अजून पन्नाशीच्या जवळ नाही आहे त्यामुळे अनुभव नाही ;) पण कविता मात्र मस्तच आहे!
शेवटचे कडवे वाचताना मला माझ्या आजोबांची आठवण झाली. त्यांना नुसता रस्ता क्रॉस करून देयला गेलो तरी हे त्यावेळेस ८०+ असलेले म्हणायचे की मी काय म्हातारा झालो का? :-)
वास्तवीक तसेच लता मंगेशकर पण मागच्या वर्षी म्हणाल्याचे आठवते, "मला वाढदिवस साजरे करायला आवडत नाहीत, उगाच म्हातारपण आले असे वाटते" :)
कविता आवडली....
फार वाईट वाटून घेऊ नका --
आमच्या पिढीमागे तर यातल्या काही गोष्टी चाळिशीही यायच्या आधीच लागल्या आहेत ;)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
कविता गमतीशीर आहे.
मी आता पन्नाशी ओलांडून साठीकडे झुकलोय पण माझा वैयक्तिक असा अनुभव मात्र नाही.
नियमित व्यायाम शाळेत जातो. वजनं उचलण्याचे सगळे प्रकार लीलया करतो. मोठेपणा म्हणून नाही पण केस पांढरे झालेत्(ते तर ऐन पंचविशीतच सुरु झाले होते पांढरे व्हायला)इतके सोडले तर शारीरिक दृष्ट्या मी अजूनही तंदूरूस्त आहे.
पण केस पांढरे झाल्यामुळे मी माझ्या वयापेक्षाही मोठा दिसतो. पण त्याचा फायदाच आहे म्हणा. लोक आदराने बोलतात. ;)
हं,आता वयोमानानुसार कानपुरात हरताळ सुरु झालाय. ;) पण सगळे दात अजूनही शाबूत आहेत.....असं बरंच काहीसं सांगता येईल. :D
तरीही मला वाटते कुणाही म्हातार्या/म्हातारीला तसे म्हटलेले सहजासहजी आवडत नाही.
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
आम्ही पण पन्नाशीपासून फार लांब नाही. पण अजूनतरी देवकाकांप्रमाणेच लेखातले अनुभव नाहीत. कसलेही टेन्शन न येण्याचा परिणाम असावा.
>>हं,आता वयोमानानुसार कानपुरात हरताळ सुरु झालाय.
आत्ता समजलं. यांनी कवितेला लावलेल्या चाली यांना ऐकूच येत नसणार आणि त्या कशा आहेत हे कळणारच नाही. (एकदम हलके घेणे)
खराटा
(रंग माझा वेगळा)
आत्ता समजलं. यांनी कवितेला लावलेल्या चाली यांना ऐकूच येत नसणार आणि त्या कशा आहेत हे कळणारच नाही.
कमाल आहे राव! तुम्ही कसं ओळखलंत!
( तुम्हाला म्हणून सांगतो,कुठे बोलू नका. मी मनात आणले ना नुसते गाणे म्हणायचे की मलाच एकामागून एक जांभया यायला लागतात. मग इतरांची काय कथा? ;)
हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!
वाचताना मजा आली ....
काय-द्याच बोला.....
"Why to worry and have wrinkles when you can smile and have dimples."
My blog .... just to spread smiles...
http://ulta-pulta-jokes.blogspot.com/
कविता आवडल्याचं कळवल्याबद्दल सर्वांचे आभार!
किंचित डिसक्लेमरः मी नुकतीच पन्नाशी गाठली असली तरीही, या कवितेत अजून तरी माझं स्वतःचं प्रतिबिंब (सुदैवाने!) पडलेलं नाही. देव साहेबांसारखी (वयात काही वर्षांचाच फरक असल्याने 'काका' म्हणत नाही) 'बलदंड' शरीरयष्टी नसली तरी सध्या तरी अवस्था बरी आहे. ही कविता सुचली ती एका समवयस्क मित्राची नुकतीच कुरकुर ऐकली तेंव्हा. तेंव्हा सध्या तरी हे परदु:ख!
बाय द वे, अशा कवितेच्या प्रकाराला काय म्हणावं? हे विडंबन नाही, तसंच 'वात्रटिका' हेही विशेषण योग्य वाटत नाही.
पन्नाशी उलटून गेली. कवितेतील बहुतेक सर्व अनुभव घेतले आहेत/ घेत आहे. गरजे नुसार आहार, जीवनपद्धती बदलत आहे. काही सुपरिणाम दिसत आहेत. अधिक आरोग्यदायी जीवनासाठी जीम लावली आहे. जमले तर जमले नाहीतर आहेच, आलिया भोगाशी....
लाजायचे काय त्यात?
मुलभूत गरजा भागविण्यासाठी ऐन तारुंण्यात मजा केली नाही. काटकसर करून पैसा जमवला. मुलभूत गरजा भागविल्या. आता आयुष्य एन्जॉय करावे म्हंटले तर च्यायला... डॉक्टराने फांदा घातला. मला वाटते मी मजा मारायला सुरुवात केली तेंव्हा, मला दिसले नाहीत तरी, हे डॉक्टर लोकं गिधाडांसारखे झाडांवर बसून वाट पाहात होते जणू... आता ह्याची विकेट पडणार्....आता पडणार. (आणि पडलीच).
असो. कविता आवडली. अंतर्मुख करविणारी आहे.
मस्त!
छान कविता...
मस्तच!!!
क्या बात है !
मस्त
क्लास
आयला !!!
मनापासून
गमतीशीर!
आम्ही पण
हाहाहा!
लय
कविता
झकास
आहो हल्ली
ह्म्म चुचु
फारच
वा मस्तच !!!
न विडंबन ना 'वात्रटिका'
जबरा!
लाजायचे काय?