Skip to main content

मिपामिपा खेळणार

लेखक सहज यांनी गुरुवार, 17/06/2010 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
खुलासा, डिस्क्लेमर, आवाहन, माफी - संपादकांना वाटल्यास धागा उडवू शकतात, मी उडाल्याची तक्रार अथवा निषेध करणार नाही. धागा निखळ करमणुकीसाठी आहे कृपया हलके घ्या. प्रतिसादातुन कवितेत बिन्धास्त भर घाला ही मिपाकरांची कविता आहे. आणि हो, दोघा मित्रांची आगाउ माफी मागतो. ;-) म्यानेजर ब्रेक घेणार | आम्ही मिपामिपा खेळणार|| कोरम फुल्ल जमणार| मज्जा येणार निश्चित|| गल्लीत आमचा नार्‍या जाणार | मोशणी त्याला हात करणार|| सिद्धहस्त लेखक बनणार | अर्धा साबण संपणार निश्चीत|| हॅकिंग पॅपीलॉन शिकवणार | क्रिप्टीकगुर्जींचा आधार|| सग'ळे शिकवणी लावणार | संगणक क्रॅश निश्चीत|| दिवसामागुन दिवस जाणार| ऋतुचक्र नियमीत बदलणार|| काका आवाहन करणार | जालीय अंक निश्चित|| शिशुवर्ग धागे काढणार | निष्कारण चर्चा पसरणार|| परत ते काढून घेणार| फेड अप होणार निश्चित|| रात्रभर पेंगत बसणार| झोपेचे खोबरे होणार| पहाटे गुगल करणार | फिफापान अप्डेट निश्चित|| क्रिप्टीकचे गुगली पडणार | पब्लीक झाडावर चढणार|| प्रभुचा उद्धार होणार| फांदी तुटणार निश्चित|| तू तू मैं मैं जोरदार | मस्करीची कुस्करी होणार| संपादक कार्यान्वित होणार | धागा उडणार निश्चित||
काव्यरस

वाचने 10093
प्रतिक्रिया 49

प्रतिक्रिया

साला आमचा सहजशेठ पण एकदम छुपा रुस्तम आहे. भल्या भल्यांच्या दांड्या उडवतो.

In reply to by गणपा

हेच म्हणतो. सहजराव : मिपाभारताचे संजय, नारद , इत्यादि इत्यादि. ;-)

In reply to by मुक्तसुनीत

>> मिपाभारताचे संजय, नारद , इत्यादि इत्यादि किंवा गरीबांचे संजय, नारद इ. ;)

In reply to by नंदन

छुप्या रुस्तुमाची रदिफावर छबी

In reply to by धनंजय

बाडिसच! :-) -Nile

जबरी. सहजराव लै फार्मात हाईत हल्ली. :)

छान.. :)

मस्त मस्त मस्त.. आवडली.. खादाडमाऊ

In reply to by टारझन

बिल्कुल सही फ़रमाया आप ने! ;) =)) - पंडित गागाभट्ट.

=)) =)) =)) =)) =)) ज ह ब र्‍या !! 'शिशुवर्ग' आणि 'फेडअप' हे शब्द हृदयाला भिडले. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

एक नंबर सहजराव ... लै भारी काव्य प्रतिभा . आता हा घ्या आमचा नजणारा "कधीतरी राडा होणार । धडाधड प्रतिसाद उडणार ॥ गॉसिप खच्चुन होणार । 'व्यनी' येणार निश्चित ॥ ------ (रात्री-अपरात्री गुगलणारा) छोटा डॉन आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता ! उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

In reply to by छोटा डॉन

कधीतरी राडा होणार । धडाधड प्रतिसाद उडणार ॥ गॉसिप खच्चुन होणार । ब्लॉग अपडेट होणार निश्चित ॥ हे कसे वाटते हो फुटबॉलप्रेमी ?? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य

In reply to by परिकथेतील राजकुमार

अगाई गं, असं कसं हो लिहीता तुम्ही ... ब्लास्फेमस कुठले? अ. जोशी!

मिपावर आनीबानी येनार आन जानार पन हा धागा तरनार निश्चित|| प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

छान... बिपिन कार्यकर्ते

धाग्यावर कात्री चालणार | संपादकांची सारवा सारव होणार | मी नाही मी नाही असे म्हणणार | पुन्हा सगळे तसेच चालणार निश्चित || संपादकांची + भक्तगणांची आगाऊ माफी :) आणि धागा उडवु नये (प्रतिसाद तर त्याहुन नाही) अशी कळकळीची विनंती ...असे बोलुन माझे महावाक्य मी संपवतो! पांथस्थ माझी (शिळी) अनुदिनी: रानातला प्रकाश... मी काढलेली छायाचित्रे - फ्लिकर

"कार्यकर्ता पाहणार । सहजा'सहजी कळवणार ॥ इकडे तिकडे पसरणार । 'केसू' बिंग फोडणार निश्चित ॥ बाकी चालू द्या!

सहजकाका.. लै भारी!!!! सहजकाका फॉर्मात येणार । मिपावर विडंबन लिहिणार॥ स्वतः झाडावर जाऊन बसणार। मजा बघणार निश्चित॥ मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

हा हा हा! जबरा ! स्मिता

:) हॅहॅहॅ. मस्त _____________________________ श्याम, आजची पीढी अशी आहे का रे?हे असे चित्र का रंगवायचे? आणि असेल तर बदलायला नको का रे श्याम?

काय लेख आहे!! चांगला आहे का???

पाषाण भेद चमचमित मागणार | जागु त्याला फदफद देणार| सोम्या गोम्या डेटला जाणार | ओकांची नाडी निश्चित || *************************************************** दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

छान ! --अवलिया

In reply to by अवलिया

माझ्या अनिरुद्धाच्या महावाक्याचं निर्मळ विडंबन पाहून डोळे पाणावले! ;) इतर 'काही' आगाऊ आणि उद्धट मिपाकरांप्रमाणे माझ्या अनिरुद्ध-बापूंबद्दल कटू शब्द न वापरल्याबद्दल आभार! :) युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार | मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित || || इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

अरे या सहजला संपादक करुन टाका रे.. हल्ली फार लेखन प्रतिसाद येत आहेत संपादक झाला म्हणजे कसा मुकाट बसेल कोप-यात --अवलिया

मस्त सुरुवात झाली सकाळची ... मिभोकाका लेख लिहीणार| केसुरंगा थयथयाट करणार| अर्वाच्यपणा केल्यानंतर| गुडूप होणार हे निश्चित|

सहजराव फॉर्मात! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

उसहजशेठ, त्तम चालू आहे ..चालु दे.. (निप्चित)केशवसुमार

In reply to by केशवसुमार

केसुचा प्रतिसाद "न्हाव्याच्यादु कानात ऊ तमगॉसिपचाल्ते" च्या चालीवर आहे ;-)

In reply to by मुक्तसुनीत

सहजशेठ चालू आहे असे म्हणायचे होते केसुगुर्जींना. त्यांनी ते म्हणले. मॅटर खतम! :-)

मस्त लगे रहो....! :) -दिलीप बिरुटे

हॅहॅहॅ...चालू द्या सहजराव.... लेखणीला धार अशीच राहूदे म्हटलं...

सहज उद्धार केलाय हो सह्स्राव.

च्यामारी हसुन हसुन पोट दुखले...... - (हसुन हसुन पोट दुखलेला) पिंगू

आमचा हि एक प्रयत्न... रिकाम्या वेळी धागे काढणार l दणादण सगळेच उडणार ll सहज कोणीतरी खव वाचणार l विडंबन होणार निश्चित ll बाकि विडंबन मस्तच... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

लय भारी. गणपा, मुक्तसुनीत आणि खरं तर इतर बहुतेक सगळ्यांशीच सहमत.

मस्त कविता उडायची भिती का बाळगता. आक्षेपार्ह काहीच नाही त्यात! The universal symbol for diabetes मधुमेहा विरुद्ध लढा माझी जालवही

झकास कविता , लगे रहो सहजभाई ! - नीलकांत

मस्त! आवडले!! :) राघव

काका मंडली फार्मात हायती!.. मस्त लिवलंय चालु द्या! ऋषिकेश ------------------ इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

मस्त... स्वाती