Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अजुन कच्चाच आहे on Tue, 10/20/2009 - 22:34
  • Log in or register to post comments
  • 5978 views
  • हमारा बीज अभियान २

Book traversal links for हमारा बिज अभियान

  • हमारा बीज अभियान २ ›

प्रतिक्रिया

Submitted by श्रावण मोडक on Tue, 10/20/2009 - 23:06

Permalink

चांगला लेख

लेख चांगला. जीएम वांग्यांना परवानगी मिळाल्याच्या बातम्या आहेत. त्याचे काय परिणाम होतील?
  • Log in or register to post comments

Submitted by अजुन कच्चाच आहे on Tue, 10/20/2009 - 23:06

In reply to चांगला लेख by श्रावण मोडक

Permalink

चुक लक्षात

चुक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यू. हे जिएम पिकांबद्दलच लिहीलय. वांगी ही सुरवात आहे. याचाही सगळ्यात जास्त फायदा सिड कं आणि तणनाशक कं ला होणार आहे. तोटा होईल तो आपल्या पुढील पिढ्यांना. ................. अजून कच्चाच आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Tue, 10/20/2009 - 23:11

Permalink

उत्तम

उत्तम माहिती... अजुन यावर जरुर लिहावे ही विनंती... जगभरात आधीच अनेक ठिकाणी या प्रकारच्या पिकांना विरोध होत आहे. फ्रान्स, जर्मनी, हंगेरी, इ. देशात जनुकबदल पिकांना पुर्णपणे बंदी घातलेली आहे. गोरे शहाणे आहेत आणि आपण ? --- मध्यंतरी एका बातमीत इंजेक्शन देऊन मोठे केलेले दुधी भोपळे पाहिले होते... कॅन्सर होणार नाहीतर काय !!! मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 10/20/2009 - 23:12

Permalink

जेनेटिकली मॉडिफाईड

वाण हे संपूर्णपणे स्वामित्व निर्मितीसाठीच निर्माण झालेले आहे ह्यात शंकाच नाही! प्रत्येक गोष्टीत व्यापारीकरण बघणार्‍या कंपन्यांच्या सुपीक डोक्यातले हे पिल्लू भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला फारच घातक ठरणार ह्यात शंका नाही. आपण सर्वांनी ह्या जे.मॉ. धान्य प्रकाराचा कडाडून निषेध करायला हवा ह्यात शंका नाही! मोन्सांटो ह्या बलाढ्य कंपनीचे मुख्यालय असलेल्या खुद्द अमेरिकेतच 'ऑर्गॅनिक कंझ्यूमर्स असोसिएशन' ने 'मिलिअन्स अगेन्स्ट मोन्सांटो' नावाने एक ई-पत्रक काढून थेट मोन्सांटोच्या अध्यक्षांनाच फॅक्स करण्याचे सुरु केले आहे. हा दुवा पहा. चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by चतुरंग on Tue, 10/20/2009 - 23:38

Permalink

विकिपीडियावर ह्या कंपनीबद्दल

बरीच माहिती उपलब्ध आहे. प्रदूषणाचे अनेक खटले ह्या कंपनीविरुद्ध अमेरिकेतच सेटल केले गेलेत. कंपनीचा एक डायरेक्टर काय म्हणतो हे पहा - Phil Angell, Monsanto's director of corporate communications (referring to the U.S. Food and Drug Administration) explained the company's regulatory philosophy to Michael Pollan in 1998: “ Monsanto should not have to vouchsafe the safety of biotech food. Our interest is in selling as much of it as possible. Assuring its safety is FDA's job.[22] ह्यातल्या अधोरेखित वाक्यावरुन कंपनीच्या एकूण 'लोकहितवादी' विचारसरणीची कल्पना यावी! चतुरंग
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Wed, 10/21/2009 - 02:02

Permalink

निसर्गापासून दूर

जायचं म्हटलं की विपरीत परिणाम ठरलेले ! कुठे कुठे म्हणून पैसा कमवायला बघणार हे लोक !
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 10/21/2009 - 08:56

Permalink

गंभीर

विषय गंभीर आहे खरा. यावर वेळोवेळी आम्हाला माहीती देत रहा. नगदी बाजारपेठेत(जंकफूडने ओसंडून वहाणारे मॉल्स) उपलब्ध अन्नधान्याचे प्रमाण (गरजेपेक्षा जास्त की कसे) तसेच नासाडी खूप कमी केली तर नैसर्गीक शेतीने (संकरीत बियाणे, रासायनीक खत न वापरता)उत्पन्न होणारे अन्न जगाला पुरेसे असेल काय? यावर काही संशोधन झाले आहे काय? नाहीतर गरीब देशांना अन्न नसेल या भितीपोटी(बागुलबुवा) रासायनीक शेतीला पर्याय नसेल असेच समजले जाईल. व आहे ते दुष्टचक्र/परिणाम सुरुच राहील. शिवाय आजकाल इंधनासाठी मोठी सुपीक जमीन वापरली जात आहे त्याचाही भार असणारच. नवोदयसारख्या संस्था ज्या भारतातील अनेक राज्यात खेड्यात बियाणे बँक, ऑर्गॅनीक शेती माध्यमातुन नैसर्गीक शेती टिकवून ठेवायचे काम करत आहेत, वाचुन बरे वाटते अर्थात त्याचा प्रभाव किती आहे ते माहीत नाही. वाढावा ही सदिच्छा! भारतातील कृषी विद्यापीठे, शेतकरी संघटना यावर काहीतरी चांगली उपाययोजना करत असाव्यात. हा भाबडा आशावाद नाही ना?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसन्न केसकर on Wed, 10/21/2009 - 13:00

Permalink

सुंदर लेख

लिहिला आहे. बरीच माहिती मिळते तो वाचुन. हरित क्रांती, दुसरी हरित क्रांती याचे अनेक फायदे-तोटे आहेत हे तर निर्विवाद सत्य आहेच. पण गेल्या काही वर्षात मी महाराष्ट्रातल्या विविध भागातल्या शेतकर्‍यांशी जे शिळोप्याचे बोलणे केले त्यातुन असे लक्षात आले की या पद्धतीने उत्पादन वाढले तरी क्रॉप पॅटर्न बदलतोय आणि त्यामुळे काही विशिष्ठ क्रॉप किंवा वाण नामशेष होताहेत. आधी हायब्रीड आणि नंतर जीएम बेण्यांच्या वाढत्या वापराने स्थानिक वाण नष्ट झाल्याची बरीच उदाहरणे आहेत आणि ती बाब चिंताजनक वाटते. त्याशिवाय विशेषतः दुसर्‍या हरित क्रांतीमधील बेण्यांबाबत शेतकर्‍यांकडुन जो मुद्दा समोर आला तो असा की या बेण्यांची `गॅरंटी' मिळत नाही अन त्यात बियाणे पोचे निघण्याचे प्रमाण मोठे असते. यातील खरे-खोटे मला माहिती नाही कारण या विषयातले मला काही कळत नाही. याबाबतही माहिती मिळेल काय?
  • Log in or register to post comments

Submitted by महेश हतोळकर on Wed, 10/21/2009 - 13:43

Permalink

आरती!

Appropriate Rural Technology Institute ही संस्था बियाणांच्या देशी वाणांबद्दल आणि संबंधीत शेती तंत्राबद्दल बरच संशोधन करते. त्यांना दोनदा अंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मागे एकदा मायबोलीवर आनंद कर्वेंची मुलाखत वाचली होती. त्यात त्यांनी वरील सर्व धोक्यांबद्दल खूप काही सांगीतले आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वेदश्री on Wed, 10/21/2009 - 14:07

Permalink

उत्तम लेख

याबाबत मला याआधी काहीच माहिती नसल्याने खूप उपयुक्त माहिती सहज समजेल अशा शब्दात मिळाली. धन्यवाद. आणिक काही माहिती मिळाल्यास तीही देत राहू शकलात तर खूप चांगले होईल. यावेळी गावी गेल्यावर अय्यरमामाला गाठून माझ्या गावाच्या आसपासची माहिती काढावी म्हणते.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंद on Wed, 10/21/2009 - 18:16

Permalink

गुजरात

गुजरात मध्ये बेकायदेशीर BT Cotton बियाणा मुळे कापसाचे प्रचंड उत्पादन होत आहे.अर्थात त्यामुळे महिको मोन्साटा चे नुकसान होत आहे. कंपनी च्या दरा पेक्षा १/८ ते १/४ दराने बियाणे विकले जाते.बहुदा टर्मिनेटर बियाणांचा उपयोग होत नसावा, किंवा आपल्या जुगाड टेक्नॉलॉ़जी पुढे या कंपन्यांनी हात टेकले आहेत.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com