मायाळूच्या भजीचे साहित्य :
मायाळूची आख्खी पाने स्वच्छ धुवुन
बेसन १ वाटी
हिंग चिमुटभर
पाव चमचा हळद
चवीपुरते मिठ
दोन चिमुट ओवा असल्यास
अर्धा चमचा तिखट
तळण्यासाठी तेल
मायाळूच्या भजीची पाककृती :
मायाळूची पाने आख्खी स्वच्छा धुवुन घ्यावीत. मग तेल सोडून साहीत्यात दिलेले सगळे जिन्नस थोडे पाणी घालून मिक्स करावे. थोडे घट्टच ठेवावे. बटाट्याच्या भजीला ठेवतो तसे. मग मायाळूचे एक एक पान भिजवलेल्या पिठात बुडवुन गरम तेलात सोडावे. गॅस मिडीयम ठेवाव. थोड्या वेळात भजी पलटून मग भजीला किंचीत लालसर रंग आला की काढाव्यात.
मायाळूची पिठ पेरुन भाजीचे (भगरा) साहित्य :
मायाळूची पाने धुवुन चिरुन
बेसन पाव वाटी
१ मोठा कांदा
फोडणी : राई, जिर, हिंग
हळद
१ चमचा मसाला किंवा २-३ मिरच्या
पाव चमचा साखर
अर्धा चमचा गोडा मसाला
चविपुरते मिठ
मायाळूच्या भाजीची (भगरा) पाककृती :
प्रथम कढईत वरील फोडणी द्यावी मग कांदा घालून थोड परतवुन हळद, हिंग मिरची किंवा मसाला घालावा. त्यावर मायाळूची चिरलेली पाने घालावीत. आता थोडावेळ पाने शिजवुन मग त्यात कोरडेच बेसन भुरभुरावे. मग त्यात गोडा मसाला, मिठ साखर घालून वाफेवर शिजू द्यावे. गॅस मंद ठेवावा नाहीतर खाली लागते. बेसन शिजले की गॅस बंद करावा.
अधिक टिपा:
मायाळूच्या पानांचा वेल खुप पसरतो. ही पाने वर्षभर मिळतात. त्याला छोट्या काळ्या बिया येतात त्या जमिनीवर पडल्या कि तिथे ह्याचि भरपुर रोपे उगवतात.
मायाळुच्या पानांची आमटीही करतात. पालकाच्या आमटीप्रमाणे.
वाचन संख्या
18507
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
मायाळूची भाजी
मस्त
असेच
In reply to मस्त by सहज
आमच्या घरी
चविष्ट
रसराज
राग मानु
शानबा यांच्या व्याख्येप्रमाणे
In reply to राग मानु by शानबा५१२
माशांच्या
In reply to शानबा यांच्या व्याख्येप्रमाणे by चित्रा
ओ साहेब
In reply to माशांच्या by शानबा५१२
व्यनी
In reply to ओ साहेब by चित्रा
भाजीचे
जागुताई आता टाकळा राहिला वाटतं
संग्राह्य
शानबा,
भजी आवडली.