'असल उत्तर'! भाग-२
पहिल्या भागात म्हटल्याप्रमाणे, भारतीय सैन्य लहोरच्या 'कंटॉनंमेंट' पर्यंत जरी पोहोचलं असलं, तरी पंजाब आघाडी लढवणं, ही काही सोपी गोष्ट नव्हती. एक गोष्ट इथे नमूद कराविशी वाटते, ती म्हणजे बहुतेक वेळा आपण जो इतिहास वाचतो किंवा सिनेमात पाहतो, तो फार एकांगी आणि अतिरंजीत असतो. पाकिस्तानी सैन्याधिकारी हे मुर्ख आहेत, असाच आपला समज होतो. वास्तव परिस्थिती तशी नाही. आणि ते ह्याही लढाईच्या बाबतीत खरे आहे.
भारतीय सैन्याच्या ३ वेगवेगळ्या डिव्हिजननी लाहोर आणि परिसरात (' लाहोर अँड कसूर सेक्टर') हल्ला केला होता. कसूर परिसरात हा हल्ला ७ वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात आला होता. आपल्या सैन्याधिकार्यांची अपेक्षा होती की ह्या भागात पाकिस्तानच्या नियमित सैन्याची (रेग्युलर आर्मी) केवळ एकच बटालियन तैनात आहे आणि केवळ तीच प्रतिकार करेल. पण खरतरं पाकिस्तानने तिथे एक पूर्ण रेजिमेंट तैनात केली होती, तीही चिलखती दलासोबत. आणि त्यांच्यामागे तैनात होती पाकिस्तानी चिलखती दलाची १ ली डिव्हिजन, जी त्यांच्या सैन्याचा मानबिंदू समजली जात असे ('प्राईड ऑफ पाकिस्तान आर्मी). लक्षात घेण्यासारखा भाग असा, की आपल्या सैन्याने (पाकिस्तानने आगळिक केल्यास) लाहोर आणि ईचोगिल भागात हल्ला करून तो भाग ताब्यात घेण्याची योजना जून १९६५ च्या युद्धसरावातच नक्की केली होती. त्यातही कसूर भागात (कसूर सेक्टर) दोन बाजूनी हला करून लाहोर लढवणं पाकिस्तानला कठीण करून टाकावं, अशी ही योजना होती. परंतु, भारतीय सैन्याधिकार्यांच्या अपेक्षेविपरित हा भाग पाकिस्तानी सैन्याने फारच चांगल्या प्रकारे सुरक्षित केला होता.
पाकिस्तानच्या सैन्यानेही खेमकरणचा भाग (खेमकरण सेक्टर) ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्याचा मुख्य कारणं म्हणजे त्यावेळी बियास नदीवर दोन पूल होते. त्यातला एक पूल ताब्यात घेउन उत्तरेकडे सैन्य वळवायचं आणि भारतीय सैन्याच्या ११ डिव्हिजनना वेगळं पाडायचं, हा पाकिस्तानी लष्कराचा उद्देश होता. ह्या अकरा डिव्हिजन म्हणजे भारताच्या पंजाब, पठाणकोट, जम्मू-काश्मिर आणि लडाख इथे तेव्हा तैनात असलेल्या एकूण सैन्याच्या ५०% सैन्य होतं. तसचं त्यावेळी भारताने बियास नदीच्या पूर्व किनार्यावर राखीव सैन्यही तैनात केलं नसल्याने, पाकिस्तानी सैन्यासाठी दिल्ली फक्त एका दिवसाच्या अंतरावर आली असती. (काही जाणकारांच्या मते पाकिस्तान जर ह्यात यशस्वी ठरला असता तर ही पानिपतची ४थी लढाई ठरली असती. पुढचा विचार न केलेलाच बरा!) त्यामुळे, ही लढाई एकप्रकारे १९६५ च्या युद्धातली सर्वात निर्णायक लढाई ठरते.
आधी म्हटल्याप्रमाणे, केवळ पाकिस्तानची केवळ एकच बटालियन आपल्यासमोर प्रतिकार करतेय, ह्या समजातून कसूर परिसरात आघाडीवर गेलेली भारताची ४थी माउंटन पाकिस्तानच्या ह्या (प्रति)हल्ल्यामुळे चांगलीच अडचणीत सापडली होती. आघाडीवरील भारतीय सैन्याकडे (४थी माऊंटन डिव्हिजन) केवळ एकच टँक रेजिमेंट होती. त्यातही शेरमन-४ आणि शेरमन-५ रणगाड्यांचा समावेश होता (हे रणगाडे दुसर्या महायुद्धात वापरात होते) आणि पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांसमोर जवळजवळ कुचकामी होते. तसेच पाकिस्तानच्या तोफखाना दलाच्या (आर्टिलरी) १४० तोफा अतिशय सुनियोजित मारा करीत होत्या.
४थ्या मांऊटन डिव्हिजनकडे असलेल्या तोफांची क्षमताही पाकिस्तानी तोफांच्या मानाने अतिशय तोकडी होती. भारतीय सैन्याकडे असलेल्या १०६ मि मि आर. सी. एल. तोफाही पाकिस्तानच्या रणगाड्यांवर लांबून हल्ला करण्यासाठी निष्प्रभ ठरत होत्या. त्यातच त्या कुठे तैनात केल्या आहेत हे कळू न देण्यासाठी, त्यांचा माराही पाकिस्तानी सैन्य जवळ येईपर्यंत करता येत नव्हता. याउप्पर, पाकिस्तानच्या हवाईदलाची त्यांच्या पायदळाला पूर्ण मदत मिळत होती. तर भारतीय हवाईदलाची म्हणावी इतकी मदत पायदळाला होत नव्हती (काही तज्ञांच्या मते तर भारतीय पायदळाला हवाईदलाची मदत ह्या लढाईत अजिबात मिळाली नाही).
ह्या सगळ्या विपरित परिस्थीतीमुळे, ४थ्या माऊंटन डिव्हिजनच्या मुख्याधिकार्यांनी त्या डिव्हिजनला ताबडतोब माघार घ्यायला सांगितली. त्याप्रमाणे, ४थ्या मांऊटन ब्रिगेडने माघार घ्यायला सुरूवात केली. इथून पुढे सुरूवात होते एका थरारक लढाईची आणि भारतीय सैन्याने जवळपासच्या भूप्रदेशाचा सुयोग्य वापर करून मिळवलेल्या जवळजवळ अशक्यप्राय अशा विजयाची. ४थ्या माउंटन डिव्हिजनने माघार घेउन पाकिस्तानातून खेमकरणकडे येणार्या दोन रस्त्यांच्यामध्ये घोड्याच्या नालेच्या आकारात संरक्षक फळ्या उभ्या केल्या. आणि ह्या संरक्षक रचनेचा केंद्रबिंदू होता 'असल उत्तर'!
वर्गीकरण
वाचतो आहे
वाचतोय
In reply to वाचतोय by सुनील
होय!
वाचतोय. पुढचे भाग लवकर आणि
एक दुरुस्ती!
+१
In reply to +१ by नंदन
+२ सहमत
In reply to +२ सहमत by प्रभो
+३ पुढील भागाच्या
In reply to +३ पुढील भागाच्या by पुष्करिणी
अरे हो. क्रमशः राहिलच लिहायचं. :)
In reply to अरे हो. क्रमशः राहिलच लिहायचं. :) by मुशाफिर
हरकत नाही...
In reply to +३ पुढील भागाच्या by पुष्करिणी
+ ४
चित्रमय वर्णन..
In reply to चित्रमय वर्णन.. by बहुगुणी
मस्त व्हिडियो! अनेक धन्यवाद,
वाह!! वाचते आहे.. पुढे येऊदे
न वाचलेली
वाचत आहे.
वाचतो आहे.
एक गोष्ट इथे नमूद कराविशी
युध्दस्य कथा: रम्य: हे खरेच
लिहित रहा..
मस्त लिहिताय! प्रचंड आवडलं.
In reply to मस्त लिहिताय! प्रचंड आवडलं. by धमाल मुलगा
कसचं कसचं धमालराव.....
पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत