'चित्रलेखा' या जुन्या सिनेमाची गाणी लिहिताना साहिर लुधियानवीने या जगन् मिथ्या वाल्यांना सणसणीत उत्तर दिले होते.
'संसारसे भागे फिरते हो' हे गाणे आठवा! त्यातली प्रत्येक ओळ न् ओळ या भोंदू निराशावादी थिअरीला फटकारणारी आहे.
ये भोगभी एक तपस्या है तुम त्यागके मारे क्या जानो
अपमान रचेताका होगा रचनाको अगर ठु़कराओगे |
किंवा
हम कहते है ये जग अपना है तुम कहते हो झुटा सपना है
हम जनम बिता कर जायेंगे तुम जनम गवां कर जाओगे |
मला वाटते, यापेक्षा दुसरे चांगले उत्तर या मंडळींना कोणी दिले नसेल.
सध्याच्या जमान्यात असे लिहिले तर लगेच संस्कृतीसंरक्षक येतील दंडा घेऊन!
ये भोगभी एक तपस्या है तुम त्यागके मारे क्या जानो
अपमान रचेताका होगा रचनाको अगर ठु़कराओगे |
क्या केहेने!
तात्या.
--
अरे दाद द्या रे. सारा निसर्ग दाद मागून राहिला आहे यार तुमच्याकडे. पावसाळ्यात आकाशात मेघांचा पखवाज आणि बिजलीचा कथ्थक सुरू होतो, मोर नाचू लागतात? कुणासाठी? तुमच्याआमच्यासाठीच ना? मेंडकीरोडवर बेडकं ओरडतात. ओहोहो, काय खर्ज लागतो एकेका बेडकाचा! असं वाटतं कुठी दशग्रंथी ब्राह्मण वेदपठण करून राहिले आहेत बेटे! (इति काकाजी : नाटक - तुझे आहे तुजपाशी)
भोग आणि गूढवादाबद्दल गणित कठिण आहे. या गूढ गणितासाठी ही कडवी लागू पडतील असे वाटते.
श्रावण मोडक यांच्या "गणित" कवितेत दोन-चार शब्द बदलून अर्थ पूर्णपणे वेगळ्या दिशेला नेला आहे. (माफी असावी.)
- - - अनंगाचे अंग - - -
नव्या शेजेमध्ये शिरताना
प्रेमी स्वतःशीच म्हणाला,
"शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध -
रती अनंग की अंग?"
गणित सुटेनासं झालं तेव्हा,
अंधुक फुटलेला एक हुंकार
अंगाकडून अंगाकडे झेपावला...
***
वस्त्र कवच उतरवताना
शय्येवर पाहिले प्रेम्याने
तेव्हा 'अनंगा'तही त्याला
अंग-प्रत्यंगच दिसले...
दिसणं, आणि असणं
या खेळाचे नियम
उमजेपर्यंत तो हरला...
फैलावत शक्त-सबल बाहू
एकदा मिठीत घेतलं तेव्हा
त्याच्याकडंच पाहात
ते अंग म्हणालं,
"अंग हेच तर अनंग!"
- - -
याबाबत एक श्लोक सापडला .. जाणकार लोकांनी अजून माहिती द्यावी !
श्रीराम :
कस्त्वम ?
हनुमान :
देहबुद्ध्या त्वदासोऽहं जीवबुद्ध्या त्वदंशकः।
आत्मबुद्ध्या त्वमेवाहम् इति मे निश्चिता मतिः॥
संदर्भ :
http://kirtimukha.com/surfings/Valmiki/ValmikiRamayanam.htm
तर्कतीर्थांनी एका लेखात लिहिले होते " शंकराचार्यांचे अनुयायी स्वत:च्या सोयीसाठी उपनिषदे, गीता, ब्रह्मसूत्रे यांची ओढाताण करतात.
बोद्धमताचे खंडन करताचा ब-याच ठिकाणी खोडसाळपणे misquoting, उचलेगिरी इत्यादी गोष्टी शंकराचार्यांनी आणि अद्वैतवादांच्या समर्थकांनी केल्याचे अनेक विद्वानांकडून ऐकले होते. त्याची यानिमित्ताने आठवण झाली...
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
चार्वाकाचा श्लोक देखील एका शंकराचार्यानीच बदलला........... यावज्जीवेत सुखं जीवेत नास्ति मृत्युत अगोचर च्या ऐवजी ऋणं पीत्वा घृतं पीबेत नास्ती.....
हाच तो बदल ! बाकी यात त्यांचे चुकले काय, हे मात्र सांगू शकत नाही.... कारण धर्मप्रसार हे देखील एक राजकारणच ! ते सगळेच धर्म खेळत असतात...
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
चार्वाकाचा श्लोक देखील एका शंकराचार्यानीच बदलला........... यावज्जीवेत सुखं जीवेत नास्ति मृत्युत अगोचर च्या ऐवजी ऋणं पीत्वा घृतं पीबेत नास्ती.....
हे प्रथमच ऐकत आहे म्हणून हा प्रश्नः यासाठी कुठला संदर्भ सुचवू शकाल का? (कृपया ह्या प्रश्नातून गैरसमज करून घेऊ नये. अविश्वास म्हणून नाही, तर मला जर इतरत्र हे वापरायचे असेल तर कुठेतरी संदर्भ असलेले लिखाण माहीती असणे आवश्यक आहे, म्हणून...)
हे बर्याच ठिकाणी तुम्हाला मिळू शकेल.... चार्वाक वादावरची पुस्तके वाचलीत तर मूळ श्लोक मिळेल.... शंकराचार्यांचा संदर्भ मी अलीकडेच एका पुस्तकात्/कादंबरीत वाचला... को$हं असे नाव आहे, लेखक माहीत नाही, पण पुस्तक छान आहे....... जगभरच्या सगळ्या धर्मांचा एक ओझरता इतिहास कथेची पार्श्वभूमी म्हणून वापरला आहे.........
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
नाही, लोन्ढेंची विज्ञानकथा आहे.... ही वेगळी आहे.... नावदेखील सोहं की कोहं आता आठवत नाही.... पण त्यात हा संदर्भ अगदी डिटेलमध्ये आहे........
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
A buddha-mind is a pure consciousness.
It is like a mirror: it simply reflects, it does not project. It has no ideas, no content, no thoughts, no desires, no imagination, no memory.
It is present to the everpresent,
it lives in the present.
And when you are totally in the present, the mind disappears, it loses all its boundaries.------ budha
"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या" हे आपल्याला काय कळत नाही. सत्य कशाला म्हणावे आणि मिथ्य कशाला म्हणावे हे काय माझ्यासारख्याला झेपणारं नाही. पण, तुमच्या मित्राला कसंही करुन ज्ञानेश्वरांवर त्यांच्या विचारांवर चर्चा आणायची असते असे वाटते. अर्थात तसे करतात म्हणून आपल्या काय अडचण नाही. फक्त जे सांगायचं आहे ते स्पष्ट सांगितलं पाहिजे. उगाच कशाला शंकाराचार्यांना वेठीस धरायचे, नाही का ? :)
-दिलीप बिरुटे
तात्या, तुमचे मूळ विषयावरील चर्चाकार मित्र [उपक्रमवर]खरड करुन विचारतात की, बिरुटे साहेब "वेठीस धरणे" म्हणजे नक्की काय? मी शंकराचार्यांना वेठीस धरले आहे म्हणजे नेमके काय केले आहे? [ संदर्भ या संस्थळावरील चर्चेचा असल्यामुळे हा खुलासा इथेच]
वेठीस धरणे चा अर्थ आहे 'आपले काम करण्यासाठी एखाद्याला भाग पाडणे'. आता इथे शब्दशः अर्थ घेऊ नये. आपल्याला काही सांगायचे आहे, पण कोणाला तरी पुढे करुन ते सांगायचे, या अर्थाने तसे म्हणायचे आहे. आता शंकराचार्यांना वेठीस धरले म्हणजे काय केले आहे. ''जग ही माया आहे, आभास आहे, मिथ्या आहे. अ़ज्ञानाने ब्रह्माला झाकल्याने हा मिथ्याभास होतो. याला विवर्तवाद असे नाव आहे''
त्यावर ज्ञानेश्वरांचे मत काय आहे, हे सांगण्यासाठी आपला चर्चेचा खटाटोप आहे. खटाटोपाबद्दल माझी काही तक्रार नाही. पण, जे काय सांगायचे ते स्पष्ट सांगायचे. शंकराचार्य त्यांच्या जागी मोठे आहेत आणि ज्ञानेश्वर त्यांच्या जागी मोठे आहेत. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणारे म्हणतात, ज्ञानेश्वरीमधे अनेक ग्रंथातील तत्त्वज्ञानाचे पडसाद दिसून येतात. वेद,उपनिषदे,भगवद्गगीता,शांकरभाष्य,काव्य,नाटक,मीमांसा, इत्यादी. त्यामुळे शंकराचार्यांचे "ब्रह्म सत्य जगत् मिथ्या"चुकीचे आणि ज्ञानेश्वरांचे तत्व दोन-पाच अध्यायाचे दाखले देऊन ते कसे बरोबर आहेत हे स्पष्ट होणार नाही. आणि नेमके आपण ते करु पाहात असे वाटते. शंकराचार्य आणि मंडनमिश्र यांचा वाद प्रसिद्ध आहे, मंडनमिश्र सारख्या विद्वानास वादात ते पुरले नाहीत. आपण तर फार लहान ठरु नाही का ? म्हणून 'वेठीस धरणे' हा शब्दप्रयोग वापरला आहे.
-दिलीप बिरुटे
देव साहेब
बुद्ध बी फारिन रिटर्न्ड व्हता की काय? याची मला कल्पना नाही.
इंग्रजी मधे पोस्ट करण्याच कारण मला गमभन निट वापरता येत नाही.
लब्जों को छोड दो. मतलब समजलो.
"दया क्षमा आणि शांति"
सगळ्यांच मंगल होवो.
रजनीशानी या असल्या तथाकथीत ब्रम्हचार्यांवर मस्त टीप्पण्णी केली आहे.
ते म्हणतात की संसारी माणसाला स्त्री जितक्यावेळा आठवते त्यापेक्षा कैक पटीने अधीक वेळेस ती ब्रम्हचार्याला आठवते.
याचे कारण म्हणजे की ब्रम्हचारी एका नैसर्गीक सत्यापासून पळ काढत असतो.
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
>मिपाकरांची मतं अपेक्षित...
तर्कतीर्थ तात्यास्वामी तुमचे दोस्त जोशीबुवा यांनी खिशाला खार लावून असल्या विषयावर चर्चा करायला स्वतंत्र स्थळ काढून सोय करुन दिली आहे ना. तिकडे टाका.
मिपाचे उपक्रम करु नये, ही विनंती.
अधीक चर्चा केल्यास महर्षी व्यास पुरस्काराने गौरवण्यात येईल.
हा हा हा
सहजरावांशी सहमत आहे.
तात्या, उगाचच विचारवंतांच्या समजुतींच्या मर्यादा उघड करणारे लेख, प्रतिसाद मिपावर नको ब्वा !
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
खरे तर लोकांना सांगायची गरज नाही. तरीपण एक गोष्ट स्पष्ट करतो. ज्या लोकांना माझ्याकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे त्यांनी उपक्रमावर मूळ लेखावर प्रतिसाद द्यावा. तिथे उत्तर देईन. बिरुट्यांनी लिहिलेल्या खरडींना यापुढे उत्तरे देणार नाही.
विनायक
>>बिरुट्यांनी लिहिलेल्या खरडींना यापुढे उत्तरे देणार नाही.
माझ्या आठवणी नुसार माझ्या मसं वरील आंतरजालीय कारकिर्दीत मी आपल्याला हा प्रतिसाद लिहीपर्यंत कधीच खरड केलेली नाही. त्यामुळे मी तुम्हाला खरडी करण्याचा प्रश्नच नाही. उलट आपल्याच खरडी येऊन पडल्या आहेत.
>>ज्या लोकांना माझ्याकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे त्यांनी उपक्रमावर मूळ लेखावर प्रतिसाद द्यावा.
मला आपल्याकडून कोणत्याच प्रतिसादाची अपेक्षा नाही आणि आपल्याकडून मला काही समजूनही घ्यायचे नाही. धन्यवाद....!!!
-दिलीप बिरुटे
बिरुट्यांनी लिहिलेल्या खरडींना यापुढे उत्तरे देणार नाही.
बिरुटे नाही... प्रा.डॉ.बिरुटे... :)
मिपावरील सन्माननीय सदस्य आणि संपादक असलेल्या सरांचा "बिरुट्यांनी" असा केलेला उल्लेख खटकला. किमान बिरुटे सर असे म्हणणे गरजेचे होते.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
हा विषय माझ्या आवाक्याबाहेरचा आहे, मला पेलत नाहीं. म्हणून "नो कॉमेंट्स".
सुधीर
------------------------
कटी रात सारी मेरी मयकदेमें
खुदा याद आया सवेरे सवेरे!
प्रतिक्रिया
सहमत
http://www.youtube.com/watch?
मूळ लेखाला
ये भोगभी
भोग आणि गूढ
एक श्लोक
misquoting, उचलेगिरी
चार्वाकाच
पहील्यांदाच ऐकले..
हे बर्याच
धन्यवाद!
नाही,
१ वेगळा विचार.
बुद्धाला विंग्रजी पण यायचे?
जगत् मिथ्या"
पण,
तात्या,
शंकराचार्
आदी शंकाचार्य
शंकराचार्य
असं
अरे हो...!
बुद्ध बी फारिन रिटर्न्ड व्हता की काय?
रजनीशानी
ओ तर्कतीर्थ
हा हा
निवेदन
सुस्वागतम....मिपावर स्वागत आहे.
अहो विनायक
बिरुट्यां
हा विषय माझ्या आवाक्याबाहेरचा आहे