=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
(हसण्याचा कल्लोळ आवरता आल्यास) सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे.
काय आहे, पब्लिकला दाखवण्यासाठी घेराव वगैरे घालावा लागतो डान्राव, तुम्ही कसं सोयीने 'देशमुख' फार्म दाखवलंत! ;-) बाकी आपली राजकीय युती अभेद्य आहे, हे वे.सां.न ल.
रा.को. अदितीताई अवखळकर पाटील
विषेश आभार : दिपाली पाटील, धमाल मुलगा, अवलिया, बिपीन कार्यकर्ते,अदिती, नंदन, परिकथेतला राजकुमार, निखील देशपांडे, राजे,ब्रिटिश टिंग्या, अॅडी जोशी आणि सर्वात महत्वाचे मिपा व्यवस्थापन ....
मुडदा बशिवला तुझा डाण्या ... आम्हाला विषेश फाट्यावर मारतोस काय ? जा नाही देत प्रतिक्रिया !! बाझवला तिच्यामायला ... पापड .. पापड झालाय आमचा !
त्यांनी आत्तापर्यंत नियम असे काही बनवलेच नव्हते कारण असे काही खरोखर करावे लागेल ह्यांची त्यांना कल्पना नसावी बहुतेक, त्यांचाच मग घाबरुन "२ दिवसात सर्व डिटेल्स पाठवतो" असा सर्वांना ई-मेल आला व नंतर जेव्हा खरोखर मेल आला तेव्हा भेंडी त्यांनी आमच्याच मेलमधल्या ८०% शंका "नियम" म्हणुन वापरुन टाकल्या होत्या ( तर ह्यातुन आपण काय शिकलो की साहित्यचौर्य हा केवळ आंतरजालाचाच प्रॉब्लेम नाही, ते कोठेही होऊ शकते).
प्रतिसादाचा काही भाग सम्पादित. वैयक्तिक शेरेबाजी नको..
आणि हो , अभिणंदण पण नाही करणार जा ... लेख लै भारी लिहीला आहेस असं ही म्हणणार नाही ज्जा ... काय करायचं ते घे करून ...
डाण्या काही काही ठिकाणी हास्यठसके लागले रे लेका !! के व ळ अ प्र तिम ..
पण तु जर "डेकोरेशन - क्युबिकल (छोटा डॉन स्टाईल) " असे लिहीले असते तर आणखिण मजा आली असती , असो ... आपण कोदांकडे शिकवणी लावा :)
- (डॉणगार्ड) टारझन
आणि हो , आधी लेख ओव्हरव्यु करून प्रतिक्रिया घाईघाइत टाकली होती, कृपया संभाळूण घेणे, घेतली असेल तर हा भाग अलहिदा !
सर्वांना एक विनंती ...
आम्ही ह्या धाग्यात फोटो टाकताना खुप विचार करुन फक्त आमच्याच क्युबिकलचे फोटो टाकले आहेत, इतरांचे फोटो परवानगी न घेता टाकणे आम्हाला प्रशस्त वाटत नाही ...
तेव्हा कॄपया आपण फक्त पाहण्याचा आनंद घ्यावा.
ते फोटो इथे "धाग्यात टाकु नयेत" अशी विनंती ...
सहकार्य करा आणि वैयक्तिक घेऊ नका, इथे प्रश्न मोरॅलिटीचा आहे.
संपादक :
कॄपया योग्य व्यवस्था करा इतर फोटोंची ...
------
छोटा डॉन
अरे वा वा वा वा!!
पुन्यांदा हाबिणंदण
लेख वाचुन हसायचे थांबलो तेव्हा प्रतिसाद देतोय !! ;)
ऋषिकेश
------------------
सकाळचे १० वाजून ११ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक जाहिरात"झुळझुळ वाणी खेळवा पाणी.. आणायचं कुणी सांगतो राणी...."
असेच म्हणतो भाऊ.
आम्हाला क्युबिकल नाहीत (आम्ही लाईन असेंब्लीवाले) पण कालच माझे टेबल आवरले (सत्तर एक किलो कागद टेबलावरुन टेबलाखाली सावरले.) अजुन अंग दुखतय.
क्युबिकल डेकोरेशन सारखे टेबल डेकोरेशन करावे म्हणून काही `नयनरम्य स्थळांचे' फोटो काल आणले होते पण हाय! सौंदर्यदृष्टी नसलेल्या अॅडमिन वाल्यांनी बोंबाबोंब करुन सगळे काढुन टाकायला लावले. ५,००० शब्दांची निषेधाची मेल टाकली आहे आता.
डान्या क्युबिकल उत्तम सजवले आहेस :)
मग श्रम निराकरण झाल की नाही अजुन???? :)
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
डाण्याशैलीतला वृतांत जाम आवडला. =))
डेकोरेशन सुंदर आहे. तुमच्याबरोबर तुम्हाला मदत करणाऱ्या मित्रांचे अभिनंदन. :)
एक मिपाकट्टा आदर्श नगर मध्ये होऊन जाउद्या. :)
हॅ हॅ हॅ !
लै भारी रे डॉन्या.... पण लेका बार नाही तर कमीत कमी एक गुत्ता तरी उघडा ठेवायचा राव गावात ... त्याशिवाय काय मज्जा ;)
***
तुझ सम नाही दुसरा ध्वज
तुझ सम नाही दुसरा देश
तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय
स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !
डॉनशैलीतला वृत्तांत आवडला.. डेकोरेशनही सहीच!!!!
बाकी तुमच्या मित्रांची काळजी वाटतेय.. आधी उपवासाची साबुदाण्याची थालिपीठे.. आता... डेकोरेशन करता करता थर्मोकोलची भाजी!!!! देवा.. वाचव रे त्यांना!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
लेख आणि सजावट एकदम सुंदर..
पण एक गोष्ट कळत नाही..असा पैसा खर्च करून सध्याच्या काळात कंपनीला काय मिळते? फक्त HR लोकांच्या performance साठी काही सण, दिवाळी , नवरात्र गरबा आणि असे दिवस साजरे केले जातात.
जेव्हा lay-off ची वेळ येते. तेव्हा असे दिवस साजरे करून केलेल्या मौजेवरील पैसा वाचवून कमीत कमी एक-दोन जणांची तरी नोकरी वाचली असती असे वाटते. एकीकडे कंपनीला परवडत नाही म्हणून बोंबाबोंब पण असा पैसा आणि वेळ मात्र घालवायची तयारी. हे पटत नाही. एका कोठल्यातरी कंपनी काहीजणांना lay-off आणि गरबा पार्टीची नोटीस एकदम मिळाली होती.
डॉनराव तुमच्या कंपनीला हे परवडत असेल. पण माझा बोलण्याचा उद्देश फक्त ज्या ज्या कंपनीत हे प्रकार चालतात त्यांच्यासाठी आहे.
खादाडमाऊ
खादाडमाऊ, आपल्या विचारांशी बर्याच अंशी सहमत आहे.
एकुणच गांभिर्याने विचार केला तर आपण जे उदाहरण देत आहात तसे घडाले असल्यास चुकीचेच आहे. मी आपल्याशी सहमत आहे.
>>पण एक गोष्ट कळत नाही..असा पैसा खर्च करून सध्याच्या काळात कंपनीला काय मिळते?
गल्लत होते आहे ... ;)
अहो इथे कंपनीचा पैसा कशाला खर्च होईल ?
माझ्या महितीप्रमाणे अशा स्पर्धांसाठी "स्वतःच्य खिशातुन" पैसे घालावे लागतात, शिवाय जे काही बक्षिस मिळते ते कॅश किंवा तत्सम कधीच नसते. काहीतरी मर्चंडाईज आयटम मिळतात नेहमी.
>>फक्त HR लोकांच्या performance साठी काही सण, दिवाळी , नवरात्र गरबा आणि असे दिवस साजरे केले जातात.
+१, अगदी अगदी सहमत ...
शक्यतो हे त्या लोकांचे वर्कबुक भरण्यासाठीच होते. मात्र एक गोष्ट जरुर नमुद करतो की आमच्या इथे "कल्चरल कमिटी"मध्ये HR चा फक्त १ प्रतिनिधी आहे, बाकी सर्व सामान्य इंजिनीयर्स आहेत. त्यामुळे ह्यात आमच्याकडे HR चे उखळ पांढरे होत असेल असे वाटत नाही.
जेव्हा lay-off ची वेळ येते. तेव्हा असे दिवस साजरे करून केलेल्या मौजेवरील पैसा वाचवून कमीत कमी एक-दोन जणांची तरी नोकरी वाचली असती असे वाटते.
+१, पुन्हा एकदा सहमत.
भानविकदृष्ट्या आपले म्हणणे कितीही बरोबर आणि सुयोग्य असले तरी आजच्या जमान्यात वावरताना कंपन्यांना काही कॉर्पोरेट पॉलिसीज पाळाव्या लागतात, हे असे सेलिब्रेशन्स त्याचाच एक भाग आहे. आमच्या ओव्हरसिझ शाखांमध्ये हे सर्व ख्रिसमसच्या काळात घडते, त्याला भारतीय पर्याय म्हणुन हे इकडे जस्ट गणपती किंवा १५ ऑगस्टचा मुहुर्त साधुन ही स्पर्धा घेतात ...
शिवाय "Work Environment" उत्साही ठेवण्यासाठी आणि रोजच्या कामातुन कामातुन जरा विरंगुळा म्हणुन अशा स्पर्धा घ्याव्यात ह्या मताचा मी समर्थक आहे ...
बाकी आपले ले-ऑफचे म्हणणे मान्य आहे हे पुन्हा नमुद करतो ...
डॉनराव तुमच्या कंपनीला हे परवडत असेल. पण माझा बोलण्याचा उद्देश फक्त ज्या ज्या कंपनीत हे प्रकार चालतात त्यांच्यासाठी आहे.
हरकत नाही हो, बिनधास्त बोला.
आपला मुद्दा समजला, बहुतांशी सहमत आहे असेच म्हणतो ...
------
(सहमत)छोटा डॉन
कोणत्याही व्ययसायात टीम बिल्डींग हे अतिशय गरजेचे असते.
जर सूर न जुळलेली आणि एकसंध टीम नसेल तर एकत्र काम करणे अतिशय अवघड होते. सॉफ्टवेअर सारख्या उद्योगात जिथले वातावरण खूपच अस्थिर असते तिथे तर हे फारच जरूरीचे असते.
त्यासाठी अशा प्रकारचे इव्हेन्ट हे टीममध्ये इन्फॉर्मल वातावरण बनवण्याच्या कामात महत्वाची कामगिरी बजावतात.
उत्पादकता ही कामाचे वातावरण आणि कर्मचार्यांच्या मनस्थितीवर अवलम्बुन असते हा सिद्ध नियम आहे.
एच आर केवळ रीकृमेन्ट करत नाही तर ऑफीसमधले वातावरण सुव्यवस्थित राखण्याचेही काम करत असते.
पी एम आय सारखी जागतीक संस्थाही प्रोजेक्ट चे वातावरण निर्मित व्हावे म्हणून सहभागी लोकांची एक पार्टी ठेवावी असे रेकमन्ड करते.
हमप्याला /हम निवाला किंवा सहनौ भवतु सहनौ भुनक्तु हे टीम बिल्डिंगसाठी अत्यावश्यक ठरतात
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
डॉन राव आणि विजूभाऊ,
जर सूर न जुळलेली आणि एकसंध टीम नसेल तर एकत्र काम करणे अतिशय अवघड होते. सॉफ्टवेअर सारख्या उद्योगात जिथले वातावरण खूपच अस्थिर असते तिथे तर हे फारच जरूरीचे असते.
हे मला ही पटते. त्यासाठी असे celebrations आवश्यक असतात.
पण माझा राग त्या lay-off ची नोटीस आणि गरबा आमंत्रण एकत्र देण्याला आहे. असे काही घडले की पुढच्या समारंभात उत्साहाने भाग घ्यावा असे वाटत नाही. ज्या कंपनीत हा प्रकार घडला तिथे मात्र राहीलेले कर्मचारी अतीउत्साहाने गरबा खेळत होते. जणू ज्यांच्या नोकर्या टिकल्या ते सर्व deserve करणारे आणि super performer होते. जे सगळे नोकरीपासून वंचित झाले ते सारे काही under perfformer नव्हते आणि त्यांच्याच टीमचा भाग होते. सांगा काय उपयोग झाला एकसंघ टीम आणि so called team spirit असल्याचा? म्हणून माझ्या द्रुष्टीने ह्या सर्वांची किंमत त्या कंपनी पुरती शुन्य आहे. त्या कंपनीसाठी हे सगळे sheer waste of time and money हेच आहे.
बाकी डॉन राव तुम्ही चांगली मेहनत घेतलेली दिसतेय. तुमचे अभिनंदन..
(तुम्ही सर्व खर्च स्वतः केलात हे माहित नव्हते.)
खादाडमाऊ
डान्राव, हाबिणंदण. तुमी आसलि बकशिसं वैगेरे घेण्यात पटाईत आहातच त्यामुळे यावेळी पण तुमचा लंबर लागनारच ह्ये माहित हुतं. बाकी ल्येख झ्याक लिवलाय. चांगलीच म्हेनत घ्येतलेली दिसतीय. बाकी तुमचे तुमच्या एचारवाल्या पोरींशी चांगले संबंध (खरे तर प्रेमाचे संबंध म्हन्नार हुतो) हायेत आसं वाटतं, कारन ती सैफ अली खान किंवा पराच्या सरटफिकिटाची अट तुमच्या साठी पेश्शल शिथिल केल्याली वाटते. आसो. परत यकदा हाबिणंदण.
बिपिन कार्यकर्ते
अभिनंदन डॉन!
थीम चांगली आहेच आणि इतक्या अडचणींना तोंड देउन केलेली हस्तकला तर मस्तच! आपल्याकडची खेडी स्वयंपूर्ण व्हावीत अशी मनापासून इच्छा आहे. :)
रेवती
खुमासदार वर्णन. खेडे छान दिसते आहे.
बाकी ऑफिसमधील इतरांच्या क्युबिकल डेकोरेशनचे फोटो पाहिले तर त्या तुलनेत डॉनभाऊ भलतेच सरळमार्गी आणि सात्विक वाटायला लागले. ;)
रंगाशेठ, तुम्हीच बघा आमच्या भावना समजणारे ... :)
असो, विकासराव अहो त्या दिवशी कामाला "ऑफिशियली" सुट होती.
इतर दिवशी आम्ही कामाला "ग्रांटेड" सुट घेतो हा भाग अलहिदा ;)
------
(कैच्या कै कामसु) छोटा डॉन
बक्षीस मिळाल्याबद्दल अभिनंदन. आणी हो आमच्या आवडत्या हैद्राबाद शहराच्या विमानतळाची निवड करुन तुम्ही आमच्या मनात एक खास स्थान मिळवलं आहेत हे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो! :)
शैली नेहेमीप्रमाणेच छप्परफाड! (लिखाणाची म्हणतोय मी, नाहीतर याल लावसटासारखे लाळ गाळत ;) )
बाकी डॉनचा अड्डा मात्र कुठे दिसला नाही त्यामुळे थोडी चुटपुट लागून राहिली हे खरेच. :W
(मध्यम डॉन)चतुरंग
करा! करा!!!
ते जीएम चे शेयरहोल्डर बोंबा मारत बसलेयत आणि तुम्ही क्युबिकल डेकोरेशन करा!!!!:)
तिच्यायला, ह्या डॉन्याला पुढले सहा महिने फक्त अन्नम-रसम सुटेल इतकाच पगार दिला पाहिजे!!!!:)
काम करायचं सोडून क्युबिकल सजवतोय शिंचा!!!:)
सिरियसली - डॉन्या, क्युबिकल छान दिसतेय. पुरस्काराबद्दल अभिनंदन!!
अत्यंत सिरियसली - कितीही सजवली तरी क्युबिकल ही शेवटी एक कोठडीच रे डॉन्या!! जन्मठेपेची शिक्षा भोगायला लावणारी!!! :(
हा हा ..आपण जीएम चे शेअरहोल्डर दिसताय (अमेरिकेचे नागरिक या नात्याने)
विनोद आहे बर का हा..हा म्हणजे हे जे लिहिलंय ते..माझे नाव नव्हे :-D
डॉनभाऊ, तुमचे अभिनंदन !!
बरेच उशीरा पाहीला धागा.
>>मी सांगितले की " शहरांचा विकास होतोय ह्यात वादच नाही, भारतीय शहरे सध्या नुसतेच भारतासाठी महत्वाची नसुन आख्ख्या जगासाठी माहितीची आणि तांत्रिक सेवेचे हब्स झाली आहेत.
पण एवढेच संपुर्ण नाही, आज भारतीय खेडीही अशीच स्वयंपुर्ण झाली तर तिथला माणुस नोकरीसाठी उगाच शहराकडे धाव घेणार नाही सध्या प्रमुख्य समस्या असलेली अस्ताव्यस्त आणि गलिच्छपणे विस्तारणारी शहरे आपोआप सुधारतील ...
भारताच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वरील २ गोष्टी सारख्याच आवश्यक आहेत, अन्यथा संतुलन बिघडुन जाईल व सर्व व्यवस्था कोलमडुन पडेल ...<<
हे भाषण तुम्ही लोकसत्तेत पण दिलेत आणि ते सकाळ मधे छापून आले हा भाग अलाहिदा.
बाकी लेख छान आणि वरील भाषणात आमचे (म्हणजे आमचेही विचार तसे असल्याने)विचार मांडल्याबद्दल आपले पुनश्च अभिनंदन.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
तुला थर्माकोलमधे इतकं खेळताना असं वाटलं असेल की जणू गणपतीची सजावट करतोय असेच वाटले असेल.
लेख आणि फोटो मस्त.
खादाडबोकाशी मात्र त्याच्या मुद्द्याबद्दल सहमत !
प्रतिक्रिया
(विषय दिलेला नाही)
विषेश आभार
मस्त !
एक विनंती ...
अरे वा वा
अभिनंदन
वा! सुंदर!!
+ १
डेकोरेशन
लय भारी
+१
डान्या
मस्त..
वा वा
बेष्ट
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
सुपर्ब
डॉण्या लै
अभिनंदन!
लै भारी
हॅ हॅ हॅ
मस्तच!!!
ही ही..
अभिनंदन!
सुंदर पण..
सहमत आहे ...
हे असे इव्हेन्ट अत्यावश्यकच
मी सुद्धा सहमत..
वा!!!
अभिनंदन
+१
अभिनंदन
+१
मस्त!
एक प्रश्न
काय अडचणीत आणणारे प्रश्न विचारता हो विकासराव?
+१,
अर्रे वा, क्यूबिकल डेकोरेशन एकदम झांटामॅटिक झालंय की!
खास डॉन्या
मजा आहे
तद माताय!
हा हा ..आपण
छे!!!
बरेच उशीरा
अभिनंदन डॉन्या
आभारी आहे.
छोट्या आता
मस्त..
अभिनंदन