Skip to main content

रानभाज्या- टाकळा

लेखक जागु यांनी गुरुवार, 16/07/2009 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
कुरडूची भाजी - http://www.misalpav.com/node/8533 कंटोळी - http://www.misalpav.com/node/8546 लागणारे जिन्नस: टाकळ्याच्या ३-४ जुड्या (पाने खुडावीत व धुवुन चिरून घ्यावीत) २ कांदे चिरुन २-३ मिरच्या ३-४ लसुण पाकळ्या ठेचुन पाव चमचा हिंग पाउण चमचा हळद चवी पुरते मिठ अर्धा चमचा साखर पाव वाटी खवलेले ओल खोबर २ मोठे चमचे तेल. क्रमवार पाककृती: तेल गरम करुन त्यात लसूण पाकळ्या व मिरची घालावी. जरा परतवून कांदा घालावा. लगेच हिंग हळद घालून परतवावे व चिरलेला टाकळा घालावा. (हा टाकळा तव्यावर भाजून मग भाजी करण्याची ही पद्धत आहे. पण मी न भाजताच करते) झाकण ठेउन थोडावेळ भाजी शिजू द्यावी. थोड्या वेळाने मिठ व साखर घालावी. जरा परतवून २-३ मिनीटे शिजू द्यावी. नंतर ओल खोबर खालून परतवून गॅस बंद करावा. अधिक टिपा: आंबट आवडत असल्यास थोडा लिंबू पिळावा, तसेच ह्यात डाळीही घालता येतात.

वाचने 23074
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

वा ! मस्त !! --अवलिया ============================= क्या तुमने परबुभाई का नाम नही सुना? .... मैने भी नही सुना :)

शाळेत असताना ज्या भाज्या बळजबरीने खायच्या डब्यात दिल्या जायच्या त्यातली ही एक भाजी. ही भाजी गरमच मस्त लागते.थंड झाली की त्यातली मजा संपली. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न

मेथीच्या भाजी सारखीच दिसते आहे. :-) धन्यु.

In reply to by सहज

हेच म्हणते. आधी वाटले की चुकून मेथीच्या भाजीचा फोटू चढवलाय! कृती एकदम साधी आणि सोपी! रेवती

ह्म्म...एका वेगळ्याच नावाची भाजी. :) (मदनबुवा टाकळीकर) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

जागुताई, पालेभाज्या एकदम वीकपॉइंट आहे हो आमचा... तुम्ही काय काय मस्त नवीन नवीन प्रकार टाकताय!!! धन्यवाद. खायला कधी मिळेल काय माहित. :) बिपिन कार्यकर्ते

In reply to by तर्री

घोळ नावाची पालेभाजीदेखिल असते हे ठाऊक नव्हते. घोळ नावाचा मासा असतो, हे मात्र खरे! बाकी जागु तुम्ही रानभाजी मालिका चालूच ठेवा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

छान लेखमाला. एक 'मायाळू' नावाची पण पालेभाजी असते ना. त्याबद्दल माहित असल्यास ती पण रेसिपी टाका. आमच्याकडे हरभर्‍याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात. बहुतेक वेळा ती भाजी वाळवलेल्या स्वरूपात मिळते. ती पण काय टेस्टी लागते !

In reply to by पक्या

मायाळूची पालेभाजी १२ महिने मिळते. त्याचा भला मोठा वेल पसरतो. त्याची भजी आणि पिठ पेरुन भाजी करतात. मला मिळाल्यावर मी टाकेन रेसिपी. सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रोत्साहनामुळेच मी ही लेखमाला पुढे नेउ शकते.

लागते ही भाजी ,आई तुरडाळ घालुन करायची. आम्ही शिळफाट्या कडच्या डोंगरावर ही भाजी आणायला जायचो तिथे एक सुंदर शंकराचं मंदिर आहे. घोळी ची भाजी पिठल्यात वापरतात किंवा पिठ पेरुन करतात, खानदेशात एक वड्या करतात, त्यात ही वापरतात, त्यांना आम्ही "भेंडके " म्हणतो, त्यात भिजवलेली तुरडाळ भरड वाटुन ही कापलेली भाजी +कांदा+आलं+लसुण+मिरची + धने-जीरे पावडर +मिठ टाकुन वाफवुन बनवतात. कढीबरोबर मस्त लागतात. घोळी ची भाजी थोडी चिकट आणि किंचित आंबटसर असते पण बरी लागते. दिपाली :)

जागु ताई, नेहमीप्रमाणेच झ्याक पाककृती.. आमच्या आईची आवडती भाजी आहे ही! कवळ्याच्या भाजीची पाककृती पण येऊदेत जमल्यास... - कोकणी फणस

In reply to by आशिष सुर्वे

सहज, रेवती ही भाजी मेथीसारखी मिटल्या मुळे दिसते फोटो संध्याकाली काढला त्यामुळे त्याची पाने मिटलेली आहेत. ह्याची पाने संध्याकाळी मिटतात. परत मिळाल्यावर उमललेला फोटो टाकेन. मराठा कवळयाची भाजी अजुन खुप बारीक आहे. ७-८ दिवसांत येईल तेंव्हा टाकते रेसिपी.

टाकळ्यात चण्याची भिजलेली डाळ किंवा मुगाची डाळ घालून भाजी बनवली तर खूप चविष्ट लागते. लहानपणी पावसाळ्यात उपवन येऊरच्या दिशेला फिरायला गेलं की हमखास ही भाजी मिळायची. मी, भाऊ अगदी मजेने ही भाजी खुडायचो. पिशवीभर तरी भाजी आम्ही घरी घेऊन जायचोच. -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे

"चिगुरा"ची ही पाककृती टाकु शकाल ?? सुहास

घोळाची भाजी,.... जरा जपुन... ती नीट साफ करावी लागते... बारिक नजरेने बघावी म्हणजे त्यात असलेल्या बारिक किडी दिसतात.