काळे काका...काश्मिर तर हातचे जाण्याच्या स्थितीत आहे,पण चीन चा धोका त्याहुन मोठा होत चालला आहे.
चीन पाकिस्तानात बंदर (पोर्ट) बनवणे आणि श्रीलंकेत रस्ते बनवणे इं अनेक उपक्रम त्यांनी हाती घेतले असुन हिंदुस्थानाला घेरण्याचे हर तर्हेचे प्रयत्न सध्या चीन करत असुन आता त्यांचा मिलेटरी बेस पाकिस्थानात स्थापण्याचे त्यांचे मनसुबे आहेत...
http://www.timesnow.tv/China-mulls-military-base-on-Pak-soil/articleshow/4337378.cms
ह्या धाग्याला कायमच वर ठेवण्याचा काही माननीयांचा खटाटोप बघता, त्यांच्या मेहनतीला दाद म्हणुन मिपा व्यवस्थापन हा धागा कायमच अग्रस्थानी राहिल अशी सोय करु शकणार नाही का ? मान्यवरांचे इंचा इंचाने धागा वर ठेवायचे कष्ट तरी वाचतील.
पण पाकिस्तानला आवरले तर इतरांकडे लक्ष देता येईल ना?
मान्य आहे,पण कोण कोणाशी मैत्री कोणत्या कारणास्तव वाढवत आहे याच्याकडे काणाडोळा करुन कसे चालेल ?
पाकड्याचे वर्तन कधीच सुधारणार नाही,त्यांच्याकडुन मैत्री /शांतीची अपेक्षा करणे म्हणजे स्वत:चे नुकासान करुन घेणेच होय;जे आपण इतके वर्ष सहन करतोय तेच !!!
झेंडा उलटा लावुन पाकडे कुरापत काढण्याची एकही संधी सोडत नाही हे याचे एक उत्तम उदाहरण आहे...
त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल!
हे कशावरून ठरवले? काहि तर्क आहे का आपले उगाच एक वाक्य लेखनाला भारदस्तपणा येण्यासाठी टाकले आहे?
उलटपक्षी, आजकाल युरोपातील एकएक छोटेछोटे देश (आपापले सार्वभौमत्व टिकवूनसुद्धा) एकत्र येताहेत, असे खात्रीलायकरीत्या कळते.
What goes around, comes around?
त्यांच्या PIIGS चे काय? खरे तर युरो आता आहे तसाच राहील का दोन एक वर्षांत त्याला गच्छंति द्यावी लागेल अशी सध्या चिन्हे आहेत!
तुर्कस्तानला युरोने आपल्यात घेण्यात चालढकल केल्याने तो आता इतरस्त्र बघत आहे, असेही दिसून येते.
आजकाल युरोपातील एकएक छोटेछोटे देश (आपापले सार्वभौमत्व टिकवूनसुद्धा) एकत्र येताहेत, असे खात्रीलायकरीत्या कळते.
* पण जर त्यांची युरो ही सामायिक करन्सी धड राहू शकली नाही (अशी सध्यातरी लक्षणे दिसत आहेत) , तर युरोपियन युनियन कितपत एकसंध राहील? आणी राहिलाच तर त्या स्थितीचा त्यांना संघ करून अभिप्रेत असलेला फायदा काय?
* ग्रीस सारखे देश तर खरे तर युनियनच्या प्रमुख (ड्रायव्हर) देशांच्या गळ्यातील धोंड बनलेले दिसताहेत. तेव्हा ही 'आवळ्या भोपळ्याची मोट' कशी तग धरेल हे पहाणे उद्बोधक ठरेल.
* ब्रिटनमधे युनियनात सामिल होण्यावरून बराच विरोध आहे, तेव्हा युरोपातील एक मोठा देश युनियनमधे केवळ नाममात्र आहे.
* युरोपाचाच भाग असलेला तुर्कस्तान अनेक वर्षे युनियनात सामिल होण्यासाठी ताटकळत ठेवल्याने आता तो इतरस्त्र पहात आहे, ह्यामुळे युरोपातील देश एकत्र येताहेत, ह्या विधानास छेद जातो. तुर्कस्तानचे भौगोलिक स्थान पहाता त्याचे युनियनला सामिल न होणे युनियनच्या भवितव्याच्या दृष्टिने चांगले आहे असे वाटत नाही.
* पण जर त्यांची युरो ही सामायिक करन्सी धड राहू शकली नाही (अशी सध्यातरी लक्षणे दिसत आहेत) , तर युरोपियन युनियन कितपत एकसंध राहील? आणी राहिलाच तर त्या स्थितीचा त्यांना संघ करून अभिप्रेत असलेला फायदा काय?
माणसांची (labor forceची) मुक्त हालचाल किंवा इतरही अनेक (राजकीय किंवा अन्य) समाईक फायद्यांकरिता संघ एकत्र राहू शकत नाही का? त्याकरिता एक चलन असलेच पाहिजे का?
चलन आणि देश/संघ/सीमांचे धूसरीकरण यांचा परस्परसंबंध असलाच पाहिजे का? एकाच देशात एकाहून अधिक अधिकृत चलने, अनेक देशांत मिळून एक सामाईक चलन, एखाद्या देशास स्वतःचे असे चलन नसून तिसर्याच कोणत्यातरी देशाचे चलन तेथे अधिकृत चलन असणे, असे वेगवेगळे प्रकार स्थानिक परिस्थितीच्या गरजांप्रमाणे किंवा मर्यादांप्रमाणे चालू शकतात. (याची कितीतरी उदाहरणे देता येतील.) संघांच्या बाबतीतही असे काही प्रकार (गरजांप्रमाणे किंवा सोयीप्रमाणे) झाले, तर नेमके काय बिघडेल?
('एकत्र येणे' ही संज्ञा केवळ 'युरोपीयन युनियन' एवढ्या एकाच संदर्भात न पाहता, 'युरोपियन युनियन', 'शेन्जेन करार' आणि 'युरो झोन' या आणि कदाचित आणखीही वेगवेगळ्या संदर्भात पाहिली तर? तशाही या तिन्ही गोष्टी नेमक्या एक नाहीत.)
युरोपाचाच भाग असलेला तुर्कस्तान अनेक वर्षे युनियनात सामिल होण्यासाठी ताटकळत ठेवल्याने आता तो इतरस्त्र पहात आहे, ह्यामुळे युरोपातील देश एकत्र येताहेत, ह्या विधानास छेद जातो.
'युरोपातील देश एकत्र येताहेत' हे वाक्य 'युरोपातील सर्व देश एकत्र येताहेत' असे न घेता 'युरोपातील अनेक देशसमूह (कदाचित वेगवेगळ्या कारणांकरिता) एकत्र येताहेत' असे घेतले तर?
आणि युरोपियन युनियनपुरतेच बोलायचे झाले, तर युरो चलन जरी समजा कोसळले, तरी इतर समाईक interests जर पुरेसे प्रबळ असले (ते तसे आहेत की नाही हे मला नक्की माहीत नाही, पण तरीही समजा...), तर त्या परिस्थितीत युरोपियन युनियन (कदाचित समाईक चलनाविना) टिकू शकणारच नाही का?
मला वाटते, असा संघ करून राहणे (समाईक चलन असो वा नसो) हे जर अनेक किंवा सर्व घटकराष्ट्रांच्या तरीही फायद्याचे असेल, तर संघ (कदाचित घटकांची थोडी बेरीज-वजाबाकी होऊन) टिकेल. नसेल, तर टिकणार नाही. यांपैकी काहीही घडले, तरी What goes around, comes around असे म्हणता येणार नाही का?
=================================================================
चलन ही आर्थिक व्यवहाराची एक सोय आहे. त्याचा राजकीय सार्वभौमत्वाशी किंवा एकात्मतेशीही संबंध असलाच पाहिजे का?
एक hypothetical प्रश्न. (यामागे अर्थशास्त्राचा कोणताही अभ्यास नसून केवळ एक प्रामाणिक शंका / उघड विचारमंथनाचा प्रयत्न आहे. विचारांच्या दिशेत काही चूक असू शकेल; मात्र त्या परिस्थितीत नेमके काय चुकत आहे, किंवा माझा विचार नेमका कोठे तोकडा पडत आहे, ते समजून घ्यावयास आवडेल.)
समजा, भारतासारख्या खंडप्राय देशात एकाहून अधिक प्रादेशिक चलने झाली. (व्हावीत असे म्हणणे नाही. झाले तर काय होईल याचा विचार आहे.) जोपर्यंत हे परस्परसामंजस्याने आणि सुसूत्रीकृतरीत्या चाललेले असेल, आणि अशा विविध चलनांत आंतरपरिवर्तनीयता असेल, तोपर्यंत नेमके काय बिघडेल? आणि अशा व्यवस्थेचे इतर फायदेतोटे काहीही असोत, पण याने भारताच्या सार्वभौमत्वावर किंवा राष्ट्रीय एकात्मतेवर नेमका कसा फरक पडेल? जाणून घ्यायला आवडेल.
माझ्या माहितीप्रमाणे ही राज्ये संवेदनाशील होत चालली आहेत. दहशतवाद आणि नक्षलवाद इथे चांगलेच फोफावले आहेत. पंजाबमध्येही अशी चळवळ होती. राजकारणी लोक ह्या अशा मनोव्रुत्तीबद्दल सोयीस्कर मौन बाळगून आहेत. दक्षिणेकडेही अशी चळवळ मूळ धरू लागल्येय.
माझा लेख आपल्या सरकारला कारवाई करण्यास उद्युक्त करण्यासाठी आणि न केल्यास काय होईल याचा विचार करण्यासाठी लिहिला होता. याचे भान असू द्या. जे जम्मू-काश्मीरला लागू आहे ते चीन, नागालँड, आसाम, मणीपूर, दक्षिणी राज्ये यांनाही लागू आहे. ही राज्ये आणि रेड कॉरीडॉरमुळे धोक्यात आलेली राज्ये या सर्वच बाबतीत कांहींही न करता गप्प बसणे आणि समस्या आपोआप सुटेल अशी आशा करणे धोकादायक आहे. म्हणून मला झालेल्या मनस्तापापायी मी हा लेख लिहिला.
नागालँड, आसाम, मणीपूर, दक्षिणी राज्ये वगैरे अलग होऊ पहात आहेत या आणखी एका मिपाकरांच्या प्रतिसादातच श्री. ऋषिकेश यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. हा तर्क माझ्या इतर वाचनावरून मी केला आहे.
तसेच पाकिस्तानातही बलुचिस्तानसारखी राज्ये अलग व्हायला सबब मिळण्याचीच वाट पहात आहेत.
तरी विचारविनिमय त्या दृष्टीने व्हावा असे वाटते.
पंतप्रधानांना क्रियाशील बनविण्यासाठी पत्रे पाठविण्याची माझी सूचना होती तशी आणखी कुठली आहे कां? असल्यास जरूर विचार व्हावा. पण आधी कोण-चीन कीं इतर कुणी-याला अर्थ तेंव्हांच प्राप्त होतो जेंव्हां सरकार कांहीं कृती करेल व मग priorityची चर्चा करावी लागेल. इथे तर कांहींही केलेचे जात नाहींय्. ते औदासिन्य आधी कमी करावे असे मला वाटते!
जे जम्मू-काश्मीरला लागू आहे ते चीन, नागालँड, आसाम, मणीपूर, दक्षिणी राज्ये यांनाही लागू आहे. ही राज्ये आणि रेड कॉरीडॉरमुळे धोक्यात आलेली राज्ये या सर्वच बाबतीत कांहींही न करता गप्प बसणे आणि समस्या आपोआप सुटेल अशी आशा करणे धोकादायक आहे.
खरे आहे. सरकार झोपा काढत आहे काय? सरकारने कृतीशील झालेच पाहिजे. तसेच, केलेल्या प्रत्येक कृतीबरोबर, 'अमूकअमूक कृती केली' असे सांगणारे साधे दोन ओळींचे पोस्टकार्ड मला व्यक्तिशः पाठवण्याचे किमान सौजन्य सरकार दाखवेल काय?
ही समस्या दिवसेंदिवस अतिशय गंभीर होत चाललेली आहे. आणि काहीही कृती न करता आपोआप सुटणार नाही, हे खरेच! तेव्हा काहीतरी कृती ही केलीच पाहिजे! (काहीतरीच कृती केली, तरी चालू शकेल. पण कृती केली पाहिजे.) एक उपाय आहे. आजकाल भारत ही एक अणुसत्ता आहे. नुसती इतकी अण्वस्त्रे बाळगून त्यांचा काही वापर करता येत नसेल, तर फायदा काय? द्या टाकून चारदोन बाँब असल्या प्रदेशांवर. ना रहेगा बाँस, ना बजेगी बाँसुरी... आहे काय, नि नाही काय? (आपले लष्करी अधिकारी काय करताहेत?)
(तसेही, दुसरा कुठलातरी देश उलटा लावतो म्हणून आपल्याच झेंड्याचे डिज्जायन बदललेले जर चालते, तर मग दुसर्या कुठल्यातरी देशाच्या फूसलावणीने दहशतवाद सुरू झाला, म्हणून आपल्याच देशाच्या चारदोन राज्यांवर चारदोन अॅटमबाँब टाकायला काय हरकत आहे? ग्रेट आयडिया! चला दिवाळी साजरी करू या - मज्जा! औदासीन्य कुठल्याकुठे पळून जाईल.)
पंतप्रधानांना क्रियाशील बनविण्यासाठी पत्रे पाठविण्याची माझी सूचना होती तशी आणखी कुठली आहे कां?
खरे आहे. पंतप्रधानांना एवढी साधी गोष्ट सांगितल्याशिवाय कळू नये, याचे आश्चर्य वाटते. आपल्या हाताखालचे अधिकारी काय करत आहेत (किंवा काहीही न करता झोपा काढताहेत) याची पंतप्रधानांना कल्पना नाही काय? नसल्यास दहा रुपये भरून माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा वापर करून त्यांनी ती जरूर करून घ्यावी, आणि मग मला पोस्टकार्ड पाठवावे. (माहितीच्या अधिकाराच्या कायद्याचा नाहीतर उपयोग काय मग? नुसता शोभेचा कायदा आहे काय?)
त्यांनी जर आज कृती केली नाहीं तर जम्मू-काश्मीरपासून सुरुवात होऊन सारी राज्ये एक-एक करून फुटतील व भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल!
हे तुमचे वाक्य होते. वरील मिपाकरांच्या प्रतिक्रीयांतून काश्मिरपासून सुरवात होऊन सारी राज्ये फुटतील हे कसे ते कळले नाहि. म्हणजे जर काश्मिर वाचवले तर इतर राज्ये आपोआप वाचतील का?
याशिवाय युरोप खंड एकत्र होता व नंतर फुटला असे तुम्हाला म्हणायचे आहे का?
तुम्ही वाचनावरून हा तर्क केल्याचे म्हणता... नक्की काय वाचून ह्या निष्कर्षाप्रत आलात ते दुवे/संदर्भ दिलेत तर मला माझे मत बनवायला मदत होईल.
आणि आता महत्त्वाचा प्रश्न ज्याचे उत्तर मात्र अपेक्षित आहे "तुम्हाला सरकारकडून कोणती कृती अपेक्षित आहे?"
तुम्हाला सरकारकडून कोणती कृती अपेक्षित आहे?
मी पंतप्रधान व राष्ट्रपतींना पाठविलेल्या विनंतीपत्रात "राष्ट्रपती राजवट घोषित करून या बंडाचा नायनाट करायची आणि मग पुन्हा निवडणुका घ्यायची" सूचना केली आहे. इथे मिपा वाचकांचे मत जाणून घ्यायचे होते म्हणून माझे मत लिहिले नव्हते.
भारत म्हणजे एक युरोप खंड बनेल!
जर राज्ये स्वतंत्र होऊ दिली तर असे होईल असे माझे मत आहे. एवढेच नव्हे तर आपापसात युद्धेही होतील व १९१४ त३ १९४५च्या दरम्यान युरोपात जशी महायुद्धे झाली तशी इथेही होतील अशी मला काळजी वाटते.
नक्की काय वाचून ह्या निष्कर्षाप्रत आलात ते दुवे/संदर्भ दिलेतToo numerous to quote! उत्तर द्यायचे टाळतोय असे समजू नका, खरंच इतक्या ठिकाणी असे वाचले आहे की मोजणे शक्य नाहीं. पण लिंकही जपून ठेवल्या नाहींत.
मुख्य म्हणजे फक्त माझ्या मतांमधील कसर काढता-काढता (त्याला हरकत नाहीं), तुमच्या कांहीं सूचना असतील तर जरूर लिहा!
काळे
राष्ट्रपती राजवट आणू नये त्यामुळे हुर्रीयत सारख्या नेत्यांच्या दाव्यांना पाठबळ मिळते (भारताला काश्मिरवर राज्य करायचे आहे, स्वायत्तता द्यायची नाहि वगैरे वगैरे) आणि तरूणांची माथी भडकणे सोपे जाते.
शिवाय काश्मिरातील राष्ट्रपती राजवटींचा इतिहास असा आहे की जनमतापूढे मग मवाळ / भारतधार्जिण्यापक्षांनाही मग त्याविरुद्ध आवज उठवावा लागतो व अचानक सगळे एका बाजूला भारत सरकारविरूद्ध होतात व अराजक प्रचंड वाढते (आणि तेच तर पाकिस्तानला हवे आहे)
सरकारला विनंती आहे की राष्ट्रपती राजवट न आणता, राज्य सरकारच्या मदतीने व राज्य सरकारला विश्वासात घेउन साम-दाम-दंड (भेद नाही) निती वापरून आता अशांतता थांबवाच पण ती थांबल्यावर जितं मया चा गदारोळ न करता तिथल्या प्रशनांना कायमस्वरूपी सोडवण्यासाठी दूरदृष्टीने प्रामाणिक प्रयत्न करा.
झकास!
मी राष्ट्रपती राजवट तात्पुरती आणण्याचीच सूचना केली होती, पण नको तर नको.
पण तुम्ही जे इथे लिहिले आहे ते मी दिलेल्या पत्त्यांवर PMO आणि 'राष्ट्रपतीभवन'ला पाठवा.
एरवी 'मिसळपाव' कोण वाचणार आहे?
काळे
'मोठे' म्हणजे नेमके काय?
आणि 'मोठे व्हा' हे नेमके कोणी कोणाला सांगायचे? आणि कशाबद्दल?
ज्याला सांगायचे, तो मुळात लहान आहे की नाही, याची पडताळणी होते किंवा कसे?
ज्याला सांगायचे, तो लहान आहे / चिल्लर आहे / अनुभवी नाही, या गृहीतकाला आधार काय?
आपणच आधी एकदा विचारल्याप्रमाणे, ही मुस्कटदाबीची ट्रिक असावी काय? (पण असल्यास, सॉफिस्टिकेटेड असली तरी नवी नसावी, जुनीच असावी.)
एरवी 'मिसळपाव' कोण वाचणार आहे?
प्रतिभाताईंच्या नवीन आयडीला लवकरात लवकर मंजुरी द्यावी, अशी मी मिपा व्यवस्थापनास विनंती करतो. म्हणजे त्यांना पण इथे ब्लोग करता येईल.
>>माझा लेख आपल्या सरकारला कारवाई करण्यास उद्युक्त करण्यासाठी आणि न केल्यास काय होईल याचा विचार करण्यासाठी लिहिला होता.
चिदंबरम आणि अॅण्टनी मिसळपाववर काळे काकांचे लेख वाचून अधिकार्यांना आदेश देत आहेत असे चित्र डोळ्यापुढे उभे राहिले. (ह. घ्या)
असो. जे लिहिले आहे ते सिरिअस आहे आणि सरकारी मंडळींना याची कल्पना असेल असे समजतो.
काळे काका,
आपल्याकरता काश्मिर समस्या एक chronic disease आहे. आपल्या राज्यव्यवस्थेत यावर उपचार आहेत, नाहि असे नाहि. पण संपूर्ण व्यवस्थाच जिथे घसरंडिला लागल्याचि चिंन्ह आहेत तिथे या समस्येवर त्यातुन उपाय निघणे अवघड आहे. तेंव्हा हि समस्या व्यवस्थेतुन न सुटता कोणा व्यक्तीकडुन सुटलि तर सुटेल. नाहि तर हि जखम अशिच भळभळत राहिल.
(अल्पबुद्धि, लघुदृष्टीचा) अर्धवटराव.
तरीही, हा धागा काढल्यासाठी सुधीरजींचे अभिनंदन.
आता पर्यंत आलेल्या एकाही प्रतिसादात सुधीरजींच्या आवाहनाला साद नाही. फक्त उलटसुलट चर्चाच झाली. (>>>>>या अर्थाची पत्रे मी पंतप्रधानांना इंग्रजीत व प्रतिभाताईंना मराठीत पाठविली आहेत. आपणही पाठवा!)
मी असे पत्र पाठवले आहे.
सुधीरजी, त्या टाईम्स मधील बातमीतील प्रतिक्रियांवर ही तुमची प्रतिक्रिया आहे कां?- K B Kale (Jakarta, Indonesia)
01 Aug, 2010 05:55 PMDear fellow-readers,)
फक्त Dear fellow-readers? (कदाचित कोण्या विशीष्ट जमातीच्या विरुद्ध लिहीले होते म्हणून संपादित केले असेल कां?)
त्या लेखात तसे कांहीं नव्हते त्यामुळे कां अर्धवट प्रसिद्ध झाला माहीत नाहीं. (माझे आणि टाइम्सचे ग्रह जरा वक्रीच आहेत.)
ज्यांना त्याबद्दल वाचण्यात रस आहे ते या दुव्यावर वाचू शकतात!
http://www.2point6billion.com/news/2010/05/28/chatham-house-pakistan-option-unpopular-with-kashmiris-5787.html
आपली तळमळ वाखाणण्याजोगी आहे!
संरक्षण, परराष्ट्र व्यवहार आणि दळणवळण वगळता, काश्मिरमध्ये अन्य बाबतीत दखल घेण्याचे अधिकार पंतप्रधान अथवा राष्ट्रपतींना नाहीत, हे आपणास ठाऊक नाही का? का उगाच पत्रे पाठवून वेळेचा आणि पैशाचा अपव्यय करायचा?
किंबहुना, सध्या भारताच्या ताब्यात असलेले काश्मिर हे नेहेरूंच्या (अधिक माँटबॅटन आणि सर सिरिल रॅडक्लिफ) यांच्या अक्कलहुशारीने मिळालेले आहे. अन्यथा पाकिस्तानचा काश्मिरवरील दावा अधिक सबळ होता.
किंबहुना, सध्या भारताच्या ताब्यात असलेले काश्मीर हे नेहेरूंच्या (अधिक माँटबॅटन आणि सर सिरिल रॅडक्लिफ) यांच्या अक्कलहुशारीने मिळालेले आहे. अन्यथा पाकिस्तानचा काश्मिरवरील दावा अधिक सबळ होता.
धर्मावर आधारीत लोकसंख्येनुसार फाळणी करून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काश्मीरचा राजा हरीसिंग यास आपले राज्य स्वतंत्र ठेवायचे होते. पण पाकिस्तानने अनेक घुसखोर पाठवून अनन्वित अत्याचार आणि लूटालूट सुरु केली. त्यामुळे राजा हरिसिंगाने भारतात विलीन व्हायचे ठरवले आणि तसा करार केला. यामुळे काश्मीर भारताचे.
आपले सैन्य पाकिस्तानी घुसखोरांच्या तावडीतून पूर्णपणे सोडवायच्या आधीच नेहरूंनी प्रश्न यूनोमधे नेला आणि युद्धबंदी आणली. त्यामुळे बाकीचा भाग पाकिस्तानच्या ताब्यात राहिला, त्याचा एक तुकडा (बहुदा अक्साई चीन) त्यांनी चीनला दिला.
(१) नाही. अक्साई चीन पूर्वेचा प्रदेश आहे (जिथे गवताचे एक पातेही उगवत नाहीं या नेहरूच्या वाक्याने कुप्रसिद्ध)
http://www.flickr.com/photos/amapple/4201799047/
(२) खालील नकाशात पूर्वेकडे अक्साई चीन दिसत आहे. चीनला 'दान' दिलेला भाग हॅच (hatch) केलेला आहे.
(३) खालील नकाशात चीन-पाकिस्तान राजमार्ग दिसत आहे.
प्रतिक्रिया
काळे काका...काश्मिर तर हातचे
ह्या धाग्याला कायमच वर
+१११११११११११११११११११११११
+२
हय्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्य्
काश्मीर प्रश्नावर अतिसखोल चर्चा चिंतामणी ह्याना दाखवण्यासाठी
माझादेखील काडी आपलं हातभार.
सध्या किती इंच मागे अथवा पुढे
दुसरा नंबर
वेताळा
मदनबाण, मी एक पैलू पुढे
पण पाकिस्तानला आवरले तर
अरे बाप रे कसे होणार आपले?
पाकिस्तानपेक्षा चीनकडुन धोका जास्त... !!
ह्म्म्म
+१
हम्म
मुद्दा समजला नाही
उत्तर
उत्तराचा प्रयत्न
प्रतिसाद आवडला. प्रदिप
काश्मिर, नागालँड, मणिपूर, आसाम
ते औदासिन्य आधी कमी करावे असे मला वाटते
+१,००,००० (अर्थात, लाख मोलाची बात!)
कोणती कृती?
राष्ट्रपती राजवट घोषित करून या बंडाचा नायनाट करावा
माझी विनंती
झकास!
समाज?
>>'समाज' नावाची एक
मोठे
>>आपणच आधी एकदा
जबरदस्त!
एरवी
छान आहे कल्पना!
प्रतिभाताईंना देऊन काहीच उपेग
चुकून डुप्लिकेट झाल्यामुळे हा प्रतिसाद मीच काढून टाकला आहे.
सुधिर राव आपल्या लेखाने फार
>>माझा लेख आपल्या सरकारला
इंचा इंचाने आपण जम्मू काश्मिरमध्ये माघार घेत आहोत.
होय आणि नाहि !
वाईट वाटले.
कां अर्धवट प्रसिद्ध झाला माहीत नाहीं
अपव्यय
मी म्हणतो ते ’संरक्षणा’त येते कीं!
अर्धे काश्मीर नेहरूंच्या
किंबहुना.......
ऑं?
सुनील
जिथे गवताचे एक पातेही उगवत नाहीं या नेहरूच्या वाक्याने कुप्रसिद्