मजेमजेशीर हँगओव्हर निवारण उपाय!
मिपा वर पार्टी रे पार्टी पाहिल्यावर माझ्या मनात विचार सुरु झाले..... बिच्चारे पार्टीजीव!!! :S
आधी पार्टी पार्टी करत ढोस ढोस ढोसतील आणि दुसर्या दिवशी डोकं धरून बसतील. मग दुखर्या डोक्यानं घरात बायको, पोरं, हापिसात हाताखालचे लोक आणि सहकारी ह्या सर्वांवर चिडचिडाट करतील.... सर्वांचाच दिवस खराब होऊन जाईल!!! :
हँगओव्हर हा प्रकार टाळता येऊ शकतो असा सल्ला/ मत अनेक आहारतज्ञ व डॉक्टर्स प्रदर्शित करतात. त्याचे गमक तुम्ही मद्यपानाच्या अगोदर खाणे, मद्यपानादरम्यान पाणी पीत राहणे व मद्यपानानंतर काही ठराविक पथ्ये पाळणे [उदा. झोपण्याअगोदर डोकेदुखीवरच्या गोळ्या घेणे, पाणी पिणे, मल्टि व्हिटॅमिन गोळ्या घेणे, उठल्यावर ताज्या फळांचे रस पिणे इ.इ.] यात आहे. B)
पण वेगवेगळ्या देशांमध्ये, प्रांतांमध्ये ''पियक्कड'' किंवा दारूबाज असणारे लोक ह्या हँगओव्हरचा सामना व निराकरण आपापल्या पध्दतीने, घरगुती पातळीवर करताना दिसतात. :P
अशाच काही मजेमजेशीर हँगओव्हर निराकरण उपायांची ही जंत्री :
१. लोणच्याचा खार :
पोलंडमध्ये हँगओव्हरवर उपाय म्हणून लोणच्याच्या खारात मध घालून तो पितात. मधातील फ्रुक्टोज व ग्लुकोज आणि लोणच्याच्या खारातील मीठ ह्यांच्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाईटस पुन्हा संतुलित होण्यासाठी मदत होते म्हणे!
२. पेडियलाईट :
लहान मुलांना जुलाब - वांत्या होऊ लागले की जे पेडियलाईट देण्यात येते तेच मोठ्या माणसांना हँगओव्हरचा सामना करण्यासही उपयुक्त ठरते. त्यामुळे पाश्चात्य देशांत लोकप्रिय असणारा हा उपाय!
३. केळे :
मद्यपानामुळे शरीरातील पोटॅशियमची पातळी घटते, ती पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी केळे खाल्ल्यास फायदा होतो. केळ्यात पोटॅशियम असल्याने ते शरीरात निर्माण झालेली त्रुटी भरून काढते.
४. अंडी :
अंड्यांमध्ये अॅसिटाल्डिहाईड हे शरीरात हँगओव्हर निर्माण करणारे एक विषद्रव्य मोडून काढणारे सिस्टाईन नामक द्रव्य असते.
५. लिंबू :
प्युअर्टो रिको प्रदेशातील लोक अगदी शपथेवर सांगतील की काखा-बगलांमध्ये लिंबाचा ताजा रस चोळल्याने हँगओव्हर शिवत नाही म्हणून! त्यामागे तर्क असा आहे की लिंबाच्या रसामुळे घाम कमी येतो व शरीरातील द्रावांचे संरक्षण होते.
६. आल्याचा रस/ आल्याचा चहा :
आले हे पाचक आहे. त्याचा रस पाण्यात मिसळून घेतल्यास किंवा आल्याचा चहा प्यायल्यास हँगओव्हर कमी होण्यास मदत मिळते असे जाणकारांचे मत आहे.
७. तेलकट, पचायला जड, भरपूर कार्बोहायड्रेट्स असलेला नाश्ता :
जर आदल्या रात्रीच्या कर्माची फळे तुम्हाला दुसर्या दिवशी सकाळी भोगणे जड जात असेल तर भरपूर तेल, तूप असलेला भरपेट नाश्ता करा. त्यामागील तर्क असा की तुमच्या जठराच्या अंतर्भागाला त्या तेल, तूपाचे आवरण घालेल आणि जरा पोटशूळही कमी करेल.
८. ज्यांना हे उपाय नको वाटतील त्यांना रशियन/ फिन्निश उपाय खुले आहेत :
रशियात हँगओव्हरचा इलाज म्हणजे बाष्पस्नान किंवा सौना बाथ. वाफेने आपल्या शरीरातील विषद्रव्यांचा निचरा होण्यास मदत होते! ह्या प्रक्रियेत थोडा वेळ गरम वाफेत तर थोडा वेळ थंडगार पाण्याखाली/ बर्फाळ हवेत आलटून पालटून स्नान केले जाते. आणि तरीही तुमचा हँगओव्हर जात नसेल तर मग बर्च वृक्षाच्या फांदीने स्वतःला जरा फटके द्यायचे असतात!! त्याने का होईना, हँगओव्हर लवकर पळतो म्हणे!!
९. कोबीचा/ सोअरक्रॅट रस :
नुसता कोबीचा रस किंवा त्याला टोमॅटोच्या रसात मिसळून पिणे हीदेखील एक क्लृप्ती आहे हँगओव्हरमधून बाहेर यायची!
१०. कुत्र्याचा केस ;-) :
जे मद्य तुम्ही प्यायलेत त्याच्यामुळे हे सारे हँगओव्हर प्रकरण झाले.... मग काट्याचा काटा काट्यानेच काढायचा.... त्यासाठी अत्यल्प प्रमाणातप्रमाणात, टोमॅटो रस, टोबॅस्को सॉस, लोणच्याचा खार, क्रीम असे विविध पदार्थ एकत्रित करून हे शिक्षादायी पेय एका घोटात संपविण्याचा प्रयत्न करणे!
११. व्हीट ब्रेड टोस्टवर व्हेजेमाईट :
व्हेजेमाईट हे यीस्टचा अर्क समजा. व्हीट ब्रेडचा टोस्ट करून त्याला थोडे व्हेजेमाईट लावून खाल्ल्यास शरीरातील मीठ व ब जीवनसत्त्वाची पातळी वाढते व तुम्हाला पूर्ववत यायला मदत करते.
१२. काकडीचा रस :
रशियातला अजून एक आवडता उपाय!
१३.वाळूत पुरून घेणे :
आयरिश लोक ओलसर वाळूत स्वतःला पुरून घेतात आणि त्यामुळे म्हणे त्यांना हँगओव्हरमधून मुक्ती मिळते!!
तसे इतरही बरेच रोचक उपाय आहेत.... पण ते ज्यांना ट्यूना फिश, प्राण्यांची यकृते - आतडी, डोळे तळून खाणे वगैरे पसंत आहे त्यांच्यासाठी!
तेव्हा पुढील खेपेस पार्टी कराल त्यावेळी अगोदरच दुसर्या दिवसाचे हे नियोजन करून ठेवा. अल्कोहोल सेवन केल्यावर वाहन चालवू नका. स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालू नका! धन्यवाद!! :)
-- अरुंधती

वर्गीकरण
प्रतिक्रिया
जबरदस्त
पील्यावर
उपयुक्त
मस्त
उपयुक्त!
हेच म्हणतो
एक्क्झॅक्ट्ली
हो पण दारू
अवं आसं
पन
हाहाहा.. एक
हा हा हा......
अरुंधती
छान...
अंधश्रध्द
हाहा
हा हा हा....
एकतर आम्ही
इनोबा, हा
:)
ब्राझील पद्धत!
मेक्सिकोत
काय सांगता
हो, आणि हा
कोपि कुवाक
प्रतिबंधक उपाय
आपल्याला
हँगओव्हरच
हँगओव्हर
धन्य!!
त्यो उपाय
सर्वात सोप्पा उपाय....
दारू
विशाल
दुस~या
>> अल्कोहोल
शुचि, म्हणू
गप्पांवरही
"सोशल
मला वाटतं थोडा मॅच्युअर ,
व्वा...!
भटजीचे,
उपयुक्त
प्रश्ण जरा बेशिक आहे