Skip to main content

आम्ही क्युबिकल डेकोरेशन करतो ....

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 19/08/2009 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
तर मित्रांनो ही स्पर्धा होती आमच्या आस्थापनात, ती तिथेच घेतली गेली आणि निकाल तिथेच जाहीर झाले. जर पुढेमागे आमची कंपनी केंद्र सरकारने बेल-आउट पॅकेज देऊन चालवायला घेतली तर स्पर्धा महाराष्ट्रात, जाहिरात युपी/बिहारात, प्रत्येक्ष स्पर्धा कर्नाटकात व बक्षिसवितरण समारंभ दिल्लीत वगैरे होऊन ह्याला "*** गांधी पुरस्कॄत क्युबिकल डेकोरेशन स्पर्धा " असे नाव दिले जाऊ शकते ... ( कोणीतरी विचारत होता की मिपावर निकाल जाहीर झाले का म्हणुन तर त्याला हे उत्तर समजावे. बाकीच्यांनी हा मजकुर वाचायचे कारण नाही, ऑलरेडी वाचला असल्यास ( तुमच्या जिवनातल्या अनेक दुर्भाग्यांपैकी एक ) दुर्भाग्य म्हणुन सोडुन द्या ;) ) * क्युबिकल मेकओव्हर कॉम्पिटिशन : तुम्ही कंपनीत कामाला जाता की नाही, राहु द्यात आपण नुसतेच कंपनीत जातो असे म्हणु, कुणावर कशाला "काम करण्याचा " आरोप करायचा नाही का ? तर असो. तुम्ही कंपनीत गेल्यावर ( मिपा-मिपा खेळण्यासाठी सर्व सोयींनी युक्त अशी जी जागा असते त्या ) "क्युबिकल" मध्ये बसता की नाही ? इमानदारीत व्यवस्थित बसत असाल तर तुम्ही ह्या स्पर्धेला पात्र धरले जाल. ऑफीसमध्ये नुसतेच पोरी फिरवण्याचे धंदे करणार्‍यांनी जर "सैफ अली खान " किंवा गेलाबाजार नेटकॅफेफेम परा ह्याचे सर्टिफिकेट आणले तर त्याचाही विचार केला जाईल. ( टिंग्याचा चान्स गेला. असो.) ज्यामध्ये तुम्हाला तुमचे क्युबिकल एक विशिष्ठ थीम घेऊन सजवायचे होते, काहितरी देखावा तयार करायचा होता ( म्हणजे रोज आपण नुसतेच काम करतो आहोत हा देखावा उत्स्फुर्तपणे तयार करतो तो नव्हे, काहितरी वेगळा हवा होता). आपल्याकडे गणपतीला कसे लहान लहान पोरांना नाराज होऊ नये म्हणुन आपण लुटुपुटीच्या स्पर्धा घेतो तर हा त्यातलाच एक भाग, फक्त इथे "कमी पगारवाढ" हा इश्श्यु महत्वाचा होता. ह्याची सुरवात आधीपासुनच झाली होती, रोज आम्ही काम केल्याचा देखावा तयार करायचो मग शेवटी बॉसने एक दिवस "पगारवाढ दिल्याचा" नुसताच देखावा तयार करुन दाखवला व आम्हाला धोबीपछाड घातली. असो, सगळ्याच गोष्टी काढायची ही वेळ नव्हे. डेकोरेशनसाठी वापरलेली थीम ( उर्फ संकल्पना ), एकुण सजावट, नाविन्य, खर्च्,मेहनत आदी गोष्टी विचारात घेऊन ( व आपल्या कंपुमध्ये कोणकोण आहे हे पाहुन ) बक्षिस जाहीर होणार होती. ( थोडक्यात काय तर कंपुबाजी एक वैश्विक जीवनशैली आहे, चालायचेच ). सर्वात पहिल्यांदा आम्ही काय केले तर जी काही "ऑर्गनायझिंग कमिटी" होती त्यांनी १००० शब्दांचा नियम आणि कायदे यांच्याविषयी अनेक चौकश्या करणारा एक मोठ्ठ्या ई-मेल ( सीसी : एच आर मॅनेजर ) पाठव. त्यांनी आत्तापर्यंत नियम असे काही बनवलेच नव्हते कारण असे काही खरोखर करावे लागेल ह्यांची त्यांना कल्पना नसावी बहुतेक, त्यांचाच मग घाबरुन "२ दिवसात सर्व डिटेल्स पाठवतो" असा सर्वांना ई-मेल आला व नंतर जेव्हा खरोखर मेल आला तेव्हा भेंडी त्यांनी आमच्याच मेलमधल्या ८०% शंका "नियम" म्हणुन वापरुन टाकल्या होत्या ( तर ह्यातुन आपण काय शिकलो की साहित्यचौर्य हा केवळ आंतरजालाचाच प्रॉब्लेम नाही, ते कोठेही होऊ शकते). एखादा १००० शब्दांचा लेख अथवा काथ्याकुट लिहायचा असता किंवा एखाद्या संवेदनाशील विषयावर मोठ्ठ्या भिंगाचा चष्मा घालुन व कपाळाला आठ्या घालुन समिक्षा वगैरे करायची असती तर हा आमच्या डाव्या हातचा मळ होता, पण इथे मामला कठिण होता. मग आम्ही मदतीसाठी मिपाकरांना साद घातली आणि बघता बघता अनेक कल्पना आल्या. प्रतिसाद आणि आयडिया देणार्‍या सर्वांना धन्यवाद ( अ‍ॅड्या, राज्या, टार्‍या आणि धम्या तुम्हाला नंतर बघतो साल्यांनो ;) ). त्यातुन आम्ही एक "सहजरावांनी" सुचवलेली थीम निवडली व पेपरवर्क सुरु केले ( ह्यालाच आमच्या रुममेट्सनी "तुम्ही फक्त कारणे शोधा **साठी " साठी असे म्हणले, पर्याय नाही, जनहितार्थ काही करायचे म्हणले की अशी टिका सहन करावीच लागते ... आता माझी थीम तर फायनल झाली होती की "एक मॉडर्न खेडे व एक मेट्रोसिटी" दाखवुन नव्या भारताचे चित्र मांडायचे. मग त्यानुसार नेटवर भरमसाट सर्फिंग करुन काही मॉडेल्स फायनल केली. शहरासाठी भरपुर काही मिळाले पण खेड्यासाठी काय दाखवावे ह्यावर आमचे गाडे पुन्हा आडले, पुन्हा सर्वांना खरडीद्वारे साद घातली व पुन्हा मिपाकरांचे भरभरुन रिप्लाय आले ( पण ह्याच दरम्यान कुठल्यातरी नतद्रष्टाने "मिपाकरांच्या खरडवह्यातल्या खरडींची संख्या" मोजुन सर्वात जास्त टीपी कोण करतो ह्याचा कौल घेतला, पाहुन घेतो रे, पुढचा लेख येऊदेत तुझा, नाय "गल्लत होते आहे" ह्या शिर्षकाखाली १००० शब्दांचा वाघासारखा प्रतिसाद लिहला तर दुसर्‍या आयडीने लेखन करेन). सर्व काही आवश्यक माहिती मिळाली, मॉडेल्स ( फॅशन टिव्हीवाल्या नव्हे, डेकोरेशनच्या ) ही फायनल झाल्या, मटेरियलही येउन पडले ( ते कोणी आणले ह्याच्या फुक्कटच्या टांभारचौकश्या ( कॄपया "ट" च्या ठिकाणी "च" असे वाचावे) करु नयेत, अपमान होईल). केव्हा, कुणी, काय , कसे आणि किती ( हे सर्व प्रश्न थर्मोकॉल मॉडेल्सशी निगडीत आहेत ह्याची आवश्य नोंद घ्यावी ) ह्याचेही प्लानिंग झाले व युद्धाला तोंड फुटले... ऑफीसमध्ये कामाच्या वेळात बसुन जर मी थर्मोकॉल-वर्क करत बसलो असतो तर माझ्या बॉसला झीट आली असती व त्याने एक तर मला थर्मोकॉलच्या भिंतीत चिणुन मारले असते वा स्वतः थर्मोकॉलच्य गोळ्या खाऊन आत्महत्या केली असती म्हणुन मी हे काम घरी करण्याचा निर्णय घेतला. घरीही परिस्थीती फार वेगळी नव्हती, आमच्या रुमवर असे काही काम करणे ह्याची तुलना ओसामा बिन लादेनच्या गुहेत "आंतरराष्ट्रिय दहशतवादाचे उच्चाटन" अशी चर्चा घडवुन आणणे किंवा प्रविण तोगडिया / वरुण गांधीबरोबर बसुन "मदरश्यांना वाढीव अनुदान" ह्यावर उहापोह करण्यासारखे आहे. तरीही आम्ही हे अवघड शिवधनुष्य पेलले व स्ट्रॅटेजी तयार करुन त्यानुसार वागण्यास सुरवात केली ( ह्यात २-३ दिवस रुममध्ये अपशब्दांचा वापर कमी करणे, स्वतःचा लॅपटॉप स्वखुषीने दुसर्‍यांना वापरण्यास देणे, वेळप्रसंगी स्वतः ऊठुन चहा वगैरे करणे, विकांताच्या नाष्टा/चहा/आदी पदार्थांचे बिल भरणे वगैरे वगैरे गोष्टी येतात. असो, जास्त खोलात शिरण्याची आवश्यकता नाही). शेवटी आमच्या ह्या स्ट्रॅटेजीला बळी पडुन बहुतेक बाबीत माणसाशी साधर्म्य असणारा माझा एक मित्र मदतीला तयार झाला. पण हे घडत असताना त्याने निवडणुकपुर्व युती करताना जशी शिवसेना अनंत नाटके करते व रोज उठुन आपल्या युतीतल्या पक्षाला शिव्या घालते तसा "देखावा" त्याने २ दिवस सादर केला, पण माझ्यासमोर भाजपासारखाच इतर काही पर्याय नसल्याने मी आपले शांतपणे त्याचे नखरे ऐकुन घेतले व शेवटी त्याला "थर्मोकॉल कापायच्या" कामाला बसवले. ही एक अभुतपुर्व घटना होती, ह्या मित्राने ह्यापुर्वी डास, ढेकुण आणि कमीत कमी मित्रांची इज्जत ह्याशिवाय इतर काही कधीच कापले नव्हते. वास्तविक पाहता हे त्याचे कामच नव्हे कारण त्याचे कुठुन न कुठुन परशुरामाशी, खंडो बल्लाळाशी आणि बाजीप्रभु देशपांड्यांशी नाते लागते, असे असल्याने त्याला जिभेचा दांडपट्टा फिरवणे एवढेच माहित. असा हा मित्र चक्क बसुन थर्मोकॉल कापत आहे हे दॄष्य पहायला फ्लॅटवरची अवघी मित्रमंडळी लोटली होती. सगळे एकत्र जमणे ह्या योगायोगाचा हा दुसरा प्रसंग, पहिल्या वेळी मी जेव्हा परदेशवारीनंतर बॅगेतुन शिवास रिगलची कुपी ( अ‍ॅड्या, कसा आहेस रे ? ) बाहेर काढली होती तेव्हा हाच सीन घडला होता, त्यानंतर पुन्हा तशी "शनी-मंगळ युती"नाही घडली. ह्या दरम्यान आम्ही दोघांनी मिळुन आख्खा फ्लॅट थर्मोकॉलमय करुन टाकला होता, जिकडे नजर जाईल तिकडे थर्मोकॉल, सकाळी हापीसात जातना बुट घालायचा म्हणाला तर त्यातुन आहे १२५ ग्रॅम थर्मोकॉलचे तुकडे बाहेर काढा, फॅन लावला की उडणार्‍या थर्मोकॉलबरोबर झिम्मा खेळा आदी प्रकारांनी आमच्या इतर रुममेट्सच्या डोक्याला व्यवस्थित शॉट लागला आहे ह्याची खात्री करून घेतली. पुढे हे प्रकरण एवढे वाढले की एक दिवस खुद्द आम्हाला रात्री ( १ वाजता ) जेवताना मी "बटाट्याची भाजी" खातो आहे की "थर्मोकॉलची भाजी" खातो आहे हेच कळेना. शेवटी (सरकारस्थापनेवेळेस येतात तशा ) अनंत अडचणींना फाट्यावर मारुन आम्ही कसेबसे एकदाचे सर्व होमवर्क पुर्ण केले व तो सर्व कच्चा माल ऑफीसमध्ये डेकोरेशनदिवशी व्यवस्थित बॉक्समध्ये पॅक करुन घेऊन गेलो ( पण त्या गडबडीत कंपनीत प्रवेश करण्यासाठी आवश्यक असते ते " आयडेंटि कार्ड " सोईस्कर विसरलो होतो हा भाग अलहिदा ). ते बॉक्स पाहुन आमच्या कलिग्सना झीट यायचीच बाकी होती, मी आल्याआल्या फटाफट "असेंब्ली सिक्वेन्सच्या प्रिंट्स" काढुन आमच्या टिममध्ये वाटल्या व त्यांनाही आता सर्व कच्चा माल असेंबल करुन फायनल डेकोरेशनच्या लुकमध्ये बदलवण्याच्या कामाला लावले. आमच्या बरोबर असलेल्या काही आकर्षक गोष्टींमुळे ( कॄपया फोटो मागु नयेत ) अनेक स्वेच्छेने मदत करणारे स्वयंसेवक मदतीचा हात घेऊन पुढे आले व पाहता पाहता ६ तासात "डेकोरेशन रेडी" झाले ...!!! हे पहा ते डेकोरेशन : बाकीची इतर छायाचित्रे पाहण्यासाठी कॄपया इथे क्लिक करावे ... डेकोरेशनची थीम : त्याचे नाव मी "इंडिया : फ्युचर इज हियर " असे दिले होते. ह्यत मी एक सर्वसोईसुविधायुक्त असे स्वयंपुर्ण आदर्श खेडेगाव व सर्व निर्यातप्रधान वस्तुंचे उत्पादन करणारे महानगर अशा २ गोष्टींचा सेट-अप लावला होता मी "स्वयंपुर्ण खेड्यामध्ये" दाखवलेल्या गोष्टी म्हणजे एक मस्तपैकी शेत व ते ही "देशमुख फार्म" ह्या नावाचे ( धमाल मालक, पार्टी लागु झाली बरं का आम्हाला ) , एक मंदिर ( राम राम अवलियाशेठ ) , काही घरे, पिण्याच्या पाण्याची टाकी, एक शाळा, एक दवाखाना, पंचायत समितीचे कार्यालय, व्यवस्थित आखलेले रस्ते, भरपुर हिरवळ, बायोगॅस प्लँट, कन्युनिकेशन टॉवर्स वगैरे दाखवले होते. ह्या सर्वांना पुरक असे ट्रॅक्टर, बैल, व्यक्ती आदींचे कटाआउटसयोग्य ठिकाणी लावले होते. मॉडर्न शहर दाखवताना मी त्यात आयटी पार्क, ऑटोमोबाईल कंपन्या, आर & डी सेटप्स, इस्रो वगैरे दाखवले होते. ह्या सर्वांना पुरक आणि आवश्यक म्हणुन दळणवळणाची सुविधा देणारे फ्लायओव्हर्स, एक्स्प्रेस हायव्हेज, मेट्रो रेल्वे, विमानतळ आदी गोष्टी दाखवल्या होत्या ... मॉरल : शेवटी जेव्हा पहाणीसाठी "परिक्षक" येणार होते तेव्हा त्यांना २ मिनीटात आपली थीम व त्याचे महत्व सांगायचे होते. मी सांगितले की " शहरांचा विकास होतोय ह्यात वादच नाही, भारतीय शहरे सध्या नुसतेच भारतासाठी महत्वाची नसुन आख्ख्या जगासाठी माहितीची आणि तांत्रिक सेवेचे हब्स झाली आहेत. पण एवढेच संपुर्ण नाही, आज भारतीय खेडीही अशीच स्वयंपुर्ण झाली तर तिथला माणुस नोकरीसाठी उगाच शहराकडे धाव घेणार नाही सध्या प्रमुख्य समस्या असलेली अस्ताव्यस्त आणि गलिच्छपणे विस्तारणारी शहरे आपोआप सुधारतील ... भारताच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वरील २ गोष्टी सारख्याच आवश्यक आहेत, अन्यथा संतुलन बिघडुन जाईल व सर्व व्यवस्था कोलमडुन पडेल ... ( नंतर लोकांनी येड्यासारख्या टाळ्या वाजविल्या पण त्यात काही विषेश नाही. असो. ) तर अशा प्रकारे "आम्ही क्युबिकल डेकोरेशन करतो ...." उपसंहार : फोटो व वृत्तांत द्यायला ( आमच्या ख्यातीला अनुसरुनच ) बराच उशीर झाला व त्या दरम्यान बर्‍याच घटना घडुन गेल्या. त्याचा थोडक्यात घेतलेला मागोवा :
  1. आमच्या अक्षम्य दिरंगाईवर खवळुन "नंदनशेठनी" त्यांच्या इथुन प्राकाशित होणार्‍या एका "सॅन डियेगो ट्रिब्युन" ह्य नियतकालीकात " एसी व पीसी वाल्यांचा क्युबिकल डेकोरेशनचा माज ..." ह्या शिर्षकाखाली समस्त व्हाईट कॉलर जॉब वाल्यांना ४ खडे बोल सुनावणारा अग्रलेख लिहला.
  2. "अवलियाशेठ"नी आम्ही दाखवलेल्या मॉडेलमध्ये मंदिरावर "भगवा ध्वज" नसल्याच्या निषेधार्थ आंतरजालीय भगव्या आघाडीला हाताशी धरुन आंतरजालेय मोर्चे आणि निषेधसभा घेतल्या. पुण्याच्या पेशव्यांनी २ दिवस अनेक वेबसाईट्सची बँडविड्थ अडकवुन ठेवल्याच्या बातम्या आहेत.
  3. विजुभाउ, अदिती, टिंग्या आदी धर्मनिरपेक्ष लोकांनी गावामध्ये चर्च आणि मशिद का नाही म्हणुन धरणे धरल्याचे समजते. तसेच आम्हाला घेराव घालण्याचा त्यांचा मनसुबा बोलुन दाखवला. श्री. टारझन ह्यांनी स्वखुषीने आमच्या संरक्षणाची जबाबदारी उचलल्याचे समजले.
  4. गावामध्ये बार न दाखवुन "दारुबंदी" सारख्या अनिष्ठ प्रथांना थारा दिल्याच्या निषेधार्थ राजे व अ‍ॅडी जोशी ह्यांनी रास्तारोको केल्याचे समजते.
  5. धमाल मुलगा ह्यांनी आपल्या घरावरच "देशमुख फार्म" अशी पाटी लावल्याचे चित्र स्थानिक दैनिकात छापुन आले.
  6. बिपीन कार्यकर्ते ह्यांनी पुढच्या भारत भेटीत "आदर्श नगर" ला भेट देऊन तिथे एक कट्टा घेण्याचा मनसुबा व्यक्त केला. नेहमीप्रमाणे निखील देशपांडे हे बिकांना सहमत होते.
  7. पराची ह्या गावात नेटकॅफे कितपत चालेल व सुम्दर कन्या किती आहेत ह्याची चाचपणी सुरु केल्याचे समजते ...
  8. फोटोची चौकशी करण्यासाठी अनेक व्यनी केले गेल्याने "सहजरावांचा" ह्या वर्षीचा "व्यनी कोटा" संपल्याचे समजते, त्यांनी आता दुसर्‍या खात्यासाठी मिपा व्यवस्थापनेकडे अर्ज केल्याचे समजते.
असो, तुर्तास इतकेच ... विषेश आभार : दिपाली पाटील, धमाल मुलगा, अवलिया, बिपीन कार्यकर्ते,अदिती, नंदन, परिकथेतला राजकुमार, निखील देशपांडे, राजे,ब्रिटिश टिंग्या, अ‍ॅडी जोशी, टारझन ( मरता मरता वाचलो तिच्यायला ) आणि सर्वात महत्वाचे मिपा व्यवस्थापन .... ता.क. : उपलब्ध वेळ आणि मुड ह्या दोघांचेही गणित व्यवस्थित जमल्यास "स्पर्धेदिवशीच्या गमती जमती" असा खास माझ्या शैलीतला अस्जुन एक लेख टाकेन, गँरेटी नाही पण प्रयत्न करेन ... ;)

वाचने 14250
प्रतिक्रिया 48

प्रतिक्रिया

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) (हसण्याचा कल्लोळ आवरता आल्यास) सविस्तर प्रतिसादासाठी जागा राखून ठेवत आहे. काय आहे, पब्लिकला दाखवण्यासाठी घेराव वगैरे घालावा लागतो डान्राव, तुम्ही कसं सोयीने 'देशमुख' फार्म दाखवलंत! ;-) बाकी आपली राजकीय युती अभेद्य आहे, हे वे.सां.न ल. रा.को. अदितीताई अवखळकर पाटील

विषेश आभार : दिपाली पाटील, धमाल मुलगा, अवलिया, बिपीन कार्यकर्ते,अदिती, नंदन, परिकथेतला राजकुमार, निखील देशपांडे, राजे,ब्रिटिश टिंग्या, अ‍ॅडी जोशी आणि सर्वात महत्वाचे मिपा व्यवस्थापन ....
मुडदा बशिवला तुझा डाण्या ... आम्हाला विषेश फाट्यावर मारतोस काय ? जा नाही देत प्रतिक्रिया !! बाझवला तिच्यामायला ... पापड .. पापड झालाय आमचा !
त्यांनी आत्तापर्यंत नियम असे काही बनवलेच नव्हते कारण असे काही खरोखर करावे लागेल ह्यांची त्यांना कल्पना नसावी बहुतेक, त्यांचाच मग घाबरुन "२ दिवसात सर्व डिटेल्स पाठवतो" असा सर्वांना ई-मेल आला व नंतर जेव्हा खरोखर मेल आला तेव्हा भेंडी त्यांनी आमच्याच मेलमधल्या ८०% शंका "नियम" म्हणुन वापरुन टाकल्या होत्या ( तर ह्यातुन आपण काय शिकलो की साहित्यचौर्य हा केवळ आंतरजालाचाच प्रॉब्लेम नाही, ते कोठेही होऊ शकते).
प्रतिसादाचा काही भाग सम्पादित. वैयक्तिक शेरेबाजी नको.. आणि हो , अभिणंदण पण नाही करणार जा ... लेख लै भारी लिहीला आहेस असं ही म्हणणार नाही ज्जा ... काय करायचं ते घे करून ... डाण्या काही काही ठिकाणी हास्यठसके लागले रे लेका !! के व ळ अ प्र तिम .. पण तु जर "डेकोरेशन - क्युबिकल (छोटा डॉन स्टाईल) " असे लिहीले असते तर आणखिण मजा आली असती , असो ... आपण कोदांकडे शिकवणी लावा :) - (डॉणगार्ड) टारझन आणि हो , आधी लेख ओव्हरव्यु करून प्रतिक्रिया घाईघाइत टाकली होती, कृपया संभाळूण घेणे, घेतली असेल तर हा भाग अलहिदा !

मस्त ! =D> =D> =D> :B :B :B बाकरवडी :B :B :B

In reply to by बाकरवडी

सर्वांना एक विनंती ... आम्ही ह्या धाग्यात फोटो टाकताना खुप विचार करुन फक्त आमच्याच क्युबिकलचे फोटो टाकले आहेत, इतरांचे फोटो परवानगी न घेता टाकणे आम्हाला प्रशस्त वाटत नाही ... तेव्हा कॄपया आपण फक्त पाहण्याचा आनंद घ्यावा. ते फोटो इथे "धाग्यात टाकु नयेत" अशी विनंती ... सहकार्य करा आणि वैयक्तिक घेऊ नका, इथे प्रश्न मोरॅलिटीचा आहे. संपादक : कॄपया योग्य व्यवस्था करा इतर फोटोंची ... ------ छोटा डॉन

अरे वा वा वा वा!! पुन्यांदा हाबिणंदण लेख वाचुन हसायचे थांबलो तेव्हा प्रतिसाद देतोय !! ;) ऋषिकेश ------------------ सकाळचे १० वाजून ११ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक जाहिरात"झुळझुळ वाणी खेळवा पाणी.. आणायचं कुणी सांगतो राणी...."

सर्वात आधी अभिनंदन आणि विषेश आभार : दिपाली पाटील, ... धमाल मुलगा, अवलिया, बिपीन कार्यकर्ते,अदिती, नंदन, परिकथेतला राजकुमार, निखील देशपांडे, राजे,ब्रिटिश टिंग्या, अ‍ॅडी जोशी, टारझन ( मरता मरता वाचलो तिच्यायला ) आणि सर्वात महत्वाचे मिपा व्यवस्थापन याबद्दल धन्यवाद दिपाली :)

डानभौ, लय सुंदर! =D> क्युबिकल डेकोरेशन हा असा काही प्रकार असतो हे माहितच नव्हते :? (बाकी तो लाल शर्टात असलेला अण्णा रास्कला कोन :D )

In reply to by समंजस

असेच म्हणतो भाऊ. आम्हाला क्युबिकल नाहीत (आम्ही लाईन असेंब्लीवाले) पण कालच माझे टेबल आवरले (सत्तर एक किलो कागद टेबलावरुन टेबलाखाली सावरले.) अजुन अंग दुखतय. क्युबिकल डेकोरेशन सारखे टेबल डेकोरेशन करावे म्हणून काही `नयनरम्य स्थळांचे' फोटो काल आणले होते पण हाय! सौंदर्यदृष्टी नसलेल्या अ‍ॅडमिन वाल्यांनी बोंबाबोंब करुन सगळे काढुन टाकायला लावले. ५,००० शब्दांची निषेधाची मेल टाकली आहे आता.

डेकोरेशन करता करता किती रसगुल्ले ‍खाल्ले रे? :? --अवलिया

आता पुढील पायरी केबिन डेकोरेशन

In reply to by विनायक प्रभू

असेच म्हणतो. :-)

डान्या क्युबिकल उत्तम सजवले आहेस :) मग श्रम निराकरण झाल की नाही अजुन???? :) ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao

क्युबिकल डेकोरेशन झक्कास...आणि वॄत्तांत तर त्याहुन झक्कास... -स्मिता

वा वा ! रा.रा.श्री. छोटा डॉन सविस्तर वृतांत वाचता वाचता ह.ह.पु.वा. झाली बॉ ! नशीब कॉफी, पाणी, दारु वगैरे काही पीत न्हवतो नाहितर फॉक्कन धम्या झाला असता. बाकी आमचे आभार मानल्याबद्दल आभार. पण आभार का मानले ते कळले नाही ;) आदर्शनगर मध्ये 'बार' नाही मग त्याला आदर्श नगर कसे म्हणायचे ? तुही अंमळ वेडझवाच आहेस बघ डॉन्या. आणी हो मागच्या महिन्याचा 'अस्ताव्यस्त' दैनीकात माझा 'ऑफीस मध्ये टाइमपास करणारे अवैचारीक मिपाकर' हा लेख छापुन आल आहे तो प्लिज प्लिज प्लीज वाच आणी काही मदत होते का बघ. ©º°¨¨°º© भयानक पाठलाग ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

डाण्याशैलीतला वृतांत जाम आवडला. =)) डेकोरेशन सुंदर आहे. तुमच्याबरोबर तुम्हाला मदत करणाऱ्या मित्रांचे अभिनंदन. :) एक मिपाकट्टा आदर्श नगर मध्ये होऊन जाउद्या. :)

डॉण्या लै भारी सजावाट..... नशिब परा म्हणाल्या प्रमाणे चहा कॉफि पित असताना हा लेख नाही वाच्ला..... निखिल ================================

डॉनराव लै भारी..................... असच सजवत रहा............. -( नव्याचे नऊ दिवस.....) प्रभो -

हॅ हॅ हॅ ! लै भारी रे डॉन्या.... पण लेका बार नाही तर कमीत कमी एक गुत्ता तरी उघडा ठेवायचा राव गावात ... त्याशिवाय काय मज्जा ;) *** तुझ सम नाही दुसरा ध्वज तुझ सम नाही दुसरा देश तुझ्यासाठीच जगणे हेच ध्येय स्वप्न माझे अर्पावा तुझसाठी हा देह !

डॉनशैलीतला वृत्तांत आवडला.. डेकोरेशनही सहीच!!!! बाकी तुमच्या मित्रांची काळजी वाटतेय.. आधी उपवासाची साबुदाण्याची थालिपीठे.. आता... डेकोरेशन करता करता थर्मोकोलची भाजी!!!! देवा.. वाचव रे त्यांना!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) ~X( ~X( ~X( सू हा स...

सही डेकोरेशन आणि वृत्तांत.

लेख आणि सजावट एकदम सुंदर.. पण एक गोष्ट कळत नाही..असा पैसा खर्च करून सध्याच्या काळात कंपनीला काय मिळते? फक्त HR लोकांच्या performance साठी काही सण, दिवाळी , नवरात्र गरबा आणि असे दिवस साजरे केले जातात. जेव्हा lay-off ची वेळ येते. तेव्हा असे दिवस साजरे करून केलेल्या मौजेवरील पैसा वाचवून कमीत कमी एक-दोन जणांची तरी नोकरी वाचली असती असे वाटते. एकीकडे कंपनीला परवडत नाही म्हणून बोंबाबोंब पण असा पैसा आणि वेळ मात्र घालवायची तयारी. हे पटत नाही. एका कोठल्यातरी कंपनी काहीजणांना lay-off आणि गरबा पार्टीची नोटीस एकदम मिळाली होती. डॉनराव तुमच्या कंपनीला हे परवडत असेल. पण माझा बोलण्याचा उद्देश फक्त ज्या ज्या कंपनीत हे प्रकार चालतात त्यांच्यासाठी आहे. खादाडमाऊ

In reply to by योगी९००

खादाडमाऊ, आपल्या विचारांशी बर्‍याच अंशी सहमत आहे. एकुणच गांभिर्याने विचार केला तर आपण जे उदाहरण देत आहात तसे घडाले असल्यास चुकीचेच आहे. मी आपल्याशी सहमत आहे. >>पण एक गोष्ट कळत नाही..असा पैसा खर्च करून सध्याच्या काळात कंपनीला काय मिळते? गल्लत होते आहे ... ;) अहो इथे कंपनीचा पैसा कशाला खर्च होईल ? माझ्या महितीप्रमाणे अशा स्पर्धांसाठी "स्वतःच्य खिशातुन" पैसे घालावे लागतात, शिवाय जे काही बक्षिस मिळते ते कॅश किंवा तत्सम कधीच नसते. काहीतरी मर्चंडाईज आयटम मिळतात नेहमी. >>फक्त HR लोकांच्या performance साठी काही सण, दिवाळी , नवरात्र गरबा आणि असे दिवस साजरे केले जातात. +१, अगदी अगदी सहमत ... शक्यतो हे त्या लोकांचे वर्कबुक भरण्यासाठीच होते. मात्र एक गोष्ट जरुर नमुद करतो की आमच्या इथे "कल्चरल कमिटी"मध्ये HR चा फक्त १ प्रतिनिधी आहे, बाकी सर्व सामान्य इंजिनीयर्स आहेत. त्यामुळे ह्यात आमच्याकडे HR चे उखळ पांढरे होत असेल असे वाटत नाही.
जेव्हा lay-off ची वेळ येते. तेव्हा असे दिवस साजरे करून केलेल्या मौजेवरील पैसा वाचवून कमीत कमी एक-दोन जणांची तरी नोकरी वाचली असती असे वाटते.
+१, पुन्हा एकदा सहमत. भानविकदृष्ट्या आपले म्हणणे कितीही बरोबर आणि सुयोग्य असले तरी आजच्या जमान्यात वावरताना कंपन्यांना काही कॉर्पोरेट पॉलिसीज पाळाव्या लागतात, हे असे सेलिब्रेशन्स त्याचाच एक भाग आहे. आमच्या ओव्हरसिझ शाखांमध्ये हे सर्व ख्रिसमसच्या काळात घडते, त्याला भारतीय पर्याय म्हणुन हे इकडे जस्ट गणपती किंवा १५ ऑगस्टचा मुहुर्त साधुन ही स्पर्धा घेतात ... शिवाय "Work Environment" उत्साही ठेवण्यासाठी आणि रोजच्या कामातुन कामातुन जरा विरंगुळा म्हणुन अशा स्पर्धा घ्याव्यात ह्या मताचा मी समर्थक आहे ... बाकी आपले ले-ऑफचे म्हणणे मान्य आहे हे पुन्हा नमुद करतो ...
डॉनराव तुमच्या कंपनीला हे परवडत असेल. पण माझा बोलण्याचा उद्देश फक्त ज्या ज्या कंपनीत हे प्रकार चालतात त्यांच्यासाठी आहे.
हरकत नाही हो, बिनधास्त बोला. आपला मुद्दा समजला, बहुतांशी सहमत आहे असेच म्हणतो ... ------ (सहमत)छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

कोणत्याही व्ययसायात टीम बिल्डींग हे अतिशय गरजेचे असते. जर सूर न जुळलेली आणि एकसंध टीम नसेल तर एकत्र काम करणे अतिशय अवघड होते. सॉफ्टवेअर सारख्या उद्योगात जिथले वातावरण खूपच अस्थिर असते तिथे तर हे फारच जरूरीचे असते. त्यासाठी अशा प्रकारचे इव्हेन्ट हे टीममध्ये इन्फॉर्मल वातावरण बनवण्याच्या कामात महत्वाची कामगिरी बजावतात. उत्पादकता ही कामाचे वातावरण आणि कर्मचार्‍यांच्या मनस्थितीवर अवलम्बुन असते हा सिद्ध नियम आहे. एच आर केवळ रीकृमेन्ट करत नाही तर ऑफीसमधले वातावरण सुव्यवस्थित राखण्याचेही काम करत असते. पी एम आय सारखी जागतीक संस्थाही प्रोजेक्ट चे वातावरण निर्मित व्हावे म्हणून सहभागी लोकांची एक पार्टी ठेवावी असे रेकमन्ड करते. हमप्याला /हम निवाला किंवा सहनौ भवतु सहनौ भुनक्तु हे टीम बिल्डिंगसाठी अत्यावश्यक ठरतात पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

In reply to by विजुभाऊ

डॉन राव आणि विजूभाऊ, जर सूर न जुळलेली आणि एकसंध टीम नसेल तर एकत्र काम करणे अतिशय अवघड होते. सॉफ्टवेअर सारख्या उद्योगात जिथले वातावरण खूपच अस्थिर असते तिथे तर हे फारच जरूरीचे असते. हे मला ही पटते. त्यासाठी असे celebrations आवश्यक असतात. पण माझा राग त्या lay-off ची नोटीस आणि गरबा आमंत्रण एकत्र देण्याला आहे. असे काही घडले की पुढच्या समारंभात उत्साहाने भाग घ्यावा असे वाटत नाही. ज्या कंपनीत हा प्रकार घडला तिथे मात्र राहीलेले कर्मचारी अतीउत्साहाने गरबा खेळत होते. जणू ज्यांच्या नोकर्‍या टिकल्या ते सर्व deserve करणारे आणि super performer होते. जे सगळे नोकरीपासून वंचित झाले ते सारे काही under perfformer नव्हते आणि त्यांच्याच टीमचा भाग होते. सांगा काय उपयोग झाला एकसंघ टीम आणि so called team spirit असल्याचा? म्हणून माझ्या द्रुष्टीने ह्या सर्वांची किंमत त्या कंपनी पुरती शुन्य आहे. त्या कंपनीसाठी हे सगळे sheer waste of time and money हेच आहे. बाकी डॉन राव तुम्ही चांगली मेहनत घेतलेली दिसतेय. तुमचे अभिनंदन.. (तुम्ही सर्व खर्च स्वतः केलात हे माहित नव्हते.) खादाडमाऊ

डान्राव, हाबिणंदण. तुमी आसलि बकशिसं वैगेरे घेण्यात पटाईत आहातच त्यामुळे यावेळी पण तुमचा लंबर लागनारच ह्ये माहित हुतं. बाकी ल्येख झ्याक लिवलाय. चांगलीच म्हेनत घ्येतलेली दिसतीय. बाकी तुमचे तुमच्या एचारवाल्या पोरींशी चांगले संबंध (खरे तर प्रेमाचे संबंध म्हन्नार हुतो) हायेत आसं वाटतं, कारन ती सैफ अली खान किंवा पराच्या सरटफिकिटाची अट तुमच्या साठी पेश्शल शिथिल केल्याली वाटते. आसो. परत यकदा हाबिणंदण. बिपिन कार्यकर्ते

अभिनंदन डॉन! थीम चांगली आहेच आणि इतक्या अडचणींना तोंड देउन केलेली हस्तकला तर मस्तच! आपल्याकडची खेडी स्वयंपूर्ण व्हावीत अशी मनापासून इच्छा आहे. :) रेवती

क्लास डेकोरेशन .एकतर आयडिया शोधायची मग वस्तूंची शोधशोध आणि मग मांडणी. ईट टेक्स लॉट्स ऑफ एफर्ट्स. मीनल.

In reply to by अनामिक

असेच म्हणतो! अभिनंदन रे! :)

खुमासदार वर्णन. खेडे छान दिसते आहे. बाकी ऑफिसमधील इतरांच्या क्युबिकल डेकोरेशनचे फोटो पाहिले तर त्या तुलनेत डॉनभाऊ भलतेच सरळमार्गी आणि सात्विक वाटायला लागले. ;)

डॉन राव, अभिनंदन! डेकोरेशन एकदम झकास आहे! फक्त एक प्रश्न पडला आहे: इतके डेकोरेशन क्युबिकल मधे केल्यावर तुम्ही काम करायला कुठे बसता?

In reply to by चतुरंग

रंगाशेठ, तुम्हीच बघा आमच्या भावना समजणारे ... :) असो, विकासराव अहो त्या दिवशी कामाला "ऑफिशियली" सुट होती. इतर दिवशी आम्ही कामाला "ग्रांटेड" सुट घेतो हा भाग अलहिदा ;) ------ (कैच्या कै कामसु) छोटा डॉन

बक्षीस मिळाल्याबद्दल अभिनंदन. आणी हो आमच्या आवडत्या हैद्राबाद शहराच्या विमानतळाची निवड करुन तुम्ही आमच्या मनात एक खास स्थान मिळवलं आहेत हे आम्ही आवर्जून सांगू इच्छितो! :) शैली नेहेमीप्रमाणेच छप्परफाड! (लिखाणाची म्हणतोय मी, नाहीतर याल लावसटासारखे लाळ गाळत ;) ) बाकी डॉनचा अड्डा मात्र कुठे दिसला नाही त्यामुळे थोडी चुटपुट लागून राहिली हे खरेच. :W (मध्यम डॉन)चतुरंग

करा! करा!!! ते जीएम चे शेयरहोल्डर बोंबा मारत बसलेयत आणि तुम्ही क्युबिकल डेकोरेशन करा!!!!:) तिच्यायला, ह्या डॉन्याला पुढले सहा महिने फक्त अन्नम-रसम सुटेल इतकाच पगार दिला पाहिजे!!!!:) काम करायचं सोडून क्युबिकल सजवतोय शिंचा!!!:) सिरियसली - डॉन्या, क्युबिकल छान दिसतेय. पुरस्काराबद्दल अभिनंदन!! अत्यंत सिरियसली - कितीही सजवली तरी क्युबिकल ही शेवटी एक कोठडीच रे डॉन्या!! जन्मठेपेची शिक्षा भोगायला लावणारी!!! :(

In reply to by पिवळा डांबिस

हा हा ..आपण जीएम चे शेअरहोल्डर दिसताय (अमेरिकेचे नागरिक या नात्याने) विनोद आहे बर का हा..हा म्हणजे हे जे लिहिलंय ते..माझे नाव नव्हे :-D डॉनभाऊ, तुमचे अभिनंदन !!

In reply to by शाहरुख

आपण जीएम चे शेअरहोल्डर दिसताय नाय बॉ! नाय म्हणजे शेयर होते, पण हा डॉन्या तिथे काम करतो हे कळल्याबरोब्बर विकून टाकले दीड वर्षांपूर्वी!!! :)

बरेच उशीरा पाहीला धागा. >>मी सांगितले की " शहरांचा विकास होतोय ह्यात वादच नाही, भारतीय शहरे सध्या नुसतेच भारतासाठी महत्वाची नसुन आख्ख्या जगासाठी माहितीची आणि तांत्रिक सेवेचे हब्स झाली आहेत. पण एवढेच संपुर्ण नाही, आज भारतीय खेडीही अशीच स्वयंपुर्ण झाली तर तिथला माणुस नोकरीसाठी उगाच शहराकडे धाव घेणार नाही सध्या प्रमुख्य समस्या असलेली अस्ताव्यस्त आणि गलिच्छपणे विस्तारणारी शहरे आपोआप सुधारतील ... भारताच्या सर्वांगिण प्रगतीसाठी वरील २ गोष्टी सारख्याच आवश्यक आहेत, अन्यथा संतुलन बिघडुन जाईल व सर्व व्यवस्था कोलमडुन पडेल ... हे भाषण तुम्ही लोकसत्तेत पण दिलेत आणि ते सकाळ मधे छापून आले हा भाग अलाहिदा. बाकी लेख छान आणि वरील भाषणात आमचे (म्हणजे आमचेही विचार तसे असल्याने)विचार मांडल्याबद्दल आपले पुनश्च अभिनंदन. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984

तुला थर्माकोलमधे इतकं खेळताना असं वाटलं असेल की जणू गणपतीची सजावट करतोय असेच वाटले असेल. लेख आणि फोटो मस्त. खादाडबोकाशी मात्र त्याच्या मुद्द्याबद्दल सहमत !

In reply to by संदीप चित्रे

आभारी आहे.. पण माझे नाव खादाडमाऊ आहे. मी खरेतर बोकाच आहे पण ते नाव आधीच कोणीतरी घेतले होते. खादाडमाऊ (आता नाव बदलावे म्हणतोय)

छोट्या आता कंपणीमध्ये फ्यान्शी ड्रेस स्पर्धा कधी ते पण कळव...बर्याच आयडीया आहेत आपल्याकडे!!

मस्त रे डॉन्या, लेख आणि सजावट दोन्ही झकास, अभिनंदन! स्वाती

अभिनंदन डॉन शेठ. क्युबिकल डिजाईन आवडले. अभिज्ञ. -------------------------------------------------------- पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.