स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात? - एक नीरीक्षण
पार्श्वभूमी - माधुरी आणि नुपूर या माझ्या सहकारी माझ्याहून १० ते ८ वर्षाने तरी लहान आहेत. परवाचीच गोष्ट आम्ही ६० मैल दूर कॉर्पोरेट ऑफीसला कामानिमित्त जाऊन आलो आणि दुसर्या दिवशी रात्री डिप्लॉयमेंट होती म्हणून दोघी माझ्या खोलीवर राहील्या.
रात्री डिनरच्या वेळी साहजीकच कॉर्पोरेट ऑफीस , तेथील नवीन सहकारी यांचा विषय निघाला. गाडी या रूळावर आली की कोणते सहकारी कसे वाटले? आणि काही रोचक पण सामाइक मुद्दे समोर आले.
जसं मला आणि माधुरीला योगेश आवडला,
नुपूरला सुमीत आवडला,
मला आणि नुपूरला हेमंत अजीबात आवडला नाही
तीघींनाही अली सो सो वाटला.
पहीली सुरुवात मी केली "माधुरी , ये हेमंतको कुछ मॅनर्स नही लगता है यार. कल एक तो लंच पर इतना काफी अंतर था बीचमें फीर भी चिल्ला चिल्ला के मुझे पूछ रहा था कहां से हूं, फिर पुणे मे एक्झॅक्टली कहांसे? फिर महाराष्ट्रीअन हूं क्या? वो समझनेके बाद बोलने लगा - कस काय हाय, बर हाय काय?" ...... "रिअली एम्बॅरॅसींग!"
माधुरीने इतकं नीरीक्षण केलं नव्हतं पण नुपूरने दुजोरा दिला. ती म्हणाली तो जरा तसाच आहे एकदा तिचा डिफेक्ट लाटला होता तेव्हा पासून तिने फोनवर त्याच्याशी डिफेक्ट ची चर्चा करणं बंद केलं.
आमच्या तीघींच एक मत पक्क होतं ते होतं अली बद्दल की हा स्वतःबद्दल अति बोलतो. मान्य त्याची बायको पहीलट्करीण आहे, फेब्रुवारीमधे त्यांना मुलगी होणार आहे पण पूर्ण लंच सगळ्यांना त्याच विषयावर वेठीला धरण्याचं कारण नव्हतं.
नुपूरला सुमीत खूप आवडला होता. सुमीत मॅनेजर होता. माधुरी गेल्या महीन्यात भारतातून अमेरीकेत आली आहे. असो.
मला आणि माधुरीला योगेश आवडला कारण तो फार बोलत नव्हता , जे बोलत होता ते सेन्सीबल बोलत होता. त्याच्यामध्ये मार्दव एक प्रकारचा जंटलनेस होता. तो खूप वेलमॅनर्ड आनि सौजन्यशील वाटला.
हे सर्व आत्ता आठवण्याचं कारण की पुढील लेख वाचनात आला- http://timesofindia.indiatimes.com/life-style/relationships/man-woman/5-types-of-women-men-cant-stand/articleshow/5640393.cms
. हा लेख आहे पुरुषांना कशा प्रकारच्या स्त्रिया आवडत नाहीत. गोषवाराच सांगायचा तर - (१) कटकट्या - २४ X ७ कशा ना कशा बद्दल कीरकीर करणार्या, नकारात्मक दृष्टीकोन असलेल्या. (२) वजनाची फार काळजी करणार्या म्हणजे खाणं पीणं एंजॉय न करता सतत स्वतःच्या वजनाचीच काळजी करणार्या (३) सतत सासरच्या माणसांबद्दल उफराटं बोलणार्या (४) कामामध्ये अति व्यग्र स्त्रिया (५) सतत दुसर्यांची दुखणी खुपणी बरी करण्याकरता धावणार्या
आणि आमची या लेखाच्या बरोब्बर उलटी चर्चा आठवली ती म्हणजे स्त्रियांना कशा प्रकारचे पुरुष आवडतात. खालील निष्कर्ष हे मैत्रिणींबरोबर केलेल्या चर्चेतून निष्पन्न झालेले आहेत. मी त्यांची जबाबदारी घेत नाही. मी फक्त मांडण्याचं काम करते आहे.
(१) "पॉवरफुल" - आदिमानवाच्या काळात कदाचित शारीरीक सबळता हा निकष असेल पण आता आधुनिक युगामधे तो निकष तितक्या प्रिमिटीव्ह पातळीवर न राहता तो निकष देखील विकसीत झाला आहे . "आर्थिक", "सामाजिक", "बौद्धिक" दृष्ट्या सक्षम पुरुष हे स्त्रियांना चटकन अपील होतात (भावतात). नात्यामधे स्त्रीला सुरक्षेची भावना महत्वाची वाटते. जी सुरक्षा अर्थिकदृष्ट्या स्थिर किंवा स्वतःच्या कार्यक्षेत्रामधे स्थिर झालेली व्यक्ती परिपूर्ण रीतीने देऊ शकते. त्याचप्रमाणे नात्यामधील "कमीटमेंट" ही स्थैर्य लाभलेले पुरुषच देऊ शकतात. शेवटचा मुद्दा अशा रीतीने स्थैर्य लाभलेल्या पुरुषाचा सहवास प्रिय वाटणं कारण स्त्रीला स्वतःला स्थिरता लाभल्याने जणू सुर्यप्रकाश मिळालेल्या कमळासारखी ती विकसीत होणं.
(२) "मार्दवपूर्ण" - काही पुरुष अतिशय मार्दवपूर्ण वागणारे , बोलणारे, सौजन्यशील, सिव्हिलाइज्ड असतात. दुर्मीळ पण क्वचित सापडतात खरे. स्त्रियांना हे "नॉन्-थ्रेटनिंग" वाटतात. त्यांच्याबरोबर मन मोकळं करता येईल असं काहीसं वाटतं. हे पुरुष आवडण्यामागे शास्त्रीय कारण हेदेखील असू शकतं की मार्दव असल्याने मूल वाढविण्यास हा योग्य जोडीदार आहे असा "सबकॉन्शस" निर्णय मेंदू घेत असावा. शिवाय मित्र या रूपातदेखील हे पुरुष अगदी फिट बसतात.
(३) "बॅड बॉय" - हे पुरुष रुढार्थाने पारंपारीक नसतात तर थोडे बंडखोर, धोकादायकच असू शकतात्.त्यांच्यामध्ये गुंतण्यात एक प्रकारचा धोका असतो. पण या धोक्यातच थ्रिल असतं. परत आपण अशा पुरषाला बदलू शकू हा अटळ आत्मविश्वास .आपलं प्रेम या आडमार्गाला गेलेल्या पुरषाला पारंपारीक सज्जनतेच्या मार्गावर घेऊन येइल आणि आपला अहंकार सुखावेल अशी काहीशी मनोभूमिका यामागे असू शकते.
(४) "रोमँटीक" - कधीही पहीला वाढदिवस, पहीली भेट, पहीलं अमकंटमकं न विसरणारे हे पुरुष. फुलं देतील, चॉकलेटचा भडीमार करतील, भेटवस्तू, कवितांची पखरण करतील. भरपूर लाड आणि खूप लक्ष पुरवतील आपल्या प्रियेकडे. काही स्त्रियांना असे पुरुष का आवडतात हे ओळखणं फार अवघड नसावं.
अजूनदेखील अनेक प्रकार असतील यात वाचकांनी जमेल तशी भर घालावी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+ १ अदिती आणि चित्राशी सहमत !
हेच म्हणते. आदिती आणि चित्रा
एकुणच धागा आणि त्यावरच्या
शुचि लेख आवडला , प्रश्न हा
शुचि, एक धमाकेदार लेखमाला
शुची यांचे लेखन आणि त्यावर
आणखी एक क्याटेगरी.
>>> असं मला एकुण ८
च्छ्या:!
धमाल, पुरुषांना कशा
मग काय..
मस्त धागा !
माझ्या मते 'नंदीबैल' ही कॅटॅगरी राहिली आहे...
हा ह हा!
LOL!
हा हा हा लै भारी !!
५००% सहमत! मला स्वतः ला जरी
माझ्या साधारण (आधी सुमारच
अग्गं माय !!! ( तोंडावर पदर
आत्ता कळलं
_/\_ धन्य!
आणि इथे अजून एक लोळेरी
बैल
आत्मचरित्र
माझ्या एका मित्राला
+१
+२
सामान्य...
अहो माणूसप्रेमी
इश्य!
अय्या इतकं काय लाजायचं ते !!
शी बै! काहीच कळत नाही हिला!!
काका ...
रापचिक रापचिक, कूल कूल!!
भेटा तुम्ही ....
>> मुलींना मुलगी म्हणून न
हॅ हॅ हॅ ...
आणखी काही
गुर्जी, तुमचे यशस्वी
अंमळ उशीर
नाही नाही, उशीरच असा काही
च्यायला
विरोधाचा क्षीण प्रयत्न!
तरुणाईच्या जाहीरातबाजीचा
बरं ते सगळं राहू दे.... लग्न
शादी का लड्डू
कसं आहे ना मित्रा, वाघोबा
हम्म्म्म वाचतोय...
"मी सिंगल आहे", "मी लहान
"मी सिंगल आहे", "मी लहान