Skip to main content

मोगरा फुलला

लेखक शुचि यांनी बुधवार, 13/10/2010 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानेश्वरांच्या अभंगांबद्दल असं बोललं जातं की एक तरी ओवी अनुभवावी अर्थात एका तरी ओवीचा गूढार्थ उकलून घेण्याचा प्रयत्न करावा. बर्‍याच वर्षापूर्वी "मोगरा फुलला" या अभंगातील एका ओवीचं सुंदर विवेचन माझ्या वाचनात आलं होतं. ते इथे मांडते. "इवलेसे रोप" म्हणजे गुरुभेट झालेली आहे आणि गुरुकृपेने शिष्याला गुरुमंत्राची दीक्षा मिळाली आहे. हा मंत्र फक्त "द्रां", "र्‍हीं" किंवा "गँ" असा बीजमंत्र असू शकेल किंवा "श्रीराम जय राम जय जय राम" किंवा "नम: शिवाय" असा मोठा मंत्र देखील असू शकेल. पण हे इवलसं रोपटं शिष्याला मिळालं आहे. या रोपट्याला नित्यनेमाने ठराविक वेळी, ठराविक मापाचं खतपाणी घालून शिष्याने जोपासलं आहे. अर्थात शिष्याने निश्चयाने, शुचितेने , भक्तीभावाने मंत्राची रोज अखंड उपासना केली आहे. आणि काय आश्चर्य "तयाचा वेलु गेला गगनावरी" ; एक वेळ अशी आली की या साधनेला फळ आलं. त्या इवल्याशा मंत्राने कुंडलिनी जागृत होऊन तिचा प्रवास गगन अर्थात सहस्रार चक्राच्या दिशेने सुरू झाला. आणि मग पुढे येतं - मोगरा फुलला मोगरा फुलला| फुले वेचिता अति भारू कळियासि आला||२|| मनाचिये गुंति गुंफियेला शेला| बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पियेला||३|| पूर्ण अभंग पुढीलप्रमाणे - इवलेसे रोप लावियेले द्वारी|तयाचा वेलु गेला गगनावरि||१|| मोगरा फुलला मोगरा फुलला| फुले वेचिता अति भारू कळियासि आला||२|| मनाचिये गुंति गुंफियेला शेला| बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पियेला||३||
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 29926
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

त्यापेक्षा इतिहासाचे संशोधन करा, सरकारी पैसा फुकट खाऊ नका आणि खोटा इतिहास खरा म्हणून मांडू नका. ;)

लेखिकेचा अध्यात्माचा सखोल व गुढ अभ्यास ह्याची साक्ष देतोय.अजुन ह्यावर चर्चा येईल असे वाटते.

इथे गौळणींचे कुणी जाणकार असतील तर "डोळे मोडीत राधा चाले, वारीयाने कुंडल हाले" ह्या गौळणीचे निरुपण करावे. ही गौळण मालिकेतील आहे ह्याची क्रूपया नोन्द घ्यावी.

"इवलेसे रोप" म्हणजे व्हिजा मिळालेला आहे आणि कंपनीकृपेने कन्स्लटंटला प्रोजेक्टची टर्म मिळाली आहे. हा व्हिजा फक्त "एल १ " किंवा "बी १" असा शॉर्ट् टर्म व्हिजा असू शकेल किंवा "एच १" असा लाँग टार्म व्हिजा देखील असू शकेल. पण हा इवलासा व्हिजा कन्स्लटंटला मिळाला आहे. आणि काय आश्चर्य "तयाचा वेलु गेला गगनावरी" ; एक वेळ अशी आली की या साधनेला फळ आलं. त्या इवल्याशा व्हिजाने ग्रीन कार्ड प्रॉसेस पार होऊन त्याचा प्रवास सिटीझनशिप अर्थात हिरव्या माजाच्या दिशेने सुरू झाला.

In reply to by मुक्तसुनीत

हे खूप आवडलं :) :) :) हसले असं काहीतरी वाचायला मजा येते.

In reply to by मुक्तसुनीत

व्हिजा म्हणजे 'इवलेसे' रोप ... चालू द्या!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे ग्रीन कार्ड वाले इतक्या महत्प्रयासाने मिळालेल्या बी१-एफ१ वगैरे विसावाल्यांना कसे कमी लेखतात पाहिले ना!!

In reply to by मुक्तसुनीत

शिवाय 'बापरखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला' मधला विठ्ठल कोण हेही थोडे खोदकाम केल्यास सापडावे ;) [सध्या तो पुढच्या महिन्यातल्या निवडणुकांच्या चिंतेने ग्रस्त आहे म्हणे.] बाकी 'वेलु' वर कोटी करण्याचा मोह महत्प्रयासाने आवरला आहे :)

In reply to by नंदन

शिवाय 'बापरखुमादेवीवरू विठ्ठली अर्पिला' मधला विठ्ठल कोण हेही थोडे खोदकाम केल्यास सापडावे "विठ्ठले आळविता भक्त न दे सादुं " अशी परिस्थिती ! ;-)

In reply to by नंदन

सध्या विठ्ठलावर मुंबई पोलिस नाराज आहेत म्हणे!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

ह्या बिकांची लेखन न वाचता प्रतिक्रीया द्यायची सवय कधी जाणार आहे विठ्ठलाला माहिती.

छान लिहले आहे... बाकी तुमचे मनोगत वाचताना ही ओळ विशेष आठवली... त्वंगुणत्रयातीतः । त्वंदेहत्रयातीतः ॥ त्वंकालत्रयातीतः । त्वंमूलाधारस्थितोसिनित्यं ॥ त्वंशक्तीत्रयात्मकः । त्वांयोगिनोध्यायंतिनित्यं ॥