वजनदार ! - ३
लेखनप्रकार
वजनदार -१
वजनदार -२
जीम मधला व्यायाम , दर दोन तासांचे छोटे छोटे मीलस् वगैरे उपायांचा उलटाच परिणाम झाला महिन्यात एक किलो वजन वाढले ..... आता पुढे..
" हट बे. व्यायामानी कोणाच वजन वाढत नाही. तू जीम मधे व्यायाम सोडून भलत्या गोष्टीत लक्ष घालत असणार." विकासनी अविश्वासाचा ठराव आणला. तो लगेच आवाजी मतदानाने संम्मत झाला.
" आणि, तुला ते पुस्तक वाचून स्वतः वर प्रयोग करायची काय गरज पडली ? "
" पुस्तक तुझ्याच मैत्रीणीने आणले, मी नाही" मी 'गिरा तो भी पीठ उप्पर' वाला आहे.
" मी सांगितलेले केले का? भात बंद, साखर कमी वगैरे वगैरे " इती विकास." माझ्या कडे बघ "
"तुला तसाच भात बित आवडत नाही. आणी तू माझ्या पेक्षा ५ वर्षानी लहान आहेस. तुझ्या वयात माझेही वजन काही इतके वाढलेले नव्हते." मी पण आता पेटलो होतो. " आणि काय रे तू काय आहार तज्ञ आहेस का? भात माझा वीक पॉईंट आहे. तो सोडणे मला जमणार नाही."
"विकास, बाहेर तुझे बरेच पेशंट खोळंबले आहेत. मी बघते आता काय ते." तिने प्रसंगाचे गांभीर्य ओळखून मला बाहेर काढले.
"आपण एखाद्या आहार तज्ञा कडेच का जावू नये?" रिक्षात बसता बसता तिने प्रस्ताव मांडला. " तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे. पण जीम मात्र बंद करायला नको" म्हणजे काय की पुन्हा येरे माझ्या मागल्या.
" अग पण तुला माहित आहे. मी सकाळी उठायचा गजर लावला तर रात्रभरात तीन - चार वेळा उठून घड्याळ पाहातो. कदाचित झोप नीट न झाल्याने पण वजन वाढत असेल तर ! "
" व्हेरी स्मार्ट , बेटर लक नेक्स्ट टाइम "
दुसर्या दिवशी सकाळी पेपर वाचता वाचता माझे लक्ष एका स्लिमींग सेंटरच्या जाहिरातीतल्या तरूणीने वेधून घेतले . ती चित्ताकर्षक तरूणी अत्यंत सोप्या पध्दतीने वजन कमी होण्याची खात्री देत होती. त्यातच त्यांच्या नव्या शाखेत नोंदणी केल्यास २०% भरगोस सूट ही होती. मी लगेच फोन फिरवला. जाहिरातीतल्या तरूणीचाच असावा अशा अत्यंत लाघवी आवाजात माझी सर्व विचारपूस करुन मला संध्याकाळची वेळ खास माझ्याच करता राखून ठेवल्याचे सांगितले.
" काय रे आज तुझी दांडी यात्रा काय ?" मी आनंदात असलेलो तिला बघवतच नाही. " त्या जाहिरातीतल्या पोरी पाहून तू जाणार असलास तर ब्युटीशीयन = शहनाझ हुसेन हे समीकरण त्रिकालाबाधीत आहे हे लक्षात ठेव"
" अग शुभ शुभ बोल ग बये. मी ऑफीसातून परस्परच जावून येईन "
" आता ते ओघाने आलेच"
त्या लाघवी आवाजाने दुपारी स्मरण ध्वनी केल्याने , ऑफीसातून तासभर लवकर निघून मी ठरल्या वेळेच्या १० - १५ मि. आधीच पोहोचलो. चकाचक दरवाजा वरच्या गुरख्याने कडक सलाम करत दार उघडून धरले. सवयीने मी मागे वळून पाहत सलाम माझ्या करताच असल्याची खात्री करुनच आत शिरलो. गारेगार वातावरण्, सुंदर रंगसंगती असलेली अंर्तगत सजावट, मंद संगीत. एकूण फाईव्ह स्टार मामला दिसत होता. माझा एक प्रॉब्लेमच आहे. कळकट वातावरणात मी खूप अॅट ईझ असतो. पॉशपणा दिसला की मला घाम फुटायला लागतो. अत्यंत अवघडलेल्या स्थितीत मी सोफ्यावर भित भितच टेकलो. भसकन सहा - आठ ईंच आत घुसलो. आता हा आपल्या वाढल्या वजनाचाच परिणाम असावा असे वाटून मी सोफा नीट राहू दे अशी प्रार्थना करु लागलो. आता वहुदा गेट वरचा गुरखा " खाया पीया कुछ नही गीलास तोडा ५ रुपीया " छाप आरोळी ठोकतो की काय याची वाट पाहू लागलो.
तेव्हढ्यात टॉक टॉक आवाज करत स्वागतीका बाई आल्या. " मी. मोहन, अवर डॉक्टर्स आर बीझी अॅट द मूमेंट यू विल हॅव टू वेट. प्लीज बी कंफरटेबल" " तो पर्यंत हा फॉर्म भरून ठेवा"
आता ह्या फॉर्म मधला काही भाग इन्कम टॅक्स वाल्यांनी डिझाईन केला होता काय कोण जाणे. मी रिटर्न फाइल करतांना सुध्दा मिळ्कतीचे एवढे तपशील देत नाही.
एवढ्यात माझा नंबर आला. आहार तज्ञ बाई सुहास्य वदन होत्या. त्यांच्या मदतनिसानी माझी जुजबी वजन माप मोजणी करून बाईंच्या पुढे कागद ठेवले. " आम्ही तुम्हाला स्पेसिफीक डायट प्लान देवू नैसर्गीक वनस्पतींचे एक्सट्रॅक्ट्स देवू आणि भरभर चालण्याचा व्यायाम."
" म्हणजे जीम वगैरेची गरज नाही !" बाईंच बोलण माझ्या कानांना संगीत वाटत होत.
" अजिबात नाही"
"मग तुमचे चार्जेस किती पडतील ?" मी जवळ जवळ खिशात हात घालून पाकीट काढलेच होते.
"ते तूम्हाला आमच्या मॅनेजर सांगतील " आता माझी रवानगी मॅनेजर बाईंच्या कडे झाली.
" कसा वाटला आमचा प्लान " या बाई पट्टीच्या कसाई वाटत होत्या.
" मी अजून अनुभवलेला नाही तेंव्हा कसे सांगणार ?" मी पण चिवट बकरा होतो.
" डॉ. नी नीट समजावून सांगीतलाच असेल न ! "
" हो. पण चार्जेस तुम्ही सांगणार म्हणाल्या "
" तुम्हाला किती किलो कमी करायचे आहे ? आमचे चार्जेस त्या प्र्माणे आहेत." मला आपली किंमत किलोच्या भावात होते आहे हे ऐकून हसावे की रडावे कळत नव्हते.
" तुम्ही अस करा आमचा ९ आठवड्यांचा प्लान घ्या. ८-१० कि. पर्यंत वजन कमी होउ शकेल. "
" चार्जेस?"
" तुमच्या करता फक्त आजच्या दिवसा करता ऑफर आहे. १७,००० रु. फक्त. टॅक्सेस वेगळे."
" ते जाहितातीत २०% सूट लिहीले होते."
"ते धरूनच सांगीतले. तुम्ही आत्ता पेमेंट करत असाल तर दोन आठवडे एक्स्ट्रा देऊ. उद्द्या पासून २१००० रू. होतील "
" तुम्ही हे आठवडे देता म्हणजे काय करता ?" " भरभर मी चालीन , डायटींग मलाच करायचे , तुम्ही फार तर इसब गोलच्या बाटल्या देणार असाल. ह्या करता १७००० रू. ?!" मी इतरांना सहसा माझ्या खिशात हात घालू देत नाही
" दर आठवड्याला आमच्या आहार तज्ञ तुम्हाला मार्गदर्शन करतील त्याचेच हे चार्जेस."
मला सुहास्य वदन आठवल्या आणि १७,००० फारसे वाटेनासे झाले.
" मला एक फोन करावा लागेल . नंतर सांगतो." मॅनेजर बाईंच्या चेहेर्या वर गळाला लागलेला मासा सूटतो की काय ह्या काळजीचे भाव दिसले.
" ठीक आहे"
मी बाहेर आलो. " विकास , अरे मी इथे स्लिमींग सेंटरला आहे. हे तीन महिन्याचे १७,००० रू. सांगताहेत काय करू.?"
" आत्ता तू कुठे आहेस बाहेर की आत ?"
" बाहेर"
" छान.! आता समोर बघ. रिक्षा उभा असेल . लगेच पकड आणि घरी जा. २५रू. पडतील. " विकासला दिव्य दृष्टी वगैरे आहे की काय ?
मी २५ रू चा सल्ला तातडीने घेतला.
क्रमशः
वाचने
5313
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
वजनदार -३
आमचा व्यक्तीगत अनुभव असा
हा भाग खुपच मस्त!!!!
तुमचे लिखान खुप सहज सुंदर
खुपच मस्त लिहिले आहे आपण! जोर
भारी लिहिताय बाकी वल्लीशी
क्या बात !!!
अरे वा! १७००० रू. वाचले
गळाला लागलेला मासा सूटला !
छान.! आता समोर बघ...
आयला........ वजन
In reply to आयला........ वजन by स्पा
तुम्ही नियमित व्यायाम करता का
In reply to तुम्ही नियमित व्यायाम करता का by Pain
हो
In reply to हो by मोहन
मोहन
In reply to मोहन by Pain
हो न किती बरं झालं
व्वा.. :-)
हाही भाग छान जमलाय !!
पुढचा भाग येवुद्या हो
In reply to पुढचा भाग येवुद्या हो by गणेशा
धन्यवाद
मस्त!!