एक मत

शिल्पा ब's picture
शिल्पा ब in जनातलं, मनातलं
18 Aug 2010 - 10:05 pm

आजकाल मिपावर बऱ्याच चर्चा चालू आहेत...सैपाक, मुलीनी दारू पिणे, सरकारने किती करोड खर्च करावे, मोठाल्या दुकानातून समान आणणे, मुसलमान धर्मातील अतिरेकी मते आणि काय काय...
एक अस्सल मराठी माणूस म्हणून आम्हीही या सगळ्यात हिरीरीने भाग घेत आहोत, घेत राहू....बरेच धागे अप्रकाशित झाले, काही वाचनमात्र झाले. आम्हाला उगाचच एक प्रश्न पडला कि अशा चर्चांना काही धरबंध असावा कि नाही? म्हणजे काय प्रमाण असावे? महिन्यातून किती वेळा अशा चर्चा व्हाव्यात? आणि याविषयी आम्ही एखादा कौल काढावा काय?

आपल्यासारख्या थोरामोठ्यांकडून या समस्यांवर काही प्रकाश पडेल अशी आशा आहे.

हे ठिकाणधोरणवावरधर्मपाकक्रियावाङ्मयइतिहासप्रकटनविचार

प्रतिक्रिया

धमाल मुलगा's picture

18 Aug 2010 - 10:09 pm | धमाल मुलगा

म्हणजे?
रेशनिंग करायचं म्हणता?
कुणाला लाल कार्ड, कुणाला निळं कार्ड हे कसं ठरवणार? :)

शिल्पा ब's picture

18 Aug 2010 - 10:13 pm | शिल्पा ब

इथं पण पांढऱ्या कार्डवाले म्होठ्ठे लोकं असतील का?

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2010 - 10:25 pm | राजेश घासकडवी

तै हिरवा रंग विसरलात...

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Aug 2010 - 7:44 am | llपुण्याचे पेशवेll

डॉक्टरांनी काय सांगितलंय?

मी-सौरभ's picture

18 Aug 2010 - 11:42 pm | मी-सौरभ

असं मला तरी वाटतं..

चला म्हणजे अगदीच काही हे नाही तुम्ही...(बाकीच्यांना त्यांचा वेळ घेऊ देत, क्काय म्हणताय ?)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2010 - 10:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मिपावर फक्त सोमवार, गुरूवार आणि शनिवारीच चर्चांची परवानगी द्यावी. एका चर्चेवर, एका प्रतिसादकाला, एका आयडीने एकच प्रतिसाद देता येईल अशी सोय असावी. शिवाय कविता, कथा, प्रवासवर्णनं (विशेषतः भारताबाहेरची आणि भारतातल्या धार्मिक स्थळांची), इत्यादी ललित साहित्यांवर प्रतिक्रिया देताना चार ओळींची प्रतिसाद मर्यादा घालावी. पंगा आणि चोता दोन या मेगाबायटी प्रतिसादकांसाठी त्यातून काही अपवाद निर्माण करता येतील का यावर श्री. निखिल देशपांडे यांनी उजेड टाकावा.

कौलावर मात्र बंधने घालू नयेत. कौलात प्रतिसादकांनाही जास्तीचे पर्याय घालता येतील अशी सोय असावी.

शिल्पा ब's picture

18 Aug 2010 - 10:16 pm | शिल्पा ब

पंगा, चोता दोन याशिवाय इंद्रजीत पवार हेसुद्धा एक मेगाबायटी लेखक आहेत...साधं सहमत आहे या वाक्यावरसुद्धा ते एक पानभर लिहू शकतील..

मिसळभोक्ता's picture

18 Aug 2010 - 11:36 pm | मिसळभोक्ता

मेगाबायटी लेखक हा शब्द फार्फार आवडला !

(किलोबायटी) मिभो

घाटावरचे भट's picture

19 Aug 2010 - 3:30 am | घाटावरचे भट

सहमत.

- (बायटी) भटोबा

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Aug 2010 - 7:46 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत.
(टांगापल्टी) पेशवे

पाषाणभेद's picture

19 Aug 2010 - 9:29 am | पाषाणभेद

सोमवार, गुरूवार आणि शनिवारीच चर्चा करण्यापेक्षा मंगळवार, बुधवार अन शुक्रवारी चर्चा केली तर नाही का चालणार?
एकादशीच्या दिवशी एखादे काव्यच वाचणे अथवा लिहीणे किंवा काव्याचाच धागा मिपावर ठेवणे व अन्य धागे दिसणेही बंद करणे, चतूर्थीला चर्चासत्र दिसू देणे व इतर बंद करणे, रमजान मध्ये शांततेचेच धागे दिसू देणे, शिळासप्तमीस खादाडी दिसू देणे, पारशी नवरोज च्या दिवशी नविन वर्षाच्या सुभेच्छांचेच धागे दिसू देणे, पोंगल च्या दिवशी शेतीविषयक धागे,
ख्रिसमस च्या दिवशी पार्टी, पब पार्टी, आदींचे धागे, महाराष्ट्रदिनी शिवाजीमहाराज, इदीच्या दिवशी खिरखुर्म्याचे, मटनाचे खायचे पदार्थ दिसू देणे, महाविरजयंतीदिनी मंगल गाणी दंगल गाणी, बैसाखीनिमित्त शिखांचे धागे असे सर्व केल्याने सर्व समाज एकरूप होईल. प्रत्येकाला ज्याचात्याचा वार मिळेल. संपादकांनाही त्यांचे त्यांचे दिवस वाटून घेता येईल. सर्वत्र आनंदी आनंद होईल.

भांडन तंटा वादविवाद, मतमतांतर होणार नाही. तिखटमिसळीपेक्षा गुळवणी चांगली की नाही?

त्याचप्रमाणे राहू काळात चर्चा केल्याने चर्चा करणार्‍याला पुढच्या दोन दिवसात वाईट काळ संभवतो असे त्याच्या त्याच्या नाडीत लिहील्याचे आम्हास एका हात पाहणार्‍या ज्योतिषाने पायाच्या अंगट्याचे भविष्य पाहतांना आमच्या कपाळावर पाहून सांगितले असल्याचे आम्हास स्मरत आहे.

अप्पा जोगळेकर's picture

19 Aug 2010 - 11:41 am | अप्पा जोगळेकर

मला वाटतं त्यांचं नाव इंद्रराज पवार असं आहे. क्रेमर, राजेश घासकडवी हेसुद्धा मेगा बायटी लेखक आहेत असे आमचे मत आहे.

इन्द्र्राज पवार's picture

19 Aug 2010 - 3:29 pm | इन्द्र्राज पवार

आता शिल्पाताई आणि अप्पा जोगळेकर यांच्या प्रतिसादावर मी "इन्द्रजीत" की "इन्द्रराज" यावर खुलासा द्यायचे म्हटले तर तो मेगाबाईटचा व्हायलाच हवा, नाहीतर वाचणारे म्हणतील 'साधा खुलासा अमान्य'. प्रिय संपादक मंडळींनी अजून तरी मला "इतके मोठे प्रतिसाद चालणार नाहीत, भाऊ" अशी सूचना केलेली नाही, त्यामुळे सबब प्रतिसाद गरगरीत तब्येतीत देणे चालू आहे. धागाधारकांचीही काही तक्रार नाही. ~~ असो. डाय हार्ड हॅबिट.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2010 - 3:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =)) =)) =)) =)) =))

अर्धवट's picture

19 Aug 2010 - 3:47 pm | अर्धवट

इंद्रराज ह्यांच्या सदर प्रतीसादाची लांबी कमी भरल्यामुळे फाउल धरला आहे.. ;)

इन्द्र्राज पवार's picture

19 Aug 2010 - 3:54 pm | इन्द्र्राज पवार

डिप्रिसिएशन पुढे कुठेतरी भरून काढतो. आत्तापुरती वे मशीनवरून एन्ट्री आत घ्या.

अर्धवट's picture

19 Aug 2010 - 4:20 pm | अर्धवट

हा दुसरा फाउल..

असो, 'मापात पाप' नको यापुढे. ;)

इन्द्र्राज पवार's picture

19 Aug 2010 - 3:49 pm | इन्द्र्राज पवार

अदिती =)) =)) =)) =)) =)) =)) ही काय मेटाफिजिक्सची रचना?

इन्द्रा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

19 Aug 2010 - 3:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे नीलकांत, निखिल, हसून लोळणारा इमोटीकॉन परत आणा रे ... एक मेगाबायटी प्रतिसादक स्वतःची प्रतिमा धुळीस मिळवत आहे. ;-)

दिपक's picture

19 Aug 2010 - 3:58 pm | दिपक

हा वापरा

शेजारुन आणला आहे. ;-)

चिन्मना's picture

18 Aug 2010 - 11:08 pm | चिन्मना

>> एका चर्चेवर, एका प्रतिसादकाला, एका आयडीने एकच प्रतिसाद देता येईल अशी सोय असावी.

अहो प्रतिवादांमुळे तर चर्चा खुलतात आणि बर्‍याच लोकांना त्यातून नवीन माहिती कळते. एकदाच प्रतिसाद द्यायची मर्यदा ठेवली तर कुठलीच चर्चा कधीच रंगणार नाही.

असुर's picture

19 Aug 2010 - 1:32 am | असुर

आजाबात चालाच नाय!
जरा कुठे लोक चर्चा वगैरे करतात, थोडेफार हमरीतुमरीवर येतात. कसं बरं वाटतं, आमच्यासारखे लोक अशी एखादी म्याच, एखादं चांगलं झाड, पॉप-कॉर्न आणि कोक घेऊन एन्जॉय करतात. ;-)
हे असलं उपासाच्या वारांचं बंधन घातलं तर आम्ही म्याच पाहायला कुठे जाणार? ते काही नाही, चर्चा झालीच पाहिजे, मनमुराद म्याचेस खेळता आल्याच पाहिजेत, आणि त्या पाहण्यासाठी तिकीट नाय पायजे! ;-) काय पाहिजे तेव्हढे प्रतिसाद कुटता आले पाहिजेत.
असले रूल लावले तर प्रतीसादपाडू लेखांनी कुणाकडे पाहायचं ओ? ;-)

--असुर

विजुभाऊ's picture

19 Aug 2010 - 1:57 pm | विजुभाऊ

कौलात प्रतिसादकांनाही जास्तीचे पर्याय घालता येतील अशी सोय असावी.

ही तर धाग्याच अख फ करायची "पाक" कृती
लै भारी.
आता त्या पर्यायात दहा पैकी तीन उर्टच्या ढगाबद्दल असावेत ( उदा पत्रीकेत उर्टच्या ढगाचे स्थान कोणते वगैरे. दोन नाडीबद्दल असावेत आणि उरलेले पाच पाध्येगिरी वर असावेत)
कौलारू धागे काढताना जर ते स्वयंपाक घराबद्दल असतील तर तीन पैकी किमान एक फोडणीच्या कालच्या भाताचे आज काय कराल अशा पैकी असावेत.
जसे विडंबनकाव्यात बायको,ऑफिस आणि साहेब या घटकाना ऑप्शन नसतो तसे कौलात सुद्धा किमान एखादा ऑप्शन नसलेला पर्याय ठेवावा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

18 Aug 2010 - 10:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अहं ! खुशाल वाटेल ते बोलू द्यावे. वाटेल तशा चर्चा होऊ द्याव्या. श्लील-अश्लील, नीती-अनीती, योग्य-अयोग्य, अशा पलिकडे मिपा जावे असे वाटते. ''अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ असल्यामुळे '' लिहिण्या-बोलण्याची कोणतीच कसर राहू नये असे मला वाटते. काही अधिक - उणे असेल तर काळजी घेणारी मंडळी इथे आहेच. तेव्हा आपण काही मर्यादा वगैरे आखून घेतल्या पाहिजेत असे मला तरी वाटत नाही.

-दिलीप बिरुटे

बेसनलाडू's picture

18 Aug 2010 - 10:48 pm | बेसनलाडू

कोणात्याही स्वरूपाची मर्यादा नको. चर्चांवर तर नाहीच नाही.
(अमर्याद)बेसनलाडू

चिन्मना's picture

18 Aug 2010 - 11:04 pm | चिन्मना

सहमत आहे. कुणाला त्याने वेळ वाया जातो असे वाटत असेल तर फाट्यावर मारण्याचे स्वातंत्र्य आहेच की! प्रत्येक चर्चेत हिरीरीने भाग घेतला पाहिजे असे नाही.

इन्द्र्राज पवार's picture

18 Aug 2010 - 10:35 pm | इन्द्र्राज पवार

"थोरामोठ्यांकडून"

आता यात मी (आणि असेही असू शकेल की अजुन बरेच...) या गटात बसण्यासाठी "क्वालिफाईड" नाही; त्यामुळे मत व्यक्त करताना "टु बी ऑर नॉट टु बी" अशी अवस्था आहे. तरीही धागा रोचक आहे म्हणून थोडे मत मांडतो.

कोणत्याही चर्चेला कुठपर्यंत जावू द्यायचे आणि कोणता धागा "फक्त वाचनमात्र" ठेवायचा, कुठला "आता धाग्याने वादग्रस्त वळण घेतले..." म्हणून काढून टाकायचा, या बाबी संपादक मंडळाच्या अखत्यारीतील बाबी आहेत, आणि त्याप्रमाणे वेळोवेळी तशी कार्यवाही (जरी धागा प्रतिसादाने वाढत जात असला तरी) झालेली आहेच. त्यामुळे "धरबंधा" चा लगाम सर्वस्वी त्या टॉवरकडे आहे, जिथे "बिग ब्रदर इज वॉचिंग" अशी स्थिती आहे.

काही धाग्यांचे काही विषय प्रक्षोभक तर काही माहितीपूर्वक, तर मनोरंकनात्मक असू शकतात, होऊ शकतात (उदा. अगदी लेटेस्ट 'रोजा', "विवाह कौल", "मुली आणि मदिरापान') पण त्यामुळे कित्येकवेळा कित्येकाना माहितीचे नवनवे कंगोरे मिळू शकतात व अशाच चर्चेतून उपधागेदेखील सुचू शकतात. "रोजा" च्या निमित्ताने मला एका सदस्याने "अमुक एक इंग्रजी पुस्तक जरूर वाचा..." अशी खरडीद्वारे सूचना केली. ते पुस्तक मला नवीन होते आणि त्यावरील परिक्षण वाचल्यावर समजले की किती एखाद्या विषयावरील किती सखोल माहिती मला मिळू शकते. हे सर्व धागा चहुबाजूनी फुलू लागला तरच शक्य आहे. काही सदस्यांनी "विवाह कौल" वरील चर्चा वाचून मला "५२% रिझर्व्हेशनबद्दल अजून सविस्तर लिहा" अशी विनंतीही केली. या निमित्ताने माझेही अवांतर वाचन घडून येईल.

अशा विस्तारित स्वरूपाच्या संबंधामुळे धाग्यांचे आणि त्यावरील चर्चेचे प्रमाण याला कुठले आणि कसले मीटर असावे असा प्रश्न पडू नये असे वाटते.

शेवटी प्रवास करणार्‍याला रेल्वेचा डबा मोकळा काय, भरलेला असला काय, तो प्रवास हा करणारच. त्यासाठी कौल काढावा लागू नये, ही अपेक्षा.

सहज's picture

19 Aug 2010 - 12:07 pm | सहज

आमच्या प्रकाशकाका घाटपांडे यांनी हे असेच मत व्यक्त केले आहे.

इंद्राज प्रतिसाद आवडला व पटला.

आणि याविषयी आम्ही एखादा कौल काढावा काय?

हा प्रश्न कौलातून का नाही विचारला?

शिल्पा ब's picture

18 Aug 2010 - 10:40 pm | शिल्पा ब

कौल काढून हा प्रश्न कौलातून विचारावा कि नको याचा कौल काढू का?

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2010 - 10:47 pm | राजेश घासकडवी

मेटा मेटा मेटा (काथ्या) कुटीला आलो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Aug 2010 - 10:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

या प्रतिसादतही काही मेटाफर आहे काय? ;-)

राजेश घासकडवी's picture

18 Aug 2010 - 11:01 pm | राजेश घासकडवी

यात दुर्दैवाने मेटा 'फार' आहेत. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Aug 2010 - 11:02 pm | बिपिन कार्यकर्ते

ते मेटा जाऊ द्या हो... 'मेट'च बरंय.

प्रदीप's picture

19 Aug 2010 - 11:02 am | प्रदीप

:)

शानबा५१२'s picture

18 Aug 2010 - 11:02 pm | शानबा५१२

लेखिकेशी सहमत पण.....एक सुधारणा करतो.

एका सदस्याला एका आठवड्यात कीती लेख (काव्य,कौल काहीही) प्रकाशित करता येतील ह्यावर बंधन असावे.

हे पण जरा कीचकट वाटत आहे,पण लेखिकेला मिपाची फार काळजी आहे हे दीसते,त्यांनी अजुन एखादा पर्याय समोर आणावा अस वाटत.

धन्यवाद्,शिल्पा मॅडम,आपण सर्व मराठी संस्थळावर अश्याच आवडीने लिहत रहावे व सुधारणासाठी उपाय सुचवावेत.........नाही उगाच नाही लिहीत खरच आपण जो प्रस्ताव मांडला आहे तो काबिले-ए-तारीफ आहे,ह्यामुळे वायफळ चर्चांना आळा बसेल व चर्चेत गंभीरता येईल अस मला वाटत.

पण हो आपण सर्वीकडे असाच रस घ्या,ह्यानिमित्ताने मराठी,संस्थळावर तरी एकत्र येउ देत.

जय हींद!

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Aug 2010 - 11:04 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त पाऊस पडतोय. गरमागरम कांदाभजी घेऊन झाडावर चाललो आहे.

शानबा५१२'s picture

18 Aug 2010 - 11:18 pm | शानबा५१२

बीपीनदा,ते करण्याआधी ह्यांचा आयडी एक आठवडाभर ब्लॉक करुन टाका,काही न सांगता,मुद्दाम.
मग एक आठड्यानंतर जेव्हा ह्या ईथे येतील तेव्हा बघा.त्या स्वःताच आपला प्रस्ताव विसरतील्,व नंतर
महीन्यात व्हायला हवी तेवढी चर्चा एका दीवसात होईल..............सॉरी सॉरी नॉट चर्चा,बोंबाबोंब म्हणा ना!.

नाही पण त्यांनी जे लिहलय तेही बरोबर आहे,त्यांच्याकडे पाउसात ५ फुट पाणी जमा होत्,अस ऐकलय,मग असल्या भयंकर वातावरणात रहाणा-यांच्या अपेक्षा पण अश्याच भयंकर असणार ना!

YOU ARE GOOD AT INDUCING SOMEONE TO DO GOOD THINGS,SO APPLY YOUR SKILLS FOR WELFARE OF NEEDY PEOPLE.

BYE,
GOOD NIGHT,SWEET DREAM!

शिल्पा ब's picture

18 Aug 2010 - 11:40 pm | शिल्पा ब

<<<नाही पण त्यांनी जे लिहलय तेही बरोबर आहे,त्यांच्याकडे पाउसात ५ फुट पाणी जमा होत्,अस ऐकलय,

अहो जरा तुमच्या डबक्यातून बाहेर येऊन पाहत चला...मुंबईत पाऊस पडला कि पेपर पाहत चला म्हणजे कळेल...बाकी माझ्या प्रस्तावामुळे आपल्यालाच खूप दुखः होणार हे अपेक्षितच आहे.

बाकी पुस्तकं न वाचताच आणि सिनेमा न पाहताच मत देणारे थोर आपण...सध्या मुंबईतल्या पावसाबद्दल काय घेऊन बसलात..

अप्पा जोगळेकर's picture

19 Aug 2010 - 11:46 am | अप्पा जोगळेकर

काय रे शानबा, कशाला उगाच चिखलात दगड मारत बसतोस ?

अप्पा,

कॉपीराइट उल्लेख विसरला आहे ह्याची नम्र आठवण करून देउ इच्छीतो. ;)

शानबा५१२'s picture

19 Aug 2010 - 11:02 pm | शानबा५१२

आता समजल का की मराठी का पुढे जत नाही ते?

अरे तुझ्यासरखे लोक माझ्यासारख्या क्रांतिकारी विचाराच्या माणसाचाच पाठींबा काढायला लागले तर कठीण आहे रे बाबा!!

अणि हो,शिल्पा मॅडम्,मिपावर सदस्यांनी फक्त लिहायच आणि वाचायच असत्,असे सल्ले अमंलात आणले जातील अस नाही वाटत.

ईथे कोण आहे ज्यांनी पावसाळ्यात ५ फुट पाणी चालुन कींवा पोहुन पार केले आहे,कींवा मानववस्ती असणा-या ठीकाणावर एवढे पाणी पाहीले आहे??

शिल्पा ब's picture

18 Aug 2010 - 11:33 pm | शिल्पा ब

<<<एका सदस्याला एका आठवड्यात कीती लेख (काव्य,कौल काहीही) प्रकाशित करता येतील ह्यावर बंधन असावे.

हे चक्क तुम्ही म्हणताय? अहो मग तुमच्या लेखांचे काय? आता प्रकाशित झाल्यावर काही लगेचच तर काही थोड्या प्रतिसादानंतर काढून टाकावे लागतात हा भाग निराळा.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

18 Aug 2010 - 11:19 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

हे काय आहे खुळचटासारखं....म्हणजे मनात आलं कि न लिहिता आधी उपास लक्षात ठेवल्यासारखे वार लक्षात ठेवायचे?
छे.. मि,पा. वर होणार्‍या चर्चा अशाच असल्या पाहिजेत .
मनात आलेले विचार अगदि मुक्त पणाने व्यक्त होतात.यातच तर मि,पा. चा जीव आहे यार!
आणि अमुक विषयावर तमुक दिवशी याच विषयावर चर्चा होणार हे असे मि.पा. काही रुचेल असे वाटत नाही,
गुळचट्,छान छान वाटणारे गंमत वाटणारे विषयच चर्चेला घ्यायचे हा एक अजुन बुळचट नियम.
होउ द्या ना मनमुराद गप्पा...चर्वण्...असे का नियम आणि बंधने इथेही?
आणि कधी कधी जेव्हा मर्यादा ओलांडल्या जातात्,सभ्यपणाला विसंगत वक्तव्ये केली जातात त्यावेळी योग्य असे संपादन केले जाते आहे...
so what's the harm in there?

शानबा५१२'s picture

18 Aug 2010 - 11:27 pm | शानबा५१२

आता गुमान आपला विरोध मागे घ्या,बाईंना त्यांचा विरोध केलेले चालत नाही,बाहेर फळ्यावर वाचल नाही का?
नाही मागे घ्यायचा ना विरोध्,मग खावा छडीचा मार!

अहो सगळेच तुमच्यासारखे छडीचा मार खाणारे नसतात...बहुतौंशी लोकांना बोललेले समजते...अर्थात आपल्यासारखे थोर अपवाद आहेत म्हणूनच जग चालले आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2010 - 11:32 am | परिकथेतील राजकुमार

प्रविनभप्कर चे काय झाले ?

llपुण्याचे पेशवेll's picture

19 Aug 2010 - 11:46 am | llपुण्याचे पेशवेll

पर्‍या, असले प्रश्न विचारू नयेत. मारुती कांबळेचं काय झालं माहीत आहे ना?
परा कांबळे होईल.

अवांतरः प्रविन भप्करचे काय झाले?

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2010 - 11:52 am | परिकथेतील राजकुमार

काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.

राजेश घासकडवी's picture

19 Aug 2010 - 11:47 am | राजेश घासकडवी

स्वत:लाही सोडायचा नाहीस तू, नतद्रष्ट कुठचा.

सुहास..'s picture

19 Aug 2010 - 11:45 am | सुहास..

प्रविनभप्कर चे काय झाले ? >>>>>..

+ १३४८६७१३५६८८१८९+८९+८५४६५८६६८७७=०

अप्पा जोगळेकर's picture

19 Aug 2010 - 11:47 am | अप्पा जोगळेकर

नविन्भपकर चे काय झाले ते पैले बोला. प्रविन्भपकर बद्दल लै ऐकलं.

भारतीय's picture

19 Aug 2010 - 11:58 am | भारतीय

>>महिन्यातून किती वेळा अशा चर्चा व्हाव्यात?

महिन्यातून २१ दिवस, दिवसातून २ वेळा, रात्री झोपण्यापूर्वी मुली-दारू/ स्वयंपाक व तत्सम धाग्यांवर चर्चा करावी.. सकाळी ऊठल्यानंतर जरा वेळ ध्यानमग्न राहून 'प्रविन्भपकरचे काय झाले' याचा विचार करावा व मगच मिपावर लॉगीन व्हावे व नवीन विषय सुरू करावेत... कधी कधी कटाळा आल्यास नितिन थत्ते, श्री बिरुटे, श्री दिवटे आदी मान्यवरांच्या लेखांना प्रतिसाद द्यावेत.. आरोग्य ऊत्तम राहील याची खात्रीशीर ग्यारंटी!!

कानडाऊ योगेशु's picture

19 Aug 2010 - 12:43 pm | कानडाऊ योगेशु

ठराविक दिवशी ठराविक प्रकार हे वाचुन दूरदर्शनवर मंगळवारी रात्री फ्क्त प्रौढांसाठीचे चित्रपट दाखवत असत त्याची आठवण झाली.तो वार व ती वेळ ही कायम लक्षात ठेवत असु.(पुढे केबल आल्यावर तर ठराविक दिवशी मध्यरात्री तसले चित्रपट दाखवले जायचे.)
बाकी चालु द्या!

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2010 - 12:50 pm | परिकथेतील राजकुमार

फ्क्त प्रौढांसाठीचे चित्रपट

म्हणजे कुठले ?

कानडाऊ योगेशु's picture

19 Aug 2010 - 12:58 pm | कानडाऊ योगेशु

म्हणजे कुठले ?

ते जाऊ द्या हो.
पण तिथेही पोपट व्हायचाच.तारवटलेल्या डोळ्यांनी,टी.वीचा आवाज कमी करुन काहीतरी पाहायला मिळेल म्हणुन एरवी पचनी न पडणारे चित्रपट पाहायचो आणि एखाद दुसर्या चुंबन दृष्यानेच बोळवण व्हायची.(दूरदर्शनही तसली दृष्ये संपादीत करत असे.)
तो प्रकार म्हणजे "तुम्हाला ह्या पानापाशी पोचण्याची मुभा नाही" अथवा "प्रतिसाद संपादीत"चे आद्यरुपच होते म्हणा ना.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2010 - 1:09 pm | परिकथेतील राजकुमार

तो प्रकार म्हणजे "तुम्हाला ह्या पानापाशी पोचण्याची मुभा नाही" अथवा "प्रतिसाद संपादीत"चे आद्यरुपच होते म्हणा ना.

+ शमत आहे.

सुषमा स्वराज ह्यांच्या कृपेने आता एच बी ओ, स्टार मुव्हिजचे सुद्धा आस्था चॅनेल होउ लागलेले आहे. काही दिवसांनी बहुदा ह्या चॅनेल्सवर पण फुलाला फुल चिकटलेले पाहावे लागणार असे वाटते.

सगळ्यात भिकारचोटपणा म्हणजे सबटायटल्स मध्ये सुद्धा एखाद्या पात्राने बुलशिट म्हणले की bull**** असे लिहुन येते =))

इन्द्र्राज पवार's picture

19 Aug 2010 - 3:40 pm | इन्द्र्राज पवार

"सबटायटल्स मध्ये सुद्धा एखाद्या पात्राने बुलशिट म्हणले की bull**** असे लिहुन येते =))"

+ सहमत.
तसेच Damn you चे Darn you

“f***” याच्यावर तर इतकी कुर्‍हाड आहे की "एचबीओ" वर ज्यावेळी ऑलिव्हर स्टोनचा ऑस्कर विनर "प्लटून" लागला होता त्यावेळी सबटायटलमध्ये नुसत्या चांदण्याचा महापूर होता.

परिकथेतील राजकुमार's picture

19 Aug 2010 - 4:07 pm | परिकथेतील राजकुमार

सुहास..'s picture

19 Aug 2010 - 1:26 pm | सुहास..

हा हा हा !!

४९

अर्धवट's picture

19 Aug 2010 - 4:01 pm | अर्धवट

प्रकाटाआ

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Aug 2010 - 12:03 am | विश्वनाथ मेहेंदळे

शिल्पाताईंना शतकी कल्पना सुचली आहे. ती ही कुणाचाही रोष ओढवून न घेता.
( कुणाचाही => पुणेकर, मुंबईकर, पुरुष, स्त्रिया, IT वाले, Non-IT वाले, रिक्षाने प्रवास करणारे, बस ने प्रवास करणारे, पायी प्रवास करणारे, प्रवासच न करणारे, दारू पिणारे, न पिणारे, सिगारेटी फुंकणारे, न फुंकणारे, शाकाहारी, मांसाहारी, मस्त्याहारी, फलाहारी... झालेच तर सरपंच, संपादक इ इ..... )

वा शिल्पाताई, आवडले आपल्याला !!!!! आता अशीच एक कल्पना मलापण सुचली पाहिजे, मग त्रिशतकच हाणतो बघा !!!

ह. घ्या. हे. वे. सां. न. ल.

शिल्पा ब's picture

20 Aug 2010 - 12:25 am | शिल्पा ब

अहो मग होऊन जाऊ द्या...कशाची वाट बघताय? :-)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

20 Aug 2010 - 2:35 am | विश्वनाथ मेहेंदळे

सोप्पंय !!! त्रिशतकी कल्पना सुचण्याची !!!!!