✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

एक मत

श
शिल्पा ब यांनी
Wed, 08/18/2010 - 22:05  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10370 वाचन

💬 प्रतिसाद (65)

प्रतिक्रिया

म्हणजे? रेशनिंग करायचं

धमाल मुलगा
Wed, 08/18/2010 - 22:09 नवीन
म्हणजे? रेशनिंग करायचं म्हणता? कुणाला लाल कार्ड, कुणाला निळं कार्ड हे कसं ठरवणार? :)
  • Log in or register to post comments

इथं पण पांढऱ्या कार्डवाले

शिल्पा ब
Wed, 08/18/2010 - 22:13 नवीन
इथं पण पांढऱ्या कार्डवाले म्होठ्ठे लोकं असतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

एक विसरलात

राजेश घासकडवी
Wed, 08/18/2010 - 22:25 नवीन
तै हिरवा रंग विसरलात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

डॉक्टरांनी काय सांगितलंय?

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 08/19/2010 - 07:44 नवीन
डॉक्टरांनी काय सांगितलंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हा धागा बी त्यातलाच की

मी-सौरभ
Wed, 08/18/2010 - 23:42 नवीन
असं मला तरी वाटतं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

चला म्हणजे अगदीच काही हे नाही

शिल्पा ब
Wed, 08/18/2010 - 23:47 नवीन
चला म्हणजे अगदीच काही हे नाही तुम्ही...(बाकीच्यांना त्यांचा वेळ घेऊ देत, क्काय म्हणताय ?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

सहमत आहे. माझ्या मते...

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/18/2010 - 22:11 नवीन
मिपावर फक्त सोमवार, गुरूवार आणि शनिवारीच चर्चांची परवानगी द्यावी. एका चर्चेवर, एका प्रतिसादकाला, एका आयडीने एकच प्रतिसाद देता येईल अशी सोय असावी. शिवाय कविता, कथा, प्रवासवर्णनं (विशेषतः भारताबाहेरची आणि भारतातल्या धार्मिक स्थळांची), इत्यादी ललित साहित्यांवर प्रतिक्रिया देताना चार ओळींची प्रतिसाद मर्यादा घालावी. पंगा आणि चोता दोन या मेगाबायटी प्रतिसादकांसाठी त्यातून काही अपवाद निर्माण करता येतील का यावर श्री. निखिल देशपांडे यांनी उजेड टाकावा. कौलावर मात्र बंधने घालू नयेत. कौलात प्रतिसादकांनाही जास्तीचे पर्याय घालता येतील अशी सोय असावी.
  • Log in or register to post comments

पंगा, चोता दोन याशिवाय

शिल्पा ब
Wed, 08/18/2010 - 22:16 नवीन
पंगा, चोता दोन याशिवाय इंद्रजीत पवार हेसुद्धा एक मेगाबायटी लेखक आहेत...साधं सहमत आहे या वाक्यावरसुद्धा ते एक पानभर लिहू शकतील..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

मेगाबायटी

मिसळभोक्ता
Wed, 08/18/2010 - 23:36 नवीन
मेगाबायटी लेखक हा शब्द फार्फार आवडला ! (किलोबायटी) मिभो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

+१

घाटावरचे भट
गुरुवार, 08/19/2010 - 03:30 नवीन
सहमत. - (बायटी) भटोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळभोक्ता

+२

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 08/19/2010 - 07:46 नवीन
सहमत. (टांगापल्टी) पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

सोमवार, गुरूवार आणि शनिवारीच

पाषाणभेद
गुरुवार, 08/19/2010 - 09:29 नवीन
सोमवार, गुरूवार आणि शनिवारीच चर्चा करण्यापेक्षा मंगळवार, बुधवार अन शुक्रवारी चर्चा केली तर नाही का चालणार? एकादशीच्या दिवशी एखादे काव्यच वाचणे अथवा लिहीणे किंवा काव्याचाच धागा मिपावर ठेवणे व अन्य धागे दिसणेही बंद करणे, चतूर्थीला चर्चासत्र दिसू देणे व इतर बंद करणे, रमजान मध्ये शांततेचेच धागे दिसू देणे, शिळासप्तमीस खादाडी दिसू देणे, पारशी नवरोज च्या दिवशी नविन वर्षाच्या सुभेच्छांचेच धागे दिसू देणे, पोंगल च्या दिवशी शेतीविषयक धागे, ख्रिसमस च्या दिवशी पार्टी, पब पार्टी, आदींचे धागे, महाराष्ट्रदिनी शिवाजीमहाराज, इदीच्या दिवशी खिरखुर्म्याचे, मटनाचे खायचे पदार्थ दिसू देणे, महाविरजयंतीदिनी मंगल गाणी दंगल गाणी, बैसाखीनिमित्त शिखांचे धागे असे सर्व केल्याने सर्व समाज एकरूप होईल. प्रत्येकाला ज्याचात्याचा वार मिळेल. संपादकांनाही त्यांचे त्यांचे दिवस वाटून घेता येईल. सर्वत्र आनंदी आनंद होईल. भांडन तंटा वादविवाद, मतमतांतर होणार नाही. तिखटमिसळीपेक्षा गुळवणी चांगली की नाही? त्याचप्रमाणे राहू काळात चर्चा केल्याने चर्चा करणार्‍याला पुढच्या दोन दिवसात वाईट काळ संभवतो असे त्याच्या त्याच्या नाडीत लिहील्याचे आम्हास एका हात पाहणार्‍या ज्योतिषाने पायाच्या अंगट्याचे भविष्य पाहतांना आमच्या कपाळावर पाहून सांगितले असल्याचे आम्हास स्मरत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मला वाटतं त्यांचं नाव

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 08/19/2010 - 11:41 नवीन
मला वाटतं त्यांचं नाव इंद्रराज पवार असं आहे. क्रेमर, राजेश घासकडवी हेसुद्धा मेगा बायटी लेखक आहेत असे आमचे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

डाय हार्ड हॅबिट

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 08/19/2010 - 15:29 नवीन
आता शिल्पाताई आणि अप्पा जोगळेकर यांच्या प्रतिसादावर मी "इन्द्रजीत" की "इन्द्रराज" यावर खुलासा द्यायचे म्हटले तर तो मेगाबाईटचा व्हायलाच हवा, नाहीतर वाचणारे म्हणतील 'साधा खुलासा अमान्य'. प्रिय संपादक मंडळींनी अजून तरी मला "इतके मोठे प्रतिसाद चालणार नाहीत, भाऊ" अशी सूचना केलेली नाही, त्यामुळे सबब प्रतिसाद गरगरीत तब्येतीत देणे चालू आहे. धागाधारकांचीही काही तक्रार नाही. ~~ असो. डाय हार्ड हॅबिट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

=)) =)) =)) =)) =))

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/19/2010 - 15:41 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

इंद्रराज ह्यांच्या सदर

अर्धवट
गुरुवार, 08/19/2010 - 15:47 नवीन
इंद्रराज ह्यांच्या सदर प्रतीसादाची लांबी कमी भरल्यामुळे फाउल धरला आहे.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

फाऊल

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 08/19/2010 - 15:54 नवीन
डिप्रिसिएशन पुढे कुठेतरी भरून काढतो. आत्तापुरती वे मशीनवरून एन्ट्री आत घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवट

हा दुसरा फाउल.. असो, 'मापात

अर्धवट
गुरुवार, 08/19/2010 - 16:20 नवीन
हा दुसरा फाउल.. असो, 'मापात पाप' नको यापुढे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

???

इन्द्र्राज पवार
गुरुवार, 08/19/2010 - 15:49 नवीन
अदिती =)) =)) =)) =)) =)) =)) ही काय मेटाफिजिक्सची रचना? इन्द्रा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे नीलकांत, निखिल, हसून

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 08/19/2010 - 15:51 नवीन
अरे नीलकांत, निखिल, हसून लोळणारा इमोटीकॉन परत आणा रे ... एक मेगाबायटी प्रतिसादक स्वतःची प्रतिमा धुळीस मिळवत आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

तात्पुरता

दिपक
गुरुवार, 08/19/2010 - 15:58 नवीन
हा वापरा Image removed. शेजारुन आणला आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

असहमत

चिन्मना
Wed, 08/18/2010 - 23:08 नवीन
>> एका चर्चेवर, एका प्रतिसादकाला, एका आयडीने एकच प्रतिसाद देता येईल अशी सोय असावी. अहो प्रतिवादांमुळे तर चर्चा खुलतात आणि बर्‍याच लोकांना त्यातून नवीन माहिती कळते. एकदाच प्रतिसाद द्यायची मर्यदा ठेवली तर कुठलीच चर्चा कधीच रंगणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

आजाबात चालाच नाय!

असुर
गुरुवार, 08/19/2010 - 01:32 नवीन
आजाबात चालाच नाय! जरा कुठे लोक चर्चा वगैरे करतात, थोडेफार हमरीतुमरीवर येतात. कसं बरं वाटतं, आमच्यासारखे लोक अशी एखादी म्याच, एखादं चांगलं झाड, पॉप-कॉर्न आणि कोक घेऊन एन्जॉय करतात. ;-) हे असलं उपासाच्या वारांचं बंधन घातलं तर आम्ही म्याच पाहायला कुठे जाणार? ते काही नाही, चर्चा झालीच पाहिजे, मनमुराद म्याचेस खेळता आल्याच पाहिजेत, आणि त्या पाहण्यासाठी तिकीट नाय पायजे! ;-) काय पाहिजे तेव्हढे प्रतिसाद कुटता आले पाहिजेत. असले रूल लावले तर प्रतीसादपाडू लेखांनी कुणाकडे पाहायचं ओ? ;-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कौलात प्रतिसादकांनाही

विजुभाऊ
गुरुवार, 08/19/2010 - 13:57 नवीन
कौलात प्रतिसादकांनाही जास्तीचे पर्याय घालता येतील अशी सोय असावी. ही तर धाग्याच अख फ करायची "पाक" कृती लै भारी. आता त्या पर्यायात दहा पैकी तीन उर्टच्या ढगाबद्दल असावेत ( उदा पत्रीकेत उर्टच्या ढगाचे स्थान कोणते वगैरे. दोन नाडीबद्दल असावेत आणि उरलेले पाच पाध्येगिरी वर असावेत) कौलारू धागे काढताना जर ते स्वयंपाक घराबद्दल असतील तर तीन पैकी किमान एक फोडणीच्या कालच्या भाताचे आज काय कराल अशा पैकी असावेत. जसे विडंबनकाव्यात बायको,ऑफिस आणि साहेब या घटकाना ऑप्शन नसतो तसे कौलात सुद्धा किमान एखादा ऑप्शन नसलेला पर्याय ठेवावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अहं

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 08/18/2010 - 22:26 नवीन
अहं ! खुशाल वाटेल ते बोलू द्यावे. वाटेल तशा चर्चा होऊ द्याव्या. श्लील-अश्लील, नीती-अनीती, योग्य-अयोग्य, अशा पलिकडे मिपा जावे असे वाटते. ''अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ असल्यामुळे '' लिहिण्या-बोलण्याची कोणतीच कसर राहू नये असे मला वाटते. काही अधिक - उणे असेल तर काळजी घेणारी मंडळी इथे आहेच. तेव्हा आपण काही मर्यादा वगैरे आखून घेतल्या पाहिजेत असे मला तरी वाटत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सहमत आहे

बेसनलाडू
Wed, 08/18/2010 - 22:48 नवीन
कोणात्याही स्वरूपाची मर्यादा नको. चर्चांवर तर नाहीच नाही. (अमर्याद)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत आहे

चिन्मना
Wed, 08/18/2010 - 23:04 नवीन
सहमत आहे. कुणाला त्याने वेळ वाया जातो असे वाटत असेल तर फाट्यावर मारण्याचे स्वातंत्र्य आहेच की! प्रत्येक चर्चेत हिरीरीने भाग घेतला पाहिजे असे नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रवास

इन्द्र्राज पवार
Wed, 08/18/2010 - 22:35 नवीन
"थोरामोठ्यांकडून" आता यात मी (आणि असेही असू शकेल की अजुन बरेच...) या गटात बसण्यासाठी "क्वालिफाईड" नाही; त्यामुळे मत व्यक्त करताना "टु बी ऑर नॉट टु बी" अशी अवस्था आहे. तरीही धागा रोचक आहे म्हणून थोडे मत मांडतो. कोणत्याही चर्चेला कुठपर्यंत जावू द्यायचे आणि कोणता धागा "फक्त वाचनमात्र" ठेवायचा, कुठला "आता धाग्याने वादग्रस्त वळण घेतले..." म्हणून काढून टाकायचा, या बाबी संपादक मंडळाच्या अखत्यारीतील बाबी आहेत, आणि त्याप्रमाणे वेळोवेळी तशी कार्यवाही (जरी धागा प्रतिसादाने वाढत जात असला तरी) झालेली आहेच. त्यामुळे "धरबंधा" चा लगाम सर्वस्वी त्या टॉवरकडे आहे, जिथे "बिग ब्रदर इज वॉचिंग" अशी स्थिती आहे. काही धाग्यांचे काही विषय प्रक्षोभक तर काही माहितीपूर्वक, तर मनोरंकनात्मक असू शकतात, होऊ शकतात (उदा. अगदी लेटेस्ट 'रोजा', "विवाह कौल", "मुली आणि मदिरापान') पण त्यामुळे कित्येकवेळा कित्येकाना माहितीचे नवनवे कंगोरे मिळू शकतात व अशाच चर्चेतून उपधागेदेखील सुचू शकतात. "रोजा" च्या निमित्ताने मला एका सदस्याने "अमुक एक इंग्रजी पुस्तक जरूर वाचा..." अशी खरडीद्वारे सूचना केली. ते पुस्तक मला नवीन होते आणि त्यावरील परिक्षण वाचल्यावर समजले की किती एखाद्या विषयावरील किती सखोल माहिती मला मिळू शकते. हे सर्व धागा चहुबाजूनी फुलू लागला तरच शक्य आहे. काही सदस्यांनी "विवाह कौल" वरील चर्चा वाचून मला "५२% रिझर्व्हेशनबद्दल अजून सविस्तर लिहा" अशी विनंतीही केली. या निमित्ताने माझेही अवांतर वाचन घडून येईल. अशा विस्तारित स्वरूपाच्या संबंधामुळे धाग्यांचे आणि त्यावरील चर्चेचे प्रमाण याला कुठले आणि कसले मीटर असावे असा प्रश्न पडू नये असे वाटते. शेवटी प्रवास करणार्‍याला रेल्वेचा डबा मोकळा काय, भरलेला असला काय, तो प्रवास हा करणारच. त्यासाठी कौल काढावा लागू नये, ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments

वेगवेगळ्या प्रसंगी

सहज
गुरुवार, 08/19/2010 - 12:07 नवीन
आमच्या प्रकाशकाका घाटपांडे यांनी हे असेच मत व्यक्त केले आहे. इंद्राज प्रतिसाद आवडला व पटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इन्द्र्राज पवार

आणि याविषयी आम्ही एखादा कौल

अनामिक
Wed, 08/18/2010 - 22:37 नवीन
आणि याविषयी आम्ही एखादा कौल काढावा काय? हा प्रश्न कौलातून का नाही विचारला?
  • Log in or register to post comments

कौल काढून हा प्रश्न कौलातून

शिल्पा ब
Wed, 08/18/2010 - 22:40 नवीन
कौल काढून हा प्रश्न कौलातून विचारावा कि नको याचा कौल काढू का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक

मेटा मेटा

राजेश घासकडवी
Wed, 08/18/2010 - 22:47 नवीन
मेटा मेटा मेटा (काथ्या) कुटीला आलो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिल्पा ब

या प्रतिसादतही काही मेटाफर

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 08/18/2010 - 22:49 नवीन
या प्रतिसादतही काही मेटाफर आहे काय? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

नाही

राजेश घासकडवी
Wed, 08/18/2010 - 23:01 नवीन
यात दुर्दैवाने मेटा 'फार' आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

ते मेटा जाऊ द्या हो... 'मेट'च

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/18/2010 - 23:02 नवीन
ते मेटा जाऊ द्या हो... 'मेट'च बरंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

क्लास

प्रदीप
गुरुवार, 08/19/2010 - 11:02 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

लेखिकेशी सहमत पण.....एक

शानबा५१२
Wed, 08/18/2010 - 23:02 नवीन
लेखिकेशी सहमत पण.....एक सुधारणा करतो. एका सदस्याला एका आठवड्यात कीती लेख (काव्य,कौल काहीही) प्रकाशित करता येतील ह्यावर बंधन असावे. हे पण जरा कीचकट वाटत आहे,पण लेखिकेला मिपाची फार काळजी आहे हे दीसते,त्यांनी अजुन एखादा पर्याय समोर आणावा अस वाटत. धन्यवाद्,शिल्पा मॅडम,आपण सर्व मराठी संस्थळावर अश्याच आवडीने लिहत रहावे व सुधारणासाठी उपाय सुचवावेत.........नाही उगाच नाही लिहीत खरच आपण जो प्रस्ताव मांडला आहे तो काबिले-ए-तारीफ आहे,ह्यामुळे वायफळ चर्चांना आळा बसेल व चर्चेत गंभीरता येईल अस मला वाटत. पण हो आपण सर्वीकडे असाच रस घ्या,ह्यानिमित्ताने मराठी,संस्थळावर तरी एकत्र येउ देत. जय हींद!
  • Log in or register to post comments

मस्त पाऊस पडतोय. गरमागरम

बिपिन कार्यकर्ते
Wed, 08/18/2010 - 23:04 नवीन
मस्त पाऊस पडतोय. गरमागरम कांदाभजी घेऊन झाडावर चाललो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

बीपीनदा,ते करण्याआधी ह्यांचा

शानबा५१२
Wed, 08/18/2010 - 23:18 नवीन
बीपीनदा,ते करण्याआधी ह्यांचा आयडी एक आठवडाभर ब्लॉक करुन टाका,काही न सांगता,मुद्दाम. मग एक आठड्यानंतर जेव्हा ह्या ईथे येतील तेव्हा बघा.त्या स्वःताच आपला प्रस्ताव विसरतील्,व नंतर महीन्यात व्हायला हवी तेवढी चर्चा एका दीवसात होईल..............सॉरी सॉरी नॉट चर्चा,बोंबाबोंब म्हणा ना!. नाही पण त्यांनी जे लिहलय तेही बरोबर आहे,त्यांच्याकडे पाउसात ५ फुट पाणी जमा होत्,अस ऐकलय,मग असल्या भयंकर वातावरणात रहाणा-यांच्या अपेक्षा पण अश्याच भयंकर असणार ना! YOU ARE GOOD AT INDUCING SOMEONE TO DO GOOD THINGS,SO APPLY YOUR SKILLS FOR WELFARE OF NEEDY PEOPLE. BYE, GOOD NIGHT,SWEET DREAM!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

<<<नाही पण त्यांनी जे लिहलय

शिल्पा ब
Wed, 08/18/2010 - 23:40 नवीन
<<<नाही पण त्यांनी जे लिहलय तेही बरोबर आहे,त्यांच्याकडे पाउसात ५ फुट पाणी जमा होत्,अस ऐकलय, अहो जरा तुमच्या डबक्यातून बाहेर येऊन पाहत चला...मुंबईत पाऊस पडला कि पेपर पाहत चला म्हणजे कळेल...बाकी माझ्या प्रस्तावामुळे आपल्यालाच खूप दुखः होणार हे अपेक्षितच आहे. बाकी पुस्तकं न वाचताच आणि सिनेमा न पाहताच मत देणारे थोर आपण...सध्या मुंबईतल्या पावसाबद्दल काय घेऊन बसलात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

काय रे शानबा, कशाला उगाच

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 08/19/2010 - 11:46 नवीन
काय रे शानबा, कशाला उगाच चिखलात दगड मारत बसतोस ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

अप्पा, कॉपीराइट उल्लेख विसरला

अर्धवट
गुरुवार, 08/19/2010 - 11:47 नवीन
अप्पा, कॉपीराइट उल्लेख विसरला आहे ह्याची नम्र आठवण करून देउ इच्छीतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

आता समजल का की मराठी का पुढे

शानबा५१२
गुरुवार, 08/19/2010 - 23:02 नवीन
आता समजल का की मराठी का पुढे जत नाही ते? अरे तुझ्यासरखे लोक माझ्यासारख्या क्रांतिकारी विचाराच्या माणसाचाच पाठींबा काढायला लागले तर कठीण आहे रे बाबा!! अणि हो,शिल्पा मॅडम्,मिपावर सदस्यांनी फक्त लिहायच आणि वाचायच असत्,असे सल्ले अमंलात आणले जातील अस नाही वाटत. ईथे कोण आहे ज्यांनी पावसाळ्यात ५ फुट पाणी चालुन कींवा पोहुन पार केले आहे,कींवा मानववस्ती असणा-या ठीकाणावर एवढे पाणी पाहीले आहे??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

<<<एका सदस्याला एका आठवड्यात

शिल्पा ब
Wed, 08/18/2010 - 23:33 नवीन
<<<एका सदस्याला एका आठवड्यात कीती लेख (काव्य,कौल काहीही) प्रकाशित करता येतील ह्यावर बंधन असावे. हे चक्क तुम्ही म्हणताय? अहो मग तुमच्या लेखांचे काय? आता प्रकाशित झाल्यावर काही लगेचच तर काही थोड्या प्रतिसादानंतर काढून टाकावे लागतात हा भाग निराळा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

अहं....आजिबात सहमत नाही...

जाई अस्सल कोल्हापुरी
Wed, 08/18/2010 - 23:19 नवीन
हे काय आहे खुळचटासारखं....म्हणजे मनात आलं कि न लिहिता आधी उपास लक्षात ठेवल्यासारखे वार लक्षात ठेवायचे? छे.. मि,पा. वर होणार्‍या चर्चा अशाच असल्या पाहिजेत . मनात आलेले विचार अगदि मुक्त पणाने व्यक्त होतात.यातच तर मि,पा. चा जीव आहे यार! आणि अमुक विषयावर तमुक दिवशी याच विषयावर चर्चा होणार हे असे मि.पा. काही रुचेल असे वाटत नाही, गुळचट्,छान छान वाटणारे गंमत वाटणारे विषयच चर्चेला घ्यायचे हा एक अजुन बुळचट नियम. होउ द्या ना मनमुराद गप्पा...चर्वण्...असे का नियम आणि बंधने इथेही? आणि कधी कधी जेव्हा मर्यादा ओलांडल्या जातात्,सभ्यपणाला विसंगत वक्तव्ये केली जातात त्यावेळी योग्य असे संपादन केले जाते आहे... so what's the harm in there?
  • Log in or register to post comments

आता गुमन आपला विरोध मागे

शानबा५१२
Wed, 08/18/2010 - 23:27 नवीन
आता गुमान आपला विरोध मागे घ्या,बाईंना त्यांचा विरोध केलेले चालत नाही,बाहेर फळ्यावर वाचल नाही का? नाही मागे घ्यायचा ना विरोध्,मग खावा छडीचा मार!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जाई अस्सल कोल्हापुरी

अहो सगळेच तुमच्यासारखे छडीचा

शिल्पा ब
Wed, 08/18/2010 - 23:35 नवीन
अहो सगळेच तुमच्यासारखे छडीचा मार खाणारे नसतात...बहुतौंशी लोकांना बोललेले समजते...अर्थात आपल्यासारखे थोर अपवाद आहेत म्हणूनच जग चालले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शानबा५१२

प्रविनभप्कर चे काय झाले ?

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/19/2010 - 11:32 नवीन
प्रविनभप्कर चे काय झाले ?
  • Log in or register to post comments

पर्‍या, असले प्रश्न विचारू

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 08/19/2010 - 11:46 नवीन
पर्‍या, असले प्रश्न विचारू नयेत. मारुती कांबळेचं काय झालं माहीत आहे ना? परा कांबळे होईल. अवांतरः प्रविन भप्करचे काय झाले?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

काय करणार? जुनी खोड.

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 08/19/2010 - 11:52 नवीन
काय करणार? जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका विचारणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा