✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मोगरा फुलला

श
शुचि यांनी
Wed, 10/13/2010 - 08:04  ·  लेख
लेख
ज्ञानेश्वरांच्या अभंगांबद्दल असं बोललं जातं की एक तरी ओवी अनुभवावी अर्थात एका तरी ओवीचा गूढार्थ उकलून घेण्याचा प्रयत्न करावा. बर्‍याच वर्षापूर्वी "मोगरा फुलला" या अभंगातील एका ओवीचं सुंदर विवेचन माझ्या वाचनात आलं होतं. ते इथे मांडते. "इवलेसे रोप" म्हणजे गुरुभेट झालेली आहे आणि गुरुकृपेने शिष्याला गुरुमंत्राची दीक्षा मिळाली आहे. हा मंत्र फक्त "द्रां", "र्‍हीं" किंवा "गँ" असा बीजमंत्र असू शकेल किंवा "श्रीराम जय राम जय जय राम" किंवा "नम: शिवाय" असा मोठा मंत्र देखील असू शकेल. पण हे इवलसं रोपटं शिष्याला मिळालं आहे. या रोपट्याला नित्यनेमाने ठराविक वेळी, ठराविक मापाचं खतपाणी घालून शिष्याने जोपासलं आहे. अर्थात शिष्याने निश्चयाने, शुचितेने , भक्तीभावाने मंत्राची रोज अखंड उपासना केली आहे. आणि काय आश्चर्य "तयाचा वेलु गेला गगनावरी" ; एक वेळ अशी आली की या साधनेला फळ आलं. त्या इवल्याशा मंत्राने कुंडलिनी जागृत होऊन तिचा प्रवास गगन अर्थात सहस्रार चक्राच्या दिशेने सुरू झाला. आणि मग पुढे येतं - मोगरा फुलला मोगरा फुलला| फुले वेचिता अति भारू कळियासि आला||२|| मनाचिये गुंति गुंफियेला शेला| बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पियेला||३|| पूर्ण अभंग पुढीलप्रमाणे - इवलेसे रोप लावियेले द्वारी|तयाचा वेलु गेला गगनावरि||१|| मोगरा फुलला मोगरा फुलला| फुले वेचिता अति भारू कळियासि आला||२|| मनाचिये गुंति गुंफियेला शेला| बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पियेला||३||
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
29779 वाचन

💬 प्रतिसाद (90)

प्रतिक्रिया

सुंदर

सुनील
Wed, 10/13/2010 - 08:20 नवीन
छान! हे आठवलं!
  • Log in or register to post comments

सुरेख छान वाटले वाचून. अजुन

पारुबाई
Wed, 10/13/2010 - 10:37 नवीन
सुरेख छान वाटले वाचून. अजुन येवु द्या.
  • Log in or register to post comments

हं

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 10/13/2010 - 10:41 नवीन
बसमधल्या महिला आरक्षणाचा किंवा फुले-कर्व्यांनी सुरू केलेला महिला सक्षमीकरणाचा वेलू कधी बहरू (अति भारू??) येणार कोण जाणे? अवांतरः ओवी म्हणजेच अभंग का? संदर्भः ज्ञानेश्वरांच्या अभंगांबद्दल असं बोललं जातं की एक तरी ओवी अनुभवावी अर्थात एका तरी ओवीचा गूढार्थ उकलून घेण्याचा प्रयत्न करावा.
  • Log in or register to post comments

नक्की माहीती नाही ओवी म्हणजे

शुचि
Wed, 10/13/2010 - 19:13 नवीन
नक्की माहीती नाही ओवी म्हणजे काय. इवलेसे रोप लावियेले द्वारी|तयाचा वेलु गेला गगनावरि||१|| मोगरा फुलला मोगरा फुलला| फुले वेचिता अति भारू कळियासि आला||२|| मनाचिये गुंति गुंफियेला शेला| बाप रखुमादेवीवरु विठ्ठले अर्पियेला||३|| या अभंगात ३ ओव्या असाव्यात हा माझा कयास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पुन्हा एक सुधारणा - इवलेसे

विसोबा खेचर
Wed, 10/13/2010 - 21:55 नवीन
पुन्हा एक सुधारणा - इवलेसे रोप लावियेले द्वारी|तयाचा वेलु गेला गगनावरि| असे नसून इवलेसे रोप लावियेले द्वारी|तयाचा वेलु गेला गगनावेरी असे आहे.. त्यातून शुचिजींना याकडे दुर्लक्षच करायचं असेल तर प्रश्न मिटला.. तात्या. -- शुद्धकल्याण गावा तर करीमखासाहेब, हिराबाई, आणि भीमण्णांनी, हमीर गावा तर गजाननबुवा, यशवंतबुवा, आणि मधुबुवांनी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

बरोबर गगनावेरी आहे. चुकी झाली

शुचि
Wed, 10/13/2010 - 21:59 नवीन
बरोबर गगनावेरी आहे. चुकी झाली परत एकदा. माफ करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

गगनावेरीचा अर्थ काय?

नगरीनिरंजन
Wed, 10/13/2010 - 21:59 नवीन
गगनावेरीचा अर्थ काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

जुन्या मराठीत गगनावरी असा

शुचि
Wed, 10/13/2010 - 22:00 नवीन
जुन्या मराठीत गगनावरी असा अर्थ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

"वेरी' चा अर्थ....

इन्द्र्राज पवार
Wed, 10/13/2010 - 22:10 नवीन
"गगनावेरी..." हेच बरोबर आहे. "वेरी" = एक विशिष्ट बिंदू, ज्याचे मोजमाप करता येत नाही. 'गगनावेरी' म्हणजे नजरेला 'गगन' तर दिसतेच पण ज्ञानेश्वरांना जो 'वेलू' अपेक्षित आहे तो गगनाच्या पोकळी पलिकडे गेला आहे....अंतरासाठी जो कुठल्याही मापाने मोजता येणार नाही. वेळेच्या बाबतीतदेखील 'वेरी' वापरला जातो... उदा. "लताचे गाणे कालवेरी आहे" ~ म्हणजेच लताच्या गाण्याला समयाची सीमा नाही...ते अथकच चालणार आहे. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

धन्यवाद इन्द्रा आणि शुचि. आज

नगरीनिरंजन
गुरुवार, 10/14/2010 - 07:22 नवीन
धन्यवाद इन्द्रा आणि शुचि. आज एक नवीन शब्द कळाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

ओवी आणि अभंग

इन्द्र्राज पवार
Wed, 10/13/2010 - 21:58 नवीन
ओवी = म्हणजे प्राकृत भाषेतील कोणत्यातरी कारणासाठी गुंफलेली काव्यमय रचना. उदा. लहान मुलाला झोपविण्यासाठी आई गुणगुणत असलेले गीत ही ओवी असते, किंवा पूर्वीच्या काळी पहाटे उठून जात्यावर दळण दळताना एखादी (त्या काळातील) अदिती ताल धरण्यासाठी म्हणत असलेली रचना, जी ईश्वर भक्तीशीच निगडीत असली पाहिजे असा काही दंडक नसे....म्हणजे अदितीला सासुरवाडीत आपला अजून बिनलग्नाचा राहिलेला भाऊराया आठवत असेल, आईची कामाने होत असलेली धावपळ आठवत असेल, कुणी मैत्रीण आठवत असेल....या सर्व आठवणींची गर्दी तिच्या डोक्यात भिरभिरत असेल आणि ती शमविण्यासाठी एखाद्या संताची/कवीची तशी हुरहूरीची 'ओवी' गात असेल. देवाची आळवणीही प्रसंगी ओवीत येत असतेच....म्हणजे 'माझा संसार सुखाचा कर.... मुलाला आशीर्वाद दे....कल्याण कर..." इ. अभंग = विशिष्ट नियमावलीत बध्द असलेली 'देवाची स्तुती' म्हणजे अभंग. या रचनेत केवळ देवाचे/देवीचे माहात्म्य गौरविलेले असते आणि रचिता हा फक्त भक्ताच्या भूमिकेतच असतो. अभंग हा 'देव' कल्पनेशिवाय अन्य गुंफला जात नाही. यात देवावर टीका नसते, मात्र आवाहन जरूर केले जाते. इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

फारच छान माहीती. धन्यवाद

शुचि
Wed, 10/13/2010 - 22:03 नवीन
फारच छान माहीती. धन्यवाद इंद्र.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

'फुले वेचिता बहरू कळियासि आला'

मस्त कलंदर
Wed, 10/13/2010 - 10:40 नवीन
'फुले वेचिता बहरू कळियासि आला' असे आहे ते. माझा अत्यंत आवडता अभंग आहे हा. माझ्यामते तो प्रत्येकाने आपल्याला हवा तसा अनुभवावा. असो, ही संधी साधून मी इथे बहरलेला कळ्या देतेय. Image removed.
  • Log in or register to post comments

धागा हायजॅक करण्याचा अजुन एक

परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 11:37 नवीन
धागा हायजॅक करण्याचा अजुन एक निंदनिय प्रयत्न ! सरोज खरे ह्यांचा निषेध !! प्रस्थापितांच्या ह्याच अन्यायकारक वागणुकीचा बदला घेण्यासाठी आणि विस्थापीत नवोदित आणि दीन मिपालेखकांना न्याय मिळवुन देण्यासाठी आम्ही लवकरच 'दुर्लक्षित पँथर' ह्या संघटनेची स्थापना करणार आहोत. तेंव्हा आत्ताच सुधरा. परिकथेतील टेक्सासकुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

फ्टा!!! (याचा अर्थ काय ते

मस्त कलंदर
Wed, 10/13/2010 - 12:39 नवीन
फ्टा!!! (याचा अर्थ काय ते आमच्या अदितीतैंना विचारा) असो बदलणार नाही. बाकी ते तुझ्या सातत्याने सकस आणि प्रोग्रेसिव्ह, पॉझिटीव्ह लेखनाला उत्तेजन देणार्‍या 'सकसलिखाणप्रेमी अतिपोषित समुदायाचे' काय झाले रे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

फ्टा!!! (याचा अर्थ काय ते

परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 13:08 नवीन
फ्टा!!! (याचा अर्थ काय ते आमच्या अदितीतैंना विचारा)
ते आम्हाला लक्षात आले.
असो बदलणार नाही.
खात्री होतीच !
बाकी ते तुझ्या सातत्याने सकस आणि प्रोग्रेसिव्ह, पॉझिटीव्ह लेखनाला उत्तेजन देणार्‍या 'सकसलिखाणप्रेमी अतिपोषित समुदायाचे' काय झाले रे???
सध्या आम्ही प्रतिसाद उत्तेजन मंडळ स्थापन केले आहेच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

लेख छानच आहे. फुललेला मोगरा

अरुण मनोहर
Wed, 10/13/2010 - 11:38 नवीन
लेख छानच आहे. फुललेला मोगरा पाहून मन प्रसन्न झाले. संगणक क्षेत्रात आजूनही पुरेशी प्रगती झाली नाही ह्याचे वाईट वाटले. मल्टीमिडीयाच्या युगात कोणीतरी अजून ही जादू घडवून का आणित नाही? फुलांवर टिचकी मारली की सुवासाची कुपी उधळल्या गेली पाहिजे. गणपांच्या स्वादिष्ट डिशेस् वर क्लीक केले की मस्त खाद्यगंध दरवरळा पाहिजे....... ही यादी आणखीनही बरीच लांबविता येईल. पण थांबलेलेच बरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

खुप सुन्दर! एक चित्र

स्वैर परी
Wed, 10/13/2010 - 12:28 नवीन
खुप सुन्दर! एक चित्र माझ्याकडुन ही! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

आता काय बोलणार.........

वेताळ
Wed, 10/13/2010 - 10:41 नवीन
वाचुन अगदी नि:शब्द झालो.........
  • Log in or register to post comments

छान लिहिलेलं आहे शुचि. आवडलं.

यशोधरा
Wed, 10/13/2010 - 11:42 नवीन
छान लिहिलेलं आहे शुचि. आवडलं.
  • Log in or register to post comments

आहाहा! वा वा वा !

अनिल २७
Wed, 10/13/2010 - 11:44 नवीन
आहाहा! वा वा वा ! मग पुढे जे येतं त्याचाही अर्थ सांगायचा ना.. "फुले वेचिता अति भारू कळियासि आला" म्हणजे काय ?
  • Log in or register to post comments

"फुले वेचिता अति भारू कळियासि

परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 11:47 नवीन
"फुले वेचिता अति भारू कळियासि आला" म्हणजे काय ? { हे ही दिवस जातील.. }
प्रश्नातच उत्तर दडले आहे बघा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७

?

अनिल २७
Wed, 10/13/2010 - 11:58 नवीन
?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

मोगरा फुलला मोगरा फुलला फुले

llपुण्याचे पेशवेll
Wed, 10/13/2010 - 15:40 नवीन
मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरु कळियासी आला असे माझ्या माहीतीप्रमाणे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिल २७

अर्थात शिष्याने निश्चयाने,

Nile
Wed, 10/13/2010 - 11:55 नवीन
अर्थात शिष्याने निश्चयाने, शुचितेने , भक्तीभावाने मंत्राची रोज अखंड उपासना केली आहे. आणि काय आश्चर्य "तयाचा वेलु गेला गगनावरी"
अजुन एक अंधश्रद्धेची सावली आहे असे वाटणारा चार ओळींचा लेख(?). नक्की काय म्हणायचं आहे? काय गुढार्थ लागला? कुठली कुंडलिनि? कुठले सहस्त्राकार चक्र? उगाच आपली अंधश्रद्धेवर फार श्रद्धा आहे म्हणुन काहीतरी असंबंद्ध लिहायचं का?(आणि त्यावर विपरीत प्रतिसाद आल्यावर मी सुधारेन वगैरे नेहमीची उत्तरे द्यायची का?) वगैरे प्रश्न लेखिकेने स्वत:ला विचारुन पहावेत असे वाटते.
  • Log in or register to post comments

+१

अनिल २७
Wed, 10/13/2010 - 12:00 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

तिरसटपणे लिहायलाच हवं का.

मेघवेडा
Wed, 10/13/2010 - 14:01 नवीन
तिरसटपणे लिहायलाच हवं का. नाही आवडलं लिखाण तर नीट सांगता येतं. तुमचा नसेल योगाभ्यासावर व अध्यात्मावर विश्वास म्हणून एखाद्याच्या श्रद्धेची अंधश्रद्धा म्हणून हेटाळणी करणे योग्य नाही. आधीच सांगतो माझाही योग-अध्यात्माचा विशेष अभ्यास नाही. मात्र तुझा प्रतिसाद अस्थानी वाटल्याने सांगतो आहे इतकेच. काय गूढार्थ लागला ते लेखिकेने स्पष्ट लिहिले आहे. ते जर तुम्हाला कळले नसेल तर तसे विचारा की. मान्य आहे, लेख लहान आहे, काही गोष्टी अजून स्पष्ट केल्या पाहिजेत. पण जेवढं लिहिलं आहे ते असंबद्ध आहे हे तू कसं ठरवलंस? का आपल्याला काही कळले नाही (हे तूच लिहिलं आहेस, मी म्हणत नाहीये) म्हणून उगीच कुणालातरी टार्गेट करून शिंतोडे उडवायचे फक्त? तुला वाटत असेल की यावर अंधश्रद्धेची सावली आहे तर तुला असं का वाटलं ते स्पष्टपणे लिही की. असो. प्रकटन आवडले. 'कुंडलिनि जागृत करणे' व 'सहस्त्रार चक्र' याबाबत माझ्यासारख्या नि नाईलसारख्या बर्‍याच जणांना माहिती नसेल. ते जरा आणखी स्पष्ट केलंत तर मस्त होईल शुचितै. आणि जरा मोठे लेख लिहा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

परफेक्ट.

यशोधरा
Wed, 10/13/2010 - 14:03 नवीन
परफेक्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

+१

अवलिया
Wed, 10/13/2010 - 14:05 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

+१

मितान
Wed, 10/13/2010 - 17:58 नवीन
मेवे, यशो, अवलियाशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

तिरसटपणे लिहायलाच हवं का.

Nile
Wed, 10/13/2010 - 14:22 नवीन
तिरसटपणे लिहायलाच हवं का. नाही आवडलं लिखाण तर नीट सांगता येतं
तिरसटपणे लिहलेलं नाही तर स्पष्टपणेच लिहलेलं आहे.
तुमचा नसेल योगाभ्यासावर व अध्यात्मावर विश्वास म्हणून एखाद्याच्या श्रद्धेची अंधश्रद्धा म्हणून हेटाळणी करणे योग्य नाही
सदर लेखिकेने पुर्वी "माझी असेल अंधश्रद्धा कदाचित" अश्या प्रकारचे प्रतिपादन केले आहे. त्यावरुन सदर लेखिकेची ही श्रद्धाच आहे अशी खात्री नसावी असा कयास मी करु शकतो. काहीही असले तरी, स्वत:च्या श्रद्धा-अंधश्रद्धेची खात्री करुन लेख लिहलात तर उत्तम अशी सुचवणी करण्यास हरकत नसावी. सदर लेखिकेने अश्या प्रकारचे लेखन अनेक विपरीत प्रतिसाद येउनही केले आहे हा मुद्दा ही विसरु नये.
पण जेवढं लिहिलं आहे ते असंबद्ध आहे हे तू कसं ठरवलंस?
मी एक वाचक आहे, मला संबंध दिसला नाही, हे मी 'स्पष्टपणे लिहलं आहे'. तुला संबंध दिसला असेल तर ठीक. मला जे वाटलं ते मी लिहु नये का? लेखिकेला माझे मत किती महत्त्वाचे आहे ते ठरवु देत. (मलाच संबंध दिसला नाही पण पन्नास लोकांना दिसला तर लेखिकेने माझे म्हणणे विचारात घेउ नये)
तुला वाटत असेल की यावर अंधश्रद्धेची सावली आहे तर तुला असं का वाटलं ते स्पष्टपणे लिही की. असो. प्रकटन आवडले. 'कुंडलिनि जागृत करणे' व 'सहस्त्रार चक्र' याबाबत माझ्यासारख्या नि नाईलसारख्या बर्‍याच जणांना माहिती नसेल.
मला का वाटलं हे मी वरती स्पष्टपणे नमुद केलं आहे. वरती असे प्रश्न लेखिकेने स्वतःला विचारावेत असे अनाहुत सुचवलेलेही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

नायल्या, कांगावा किती करशील?

यशोधरा
Wed, 10/13/2010 - 14:39 नवीन
नायल्या, कांगावा किती करशील? पुढे मुद्द्याचं बोल म्हटलं की तू पळ काढतोस की! :) >>मी एक वाचक आहे, मला संबंध दिसला नाही >> अगदी असं लिहिलं तरी चालेल, योग्यच आहे, पण तितकं सरळपणे काही तू लिहिलेलं नाहीस. "उगाच आपली अंधश्रद्धेवर फार श्रद्धा आहे म्हणुन काहीतरी असंबंद्ध लिहायचं का?" ह्याला कदाचित मेव्या तिरसट म्हणत असावा. तू का ठरवतोस लेखिकेची अंधश्रद्धेवर श्रद्धा आहे (म्हंजे काय रे?) लिखाण असंबंद्ध आहे वगैरे? बरं असंबंद्ध आहे म्हणतोस तर योग्य काय असायला हवे हे सांगू शकशील का? आणि शुचि, "अतिभारु" हाच शब्द मूळ आहे, आणि योग्यही आहे. संदर्भ सापडला की देतेच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

खरंतर हे लिहायचं नव्हतं पण

Nile
Wed, 10/13/2010 - 14:52 नवीन
खरंतर हे लिहायचं नव्हतं पण आता नाईलाज आहे. शुचि यांना मी मागे एकदा, "कृपया आपण अंधश्रद्धा पसरवण्यास मदत करत तर नाही ना, ह्याचा विचार करावा" असा प्रतिसाद दिला होता(आणि त्यांनी तो त्यावेळी "पुढल्यावेळी काळजी घेईन" अश्या प्रकारे स्विकारला होता. मागे जाउन पहा, त्यांनी तो धागा उडवला नसेल तर सापडेल. शुचि यांनी पुर्वीही विपरीत प्रतिसाद आल्याने स्वतःचे धागे उडवले होते. स्वतः लेखिका, माझी कदाचित अंधश्रद्धा असु शकेल असे विधान करते तेव्हा लेखिकेच्या हेतु बद्दल आम्ही काय निष्कर्ष काढायचा? अनुभवावरुन, मी जे लिहलं आहे ते सरळ आणि स्पष्ट आहे. साखरेच्या वेष्टनात गुंडाळुन एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा देण्यात मला रस नाही. एखाद्या देवभोळ्याला "मी नास्तिक आहे" हे विधानही तिरसट्/अपमानास्पद वाटेल. लिखाणात मला संबंध दिसला नाही हे मि सांगितलं आहे, त्याचा संबंध शोधुन काढणे ही माझी जबाबदारी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

आले लक्षात नायल्या. जे

यशोधरा
Wed, 10/13/2010 - 15:06 नवीन
आले लक्षात नायल्या. जे लिहायचे मनात नव्हते, तेच मूळ असल्याने, लिहिलेस हे उत्तम झाले. तुझी भूमिका समजली. तरीही केवळ शुचि चार ओळी लिहिते म्हणून, तुला जी अंधश्रद्धा वाटते ती झंझावाताप्रमाणे पसरेल असे काही मला वाटत नाही. कदाचित इथे सगळेच एकदम हात धुवून मागे लागतात, म्हणून कटकट नको ह्या भावनेनेही शुचिने गप्प बसणे आणि धगे उडवणे हे केले असावे, मी धागे पाहिले नव्हते, त्यामुळे कल्पना नाही. >>स्वतः लेखिका, माझी कदाचित अंधश्रद्धा असु शकेल असे विधान करत>>>>हो कदाचित ते तुला गप्प बसवायला केले असेल, की हो बाबा, असेल माझी अंधश्रद्धा. पुढे? असे असेल ते. :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

अंधश्रद्धा वाटते ती

Nile
Wed, 10/13/2010 - 15:12 नवीन
अंधश्रद्धा वाटते ती झंझावाताप्रमाणे पसरेल असे काही मला वाटत नाही
कशी पसरेल कीती पसरेल याला महत्त्व नाही. तुम्ही जर मुद्दा मांडत असाल तर तो पुर्ण मांडा, त्यावर होणार्‍या टिकेला तयार रहा.
हो कदाचित ते तुला गप्प बसवायला केले असेल, की हो बाबा, असेल माझी अंधश्रद्धा.
हे मला नाही, जाहिर धाग्यावर कुठल्यातरी प्रतिसादात लिहले होते.
म्हणून कटकट नको ह्या भावनेनेही शुचिने गप्प बसणे आणि धगे उडवणे हे केले असावे, मी धागे पाहिले नव्हते, त्यामुळे कल्पना नाही.
म्हणुन प्रतिसादात मी लिहले होते की, मुद्दा विस्तृत, खात्री करुन मांडा. जर तुमच्यामुद्द्यांबद्दल खात्री नसेल तर धागा लिहुन मग नंतर चुका निघाल्यावर उडवावे लागण्याची वेळ येणार नाही. (चुकलात तरी तुमचे मत विचार करुन मांडल्यात तर धागा उडवावासा वाटणार नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

कदाचित इथे सगळेच एकदम हात

मेघवेडा
Wed, 10/13/2010 - 15:12 नवीन
कदाचित इथे सगळेच एकदम हात धुवून मागे लागतात, म्हणून कटकट नको ह्या भावनेनेही शुचिने गप्प बसणे आणि धगे उडवणे हे केले असावे, मी धागे पाहिले नव्हते, त्यामुळे कल्पना नाही. असेच म्हणतो. आणि निळ्या, संबंध शोधून काढणे ही तुझी जबाबदारी नाही याची ज्याप्रमाणे तुला जाणीव आहे त्याचप्रमाणे एखादी गोष्ट न कळाल्यास किंवा माहिती नसल्यास "ती असंबंद्ध आहे" असे उगाच आपली करमणूक म्हणून शिंतोडे उडवणे देखील योग्य नाही हे जाणण्याइतपत जबाबदारीची जाणीव तुझ्यात असावी असं वाटतं. >> हो कदाचित ते तुला गप्प बसवायला केले असेल, की हो बाबा, असेल माझी अंधश्रद्धा. पुढे? असे असेल ते. पुन्हा फुल्टू सहमत! जयंत कुलकर्णींची सही आठवली. "त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी गप्प बसतो." :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

असे उगाच आपली करमणूक म्हणून

Nile
Wed, 10/13/2010 - 15:20 नवीन
असे उगाच आपली करमणूक म्हणून शिंतोडे उडवणे देखील योग्य नाही हे जाणण्याइतपत जबाबदारीची जाणीव तुझ्यात असावी असं वाटतं.
हा जावईशोध आपणास कुठुन लागला? जे मला असंबंध वाटते ते तसे आहे असे म्हणणे म्हणजे शिंतोडे उडवणे का? इथे फक्त, वा सुदंर अप्रतिम अश्याच प्रतिक्रीयांची तुम्ही अपेक्षा ठेवता का?
पुन्हा फुल्टू सहमत! जयंत कुलकर्णींची सही आठवली. "त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा त्यांची अडचण होऊ नये म्हणून मी गप्प बसतो."
असे म्हणण्याआधी थोडा अभ्यास केला असतात तर बरे झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

>> हा जावईशोध आपणास कुठुन

मेघवेडा
Wed, 10/13/2010 - 15:35 नवीन
>> हा जावईशोध आपणास कुठुन लागला? आणि मला "अभ्यास करा" असे सल्ले देतोस? वा! >> जे मला असंबंध वाटते ते तसे आहे असे म्हणणे म्हणजे शिंतोडे उडवणे का? परत विचारतो, कसं ठरवलंस? असंबद्ध वाटले म्हणजे त्या दोन गोष्टींची तुला पूर्ण माहिती आहे, बरोबर? अन्यथा तू त्या दोन गोष्टींमध्ये संबंध आहे की नाही ठरवू शकतच नाहीस. मग "कोणती कुंडलिनि, कोणते सहस्त्राकार चक्र?" हे प्रश्न उगाचच विचारलेले नाहीत काय? >> असे म्हणण्याआधी थोडा अभ्यास केला असतात तर बरे झाले असते. एक शॉट खेळून चार डिफेन्सिव्ह असं टेस्ट मॅच मोडमध्ये खेळू नकोस रे. तितका वेळ नाही. टी२०चा जमाना आहे. सगळं फास्ट हवं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

परत विचारतो, कसं ठरवलंस? मला

Nile
Wed, 10/13/2010 - 15:43 नवीन
परत विचारतो, कसं ठरवलंस?
मला दोन्ही गोष्टींची शुन्य माहीती आहे असं समजुया. लेखात मल संबंध दिला आहे का? लेखिका इथे अशी अपेक्षा करते का संबंध सर्वांना माहित असावा? मला माझ्या सामान्य ज्ञानाप्रमाणे संबंध नाही असे वाटते.
एक शॉट खेळून चार डिफेन्सिव्ह असं टेस्ट मॅच मोडमध्ये खेळू नकोस रे.
संदर्भ महत्त्वाचे असतात. पहात चला.
आणि मला "अभ्यास करा" असे सल्ले देतोस? वा!
ह्याला आम्ही तुमची पुर्वग्रहदुषित दृष्टी असे म्हणतो. का ते अभ्यास केल्यास कळेलच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

>> मला दोन्ही गोष्टींची शुन्य

मेघवेडा
Wed, 10/13/2010 - 16:00 नवीन
>> मला दोन्ही गोष्टींची शुन्य माहीती आहे असं समजुया. लेखात मल संबंध दिला आहे का? लेखिका इथे अशी अपेक्षा करते का संबंध सर्वांना माहित असावा? मला माझ्या सामान्य ज्ञानाप्रमाणे संबंध नाही असे वाटते. नाही दिसला ना तुला. मग ते तसं सांग की. नाही कोण म्हणतो. पण संबंध दिलेला नाही म्हणजे लिखाण असंबद्ध कसे ठरते? माझा आक्षेप केवळ या एकाच वाक्याला होता नि तो अजूनही आहे. आपल्याला एखादी गोष्ट कळली नसल्यास किंवा माहिती नसल्यास उगाच ताशेरे ओढण्यात येऊ नयेत. >> ह्याला आम्ही तुमची पुर्वग्रहदुषित दृष्टी असे म्हणतो. तुला कदाचित परत एकदा समोरच्याला काय म्हणायचंय ते कळलेलं दिसत नाही. "मला (किंवा 'लोकांना' म्हणूयात का, ते जास्त समर्पक ठरेल! ;) ) अभ्यास करण्याचे सल्ले देतोस पण तुझाच अभ्यास कमी पडत आहे" असं म्हणायचं होतं मला. आपला नाय बाबा पूर्वग्रह! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

पण संबंध दिलेला नाही म्हणजे

Nile
Wed, 10/13/2010 - 21:00 नवीन
पण संबंध दिलेला नाही म्हणजे लिखाण असंबद्ध कसे ठरते?
मी वरती लिहले. लेखात मल संबंध दिला आहे का? ... मला माझ्या सामान्य ज्ञानाप्रमाणे संबंध नाही असे वाटते. चार ओळींचा लेख वाचल्यानंतर मला जे वाटलं ते लिहलेलं आहे, असेल नसेल टाईप प्रतिक्रिया हव्या असतील तर मुक्तपीठ ओपन आहे. माझा मुद्दा मी मांडलेला आहे, पुन्हा पुन्हा तेच लिहण्यात इथुन पुढे स्वारस्य नाही. तुमचे चालु द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

अरे आवरा!!!!!

धमाल मुलगा
Wed, 10/13/2010 - 21:08 नवीन
उपक्रम पलिकडं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

+१

Nile
Wed, 10/13/2010 - 21:11 नवीन
चला जाउ 'बागा' मधी, का.कु. खेळु चला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अंधश्रद्धा वाटते ती

Nile
Wed, 10/13/2010 - 15:13 नवीन
अंधश्रद्धा वाटते ती झंझावाताप्रमाणे पसरेल असे काही मला वाटत नाही
कशी पसरेल कीती पसरेल याला महत्त्व नाही. तुम्ही जर मुद्दा मांडत असाल तर तो पुर्ण मांडा, त्यावर होणार्‍या टिकेला तयार रहा.
हो कदाचित ते तुला गप्प बसवायला केले असेल, की हो बाबा, असेल माझी अंधश्रद्धा.
हे मला नाही, जाहिर धाग्यावर कुठल्यातरी प्रतिसादात लिहले होते.
म्हणून कटकट नको ह्या भावनेनेही शुचिने गप्प बसणे आणि धगे उडवणे हे केले असावे, मी धागे पाहिले नव्हते, त्यामुळे कल्पना नाही.
म्हणुन प्रतिसादात मी लिहले होते की, मुद्दा विस्तृत, खात्री करुन मांडा. जर तुमच्यामुद्द्यांबद्दल खात्री नसेल तर धागा लिहुन मग नंतर चुका निघाल्यावर उडवावे लागण्याची वेळ येणार नाही. (चुकलात तरी तुमचे मत विचार करुन मांडल्यात तर धागा उडवावासा वाटणार नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अंधश्रद्धा वाटते ती

Nile
Wed, 10/13/2010 - 15:15 नवीन
अंधश्रद्धा वाटते ती झंझावाताप्रमाणे पसरेल असे काही मला वाटत नाही
कशी पसरेल कीती पसरेल याला महत्त्व नाही. तुम्ही जर मुद्दा मांडत असाल तर तो पुर्ण मांडा, त्यावर होणार्‍या टिकेला तयार रहा.
हो कदाचित ते तुला गप्प बसवायला केले असेल, की हो बाबा, असेल माझी अंधश्रद्धा.
हे मला नाही, जाहिर धाग्यावर कुठल्यातरी प्रतिसादात लिहले होते.
म्हणून कटकट नको ह्या भावनेनेही शुचिने गप्प बसणे आणि धगे उडवणे हे केले असावे, मी धागे पाहिले नव्हते, त्यामुळे कल्पना नाही.
म्हणुन प्रतिसादात मी लिहले होते की, मुद्दा विस्तृत, खात्री करुन मांडा. जर तुमच्यामुद्द्यांबद्दल खात्री नसेल तर धागा लिहुन मग नंतर चुका निघाल्यावर उडवावे लागण्याची वेळ येणार नाही. (चुकलात तरी तुमचे मत विचार करुन मांडल्यात तर धागा उडवावासा वाटणार नाही.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

अरे नायल्या, टीका करताना टीका

यशोधरा
Wed, 10/13/2010 - 15:24 नवीन
अरे नायल्या, टीका करताना टीका करणार्‍यानेही मुद्दा मांडावा लागतो. तो मांड ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

काय मुद्दा मांडणार कपाळ. जे

Nile
Wed, 10/13/2010 - 15:27 नवीन
काय मुद्दा मांडणार कपाळ. जे लिहले आहे त्याचा काही अर्थ लागत नाही ह्यापेक्षा अजुन काय मुद्दा हवा? त्याशिवाय वरती कुंडलिनी फिंडलीनी वर प्रश्न विचारले आहेत ते वाचले नाहीत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

हे निळ्या सारखे प्रस्थापीत

परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 15:34 नवीन
हे निळ्या सारखे प्रस्थापीत लोक कायम अशीच दादागिरी करतात. लवकरच ह्यांना 'दुर्लक्षित पँथर'चा हिसका दाखवण्यात येईल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

बोलले काडीकुमार! की हे

यशोधरा
Wed, 10/13/2010 - 15:57 नवीन
बोलले काडीकुमार! :D की हे खुषखबरीचे प्रात्यक्षिक रे पर्‍या? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा तळागाळातल्यांचा आवाज आहे

परिकथेतील राजकुमार
Wed, 10/13/2010 - 16:02 नवीन
हा तळागाळातल्यांचा आवाज आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा
  • 1
  • 2
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा