याला म्हणायचं पुरुषी अहंकार]
धमाल, पुरुषांना कशा प्रकारच्या स्त्रीया आवडतात यावर एक धागा काढा राव.
दिवाळीचा फराळ करता करता चर्चा करु, काय म्हणता ?
-दिलीप बिरुटे
काय हे गुर्जी? वाढीव काय राव? स्वतःचा छळ कशाला कोण वाढवून सांगतो का? :(
>>[याला म्हणायचं पुरुषी अहंकार]
अत्यंत पाशवी प्रतिसादामुळे माझ्या कोमल मनास इंगळ्या डस्ल्या हे मी इथे खेदानं नमुद करु इच्छितो.
अहो, पुरुषांना अहंकार बाळगायला हल्ली परवानगी आहे का? ;)
(पळा आता...नायतर खातंय पाशवी मार )
>>धमाल, पुरुषांना कशा प्रकारच्या स्त्रीया आवडतात यावर एक धागा काढा राव.
हा हा हा...इकडं नको. तुम्ही एखादा दिवाळी अंक काढा,त्याला देतो लेख ;) (पर्या गप...मी मचाकला कथा देणार नैय्ये.)
>>दिवाळीचा फराळ करता करता चर्चा करु, काय म्हणता ?
जरुर जरुर...पण त्यापायात आपलं दिवाळं काढेल इथलं पब्लिक त्याचं काय? घाबरके रैना पडता है भिडू... :D
(प्रतिक्रिया केवळ विनोद निर्मितीसाठी. ह. घेणे)
शुची,
स्त्रियांना विशेषतः विवाहानंतर आवडणार्या पुरुषांच्या कॅटॅगरीत एक अॅड करावी म्हणतो. अनुभवाचे बोल.
नंदीबैल पुरुष : हे नेहमीच बायकांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्या चेहर्याकडे बघून, अंदाज घेऊन देतात. स्वतःची फारशी अक्कल चालवत नाहीत. खरेदीच्या वेळी पिशव्या सांभाळायला, गाडी थांबल्यावर/ सिनेमाच्या मध्यंतरात वडापाव-कोल्ड्रिंक व पाणी आणायला, बाहेर गेल्यावर लहान मुलांच्या हमखास होणार्या 'शिशु'कार्यक्रमांवर निरीक्षक म्हणून अशा अनेक प्रसंगी हे पुरुष उपयुक्त ठरतात. यांचे पाकिट किंवा कार्ड बायकोच्या ताब्यात असते. यांचा वर्षातून एकच सण म्हणजे 'बैलपोळा'. तो दिवाळीच्या पाडव्याला असतो. त्या दिवशीच बायका उपचार म्हणून यांना अंघोळ घालतात व केवळ त्याच प्रसंगी दोन बोटे तेल चोपडतात. बैलाचे पोवळे खाजवल्यावर तो मान वर करत जातो तसे हे पुरुष अंगावर आणखी हात फिरेल या अपेक्षेने वर पाहतात. अशावेळी चतुर बायका गडबडीने बाहेर जाऊन औक्षणाचे तबक आणतात आणि काही सेकंदात ओवाळून पळ काढतात. पुन्हा 'बाबाच्या अंघोळीला फुलबाज्या लावा' असे सांगून मुलांना स्नानगृहाच्या दाराशी उभे करतात. या अल्पकालीन उपकाराचा मोठा मोबदला त्या पुरुषांकडून त्या दिवशी वसूल करतात.
हे पुरुष बैल असले तरी झापड लावलेला घोडा आणि ओझ्याचे गाढव अशा भूमिकाही उत्तम वठवतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या अंगावर वस्सकन ओरडल्यास ते भांडणात माघार घेतात आणि 'बरं बाई. तुझं खरं' असे म्हणतात. या पुरुषांना इमोशनल ब्लॅकमेल करणे सोपे असते. जादा घरकाम/जड वस्तूंची हलवाहलव करायची असेल त्यावेळी स्वयंपाकघरात भांडी वाजवत एकच वाक्य म्हणायचे ' त्या सुयोगचे वडील बघा. किती मदत करतात घरात. नाहीतर इकडे. आमचे नशीबच मेले खोटे' हे ऐकल्यावर बैलोबा निमूट उठून काम करतात. :)
कडक प्रतिसाद. जवळजवळ सर्वच विवाहित पुरुषांना पटण्यासारखा!
(विवाहित)बेसनलाडू
यावरून आमच्या बैल या विडंबनाची आठवण झाल्याशिवाय राहवले नाही.
(स्मरणशील)बेसनलाडू
माझ्या एका मित्राला मैत्रिणींबरोबर गंमतीत आणि मैत्रीत फ्लर्टची फार सवय आहे; जेवढी मैत्री जास्त तेवढं याचं फ्लर्टींग जास्त! त्याच्या गर्लफ्रेंडलाही या सगळ्याची मजा वाटते आणि ती पण माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तो सगळ्यांचा खूप चांगला मित्र आहे याचा आनंद होतो आणि तिला हे असं इतर मैत्रीणींशी केलेलं मैत्रीखात्यातलं फ्लर्टींग आवडतंही. कधीमधी तीसुद्धा काड्या लावत बसते. आमच्या एकूणच मित्रमंडळात हा मित्र खूप लाडका आहे हे वेगळं सांगायची गरज नसावी.
सामान्यतः मुलींना मुलगी म्हणून न वागवणारे, एक माणूस म्हणून वागवणारे लोकं मला आवडतात, अशा लोकांशी माझी मैत्री चटकन होते.
सामान्यतः मुलींना मुलगी म्हणून न वागवणारे, एक माणूस म्हणून वागवणारे लोकं मला आवडतात, अशा लोकांशी माझी मैत्री चटकन होते.
प्रतिसादामधले हे वाक्य १०० टक्के पटले.
>> मुलींना मुलगी म्हणून न वागवणारे, एक माणूस म्हणून वागवणारे लोकं मला आवडतात >>
वय वाढेल तसे असेच लोक जास्त भेटतात ग बाई. लहान आहेस तोवर मुलगी म्हणून वागावणं एन्जॉय करून घे. ;)
गम्मत करतेय :)
हॅ हॅ हॅ ... वय वाढेल तेव्हा मुलगी म्हणून वागवणारे जास्त आवडतील! ;-) पुढचं पुढे ... आणि तेव्हा हे मित्रंही म्हतारे 'काका'च झाले असतील ना!!
एखाद्या मुलाशी चांगली दोस्ती झाली आहे हे समजण्याचे उपाय म्हणजे बर्याचदा 'ही काय मुलगी आहे का?' अशी वाक्य कानावर येतात. नाहीतर स्कूटर, बाईक सर्व्हीसिंगला टाकायची असताना मुलं लिफ्ट मागतात.
मी सध्या भलत्या काहीतरी विषयात नोकरी करत असल्यामुळे मुली ही अतिशय दुर्मिळ वस्तू आहे. त्यातही माझ्यासारख्या टवाळ पोरीच आजूबाजूला जास्त! त्यामुळे बर्याचदा अनिच्छेनेही मुलगी आहे यावरून "एन्जॉय" करून घेते.
इतक्या महत्त्वाच्या विषयावरचा लेख अस्थायी किंवा अश्लील किंवा कोणी सुरू केली आहे व तिच्यात चित्रं आहेत की नाहीत अशी चर्चा का व्हावी ते कळलं नाही. मूळ लेखातल्या यादीत थोडी भर. यातल्या काही गोष्टी स्त्री व पुरुष दोहोंना लागू पडतात.
१. 'विनोदबुद्धी असलेले' - जग गमतीदार आहे असा दृष्टीकोन असणारे, आणि ती गंमत शेअर करण्यात उत्साह दाखवणारे कोणाला आवडणार नाहीत?
२. 'संगीताचं अंग असलेले' - ज्यांना एखादं वाद्य वाजवता येतं अशांना स्वरांच्या माध्यमातून मोहिनी टाकता येते. निदान रसिकपणे कानसेन असणंही महत्त्वाचं असतं.
३. 'खेळांमध्ये प्रवीण असलेले' - म्हणजे अर्थातच अगदी सचिन तेंडुलकर नाही, पण काहींना जात्याच खेळांमध्ये गती असते. हालचाली सौष्ठवपूर्ण असतात.
४. 'सकारात्मक भूमिका असलेले' - हातपाय गाळून बसणे, तक्रार करणे याऐवजी उत्साहाने सगळ्याला सामोरं जाणारे.
प्रतिक्रिया
+ १ अदिती आणि चित्राशी सहमत !
हेच म्हणते. आदिती आणि चित्रा
एकुणच धागा आणि त्यावरच्या
शुचि लेख आवडला , प्रश्न हा
शुचि, एक धमाकेदार लेखमाला
शुची यांचे लेखन आणि त्यावर
आणखी एक क्याटेगरी.
>>> असं मला एकुण ८
च्छ्या:!
धमाल, पुरुषांना कशा
मग काय..
मस्त धागा !
माझ्या मते 'नंदीबैल' ही कॅटॅगरी राहिली आहे...
हा ह हा!
LOL!
हा हा हा लै भारी !!
५००% सहमत! मला स्वतः ला जरी
माझ्या साधारण (आधी सुमारच
अग्गं माय !!! ( तोंडावर पदर
आत्ता कळलं
_/\_ धन्य!
आणि इथे अजून एक लोळेरी
बैल
आत्मचरित्र
माझ्या एका मित्राला
+१
+२
सामान्य...
अहो माणूसप्रेमी
इश्य!
अय्या इतकं काय लाजायचं ते !!
शी बै! काहीच कळत नाही हिला!!
काका ...
रापचिक रापचिक, कूल कूल!!
भेटा तुम्ही ....
>> मुलींना मुलगी म्हणून न
हॅ हॅ हॅ ...
आणखी काही
गुर्जी, तुमचे यशस्वी
अंमळ उशीर
नाही नाही, उशीरच असा काही
च्यायला
विरोधाचा क्षीण प्रयत्न!
तरुणाईच्या जाहीरातबाजीचा
बरं ते सगळं राहू दे.... लग्न
शादी का लड्डू
कसं आहे ना मित्रा, वाघोबा
हम्म्म्म वाचतोय...
"मी सिंगल आहे", "मी लहान
"मी सिंगल आहे", "मी लहान