पार्श्वभूमी - माधुरी आणि नुपूर या माझ्या सहकारी माझ्याहून १० ते ८ वर्षाने तरी लहान आहेत. परवाचीच गोष्ट आम्ही ६० मैल दूर कॉर्पोरेट ऑफीसला कामानिमित्त जाऊन आलो आणि दुसर्या दिवशी रात्री डिप्लॉयमेंट होती म्हणून दोघी माझ्या खोलीवर राहील्या.
रात्री डिनरच्या वेळी साहजीकच कॉर्पोरेट ऑफीस , तेथील नवीन सहकारी यांचा विषय निघाला. गाडी या रूळावर आली की कोणते सहकारी कसे वाटले? आणि काही रोचक पण सामाइक मुद्दे समोर आले.
जसं मला आणि माधुरीला योगेश आवडला,
नुपूरला सुमीत आवडला,
मला आणि नुपूरला हेमंत अजीबात आवडला नाही
तीघींनाही अली सो सो वाटला.
पहीली सुरुवात मी केली "माधुरी , ये हेमंतको कुछ मॅनर्स नही लगता है यार. कल एक तो लंच पर इतना काफी अंतर था बीचमें फीर भी चिल्ला चिल्ला के मुझे पूछ रहा था कहां से हूं, फिर पुणे मे एक्झॅक्टली कहांसे? फिर महाराष्ट्रीअन हूं क्या? वो समझनेके बाद बोलने लगा - कस काय हाय, बर हाय काय?" ...... "रिअली एम्बॅरॅसींग!"
माधुरीने इतकं नीरीक्षण केलं नव्हतं पण नुपूरने दुजोरा दिला. ती म्हणाली तो जरा तसाच आहे एकदा तिचा डिफेक्ट लाटला होता तेव्हा पासून तिने फोनवर त्याच्याशी डिफेक्ट ची चर्चा करणं बंद केलं.
आमच्या तीघींच एक मत पक्क होतं ते होतं अली बद्दल की हा स्वतःबद्दल अति बोलतो. मान्य त्याची बायको पहीलट्करीण आहे, फेब्रुवारीमधे त्यांना मुलगी होणार आहे पण पूर्ण लंच सगळ्यांना त्याच विषयावर वेठीला धरण्याचं कारण नव्हतं.
नुपूरला सुमीत खूप आवडला होता. सुमीत मॅनेजर होता. माधुरी गेल्या महीन्यात भारतातून अमेरीकेत आली आहे. असो.
मला आणि माधुरीला योगेश आवडला कारण तो फार बोलत नव्हता , जे बोलत होता ते सेन्सीबल बोलत होता. त्याच्यामध्ये मार्दव एक प्रकारचा जंटलनेस होता. तो खूप वेलमॅनर्ड आनि सौजन्यशील वाटला.
हे सर्व आत्ता आठवण्याचं कारण की पुढील लेख वाचनात आला- http://timesofindia.indiatimes.com/life-style/relationships/man-woman/5…
. हा लेख आहे पुरुषांना कशा प्रकारच्या स्त्रिया आवडत नाहीत. गोषवाराच सांगायचा तर - (१) कटकट्या - २४ X ७ कशा ना कशा बद्दल कीरकीर करणार्या, नकारात्मक दृष्टीकोन असलेल्या. (२) वजनाची फार काळजी करणार्या म्हणजे खाणं पीणं एंजॉय न करता सतत स्वतःच्या वजनाचीच काळजी करणार्या (३) सतत सासरच्या माणसांबद्दल उफराटं बोलणार्या (४) कामामध्ये अति व्यग्र स्त्रिया (५) सतत दुसर्यांची दुखणी खुपणी बरी करण्याकरता धावणार्या
आणि आमची या लेखाच्या बरोब्बर उलटी चर्चा आठवली ती म्हणजे स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात. खालील निष्कर्ष हे मैत्रिणींबरोबर केलेल्या चर्चेतून निष्पन्न झालेले आहेत. मी त्यांची जबाबदारी घेत नाही. मी फक्त मांडण्याचं काम करते आहे.
(१) "पॉवरफुल" - आदिमानवाच्या काळात कदाचित शारीरीक सबळता हा निकष असेल पण आता आधुनिक युगामधे तो निकष तितक्या प्रिमिटीव्ह पातळीवर न राहता तो निकष देखील विकसीत झाला आहे . "आर्थिक", "सामाजिक", "बौद्धिक" दृष्ट्या सक्षम पुरुष हे स्त्रियांना चटकन अपील होतात (भावतात). नात्यामधे स्त्रीला सुरक्षेची भावना महत्वाची वाटते. जी सुरक्षा अर्थिकदृष्ट्या स्थिर किंवा स्वतःच्या कार्यक्षेत्रामधे स्थिर झालेली व्यक्ती परिपूर्ण रीतीने देऊ शकते. त्याचप्रमाणे नात्यामधील "कमीटमेंट" ही स्थैर्य लाभलेले पुरुषच देऊ शकतात. शेवटचा मुद्दा अशा रीतीने स्थैर्य लाभलेल्या पुरुषाचा सहवास प्रिय वाटणं कारण स्त्रीला स्वतःला स्थिरता लाभल्याने जणू सुर्यप्रकाश मिळालेल्या कमळासारखी ती विकसीत होणं.
(२) "मार्दवपूर्ण" - काही पुरुष अतिशय मार्दवपूर्ण वागणारे , बोलणारे, सौजन्यशील, सिव्हिलाइज्ड असतात. दुर्मीळ पण क्वचित सापडतात खरे. स्त्रियांना हे "नॉन्-थ्रेटनिंग" वाटतात. त्यांच्याबरोबर मन मोकळं करता येईल असं काहीसं वाटतं. हे पुरुष आवडण्यामागे शास्त्रीय कारण हेदेखील असू शकतं की मार्दव असल्याने मूल वाढविण्यास हा योग्य जोडीदार आहे असा "सबकॉन्शस" निर्णय मेंदू घेत असावा. शिवाय मित्र या रूपातदेखील हे पुरुष अगदी फिट बसतात.
(३) "बॅड बॉय" - हे पुरुष रुढार्थाने पारंपारीक नसतात तर थोडे बंडखोर, धोकादायकच असू शकतात्.त्यांच्यामध्ये गुंतण्यात एक प्रकारचा धोका असतो. पण या धोक्यातच थ्रिल असतं. परत आपण अशा पुरषाला बदलू शकू हा अटळ आत्मविश्वास .आपलं प्रेम या आडमार्गाला गेलेल्या पुरषाला पारंपारीक सज्जनतेच्या मार्गावर घेऊन येइल आणि आपला अहंकार सुखावेल अशी काहीशी मनोभूमिका यामागे असू शकते.
(४) "रोमँटीक" - कधीही पहीला वाढदिवस, पहीली भेट, पहीलं अमकंटमकं न विसरणारे हे पुरुष. फुलं देतील, चॉकलेटचा भडीमार करतील, भेटवस्तू, कवितांची पखरण करतील. भरपूर लाड आणि खूप लक्ष पुरवतील आपल्या प्रियेकडे. काही स्त्रियांना असे पुरुष का आवडतात हे ओळखणं फार अवघड नसावं.
अजूनदेखील अनेक प्रकार असतील यात वाचकांनी जमेल तशी भर घालावी.
वाचने
205235
प्रतिक्रिया
125
मिसळपाव
प्रतिक्रिया
_/\_ धन्य!
In reply to आत्ता कळलं by श्रावण मोडक
आणि इथे अजून एक लोळेरी
In reply to माझ्या मते 'नंदीबैल' ही कॅटॅगरी राहिली आहे... by योगप्रभू
बैल
In reply to माझ्या मते 'नंदीबैल' ही कॅटॅगरी राहिली आहे... by योगप्रभू
आत्मचरित्र
In reply to माझ्या मते 'नंदीबैल' ही कॅटॅगरी राहिली आहे... by योगप्रभू
माझ्या एका मित्राला
+१
In reply to माझ्या एका मित्राला by ३_१४ विक्षिप्त अदिती
+२
In reply to +१ by मुक्तसुनीत
सामान्य...
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
अहो माणूसप्रेमी
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
इश्य!
In reply to माझ्या एका मित्राला by ३_१४ विक्षिप्त अदिती
अय्या इतकं काय लाजायचं ते !!
In reply to इश्य! by पिवळा डांबिस
शी बै! काहीच कळत नाही हिला!!
In reply to अय्या इतकं काय लाजायचं ते !! by शिल्पा ब
काका ...
In reply to इश्य! by पिवळा डांबिस
रापचिक रापचिक, कूल कूल!!
In reply to काका ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
भेटा तुम्ही ....
In reply to रापचिक रापचिक, कूल कूल!! by पिवळा डांबिस
>> मुलींना मुलगी म्हणून न
In reply to माझ्या एका मित्राला by ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ ...
In reply to >> मुलींना मुलगी म्हणून न by शुचि
आणखी काही
गुर्जी, तुमचे यशस्वी
In reply to आणखी काही by राजेश घासकडवी
अंमळ उशीर
In reply to गुर्जी, तुमचे यशस्वी by Nile
नाही नाही, उशीरच असा काही
In reply to अंमळ उशीर by ३_१४ विक्षिप्त अदिती
च्यायला
विरोधाचा क्षीण प्रयत्न!
In reply to च्यायला by श्रावण मोडक
तरुणाईच्या जाहीरातबाजीचा
बरं ते सगळं राहू दे.... लग्न
शादी का लड्डू
In reply to बरं ते सगळं राहू दे.... लग्न by स्वानन्द
कसं आहे ना मित्रा, वाघोबा
In reply to बरं ते सगळं राहू दे.... लग्न by स्वानन्द
हम्म्म्म वाचतोय...
"मी सिंगल आहे", "मी लहान
In reply to हम्म्म्म वाचतोय... by इंटरनेटस्नेही
"मी सिंगल आहे", "मी लहान
In reply to "मी सिंगल आहे", "मी लहान by ३_१४ विक्षिप्त अदिती
अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्
In reply to "मी सिंगल आहे", "मी लहान by परिकथेतील राजकुमार
जसा मूड असेल त्यावर डिपेंड
In reply to अग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग् by धमाल मुलगा
ही ही ही... जबरी... जोरदार
In reply to "मी सिंगल आहे", "मी लहान by ३_१४ विक्षिप्त अदिती
बाळा, उगी उगी
In reply to ही ही ही... जबरी... जोरदार by इंटरनेटस्नेही
हो ना.. पण कधी कधी इतकं
In reply to बाळा, उगी उगी by वाहीदा
डेस्पो ??
In reply to हो ना.. पण कधी कधी इतकं by इंटरनेटस्नेही
डेस्पो म्हणजे डेस्परेट.. मला
In reply to डेस्पो ?? by वाहीदा
ॠषि, तू पण ना त्या पराच्या नादाला लागून आगाऊ झाला आहेस
In reply to डेस्पो म्हणजे डेस्परेट.. मला by इंटरनेटस्नेही
.. परा हे आमचे सर्वच बाबतीत
In reply to ॠषि, तू पण ना त्या पराच्या नादाला लागून आगाऊ झाला आहेस by वाहीदा
इंट्या... अरे दादा धाग्याचे
In reply to .. परा हे आमचे सर्वच बाबतीत by इंटरनेटस्नेही
ही ही ही.. जबरी!__/\__आमचा
In reply to इंट्या... अरे दादा धाग्याचे by परिकथेतील राजकुमार
सलमान खान आवडतो.
लेख वाचुन भारतभुषन
हसून हसून मेले !
In reply to लेख वाचुन भारतभुषन by वेताळ
कदाचित स्त्रियांना मनोनिग्रही
In reply to हसून हसून मेले ! by वाहीदा
>>भारतभुषणचा मनोनिग्रह >>
In reply to कदाचित स्त्रियांना मनोनिग्रही by मृत्युन्जय
मनोनिग्रह काय कप्प्पाळीचा पॉवरफुल्ल ??
In reply to कदाचित स्त्रियांना मनोनिग्रही by मृत्युन्जय
यडपट, बावळट वाटायचा नुसता तो
In reply to मनोनिग्रह काय कप्प्पाळीचा पॉवरफुल्ल ?? by वाहीदा
ए आगाऊ बाळा..
In reply to यडपट, बावळट वाटायचा नुसता तो by परिकथेतील राजकुमार
इथे एक स्त्री सदस्या मला धमकी
In reply to ए आगाऊ बाळा.. by वाहीदा
नायिका बोलतेय यांच्याशी तर
In reply to इथे एक स्त्री सदस्या मला धमकी by परिकथेतील राजकुमार
खरं आहे गं तुझं, पण
In reply to नायिका बोलतेय यांच्याशी तर by पुष्करिणी
हा हा हा
In reply to इथे एक स्त्री सदस्या मला धमकी by परिकथेतील राजकुमार
आली आली पाशवी स्त्रीयांची
In reply to हा हा हा by वाहीदा
तरीही दिला तुझा अभय!
In reply to आली आली पाशवी स्त्रीयांची by परिकथेतील राजकुमार