असेच म्हणतो.
पहावा लागेल एकदा तरी हे नक्कीच.
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
भयानक वास्तववादी चित्रपट! बघितल्यावर एकदम सुन्न होऊन गेलो होतो
.
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
श्री राजकुमार, मराठीतील चित्रपटांचे परीक्षण मराठी संकेतस्थळांवर दुर्मीळ झाले होते. ती उणीव तुमच्या नेटक्या परीक्षणाने भरून निघाली. टॉरंट फाइल डाउनलोड (चोरीच ती) न करून थेटरात जाऊन चित्रपट पाहणे मसंवरचे चित्रपटपरीक्षक विसरले आहेत असेच वाटत होते. पण तो समजही तुमच्या परीक्षणाने दूर झाला.
नुकताच पाहिला, बराचसा चांगला आहे. जाणवलेली मुख्य त्रुटी म्हणजे खूप काही/सगळेच सांगायचे असल्याने जे काही सांगायचे आहे त्याला पूर्ण न्याय देता आलेला नाही. कथेचा शेवट, कॄषीमंत्र्यांचे अपहरण वगैरे थोडे अतिरंजक. जमेची बाजू म्हणजे सिनेमाटोग्राफी, ताकदवान अभिनय - विशेषतः माधवी जुवेकर (माली). ही अत्यंत गुणी अभिनेत्री आहे. मकरंदचे (राजाराम पवार) काम वेगळे आणि नेहमीचे अंगविक्षेप आणि हेल टाळून केलेले (कदाचित भूमिकेची तशीच मागणी असल्याने). नागेश भोसले (नंदू)ही अतिशय गुणी अभिनेता;पण या चित्रपटात त्याच्यातल्या दिग्दर्शकाने त्याच्यातल्या अभिनेत्यावर बर्यापैकी अन्याय केला आहे, असे वाटले.सयाजी शिंदेचे काम फार सामान्य;किंबहुना ही व्यक्तिरेखा त्याच्यातल्या अभिनेत्यासाठी साजेशी नाही, असे वाटले.
एकंदर शेतकर्यांच्या समस्यांना तोंड फोडण्यात चित्रपट बर्यापैकी यशस्वी ठरलाय असे मात्र नक्कीच सांगता येईल.
(प्रेक्षक)बेसनलाडू
परा, मस्त परिक्षण रे...!
'गोष्ट छोटी डोंगरा एवढी' माझ्या दृष्टीने मध्यंतरालाच संपतो.
चित्रपटातील मंत्र्याचा प्रसंग आणि मूळ समस्यावरील उपचार... कै च्या कैच. मात्र चित्रपट सर्वांनी पाहावा असा आहेच.
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
ह्म्म
ह्म्म
असेच
होय,
सुंदर
भयानक वास्तववादी
+१
+२
परा छान
परीक्षण सुंदर
अप्रतिम
पाहतोच
छान परीक्षण
बघितला .. त्रुटी
गाभ्रिचा पाउस </strong> हेच सांगुन गेला.
मस्त चित्रपट